प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य  

कागद, तयार करण्याचे पदार्थ -  शिक्षणाच्या व विद्येच्या प्रसाराबरोबर कागदाचा खप सर्व जगांत इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे कीं त्याचा पुरवठा होणेंच कठिण झालें आहे.  ह्या उपयुक्त पदार्थाच्या उत्पत्तीच्या वाढीचा इतिहास फार मनोरंजक आहे.  यूरोपीय देशांमध्यें अति प्राचीन काळीं पापीरस नांवाच्या ईजिप्‍तमधील झाडापासून निघणारा पदार्थ लेखनाकरितां उपयोगांत आणीत असत.  हिंदुस्थानांत व मध्य आशियाखंडांत जुने संस्कृत ग्रंथकार भूर्जपत्रांवर लिहीत असत  हल्लीं देखील कागदासारखा त्यांचा उपयोग करतात.  ज्या ठिकाणीं हवा दमट असते अशा हिंदुस्थानांतील मैदानांत हें भूर्जपत्र साधारणपणें ३०० वर्षांवर टिकत नाहीं.  तथापि चिनी-तुर्कस्तानांत इसवी सनाच्या तिसर्‍या किंवा चवथ्या शतकांतील यावरील हस्तलेख सांपडले आहेत.  बर्‍याच प्राचीन काळीं हिंदुस्थानांतील सपाटीच्या प्रदेशांत (तसेंच नेपाळांत) ताडपत्रांवर लिहीत असत.  हीं ताडपत्रें मुद्दाम तयार करीत; व अणकुचीदार सळईनें (शलाकेनें) त्यांवर अक्षरें कोरून लिहीत व कधीं कधीं या अक्षरांवर काळा रंग येण्याकरितां काजळ फाशीत असत.  आसामांतील मूळचे लोक अगरू झाडाच्या अंतर्सालीवर लिहीत.  बांबूंच्या सुबक पट्टयांवर चीन देशाचा प्राचीन इतिहास लिहिला होता व त्याचा एका राजघराण्याच्या लढाईंत नाश करण्यांत आला असें म्हणतात.  ईजिप्‍तमध्यें पापीरसचा उपयोग होण्यापूर्वी फार प्राचीन काळापासून चिनी लोकांत लिहिण्याच्या कामीं बांबूंचा उपयोग प्रचलित होता असा समज आहे.

स्टीन साहेबाला खोतान राज्यांत सरकारी जुनीं हस्तलिखित कागदपत्रें सांपडलीं आहेत.  त्यांतील कांहीं खोतान संस्थानांत व कांहीं चीन देशांत लिहिलेलीं आहेत.  तीं लिहिण्यासाठीं लाकडाच्या फळ्या (यांपैकी जुन्या फळ्या बांबूच्या पट्टयांप्रमाणें आहेत), चर्मपत्रें, निरनिराळ्या प्रकारचे कागद आणि भूर्जपत्रे हें साहित्य वापरलें आहे.  कागद निघण्यापूर्वी (इ.स.१०५) चीन देशांत बांबूच्या पट्टयांवर लिहीत असत असें चव्हान्नेस म्हणतो.  यावरून असें दिसतें कीं लांकडाचा उपयोग बांबूच्या नंतर करूं लागले.  चीन देशांत कागद निघाल्यानंतर दीड शतकानें खोतान येथील लोकांनां तो मिळाला.  परंतु तिसर्‍या शतकापर्यंत लिहिण्यासाठीं लोक लांकडाचाच उपयोग करीत असत.  लांकडानंतर कागदावर पत्रें लिहिण्यास सुरुवात झाली.  स्टीन यास आढळलेल्या कागदास वरून भाताची पेज लावलेली होती.  अजून देखील काश्मिीरी कागदाला भाताची पेज लावतात.  हा कागद कांहीं शतकांपूर्वी कुराण लिहिण्यासाठीं वापरीत असत.  याच्यावर पाणी पडलें तर लिहिलेलें पुसतें हा यांतील दोष सर वाल्टर लॉरेन्स यानें निदर्शनास आणला.

दंडान युइलिक (८ वें शतक) येथें सांपडलेल्या हस्तलिखिताचा कागद खोतान येथे बनविलेला असवा. तसेंच कुच येथें सांपडलेला कागद (५ वें शतक) ब्रूसोनेशिया याच्या तंतूंचा केला असावा असा समज आहे.  परंतु तुर्कस्तान, मंगोलिया, यारकंद वगैरे ठिकाणीं वनस्पतिशास्त्रज्ञांनीं बर्‍याच वनस्पतींची तपासणी केली.  परंतु त्यांना ब्रूसोनेशिया हें झाड सांपडलें नाही.  तेथें बनलेला कागद तेथल्याच वनस्पतीचा बनविला होता; याला उदाहरण म्हणजे तुतीच्या झाडाच्या वाखाचा ६ व्या शतकापासून जपानमध्यें कागद तयार करितात.  परंतु प्रो. गाइल्स यांचें असें म्हणणें आहे कीं, चीन देशांतील पूर्वीचा कागद तागाचा भुसा, जुना ताग, मासे पकडण्याची जाळीं वगैरेंचा होत असे; पण हल्लीं बांबूचे तंतू, ब्रूसोनेशिया प्रापिरिफेरा याची साल, भाताचा कोंडा, ताग, तुतीच्या झाडाची साल, वेत, शेवाळ, धान्याचा भुसा व रेशीम यांच्यापासून कागद तयार करितात.  स्टीन याला खोतान येथें सांपडलेल्या हस्तलिखितांवरून असें सिद्ध होतें कीं कागद तयार करण्याची कृति यूरोपमध्यें माहीत होण्यापूर्वीच इराण, मध्य आशिया, तिबेट आणि चीन देश यांठिकाणीं बहुतकरून ती माहीत असावी.

हिंदुस्थानांत कागद तयार करण्याची कला केव्हां माहीत झाली हें विज्ञानेतिहासांत पृ. ७६ वर दिलेंच आहे.  त्यावरून अलेक्झांडरच्या काळापासून हिंदुस्थानांत ही कला माहीत होतीं असें दिसतें.

सध्यां हिंदुस्थानांत होणारा कागद खराब कागदाचांच पुन्हां केलेला असतो.  तेथें कागदासाठीं पुष्कळ पदार्थ किंवा कच्चें द्रव्य आहे पण त्यांतील कोणतें द्रव्य चांगलें हें अजून ठरलें नाहीं.  तागापासून निघणार्‍या वाखाचा कागद सर्वांत स्वस्त किंमतींत तयार करतां येईल.  तसेंच भबर आणि मुंज नांवाचें कागदासाठीं उपयोगी पडणारें मुख्य दोन प्रकारचें गवत आहे.  या गवताचा वाफेनें चालणार्‍या कागदाच्या गिरण्यांत बराच उपयोग करितात; पण हा कागद फायदेशीर पडत नसल्यामुळें त्याचा पुढें उपयोग करणें कदाचित बंद पडेल.  बांबूचा देखील चांगला कागद होऊं शकेल परंतु याला लागणारीं रासायनिक द्रव्यें फार महाग असतात.  त्याचप्रमाणें बांबूचे कोंवळे अंकुर या कामासाठीं लागत असल्यामुळें बांबूंचा नाश होण्याचा संभव असतो.  म्हणून हल्लीं एक तर भबर आणि मुंज किंवा इतर कांहीं जातींचें गवत, जुन्या चिंध्या, पोत्यांचे तुकडे, ताग आणि सण यांचे दोर, टाकाऊ कागदाचे तुकडे वगैरे द्रव्यें कागद करण्यासाठीं उपयोगांत आणतात.  

