प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कवि - देवविशेष.

वैदिक -  ॠग्वेदांत उशनस् याला कविपुत्र (काव्य) असें म्हटलें आहे (५२९, ९) परंतु प्रत्यक्ष कवीचा उल्लेख नाहीं.

पौराणिक -  पुराणांत कवि नांवाच्या बर्‍याच व्यक्तींचा उल्लेख आहे त्या पुढीलप्रमाणें :-

(१)  स्वायंभू मन्वंतरांतील ब्रह्मपुत्र भृगुॠषि; त्याच्या तीन पुत्रांतील कनिष्ठ, याचा पुत्र उशना ॠषि. (२) प्रियव्रत राजर्षीस बर्हिष्मतीपासून झालेल्या दहा पुत्रांतील कनिष्ठ.  हा बाल्यावस्थेपासूनच विरक्त होता (भाग. ५ स्कं. अ. १).  (३) तामस मन्वंतरांतल्या सप्‍तर्षी झालेला एक (४) रैवत मनूच्या दाहा पुत्रांतील पांचवा. (५) ॠषभ देवाच्या नऊ सिद्ध पुत्रांतील ज्येष्ठ. (६) वैवस्वत मनूच्या दहा पुत्रांतील कनिष्ठ.  हा विरक्त होता म्हणून अरण्यांत गेला (भाग. नवम. अ. २).  (७) एक ब्रह्मर्षि  (८) वैवस्वत मन्वंतरांतील ब्रह्मपुत्र; यास वारुणि कवि अशी संज्ञा होती.  यास कवि, काव्य, धृष्णु, उशना, भृगु, विरजा, काशि आणि उग्र असे आठ पुत्र होते (भार.अनु. अ. ८६) (९) ब्रह्मपुत्र जो वारुणि कवि त्याच्या आठ पुत्रांतील ज्येष्ठ भार. अनु. अ. ८५ श्लोक १३२-३४).  (१०) सो. वं. पुरुकुलोत्पन्न रौद्राश्ववंशीय भरत राजा.  त्याच्या कुळांत जन्मलेल्या दुरितक्षय राजाच्या तीन पुत्रांतील मध्यम.  हा तपानें ब्राह्मण झाला होता.  (११) कौशिक ॠषीच्या सात पुत्रांतील एक.  (१२) कृष्णास कालिंदीपासून झालेल्या पुत्रांतील एक. (१३) कृष्णाचा एक प्रपौत्र; हा महारथी होता.

कवि - कवि म्हणजे काय याच्याविषयीं व तसेंच कवितेविषयीं व्याख्या अनेकांनीं अनेक प्रकारच्या केल्या आहेत; व त्या विविध व्याख्या अपूर्ण आहेत अशीं विरुद्ध पक्षाकडून मांडणी होत जाऊन आतां कवितेची व्याख्या करणें हें चिकित्सक वर्गानें सोडून दिल्यासारखें आहे.  कवि कशानें होईल ?  कवि जन्मसिद्ध गुणांनीं बनतो किंवा कांहीं कृत्रिम उपयांनीं, याविषयींहि वारंवार चर्चा चालू असते व ज्या वेळेस पृथक्करणशक्ति पूर्णपणें विकास पावली नव्हती अशा कालापासून कवि स्वाभाविकपणानेंच बनतो अशा तर्‍हेची मांडणी करण्याची प्रवृत्ति आहे.  कवीला शिक्षण नको आहे असें जन्मसिद्ध कवित्वाची तारीफ करणारे लोक आज म्हणत असतील असें वाटत नाहीं.  कारण योग्यतेचा कवि म्हणून एखादी व्यक्ति पुढें येण्यास शिक्षणाची जरूरी नाहीं असें म्हणतां येणार नाहीं.  अडाणी वर्गांतून बरेचसे कवी पुढें आले ही गोष्ट खरी आहे.  तथापि जे कवी असे पुढें आले ते कवित्व करूं लागल्यानंतर स्वतःच्या मनोविकासाकरितां व बुद्धिविकासाकरितां कांहीं तरी शिक्षण पैदा करीत यांत शंका नाहीं.  विद्वत्व आणि कवित्व या निबंधामध्यें मालाकारांनीं या दोन गोष्टी परस्परविरोधी आहेत आणि विद्वत्ता वाढली तर ती कवित्वास अपकर्षक आहे अशा प्रकारची मतें व्यक्त केलीं आहेत.  तीं त्यांच्या पांगाकरांसारख्या अनुयायांकडूनहि त्यागिलीं गेलीं आहेत.  मोरोपंत विद्वान नव्हता हें तर पांगारकरांनीं मोरोपंताची वाचनमर्यादा बरीच व्यापक होती असें दाखवून खोडून काढलें आहे (सरस्वती मंदिर) या विषयीचे महाराष्ट्रांतील वादविवाद म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांत व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधांत इंग्लंडांत जे वादविवाद होत असत त्यांची छाया आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.

कवित्वाचा इतिहास -  लोकांचें चित्तरंजन करणें ही गोष्ट अत्यंत शैशवावस्थेंतील समाजामध्येंहि असल्यामुळें अत्यंत प्राचीन काव्य सांपडणें आज जवळ जवळ अशक्य आहे.  प्राचीन भारतीयांपेक्षां देखील जुनी संस्कृति जी असुरोबाबिलोनियनांची, तींत देखील महाकाव्यें या संज्ञेस पात्र झालेली गिलगामेशसारखीं काव्यें आढळून येतात.  हिंदुस्थानांतील दोन जुन्या संस्कृती म्हणजे मांत्रसंस्कृति व सूतसंस्कृति.  यापैकीं मांत्रसंस्कृतींतील लहान लहान खंडकाव्ये ॠग्वेदांत अंतर्भूत झालीं आहेत.  सुतसंस्कृतींतील आख्यानवाङ्‌मय बरेंच जुनें असावें आणि त्यांत मोठमोठ्या पुरुषांच्या कथा आलेल्या असाव्या आणि तें आख्यानवाङ्‌मय अनेक वेळ संस्कारिलें जाऊन शेवटीं महाभारतांत संहितीकृत झालें असावें असें वाटतें.

अगदीं प्राचीन कविता केवळ आख्यानपर किंवा स्तोत्रपर असणें शक्य नाहीं.  लोकरंजन स्तोत्रांनीं कितपत होणार ?  आख्यानांनीं थोडेंबहुत होईल पण फार होणार नाहीं; लोकरंजक अशीं अत्यंत जुनी काव्यें लावणी व झगडे या स्वरूपाचीच असावींत व तीं संहितीकरणप्रसंगीं बरींचशीं वगळलीं गेली असावींत असें अनुमान करण्यास जागा आहे.  लावणी-झगड्यांचें अस्तित्व मांत्रसंस्कृतींत असलेंच पाहिजे.  कुंतापसुक्ते म्हणून जीं लावणीसारखी काव्यें ॠग्वेदपरिशिष्टांत शिरलीं ती एकाकी नसावींत तर तत्सदृश अनेक काव्यांच्या प्रणालीची तीं दर्शक असावींत.

स्तोत्रें, लावण्या, आख्यानें वगैरे साहित्य अस्तित्वांत असतां महाकाव्यरचनेसाठीं प्रयत्‍न झाला असावा व त्या काव्याच्या विस्तरणार्थ उत्तरकालीनांकडून प्रयत्‍न होऊन व त्यांत जुनें वाङ्‌मय शोषिलें जाऊन रामायण-महाभारतादि आर्ष महाकाव्यें निर्माण झालीं.  त्यांचा इतिहास रामायण व महाभारत या विशेष लेखांखालीं येईलच.  होमरच्या इलियडच्या कथेचाहि तोच इतिहास आहे.  एवढेंच नव्हे तर जी ग्रंथ चिकित्सक पद्धति होमरसारख्या कवीच्या नांवावर खपल्या जाणार्‍या कृतीचें परीक्षण करतां करतां उदयास आली तीच रामायण महाभारतादि ग्रंथांकडे लाविली गेली.

लघुकाव्यापासून महाकाव्याच्या अत्यंत मोठ्या स्वरूपापर्यंत रचनाक्षमतेचा जो इतिहास आहे त्यांत संहितीकरणाचा प्रयत्‍न जरी बराच झाला आहे तरी स्वाभाविक वाढहि झालीच आहे.  तरी त्या आर्ष महाकाव्यांच्या मुळाशीं कांहीं तरी मोठेसें काव्य असावें यांत शंका नाहीं.  कारण तसें असल्याशिवाय नवीन क्षेप घालणेंहि सुलभ होणार नाहीं.  क्षेप घालून मोठा विस्तार बनविण्यासाठीं क्षेप घालणारांनां मूळचें बरेंचसें मोठें काव्य त्यांच्या दृष्टीस पडलें पाहिजे.  एकंदरींत लहानसें काव्य करण्यास जी शक्ति लागते त्या शक्तीची वाढ बरीच होत होत महाकाव्यरचनेची तयारी आली असली पाहिजे.  कवींनां लहानसें काव्य निर्माण करणें अर्थातच कठिण नाहीं.  तथापि मोठें काव्य तयार करणें म्हणजे संविधानक पाहणें, वर्णनीय प्रसंग शोधणें, त्यांचा चित्ताकर्षक अनुक्रम साधणें, अनेक रसांच्या उत्पादनास अनुकूल अशीं व्यक्तिचरित्रें बनविणें या सर्व गोष्टी मोठ्या परिश्रमाशिवाय व्हावयाच्या नाहींत; व ज्याप्रमाणें अत्यंत मोठा राजवाडा बांधण्यास किंवा मोठ्या सैन्यसमूहाची व्यवस्था ठेवण्यास जसा व्यापक बुद्धीचा मनुष्य लागतो, आणि तो मनुष्य देखील समाजांतर्गत उत्पादनसंकलनादि कार्ये मोठ्या प्रमाणावर होत असतांच उद्धवतो त्याप्रमाणेंच महाकाव्य रचणार्‍याची गोष्ट आहे.  अलीकडे महाकवी उत्पन्न होत नाहींत याचें कारण मनुष्याच्या शक्तीमध्यें कांहीं उणेपणा आला अशातला भाग नाहीं.  कवींचें किंवा लेखकांचें अस्तित्व आज छापखान्याच्या धंद्यावर अवलंबून आहे व छापखान्याच्या धंद्याचें अस्तित्व आज ताबडतोबविक्रीवर आहे.  व प्रत्येक व्यक्ति जागतिक जीवनकलहयुक्त व श्रमविभागित समुच्चयाची अवयव झाली आहे.  यामुळें शांतपणें जगाचें निरीक्षक करण्यास ज्यांस अवसर सांपडलेला आहे व ज्यांस अनेक अनुभवांतूनहि जावयास सांपडले आहे अशा प्रकारच्या व्यक्तींस आज अवकाश नाहीं.  गद्यरूपी जर प्रचंड कांदबर्‍या लोक लिहितात व लहान लहान काव्यें लिहितांना शब्दयोजनेची व निर्दोष वृत्तरचनेची सफाई दाखवितात तर त्यांस महाकाव्यें करणें अशक्य आहे अशांतला भाग नाहीं. आजच्या सामाजिक परिस्थितींत महाकाव्य नको आहे.  वाचनास पारखा, कथानकासाठीं आतुर असा मोठा समाज असला व तो एखाद्या भटक्या शाहीरला पोसावयास तयार असला तर एखादेंच कथानक रचून तेंच शाहीरामार्फत रस्त्यावर विक्रीस मांडणें शक्य होतें. व अशी ही परिस्थिति जेव्हां नाहीशी होते तेव्हां महाकाव्याचें अस्तित्व कठिण होत जातें.  

या प्रकारची परिस्थिति लक्षांत न घेतल्यामुळें अलीकडे पूर्वीसारखी कविता होणें शक्य नाहीं.  पूर्वीचे कवी फार मोठे होते अशा प्रकारचे विचार पाश्चात्य व भारतीय अशा दोन्ही प्रकारच्या लेखकांमध्यें दृष्टीस पडतात.  आजची मराठीच नाटकें घेतलीं तर संस्कृत नाटकसमूहापेक्षां आजचा मराठीतील नाटकसमूह कमी योग्यतेचा आहे असें म्हणतां येत नाहीं व यूरोपांत पाहिलें तर उत्तमोत्तम नाटकांचा काल तर आजचाच आहे.

महाकवि होण्यास जी बुद्धि लागते ती कोणतेंहि फार वर्षे टिकणारें व व्यापक क्षेत्राचें मोठें काम करण्यास जी शक्ति लागते तींपेक्षा अधिक लागत नाहीं.  कौपर, शेले, वर्डस्वर्थ, कीट्स यासारखे कवी घेतले तर या कवींमध्यें व गल्लोगल्लीच्या कवींमध्यें प्राकृतिक फरक कांहीं एक नाहीं.  गल्लोगलली पडलेल्या कवींचा धंदा जर कांहीं वर्षे अधिक नेटानें चालला तर या उत्तरकालीन इंग्रज कवींच्या इतपत कवी आपणांस पुष्कळ दिसणें शक्य आहे.  व सौदे, कौपर, वर्डस्वर्थ यांनां जर आपण कवी म्हणूं तर तितपत स्वाभाविक गुण किंवा जन्मसिद्ध गुण कांहीं दुर्मिळ नाहीं (काव्य, महाकाव्य, नाटक, कादंबरी वगैरे लेख पहा.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .