प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कविरोंडो -  ब्रिटिश पूर्व आफ्रिकेंतील लोकांची एक जात.  एलगन पर्वताच्या उतरणीवरील प्रदेशांत, व्हिक्टोरिया नियांझाच्या ईशान्य किनार्‍यावर व झोइया नदीच्या दर्‍यांत या जातीचे लोक मुख्यत्वेंकरून रहातात.  या जातीमध्यें बंटू व निलोटिक अशा दोन उपजाती आहेत.  या दोन्ही जाती कविरोंडोच्या आखाताच्या सभोंवतालच्या टापूंत राहतात.  या जाती येथील मूळच्या राहाणार्‍या नव्हत.  बंटू जातीचे लोक दक्षिणेकडून व निलोटिक जातीचे लोक उत्तरेकडून या ठिकाणीं आले.  या आखाताच्या उत्तरेस बंटू लोक राहतात.

या दोन्ही जाती शरीरानें सुंदर बांध्याच्या आहेत.  निलोटिक हे अधिक तरतरीत आहेत.  बंटू लोकांचें अवरिमि, अववरे व अवकिशी असे तीन वर्ग आहेत.  निलोटिक लोक बंटू लोकांनां जम्व असें म्हणतात व स्वतःला जलू असें संबोधून घेतात.  या दोन्ही जातींत पुष्कळच साधर्म्य दिसून येतें.  या लोकांचा विशेष म्हणजे ते नग्न राहतात हा होय.  निलोटिक जातींतील विवाहित लोक मूल झाल्यानंतर शेळीच्या कातड्याचा एक तुकडा अंगावर वापरतात.  ही रूढी सुशिक्षित म्हणविणारे लोक देखील पाळतात.  यूरोपीयन लोकांशीं संबंध आल्यामुळें या जातींतील बरेच लोक हल्लीं पाश्चात्य तर्‍हेचे पोषाख वापरूं लागले आहेत.  तरी पण बायका जात्याच परंपरेच्या अभिमानी असल्याकारणानें शक्य तितकें कमी वस्त्र नेसणें हेंच त्यांनां पसंत पडतें.  वक्षस्थलावर व पोटावर दागिन्यांच्या ऐवजीं निरनिराळीं चित्रें गोंदवून घेण्याची यांच्यांत चाल आहे.  बंटू जातींतील कांहीं लोकांत सुंता करून घेण्याची पद्धत आहे.  निलोटिक जातींत मात्र हा प्रकार आढळत नाहीं.  बंटू जातींतील विवाहित स्त्रिया कमरेभोंवती, समोरून खालचा भाग झांकेतोंपर्यंत काळ्या दोर्‍याची झालर अगर दशा सोडतात व मागच्या बाजूस कर्दळीच्या अगर केळीच्या तंतूंचा गोंडा लोंबत सोडतात.  या गोंड्यावरून त्याच्याविषयीं अनभिज्ञ असलेल्या प्राचीन यूरोपीय लोकांनीं त्यांनां 'शेपटीनें युक्त असलेलीं माणसें' असें नांव दिलें.  निलोटिक जातीच्या बायकाहि कमरेच्या पाठीमागें गोंडा सोडतात.  पण पुढच्या बाजूस काळ्या दोर्‍याची झालर सोडीत नाहींत.  या गोंड्यांनां खुद्द नवर्‍यांना देखील शिवण्याची मनाई आहे.

कविरोंडो लोक भांडखोरपणा, स्वातंत्र्यप्रियता, प्रामाणिकपणा व नीतिमत्ता या गुणांबद्दल प्रसिद्ध आहेत.  त्यांतल्यात्यांत बंटू लोकांत हे गुण प्रामुख्यानें नजरेस येतात.  या कावरोंडो लोकांत पुरुषांपेक्षां स्त्रिया अधिक आहेत व त्यामुळें बहुपत्‍नीकत्वाची चाल यांच्यामध्यें असावी यांत नवल नाहीं.  पुरुषाला आपल्या बायकोच्याहून लहान अशा तिच्या बहिणींशीं त्यांनां ॠतुप्राप्ति होण्यापूर्वी लग्न करतां येतें.  या जातींतील बायका अविवाहित रहात नाहींत.  एखाद्या बाईला कोणीच मागणी घातली नाहीं तर ती स्वतःच वरसंशोधन करते व कमी पैसे घेऊन ती एखाद्या पुरुषाशीं विवाह करते.  निलोटिक जातीचे लोक, विजातीय लोकांतील मुलींशीं लग्न करूं इच्छितात.  कविरोंडो लोकांत मुली सहा सात वर्षांच्या असतानांच त्यांचीं लग्नें ठरवून ठेवण्याची पद्धत आहे.  लग्नाच्या प्रसंगीं, मुलगी ही अस्नाता असली पाहिजे; तिला जर ॠतु प्राप्‍त झाल्याचें उघडकीस आलें तर, तें लग्न मोडतें व मुलीच्या बापाला त्यानें घेतलेला हुंडा परत करावा लागतो व वर जादा दंड भरावा लागतो.  व्यभिचारी बायको व व्यभिचार करण्यार्‍या मुली व मुलें यांनां पूर्वी देहांतशिक्षा दिली जात असे,  बंटू लोकांत मुलीच्या बापाला हुंडा म्हणून निदान ४० कुदळी, २० शेळ्या व एक गाय द्यावी लागत असे.  निलोटिक जातींत, २० मेंढ्या व दोन ते सहा गाई देण्याची पद्धत आहे.  हा हुंडा हप्त्याहप्त्यानें दिला तरी चालतो व निम्मा हुंडा देतांच नियोजित वराला आपली वधू मागण्याचा पूर्ण हक्क आहे.  एखादी बाई मूल झाल्याशिवाय मरेल तर तिच्या बापाला घेतलेला हुंडा परत द्यावा लागतो.  पण मृत कन्येच्या नवर्‍यानें जर मृतकन्येची बहीण करून घेण्याचें कबूल केलें तर मग हा हुंडा परत करण्याचें कारण नाहीं.  या जातींतील स्त्रिया बहुप्रसवशील आहेत व जुळीं मुलें होणें हीं त्यांची नित्याची गोष्ट आहे.  जुळीं मुलें मंगलदायक मानण्यांत येतें व असा प्रसंग मोठ्या उत्साहानें व थाटानें साजरा करण्यांत येतो.  जुळ्या मुलाच्या आईनें बाळंतपणानंतर सात दिवस पर्यंत झोपडी सोडून जातां कामा नये अशी बंटू लोकांत पद्धत आहे.  पण निलोटिक लोकांत अशा स्त्रीनें एक महिनाभर झोंपडींतच राहिलें पाहिजे अशी चाल आहे.  एखाद्या बंटू बाईची ओळीनें दोन मुलें मेली असतील तर तिला तिसरें मूल झालें कीं तें पहाटेच्या पूर्वी रस्त्यावर नेऊन ठेवतात व शेजारची एखादी बाई त्या मुलाला उचलून त्याच्या आईकडे नेऊन देते व त्याबद्दल तिला एक शेळी बक्षीस मिळते.  अशाच प्रकारची चाल निलोटिक जातींतहि आहे.  स्त्रियांनां व पुरुषांनां स्वतंत्र अशीं नांवें या कविरोंडो जातींत आढळत नाहींत.  पुष्कळदां बापाचें व मुलीचें नांव सारखेंच असलेलें आढळतें.  मृत मनुष्याबद्दल सुतक पाळण्याची खूण म्हणजे मानेभोंवती व कमरेभोंवतीं, केळीच्या सोपटाचे तंतू बांधून घेणें ही होय.

करिरोंडो हे मुख्यतः शेतकीवर आपला उदरनिर्वाह करतात.  बायका व पुरुष दोघेहि कुदळीनें शेतांत खणण्याचें काम करतात.  यांचें खाद्य धान्य, मका, तंबाखू, भांग यांचें पीक या जाती काढतात.  पुरुष व बायका दोघेंहि धूम्रपान करतात पण गांजा मात्र पुरुषच ओढतात.  तिळाचें पीक काढून, त्याच्या तेलाचा दिव्यासाठीं उपयोग करण्यांत येतो.  दिवे मातीचे केलेले असून त्यांच्या आकार बशीसारखा असतो.  

कविरोंडो जातींतील कांहीं पोटजातीं झोंपड्यांमधून रहातात.  पण कांहीं जातींचीं घरें मातीच्या अगर क्वचित दगडाच्या भिंतीचीं बांधलेलीं असतात.  ब्रिटिश लोकांशीं संबंध आल्यापासून खेडेगांवाभोंवतीं मातीचे तट बांधण्याची पूर्वीची पद्धत नाहींशीं होत चाललेली आहे.  

बंटू लोकांत बाप, भाऊ हे एकत्र जेवत नसून ते स्वतंत्र जेवतात.  पुरुषांचें जेवण झाल्यानंतर बायका जेवण करतात.  निलोटिक जातींत, बाप व मुलगा एकाच वेळीं पण पृथक जागीं जेवतात.  प्रत्येक मोठ्या पुरुषाला व स्त्रीला स्वतंत्र झोपडी असते.  कविरोंडो जातींतील बायका शेळीचें मांस, अंडीं, इत्यादि खात नाहींत.  दूध देखील दुसर्‍या पदार्थाबरोबर मिसळून सेवन करण्यांत येतें.  रानटी मांजराचें अगर चित्त्याचें मांस फार आवडीनें खाण्यांत येतें.  दारू पिण्याचाहि सर्रास प्रघात आहे.

