प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य  

काचार -  आसाममधील एक जिल्हा.  ह्या जिल्ह्यांत काचारी लोक रहातात म्हणून ह्यास हें नांव मिळालें.  येथील राजानें टिपरा येथील राजकन्येशीं विवाह केल्यामुळें सुर्मा खिंडीचा वरचा भाग यास आंदणादाखल मिळाला.  उत्तर अ. २४ १२' ते २५ ५०' आणि पूर्व रे. ९२ २६' ते ९३ २९'.  क्षेत्रफळ ३७६९ चौ.मै. उत्तरेस कपिली व दोईआंग नद्या; ह्यापलिकडे नौगांव जिल्हा आहे.  याच्या पूर्वेस नागाटेंकड्या व मणीपूर संस्थान; दक्षिणेस लुशाई टेंकड्या; पश्चिमेस सिलहट जिल्हा व जयंत्या टेंकड्या.  सपाट जमीन व उंचसखल जमीन ह्या दृष्टीनें जिल्ह्याचे दोन भाग पाडतां येतात.  यांत बांबूंची झाडें पुष्कळ आहेत.  कांहीं कांहीं ठिकाणीं पाणथळ जमीनहि आहे.  लहान लहान टेकड्यांवरून चहाचे मळे व तेथेंच मळेवाल्यांच्या रहाण्याच्या जागा दृष्टीस पडतात.

ह्या जिल्ह्यांतील मोठी नदी बराक किंवा सुर्मा ही आहे.  ह्या नदीच्या दक्षिणेकडून सोनई, धाग्रा, धलेश्वरी ह्या नद्या येऊन मिळतात व उत्तरेकडून जीरी, चीरी, मधुरा व जाटिंगा ह्या नद्या मिळतात.  बरेल टेंकड्यांच्या पलीकडे ब्रह्मपुत्रेस जाऊन मिळणारी कपिली नदी मोठी आहे; पावसाळ्यांत बराक नदीच्या महापुरामुळें व सभोंवतालच्या डोंगरावर पडलेल्या पावसामुळें रेंगटी पहाड व तिलेन टेंकड्यांची ओळ ह्यांमधील प्रदेश (ह्याला 'चाटला' म्हणतात) म्हणजे एक मोठें १२ मैल लांबीचें व २ मैल रुंदीचें तळें बनतें.

कांहीं कांहीं जंगली भागांत रानटी हत्ती, वाघ हरिणें, व इतर वन्य पशू सांपडतात.  जून ते सप्टेंबरपर्यंत उन्हाळा असतो (उष्णमान ८३).  थंडीचा कडाका जानेवारींत असतो (उष्णमान ६५).  वार्षिक पाऊस १०० ते १६५ इंच आहे; पण नौगांव जिल्ह्याच्या बाजूस फक्त ५५ इंचच पडतो.  १८६९ सालीं मोठा भूकंप झाला होता.  त्यावेळी सिलचर येथें फार नुकसानी झाली.  १८८२ सालीं दुसरा मोठा भूकंपाचा धक्का बसला होता.  १८९७ सालचा धक्का सर्वांत जबर होता.  पण इलाख्यांत इतर ठिकाणीं झालेल्या नुकसानीच्या मानानें येथें फारशीं नुकसानी झाली नाहीं.

काचारी लोकांचे नाईक पूर्वी असामच्या खिंडींत राज्य करीत असत.  पण १३ व्या शतकाच्या सुरुवातीस शिवसागरचा उत्तरभाग व नौगांव जिल्ह्यांत त्यांनी ठाणें दिलें व धनसिरी नदीच्या कांठीं दिमापूर ही त्यांची राजधानी होती.  १५३६ सालीं अहोम राजानें तें शहर लुटलें व तेथील राजास ठार मारलें व लोकांस तेथून मैबंग येथें राजधानी नेण्यास भाग पाडलें.  पुढें १७०६ सालीं रुद्रसिंग नांवाच्या अहोम राजानें मैबंग लुटलें व तेथील राजास काचारकडे हांकून लावलें.  येथें आल्यानंतर ह्यांची राजधानी खासपूर येथें होती व नौगांव जिल्ह्यांतील कपिली खिंड देखील ब्रिटिश सरकारच्या हातीं जाईपावेतों ह्या लोकांच्या ताब्यांत होती.

सन १७६२ सालीं ब्रिटिश लोकांनीं ह्या जिल्ह्यांत प्रथम पाय ठेवला.  त्यावेळीं मणिपूरच्या राजास मदत करण्यास व्हर्सलेट्स, चित्तगांव येथून खासपूर येथें आला.  १७९० सालीं येथील राजघराणें हिंदुधर्मीय झालें.  नंतर थोड्या वर्षांनीं मणीपूरच्या भरजितसिंग राजानें गोविंदसिंगास हांकून लावलें.  व पुढें लवकरच ब्रम्ही लोकांनीं ह्यांस सुर्मा नदीच्या खोर्‍यांत हांकून लावलें.  ब्रम्ही लोकांनीं काचार घेण्याचा देखील घाट घातला होता.  पण सिलहट येथें ब्रिटिश लोक होते, त्यांनीं त्यांस प्रतिबंध केला. तेव्हां काचारी राजानें ब्रम्ही लोकांस हांकून देऊन गोविंदसिंगास परत राज्य दिलें.  १८३० सालीं हा राजा बेवारसी मेला.  तेव्हां १८२६ सालीं झालेल्या तहाप्रमाणें ब्रिटिशांनीं हा जिल्हा आपल्या अंमलाखालीं घेतला.  परंतु उत्तर काचार टेकड्यांचा बराचसा भाग कचदिन नांवाच्या एका मनुष्यानें आपल्या ताब्यांत घेतला होता.  पण पुढें त्याला मारण्यांत आलें व १८५४ त ब्रिटिश सरकारनें हा प्रदेश पूर्णपणें आपल्या ताब्यांत घेतला.

१८५७ सालीं कांहीं बंडखोर लोकांनीं टिपरा व सिलहट प्रदेशांतून काचारांत प्रवेश केला.  पण लाखीपूर येथें त्यांचा मोड करण्यांत आला; तरी पुढें बरींच वर्षेपर्यंत ह्या लोकांनीं फार त्रास दिला.  समबुधिन नांवाच्या कोणी एका काचारी बंडखोरानें फार धुमाकूळ केला व डेप्यूटीकमीशनरास मारिलें.  अखेरीस कांहीं दिवसांनीं बंडखोरास मारण्यांत आलें.  लोकसंख्या (१९२१) ५२७२२८.  ह्या जिल्ह्यांत मैबंग येथें कांहीं दगडांवर खोदीवकाम आहे.  जिल्ह्याचे मुख्यतः तीन विभाग केले आहेत.  एक सिलचर, दुसरा हेलाकांडी व तिसरा उत्तरकाचर.

लोकवस्ती बहुतेक हेलाकांडी ह्या भागांत फार आहे.  कारण इतर प्रदेश डोंगराळ आहे.  उत्तरकाचार भागांत सर्वत्र जंगल व बांबूंचे बन आहे.  शेंकडा ६५ लोक हिंदु आहेत.  बंगाली, हिंदुस्थानी, हिंदी, मणिपुरी, दिमासा किंवा काचारी ह्या भाषा प्रचारांत आहेत.  हिंदु जातीचे सर्व लोक हीन जातींपैकीं आहेत.  बहुतेक मळ्याच्या कामाकरितां आणलेले मजूर लोक आहेत.

येथें २९००० हिंदू धर्माचे मणिपूरी लोक आहेत.  शेंकडा ८५ लोक आपली उपजीविका शेतकीवर करतात.

शेतकी :-  जमीनीची सुपीकता पाऊसपाण्यावर अवलंबून आहे.  कांहीं कांहीं ठिकाणीं जमीन फार सखल असून गवताशिवाय तेथें कांहीं उगवत नाहीं.  अशा ठिकाणीं क्वचित कोठें तांदूळ पेरतात.  पण इतर ठिकाणीं तांदूळाचेंच उत्पन्न मुख्य आहे.  कोठें कोठें ऊंस कडधान्य वगैरे पीकहि काढलें जातें.  चहाची निपज येथें खूप आहे.  दिवाण येथें तारापूर नांवाची एक कंपनी आहे.  स्कॉटपूर व बंगाल टी कंपनी अशा एकंदर तीन मोठ्या चहाच्या कंपन्या आहेत.

हा जिल्हा ब्रिटिश सरकारच्या ताब्यांत आल्यापासून पूर्वीपेक्षां दहापट जमीन सध्यां लागवडीखाली आहे शेतकीच्या संबंधीं कांहीं फारशी सुधारणा दृष्टोत्पत्तीस येत नाहीं.

उत्तरकाचार भागांत व इतर भागांत इमारती लांकूड पुष्कळ आहे.  बर्‍याच ठिकाणीं राखीव जंगलें आहेत.  तेथें थोड्या प्रमाणावर रबर तयार होतें.  बदरर व मासिमपूर येथें मातीच्या तेलाचे (रॉकेल) झरे आहेत असें म्हणतात; पण अजून तेल काढण्यास सुरुवात झाली नाहीं.  लांकडें कापण्याचा एक कारखाना ह्या जिल्ह्यांत आहे.  मणीपुरी लोक कपडा वगैरे विणतात व पितळेचीं भांडीं तयार करतात.

काचारांतून चहा बाहेर जातो.  १९०४ सालीं ९४ लाख रुपयांचा चहा बाहेर गेला असें म्हणतात.  इमारती लांकूड व बांबू वगैरे माल सिलहटला पाठविले जातात.  नित्य संसाराकरितां लागणारा सर्व माल बाहेरून आणविला जातो.  राकेल, कोळसा, लोखंड व पोलाद बाहेरून आणतात.

लोकांनां व्यापाराची गोडी नाहीं.  राजपुताना, सिलहट व बंगाल येथील रहिवासी लोक येथें येऊन व्यापारी बनले आहेत.

पावसाळ्याच्या दिवसांत रस्ते खराब असल्यामुळें दळणवळणाच्या कामीं नद्यांच्या पात्रांचा उपयोग करतात.  थंडींत नद्यांवर तात्पुरते बांबूंचे पूल उभारतात.

जिल्ह्याच्या तीन विभागापैकी सिलचर विभागाकरितां डेप्युटी कमिशनराची नेमणूक आहे.  आसाम कमिशनचा मेंबर बहुतेक हेलाकांडी विभागांत असतो व उत्तरकाचार भाग एका पोलीसऑफीसराच्या ताब्यांत असतो.  कलकत्याचें हायकोर्ट हें मुख्य अपील करण्याचें कोर्ट आहे.

काचारी राजाच्या वेळीं जमाबंदी करण्यांत आली होती.  पण ती प्रत्येक व्यक्तीशीं न करतां एकंदर संघाशीं करण्यांत आली होती.  संस्थानांनीं मानलेल्या अत्यंत लहान संघाला 'खेल' म्हणत असत.  पुष्कह खेलांच्या एका मोठ्या संघाला 'रज' म्हणत.  ज्याप्रमाणें प्रत्येक व्यक्ति सारावसुलीबद्दल 'खेल' ला जबाबदार असे, त्याचप्रमाणें प्रत्येक 'खेल' 'रज' ला जबाबदार असे.  कार्तिकचंद एका एकरापाठीमागे १० आणे घेत असे.  गोविंदचंद तर कधीं कधीं ह्याच्या दुप्पट घेत असे.  शिवाय इतर पुष्कळ तर्‍हेच्या करांमुळें व जकातीमुळें व्यापारवाढीस फार अडथळा होत असे.

ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली आल्यानंतर पहिली जमाबंदी १८३८-३९ सालीं करण्यांत आली.  व तिची मुदत फक्त ५ वर्षांकरितांच होती.  तद्‍नंतर १८४३-४४ सालीं १५ वर्षांकरितां पुन्हा धारेबंदी करण्यांत आली.  नंतर १८५९ सालीं वीस वर्षांकरितां पुन्हां जमाबंदी करण्यांत आली.  ही मुदत संपल्यानंतर पुन्हां जी धारेबंदी करण्यांत आलीं तींत १ रु. ११ आ. पासून तों १२ आणे दर एकरप्रमाणें वसूली करीत असत.  ह्यांत चहाच्या लागवडीच्या जमीनीचा समावेश होत नसे.  १९०० सालीं झालेल्या जमाबंदींत तर दर एकरास २ रु. ७ आ. पासून १२ आ. पर्यंत सारा होता.  १९०३-४ सालीं एकंदर सारावसुली ११७२ हजार रुपये होती.  थोडासा सारा घेऊन पडीत जमीन चहा किंवा इतर धान्य उत्पन्न करण्याकरितां काचारमध्यें देत असत.  पण सध्यां पडीत जमीन लागवडीस आणण्याकरितां सवलती देणें बंद केलें आहे.

फक्त सिलचर येथेंच म्युनिसिपालिटी आहे.  शिक्षणाच्या बाबतींत काचारच्या एकंदर इलाख्यांत बराच वर नंबर आहे.  अशिक्षित मजुरांची चहाच्या मळ्याकरितां भर होत असल्यामुळें शिक्षणाचें शेंकडा मान लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणांत कमी कमी होत आहे.

उत्तर काचार -  हा एक काचार जिल्ह्याचा विभाग आहे.  उत्तरअक्षांश २४ ५८' ते २५ ५०' आणि पूर्वरेखांश ९२ ३२' ते ९३ २९'.  क्षेत्रफळ १७०६ चौ. मैल.  सुर्माखिंडीला ब्रह्मपुत्रेपासून वेगळा करणारा हा एक डोंगराळ प्रदेश आहे.  ह्याच पहाडांतून काचारी राजानें आपली राजधानी दिमापूर येथून मैबंग येथें नेली.  १९ साव्या शतकाच्या उदयसमयीं तुलाराम सेनापतीनें या विभागांत आपला ताबा बसविला व १८५४ पर्यंत तो व त्याचे पुत्रपौत्र ह्या विभागाचे खंडणी देणारे राजे म्हणून ब्रिटिशसरकाराकडून लेखले जात असत.  सर्व प्रदेश डोंगराळ असून जंगल विपुल आहे.  ह्या भागांत लोकसंख्या फारच कमी आहे.  आसाम-बंगाल रेल्वे ह्या विभागांतून जाते.  ह्या सबंध विभागाकरितां एक यूरोपियन पोलीस ऑफिसर आहे.  याचें मुख्य ठिकाण हाफ्लांग येथें आहे.  ह्यांत एकंदर २५४ खेड्यांचा समावेश होतो.  खुद्द हाफ्लांग येथें ७७ इंच पाऊस पडतो व उत्तरेस मैबंग येथें ५५ इंच पडतो.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .