प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कवार अथवा कंवर -  ही जात वर्‍हाड व मध्यप्रांतात आढळतें.  एकंदर २३३४२३ कवारा लोकसंख्येपैकीं (१९११) वरील भागांतून २२९४१२ होते.  मद्रास इलाख्यांतील कवराई जात व ही एकच असावी (कवराई पहा) छत्तीसगडांत महानदीच्या उत्तरेस बिलासपूर जिल्ह्यांतील जमीनदारी व जशपूर, उदयपूर, सुरगुजा, चांगभकार, व कोरिया संस्थानें हें या जातीचें स्थान होय.  या लोकांचा कौरिया, रवत व धोबी जातींशीं पूर्वसंबंध असावा असें यांच्या चालीरीतींवरून वाटतें.  यांनीं जरी नामसादृश्यामुळें कौरवांशीं संबंध जोडण्याचा प्रयत्‍न केला आहे तरी त्यास आधार दिसत नाहीं.  हे आपली मूळ भाषा विसरले आहेत.  आतां हिंदी भाषाच हे बोलतात.  हे द्रविड वर्गांतील लोक असावे असें वाटतें.  यांचे ८ भिन्नवर्गविवाही उपवर्ग आहेत.  ते तंवर, कमलवंशी, पैकर, दूध कवर, मठिया, चांटी, चेरवा व रौतिया हे होत.  यांपैकीं तंवर लोक स्वतःला तोमार रजपूत समजतात व जानवें घालतात.  यांनीं विधवाविवाह बंद केला आहे.  तंवर शब्द कंवर शब्दाचा अपभ्रंश असावा असें एक मत आहे.  यांनीं ब्राह्मण गोत्रें देखील धारण केलीं आहेत.  तेलासी वर्गाच्या चार जमीनदार्‍या आहेत.  पण यांनीं आतां आपलें नांव बदलून कैरव असें ठेवलें आहे.  पैकर लोकांनीं आपलें नांव पाईक शब्दापासून घेतलें आहे असें म्हणतात.  हे हैहयंवशी राजाच्या सैन्यांतील पायदळ होत असें समजतात व दसर्‍यास 'झगडा खांडाची' पूजा करतात.  बिलासपुरांत कमलवंशी हे तंवर लोकांच्या खालोखाल समजले जातात.

रावतिया जातीचे लोक बहुधा कंवरबाप व रावत आई यांची संतति असावी.  रावत मुलगी कंवारानें केली तर तिला जातींत कंवारिणीप्रमाणेंच समजतात.  तसेंच रावतांची कौरिया रावत म्हणून जी जात आहे ती अशाच मिश्र संबंधाची असली पाहिजे.  कारण जर कौरिया रावतानें कंवरकुमारीबरोबर व्यभिचार केला तरी तिला जातींतून बाहेर काढीत नाहींत.  तोच इतर विजातीयांबरोबर जर तिनें व्यभिचार केला तर तत्काल बहिष्कार होतो.  यावरून या दोन जातींत पूर्वी लग्नसंबंध रूढ असावे व अलीकडेच ते बंद झाले असावे असें दिसतें.  याप्रमाणेंच चेरवा लोक कंवर पुरुष व चेरो नांवाच्या छोटा नागपुरांतील जातीच्या स्त्रियांच्या मिश्र संबंधानें झालेले आहेत.  यांचा दर्जा फार नीच समजतात.

यांची अवर्गविवाहीं अशीं ११७ कुलें आहेत.  त्यांच्या कुलांचीं नांवें पशू, पक्षी, खाण्याचे व पोषाखाच्या पदार्थांवरून पडलीं आहेत.  कांहीं लोकांस निर्जीव पदार्थ आपले पूर्वज होते असें म्हणविण्याची लाज वाटते.  ज्यांचीं नावें झाडावरून पडलीं आहेत ते सहसा तीं झाडें कापीत नाहींत.  पण कांहीं उपयोग असला तर कापतात.  यावरून यांच्यांतील रूढ देवकें हळूहळू नाहींशीं होण्याच्या मार्गास लागलीं आहेत हें उघड आहे.  सकुल विवाह व भाऊ बहिणींच्या मुलींचा विवाह निषिद्ध समजतात.  मुलीला नेहमीं मुलाकडील लोक मागणी घालतात.  लग्नें बहुधा प्रौढ वयांतच होतात; व कधीं कधीं तर चांगली मागणी आली नाहीं तर मुली बर्‍याच मोठ्या होईपर्यंत अविवाहित राहतात.  मुलगी पसंत केली म्हणजे मुलाचा बाप आपल्या मित्रांनां तिच्या गांवीं पाठवितो.  ते तिच्या बापास म्हणतात की अमुक अमुक गांवचा अमुक अमुक माणूस तुमच्या घरची पेलाभर पेज पिऊं चाहतो.  जर त्यानें पेज करून त्यास पाजिली तर त्याची लग्नसंबंध जुळविण्यास संमति आहे असें समजतात, जर त्यानें पेज केली नाहीं तर त्याची संमति नाही असें समजतात.  वाङनिश्चय करण्याकरतां वरपक्षाची मंडळी मुलीच्या घरी बांगड्या, लुगडें, पुर्‍या व उडीद कौराई रावताच्या डोक्यावर देऊन व मुलीचें सुक (शुल्क) हि बरोबर नेतात.  तसेंच कांहीं रुपये, सडलेले व असडी तांदूळ, डाळ आणि तेल हींहि नेतात.  याला सुमारें २५ रु. किंमत पडते.  विधुराच्या लग्नांत शुल्क जास्त घेतात.  वराच्या लोकांबरोबर वाद्यें असतातच.  वाद्यें वाजलीं म्हणजे गांवचे लोक जमतात व तेथील सर्वांत जुन्या पोषाखाची वाखाणणी करतात.  जितका जुन्या पद्धतीचा पोषाख तितका चांगला.  त्या पोषाखाचा इतिहास वर्णन करून सांगतात.  लग्नस्तंभाभोंवतीं पहिल्या दिवशीं ६ व दुसर्‍या दिवशीं एक प्रदक्षिणा घालून लग्न होतें.  त्यानंतर वधुवरांचे पाय दुधानें धुवून वधूची आई तें तीर्थ घेते, मग वधूवर आपल्या घरीं येतात.  नंतर दुसर्‍या दिवशीं वधूवर तळ्यांत स्नान करतात व प्रत्येकजण दुसर्‍यावर पांच गडवे पाणी टाकतो.  वधूच्या खांद्यावरून वरानें गवताच्या हरिणास सात बाण मारावे लागतात.  प्रत्येक बाण सोडतांना वधू वराच्या तोंडांत साखर घालते.  चौथ्या दिवशीं वधू माहेरीं येते.  आषाढीनंतर तीन महिने वधू परत नवर्‍याकडे येते व लागलीच माहेरीं जाते व तेथें गौरीचा खेळ खेळते.  संध्याकाळीं गांवांतली तरुण मुलें व मुली तिच्या भोंवतीं जमतात.  मुलें ढोल वाजवितात व मुली गातात.  गौरीची एक अश्लील मूर्ती करतात व ती कोणाच्या तरी अंगांत आल्याची बतावणी करून गवताच्या दोर्‍यांनीं मुलें मुलींनां मार देतात.  तीन महिने आपल्या खेळगड्यांबरोबर अशी करमणूक करून तीन महिन्यांनंतर वधू अखेरची सासरीं जाते.

दोन कुटुंबें आपसांत मुलींची अदला बदल अथवा साटेंलोटें करून घेतात.  याचें नांव 'गुजरावत' असें आहे.  अथवा भावी जावयानें शुल्क देण्याच्या ऐवजीं ३ वर्षे नोकरी केली तरी चालते.  अशा लमसेना जावयास या लोकांत घरजियान म्हणतात.  लग्नापूर्वी स्वजातीयांशीं किंवा कौराई रावताशीं संग करणार्‍या मुलीस एका जातिभोजनानें गुन्हा माफ करतात.  पण इतर विजातीयांबरोबर वांकडें पाऊल पडलें तर बहिष्कार घालतात.  तंवर वर्ग खेरीज करून इतर लोकांत विधवाविवाह होतात.  विधवेला बांगड्या व लुगडें देतात; आणि वळचणीच्या खालीं वधूवर उभे राहतात.  वर आपल्या वधूच्या कानास स्पर्श करून त्यांत ओव्याच्या पानाची सुरळी घालतो; व मग ती विधवा त्याची बायको होते.  पुरुषाचें तिसरें लग्न कुमारिकेबरोबर करावयाचें असलें तर तिची मातीची प्रतिमा करून तीबरोबर प्रथम लग्न लावतात.  मग वर ती प्रतिमा जमिनीवर आपटून फोडतो व तिचें उत्तरकार्य करून मग त्या मुलीबरोबर खरा विवाह करतो.  विधवेनें आपल्या दिराबरोबरच लग्न लाविलें तर तिच्या पहिल्या नवर्‍याचीं मुलें व दुसर्‍या नवर्‍याचीं मुलें यांचा दर्जा व हक्क अगदीं सारखा असतो.  पण जर दुसर्‍या कोणाबरोबर लाविलें तर पहिल्या नवर्‍याचीं मुलें व त्याची संपत्ति कोणा तरी नातलगाकडे जाते.

सिरगुजाच्या कंवरांनीं सतीची चाल उचलली होती.  सतीचा यांच्यांत फार मान असे; व सतीची स्थानें अद्यापि फार भक्तीनें व सन्मानानें राखितात.  तंवर लोकांस इतर कवारांच्या मुलींशीं लग्न करतां येतें.  पण ते आपल्या मुली मात्र त्यांस देत नाहींत.  पण असा व्यवहार फारच चोरून करतात.  जमीनदारानें आतां स्वतःच्या सहीचा दाखला नसलेल्यांस तंवर समजूं नये म्हणून कडक नियम केला आहे; व हे दाखला देण्याकरितां कधीं कधीं फारच पैसा घेतात.  फारच बेबनाव झाला किंवा बायकोनें व्यभिचारच केला तर लग्न मोडतात.

बाळंत होतांना बायका भिंतीला टेकून पाय लांब व एकमेकांपासून दूर करून बसतात.  कोणी तरी दुसरी बाई त्यांनां मदत करण्यास असते.  मुलगा बोलका व्हावा असें वाटलें तर पंचाइतीच्या घरांत नाळ पुरतात.  व्यापारी व्हावा असें वाटलें तर बाजारांत, धर्मनिष्ठ व्हावा असें वाटलें तर कोणत्या तरी देवस्थानांत पुरतात.  मुलगी असली तर तिची नाळ उकिरड्यावर पुरतात.  उकिरडा हा पिकाला फार मदत करतो असें समजतात.  छत्तीसगडांतील चालीप्रमाणें आईला तीन दिवस बाळंतपणांत कांहींच खावयास देत नाहींत.  मुलास पाचव्या महिन्यांत अन्न देऊं लागतात.  जुळें झालें तर एखादें धातुपात्र फोडतात व अशा रीतीनें त्यांचा संबंध तोडला असें समजून एका मुलाला कांहींहि झालें तरी दुसर्‍या मुलास कांहींच होणार नाहीं असें समजतात.

बहुधा सर्व लोक प्रेतें पुरतात.  श्रीमंत लोक मात्र दहन करूं लागले आहेत.  प्रेत पुरतांना त्याबरोबर स्वर्गांत पेरणी करण्यास तीळ व उडीद ठेवतात.  थडग्यावर पाणी पिण्याचा तांब्या, ताट व गंज ठेवतात.  हीं भांडीं नंतर धोबी उचलून नेतो.  अर्धे प्रेत जळल्यावर त्यांतील कांहीं लांकडें काढून सुपांत घालून मृताच्या घरीं नेतात व घरच्या बायका त्यांस स्पर्श केल्यावर पुन्हां तीं लांकडें चितेंत आणून टाकतात.  नंतर सर्व लोक स्नानें करून परत येतात.  वाटेंतल्या कोणत्या तरी चौरस्त्यावर पुढचा माणूस पायानें एक दगड उचलतो व मागच्यास देतो.  तो आपल्या मागच्यास देतो व शेवटला माणूस तो दगड फेंकून देतो.  व अशा रितीनें मृताच्या आत्म्याचा व घरच्या मंडळींचा संबंध तोडून टाकतात.  तिसर्‍या दिवशीं अस्थी शुद्ध करतात.

वाघानें कोणास मारलें व खाल्लें तर त्या माणसाच्या रक्ताचा स्वाद मिळाल्यामुळें वाघाचा व त्याच्या कुटुंबाचा संबंध जुळला असें वाटून तो तोडण्याकरितां एक विधि करतात व त्याला 'दोरी तोडणें' म्हणतात.  एका बैगाला गेरु व काजळ फासून वाघाचें सोंग देतात.  त्यास घेऊन वाघानें जेथें माणसास खाल्लें असेल तेथें जातात.  बैगा रक्त सांडलेल्या जागची माती तोंडांत भरून रानांत पळतो.  त्याला जवळची माणसें परत आणतात व तोंडांत भरलेली माती टाकावयास लावतात.  अशा रितीनें वाघाच्या तोंडांतला घास हिसकतात.  नंतर बैगा मयताच्या कुटुंबाच्या सर्व माणसांस दोरीनें बांधून एका कोंबडीजवळ दाणे ठेऊन म्हणतो जर माझी जादू सिद्ध असली तर हे दाणे खा.  कोंबडीनें दाणे खाल्ले म्हणजे वाघाच्या व या कुटुंबाच्या माणसांचा संबंध तुटला.  मग तो खरोखरच ती दोरी तोडून टाकतो.  सर्प चावला तरी देखील हाच विधी करतात.

यांची 'भगवान म्हणजे सूर्य' याच्यासंबंधीं कांहीं तरी अंधुक कल्पना आहे.  त्यांच्या जातीचे अनेक देव आहेत.  वाघाची देवता वाघरा देव या नांवानें प्रसिद्ध आहे.  लाल कलगीच्या सापाची यांस फार भीति वाटते.  तो अरण्यांत शेषकुंडांत राहतो असें सांगतात.  तो गेलेल्या वाटेला जर कोणी ओलांडलें तर तो माणूस काळा ठिक्कर पडतो अशी यांची समजूत आहे.  यांच्या स्थानिक देवतांत मंडवा राणी म्हणून एक देवता आहे.  रानांत वाट चुकली तर ही बरोबर वाट दाखवून मार्गास लावते असें हे समजतात.  नदींत सात बहिणींचा वास असतो असें समजतात.  धबधब्याजवळ खेळणें यांस फार आवडतें.  हे शस्त्रांची एक स्वतंत्र देवता मानतात.  एक कोळीण सती व 'सारंगर्‍हिणी' अशा दोन देवता दोन बायकांपासून बनल्याने मानितात.  पेंड्रा जमीनदाराची एक कोळीण राख गर्भारपणी मेली व सारंगगडच्या राजाची एक घासिया स्त्री राख होती तिचा खून झाला होता म्हणून या दोघीस आतां यांनीं देवांत ओढिलें आहे.  जादू करणार्‍या स्त्रियांस टोन्ही म्हणतात व अशा तर्‍हेच्या संशयावरून सुद्धा टोन्ही मानल्या गेलेल्या स्त्रीस गांवांत राहणें अशक्य होतें.

सहानुभूतिक कृतीनें रोग बरे करण्याची यांची एक मनोरंजक कल्पना आहे.  कुर्‍हाडीचा घाव लागला तर ती कुर्‍हाड तापवून थंड करतात.  पहिल्या प्रयोगानें जखम वाळते व दुसर्‍यानें तिच्यांत थंडावा येतो असें समजतात.  घरावर कावळा ओरडला तर कोणी पाहुणा येईल असें समजतात.  पुरुषांच्या पोशाखांत विशेष असें कांहींच नाहीं.  बायका पायांत कांशाचे वाळे घालतात.  गळ्यांत कांशाच्या किंवा चांदीच्या सर्‍या घालतात कानांत चांदीचीं कर्णफुलें घालतात पण नथ घालीत नाहींत.  स्त्रिया आपल्या स्तनांवर कृष्णाची मूर्ति गोंदवितात, हातावर हरणाचें चित्र गोंदवितात व पायावर निरनिराळ्या प्रकारचीं चित्रें गोंदवितात.

युद्ध करणें हा आपला खरा धंदा आहे असें हे लोक समजतात.  पण आतां निरुपायामुळें पुष्कळ लोक शेतकी व मजूरी करतात.  

बाप जिवंत असतांना जर मुलानें वाटा मागितला तर दोन बैलांशिवाय त्याला कांहीं मिळत नाहीं.  पण बाप मेल्यावर वडील मुलास इतर वांट्याबरोबर जिठाई (ज्येष्ठत्व) म्हणून कांहीं खर्च मिळत असतो.

यांच्या पंचाइतीच्या मुख्यास परधान म्हणतात.  बहिष्कारानंतर जातींत घेण्यास एक धोबी लागतो; व त्या धोब्यानें निरनिराळ्या ५ पात्रांतून पतिताबरोबर जेवलें पाहिजे.  जखमेंत किडे पडले तर बहिष्कार पडतो.

हे लोक गोमांस, मगर, माकडें, सर्प व पालीखेरीज करून सर्व खातात.  हे बाजारांतलें मांस मुसुलमानानें हलाल केलेलें म्हणून अपवित्र समजून खात नाहींत व रेच्छा मासेहि खात नाहींत.  हे लोक गोंडाच्या हातचें व कौराई रावतांच्या हातचें जेवतात.  हे बहुतेक गोंडांसारखेच दिसतात.  यांच्या नृत्यांत स्त्रीपुरुष मिळून टिपर्‍या खेळत खेळत नाचतात व ताल फार चांगला धरतात.  (रसेल व हिरालाल).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .