प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य  

कांजीवरम, तालुका :-  हा मद्रास इलाख्याच्या चिंगलपट जिल्ह्यांतील पश्चिमेकडील एक तालुका असून याचें क्षेत्रफळ ४१२ चौरस मैल आहे.  १९२१ सालीं याची लोकसंख्या २४०३९९ होती.  या तालुक्यांत कांजीवरम व श्रीपेरुंबुदुर हीं दोन शहरें व ३६४ खेडीं आहेत.  यांपैकीं पेरंबाक्कम नांवाचें खेडें इतिहासप्रसिद्ध आहे.  येथील सार्‍याचें उत्पन्न सुमारें ५ लाख रुपये आहे.  या तालुक्यांतील जमीन हलक्या दर्जाची आहे.  एकंदर प्रदेश सपाट असून तो पालर नदीच्या उत्तरेस व पश्चिमेस उंच होत जातो.  पालर नदीच्या तीरावरच चिंच, नाराळ व खजूर यांचीं झाडें आहेत.  या तालुक्यांत पालर व कोर्त्तलईयार या नद्यांचे कालवे आहेत.

शहर -  कांजीवरम तालुक्यांतील शहर.  लो. सं. (१९२१) ६१३७६.  साऊथ इंडियन रेल्वेच्या चिंगलपट आर्कोनम फांट्यावर हें शहर आहे.  मोक्षदायक सात पुर्‍यांपैकी एक.  पूर्वीचें नांव कांची, कांचीपुरम् असून हल्लीचें कांजीवरम आहे.  हें मद्रास इलाख्यांत चिंगलपट जिल्ह्यांत आहे.  पूर्वी ही पल्लवांची राजधानी होती.  द्रविड देशाचें हें कांहीं दिवस मुख्य ठिकाण होतें.  या प्रांताचा घेर ५०० कोसांचा होता असें ह्युएनत्संग म्हणतो.  त्यानें याच्या पूर्वपश्चिमेस इतर देश सांगितले नसल्यानें त्यावेळीं हा प्रदेश दोन्ही कांठच्या समुद्रापर्यंत पसरलेला असावा.  उत्तरेस पलिकत सरोवर व पश्चिमेस कावेरीपर्यंत अशी ही सीमा असावी.  भारतांत द्रविड देशाचा उल्लेख आहे.  वराहमिहिरानें व भागवतानें (स्कंद पुराणानें व बृहत्संहितेनें) कांचीचा उल्लेख केला आहे.  समुद्रगुप्तानें कांचीच्या पल्लवांवर स्वारी करून तेथील राजा विष्णुगोप याला मांडलिक बनविलें होतें.  पल्लव व चालुक्य यांचीं नेहमी भांडणे होत व त्यांत कांची हें शहरहि दोघांच्या ताब्यांत वेळप्रसंगी जाई. विक्रमादित्य चालुक्यानें वीर राजेंद्र चोलाच्या ताब्यांतील हें काबीज केल्याचें बिल्हण लिहितो.  ह्युएननें पल्लव राजाचें नांव किंवा खास पल्लव हें नांवहि दिलें नाहीं.  तो त्या राज्याला द्रविड राज्य असेंच म्हणे.  तो म्हणतो तेथें १०० संघाराम व दहा हजार भिक्षु आहेत.  हे महायान पंथी आहेत.  येथील जमीन सुपीक असून, लोक सद्‍गुणी, धाडशी; विश्वासु, पाहुणचारी व विद्वान् असे आहेत.  ह्यांची लिपी व भाषा ह्या उत्तरेकडील लिपी व भाषेपेक्षां निराळ्या आहेत.  या शहराच्या मांडणीचें कौतुक प्रो. गेड्डीज यानें फार केलें आहे.  तो म्हणतो कीं येथें मोठमोठीं देवळें व अप्रतीम कलाकुसरीच्या इतर इमारती आहेतच, पण अतिशय पद्धतशीर व मोठ्या प्रमाणावर दोरीसूत व सर्व सुखसोईची काळजी घेऊन, जी शहराची आंखीव मांडणी व शोभादायक रचना केली आहे, तशी शहररचना सार्‍या हिंदुस्थानांतच नव्हे तर जगांत कोठेहि माझ्या दृष्टीस पडली नाहीं'' पल्लव राजांच्या वेळचे दगडावरील कोरीव कामहि पहाण्यासारखें आहे.  गणेशरथ, कैलासनाथ मामलपुरम् मुक्तेश्वर कामाक्षी इत्यादींचीं देवळें व इमारती याची साक्ष पटवितात.  येथील अनेक देवळें ८ व्या शतकांत राजसिंहाच्या वेळीं बांधलेलीं आहेत.  

कांजीवरम हें यूरोपियनांनीं दिलेलें अपभ्रष्ट नांव आहे.  येथील सर्वांत जुनी इमारत इ.स. च्या ७ व्या शतकांतील आहे; परंतु त्याच्याहि पूर्वी ८०० वर्षे हें शहर प्रख्यात होतें.  सारांश विद्येसाठीं काशीप्रमाणें हें शहरहि दोन हजार वर्षांपासून प्रसिद्ध आहे.  शिल्पशास्त्राशाला हें शहर फार महत्वाचें वाटेल.  बौद्ध, हिंदु व द्रवीड या तिन्ही (भव्य व नाजूक) शिल्पकला येथें आढळतात.  धर्मजिज्ञासूलाहि येथे बरेंच खाद्य मिळेल.  आज दोन हजार वर्षांत ज्या कांहीं धार्मिक चळवळी खुद्द दक्षिणेंत निपजल्या अगर दुसरीकडे उत्पन्न झाल्या त्यांचा स्पर्श या गांवाला झालेला असून त्यांचा ठसा अद्यापीहि येथें पहावयास सांपडतो.  अद्यापि पुष्कळ शोध व्हावयास पाहिजे.  तसा झाल्यास या शहराच्या पोटांतील अनेक प्रकारचा गुपित इतिहास उजेडांत येईल.  पंतजलीच्या भाष्यांत कांचीचा उल्लेख येतो (ख्रि.पू. ३ रें शतक) त्यावरून त्याच्याहि आधीं आर्यांनीं येथें वसाहत केली असावी असें दिसतें.  बुद्ध पूर्वजन्मी येथें राहिला होता असें ह्युएनत्संग म्हणतो.  महावंशांत कांचीपर्यंत अशोकाचे धर्मोपदेशक आल्याचें नमूद केलें आहे.  तामीळ महाकाव्य ''मणिमेखलाई'' यांत कांचीचा उल्लेख येतो.  काव्याचा काळ सर्वसाधारण २ रें शतक मानितात.  याच सुमारास पल्लवांचें राज्य येथे प्रस्थापित झालें.  तत्पूर्वी पूर्वचोलांचे साम्राज्य येथें होतें.  चवथ्या शतकांत कांची ही पल्लवांची राजधानी झाली, ती चारशें वर्षे टिकून राहिली.  धर्मपाल नांवाचा प्रख्यात बौद्ध पंडित येथला रहिवासी होता.  जैन लोकहि पल्लवांच्या वेळीं येथें बरेच होते.

एलफिन्स्टनच्या मतें येथील प्राचीन देवळांचा नमुना मूळच्या बौद्ध व चैत्य विहारांचा आहे.  पुढील प्रख्यांत आळवार व इतर तामीळ कवींपैकीं बरेच जण येथील रहिवासी होते.  बौद्ध व जैन देवळांप्रमाणेंच शैव व वैष्णव देवळेंहि येथें बरीच आहेत.  देवरम् वगैरे बौद्ध काव्यांत त्यांचे वर्णन येतें.  आद्य शंकराचार्यांनीं या गांवास भेट दिली होती.  त्यांनीं बौद्ध, जैन, शैव, वैष्णव या सर्व पंथांचें बंड मोडून तेथें अद्वैतमतस्थापना केली.  याची साक्ष तेथील कामाक्षीच्या देवळांत पटते.  नवव्या शतकांत पल्लवांकडून उत्तर चोलांनीं कांची हिसकावून घेतली ती त्यांच्याकडे १४ व्या शतकापर्यंत होती.  या काळांत या चोलांनीं अनेक देवळें येथें बांधली.  पुढें अकराव्या शतकांत तर रामानुजाचार्यांनीं विशिष्टाद्वैत वैष्णव धर्माची पताका येथें प्रामुख्यानें फडकाविली.  त्यानें येथेंच आपलें मुख्य ठिकाण केलें होतें.  १४ व्या शतकानंतर येथें विजयानगरकरांचा अंमल चालू झाला.  तो ३०० वर्षेपर्यंत (१७ वें शतक) होता.  येथें त्यांचा सुभेदार राही.  साधारण १६४६ पर्यंत विजयानगरकर व चंद्रगिरीकर यांच्या ताब्यांत हें शहर होतें.  त्यानंतर कुत्बशहानें तें घेतलें.  इ.स. १६७७ त मराठ्यांनीं हें घेतलें.  यादवांच्या कारकीर्दीत येथील जुन्या देवळांची दुरुस्ती झाली.  कांहीं नवीन देवळेंहि त्यांनीं बांधिली.  त्यांनां मोठमोठीं इनामें तोडून दिलीं.  मराठ्यांपासून हें गांव पुढें औरंगझेब व त्यानंतर कर्नाटकचा नबाब यांच्या ताब्यांत होतें.  म्हैसूर व कर्नाटकच्या लढायांत मोठ्या देवळांचा उपयोग किल्ल्यांसारखा करीत (१७६८;१७८०).  त्यावेळीं बहुतेक देवळांतील मूर्ती हैदरच्या भीतीमुळें तंजावरास नेल्या होत्या.  त्या इ.स. १८०० मध्यें परत आणल्या.  हा जिल्हा १७५९ त कर्नाटकच्या नबाबानें ई. इं. कंपनीस दिला.  तेव्हांपासून आजपर्यंत तो इंग्रजांकडेच आहे.  मुसुलमानांनीं येथें मोठमोठ्या मशीदीहि बांधल्या आहेत.  हल्लीं कांचीचा तीन कोसांचा विस्तार आहे.  अद्यापिहि येथें प्राचीन आदिद्रविडांच्या क्रूर देवींची पूजा कांहीं कांहीं ठिकाणीं दृष्टीस पडते.  शिवकांची व विष्णुकांची असे याचे २ भाग आहेत.   परंतु या भागांत परस्पर भिन्न देवांचीं देवळेंहि आहेत.  येथील एकांबरेश्वरा (शंकरा) चें देऊळ सार्‍या हिंदुस्थानांत मोठें आहे.  तें पल्लवांच्यावेळीं बांधलेलें व पुढें अनेकवेळां दुरुस्त झालेलें आहे.  त्याचा घेर २५ एकर व गोपुर १८८ फूट उंचीचें आहे.  शिवकांचींत सात वारांची सात मोठीं व पवित्र तळी आहेत.  विष्णुकांचीतील सर्वांत मोठें देऊळ वरदराजा (विष्णु) चें आहे.  यांत चोल व यादव घराण्यांचे अनेक शिलालेख आहेत.  यांतच रामानुजाचार्य रहात असत व हल्लीं त्यांचा मठहि येथेंच आहे.  याची लांबी १२०० व रुंदी ८०० फूट आहे.  याचा १०० खांबी सभामंडप म्हणजे विजयनगरकालीन कलाकौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे.  हैदरनें हें देऊळ लुटलें होतें.  या देवाची वैशाखांत १२ दिवस यात्रा भरते, व शेवटी रथोत्सव होतो.  रामानुजाचार्यांच्या पंथांतच पुढें तेनकलई व वडकलई असे दोन पोटभेद झाले व हल्लीं त्यांच्यांत वेळप्रसंगी तंटेहि होतात.  या गांवीं सर्व हिंदुस्थानांतील लोक यात्रेसाठीं नेहमीं येतात.  अद्यापिहि विद्येबद्दल हें स्थळ प्रसिद्ध आहे.  विशिष्टाद्वैत मताची एक मोठी पाठशाळा येथें असून, इतर संस्कृत पाठशाळा व इंग्रजी हायस्कुलेंहि आहेत.  येथें १८६६ त म्युनिसिपालिटी स्थापन झाली.  येथें सुती व रेशमी कापड चांगलें तयार होतें.  दागिने व तांबेपितळेचीं भांडीं तयार करण्यांत येथील कारागीर प्रसिद्ध आहेत.

(सेवेल-लिस्:-अॅंटि.; फर्गा-एम्पा; साऊ.इंडि इन्स्कि.; एपि. इंडि. १९०५-६; बील-बुधिस्ट रेक-वेस्ट. वर्ल्ड; क्रोल-म्यान. चिंग. डिस्ट्रि; कनकसभे-तामी.एटी. हंड्रे. अॅंगो; फर्ग्युसन-हिस्ट इंडि. ईस्ट. आर्कि; वेंकय्या - पल्लव; रे - पल्लव आर्कि; सुब्र. अय्यर-एन्श.  हिस्ट. कांजी; ओरि. बुधि. जैनि. सद. इंडि; र्‍हीस डेव्हिड्स-बुधि. इंडि; कृष्ण. अय्यंगार- एन्श. इंडि; गोविंदाचार्य-रामानुजाचार्य; कुष्णस्वा. अय्यर-शंकराचार्य; राजगोपाळाचार्य- वैष्ण. रिफा. इंडि; स्मिथ-एन्शंट इंडिया).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .