प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कसबी -  (कसबीण, कसबण).  गाणार्‍या व नाचणार्‍या वेश्यांची ही एक जात बनली आहे.  कलावंतांपेक्षां ही जात हलकी समजतात.  कसब (म्हणजे शरीरविक्रय करणें) या अरबी शब्दापासून कसबी शब्द तयार झाला आहे.  या देशांत नृत्य करणार्‍या व गाणार्‍या स्त्रिया वेश्याच असतात.  गरती स्त्रियांपेक्षां भाषणांत, गायनांत, नृत्यांत व पोशाखांत वेश्या जास्त कुशल असल्यामुळें हिंदुसमाजांत त्यांची जास्त चहा होत आहे.  या बायका प्रवास करीत त्यामुळें निरनिराळ्या समाजांचा अनुभव यांस प्राप्‍त होई.  यांच्याकडून विद्याहि करवीत असत.  त्यामुळें समाजांत यांची विशेष चहा होई, व सभ्य लोकांच्या समाजांत देखील यांचा प्रवेश होत असे.  दशकुमारचरितांत एका वेश्या मुलीच्या शिक्षणाचें वर्णन दिलें आहे.  त्यावरून त्यांच्या शिक्षणाची किती काळजी बाळगीत याची कल्पना होईल.  सध्यां सर्व लोकांत विख्यात अशा गौहरजान नांवाच्या गाणारिणीनें आपली मुलगी इमतियाजान हिचें शिक्षण, वाचन, लेखन, भाषण, गायन व नृत्य वगैरे बाबतींत किती काळजी घेतली याचें वर्णन एस. एम. एडवर्ड्स यानें बायवेज ऑफ बाँबे या पुस्तकांत केलें आहे.  व अजूनहि सभ्य गृहस्थांनीं वेश्यांपासून उत्तम भाषण करण्याची कला शिकण्याकरितां तिच्या घरीं जावें अशी चाल कोठें कोठें दृष्टोत्पत्तीस येईल.  याठरून ते वेश्यागमन करतातच असें नाहीं, व सुशिक्षित म्हणविणार्‍या लोकांत तर ही चाल मुळींच नाहीं असें म्हटलें तरी चालेल.

उत्तम प्रकारच्या कसबिणींत विशिष्टजातिबोधक कांहीं कांहीं अंगें दृष्टीस पडतात.  मुलीस न्हाण आलें म्हणजे तिचा पहिला संग कोणा श्रीमंत माणसाबरोबर ठरवतात; व तिला विवाहांतील वधूप्रमाणें चार पांच दिवस वागवितात.  तेल व हळद तिच्या अंगास ५ दिवस चोळतात.  जातीला एक भोजन घालतात व एका कट्यारीबरोबर तिचें लग्न लावतात; व सात वेळ एका लग्नस्तंभाला कट्यारीसहवर्तमान प्रदक्षिणा घालतात.  नंतर तिचा ठरलेला पुरुष तिला कुंकू लाऊन सातदां पदर घालतो.  रात्रीं ती त्या पुरुषाकडे जाते व तो खाऊं घालील तितके दिवस त्याच्या कडे राहाते.  हा पुरुष कसबी जातीपेक्षां भिन्न असला पाहिजे.  त्या पुरुषाकडून निघाल्यावर तिला धंदा करण्यास मोकळीक मिळते.  जात बनल्यामुळें त्यांच्यांत आपल्या धंद्याबद्दल आदर उत्पन्न झालेला दिसतो. व समाजांतहि तितका तिरस्कार दिसून येत नाहीं.  व त्यांच्या तारुण्यांत तरी गरती स्त्रियांपेक्षां यांची राहणी जास्त मोहक दिसते.  कसबीण आपल्या प्रथम गरोदरावस्थेंत सातव्या महिन्यांत १८८ करंज्या  तयार करून स्वतः खाते व आपल्या मैत्रिणींस वाटते व मग तिच्या मैत्रिणी तशाच करंज्या करून तिच्याकडे पाठवितात.  बाळंत होण्यापूर्वी गरोदर कसबीण हरबर्‍याच्या पिठानें न्हाते व उत्तम वस्त्रालंकार घालून मैत्रिणींस बोलावून दूध, भात, पुरी व मिठाई खाऊं घालते.  यांच्यांत लग्न करण्याच्या चालीचा अभाव असल्यामुळें यांची जात चांगली जोमदार होणें शक्य नाहीं.  यांच्या मुलांपैकीं कोणी लग्नें करून गृहस्थ बनतात व निरनिराळे धंदे करतात.  कोणी भडवे बनतात; कोणी सारंगिये बनतात.  यांच्यांपैकीं कसबिणी व नायकिणी म्हणविणार्‍या हिंदु असतात, तवाइफ मुसुलमान असतात व बोगम तेलंगी असतात; गोंड जातीच्या आपणांस देवघरनी म्हणवितात.  सारंगियांचीहि आतां एक निराळी जात बनत चालली आहे.  उत्तरेकडील जिल्ह्यांत नाचणार्‍या स्त्रिया बेडणी जातीच्या असतात व त्यांस बेडणी म्हणतात.  तेथें कापणीच्या सुमारास रात्रीं ३।४ बेडणी जमवून त्यांस दारू पाजून नाचवितात.  गांवचीं तरुण मुलें वाद्यें वाजवितात व कसबिणी थकून खालीं बसेपर्यंत त्यांस नाचवितात.  शेतकरी प्रत्येकी एक दोन पैसे देतो व मालगुजार एक रुपया देतो.  या नृत्यास राय असें म्हणतात.

बंगाल्यांत अशा प्रकारच्या बायका वैष्णव बनतात : व विधवांचा आणि आळशी बायकांचा यांत फार भरणा होतो.  या भीक मागत आखाड्याआखाड्यांतून फिरतात व यांच्यापैकीं पुरुष वैष्णवजरी बंधुभगिनीच्या नात्यानें त्यांच्याजवळ राहण्याचें सोंग आणतात तरी स्वैर व्यभिचार करण्यांतच त्यांचें आयुष्य जातें.  यांच्या संततीची कोठेंच नोंद होत नाहीं.  त्यामुळें या बाया बाळंत झाल्यावर मुलांची कशी तरी विल्हेवाट लावीत असाव्या.  प्रवास करतांना वाटेंत लागणार्‍या गांवांतील विवाहित गरती स्त्रियांस व विधवांस यात्रेस नेण्याच्या मिषानें फसवून या आपल्या संप्रदायांत ओढतात.  व यामुळें सभ्य लोक या वैष्णवी बायकांस नेहमीं गांवातून कोणत्या तरी निमित्तानें हांकून लावतात.  मोठ्या शहरांतून सर्व जातीच्या वेश्या सांपडतात व या स्वतःचे तारुण्य उलटल्यावर आपलें पोट भरावें म्हणून कांहीं मुली पाळतात.  निराश्रित झालेल्या मुली यांनां बळी पडतात.  जर जातवाल्यांनीं मदत करून निराश्रित मुलींचें लग्न केलें तर बरें नाहींतर अशा बायकांच्या तावडींत सांपडल्यावर फार कठिण.  पूर्वी तर मुली विकण्याचा मोठा धंदा चाले व यूरोपांतील सर्व देशांत तो अजून चालतो.  

मुंबई इलाख्यांत ठाणें, बेळगांव, विजापूर, कानडा व रत्‍नागिरी या जिल्ह्यांतून कसबिणी आढळतात.  घरदार सोडलेल्या विवाहित व अविवाहित बायका, विधवा, नवर्‍यानें टाकलेल्या, काडी मोडून दिलेल्या यांसारख्या बायकांतून या जातींत भरती होत असते.  अनेक जातींतील बायका कसबिणी होत असल्यानें त्यांच्या अर्थात निरनिराळ्या जाती पडतात.  बेळगांव व विजापूर जिल्ह्यांत कसबण नांवाची मुसुलमानी वेश्यांची जात आहे.  या बायकांची चालरीत हिंदू बायकांप्रमाणेंच असते.  मुसुलमानांच्या कोणत्याहि सामान्य वर्गांत त्या आपणांस गणीत नाहींत.  रमजानी किंवा कलावंत आणि टकाई किंवा कमाऊ अशा दोन पोट जाती कसबणांत आहेत.  पहिली पोट जात कलावंतिणी सारखी उच्च दर्जाची असून सधन आहे.  दुसरी सामान्य वेश्यांची बनलेली आहे.  जेव्हां कलावंत कसबण स्त्री वयातीत होते तेव्हां एखादी चांगली मुलगी जवळ बाळगण्याचा तिचा प्रयत्‍न असतो.  तिलाच पुढें आपला धंदा ती बहाल करिते.  यांच्यांत मुलींचे दांत काळे करण्याचा मिस्सी नांवाचा समारंभ असतो.  ज्ञातिभोजनानें मुलीचा ज्ञातींत प्रवेश होतो व ती तेव्हांपासून धंदेवाईक नायकीण बनते.  कसबणांची पुरुषसंतति कांहीं तरी उद्योग करून पोट भरते.  कसबण पुरुषांच्या बायका गरती बायकांप्रमाणें रहातात.  कसबण हे मुसुलमानी विधी पाळीत नाहींत किंवा काझीलाहि मानीत नाहींत.  त्यांचा समाज नायकीण किंवा बाई या नांवानें ओळखिल्या जाणार्‍या स्त्री वरिष्ठाच्या देखरेखीखालीं सुसंघटित असा दिसतो.  आजकाल ही जात जी खालावली आहे त्याचें कारण असें सांगतात कीं यांचे आश्रयदाते जे सधन मुसुलमान ते गरीब झाले आहेत व नवरे आपल्या बायकांनां पातिव्रत्यभंगाबद्दल टाकून वगैरे देण्यासारख्या कडक शिक्षा करीत नाहींत.  

चांगल्या कसबिणी बाहेर निघतांना उंची दागदागिने व तुकतुकित चामड्याचे जोडे घालतात.  यांचा पोशाख पुष्कळ नीटनेटका व जेथल्यातेथें असतो, व त्यामुळें या ताबडतोब ओळखूं येतात (रसेल व हिरालाल; एन्थोव्हेन; मुं. गॅ. पु. २१, २३.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .