प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य  

काठी लोक -  काठी ही काठेवाडामधील अनेक जातींपैकीं एक मुख्य जात असून तिची लोकसंख्या (१९११) २८५८० आहे.  रजपूत टोळ्यांप्रमाणें काठी लोकहि कच्छप्रांतांतूनच काठेवाडांत आले.  परंतु त्यांचे मूलस्थान कोणचें हें अद्याप निश्चित झालें नाहीं.  यांच्या नांवावरूनच या प्रांताला पूर्वीचे नांव सौराष्ट्र असें असतांहि हल्लीं काठेवाड असें पडलें आहे.

काठी लोक आपला इतिहास अगदीं महाभारत कालापर्यंत नेऊन भिडवितात; व यासंबंधी खालील गोष्ट सांगतात.  ''धर्मराज आपल्या भावांसहवर्तमान अज्ञातवासांत गुजराथेंत विराटाच्या आश्रयाला आला तेव्हां दुर्योधन सैन्यासह विराटावर चाल करून आला.  परंतु पांडव गुप्‍त असल्यामुळें त्याला पांडवांनां ओळखून काढतां येईना, तेव्हां त्याचा मंत्री कर्ण यानें त्याला अशी युक्ती सांगितली कीं, विराटाच्या गायी पळवून नेल्यास, त्यांनां सोडविण्याकरितां पांडव प्रकट होतील: परंतु गायी चोरणे हे त्या क्षत्रिय राजपुत्राला न आवडल्यामुळें कर्णानें आपली काठी जमीनीवर आपटून खाट (काष्ठ) नांवाचा एक नवीनच पुरुष निर्माण केला व त्याला गायी चोरावयास सांगून चोरीच्या पापापासून त्याला मुक्त करण्याचे अभिवचन दिलें.''  तेव्हांपासून त्याच्या वंशजांस काठी हें नांव पडले; व चोरी करणें हा आपला हक्क आहे असें ते समजूं लागले.  दुसरी एक दंतकथा अशी आहे कीं, ''आयोध्येच्या सूर्यवंशी वृत्रकेतू राजा नें माळव्यांत माण्डवगड येथें राज्य स्थापलें.  त्यावेळीं या लोकांनां (त्यांच्या जातींसह) त्यानें आपल्याबरोबर आणिलें.  त्याचा मुलगा अजकेतु यानें काट्यांनां बरोबर घेऊन सौराष्ट्रांत प्रवेश केला.''  तेथून ते कच्छांत गेले व हल्लींच्या भूजजवळ पावरगड येथें त्यांनीं राज्य स्थापलें.  सौराष्ट्रांत कालावड येथेंहि त्यांचे एक राज्य होतें.  त्यांचा राजा विशालो होता.  त्याच्या कन्येशी, बालाचमाडीं गांवच्या धानवाला नांवाच्या जमीनदाराचा पुत्र वेरावळजी यानें लग्न केलें व आपण स्वतः काठी झाला.  त्यास सर्व काठी लोकांनीं आपला राजा कबूल केलें.  त्याचा पुत्र वालाजी यानें कच्छच्या जामास पारकरवर स्वारी करण्यास मदत केली.  परंतु पुढें दोघांत वैमनस्य येऊन वालाजीनें जामास ठार मारिलें.  या वालाजीपासून काठ्यांनां वाला हें नांव पडलें.  वेरावळचा दुसरा मुलगा खुमानजी (हा नागांची पूजा करी म्हणून त्याला नागपाल असेंहि म्हणत)  यास दोन पुत्र होते.  पैकीं मानसूर याच्या वंशजांस खुमानजीवरून खुमानवंश नांव पडलें.  मानसूरचा पुत्र नागसूर यानें सावरकुंडला येथें गादी स्थापिली.  वेरावळजीचा तिसरा पुत्र खाचर नांवाचा होता.  त्याच्या वंशास खाचर म्हणूं लागले.  या खाचरांनीं परमारापासून चोटिला गांव घेऊन तेथें गादी स्थापिली (सं. १६२२).  काठी लोक हे हत्ती, नाग, वाघ, वानर व झाडें यांची पूजा करीत.  गुजराथेंत वासुकी व धरणीधर (शेष) यांचीं देवळें यांनीं बांधिली.  फोर्ब्सनें रासमालेमध्यें असें लिहिलें आहे कीं ''काठी लोक हे सिंधच्या सुम्री राजाचे प्रजाजन असून ते पावरभूमींत रहात होते.  पुढें एकदां एका नर्तकीनें नाचतां नाचतां एक गाणें गाऊन राजाचा उपहास केला.  तेव्हां राजानें तिला हद्दपार केलें.  पण काठी सरदारांनीं तिला बोलावून त्यांनीं राजाच्या निंदेचें गाणें तिच्याकडून म्हणवून घेतलें.  ह्यामुळें राजानें काठी लोकांचें आपल्या राज्यांतून उच्चाटन केलें.  तेव्हां सोरठमधील ढांक गांवाचा राजा वालो याच्या आश्रयाला ते जाऊन राहिले.''  त्यांचे मूलस्थान कोणतें हें जरी नक्की समजत नाहीं तरी ते काठेवाडांत पांचशें सहाशें वर्षांपासून आहेत एवढें बरीक खरें.  'ते सिंध आणि कच्छ या प्रांतांमधील ओसाड प्रदेशांत प्रथम वस्ती करून राहिले,'' असें जरी कर्नल वॉकरनें म्हटलें आहे तरी तेथें ते पुष्कळ कालपर्यंत राहिले असावेत असें दिसत नाहीं.  ते इ.स. १४०० सालच्या दुष्काळांत चारण लोकांच्या टोळीबरोबर काठेवाडांत आले व तेथें गुरें चारणें हा एकच धंदा त्यांनीं चालविला असें दिसतें.  त्यांच्यापैकीं कांहीं लोक उमराव पाटकरच्या नेतृत्वाखालीं ढांकला गेले.  तेथें त्यावेळीं धनवालो नांवाचा रजपुत राजा राज्य करीत होता.  तो उमरावची सुंदर मुलगी उमराबाई हिच्या प्रेमपाशांत सांपडला.  त्यानें तिला मागणी घालतांच आपल्या पंक्तीला जेवण्याच्या अटींवर उमरावनें तें कबूल केलें.  धनवालनें उमरावशीं एक पंगत करून उमराबाईशीं लग्न लाविलें; परंतु त्यामुळें त्याचा त्याच्या भावांनीं त्याग केला; तेव्हा तो काठी लोकांचा पुढारी झाला.  त्याला उमराबाईपासून वाल, सुमान व खाचर असे तीन मुलगे झाले.  या मुलांच्या वंशजांनां काठी लोकांतील सन्माननीय लोक समजतात.  त्यांनां शाखायत असेंहि म्हणतात.  इतर काठींच्या वंशजांनां अवर्तिया (इतर काठी) असें म्हणतात.  पुढें धनवालोचे काठी लोक कच्छला परत येऊन तेथील राजाशीं भांडले व एका काठी स्त्रीला त्यानें भ्रष्ट केल्याबद्दल त्यांनीं त्याला ठार मारलें असें म्हणतात.  पुन्हां भीतीमुळें ते तेथून ढांककडे पळाले, परंतु तेथें धनवालोच्या मागून राज्यावर बसलेल्या राजानें त्यांनां अटकाव केला, त्यावेळी त्याचा त्यांनीं पराभव केला.  पुढें कच्छमध्यें जाणें अशक्य झाल्यामुळें ते ढान आणि चोटीला हे प्रांत बळकावून बसले व ढांक हें आपली मुख्य राजधानी करून त्यांनीं तेथें एक सूर्याचें देवालय बांधिलें.  ढांकच्या आसपासच्या कुरणांत ते गुरें चारीत व जवळच्या प्रांतांतून लुटालुट करीत.  वालचे मुगले खुमान, खाचर आणि हर्सुर यांनीं चोटिला, मिथिआली आणि जेतपूर येथें राज्यें स्थापलीं.  परंतु आपल्या राज्याचा विस्तार करण्यापेक्षां त्यांनीं पुष्कळ वर्षेपर्यंत लुटालूटच केली.  काठी लोक फारशी शेती करीत नसत.  सर्वत्र लुटारूपणा करीत, त्यामुळें लोक त्यांनां फार भीत.  काठेवाडांतील पहिल्या १५० वर्षांच्या त्यांच्या अंमलांत त्यांच्या मालकीच्या फारशा जमिनी नव्हत्या.  पुढें मुसुलमानांच्या सत्तेला उतरती कळा लागतांच त्यांनां जमीनजुमला मिळविण्याची इच्छा झाली, तेव्हां मात्र काठेवाडांत ते सर्वत्र पसरले व जाडेजांपासून जसदन व जुनागडच्या आलग राजापासून धानानी हे प्रांत जिंकून घेतले.  नंतर ते अमरेळीला जाऊन कुंडल वगैरे ठिकाणीं वस्ती करून राहिले.  सर्वैय्यारजपुतांनीं त्यांनां चित्रक दिलें, व इतर रजपूतांनींहि त्यांना आणखी कांहीं प्रांत दिले.

याप्रमाणें स्थायिक झाल्यावर त्यांनीं आपली हळुहळू सुधारणा केली.  त्यांच्यासंबंधीं कर्नल वॉकरनें खालील हकीकत (इ.स. १८०८ सालीं) लिहून ठेवली आहे.  तो म्हणतो ''काठी लोक क्रूर व लुटारू असून आपल्या या कृत्यांबद्दल त्यांनां पश्चात्ताप होत नाहीं.  उलट ते आपल्या लुटारूपणाबद्दल फुशारकी मारितात व आपण दरवडेखोर आहों, असें उघड उघड बोलून दाखवितात.  त्यांच्या मालकीचा जमीनजुमला फार नाहीं.  ते जमीनदारांना तुच्छ मानतात.  ते उच्छृंखल असून आपल्याहून बलिष्ठ असतील त्यांच्या प्रांतांत सर्वत्र धुमाकूळ घालून अस्वस्थता माजवितात.  मात्र यांच्या अगदीं उलट वालांच्या अंमलाखालींल (जेतपूर-चितल प्रांतांतील) काठी लोक आहेत.  त्यांनां वॉकरनें सुधारलेले काठी म्हटलें आहे.  त्यांनीं चितल घेतल्यानंतर अमरेळीचा एक व्यापारी जुनागडच्या नबाबाच्या त्रासामुळें त्यांच्या आश्रयाला येऊन राहिला.  त्यानें काठी लोकांना आपली दौलत नबाबाच्या हातून मिळवून देण्यास सांगितलें.  तसें केल्यास त्याबद्दल त्यांना अर्धी दौलत बक्षीस देण्याचें कबूल केलें.  तेव्हां काठी लोकांनीं अमरेळीवर हल्ला करून त्याची दौलत परत मिळविली !  मात्र त्या व्यापार्‍याला ठार मारून ती सगळी दौलत स्वतःच्या घशांत टाकण्याचा त्यांनीं विचार केला.  परंतु त्यांच्या एका स्त्रीनें या गोष्टीचा इनकार केल्यावरून त्यांनीं त्याची सर्व दौलत त्याला दिली.  इतकेंच नव्हे, तर तिचा अर्धा भाग घेण्याचेंहि नाकारलें.  यामुळें त्या व्यापार्‍याप्रमाणें चितल येथें आणखी इतर व्यापारी व तसेच आसपासचे छोटे जमीनदारहि त्यांच्या आश्रयाला येऊन राहिले.  इ.स. १७६० मध्यें जुनागडच्या नबाबानें त्यांनां मेंदई भिल्क व जेतपूर हे महत्वाचे प्रांत दिले.  याप्रमाणें काठी लोकांनां प्रामाणिकपणाची गोडी लागली व त्यांनी लुटालूट सोडून देऊन चांगल्या प्रकारें राज्य करावयास सुरुवात केली.

मात्र जस्दनच्या खाचर नांवाच्या काठी राजानें हा लुटालुटीचा धंदा बरीच वर्षे सोडला नाहीं.  त्यानें लिंबडी, धंदुका आणि रानपूर या प्रांतांत लुटालूट चालविली होती.  त्याच्या मागून त्याचा पुतण्या वडसर यानें मात्र लुटालूट टाकून देऊन आपल्या जहागिरीची नीट व्यवस्था केली.  तथापि यांपैकीं कांहीं धाडशीं लोक गीरच्या डोंगरांत राहून आसपासच्या प्रदेशांत त्रास देत.  पन्नास वर्षांपूर्वी विसावदार वगैरे प्रांत कांहीं काल काठी लोकांच्या ताब्यांत होते.  ह्या प्रांतांचें क्षेत्रफळ मोठें पण सर्वत्र दाट झाडी, त्यामुळें तेथें फारशी वस्ती नव्हती.  म्हणून तेथील सारा वसूल तेच दाबून बसत.  पुढें बांटवाच्या नबाबानें त्यांच्यावर स्वार्‍या केल्या तेव्हां ते गीरच्या रानांत जाऊन पुन्हां लुटारू बनले.  त्यांच्यापैकीं वाल राणिंग नांवाच्या एका काठी सरदारानें मल्हारराव गायकवाडाला फितुरीनें फसविलें.

पुढें वाल राणिंग व वाल मातर या काठी सरदारांत तंटे सुरू झाले.  दोघेहि काठेवाडांत लुटालूट करीत असत.  वाल राणिंगचा धाडशी मुलगा बाव वाल यानें तर इ.स. १८२० त हिंदुस्थानच्या आरमारांतील कॅप्टन ग्रँटला पकडून गीरच्या डोंगरी किल्ल्यांत चार महिनेपर्यंत कोंडून ठेविलें होतें.  या शौर्याच्या कृत्याबद्दल काठेवाडांत लोक अद्यापि त्याची प्रशंसा करतात.  इ.स. १८२४ मध्यें बाव वाल मेल्यानंतर त्याची सर्व जहागीर जुनागड संस्थानच्या ताब्यांत गेली.  बाव वालच्या शौर्यावरील पोवाडे तिकडे फार प्रख्यात असून ते अद्यापि चारण, भाट व स्त्रियांच्या तोंडीं आहेत.  काठी लोकांचें सर्वांत शूर कुल म्हटलें म्हणजे काठेवाडच्या नैर्ॠत्येकडील खुमान काठी यांचे होय.  हे लोक कूंदला या सुपीक प्रदेशांत रहात व भावनगर प्रांतांत लुटालूट करीत.  सरते शेवटीं त्यांच्यांत आपापसांत भांडणें लागली असतां भावनगरवाल्यानें त्यांचा मोड केला (१७९६).  त्याचप्रमाणें भावनगरकर बखतसिंगजीनें बोटाड आणि गधड येथील काठी लोकांचाहि पाडाव करून त्यांची सत्ता संपुष्टांत आणली.  हल्लीं काठी लोकांची महत्वाचीं राज्यें म्हटलीं म्हणजे जेतपुर, चितल व जस्दन हीं होत.  बगसर, चोटिला, बाबरा, पलिआद येथें काठी जहागीरदार आहेत.  काठी लोकांत पूर्वी सर्व भावांचा समान वारसा समजला जाई.  परंतु या पद्धतीचे दुष्परिणाम त्यांनां कळूं लागल्यामुळें हल्लीं ते रजपुताप्रमाणेंच ज्येष्ठ पुत्राला वारस मानूं लागले आहेत.  

काठी हे पूर्वी गुरें चारणारे असून त्यांनां जनावरें फार आवडत.  हल्लीं सुद्धां काठी हे गुरांचे मोठे कळप पाळतात, व घोड्यांची उत्तम निपज करतात.

काठी लोक सूर्योपासक असून ते प्रत्येक कार्यामध्यें कोळ्याच्या (किडा) आकाराची सूर्याची खूण उपयोगांत आणतात; व तिच्याखाली 'सूर्यनारायणाची प्रतिमा' असें लिहितात.  त्यांचें पहिलें देवालय ढांक येथें होतें.  परंतु पुढें तें देवालय परमारांनीं आपल्या ताब्यांत घेतलें.  काठी लोक हे देव, गाय व ब्राह्मण यांनां पूज्य मानतात.  ते देवेभोळे असून शकुनांवर विश्वास ठेवतात.  अंत्यकर्माच्या वेळीं कावळ्या ऐवजीं धाकट्या तनमोर पक्ष्याला ते पिंड देतात.  काठी लोक सुस्वभावी पण निरक्षर व आळशी असून चकाट्या पिटण्यांत व मजा मारण्यांत वेळ घालवितात.  त्यांच्यांत खाण्यापिण्यासंबंधी फारसा धरबंध नाहीं.  काठी स्त्रिया सुंदर, सुस्वभावी व सद्‍गुणी आहेत.  त्यांच्यांत स्त्रीपुरुषांचे समान हक्क मानले जातात एवढेंच नाहीं तर, रजपुतांप्रमाणें यांच्यांत पुरुषांवर स्त्रियांचा वरचष्मा असतो.  अविवाहित अगर विवाहित स्त्रिया हातांत बांगड्या घालीत नाहींत.  काठी स्त्रियांचा पोषाख काळा व नीटनेटका असतो.  काठी पुरुष सहसा एकापेक्षां अधिक बायका एकाच वेळीं करीत नाहींत.  विधवाविवाहाला जरी प्रतिबंध नाहीं, तरी फारसे विधवाविवाह यांच्यांत होत नाहींत; जे होतात ते धाकट्या दिराशींच होतात.

काठी लोकांची नेहमी ऐकण्यांत येणारी हकीकत व कर्नल वॉटसननें दिलेली हकीकत या दोहोंत फार अंतर आहे.  हे लोक मध्यआशियामधून हिंदुस्थानांत आले असें वॉटसनचें म्हणणें आहे; परंतु तो त्यास सबळ पुरावा देत नाहीं.  दुसर्‍या कांहींच्या मतें काठी लोक प्रथम आशियामायनरमधील खुर्दिस्तान प्रांतांत वसाहत करीत होते.  तेथून त्यांनां असुरियाचा पहिला तिग्लथ पिलेसर यानें हुसकावून लाविलें.  असुरियन शिलालेखांत त्यांनां खट्टी व जुन्या करारांत (बायबल) हिटाइट असें म्हटलें आहे.  यावेळीं खट्टी लोकांचें कार्चेमिश हें राजधानीचें ठिकाण होतें.  त्यांनां घोडे व रथ यांचा फार शोक असून ते भाडोत्री सैनिक होण्यास एका पायावर तयार असत.  पुढें त्यानीं दमास्कसचा राजा बेनहादाद याची बाजू उचलली.  त्यांत असुरियाच्या सार्गननें त्यांच्यावर स्वारी केली.  यानें कदाचित खट्टी लोकांनां आपल्याबरोबर कैद करून नेलें असावें; कारण याप्रमाणें जित राष्ट्रांतील सर्व प्रजेला कैद करून नेण्याची त्यांची वहिवाट होती.  यावेळी आशियामध्यें मीडिया आणि पर्शिया ही राज्यें वैभवाच्या शिखराला जाऊन पोहोंचली होती.  हॅड्रोओटिस नदीपासून ३ दिवसांच्या मजलीवर असलेल्या संगल गांवीं खट्टींनीं आलेक्झांडर बादशहाला आडविलें होतें.  यानंतर केव्हां तरी खट्टी हे पूर्वेकडे गेले असावेत असें दिसतें.  काठी हे भटकणारे असून ते कोणाच्याच छत्राखालीं रहात नाहींत असे मॅरियननें म्हटलें आहे.  ही परकीयांनीं दिलेली माहिती झाली.  

आतां भाटांच्या बखरी पुढील माहिती देतात.  काठी लोक हे जेसलमीरच्या शालिवाहनाच्या कारकीर्दीत (११६८) जालोर शहरीं व अरवलीच्या माथ्यावर रहात होते.  नंतर ते माळव्यांत येऊन तेथून मग कच्छांत व कच्छांतून काठेवाडांत उतरले.  कदाचित ते जालोरहूनच थेट कच्छ प्रांतांत आले असावेत.  काठेवाडांत पहिल्यानदा केव्हां आले, हें सांगणें कठीण आहे.  वाल हे खाचरांच्या अगोदर व बाब्रिया हे वालांच्याहि पूर्वी तेथें येऊन राहिले असावेत.  खुमान हे खाचरांच्या बरोबर अगर त्यांच्यापूर्वीच येऊन राहिले असावेत.  ज्यावेळी खाचर काठेवाडांत आले, त्यावेळी अगर त्यानंतर कांहीं काळानें धांदल लोक उदयास आले.  खाचर हे इ.स. १४०० च्या सुमारास आले असावेत.  ते प्रथम ढांक येथें रहात; तेथून पुढे ते चोटिला येथें गेले.  या दोन ठिकाणांहून मग ते सर्व पंचमहालभर पसरले.    शेजारच्या मुसुलमानी व मराठ्यांच्या प्रदेशांवर ते पुढें दरवडेहि घालूं लागले.

त्यांच्याविषयींचा अगदीं पहिला उल्लेख मिरात-इ-सिकंदरी या ग्रंथातील होय.  तसेंच सौराष्ट्राचा 'काठेवाड' या नांवानें केलेला पहिला उल्लेख मिरात-इ-अहमदी या ग्रंथांतील होय.  भाटांच्या इतिहासांत त्यांच्या उत्पत्तीविषयीं पुढील माहिती आहे.  वाल रजपूत राजा वेरावळजी व अवर्तिया काठीवंशीय) विशाल पटगर याची मुलगी यांच्यापासून बाल, खुमान आणि खाचर काठी लोक उत्पन्न झाले.  यांनां 'शाखायत' हे नांव पडलें व इतर या अर्थाच्या 'अवर' (अपर) या शब्दावरून इतरांनां 'अवर्तिया' असें नांव पडलें.

दुसरी एक हकीकत पुढीलप्रमाणें आहे.  बाब्रिया आणि जेठवा यांच्या नात्याच्या पुष्कळ टोळ्या काठेवाडांत येऊन राहिल्या.  त्यांच्या मागून वाल लोकांची टोळी आली.  हे जेठवा वाल व चमार्डीचे वाल हे आपल्याला रजपूत म्हणूं लागले.  जेठवा हे बाब्रिया आणि वाल लोकांशीं बेटीव्यवहार करतात.

वालांपैकीं धाक राजा हा जरी आपल्याला वाल रजपूत म्हणवितो तरी धाक राणीचा (पोरबंदरच्या कागद पत्रांत) ''काठिआनि बाई'' अगर ''काठिआनि मा'' या नांवानेंच उल्लेख केलेला आहे.  यावरून वाल रजपूत हे पूर्वी काठी असावेत असें दिसतें.  काठी लोक जेथें जेथें जातात तेथें तेथें ते आपल्याबरोबर मांडू हें नांव नेतात.  त्यांनीं माळवा प्रांतांत एक मांडू म्हणून गांव स्थापिलें आहे.  यावरून ते नेपाळहून काठेवाडांत आले असावेत असें दिसतें.  प्रथम त्यांची एक शाखा पंजाबामध्यें मूलतान (मूलस्थान) येथें राहिली असावी, तेथून ती काठेवाडांत आली तेव्हां तिनें आपल्याबरोबर मांडू व ठान हीं दोन्ही नांवें आणिली.  ठान हें त्यांचें पूर्वीचें मांडव टेकडी जवळील रहाण्याचे ठिकाण होते.  रेवाकांठानजीकच्या माळवा प्रांताच्या भागाला (तेथें हे पूर्वी रहात असल्यानें) काठी असें अद्यापि म्हणतात.  एकंदरींत पुढें आपल्याला रजपूत म्हणवून घेणारे वालकाठी माळव्यांतून व खुमान आणि खाचरकाठी मुलतानहून जेसलमीर, अबू व कच्छ या मार्गानीं काठेवाडांत आले असावेत हें संभवनीय दिसतें.

काठींपैकी शाखायतांत एकाच कुलांतील वधुवरांत, अगर दोन भिन्न शाखायत वर्गांतील वधुवरांत विवाह होत नाहींत.  शाखायत आणि अवर्तिया यांच्यामध्यें विवाह होऊं शकतो.  शाखायतांत, वाल, खुमान, खाचन, हाटी आणि जोगिया खुमान अशा पांच शाखा आहेत व अवर्तियांत मांजरिआ, तोहरिआ, नरद अगर जातवड, गरीब, गुलिआ, पाडवा, नाटा आणि परगार या आठ शाखा आहेत.  बाब्रिआ अगर बर्बर लोक हे शाखायत व अहार यांच्याशीं नेहमीं बेटीव्यवहार करीत.  कोटिल, धाणकदा व वरू अशा तीन शाखा बाब्रियांत आहेत.  यापैकीं कोणत्याहि दोन कुलांतील वधुवरांत विवाहसंबंध होऊं शकतो.  अवर्तिया काठी लोक ब्राब्रियांनां अवर्तियाच समजतात.  म्हणून त्या दोघांत बेटीव्यवहार होत नाही.  काठीपैकीं अहिर लोक आपापसांत व इतर जातींशीं विवाह करतात.  मात्र अवर्तिया काठी लोकांशीं करीत नाहींत.

काठी आणि अहिर लोकांचा अबुल फझलनें आपल्या ऐनेइ अकबरी ग्रंथांत उल्लेख केलेला आहे.  त्यानें सोरठविषयीं असें लिहिलें आहे कीं, ''या प्रांतांत अहीर जातीचे पुष्कळ काठी लोक आहेत.  हे लढाईसाठीं घोड्यांची अवलाद तयार करतात.  त्यांच्या सैन्यांत ६००० घोडेस्वार व ६००० पायदळ आहे.  त्यांचे घोडे आरबी अवलादीचे असतात.  त्यांची वर्तणूक साधारणतः लुच्चेगिरीची असते.  तरी पण ते आतिथ्यपर आहेत.  दिसण्यांत ते फार देखणे आहेत.  धोंडी नदीच्या तीरावर काठी लोकांच्या वसतीजवळच बोरिया नांवाच्या अहीर जातीचें वसतिस्थान आहे.  त्यांच्याजवळ ३००० घोडेस्वार व तितकेंच पायदळ आहे.  या लोकांचें जामशीं सदैव वैर असतें.''  प्राचीन काठीवालांविषयी जेठवा आणि चुडासमा लोकांच्या इतिहासांत उल्लेख आला आहे.  यावरून ते या प्रांतांत हजारबाराशें वर्षे रहात असावेत असें दिसतें (वाल काठी अगर काठीवाल हे लोक जेथें राहतात तो प्रदेश काठीवाल अगर काठेवाड होय).

परंतु कांहींच्या मते अर्वाचीन वाल आणि खुमान, यांनां काठेवाडांत येऊन पांचशें वर्षे आणि खाचर यांनां चारशें वर्षे झालीं असावींत.  तत्पूर्वी त्यांनीं कच्छप्रांत सोडला नव्हता.  रावळजामानें सोळाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास, काठी लोकांवर स्वारी करून त्यांनां भादर नदीच्या दक्षिणेस पिटाळून लाविलें.  पुढें ५० वर्षांनीं खर्डीचा प्रसिद्ध लोम खुमान यानें सुलतान मुझफरशाहला आश्रय दिला होता.  त्यापुढील हकीकत अबुल फजलनें ऐनेइअकबरी ग्रंथांत दिली आहे; आणि त्यानंतरची हकीकत मिरात-इ-अहमदींत आहे.  अठराव्या शतकांत शुजात खानानें ठानवर हल्ला करून तेथून खाचन लोकांनां हांकून दिलें.  याच्याहि नंतरची माहिती दिवाण रणछोडजीनें दिली आहे.  या माहितींत प्राचीन व अर्वाचीन काठी, म्हणजे खाचर व खुमान यांमधील भेद फार उत्तम तर्‍हेनें दाखविलेला आहे.  तो म्हणतो कीं, काठी लोकांचीं ३० कुळें असून, त्यांच्यापैकीं कांहीं पंजाबांतून व कांहीं सिंधमधून काठेवाडांत आलीं.

पुढें ढांकच्या रजपूत वाल राजानें त्या काठी कुळांतील एका स्त्रीशीं विवाह केला.  हीन जातींतील स्त्रीशीं विवाह केल्यामुळें त्या राजाला त्याच्या जातींतील लोकांनीं वाळींत टाकलें, तेव्हां तो काठी जातीचा बनला.  त्याला त्या काठी स्त्रीपासून दोन मुलगे झाले, त्यांची नांवें खुमान व खाचर हीं होत.  त्यांनां जुनागडच्या राजानें कांहीं प्रांत दिला.  त्या प्रांतांत काठी लोकांची पुष्कळ वस्ती होतांच त्याला काठेवाड हें नांव पडलें.  काठी लोक मांस खातात व कांहीं दारूहि पितात.  यांचे उपाध्याय मोघ (मग?) ब्राह्मण आहेत.  जेतपुर येथें यांची एक मध्यवर्ती पंचायत असून तिचा अधिकार सबंध काठेवाडावर आहे.

एका वरवालकाठीनें नबाब बाहादुरखानाच्या परवानगीनें जेतापुर येथें एक देवालय बांधिलें.  काठी लोक जुनागडच्या राजाला दरसाल खंडणी व एक घोडा देतात.  सांपडतील त्या सुंदर स्त्रिया पळवून नेण्याची वहिवाट काठी लोकांत पूर्वी असल्यामुळें त्यांच्या स्त्रिया सुंदर असतात अशी ख्याति आहे, परंतु हल्लीच्या काठी स्त्रिया दिसण्यांत उग्र व धिप्पाड दिसतात.  काठी लोक जात्या शूर, उदार व आतिथ्यपर आहेत, काठेवाडांत त्यांचें जेतपुर, मंदर्द, बिल्ख, बगसर, कुंडल वगैरे मोठे किल्ले आहेत.  यांची महिआ म्हणून एक पोटजात आहे.  ती काठेवाङ्‌मधील सोरठप्रांतांत व गीरच्या डोंगराळ प्रांतांत आढळते.  ते अत्यंत त्रासदायक लोक आहेत.  त्यांनीं इ.स. १८६७ सालीं बंड केलें होतें.  तेव्हां त्यांनां माफी करण्यांत येऊन शेतीसाठीं कांहीं जमीन बहाल करण्यांत आली.  इ.स. १८७३ सालीं त्यांनां निःशस्त्र करण्यांत आलें.  हे आपापसांत विवाहसंबंध करतात.  हे हल्लीं शेती करतात.  कांहीं सैन्यांतहि दाखल झाले आहेत.  पुष्कळसे काठीलोक जमीनदार व तालुकदार आहेत.  यांच्या चालीरीति काठी आणि रजपूत लोकांच्या चालीरीतींप्रमाणें आहेत.

(संदर्भग्रंथ -  मुं. ग्या. भा. ८.  काठेवाड; वॉटसन; वॉकर; लो - इं. ने; टॉड - राजस्तान भा. २; ऐने-इ-अकबरी; मिरात-इ-शिकंदरी; मिरात-इ-अहमदी)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .