विभाग दहावा : क ते काव्य
कवष, वैदिक - ॠग्वेदांतील सूक्तांचा द्रष्टा. याच्या संबंधानें सविस्तर माहिती ज्ञानकोश विभाग ३ पूर्वार्ध पृष्ठ ४९१ व ५०६ येथें मिळेल.
पौराणिक (१) युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञांतील होता ना. ॠत्विज (भाग. स्कं. १० अ. ७४.)
(२) हा पश्चिम दिशेचा आश्रय करून रहाणारा एक ॠषि होता. (म. भा. शा. २०९.).