कविरोंडो लोक शिकारीच्या कामांत फार पटाईत आहेत.  दोर्‍यांच्या व जाळ्यांच्या साहाय्यानें ते तरस पकडतात.  आपल्या भाल्यांच्या योगानें ते मोठमोठ्या हत्तीवरहि चाल करून जाण्यांत त्यांनां भय वाटत नाहीं.  मासे पकडण्याच्याहि बाबतींत ते निपुण आहेत.  मधमाशांचीं पोळीं ते जतन करून ठेवतात.  शेळ्यामेंढ्यांनां मारण्याची त्यांची पद्धत म्हणजे त्यांचे नाक व तोंड दाबून त्यांनां गुदमरावयास लावून मारावयाची होय.  हे स्वतः शांत असले तरी मोठे शूर आहेत.  त्यांचे भाले अणकुचीदार व लांब पल्ल्याचे असतात.  त्यांच्या तरवारीहि अशाच लांब असतात.  अंगावर चिलखतें घालण्याचीहि त्यांच्यांत पद्धत आहे.  पण धनुष्य बाण वापरण्यांत येऊं लागल्यापासून तलवारी व भाले यांचा ते कमी उपयोग करूं लागले आहेत.  यांची लढण्याची पद्धत चढाईची नसून, स्वतःचे संरक्षण करण्याची आहे.  यांच्यांत जातीजातींमध्यें वैमनस्यें माजून आपापसांतच यादवी होऊन लढाया होतात.  लढाई संपल्यानंतर मृतमनुष्यांच्या त्रासापासून आपलें संरक्षण करण्यासाठीं ते आपलीं डोकीं भादरून त्यांवर शेळीचें शेण फांसतात.

समुद्रकांठच्या लता अगर वनस्पती जाळून त्याच्या राखेपासून मीठ करणें, भांडी तयार करणें, टोपल्या बनविणें, इत्यादि धंदे या जाती करतात.  यांच्यामध्यें देवकपूजेचें माहात्म्य बरेंच आहे; व प्रत्येक देवकाला भजणार्‍यांचा एकेक स्वतंत्र पंथ आहे.  पितृपूजा हें त्यांच्या धर्माचें एक विशिष्ट अंग आहे.  उत्तरेकडील जातींत, अवफवा व इशिशेमी हे दोनच देव मानतात.  त्यांपैकी पहिला पुण्याचा व दुसरा पापाचा देव मानण्यांत येतो.  गुरें व बकरीं यांनां पुण्याची देवकें समजतात.  बकर्‍याची आंतडीं हे लोक फार पवित्र मानतात.  या लोकांत पौराणिक गोष्टींचा संग्रह फारच थोडा आहे.  मंत्रतंत्रावर यांचा फार विश्वास असतो.  दिव्याच्या द्वारें खर्‍याखोट्याचा निकाल करण्याची यांच्यांत वहिवाट आहे.

कविरोंडो जातीच्या बायका बहुप्रसवशील असल्याकारणानें त्यांच्यांत लोकसंख्येचें प्रमाण वाढतें आहे.  सखल प्रदेशांत रहाणार्‍या लोकांमध्यें हिवतापाचा बराच प्रचार असतो.  तसेंच उंच प्रदेशांत रहाणार्‍या जातींत, आंकडी, व निमोनिया हे आजार कायमचे आहेत.  यांच्यांत देवीची सांथहि वरचेवर येते.  बायकांनांच वैद्यकीचें ज्ञान असतें.  या लोकांत पुढचा दांत मुद्दाम पाडण्यांत येतो.  तसें न केल्यास तो मनुष्य युद्धांत मारला जातो अशी समजूत आहे.  कांहीं जातींत आपल्या नवर्‍यावर संकटें येऊं नयेत म्हणून स्त्रिया आपला पुढला दांत उपटून टाकतात, अगर कपाळावर अगर पोटावर घट्टे पाडून घेतात.  एखाद्या बाईचा नवरा एखाद्या धाडसाच्या कामावर निघण्यापूर्वी आपल्याला यश यावें म्हणून तो आपल्या बायकोच्या अंगावर प्रहार करून घट्टा अगर वण पाडतो.  

या लोकांत चार प्रकारचे नाच आहेत.  जन्मकालचा नाच, मृत्यूनंतरचा नाच, संस्कारकाळीं करण्यांत येणारा नाच व दुष्काळ पडला असतांनां देवतांनां प्रसन्न करून घेण्यासाठीं करावयाचा नाच हे ते चार नाच होत.  यांच्यांतील गाणीं करुणरसपरिपूर्ण व सुंदर असतात.  गातांनां विण्याच्या आकाराचें एक वाद्य वाजविण्यांत येतें.  याशिवाय पुष्कळ प्रकारचीं वाद्यें त्यांच्यामध्यें आहेत.

निलोटिक जातींतील स्त्रिया कानामध्यें पितळेच्या तुकड्यांत बसविलेले मणी घालतात.  हे मणी बहुतेक निळ्या रंगाचें असतात.  ईजिप्‍तमध्यें ज्या प्रकारचे मणी आढळतात, तशाच प्रकारचे हे मणी असतात.

(संदर्भग्रंथ - हॉब्ले-ईस्टर्न युगँडा, अॅन एथ्रॉलॉजिकल सर्व्हे; सर एच. एच. अॅच जॉन्स्टन-युगँडा प्रोटेक्टोरेट (१९०२); जे. एफ. कनिंगहॅम यूगँडा अॅड इट्स पीपल्स (१९०५); पॉल कोल्लयम-दि व्हिक्टोरिया नायंझा (१८९९)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .