प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य  

कांच -  कांचेची सर्वांगसुंदर व्याख्या करणें जरा अवघड आहे.  कारण कांचेच्या अनेक जाती असून प्रत्येक जातीचे गुण धर्म निरनिराळे आहेत.  कांच या पदार्थांचा मुख्य गुण पारदर्शकता हा आहे.  तसेंच त्यांत काठिण्य व ठिसूळपणा हे गुण पाहिजेत.  आपल्या देशांतील ६४ कलांच्या यादींत कांचेचा समावेश केलेला दिसत नाहीं.  आपल्या देशांत कांचेच्या जिनसांचा नामनिर्देश कोठें आढळत नाहीं असा साधारण समज आहे.  पण डाब्ज यांनीं संयुक्त प्रांतांतील कांचकलेवर जो लेख लिहिला आहे त्यांत त्यांनीं असें प्रतिपादन केलें आहे कीं ख्रिस्ती शकाच्या पूर्वी ८ शें वर्षे हिंदुस्थान देशांत कांचकला होती.  कारण यजुर्वेदांत कांचेचे दागिने स्त्रिया घालीत असत असा उल्लेख आहे.  तसेंच महाभारत व युक्तिकल्पतरु वगैरे ग्रंथांतहि कांचेसंबंधी उल्लेख आलेले आहेत.  हीं कांच आपले लोक पुरातनकाळीं स्फटिकापासून करीत असत असें अनुमान, बौधस्तूपांतून अत्यंग गुळगुळीत केलेली स्फटिकाची अस्थिपात्रें सांपडलीं आहेत यावरून निघतें. ''काचमूल्येनविक्रीतो हंत चिंतामणिर्यथा'', ''काचःकाचोमणि र्मणिः'' इत्यादि अनेक वाक्यांवरून महाभारत, व रामायणकाळीं तसेंच योगवसिष्ठ वगैरे ग्रंथावरून कांचेची आर्य लोकांस माहिती होती असें निःसंशय दिसतें.  प्राचीनकाळीं असुर लोकांस कांच करण्याची कला अवगत होती इतकेंच नव्हें तर ते रंगीत कांचा करीत होते.

कांहीं लोकांच्या मतें कांच करण्याची युक्ति प्रथमतः फिनिशियन लोकांनीं शोधून काढली.  ईजिप्शियन लोक पूर्वी धातुसंशोधनक्रियेंत फार निपुण होते.  लंडन वगैरे शहरीं मोठ्या पदार्थसंग्रहालयांत ठेवलेल्या नमुन्यावरून ईजिप्‍त देशांत फार प्राचीनकाळीं कांचेचे मणी वगैरे जिन्नस फार उत्तम दर्जाचे तयार होत असें मानण्यास आधार आहे व त्यांनीं या कलेस अगदीं उच्च दर्जावर नेलें होतें.  सीझर आगस्टसनें ईजिप्‍तप्रांत काबीज केला त्यावेळेस खंडणीदाखल ईजिप्शियन लोकांनीं कांचेचे नमुने द्यावे असा हुकूम केला.  रोमन लोक जात्याच कलेचे भोक्तें व बुद्धिमान असल्यामुळें त्यांनीं ही कला लवकरच हस्तगत करून परदेशांत कांचेचा माल पाठविण्याचा मक्ता आपल्याकडेसच ठेवला होता.  ह्यामुळें इजिप्शियन लोक या कलेंत कांहीं दिवसांनीं मागें पडले.  पुढें फ्रान्स देशांतील गॉल या प्रांतीं रोमन लोकांचें राज्य असल्यामुळें तिकडें या कलेची वाढ झाली.  परंतु रोमन राज्यास उतरती कळा लागून तें बुडाल्यावर ह्या कलेचा कांहीं कालपर्यंत लोप झाला.  त्यानंतर कान्स्टान्टिनोपल येथें राजाश्रय मिळून या कलेचा पुन्हा उदय झाला.  तेथून व्हेनिस शहरी ही कला पुन्हा उदयास आली.  त्यानंतर इंग्लंड, जर्मनी, बेल्जीयम या देशांतील लोकांनीं आपआपल्या देशांत ही कला आणण्याबद्दल फार प्रयत्‍न केले.  परंतु त्यांस त्यावेळी फारसे यश आलें नाहीं.  व्हेनिस येथील कॉन्सलनें असा हुकूम सोडला होता कीं, राज्यांतील कोणीहि इसमानें कांच करण्याची कच्चीं द्रव्ये किंवा फुटकी कांच परराष्ट्रीय लोकांस देऊं नये, दिल्यास त्याची सर्व मालमत्ता जप्‍त होऊन त्यास कडक शिक्षा होईल.  १२८९ सालीं असाहि दुसरा कायदा करून त्यानें कांचकरी लोकांनां व्हेनिस शहर सोडावयास लाविलें व त्यांनीं एका तटबंदी असलेल्या जागीं राहावें असा हुकूम केला.  इ.स. १२९५ च्या सुमारास व्हेनेशियन प्रवासी मार्कोपोलो हा तार्तरी, चीन, हिंदुस्थान, वगैरे देशांतील प्रवास करून आपल्या देशी परत गेला व खोटीं रत्नें, कांचेचे मणी वगैरे जिन्नस हिंदुस्थान देशांत फार खपतील असे त्यानें आपल्या देशांतील लोकांस कळविल्यावर व्हेनिशियन लोकांनीं तसले जिन्नस तयार करून फार संपत्ति मिळविली.  व्हेनिसहून ही कला जर्मनींत गेली व तेथून बोहिमियांत तिचा प्रवेश झाला व तेथें अनुकूल परिस्थिति असल्यामुळे तेथील मालहि लवकरच हिंदुस्थान, जर्मनी, स्वित्झरलंड, रशिया, अमेरिका वगैरे ठिकाणीं जाऊं लागला.  व्हेनिशियन लोकांनीं खिडक्यांच्या कांचेत अत्युत्तम सुधारणा केल्यामुळें फ्रेंच सरकारने सवलती देऊन आपल्या देशातील लोकांस काचकाम शिकण्यास उत्तेजन दिले. इ. स. १६६५ मध्ये मि. कोलबर्ट नांवाच्या गृहस्थानें आपल्याबरोबर २० व्हेनिशियन कांचकोविद पारिस शहरी नेऊन कांचेचे जिन्नस बनविण्याचें काम, आरसे वगैरे परावर्तक कांच करण्याचें व कांचेस जिल्हई देण्याचें काम सुरू केलें.  फ्रान्स व बेल्जम या देशांत या कलेचा एकाच वेळीं प्रादुर्भाव झाला.  बेल्जम कारागिरांनीं डेमी क्रिस्टल कांचेत बरेंच नैपुण्य मिळविलें.  त्यामुळें त्यांनां फ्रान्स, इंग्लंड वगैरेशीं टक्कर देतां येऊं लागली; व हल्लीं तर या कामीं इंग्लंड व बेल्जम यांच्यांत स्पर्धा सुरू आहे.  इंग्लंड देशांत इलिझाबेथच्या अमदानींत प्रथम कांचेचे कारखाने सुरू झाले.  १८५५ त पॅरिस येथें भरलेल्या प्रदर्शनांत बर्मिंगहॅम येथील कारागिरांनीं २९ फूट व्यासाचें लेन्स ठेवलें होतें.  इंग्लंडांत कांचकारखाने पुढें येण्याचें कारण ते भांडवल, कच्चीं द्रव्यें वगैरे बाबतींत श्रमविभागाच्या तत्वावर चालविण्यांत आले.  ६ व्या जेम्सच्या कारकीर्दीत स्कॉटलंडांत व १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगॉलमध्यें कांच कारखानें निघाले.  १७ व्या शतकांत अमेरिकेंत कांच तयार होऊं लागली.  बाटल्या करण्यांत या देशानें बरीच आघाडी मारली आहे.

कांच करण्याच्या कृती - वाळू, सोडा (शुद्ध केलेला), पोट्याश, चुना, अल्यूमिना व शिशाचा ऑक्साईड वगैरे पदार्थांपासून निरनिराळ्या जातीची कांच तयार होते.  घटकद्रव्यें व विविध कामांत उपयोग या दोन तत्वांवर कांचेचें खालीं लिहिल्याप्रमाणें वर्गीकरण करतां येईल.

(१) दृग्विषयक कांच किंवा नेत्रकांच; हींत दुर्बिणीला लागणारी कांच, चष्मे व सूक्ष्मदर्शक यंत्रांची कांच या जाती येतात. (२) खिडकांच्या तावदानास लागणारी कांच, (३) चिमण्या वगैरे पदार्थ तयार करण्यास रस फुंकून केलेली कांच, (४) मेजावर ठेवण्याकरितां लागणारे जिन्नस म्हणजे वजनें, प्याले, बशा वगैरे पदार्थ, बाटल्या तयार करण्याकरितां लागणारी कांच (५) बिलोरी किंवा सपाट पत्रे करण्याची कांच व गारेची कांच.

कांचेच्या कारखान्यांत कांच फुंकणारे, भट्टीवर काम करणारे कांच थंड करून तिचा ठिसूळपणा घालविणारे, मूस तयार करणारे, कांच कापणारे व इतर मजूर वगैरे माणसांची जरूरी असते.  तसेंच कांच कापल्यानंतर घांसण्याकरितां कुरुंदाची चाकें लागतात.  रंगीत कांच करण्याकरितां निरनिराळ्या रासायनिक पदार्थांचा उपयोग करावा लागतो.  हे बहुतेक खनिज पदार्थ असतात.  कांचेला तांबडा रंग देणें फार अवघड जातें.  

कांच दोन प्रकारची असते.  एक विद्राव्य व दुसरी अविद्राव्य.  विद्राव्य कांचेंत पोट्याशचा अंश थोडा असतो व सोड्याचें प्रमाण अधिक असतें.  ही कांच लवकर द्रवते म्हणून तिला विद्राव्य कांच म्हणतात.  अविद्राव्य काचेंत सिलिकेट आफ पोट्याशचें प्रमाण जास्त असतें व दुसर्‍याहि वस्तूंचे सिलिकेट्स कांहीं विशेष प्रमाणानें एकत्र झालेले असतात.  यामुळें कांचेच्या अंगीं बळकटपणा येऊन ती अविद्राव्य कांच बनते.  

कांच जरी अशुद्ध अशा कच्च्या द्रव्यापासून तयार होते तरी ती उत्तम प्रकारची तयार करण्यास तिच्या मिश्रणांत निरनिराळ्या प्रकारच्या व शुद्ध पदार्थांचा उपयोग करावा लागतो.  सोड्यापासून जी कांच तयार करतात ती रंगहीन असते.  चुना घातल्यानें कांचेला कठिणपणा येऊन तिच्या अंगीं लवकर विरण्याचा गुण कमी असते.  समुद्रावरील सफेद व बारीक रेती ३० भाग लीथार्ज किंवा मुरदाडशिंग २० भाग, मोत्याच्या शिंपल्याची राख ८ भाग, व सोरा २ भाग या प्रमाणें सामान घेऊन त्यांत सोर्‍याच्या १/२० सोमल व मँगनीज घालावा.

खिडक्या व तावदानांची कांच -  सफेत व बारीक रेती १०१ भाग, कार्बोनेट आफ लाईस १२ भाग, पापडखार ५ भाग, कांचेचे तुकडे ११२ भाग हे सर्व पदार्थ मिश्र करावे :-  दुसरी कृति, १०० भाग शुभ्र रेती, ४० भाग पापडखार, १०१ फुटकी कांच यांचा रस करावा.

प्लेट ग्लास -  शुभ्र रेती ३० पौंड, पापडखार १० पौंड, चुना ४ पौंड आणि ३० पौंड काचेचे चूर्ण यांचे मिश्रण भट्टींत घालून मुशीत रस करावा.  नंतर एकेक पत्रा ओतण्यास जितका लागेल तेवढा रस तांब्याच्या पळ्यानें घेऊन लोखंडी टेबलावर ओतावा.  हें टेबल आयतेंच बिडाचें ओतून तयार केलेलें असतें.  प्लेटोची जेवढी जाडी पाहिजे तेवढी कड टेबलाच्या चोहोंकडून ठेवावी.  रस सुकला म्हणजे प्लेट तयार झाली.  याच काचेचे आरसे होतात.

उत्तम प्रकारच्या आरशाची कांच :-  पांढरी रेती ६० पौंड, पर्ल अॅश २५ पौंड, सोरा १५ पौंड, टांकणखार ७ पौंड.  अशी सर्व एकत्र करून मुशीत रस करावा.  ह्या मिश्रणाची कांच पिवळट रंगाची होऊं लागल्यास सोमल व म्याग्नेशिया समभाग थोड्या प्रमाणानें घेऊन त्यांचें मिश्रण करावें म्हणजे कांच स्वच्छ होते.

शिशाची कांच -  हिरव्या व काळ्या रंगाच्या बाटल्या आपण पाहतों त्यांच्या कांचेंतील पदार्थ शुद्ध नसल्यामुळें त्यांस अशा प्रकारचे रंग येतात; या कांचेच्या मिश्रणांत सोडा, लाइम, अल्युमिना, लोखंड, म्याग्नेशिया हे पदार्थ मिश्र केलेले असतात. ५० पौंड रेती, ४० पौंड पापडखार, ४० पौंड चुना, २॥ पौंड चिकणमाती व १॥ पौंड सैंधव, याप्रमाणें मिश्रण करून त्यांचा चांगला रस करून त्यांत लालभडक् केलेल्या लोखंडी नळीचें टोंक बुडवून तें टोंक चक्राकार फिरवावें.  बाटली किंवा चिमणी होण्यापुरता गोळा जमला म्हणजे नळी बाहेर काढून ओतीव लोखंडी पत्र्यावर फिरवावी व नळीच्या टोंकावर गोल गोळा जमवावा.  आपणांस ज्या आकाराचा शिसा करावयाचा असेल त्या आकाराच्या साच्यांत नळीचें टोंक घालून नळी फुंकावी आणि साच्याचीं दोन्ही शकलें काढून शिसा थंड करावा.

गारेची कांच -  ३० पौंड गारेची पूड, २० पौंड शेंदूर, १० पौंड शुद्ध पर्लअॅश आणि ३ पौंड सोडा, हे पदार्थ एकत्र आटवून केलेली कांच दूरदर्शक यंत्र, दुर्बिणी वगैरे कामास उपयोगी पडते.

रंगाची कांच -  कांचेंत निरनिराळा रंग आणणें हे फार महत्वाचें व कठिण काम आहे.  रंगाची पूड न टाकतां रंग येण्याकरितां अनेक धातूंचीं भस्में घालावीं लागतात.  निळ्या रंगाची कांच कोबाल्ट ऑक्साईडनें होते.  हिरवा रंग आणणें झाल्यास लोखंडाचे ऑकसाईड, काळ्याकरितां म्यांगनीझचें ऑकसाईड, नारिंगी रंगाकरितां अॅटिमनीचें ऑकसाईड व लोखंडाचें ऑकसाईड, व तांबडा रंग येण्यास सोडियम सिलेनाईट व तांब्याचा ऑकसाईड किंवा गोल्ड क्लोराइड वापरतात.

भट्टी बांधण्यास लागणारे पदार्थ -  भट्टी तयार करणें महत्वाचें काम आहे.  चांगली कांच तयार करण्यांत यश येणें हें उत्तम भट्टीवर अवलंबून आहे.  भट्टीचे प्रकार ट प्रत्यक्ष आंच देणारी भट्टी, टाके भट्टी, गॅसची भट्टी, विजेची भट्टी हे होत.  भट्टी टिकाऊ असून तींत रोजच्यारोज शक्य तितकी जास्त कांच तयार होऊन कामास मिळावी.  तसेंच उष्णता पूर्ण मिळून इंधन ज्यास्त लागू नये अशी भट्टी असावी.

मुशी -  कांच तयार होण्यास १४००० श. अंशावर उष्णमान लागतें.  इतकी उष्णता कोणत्याहि धातूच्या भांड्यास सहन करतां येणार नाहीं.  यास्तव जी माती पुष्कळ वेळ तापविली असतांहि वितळू शकत नाहीं अशा फायरक्लेच्या मुशी बनवाव्या लागतात.  आपल्या देशांत उघड्या ताडाच्या म्हणजे बादलीच्या आकाराच्या मुशी बनतात व निमुळत्या तोंडाच्या मुशी तयार होतात.  बादलीसारख्या मुशीची रुंदी व खोली सारखीच असते.  निमुळत्या तोंडाचे रांजण (मूस) एकाच बाजूनें असतात.  ज्या कांचेत शेंदूर असतो त्या काचेला आवळत्या तोंडाच्या मुशीच योग्य असतात.  कांचेचा रस करण्याच्या मुशी मजबूत लागतात.  अभ्रकाची भुकटी व तितकीच चिकणमाती किंवा प्लॅस्टर ऑफ पारिस मिसळून त्याची मूस करावी.

कांचेची पूड करणें -  काचेचे तुकडे विस्तवांत टाकून तांबडे लाल करावे.  नंतर ते काढून तसेंच थंड पाण्यांत बुडवावे म्हणजे विरघळून जातात.  वरचें पाणी हलकेंच ओतून खालीं गाळ जमतो तो सुकवावा म्हणजे पूड होईल.  ही पूड पॉलिश पेपरच्या फार उपयोगी आहे.

हिंदुस्थानांतील कांचेचे कारखाने -  हिंदुस्थानांतील कारखान्याचे साधारणतः दोन वर्ग करतां येतात.  (१) अगदी जुन्या पद्धतीनें चाललेले कारखाने व (२) सुधारलेल्या पद्धतीचे कारखाने.

जुन्या पद्धतीचे कारखाने सर्व हिंदुस्थानभर आहेत पण त्यांची स्थिति आज परदेशीय चढाओढीमुळे खालावलेली आहे.  त्यांतून बांगड्या, बाटल्या, अत्तराचे फुगे, पेपरवेट्स व खेळण्याच्या गोट्या वगैरे जिन्नस तयार होतात.  कपडवंज, नाशिराबाद, चिंचणी तारापूर, फिरोझाबाद वगैरे ठिकाणी बांगड्या वगैरे जिन्नस तयार होतात.  हे कारखाने अतिशय लहान प्रमाणावर चालत असल्यामुळें कोष्टी लोकांच्या कारखान्यांप्रमाणें ते त्यांच्या घरांतच असतात.  भट्टयाहि तेच स्वतः बांधतात व त्यांस बाहेरच्या मजुरांची जरूरी लागत नाहीं.

सुधारणेच्या पद्धतीवर पहिला कांचेचा कारखाना पंजाब प्रांतांत १८७० सालीं निघाला.  तेव्हांपासून आजपर्यंत किती कारखाने निघाले व त्यांची सांप्रत स्थिति काय आहे हें पुढें दिलेल्या कोष्टकावरून समजेल.

पुढील तक्तयाचें सार काढलें असतां कांचकोविद नालायक, माल हलक्या प्रतीचा, भट्टी बांधण्यांत चुका, कारागिरांची फंदफितुरी, अवाढव्य खर्च, अव्यवस्था, अपुरें भांडवल, कुशल कारागिरांचा अभाव, आपसांतील तंटेभांडणें, लोकस्थितीचें अज्ञान, राजाश्रयाचा अभाव, रेल्वे कंपन्याचें प्रतिकूलत्व इत्यादि कारणांवरून पुष्कळ कारखाने बंद पडले.

हिंदुस्थानांत मोठ्या प्रमाणावर कांचेचे कारखाने निघालेले नाहींत.  पाश्चात्य देशांतून आलेल्या मालाची स्वस्तता, भांडवलवाल्या लोकांत असलेला उदमी साहसाचा अभाव व हवामानाची प्रतिकूलता हींच त्याची कारणें आहेत.  अलीकडे कांचेचे कारखाने वाढविण्याचे स्तुत्य प्रयत्‍न होत आहेत.  द्रवीकरणास (रस करण्यास) योग्य अशी वाळू, लांकडे व दुसरीं आवश्यक द्रव्यें हीं व्यापारी ठिकाणाजवळ मिळूं शकत नाहींत हीहि कांचेचे कारखाने काढण्याच्या बाबतींत मोठी अडचण आहे.

हिंदुस्थानांतील कांचकारखान्यांच्या माहितीचा तक्ता.

कांचकाम व हस्तकौशल्याचें काम छायाचित्र

पैसाफंड कांचशाळा -  हा कारखाना पुणे जिल्ह्यांत तळेगांव दाभाडें येथें आहे.  याची स्थापना सन १९०८ मध्यें झाली.  त्यावेळीं भांडवल ३७॥ हजारांचे होतें.  हल्लीं (१९२४) भांडवल वाढविलें आहे.  पैसाफंडांतून औद्योगिक शिक्षण देऊन देशांत त्या शाखेचा प्रसार जास्त होऊन, लोकांनीं स्वावलंबी बनावें ह्या उद्देशानें ही संस्था निघाली.  आजपर्यंत शिक्षणदानाचाच मुख्य हेतु संस्थेनें डोळ्यापुढें ठेविला असून (व नफाबाजीकडे दुर्लक्ष केलें असून), त्या मानानेंच तिचे सारे प्रयत्‍न चालू आहेत.  कांचेच्या कामांत चिमण्या व इतर ग्लोब यांचीच पैदास जास्त आहे.  हंड्या, दौती वगैरे कामेंहि होतात.  आतां बांगड्यांचा धंदा त्यांनी हातांत घेतला आहे व चिनीमातीची भांडी तयार करण्याच्या कामींहि लक्ष घातलें आहे.  विशेष महत्वाचा व हिंदुस्थानांत पहिलाच असा बरण्या व रांजण तयार करण्याचा धंदा यानीं आज उत्तम तर्‍हेने चालविला असून त्याप्रीत्यर्थ परदेशीं जाणारा बराच पैसा वाचविला आहे.

ओगले ग्लास वर्क्स लिमिटेड ओगलेवाडी (संस्थान औंध) -  हा कारखाना समाईक भांडवलाच्या कंपनीनें चालविलेला आहे.  कांचकारखाना व कारखान्याची वसाहत, यांची स्थापना सन १९१४ त झाली व याचें आज लिमिटेड कंपनींत रूपान्तर झालें आहे.  अधिकृत भांडवल (१०,००,०००) रुपये दहा लाख आहे पैकीं सध्यां तीन लाख खपलेलें आहे.

कारखाना औंध संस्थानच्या हद्दींत आहे.  कंपनीनें सन १९२१-२२ व २२-२३ या सालीं आपल्या भागीदारास अनुक्रमें ६ व ९ टक्के डिव्हिडंड दिलें आहे.

डीट्झ व प्रचारांतील इतर सर्व प्रकारच्या दिव्यांवरील लहान मोठ्या चिमण्या व ग्लोब्ज, कांचेचीं कौलें, फ्लॉवर पॉट्स, पेपरवेट्स, बरण्या, बशा, चटणी सेट्स, इलेक्ट्रिक शेड्स इत्यादि माल या कारखान्यांत होतो.

व्यापार -  हिंदुस्थानांत अयात होणार्‍या कांचेच्या किंमतीचे आंकडे सालवारी पुढीलप्रमाणें :-

  साल   किंमत रुपये.
  १८७६-७७   २९४५०९१
  १८९६-९७   ७२२५९१९
  १९०२-०३   ९६१५६३४
  १९०६-०७   १२२७५७२५
  १९१३-१४   १९००००००
  १९१९-२०   १९९००००००
  १९२०-२१   ३३८०००००

महायुद्धापूर्वी आस्ट्रियाहंगेरी आणि जर्मनी या भागांतून ११६ लाख रुपये (१९१३-१४) किंमतीच्या बांगड्या, मणी, बाटल्या, चिमण्या वगैरे माल आला.  युद्ध सुरू झाल्यापासून जपान हा माल पुरवूं लागला.  त्याचें आयातीचें प्रमाण शेंकडा ८ पासून ७१ पर्यंत चढलें.  तरीहि सर्व पुरवठा त्याला करतां येणें शक्य झालें नाहीं.  युद्ध थांबल्याबरोबर पुन्हां आस्ट्रिया-हंगेरीचा माल येऊं लागला.  १९२०-२१ सालीं ४३३००० पौंड किंमतीच्या कांचमालाची त्या देशांतून आयात झाली.  १९१३-१४ त ही आयात ५८३००० पौंडांची होती.

१९०५-०६ सालीं ९८०२९ रु. किंमतीचा माल येथून परदेशांत गेला.  पैकीं मुंबईहून ८९०२९ रु. किंमतीचा माल गेला.  निर्गत मालाचें मुख्य गिर्‍हाईक इराण असून आशियांतील तुर्कस्तान, अरबस्तान, सिलोन व संयुक्तराज्य या ठिकाणींहि कांहीं माल जातो.

(अॅपस्ले पेलाः- क्यूरिऑसिटीज ऑफ ग्लासॅमोकिंग, ट्रन्झॅक्श ऑप्टिकल सोसायटी, कॅटलॉग ऑफ दि ऑप्टिकल कनव्हेन्शन्; फ्रँक्स-गाईड टु ग्लॉस रूम इन ब्रिटिश म्यूझियम.  आर्ट हँड बुक (व्हिक्टोरिया अॅंड अलबर्ट म्यूझियम).  मॅन्युफॅक्चर्स ऑफ ग्लॉस अॅंड पोर्सेलेन (कॅबिनेट सायक्लोपीडिया) सौझे-मार्व्हल्स ऑफ ग्लॉस मेकिंग इन आल एजेस.  लोकशिक्षण वर्ष २-४, 'श्रीराम' चे कांचेवरील लेख).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .