विभाग दहावा : क ते काव्य  

कांचनगंगा - जगांतील सर्वांत मोठें दुसरें पर्वतशिखर.  हें हिमालयपर्वताच्या पूर्वेकडील भागाचें शिखर असून, सिक्कीम आणि नेपाळ या दोन संस्थानांच्या दरम्यानच्या हद्दीवर आहे.  दार्जिलिंग स्टेशनावरून या प्रचंड पर्वताचा पायथ्यापासून तो नेहमीं बर्फाच्छादित असलेल्या शिखरापर्यंतचा सर्व भाग पहावयास मिळतो.  कांचनगंगा पर्वताचें शिखर २८१४६ फूट उंच आहे.  कांचनगंगा हें तिबेटियन नांव आहे व त्याचा अर्थ 'बर्फाच्या प्रचंड राशींचे पांच समूह' असा आहे.