कृति -  वरील द्रव्यांचा लगदा तयार करून तो धुवून स्वच्छ करावा लागतो.  चिंध्या असल्या तर त्या पूर्वीच साफ कराव्या लागतात.  नंतर त्यांत अलकली टाकून तो उकळतात (तो गवताचा असल्यास, ज्यावर वाफेचा १० ते ४० पौंडांचा दाब आहे अशा शे. १० प्रमाणांतील दाहक सोड्याच्या द्रावणांत तो उकळावा लागतो).  याप्रमाणें लागदा तयार झाल्यावर त्यांतील राहिलेले अलकली धुवून काढतात व त्याचा पुन्हां यंत्रानें बारीक रांधा तयार करून त्यांत पाहिजे असेल तो रंग टाकतात.  याला मग्म म्हणतात.  कागद तयार करण्याकरितां बारीक तारेचा जाळीदार कपडा या लगद्यामधून काढतात.  म्हणजे पाहिजे तेवढ्या जाडीचा पापुद्रा या कापडाला चिकटून येतो.  हा पापुद्रा काढून घेतात व त्याला दोन रुळांमधून काढून दाबून काढतात व पुन्हां तापलेल्या रुळामधून काढून चांगला सुकवितात.  स्वीडन व जर्मनी इत्यादि पाश्चात्य देशांत लांकडाच्या भुशापासून फार मोठ्या प्रमाणावर रांधा करतात व त्याचा उपयोग कागद करण्याकडे होतो.  ह्या तर्‍हेचा रांधा हिंदुस्थानांतील कांहीं जंगलांतील झाडांचा किंवा कांहीं जातींच्या गवताचा उपयोग केल्यास हिंदुस्थानांतहि कागद तयार करतां येईल असें कांहीं तज्ञांचें म्हणणें आहे.  परंतु अद्यापपावेतों त्यांत विशेष यश आलें नाहीं असें दिसतें.

कागदाच्या गिरण्या :-  इंग्लंडांत कागद तयार करण्याचे कारखाने पहिल्यानें १५८८ सालीं निघाले.  हे कारखाने केंटमधील डार्टफोर्ड गावीं जॉन स्पिंयेलमन नांवाच्या जर्मन रानपारख्यानें काढले.  ह्याच्या अगोदर एक शतकापूर्वी यासारखेच कारखाने स्पेन येथें निघाले होते.  त्याच्या नंतर म्हणजे १६९० त देखील फक्त इंग्लंडांतच जाडा तपकिरी रंगाचा कागद होत असे व उत्तम पांढर्‍या कागदाचा पुरवठा फ्रान्स आणि हॉलंड या दोन देशांतून इंग्लंडांत होत असे.  फ्रान्सशी लढाई सुरू झाल्यामुळें जकात वाढली व त्यामुळें इंग्लंडमधील कारखान्यांत सुधारणा करण्यास उत्तेजन मिळालें.  मेडस्टोन येथील मि. जेम्स व्हाटमन यानें पहिल्यानें पांढरा कागद तयार केला.  त्यानंतर इंग्लंडांत कागद करण्याच्या धंद्यांत बरीच प्रगति झाली.  परंतु १८०१ पर्यंत हातानेंच कागद तयार करीत असत.

कागद करण्यासाठीं कापसाचा व कधींकधीं तागाचा इंग्लंडांत पहिल्यानें उपयोग करीत असत.  सध्यां फारकरून लांकडाच्या भुशाच्या लगद्याचा उपयोग करितात.  बाहेरून कच्चा माल आणवून मग इंग्लिश कारखान्यांत हा लगदा बनवितात.

आज इंग्लंडांत २३१, स्कॉटलंडांत ६१ व आयर्लंडांत ७ कागदाच्या गिरण्या आहेत.  लांकडाचा लगदा तयार करणार्‍या गिरण्याहि आहेत.  शिवाय कानडांत ३४, आस्ट्रेलियांत ७ व न्यूझीलंडांत ३ याप्रमाणें गिरण्यांची संख्या इतरत्र आहे.  जगांत तयार होणार्‍या कागदापैकीं शेंकडा ११ ग्रेटब्रिटनमध्यें तयार होतो.  नार्वे, स्वीडन व जर्मनी या देशांतून इंग्लंडांत कागद फार येतो.

इ.स. १८४० पूर्वी हिंदुस्थानांतील कागदाचा चीन देशांत पुरवठा होत असे.  यामुळें हिंदुमुसुलमानांत चळवळ होऊन हातानें कागद तयार करण्याचे कारखाने निघाले.  सर चार्लस वूड हे हिंदुस्थानचे स्टेट सेक्रेटरी असतांना त्यांनीं हिंदुस्थान सरकारला लागणारा सर्व कागद ग्रेटब्रिटनमध्यें घ्यावा असा हुकूम सोडला.  त्यामुळें हिंदुस्थानांतील वाढत चाललेल्या कारखान्यांनां उतरती कळा लागली.

हिंदुस्थानांत कागदाच्या गिरण्या केव्हां स्थापन झाल्या हें खात्रीनें सांगतां येत नाहीं.  मि. डि. एम. ट्रेल यानें कांहीं वर्षांपूर्वी कागदाच्या गिरण्यासंबंधीं उपयुक्त अशी माहिती लिहून ठेवली आहे.  तो म्हणतो कीं या धंद्यांत सरकारी ५ कोटी पौंड भांडवल गुंतलें होतें व त्यांपैकी तीनचतुर्थांश भांडवलाची यंत्रें होतीं व एकचतुर्थांश भांडवल वरखर्चाकरिता राखून ठेवलें होतें.  रामपूर येथील गिरणी ही पहिली होय.  येथें होणार्‍या विशिष्ट प्रकारच्या पांढर्‍या कागदाला 'रामपुरी कागद' म्हणतात.

आजचे हिंदुस्थानांतील कागदाचे कारखाने

कागद करण्याची कृति -  सुती कापडाच्या व तागाच्या चिंध्यातून पांढर्‍या, काळ्या व इतर रंगांच्या चिंध्या वेगळाल्या काढून त्यांच्या गांठी व शिवणी तोडतात आणि यंत्रानें किंवा हातांनीं त्या बडवून त्यांतील धुरळा व माती काढून नंतर त्यांचे बारीक तुकडे करतात.  रंगीत चिंध्यांस क्लोरीन वायूनें धुवून त्यांचा रंग घालवितात.  नंतर सर्व पांढर्‍या चिंध्यांस पापडखाराच्या पाण्यांत टाकून शिजवितात व त्यांतील मळ घालवितात.  याप्रमाणें स्वच्छ केलेल्या चिंध्यांस डंगांत घालून कुटतात किंवा यंत्रानें त्यांचा बलक करितात.  हा बलक पुन्हां एकदां शुभ्र करण्याच्या पुडीनें धुतला, म्हणजे तो कागद तयार करण्यालायक होतो.  हा बलक पाण्यानें भरलेल्या एका मोठ्या हौदांत सोडून देतात.  या रीतीनें हवा तेवढा पातळ थर घेऊन बारीक चौकोनी तारांची किंवा बारीक काड्यांची एक ताटी केलेली असते.  ही ताटी एका लांकडी चौकटीवर बसवून ती चौकट हातांत घेऊन कागद करणारा मनुष्य हौदाजवळ बसतो व ही चौकट थोडी कलती करून हौदांत बुडवतो व तिजवर थोडा बलक घेऊन वर उचलून सरळ धरतो; व हालवून तो बलक सर्व ठिकाणी सारखा पसरेल असें करतो.  या योगें पाणी सर्व झिरपून ताटींतून खालीं जात असतें.  याप्रमाणें एक दोन वेळां बुडवून वाटेल त्या जाडीचा कागद तयार होतो.  नंतर जवळच कट्टयावर जाड कपड्याचा कोरडा तुकडा टाकलेला असतो.  त्यावर ताटी पालथी घालून व हातानें झटका मारून कागदाचें पान त्या कपड्यावर पाडवितो.  या रीतीनें २ माणसें व एक मुलगा दररोज ६ पासून ८/७ रिमें कागद तयार करूं शकतात.

हा कागद प्रथम मऊ, निःसत्व व शोषक असतो.  त्यास बळकटी येऊन त्याचीं छिद्रें बुजविण्याकरितां खळींत टाकून दाबांत घालून पुन्हां वाळवावा लागतो.  शेवटीं त्यास कवडीनें किंवा गुळगुळींत गारेनें घासून मोहरा आणतात.  वर लिहिलेली सर्व कृति कागदांच्या मोठ्या गिरण्यांत यंत्रांच्या साह्यानें आपोआप होऊन कापडाच्या ताग्याप्रमाणें कागदाच्या मोठाल्या आकाराच्या सुरळ्या तयार होतात.  नंतर हव्या त्या आकाराच्या कापून त्यांचीं रिमें बांधतात.

टिपण्याचे कागद केवळ बिन खळलेले कागद असतात.  कोल्हापुरी, जुन्नरी, दौलताबादी वगैरे कागद फार नामांकित होते.  त्यांवर लिहिलेले लेख ३०० पासून ४०० वर्षांवर टिकलेले दृष्टीस पडतात.  ब्राउन पेपर हे गोणपाट, ताग, कॅनव्हस वगैरे पदार्थांपासून करतात.  पुठ्ठयाचे व गंजिफांचे कागद गवतापासून किंवा ब्राऊनपेपर एकावर एक चिकटवून तयार करतात.

सुधारलेले कागद करण्याचें यंत्र म्हणजे एकटें दुकटें नसून अनेक लहान मोठीं सहाय्यक यंत्रें कागद करण्याच्या क्रियेला आवश्यक असतात.  लाकडाचा लगदा छापण्याच्या किंवा लिहिण्याच्या स्थितींत आणावयाचा म्हणजे साधें काम नव्हे.  प्रथम तो कुटून बारीक करून त्यास ब्लीचींग पावडरनें शुभ्र करावा लागतो; व पुन्हा भट्टींत घालून तो उकळून पुन्हां स्वच्छ करावा लागतो.  प्रथम हा लागदा कुटण्याच्या यंत्रांत घालतात.  तेथें त्याचे तंतू वेगवेगळे होतात.  या यंत्रांतून दुसर्‍या एका यंत्रांत हा पिंजलेला लगदा येतो.  तेथें सुमारें शंभरपट पाण्यांत तो मिसळला जातो.  नंतर मुख्य यंत्राच्या 'ओल्या' टोंकाकडे हा जातो.  या ठिकाणीं तारेच्या जाळीवर हा पातळ लगदा पडतो.  यांतील पाणी पूर्णपणें निघून जावें म्हणून या जाळीला शोषक पेट्या बसविलेल्या असतात; ह्या पेट्या जाळींतून खालीं न पडणारें पाणी किंवा ओलावा वाय्वाकर्षणानें शोषून घेतात.  या जाळीच्या टोंकाजवळ कागदावर जलचिन्ह (वाटरमार्क) उठविणारा पितळी अक्षरांचा रूळ असतो; तो या मऊ लगदी कागदावर पाहिजे तीं अक्षरें उठवितो.  तारेच्या टोंकाशीं स्पंजासारखा व मऊ झालेला हा लगदा आल्यावर तो फिरणार्‍या बनात किंवा फेल्टवर कोरडा होऊन चढूं लागतो व या फेल्टच्या सहाय्यानें कोरड्या करणार्‍या पहिल्या रुळावर व त्यावरून इतर रूळांवर जात जात व कोरडा आणि कणखर होत होत शेंवटीं एका रूळावर गुंडाळला जातो.  या रुळांपैकींच कांहीं रूळ अति गुळगुळींत असल्यामुळें व त्यांतून प्रमाणशीर दाबाखाली कागद गेल्यामुळें त्यावर मोहरा येतो.  या सर्व क्रिया इतक्या थोड्या वेळांत होतात कीं, पहाणाराला हा एक चमत्कार वाटतो.  यापेक्षांहि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 'ओल्या' टोंकाशीं असणारा माणूस जसा पाहिजे तसा पातळ जाड कागद करण्याकरितां व लगदा कमीजास्त प्रमाणांत सोडण्याकरितां इकडचीं तिकडचीं अनेक यंत्रें ज्या कुशलतेनें फिरवीत असतो, तें त्याचें विशेष कसब होय.  कारण यंत्रांत किंवा साधनांत अगदीं थोडा जरी फरक झाला तरी कागद पूर्वीसारखा निघत नाहीं.

कागदाचे व्यापारी आकार -
  नांव    आकार इंचेस
  पॉट   १२॥x१५
  फुलस्कॅप   १३॥x१६॥
  डबलफुलस्कॅप    १६॥x२६॥
  फुलस्कॅप व थर्ड    १३।x२२
  फुलस्कॅप व हॉफ   १३।x२४॥।
  पिच्ड पोस्ट   १४॥x१८॥
  स्मॉल पोस्ट    १५।x१९
  लार्ज पोस्ट   १६॥x२१
  डबललार्ज पोस्ट   २१x३३
  मीडियम   १८x२३

 

चित्रकलेचे व पुस्तकांचे कागद
  डेमी   १५॥x२०
  मिडियम्   १७॥।x२२॥
  रॉयल   १९x२४
  सुपररॉयल   १९।x२७
  इंपीरियल   २२x३०
  एलिफन्ट   २३x२८
  कोलोंबीर   २३॥x३४॥
  एटलॅस   २६x३४
  ऍंटिक्वेरियन   ३१x५३
 
 छापखान्याचा कागद   इंचेस
 डेमी    १७॥x२२॥
 डबल डेमी   २२॥x३५
 क्वाड डेमी   ३५x४५
 डबल फुल्सकॅप   १७x२७
 रॉयल   २०x२५
 डबल रॉयल   २५x४०
 डबल क्राऊन   २०x३०
 क्वाड क्राऊन    ३०x४०
 इंपीरियल   २२x३०

इंडिया पेपर -  हा अति पातळ, हलका, परंतु चिंवट आणि प्रकाशाभेद्य असा कागद असतो.  इ.स. १८४१ सालीं ऑक्सफोर्डच्या एका पदवीधरानें पूर्वेकडून (चायना हिंदुस्थान) अति पातळ प्रकारचा एक कागदाचा नमुना परत स्वदेशीं नेला.  यावर पुष्कळ प्रयोग होऊन यासारखा कागद इ.स. १८७५ सालीं तयार झाला.  या कागदाचें अंग शामॉयलेदरइतकें चिवट असल्याचें दिसून येईल.

कागदासाठीं लागणारा कच्चा माल -  हिंदुस्थानांत कागद तयार करण्यासाठीं खालीं दिलेला कच्चा माल उपयोगांत आणितात.

अडनसोनिआ डिझिटाटा अगेव्ह स्पीसीज, अॅटिआरिस टॉक्सिकारिया, बांबूसी, ब्रौसोनेटिया पापीरीफेरा, कॉर्चोरस, क्रोटालारिआ जुन्सिआ, डाफ्ने कॅनाबिना, एड्जवर्थिआ गार्डनेरी, हेलिक्टेरीच आयसोरा, हिबिस्कस कॅनाबिनस, इश्चिमुम अॅगुस्टिफोलिअम, मुसा स्पीसीज, ऑपुन्शिआ डिलेनिआय, फोनिक्स पालुडोसा, सॅकॅरम अरुंडिनासिअम, सान्सेव्हिएरिआ झेलानिका.  कपाशीच्या धांड्यांचाही उपयोग अमेरिकेंत कागद बनविण्याकडे करतात; व त्या दिशेंनें हिंदुस्थानांतहि प्रयत्‍न चालू आहेत.

तुरटी, कॉस्टिक सोडा, कळीचा चुना, जिलेटाईन, सोडा अॅश, रोझिन इतके पदार्थहि कागदाकरितां लागतात.  यांखेरीज निरनिराळे रंग किंवा रंगाच्या मातीचाहि उपयोग कागद करण्याकडे होतो.

हिंदुस्थानांत कागदाची आयात निर्गतीच्या मानानें बरीच जास्त आहे व सुमारें ८०००० टन कागद हिंदुस्थानांत दरवर्षी लागतो.  त्यातून हिंदुस्थानांत तयार झालेला माल वजा जातां ५०००० टन कागद अन्य देशांतून आपणास आणावा लागतो.  हिंदुस्थानांत पूर्वी पुष्कळ ठिकाणीं फार मजबूत, सुबक व टिकाऊ कागद बनविण्याचे कारखाने होते.  परंतु त्यांचा यांत्रिक कागदांपुढें टिकाव न लागल्यामुळें ते सध्यां नामशेष झाले आहेत.  १९१३-१४ सालीं १ कोटी ५९ लक्ष किंमतीचा कागद बाहेरून आला, पण १९२०-२१ सालीं ७ कोटी ३० लक्षांचा कागद हिंदुस्थानांत आला.

हल्लीचे उतरलेले भाव लक्षांत घेतल्यास आयातीच्या रकमेवरून मालाच्या प्रमाणांत कांहीं फरक पडला असें दिसत नाहीं.  उलट पक्षीं १९२१-२२ सालापेक्षां १९२२-२३ सालीं कागदाची आयात अधिकच झाली.  १९२१-२२ सालापेक्षां १९२२-२३ सालीं कागदाच्या आयातींत सुमारें अर्धा कोट रुपयांची वाढ दिसते.  कागद तयार करण्याच्या वस्तूंची आयात कमी झाली तरी या वस्तूंची आयात वाढून कागदाची आयात कमी झाली नाहीं.  उत्तम कागद, छपाईचा कागद, वेस्टबोर्ड, मिलबोर्ड, कार्डबोर्ड वगैरे कागदांची अनेक जाती आहेत.  यांपैकीं हिंदुस्थानांत मुख्यत्वेंकरून छपाईचा कागद पुष्कळ येतो.  या प्रकारचा कागद १९२१-२२ सालीं ११००० टन आला होता; तो १९२२-२३ सालीं १९३०० टन आला आहे.  यावरून या प्रकारच्या कागदाच्या आयातींत केवढी मोठी वाढ झाली आहे तें दिसून येईल.  हा कागद बहुतेक नॉर्वे व इंग्लंड येथून येतो.  जर्मनी व नेदरलंड्स यांचाहि हा व्यापार वाढूं लागला आहे.

 कागदाच्या आयातीचें निरनिराळ्या देशांचे प्रमाण :-
  देश   १९१३-१४   १९२०-२१  १९२२-२३
  युनायटेड किंगडम्  ५६   ४३   ४८
  नॉर्वे   ५   १७   १५
  अमेरिका   १   १२   ४
  स्वीडन   ३   ९   ७
  जपान   १   ६   १
  जर्मनी  १७   २   ११
  इतर  १७   ११   १४
  एकंदर   १००   १००   १००

यावरून नॉर्वे व जर्मनी यांच्या व्यापाराची तेजी दिसून येते.  जपाननें मध्यंतरीं आपला बराच माल इकडे आणला; परंतु तो आतां कमी कमी होत असल्याचें स्पष्ट दिसतें.  (ज्ञानप्रकाश ता. १७ जुलै १९२४).

(संदर्भग्रंथ -  यावर अनेक ग्रंथ आहेत.  त्यांपैकीं कांहीं महत्वाचे - ए टेकस्ट बुक ऑफ पेपरमेकिंग (लंडन, १८८८); डेव्हिस - दि मॅन्युफॅक्चर ऑफ पेपर :  ग्रिफिन अॅंड लिटल - केमिस्ट्री ऑफ पेपरमेकिंग; हिंदुस्थानसरकारचा 'दि मॅन्युफॅक्चर ऑफ पेपर अॅंड पेपर पल्प इन् बर्मा' वरील रिपोर्ट (लंडन १९०६); सिंडाल - पेपर टेक्नॉलॉजी; वॅट; पेपर मेकर्स मंथली जर्नल (लंडन); पेपर ट्रेड जर्नल न्यूयार्क).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .