प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य  

काची -  अथवा काछी, काचिया.  एक शेतकरी जात.  कक्ष म्ह.  कुंपण किंवा कर्ष म्हणजे तास या संस्कृत शब्दापासून या जातिनामाची उत्पत्ति सांगतात.  यांची सर्वांत मोठी वस्ती उत्तरहिंदुस्थानांत आहे.  १९११ च्या खानेसुमारींत गणती केलेल्या १३०४२९६ काची लोकांपैकीं संयुक्तप्रांतांत ७२८८००, मध्यहिंदुस्थानांत ३७२४९६, व राजपुतान्यांत ६०६६६ होते.  मध्यप्रांतांतहि लाख दीड लाख लोक आहेत.  बहुतेक काची हिंदुधर्मीय आहेत.  मुसुलमान दोन हजारांपर्यंत सांपडतील.  

उत्तर हिंदुस्थान :-  उत्तम शेतकर्‍यांमध्यें या लोकांची गणना होत असून फळें, ऊस, अफू या जास्त किफायतीच्या लागवडींत हे मन घालतात व रजपुतांच्या कच्छवाहजातीशीं हे संबंध जोडूं पहातात.  ही जात विशेषेंकरून शाक्तपंथाची दिसते; कारण दुर्गादेवी व तिचें दुसरें एक स्वरूप शीतळादेवी (गोंवराची देवी) हिची उपासना हे लोक करितात व हिंदूंतील जुन्या पुराण्या देवतांनां फारसे मानीत नाहींत.  रोग निवारण करणार्‍या व पीक वाढविणार्‍या नागरसेन, चामर यांसारख्या स्थानिक देवतांनां हे पूज्य मानतात.  धरित्रीमाता व तिचा पति भूमिया या यांच्या ग्रामदेवता होत.  मदारसाहेब, सय्यदमर्द वगैरे किरकोळ मुसुलमान देवताहि यांच्यांत आहेत.

मध्यप्रांत व वर्‍हाड :-  लो.सं.(१९११) ११९५५३.  भाज्या, फळें व इतर थोड्या जागेंत पुष्कळ उत्पन्न होणार्‍या वस्तु पिकविण्याचा धंदा करणारी ही जात आहे.  सागर, दमोह, जबलपूर व नरसिंगपूर जिल्ह्यांत ही आढळते.  कोणी हा शब्द कछार (पुळणवट किंवा मळीची जमीन) शब्दापासून काढतात.  कोणी काछानी (अफूच्या बोंडावरील रस गोळा करणें) शब्दापासून काढितात.  नामसादृश्यामुळें ह्यांपैकीं कांहीं लोक स्वतःला कच्छवाह रजपूतांचे वंशज म्हणवितात पण त्यास कांहीं आधार नाहीं.

यांच्यांतील उपजाती निरनिराळ्या पदार्थांच्या लागवडीवरून झाल्या असाव्या असें यांच्या नांवावरून दिसतें.  जसें :-  हरदिया काछी, आलिया काछी, फूलिया काछी, जीरिया काछी, मुरई काछी, हीं नांवें हळद, आलें, फुलें जिरें व मुळे यांच्या लागवडीनें मिळालीं असावीं.

यांच्या सामाजिक चालीरीती कुर्मी लोकांसारख्याच आहेत.  एकाच आईबापापासून झालेले तीन पिढ्यापर्यंत विवाह संबंध करीत नाहींत.  दमोह जिल्ह्यांत वरात आली म्हणजे मुलीला फक्त एक फडकें नेसवून हातांत एक द्रोण देऊन उघडी उभी करतात.  मुलींचीं लग्नें १० वर्षांच्या आंतच होतात.  एकाच वेळीं दोन बहिणींबरोबर लग्नें करतां येतात.  मुलीच्या आईबापास लग्नाचा खर्च सोसण्याचें सामर्थ्य नसलें तर जातभाई वर्गणी करतात.  वर लग्नांत एक धोतर नेसतो व लांब अंगरखा घालतो.  याला हळदीचा रंग देतात.  व वधू लाल रंगाचें वस्त्र नेसतें.  वधूचा बाप तिला गाय, रत्नें किंवा निदान २ रुपये तरी देतो.  वराचा बाप लग्नाचा सर्व खर्च सोसतो, फक्त मेजवानी देत नाहीं.  वराकडून वधूला ३ उत्तरीयें किंवा फरिया व तीन परकर किंवा लहंगे दिले जातात.  हल्लीं विवाहित बायका परकर न नेसतां साडीच नेसतात.  लग्नस्तंभाभोंवती वधूच्या पाठीवर वरानें हात ठेवून चार प्रदक्षिणा व मग वधूचें तिसरें बोट धरून ३ प्रदक्षिणा घालाव्या लागतात.  हा विधि होत असतां घरांतील वडील मंडळी एका खोलींत कोंडून घेऊन रडत बसतात.  प्रदक्षिणा झाल्यावर वधूस कोठें तरी लपवून ठेवतात व वरास ती न सांपडली तर एक दागिना तिला द्यावा लागतो.  कधीं कधीं तिचा पोषाख तिच्या धाकट्या बहिणीला घालून वरास फसवितात.  लग्न झाल्यावर वराचा मुकुट एका टोपलींत ठेवून घराच्या छतास टांगून ठेवतात व भाद्रपद शुद्ध ६ ला वर पुन्हां लग्नांतला पोषाक घालून नदीच्या कांठी जातो व मुकुट पाण्यांत विसर्जन करतो आणि लग्नांतला झगा उसवून त्याची हळद धुवून त्याचे साधे कपडे करतो.

बाळंत झाल्यावर पहिल्या दिवशी बाळंतिणीला कांहींच खाण्यास देत नाहींत.  दुसर्‍या दिवशीं मुलास गोमूत्र पाजतात व आईस साखरखोबरें देतात, व संध्याकाळीं सर्व उष्ण औषधी आणून त्यांच्या वड्या करून खाऊं घालतात.  मुलगा झाला तर ५ व मुलगी झाली तर ४ दिवस अस्पृश्य राहतात.  मुलाचें नाळ बाळंतखोलींत गाडून त्यावर सोहेर असेपर्यंत विस्तव जळत ठेवतात.  ६ व्या दिवशीं आईला भात खाऊं घालतात.  १२ व्या दिवशीं न्हावीण मुलाचीं नखें कापिते.  मुलें चार पांच वर्षांची झालीं म्हणजे त्यांचे कान टोंचतात मुलीचें नाक टोंचीत नाहींत.  रजस्वला असतांना मुलींनां एक खोलींत कोंडतात व मासे आणि मांस खाऊं देत नाहींत.  नंतर डोक्यांत माती घालून न्हाऊन व कपडे धुवून यावें लागतें.  यांचा मुख्य देव माहिषासुर आहे.  होळींत त्याची पूजा करतात.  हे सर्व प्रकारचा भाजीपाला पिकवितात व फार कष्टाळू असतात.

मुंबई इलाखा -  लो.सं. (१९११) १२७५७.  गुजथेंतील सर्व जिल्ह्यांत व संस्थानांत हे लोक आहेत.  हे मूळचे कुणबी व कोळी असून त्यांनीं बागाईत करावयाला सुरुवात करून ते माळ्याचा धंदा करूं लागले असें म्हणतात.  यांमध्यें ९ पोटजाती असून उत्तरगुजराथ व सिंधप्रांत यांत (१) अजवालिया, (२) अंधारिया व (३) कंभाटिया या तीन पोटजातींतील लोक आहेत.  (१) अहमदाबादी, (२) खामर, (३) खत्री, (४) कोळी, (५) माळी व (६) संगरिया या सहा पोटजातींतील लोक फक्त दक्षिणगुजराथेंत आहेत.  पहिल्या तीन पोटजातींमध्यें अंधारिया लोक सर्वांत कनिष्ठ दर्जाचे आहेत.

दुसर्‍या सहा पोटजातींमध्यें अहमदाबादी लोकांचा दर्जा सर्वांत श्रेष्ठ असून इतर भागांतील लोक फक्त त्यांच्याच हातचें खातात.  इतर पोटभागांमध्यें रोटीव्यवहार नाहीं.  कचिया लोकांमध्यें कुळें नाहींत.  इतर गुजराथी जातीप्रमाणें कचिया लोकांचे गोल ठरलेले असून गोलाच्या बाहेर लग्न करण्याची मनाई आहे.  गोलाच्या बाहेर लग्न केलें असतां दंड होतो.  मामे, आते व मावसबहिणीशीं लग्न करतां येत नाही.  लग्नें बाळपणीं होतात.  मुलाच्या बापाला हुंडा म्हणून १२५ कचे किंवा याहून अधिक रकमेचे दागिने व कपडे मुलीला द्यावे लागतात.  पुनर्विवाह व घटस्फोट या चाली यांच्यामध्यें आहेत.  विधवेला धाकट्या दिराशींहि लग्न लावितां येतें.  अंधारिया व खत्री लोकांखेरीज इतर काचिया हिंदुधर्माचे आहेत.  अंधारिया व खत्री लोक इमामशहाचे अनुयायी असून यांच्या संस्कारामध्यें हिंदु व मुसुलमान संस्कारांचे मिश्रण आहे.  काचिया लोकांचे उपाध्याय ब्राह्मण आहेत.

भडोच जिल्ह्यांत जंबूसर येथें १२ सभासदांची एक मध्यवर्ती पंचायत असून तिचा अधिकार जंबूसर तालुक्याभर आहे.  पंचायतीच्या सभेची निमंत्रणें देण्याचें काम गोर जातीच्या उपाध्यायाकडे असतें.  इतर तालुक्यांमध्यें अशाच पंचायती आहेत.  अपराधाबद्दल दंड होतो व तो न दिल्यास जातीबाहेर टाकिलें जातें.

अहमदाबाद शहरांत काचिया लोकांची एक पंचायत असून तींत ४ सभासद आहेत.  दंडाचें व प्रत्येक कुटुंबामागें असलेल्या (रु. १-०-९) कराचें उत्पन्न जातीच्या उपाध्यायाजवळ ठेविलें जातें व तें जातीच्या कामानिमित्त किंवा धर्माकडे खर्चिले जातें.

खेडा जिल्ह्यांतील बोरसाद तालुक्यांत २२ खेड्यांचा एक असे वर्ग (एकाडा) पाडलेले असून त्या एकाड्याची एक ४४ सभासदांची पंचायत आहे.  याखेरीज प्रत्येक खेड्याची पंचायत असते.  खेडेंपंचायतीच्या निकालावर एकाडा पंचायतीकडे अपील करतां येतें व सभा भरविण्याचा खर्च फिर्यादीला द्यावा लागतो.  फिर्यादीनें खटला जिंकल्यास दुसर्‍या पक्षाला हा खर्च भरून द्यावा लागतो.  खेडेपंचायतीला ५०१ रुपये दंड करण्याचा अधिकार आहे व एकाडा पंचायतीला १५५१ रु. दंड करण्याचा अधिकार आहे.  (क्रूक; रिस्ले व हिरालाल; एंथोव्हेन सेन्स रिपोर्ट १९११ (मुंबई; ए. रि.ए. (काच्छी) वगैरे.).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .