प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कसाईखाना -  वेदकालापासून, शस्त्रृ व गोघात असे खाटिकवर्गाचे वाचकशब्द आढळतात,  शस्त्रृ व शब्द ॠग्वेदांत एक वेळ व अथर्ववेदांत एक वेळ आलेला आहे; पण त्यावरून या धंद्याची विशेष माहिती मिळत नाहीं.  गोघाताचा देखील उल्लेख पुरुषमेधांत आलेला आहे.  त्यावरून ग्राम्य पशु मारणारा एक वर्ग होता यांत शंका नाहीं.  तो शब्द धंदेवाचकच असला पाहिजे.  कां कीं सामान्यपणें पशू मारणें हें प्रत्येक गृहस्थाचें कर्तव्य होतें.  गोघाताला पुरुषमेधांत बळी म्हणून उभा करण्याचा प्रसंग धंदेवाईकांसच अनुलक्षून आलेला असला पाहिजे.  अतिथी आला तर गाय वगैरे मारावी व मधून मधून शूलगव करावा असे विधी धर्म म्हणून आश्वलायनानें सांगितलेच आहेत.  खाटकांचा हा वर्ग असावा व हा विशेषेंकरून गाई मारणाराच असावा.  कां कीं, मासे मारणारे धीवर, शेळ्या मारणारे धनगर, वन्यपशू मारणार्‍या अनेक शिकारी जाती यांचाहि उल्लेख स्वतंत्रपणें करण्यांत येतोच.  शूलगव करावयाचा तो गांवाबाहेर जाऊन करावा असें सूत्र आश्वलायन स्मरतो.  त्यावरू पशुवध गांवांबाहेर करण्यास प्रारंभ प्राचीन काळापासून झाला असावा असें दिसतें.

कौटिल्याच्या अर्थशास्त्रांत उपदेशिलेले पशुवधविषयक नियम येणेप्रमाणें आहेत :-  सरकारी आश्रयाखालील अभयारण्यांत असलेल्या हरीण, गवा, पक्षी व मासे यांनां जो कोणी उपद्रव देईल, ठार मारील किंवा अडकवून ठेवील त्यास मोठा द्रव्यदंड होईल.  सरकारी अरण्यांतून जाणार्‍या गृहस्थास शिक्षा होईल.  इतर प्राण्यांनां त्रास न देणार्‍या पक्ष्यांनां व माशांनां जो त्रास देईल, ठार मारील व पकडील त्यास २६३/४ पण दंड होईल; व असें वर्तन हरिण व इतर पशूंच्या बाबतींत केल्यास दुप्पट दंड होईल.

पकडलेल्या पशूंपैकी १/६ भाग अधिकारी घेईल.  मासे व पक्षी या बाबतींत ११/२ किंवा अधिक घेईल व हरिण व इतर मृगपशूपैकी १/१० किंवा अधिक भाग कर म्हणून अधिकारी घेईल.  सरकारी अरण्यांतील जिवंत पशुपक्षांचा १/६ भाग सोडण्यांत येईल.  समुद्रांत असणारे व मनुष्यकृतीसारखे हत्ती घोडे वगैरे प्राणी, त्याचप्रमाणे बैल व गाढवें वगैरे, तसेंच नदीमध्यें व सरोवरांत असणारे मासे, यांचें सर्व त्रासापासून रक्षण केलें जाईल.  त्याचप्रमाणें कौंच, उत्क्रोशक, दत्यूह, हंस, चक्रवाक, जीवनजीवक, भृंगराज, चकोर, मत्तकोकिल, मोर, राघु, मैना व इतर शुभ पशुपक्षी यांनां सर्व त्रासापासून अभय आहे.  वरील कायदे भंग करणा-यास द्रव्यदंड होईल.  खाटिकांनीं नुकत्याच मारलेल्या मृगपशूचें ताजें व अस्थिविरहित मांस विकावें.  अस्थियुक्त मांस विकल्यास त्यांनां तितकीच नुकसानी (प्रतिपाकम) द्यावी लागेल.  खोटी मापें योजिल्यास कमी पडणार्‍या वजनाच्या आठपट हिस्सा त्यांनां द्यावा लागेल.  वासरू, बैल व दुभती गाय याची कत्तल करूं नये.  जो असें करील त्यास ५० पण दंड होईल.

कसाईखान्या (परिसूनम्) पलीकडे मारलेल्या प्राण्यांचें मांस ; शीर्षविहीन, पादविहीन व अस्थिविहीन मांस; कुजकें मांस, व अकस्मात मृत झालेल्या प्राण्याचें मांस विकूं नये.  नाहीं तर गुन्हेगारास १२ पण दंड होईल.  सरकारी रानांतील जनावरें, वन्यपशू व व्याळ जर मत्त झाले तर त्यांनां पकडावें किंवा अरण्याबाहेर ठार मारावे (कौटिलीय अर्थशास्त्र, अध्याय २६).

मुसुलमानी काळापासून या धंद्यामध्यें एक नवीन रिवाज शिरला; तो म्हणजे हाल हाल करून मारणें हा होय.  मुसुलमानांकडून समंत्रक हत्त्या करवून घेऊन आज हिंदू मांस खाऊं लागले आहेत.  अर्वाचीन हिंदुस्थानामध्यें कसाईखान्यासंबंधाचे नियम यूरोपीय अनुभवावरून लावण्यांत येऊं लागले आहेत.

ग्रेटब्रिटन व आयर्लंडमध्यें कत्तलखाने दोन प्रकारचे आहेत.  खाटिकांनीं चालविलेले खासगी कत्तलखाने व अधिकार्‍यांनीं चालविलेले सार्वजनिक कत्तलखाने असे ते दोन प्रकार आहेत.  इ.स. १८७५ चा सार्वजनिक आरोग्याचा कायदा पास होण्यापूर्वी खासगी कत्तलखाने बिनपरवानगीनें उघडले जात अस.  खुद्द लंडन शहरांत इ.स. १८५५ पासूनच पूर्ण मुभा ठेवलेली होती.  खासगी कत्तलखाने दुकानाच्या पिछाडीस असून तेथेंच मांसाची विक्री करतात.  प्राण्यांची कत्तल करण्याचीं तेथें स्वतंत्र दालनें असून कांहीं गुरें कोंडवाड्यांत राखून ठेवलेली असतात.  हे कत्तलखाने कसे असावे याविषयीं सार्वजनिक आरोग्यविषयक कायद्याची कांहीं कलमें आहेत व त्याअन्वयें तेथें सपाट फरशी असावी व कत्तलींत माती वगैरे उडूं नये अशी व्यवस्था केलेली असते.  गुरांनां जातांना अडथळा होऊं नये म्हणून विस्तीर्ण दरवाजे असावे; कोंडवाड्यांतील फरशी चांगली असावी, व भिंतीला सिमेंट केलेलें असावें; पाणी भरपूर असावें, इत्यादि योजना वरील कायद्यानें काळजीपूर्वक केलेल्या आहेत.  नांदत्या घरांजवळ असलेल्या खासगी कत्तलखान्यांमुळें लोकांना बराच त्रास पोंचतो.  गांवांतून गुरें नेणें धोक्याचें असून शिवाय मांसाची सरकारी पाहणीहि बरोबर होत नाहीं.  यामुळें सार्वजनिक कत्तलखानेच दिवसेंदिवस लोकसंमत होऊं लागले आहेत.

सार्वजनिक कत्तलखाना ही एक पुरातन संस्था असून तिचें मूळ अगदीं रोमन सुधारणा व संस्कृतीपर्यंत जाऊन पोंचते.  ख्रिस्तीशकापूर्वी ३०० वर्षे रोममध्यें उघड्या बाजारांत प्राण्यांची कत्तल होत असे.  पुढें खाटकांच्या सोयीकडे लक्ष देऊन त्यांनां हा धंदा करण्यास टायबर नदीच्या तीरावर जागा देण्यांत आली.  तेथें मॅसेलस नांवाच्या रोमन नागरिकाचा कसाईखाना होता.  लेव्हीच्या वेळीं वरील नागरिकाच्या स्मरणार्थ मॅसेलम-कसाईखाना होता; व हाच मॅसेलम शब्द थोड्या फरकानें, पण एकाच-कसाईखाना या-अर्थी इटालियन, जर्मन व इंग्रजी भाषेंत आढळतो.  

मध्ययुगीन जर्मनींत कुट्टेलहोफ नांव धारण करणारे सार्वजनिक कसाईखाने अनेक होते व ते बहुधा नदीच्या तीरावर असत.  त्यांची मालकी खाटिक-मंडळाकडे असे.  परंतु सर्वच खाटिक त्या मंडळाचे सभासद नसत.  १८६८ व १८८१ सालीं प्रशियांत व इतर जर्मन संस्थानांत कांहीं कायदे झाले व त्यामुळें शहरांत कत्तल केले जाणारे प्राणी सार्वजनिक कसाईखान्यांतच कत्तल केले गेले पाहिजेत असें ठरलें.  

पंधराव्या व सोळाव्या शतकांत फ्रान्समध्यें प्रमुख शहरीं सार्वजनिक कसाईखाने असत.  प्राण्यांची हत्त्या करणार्‍या कोणत्याहि मनुष्यास तेथें मोकळीक असे.  १८०७ व १८१० सालीं फ्रान्सच्या सर्व शहरांतून कसाईखाने उघडावे असा हुकूम झाला.  १८३८ मध्यें नवीन कायद्यानें ही संख्या वाढविण्यांत आली व ते राहत्या वस्तीपासून दूर असावे असें ठरलें.  १८६७ सालीं लाव्हिक्लेटी हा प्रसिद्ध कसाईखाना पॅरिसकरितां सुरू करण्यांत आला.  बेलजम, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, नार्वे, स्वीडन, डेन्मार्क व रुमानिया येथें बरेच सार्वजनिक कसाइखाने आहेत.  परंतु या बाबतींत सर्वांपेक्षां खरी प्रगति जर्मनीची झाली आहे.  १८९७ सालीं जर्मनींत ३२१ सार्वजनिक कसाईखाने होते.  १९०६ सालीं प्रसिद्ध केलेल्या एका पुस्तकांत जे. डी. लोव्हर्डो असें लिहितो कीं, जर्मनींत ८३९, इंग्लंडांत ८४, फ्रान्समध्यें ९१२ व आस्ट्रियांत सुमारें २०० असे एकंदर २०३५ कसाइखाने आहेत.

इ.स. १८४८ च्या व १८७५ च्या सार्वजनिक आरोग्य कायद्याप्रमाणें स्थानिक अधिकार्‍यांनां सार्वजनिक कसाईखाने उघडण्याबद्दल पूर्ण मुभा असली तरी वर्षाचें नियंत्रण घालण्यापलीकडे, खासगी कसाईखान्यावर पूर्ण नियंत्रण घालणें त्यांनां जड होऊं लागलें आहे.  मनुष्यभक्ष्य म्हणून मांसाची विक्री करण्यापूर्वी त्या मांसाची तपासणी करण्यास कडक कायदा अस्तित्वांत नसल्यामुळें फार गैरसोय होत असे.  परंतु आतां कत्तलीपूर्वी व नंतर जनावरांची व मांसाची अनुक्रमें तपासणी होते.  ही पद्धत बेलजम, जर्मनी, नॉर्वे व स्वीडन, आस्ट्रियाहंगेरी येथें अमलांत आली आहे.  न्यूझीलंडसारख्या ब्रिटिश कॉलनीमध्येंहि आता सार्वजनिक कसाईखान्यांतच जनावर मारावें व मांसाची तपासणी व्हावी अशी योजना सुरू झाली आहे.

सार्वजनिक कसाईखाने कसे असावे यासंबंधीं नकाशे व रचना मांडून भरपूर माहिती देण्यांत जर्मन ग्रंथकार मोठे वाकबगार आहेत.  त्यांच्या वर्णनाप्रमाणें कसाईखाने वस्तीपासून फार दूर असावे व तेथें जाणारे रस्ते लांब रुंद असावे.  एखादा रेल्वेचा फाटाहि त्यांनां जोडलेला असावा.  कसाईखान्याचा आकार समकोनाचा किंवा चौकोनी असा असावा; जवळच गुरांचा बाजार असावा व तेथून जनावरें रेल्वेनें कसाईखान्याकडे न्यावीं.  डॉ. ऑकसर स्कवार्झ आणखी त्या इमारतीचें असें वर्णन करितो कीं, तेथें एक कारभाराचें स्वतंत्र दालन असतें, कत्तलीकरितां एक मोठा हॉल असतो, आजारी जनावरांकरितां एक जागा असते, इंजिनाकरितां जागा असते आणि कत्तल झालेल्या जनावरांची आंतडीं स्वच्छ करून व पुढील व्यवस्था करून त्याचें पृथक्करण करण्याकरितांहि एक स्वतंत्र दालन असतें.  मुबलक हवा, प्रकाश व पाणी यांचीहि तेथे व्यवस्था असते.  सर्व उपकरणे व फरशी स्वच्छ केलेली असते.

कत्तलीच्या धंद्याचें केन्द्रीकरण (समाकर्षण) केल्यामुळें अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांतील कत्तलखाने यूरोपमधील कसाईखान्याबरहुकूम नाहींत.  इ.स. १८९०-१८९१ व १८९५ सालच्या काँग्रेसच्या कायद्याप्रमाणें तपासणीचें नियंत्रण घालण्याचा येथें प्रयत्‍न करण्यांत आला.  अध्यक्ष रूझवेल्ट यांनीं चौकशीकमिटी नेमली व तिच्या रिपोर्टाप्रमाणें १९०६ सालीं मांसतपासणींचा कायदा पास करण्यांत आला.  प्रत्येक जनावर, मेंढी व डुक्कर यांची तपासणी करून मग त्यांनां कसाईखान्याकडे पाठविणें, व नंतर मांसाची तपासणी करणें, असे दोन निर्बंध घालण्यांत आले.

शिकागो व इतर अमेरिकन कसाईखान्यांचा हा विशेष आहे कीं, प्राण्यांचे जीव तत्काल व सुटसुटीत रीतीनें तेथें घेतले जातात.  प्रत्येक प्राण्याला एका अरुंद गोठ्यांत कोंडून व त्याच्या डोक्यावर जबर प्रहार करून त्याची संवेदनशक्ति कमी केली जाते.  नंतर त्या अरुंद गोठ्याच्या फटींतून त्याचा विस्तीर्ण कसाईखान्यांत प्रवेश होतो, तोंच त्याचे पाय वेगळे होऊन धड तारेच्या दोरामुळें एकदम वर उचललें जातें.  नंतर त्याच्या गळ्यांत सुरी भोंसकून धड तारेवर लटकवितात व लाडसावरून तें ताबडतोब विशिष्ट स्थळीं नेलें जाऊन त्याची सर्व व्यवस्था लागते.  तेथील कसाईखान्यांत ४०० च्या वर जनावरें फक्त एका तासांत कत्तल केलीं जातात.  यावरून या धंद्यांतील व्याप व सुधारणा केवढी जबर झाली आहे याची कल्पना होईल.  १९०४ सालीं एका ब्रिटिश डिपार्टमेंटल कमिटीनें प्राण्यांची कत्तल भूतद्‍यार्द्र होऊन केली जावी असा अभिप्राय दिला व शिफारस केली कीं, कत्तलीपूर्वी प्राण्यांची संवेदनाच नष्ट होईल असें करावें व जनावरें वेगवेगळी ठेवण्याची व्यवस्था तेथें करावी.  वरील ब्रिटिश कमिटीनें दयायुक्त कत्तल कशी करावी याबद्दल अनेक प्रयोग केले व त्यातच ब्रूनियू व बक्स्टर झापड, दि ग्रीनर पेटंट किलर, बिलट्झ शस्त्र आणि बॅकेटपंच अशीं साधनें तत्काळ प्राण घेण्याकरिता सुचविलीं आहेत.  शिरच्छेदकारक कुर्‍हाड हेंच कमिटीच्या मतें उत्तम साधन असून वासरें मात्र डोक्यावर प्रहार करूनच मारावी असें दयायुक्त-कत्तलीबद्दल वरील ब्रिटिश कमिटीचें मत आहे.  या सर्व सुधारलेल्या प्राणघातक साधनाची एवढी प्रगति झालेली आहे कीं प्रो. स्टार्लिंगच्या रिपोर्टाप्रमाणें पाहिलें तर ५ ते ३० सेकंदांत सुरी खुपसणें व प्राण घेणें किंवा पूर्ण अशी मर्च्छा आणणें या गोष्टी सहज होतात.  ज्यू लोकांची कत्तलीची पद्धत प्रो. स्टार्लिंग व सर मायकेल फॉस्टर व ब्रिटिश कमिटी यांनां मुळींच पसंत नाहीं.  कां कीं, प्राण्यास ठोसा देऊन मर्च्छा आणणें, त्याच्या वेदना कमी करणें व त्यांच्या प्राणांची तत्काल मुक्तता करणें या भूतद्‍यायुक्त योजना ज्यू लोकाच्या कत्तलीच्या पद्धतींत सांपडत नाहींत.

यूरोपियन राष्ट्रात तपासणीची आवश्यकता सर्वांनाच भासूं लागली.  जनावरें तपासणे, त्याचें मांस भक्षणाकरिता तपासून पहाणें, अशी तपासणी करण्याकरिता सार्वजनिक कसाईखाने उघडणें, व धंद्याच्या दृष्टीनें या गोष्टींचा फायदा जाणणें या सर्व गोष्टी लक्षांत घेतां खासगी कसाईखान्यांच्या उणीवाच जास्त स्पष्ट होतात व साहजिकच सार्वजनिक कसाईखान्याकडे लोकप्रवृत्ति वळते.  शिवाय मांसाच्या किंमतींतहि सार्वजनिक कसाईखान्यामुळें कोणतेहि अनिष्ट परिणाम घडून येत नाहींत असे दिसून आलें आहे.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .