प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य  

कांग्रा, जिल्हा - पंजाब.  जलंदर भागाचा ईशान्येकडील जिल्हा.  उत्तर अक्षांश ३१ २१' ते ३२ ५९' व पूर्व रेखांश ७५ ३७' ते ७८ ४२'.  क्षेत्रफळ ९९७८ चौरस मैल.

सीमा :-  वायव्येस चंबा संस्थान; उत्तरेस काश्मीर संस्थानचा प्रदेश; आग्नेयीस बशहर संस्थान; दक्षिणेस सिमला जिल्ह्यांतील कोटगड खेडी व कुमारसेन, संग्री, सुकेट, मंडी आणि विलासपुर ही संस्थानें; नैर्ॠत्येस होशियारपुर जिल्हा; आणि पश्चिमेस गुरुदासपुर.  याचा बहुतेक भाग हिमालय पर्वतांत आहे.  येथील वनश्री फारच सुंदर आहे.

वन्य आणि हरतर्‍हेचे प्राणी या भागांत सांपडतात.  उदा. वाघ, चित्ते, अस्वलें, लांडगे, इत्यादि.

या भागांतील सरासरी उष्णमान उन्हाळ्यांत ८० अंश व हिवाळ्यांत ५३ अंश असतें.  कांग्रा खोर्‍यांत भाताची लागवड सररहा होत असल्यामुळें जमीन पाणथळ झाली आहे व त्याचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो असें म्हणतात.  पावसाळा स्थलमानानें बदलतो.  पावसाची सरासरी ७० इंच आहे.

तारीख ४ एप्रिल इ.स. १९०५ रोजीं या भागांत धरणीकंपाचा एक मोठा धक्का जाणवला.  त्यावेळीं सुमारें २०००० माणसें प्राणास मुकलीं.  कांग्रा आणि पालमपूर तहशिलींत या धक्क्याचा परिणाम जास्त भोंवला.  पुष्कळ जुन्या देवळांचीं बरीच मोडतोड झाली.

कांग्रा खोर्‍यांत आज कित्येक शतकेंपर्यंत लहान लहान राज्यें अस्तित्वांत आहेत व तेथील राजे आपणांस जलंदरचे प्राचीन कटोक (रजपूत) राजांचे वंशज म्हणवितात.  महाभारतांत वर्णिल्याप्रमाणें ख्रिस्ती शकापूर्वी १५०० वर्षे सतलज आणि बिआस या दोन नद्यांमधील प्रदेशावर त्यांचे राज्य होतें असें दिसतें.  सातव्या शतकांत जलंदरच्या राज्याचे विभाग पडले नव्हते असें ह्युएनत्संगनें वर्णन करून ठेवलें आहे.  पुढें कांहीं वर्षांनी (बहुधा मुसुलमानी स्वार्‍या होऊं लागल्या तेव्हां) या राजांस जलंदरच्या भागांतून हांकून दिल्यामुळें त्यांनीं कांग्रा खोर्‍याचा आश्रय घेतला.  त्यांच्या पूर्वी या राज्यांत कांग्राचा किल्ला पूर्वीपासूनच फार महत्वाचा होता.  याप्रमाणें पूर्वीचें विस्तृत राज्य बरेंच संकुचित झालें.  पुढें त्या राज्याचेहि आपसांत बरेच विभाग होऊन लहान लहान राज्यें उत्पन्न झालीं.  यांपैकीं नूरपुर, सिबा, गोलेर, बंगाहळ आणि कांग्रा हीं कांग्रा खोर्‍यांत आहेत.  मुसुलमानांच्या स्वार्‍या या प्रांतांवर जरी वारंवार होत असत तरी हीं छोटी राज्यें हिमालयाच्या दर्‍याखोर्‍यांत असल्याकारणानें बरींच वर्षे टिकाव धरून होतीं.  इ.स. १००९ मध्यें नगरकोटच्या देवालयांत असलेल्या अपार संपत्तीचा मोह पडून गझनीच्या महंमदानें या भागावर स्वारी केली व पेशावर येथें हिंदु राजांचा पराभव करून कांग्राचा किल्ला हस्तगत करून घेतला आणि नगरकोट देवळांतील सर्व बहुमोल चीजवस्तू लुटून नेली.  परंतु यानंतर ३५ वर्षांनीं या लोकांनीं पुन्हां उचल केली व किल्ला परत सर करून घेतला व नगरकोट येथें पुन्हां देवाची स्थापना केली.  यावेळीं त्यांस दिल्लीच्या राजाचें सहाय्य मिळालें होतें.  या वेळेपासून इ.स. १३६० पर्यंत कांग्राचा इतिहास फारसा महत्त्वाचा दिसत नाहीं.  १३६० त फेरोजशहा तघलखानें या भागावर स्वारी केली.  राजा शरण आल्यामुळें त्याचा मुलूख त्याजकडेच ठेवण्यांत आला.  परंतु याहि वेळीं उपर्युक्त देऊळ मुसुलमानांनीं लुटलें व मूर्ति मक्केस नेण्यांत आली व ती भररस्त्यांत टाकून ती पायांखालीं तुडविण्यांत आली.  यानंतर दोनशें वर्षांनीं म्हणजे इ.स. १५५६ सालीं अकबर बादशहानें या भागावर स्वतः स्वारी केली व या वेळेपासून कांग्राचा किल्ला मोंगलांच्या ताब्यांत कायमचा गेला.  यावेळीं कांग्रामधील अतिशय सुपीक भाग मोंगलांनीं व्यापला व निकस डोंगराळ प्रदेश फक्त स्थानिक राजांकडे राहिले.  तथापि येथून मोंगलांची राजधानी फार दूर असल्यामुळें व प्रदेश डोंगराळ असल्यामुळें येथील राजे वारंवार बंड करीत असत.  इ.स. १६२० सालीं राजपुत्र खुरम यानें या राजांचा पूर्ण पराजय केला.  त्यावेळीं २२ राजांनीं मोंगल सत्ता मानण्याचें, खंडणी देण्याचें व आग्रा येथें ओलीस पाठविण्याचें कबूल केलें.  एके काळीं येथील वनश्रीस भुलून जहांगिरचा विचार आपलें उन्हाळ्यांतील राहण्याचें ठिकाण येथें करावें असा होता.  परंतु लवकरच काश्मीरचा प्रदेश जास्त रमणीय असा त्यास दिसल्यामुळें त्यानें आपला तो विचार बदलला असें दिसतें.  ज्यावेळीं शहाजहान तख्तावर बसला त्यावेळीं येथील सर्व राजांनीं मोंगलांची सत्ता निमूटपणें मान्य केली होती व बादशहाकडून आलेले हुकूम व कामगिर्‍या ते बिनबोभाट पाळीत असत.  अकबर आणि औरंगझेब यांच्या दरम्यान वेळोवेळीं मिळालेल्या सनदा अद्यापि यांच्याजवळ सांपडतात व अद्यापिहि कांहीं वंशजांकडे मोगल बादशहांनीं दिलेले अधिकार चालत आहेत.

मुसुलमानांच्या भरभराटींत या डोंगरांतील राजांनां एकंदरींत चांगल्या तर्‍हेनें वागविण्यांत आलें असें दिसतें.  त्यांच्या कारभारांत फारशीं ढवळाढवळ केली जात नसे.  त्यांच्या निस्सीम राजभक्तीमुळें धाडसाच्या परंतु अत्यंत महत्त्वाच्या कामगिरींवर यांचीच योजना करीत असत.

१७५२ च्या सुमारास काटोच येथील दुराणीची सत्ता बहुतेक नामशेष झाली होती व तेथील सरदारानें पूर्णपणें स्वातंत्र्य मिळविलें होतें.  कांग्राचा रजपूत सरदार संसारचंद यानें काटोच भागांत आपली सत्ता स्थापन करून जवळपासच्या सर्व भागावर कर बसविला.  त्याच्या वंशांत याच्या सारखा प्रख्यात पुरुष दुसरा कोणी झाला नाहीं.  शीख लोकांपुढें मात्र त्याची मात्रा चालत नसे.  गुरख्यांच्या विरुद्ध लढतांना त्याचा नाइलाज होऊन त्याला शीख लोकांची मदत मागणें भाग पडलें व त्याचा परिणाम असा झाला कीं त्याच्या मरणसमयीं (१८२४) लाहोरच्या राजाचा तो एक खंडणीदार बनला होता.  १८२८ त त्याचा मुलगा आपल्या बहिणीचें शीखाशीं लग्न लावण्याचें टाळण्याकरितां राज्य सोडून पळून गेला तेव्हां रणजितसिंगानें तें राज्य कायमचें शीखांच्या राज्याला जोडून टाकलें.

शीखांशीं झालेल्या पहिल्या युद्धानंतर (१८४६) कांग्राचें स्वामित्व इंग्रजांकडे आलें.  १८५७ च्या बंडांत कुलु पोटविभागांत थोडी फार बंडाळी झाली परंतु अधिकार्‍यांच्या धूर्ततेमुळें पुन्हां लवकरच सर्व देशभर शांतता दिसूं लागली.

प्राचीन अवशेषांच्या बाबतींत कांग्राचा पहिला नंबर लागतो.  दुसर्‍या शतकांतील सुद्धा कांहीं अवशेष येथें आढळतात.

या जिल्ह्यांत एकंदर ३ शहरें व ७१५ खेडीं असून १९२१ सालीं लोकसंख्या ७६६०६५ होती.  सात तहशिली मिळून हा जिल्हा झाला आहे.  या जिल्ह्याचा बराचसा भाग डोंगराळ असल्यामुळें दर चौरस मैलाला ७७ लोकसंख्या पडते.  लोक अनेक भाषा बोलतात.  एकंदर लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण मुसुलमानांपेक्षां जास्त आहे.  टेकड्यांतून वस्ती केलेले गोसावी पैशाची देवघेव व व्यापार करतात.  या लोकांप्रमाणें खत्री व सुद लोकहि थोडाफार व्यापार करतात.  एकंदर लोकसंख्येपैकीं शेंकडा ७७ लोक शेतकीवर आपली उपजीविका करतात.

सप्टेंबर तें डिसेंबर आणि एप्रिल ते जुलई असे दोन पिकांचे हंगाम असतात.  ह्यांपैकी एप्रिल ते जुलईपर्यंत निघणारें पीक महत्वाचें आहे.

गहूं, मका, सत्तू, तांदूळ, द्विदळ धान्यें हे उत्पन्नाचे मुख्य पदार्थ आहेत.  यांशिवाय कापूस, चहा आणि बटाटे यांचेहि पिक या जिल्ह्यांत निघतें.

स्थानिक गुरें ढोरें लहान परंतु मजबूत आहेत.  गुजर लोकच फक्त दूध, तूप विकतात.  शेळ्या व मेंढरें बरींच असून धनगरांचा चरितार्थ यांच्यापासून होणार्‍या उत्पन्नावरच अवलंबून असतो.  १९०३-०४ सालीं लागवड केलेल्या जमीनीपैकीं सुमारें एकपंचमांश जमीनीला पाटबंधार्‍याचें पाणी दिलें होतें.

जंगल ही एक महत्वाची बाब आहे.  लहान टेकड्यांवरून पुष्कळ जातीचे बांबू होतात.  १९०३-०४ सालीं जंगल खात्याचें उत्पन्न २.८ लक्ष होतें.

कांग्रा व कुलूमध्यें मौल्यवान खनिज द्रव्यें आहेत परंतु जरूर लागणार्‍या उपकरणांच्या अभावामुळें खाणींतून हीं द्रव्यें काढण्याचें काम व्हावें तसें होत नाहीं.  कुलूमध्यें गरम पाण्याचें झरेहि पुष्कळ ठिकाणीं आढळतात.

चहाच्या कारखान्यांशिवाय या जिल्ह्यांत दुसरे कोणतेच कारखाने नाहींत.  हातानें चालवितां येतात असे कांहीं थोडे कारखाने येथें आहेत.  त्यांत तयार होणारें सुती कापड विलायती कापडाशीं होणार्‍या चढाओढींत बराच टिकाव धरून आहे.  परंतु कापसाचा स्थानिक पुरवठा कमी असल्यामुळें हा धंदा मागासल्यासारखा दिसतो.  चांदीचीं भांडीं, टोपल्या व पांघरण्याचे रग वगैरे कोठें कोठें तयार करतात.  तांदूळ, चहा, बटाटे, मसाल्याचे पदार्थ, अफू, पांघरण्याचे रग, लोंकर, तूप, मध व मेण यांची निर्गत आणि गहूं, हरभरा, मका, द्विदल धान्यें, कापूस, तंबाखू, घासलेट व कापड यांची आयात होते.  सपाटीवरील होशियारपूर, जालंदर, अमृतसर आणि पठाणकोट हीं कांग्राच्या व्यापाराचीं मुख्य ठिकाणें आहेत.  कुलूचा लडख व यार्कंद यांच्याशीं सुलतानपूरमधून बराच व्यापार चालतो.  

कांग्रा, पालनपूर, सुजानपूर, तिरा, आणि नूरपूर हीं या जिल्ह्यांतील व्यापाराचीं मुख्य ठिकाणें आहेत.  आगगाडीचा एकहि फांटा या जिल्ह्यांतून जात नाहीं.  पाऊस विपुल पडत असल्यामुळें येथील लोकांनां दुष्काळ मुळींच माहीत नाहीं.  इतर जिल्ह्यांप्रमाणें येथेंहि डेप्युटीकमिशनर व त्याचे मदतनीस असे मिळून राज्यकारभार पहातात.  या जिल्ह्यांत तीन म्युनिसिपालिट्या, १५ पोलिसठाणीं व ९ रुग्णालयें आहेत.  एकंदर लोकसंख्येपैकीं लिहितां वाचतां येणारांचें प्रमाण शेंकडा ४.५ आहे.

तहशील - कांग्रा तहसिलीचें (कांग्रा जिल्हा, पंजाब) एकंदर क्षेत्रफळ ४२९ चौरस मैल आहे.  मुलूख डोंगराळ असून बाणगंगा आणि गज या नद्या यांमधून वाहतात.  लोकसंख्या (१९११) ११९,६२८.  या तहसिलींत दोन शहरें व १३४ खेडीं आहेत.

शहर :-  कांग्रा तहसिलीचें (कांग्रा जिल्हा, पंजाब) मुख्य ठिकाण.  उ. अ. ३०० ५' व पू. रे. ७६० १६', लोकसंख्या (१९०१) ४७४६.  शहराच्या दक्षिणेस एका उंच कड्यावर किल्ला आहे.  याच्या सर्वांत उंच असलेल्या भागांत काटोच राजांची वस्ती व देवालयें होती.  १९०५ च्या धरणीकंपानें हें शहर व किल्ला यांचा नाश झाला.

कांग्राचा प्राचीन इतिहास बराच सांपडतो  १००९ मध्यें गझनीच्या महंमुदानें येथील देऊळ लुटून अपार संपत्ति परदेशीं नेली.  १३६० त फिरोझ तघलखानें पुन्हां येथील देऊळ लुटलें.  मोंगल लोकांनीं येथें कायमचें ठाणें वसविलें.  १७७४ नंतर कांग्राचा राजा संसारचंद यानें किल्ल्याला वेढा दिला.  परंतु त्याला एकट्याला किल्ला घेणें शक्य नसल्यामुळें त्यानें शीख लोकांची मदत मागीतली व अशा रीतीनें किल्ला सर केला.  येथें एक मिशनरी लोकांची शाळा व सरकारी रुग्णालय आहे.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .