प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कवचधरवर्ग संघ - संधिपाद - या वर्गांतील साधारण प्राणी म्हणजे समुद्रकिनार्‍यावर सांपडणारा शेंवडा (पालिन्युरस) अथवा खेंकडा हा होय.  कांहीं अपवाद खेरीज करून या वर्गांतील प्राणी जलचर अथवा जलसंचारी आहेत.  कल्ले अथवा जलश्वसनेंद्रियें यांच्या योगानें त्यांची श्वसनक्रिया चालते.  त्यांच्या शीर्षाला शृंगांच्या दोन जोड्या असतात व त्यांशिवाय दुसरे शाखारूपी अवयव जोडले गेलेले असतात.  वक्षाचा म्हणजे शरीराचा मध्य भाग हा कांहीं प्राण्यांत शीर्षाशीं संयुक्त झालेला असतो तर इतर प्राण्यांत निराळा स्वतंत्र राहतो, व या भागालाहि शाखारूपी अवयवांच्या जोड्या लागलेल्या असतात.  उदर म्हणजे शरीराचा पश्चिम भाग.  हा बहुधा वलयांकित असून त्यालाहि शाखारूपी अवयव जोडलेले असतात.  प्रत्येक शाखारूपी अवयवाची घटना साधारणपणें अशी झालेली असते कीं त्याच्या तळाचा प्रथम एक भाग असून पुढें त्या तळाच्या भागाचे दोन फांटे फुटतात.  या तळाच्या भागाला कांहीं अवयवांत जलश्वसनेंद्रियें जोडलेलीं असतात.  बाह्यत्वचेवरील पूट म्हणजे त्वकपापुद्रा हा 'चिटीन' द्रव्य मिश्रित असून त्यांत चुनखडीक्षाराची भेसळ होते.

या वर्गांतील शेंवडा हा प्राणी प्रतिरूप कल्पून त्याचें वर्णन खालीं दिल्याप्रमाणें आहे.

शेंवडा - (पालिन्युरस अथवा पान्युलिरस) मुंबईंत आढळणारा खेंकडा. हा प्राणी बहुतेक मुंबईच्या समुद्रकांठीं नेहमीं सांपडतो.  हातांत धरला असतां हा आपल्या शृंगांच्या योगानें एक प्रकारचा आवाज करतो.  कितयेक वेळां आपलें शेंपूट उदराच्या खालच्या भागात आपटून हा प्राणी धरणारास भिववितो आणि याच पद्धतीनें हा पाण्यांत पोहतोहि.  याला शेंपूट सुकाणूप्रमाणें उपयोगी पडतें.  समुद्राच्या तळाशीं असतांना हा अर्धवट चालतो व अर्धवट पाण्यांत पोहतो.

याच्या तोंडाला लागलेले जबड्याप्रमाणें अवयव आडवे हालतात.  ते मनुष्य किंवा कुत्रा यांच्या तोंडाला लागलेल्या जबड्याप्रमाणें वर खालीं हालत नाहींत.  शीर्षवक्षाच्या कवचाच्या पूर्वशेवटच्या कडेचे अवलोकन केलें असतां असें आढळून येईल कीं तेथें खांचणीच्या आंतल्या बाजूस एक पडद्याप्रमाणें असणारा व नावेच्या आकाराचा अवयव हालत आहे.  या अवयवाला ओष्ठनौकाप्रसर (स्कॅफॅग्नाथाइट) म्हणतात व याच्या हालचालीनें जलश्वसनेंद्रियविवरामध्ये ( गिलचेंबर) खालून व मागच्या बाजूने पाणी आत शिरून तें त्यांच्या पूर्वशेपटीबाहेर उपसले जाते. जलश्वसनेंद्रियांनां पाण्यांत विरलेला प्राणवायु शोषून घेतां यावा व कर्बाम्लवायु पाण्यांत टाकितां यावा म्हणून ह्या रीतीनें पाण्याचा प्रवाह जलश्वसनेंद्रियावर सतत सारखा चालू असतो.

शेंवड्याचें सर्व शरीर मनुष्य अथवा इतर उच्च प्राणी यांच्याप्रमाणें कातडीनें आच्छादित झालेलें असून ही कातडी त्यांच्या बाह्यत्वचेशीं सम्यक आहे व ती त्वकपेशींची झालेली असते.  या त्वकपेशींतून स्त्रवणार्‍या पदार्थाचें एक शरीराभोंवतीं अखंड पटल तयार होतें.  त्याला त्वक पापुद्रा (क्यूटिकल) म्हणतात व तो एकंदरींत ''चिटीन'' द्रव्य मिश्रित असतो.  ह्या त्वकपापुद्याचा भाग पुष्कळ ठिकाणीं चुनखडीक्षारयुक्त होतो व त्यामुळें टणक कवच रूपीं भाग बनतात व या सर्वांचें मिळून शेंवड्याचें बाह्यकवच झालेलें असतें.  या चुनखडीक्षारयुक्त भागांवर जर एखादें अम्ल ओंतलें तर त्यांतून वायूचे बुडबुडे निघूं लागतात.  ह्यावरून हें चुनखडीक्षाराचें मिश्रण झालेलें आहे हें सिद्ध होतें.  सापाच्या कांतीप्रमाणें हें कवच वेळोंवेळीं शेंवडा टाकतो.  समुद्रकाठीं हिंडत असतां अशीं टाकलेलीं कवचें आढळून येतात.

शरीराचे साहजिक ओळखतां येण्याजोगे दोन भाग झालेले असतात.  मागचा भाग उदर असून त्याचीं सहा वलयें असतात.  हीं सहाहि वलयें जवळ जवळ सारखीं असून पहिलें सोडून बाकीच्या सर्वांत शाखा जोडलेल्या असतात.  या सर्वांच्या पश्चिम टोंकास वलयाप्रमाणें एक सातवा भाग असतो.  त्याला शेंपूट म्हणतात.  याला कोणात्याहि प्रकारची शाखा नसून वास्तविक हें वलयहि नव्हे.  अगदीं पूर्वशेवटीं शीर्ष असतें.  या शीर्षाचे भाग साहजिकपणें ओळखूं येत नाहींत.  शीर्ष व वक्ष यांच्या भागांचीं वलयें त्यांच्या शाखांच्या संख्येवरून व त्यांच्या उदरतलावरील आडव्या पट्टयावरून समजावयाचीं असतात.  या रीतीनें पाहिलें असता शीर्षाला पांच वक्षाला आठ वलयें असावींत असें दिसतें.

उदराच्या मध्यभागीं वलयाचा आडवा छेद केला असतां त्याची रचना अशी झालेली दिसते कीं वलयाच्या पृष्ठावरील बाह्यकवच त्याला सभोंवतीं सारखें वेष्टिलेलें असतें व ज्या ठिकाणीं शरीराच्या भागाला लवचिकपणा पाहिजे त्या ठिकाणीं तें मृदु राहून इतर ठिकाणीं चुनखडीक्षाराच्या मिश्रणानें घन व टणक बनतें.  ह्या घन व टणक कवचाची पृष्ठभागीं कमान बनलेली असते तिला पृष्ठवलयार्ध (टर्गम) म्हणतात.  ह्या कमानीच्या दोहों बाजूंवर अधोगामी व कंटकांत शेंवट पावणारे असे दोन भाग झालेले असतात.  त्यांना वलयबाहू (प्यूरॉन) म्हणतात.  उदरतलाच्या भागीं एका आडव्या सरळ अरुंद पट्टयाच्या योगानें ही कमान वर्तुळाकार बनते व त्यामुळें वलय पूर्ण होतें ह्या आडव्या पट्टयाच्या दोन्ही शेवटीं शाखारूपीं गात्रें जोडलेलीं असतात व त्या गात्रांच्या मधील या पट्टयाच्या भागाला अधोवलयार्ध (स्टर्नम) म्हणतात.  या आडव्या पट्टयाचा गात्रांच्या बाहेरील भाग जो प्रत्येक वलयबाहूच्या आंत असतो त्याला ऊरु गात्र (एपिमेरान) म्हणतात.

एकामागून एक असलेले या उदराच्या वलयांचे पृष्ठवलयार्ध हे त्यांच्या पश्चिम कांठांनीं घराच्या छपराच्या कौलाप्रमाणें एकावर एक असे चढलेले असतात व ते वलयबाहूजवळ दोहों बाजूंवर एकमेकांशीं अशा रीतीनें जोडले गेले आहेत कीं त्यांची हालचाल वर खालीं म्हणजे ऊध्वक्षेत्रांतच होऊं शकते.

उदराचीं गात्रें वर म्हटल्याप्रमाणें ऊरुमात्र व अधोवलयार्ध यांच्या मध्यें चिकटलेलीं असून तीं मृदु अशा त्वकपापुद्य्रानें किंवा संधित्वचेच्या योगेकरून (अर्थ्रोडिल मेंब्रेन) जोडलीं जातात.  प्रत्येक गात्राच्या तळाच्या भागाला मूलसंधि म्हणतात.  हा दोन भागांचा झालेला असून त्याच्या आदिम भागाला कटिसंधि (कॉक्सोपोडाइट) म्हणतात, व अंतिम भागाला तलसंधि (बॅसिफोडाइट) म्हणतात.  ह्या तलसंधिभागाच्या अंतिम शेवटीं दोन चापटलेले पानासारखे फांटे जोडलेले असतात.  त्यांपैकीं बाहेरच्या फांट्याला बहिःप्रसर (एक्सोपोडाइट) म्हणतात व आंतल्या फांट्याला अंतःप्रसर (एन्डोपोडाइट) म्हणतात.  बहिःप्रसराचा आकार सशाच्या कानासारखा दिसतो व तो मूळाकडे थोडासा चुनखडी क्षारयुक्त असल्यानें टणक बनलेला आहे.  मादीमध्यें वर सांगितलेले हे दोन्ही फांटे बनलेले असतात व अंतःप्रसराच्या कांठांनां केंस लागलेले असतात व त्यांनां अंडीं बाहेर टाकिलीं असतां तीं चिकटून राहतात.  नरामध्यें हे गात्रांचे भाग लहान असून त्यांत सहाव्या गात्रांच्या जोडीखेरीज करून इतर गात्रांच्या जोड्यांनां अंतःप्रसर बनलेले नसतात.  नर व मादी या दोहोंमध्येंहि उदराच्या पहिल्या वलयाला गात्रें बनलेलीं नसतात.  नर व मादी या दोहोंमध्यें सहावी गात्रांची जोडी बरीच मोठी बनलेली असून ''टेलसन'' व तीं मिळून शेंवड्यांचें बळकट पुच्छपर झालेलें असतें.  टेलसनच्या उदरतलाच्या भागीं गुदद्वार झालेलें असतें.

शीर्षवक्ष -  शीर्षवक्षाचा सर्व भाग एकाच अविछिन्न अथवा अखंड कवचानें आच्छादिलेला असतो.  त्याला शीर्षवक्षपृष्ठ कवच म्हणतात.  ह्या कवचाच्या पृष्ठाच्या पूर्वशेवटीं चक्षुदेठांच्या पाठीमागें एक अर्धचंद्राकृति कात्रा दिसतो.  त्याच्या दोन बाजूस त्याची मर्यादा दर्शविणारे पूर्वगामी दोन कांटे बनलेले आहेत.  ते चक्षूच्या आंतल्या बाजूनें पसरलेले असतात.  या काट्यांमुळें शेवड्यांच्या शत्रूला त्याच्यावर पुढून हल्लां करणें कठिण पडतें.  तसेंच त्याला पुढून गिळणेंहि अवघड होतें.

पृष्ठभागाच्या निम्यांवरून एक करकोचा झालेला असतो.  हा शीर्षवक्ष पृष्ठकवचाच्या प्रत्येक बाजूस आधोगामी होऊन पुढें पूर्व दिशेस वळतो.  या करकोच्यामुळें शीर्ष व वक्ष वेगळे केले जातात.  याला ग्रीवाप्रणाली (सर्व्हिकल ग्रूव्ह) असें म्हणतात.  या करकोच्याच्या मागील बाजूस एक चौकोनी भाग दिसतो.  त्याला हृत्क्षेत्र (कार्डिअॅक एरिआ) म्हणतात.  कारण या हृत्क्षेत्राखालींच हृदय बनलेलें असतें.  या हृत्क्षेत्राच्या दोहोंकडच्या बाजू पूर्व दिशेस ग्रीवाप्रणालीमध्यें अंतर्भूत होतात; व त्या पश्चिम शेवटीं एका उभ्या करकोच्यामध्यें गति घेत जातात.  याप्रमाणें पृष्ठभागीं प्रत्येक बाजूवर पूर्व पश्चिमरीत्या हा एक ऊर्ध्व करकोचा आंखला जातो.  त्याला श्वसनेंद्रिय हृत्प्रणाली (ब्राँचिओकार्डिअल ग्रूव्ह) म्हणतात.  कारण ह्या प्रणालीच्या खालच्या बाजूस असलेला कवचाचा सर्व भाग जलश्वसनेंद्रियाचें आच्छादन करितो व तेवढ्या या कवचाच्या भागाला श्वसनेंद्रियकवच (ब्रांचिओस्टिगाइट) म्हणतात.  शीर्ष व वक्ष मिळून त्यांनां १३ गात्रांच्या जोड्या झालेल्या असतात.  वक्षाला पांच पायांच्यां जोड्या एकामागून एक अशा जोडलेल्या असतात व त्यांचा उपयोग चालण्याच्या कामीं होतो.  या पायांच्या जोड्यांमधील वक्षाच्या उदरतलावरील भाग त्रिकोनी झालेला दिसतो व त्याचें टोंक पूर्वशेवटीं गेलेलें असतें.  या भागावर आडवे करकोचे पडलेले असून त्यांच्यामुळें ह्याचे पांच भाग झाल्यासारखे दिसतात व हे भाग वक्षाचें अधोवलयार्ध मिळून झालेले असावेत.  

वर सांगितलेंच आहे कीं उदरावरील गात्रें चपटलेलीं झालेलीं असतात; त्यामुळें यास त्यांचा उपयोग वल्ह्याप्रमाणें पाण्यांत तरंगण्यास होतो.  शीर्षवक्षावरील गात्रें निरनिराळ्या कामीं उपयोगी पडावीं म्हणून त्यांच्यांत बरेच फेरफार होऊन तीं बनलेलीं असतात.  तरी त्यांची घटकरचना उदराच्या गात्रांसारखीच झालेली असते.  तेव्हां शीर्षाचीं व वक्षावरील गात्रें पुढून पाठीमागें खालीं नमूद केल्याप्रमाणें आहेत :-

  नांव   उपयोग
  १  लघुशृंगांची जोडी (अॅंटन्यूल्स)   स्पर्शेंद्रियाप्रमाणें
  २  बृहतशृंगांची जोडी (अॅंटनी)  "
  ३  बळकट दष्ट्रांची जोडी (मॅंडिबल्स)   जबडे व दांतांप्रमाणें
  ४  पहिली पाश्र्वोष्ठांची जोडी (फर्स्ट-मॅक्सिली)   जबड्याप्रमाणें
  ५  दुसरी पार्श्वोष्ठांची जोडी (सेकंड-मॅक्सिलि)   जबड्याप्रमाणें
  ६  पहिली ओष्ठपादांची जोडी (फ. मॅक्सि. पे.)   जबड्याप्रमाणें
  ७  दुसरी ओष्ठपादांची जोडी (से. मॅक्सि पे.)
  ८  तिसरी ओष्ठपादांची जोडी (थर्डमॅक्सि पे.)  जबड्याप्रमाणें व पायाप्रमाणें

९, १०, ११, १२ व १३ ह्या वर म्हटलेल्या व एका मागून एक अशा जोडलेल्या पांच पायांच्या जोड्या किंवा चरणयुगुल होत.

जलश्वसनेंद्रियांवरील आच्छादन काढिलें तर निरनिराळ्या ठिकाणीं जोडलेलीं जलश्वसनेंद्रियें दृष्टीस पडतात.  त्यांच्या या ठिकाणावरून त्यांचे तीन प्रकार पाडिलेले आहेत; ते असे :  (१) गात्रांना जोडलीं असल्याकारणानें त्यांना पादजलश्वसनेंद्रियें (फूट गिल्स) म्हणतात. (२) गात्रांच्या संधित्वचेला जोडलेलीं असतात त्यांना संधिजलश्वसनेंद्रियें (अर्थ्रोब्रँटाइड) म्हणतात. (३) व श्वसनेंद्रिय विवराच्या अंतःपृष्ठाला लागलेलीं असतात त्यांना पृष्टश्वसनेंद्रियें (प्ल्यूरो ब्रंचिऑक) म्हणतात.

वक्षाला लागलेल्या गात्रांपैकीं दुसरी ओष्ठपादांची जोडी अवलोकन केली असतां असें कळून येईल कीं त्या गात्राची रचना पूर्णत्वानें झालेली असून तें गात्र नमुना म्हणून समजण्यास हरकत नाहीं.  याचा मूलसंधि दोन विभागांचा म्हणजे कटिसंधि व तलसंधि मिळून झालेला आहे.  कटिसंधीला जोडून एका पापुद्य्रासारखा भाग वाढलेला असतो त्याला पणसंधि (एपिपोडाईट) म्हणतात.  व तो कटिसंधि लागलेल्या पादजलश्वसनेंद्रियाला आधारभूत होतो.  तलसंधि हा हालचाल होऊं शकेल अशा रीतीनें कटिसंधीला जोडलेला असतो.  हा तलसंधि पुढें या गात्राच्या अंतःप्रसरामध्यें (एंडोपोडाइट) अंतर्भूत झालेला दिसतो.  तरी त्याच्या आंतल्या कांठावर एका खांचणीच्या योगेंकरून ते दोन भाग निराळे आहेत हें ओळखतां येतें.  अंतःप्रसर हा पांच भागांचा मिळून झालेला असतो.  त्यांचीं नांवें अनुक्रमें येणेंप्रमाणें होत. (१) अनुकटिसंधि (इश्चिओपोडाइट), (२) जंघासंधि (मोरोपाइट), (३) मणिसंधि अथवा कूर्चसंधि (कार्पोपोडाइट), (४) अनुकूर्चसंधि (प्रोपोडाइट) व (५) अंगुलिसंधि (डक्टिलोपोडाइट).  हे सर्व अंतःप्रसराचे संधिभाग (पोडोमिअर्स) येथें चपटलेले असून त्यांच्या आंतल्या कांठाला रांठ केश लागलेले असतात.  या गात्राचा बहिःप्रसर (एक्स्पोडाइट) हा पुष्कळ संधिभाग मिळून लांब झालेला आहे.  व तो इंद्रियगोचर आहे.  यावरून नमुनेदार गात्र म्हटलें म्हणजे त्याला मूलसंधि असून त्या मूलसंधीचे कटिसंधि व तलसंधि असे दोन भाग असतात.  या कटिसंधीला जलश्वसनेंद्रिय व पर्णप्रसर असे दोन भाग लागलेले असतात.  त्याच्या तलसंधीला दोन फांटे लागलेले असतात ते अंतःप्रसर व बहिःप्रसर होत व हा अंतःप्रसर वर नमूद केलेले पांच भाग एकापुढें एक जोडून झालेला असतो.  आतां सर्व गात्रें याच घटकरचनेबरहुकूम बहुतेक बनलेलीं असतात.  परंतु त्या सर्वांमध्यें हे सर्व भाग असतातच असें नाहीं.  कारण यांपैकीं कांहीं भाग एकमेकांशीं जुळून जातात किंवा ते वाढतच नाहींत अथवा खुरटे बनून दिसेनासे होतात.  तेव्हां त्यांच्यांत फरक आहेत म्हणून अनुक्रमें ते खालीं नमूद केले आहेत.

ओष्ठ व ओष्ठपाद हे मुखद्वाराच्या खालीं आडवे पूर्वपश्चिमरीत्या पसरून बनलेले आहेत व ते एकावर एक असे रचून झालेले असतात.  पाय किंवा चरण बहुतेक सारखेच असतात.  यांच्यांत तलसंधीचा बाहेरचा फांटा बहिःप्रसर बनलेला नसतो.  पहिला पाय फार तोकडा असतो परंतु बळकट असतो.  दुसरा त्याच्यापेक्षां थोडा जास्त लांब असून बारीक असतो पण पहिल्या सारखाच असतो.  तिसरा पाय सर्वांत लांब असून त्याच्या मूलसंधीच्या उगमाजवळ मादीमध्यें प्रत्येक बाजूस एक लहान छिद्र असतें.  तें स्त्रीजननेंद्रियाचे ब्राह्य छिद्र होय.  ह्या छिद्राच्या अस्तित्वामुळें मादी बाह्यतः ओळखतां येते.  चवथा दुसर्‍यासारखाच आहे.  पांचवा पाय इतर सर्व पायांपेक्षां भिन्न आहे.  कारण त्याच्या कटिसंधीला पर्णप्रसराचा भाग बनलेला नसतो व म्हणून त्याला जलश्वसनेंद्रिय झालेलें नसतें.  नरामध्यें ह्या कटिसंधीच्या भागाच्या उदरतलावर एक मोठी चीर असते.  तिच्या द्वारें शुक्रस्त्रोतस बाहेर उघडतें.  हिच्या अस्तित्वामुळें बाह्यतः नर ओळखतां येतो.  या चरणाचा अंगुलिसंधि नरामध्यें दुसर्‍या चरणांचा अंगुलिसंधीप्रमाणें निमुळता होऊन शेवट पावतो; तर मादीमध्यें या चरणाचा अंगुलिसंधि सुरवातीला दुभागून जातो व त्याचा चिमट्याप्रमाणें भाग झालेला असतो.

तिसरा ओष्ठपाद दुसर्‍या ओष्ठपादासारखाच परंतु थोडा जास्त लांब व बळकट असतो.  तरी त्याचा बहिःप्रसर खुरटा बनून बहुतेक नाहींसा झालेला आहे.  पहिल्या ओष्ठपादामध्यें बराच फरक झालेला आहे.  त्याच्या मूळसंधीचे दोन भाग रुंद अशा चपटलेल्या तबकडीप्रमाणें बनून त्यांच्या आंतील काठांनां धार आलेली असते व त्यांना दाट केस लागलेले असतात.  पर्णप्रसर अगदीं पापुद्य्राप्रमाणें बनून त्यांना जलश्वसनेंद्रियें मुळींच झालेलीं नसतात.

द्वितीयपार्श्वोष्ठ हें शीर्षाला लागलेलें गात्र होय.  तें प्रथम ओष्ठपादाच्या खालीं दबून गेलेलें असतें म्हणून स्पष्ट दिसण्यांत येत नाहीं.  ह्याचा उपयोग मुख्यतः श्वसनक्रियेला मदत करण्याकडे होतो.  हे दोन चपट्या लहानशा भागांचें झालेलें असतें.  त्यांतील आंतला भाग म्हणजे मूळसंधीचे दोन कटिसंधि व तलसंधि मिळून झालेला भाग व त्यांच्या पुढचा अंतःप्रसर ह्यांना दर्शवितो.  बाहेरचा कठिण झालेला तबकडीसारखा भाग जो ग्रीवाप्रणालीखालीं जलश्वसनेंद्रिय विवराच्या पूर्वशेवटीं हालत असतो व ज्याच्यामुळें विवरांतलें पाणी उपसलें जातें तो पर्णप्रसर व बहिःप्रसर ह्यांच्या संयोगानें झालेला आहे.  तो नौकाकार असल्यामुळें त्याला ओष्ठनौकाप्रसर म्हणतात.

प्रथमपार्श्वोष्ठ मुखाच्या मध्याला असल्याकारणानें थोडासा जास्त स्पष्ट रीतीनें दिसतो.  ह्याचे तीन भाग असलेले दिसतात व मधला भाग सर्वांत जास्त मोठा असतो, तो तलसंधि होय व आंतला भाग कटिसंधि होय.  ह्या दोन्ही भागांना धार असून केश लागलेले आहेत.  हे टणक असल्याकारणानें यांचा उपयोग चर्वण करण्यांत होतो.  बाहेरचा भाग हा अंतःप्रसर दर्शवितो.  याला बहिःप्रसर बनलेलें नाहीं.

यांच्यापुढें दंष्ट्रा येतात.  प्रत्येक दंष्ट्रा मुखद्वाराच्या बाजूला लागलेली असून ती आडवी हालते.  ती वाटोळी असून तिच्या आंतील कांठ दंतयुक्त असा दिसतो.  हा वाटोळा दंष्ट्रेचा भाग कटिसंधि दर्शवितो व दंष्ट्रेला बाहेरून लागलेला काडीसारखा भाग हा दंष्ट्रेचे तलसंधी व अंतःप्रसर या भागांचा मिळून झालेला आहे.  दंष्ट्रेचा काडीसारखा भाग पुष्कळ संधियुक्त असून इंद्रियगोचर आहे.  दंष्ट्रेला बहिःप्रसर झालेलें नसतें.

शीर्षाच्या पृष्ठभागीं दोन शृंगांच्या जोड्या आहेत.  लघुशृंगाचा मूळसंधि तीन भागांचा झालेला आहे व त्याच्या पुढें दोन फांटे अनेक संधिभाग मिळून बनलेले दिसतात.  ते अंतःप्रसर व बहिःप्रसर दर्शवितात.  मूळसंधीच्या आदिम भागाच्या पृष्ठावर एक छिद्र केशयुक्त असें दिसतें तें कणेंद्रियाचें बाहेरचें रंध्र होय.

बृहतशृंगाला बहिःप्रसर बनलेलें नसतें व तें ज्या ठिकाणीं उगम पावतें त्या ठिकाणीं उदरतलावर शीर्षाच्या पूर्वशेंवटीं वृक्कस्त्रोतस् बाहेर ज्या एका लहानशा उंचवट्यानें उघडतें तो छिद्रयुक्त उंचवटा दिसतो.  शीर्षाला नेत्र देंठानें लागलेले आहेत.  कांहींच्या मतें हे नेत्रांचे देंठ म्हणजे शीर्षाला लागलेलीं गात्रें होत.

रुधिराभिसरणव्यूह :-  हृत्क्षेत्राच्या भागांतील त्वचेच्या खालीं व आंत्राच्या वर हृत्कलेच्या विवरांमध्यें हृदयाची स्थापना झालेली असते.  हृदय स्नायूंचें बनलेलें असून त्याला हृच्छिद्रांच्या तीन जोड्या लागलेल्या असतात व ह्या छिद्रांनां अशा तर्‍हेचे पडदे बसलेले असतात कीं त्यांच्यामुळें हृत्कलाविवरांतून रक्त हृदयांत येतें, परंतु तें हृदयांतून बाहेर हृत्कलाविवरांत जाऊं शकत नाहीं.  हें हृदय षट्कोनी असून त्याच्या पासून कांहीं रुधिरवाहिन्या उगम पावतात.  पूर्वशेवटीं मध्याला नेत्रधमनी उगम पावते व ती पुढें जठरावरून जाऊन दुभागली जाते व तिचा फांटा प्रत्येक नेत्राला व पूर्वशेंवटीं रुधिर पुरवितो.  नेत्रधमनीच्या प्रत्येक बाजूवर शृंगधमनी उगम पावते व ती तिच्या बाजूवरील लघु व बृहद्शृंगांना तसेंच वृक्काला रक्त पोंचविते.  शृंगधमनीच्या थोडेसें खालीं व बाहेरच्या अंगापासून यकृतधमनीची जोडी उगम पावते व ती पचनपिंड अथवा यकृत याला रक्त पुरविते.  हृदयाच्या पश्चिम शेवटापासून पृष्ठोदरधमनी उगम पावून आंत्राच्या पृष्ठावरून पश्चिम दिशेस गति घेत जाते.  व तिच्या आडव्या शाखा होत होत ती शरीराच्या शेवटीं संपते तिच्यामुळें आंत्राच्या भागाला व त्याच्या सभोंवतीं असलेल्या स्नायूंनां रक्त पुरविलें जाते. पृष्ठोदरधमनीच्या उगमस्थानापासूनच सरळ अधोगामी जाणारी अधोधमनी निघते.  ती उदरतलावरील ज्ञानकंदाच्या मधल्या मोठ्या रंध्रांतून बाहेर निघून उदरतलाच्या पृष्ठावर येते व तेथें तिचे दोन फांटे फुटतात.  एक फांटा पूर्वगामी असून तो ज्ञानकंदाच्या सांखळीखालून पूर्वशेवटाकडे गति घेतो व फांटे फोडून चरण, ओष्ठपाद, ओष्ठ वगैरे या शेवटावरील सर्व आजूबाजूच्या भागांना रक्त पुरवितो.  दुसरा फांटा ज्ञानकंदाच्या सांखळीखालून पश्चिम शेवटीं गति घेतो व शाखा फोडून उदराच्या गात्रांनां व उदरतलावरील स्नायूंना रुधिर पुरवितो.

या सर्व धमन्यांचे बारीक बारीक फांटे फुटतात, परंतु शेवटीं त्या (अंतिम) बारीक फांट्यांपासून शिरा उगम पावत नाहींत.  पृष्ठवंशप्राण्यांमध्यें जसा शिरांचा उगम केशवाहिन्यांपासून होतो तसा या अपृष्ठवंशांतील प्राण्यांत शिरांचा उगम होत नाहीं.  या प्राण्यांत धमन्यांचे अगदी शेवटचे फांटे अंतरिंद्रिये व स्नायू यांच्या मध्यंतरांत शेवट पावतात.  त्यामुळें या धमन्यांतील रुधिर शरीराच्या अंतरिंद्रियांच्या व स्नायूंच्या आजूबाजूस बाहेर सर्व ठिकाणीं जिकडे वांव मिळेल तिकडे सांठतें व अशा रीतीनें शिरामार्ग बनतात.  हे सर्व शिरामार्ग म्हटले म्हणजे शेंवड्यांच्या शरीरांतील सर्व पोकळ्या होत व त्या एकमेकांना जोडल्या गेलेल्या असतात.  म्हणून शेंवड्याच्या शरीरांत खरी शरीरगुहा आढळून येत नाहीं.  हे सर्व शिरामार्ग कबंधाच्या उदरतलावरील पूर्वपश्चिमरीत्या पसरलेल्या एका उभ्या शिरामार्गांत एकवटतात व रुधिर तेथें जमतें.  ह्या उभ्या उदरतलावर शिरामार्गांतच ज्ञानकंदांची सांखळी व अधोधमनीचे पूर्वगामी व पश्चिमगामी फांटे स्थापित झालेले असतात.  वक्षाच्या भागांत ह्या उभ्या शिरामार्गांतून प्रत्येक जलश्वसनेंद्रियाच्या बहिर्नलिकेमध्यें रुधिर वहात जातें व तींतून जलश्वसनेंदियाच्या आडव्या वाहिन्यांच्या द्वारें अंतर्नलिकेमध्यें येतें.  या सर्व जलश्वसनेंद्रियांच्या अंतर्नलिका प्रत्येक बाजूवर ऊर्ध्वगामी असलेल्या सहा शिरामार्गांत उघडतात व हे ऊर्ध्व शिरामार्ग हृत्कलाविवरांत उघडतात.  तेणेंकरून जलश्वसनेंद्रियांतून वाहून शुद्ध झालेलें रुधिर हृत्कलाविवरांत सांठतें व त्याच्यातून हृदयाच्या रंध्रामार्गे जेव्हां हृदय विकास पावतें तेव्हां तें हृदयांत येतें.  हृदय जेव्हां संकोच पावतें तेव्हां तें त्याच्यांतील रुधिर धमन्यावाटे बाहेर काढून टाकितें व अशा रीतीनें रुधिराभिसरणाची क्रिया सतत चालू असते.  जलश्वसनेंद्रियाच्या आडव्या वाहिन्या फार पातळ पापुद्य्राप्रमाणें असतात म्हणून त्यांतून अभिसरण पावत असतांना रुधिरांतील कर्बाम्ल वायु (कर्बालिक ऍसिड) प्रसरण क्रियेनें पाण्यांत निघून जातो व पाण्यांत विरलेल्या प्राणवायु त्याच कारणानें रुधिराशीं मिसळतो व अशा रीतीनें रुधिराची शुद्धता घडून येते.

पचनेंद्रियें :-  मुखद्वार हें उभ्या चिरेप्रमाणें असून त्याच्या पूर्वशेवटीं एक मांसल ओंठासारखा लवचिक पडदा असतो त्याला ऊर्ध्वोष्ठ म्हणतात.  हा संधियुक्त नाहीं.  मुखद्वाराच्या बाजूवर एक बळकट दंष्ट्रांची जोडी लागलेली असते व तिच्या पश्चिम शेवटीं तसाच दुसरा मांसल ओंठासारखा लवचिक पडदा असतो त्याला अधरोष्ठ म्हणतात.  मुखापासून लगेच रुंद व उभी अशी अन्ननलिका सुरू होऊन ती मोठ्या रुंद व आडव्या जठरामध्यें शेवट पावते.  हें जठर शीर्षभागांत असून तें त्यांतील सर्व जागा अडवून टाकितें.  जठराचे दोन भाग झालेले दिसतात.  पूर्वभाग मोठा असून एका आडव्या करकोच्यामुळें लहानशा पश्चिम भागापासून तो निराळा दिसतो.  जठराच्या अंतःकलेंत चुनखडीक्षाराच्या दंतयुक्त आडव्या उभ्या पट्टया लागलेल्या असतात व त्यांची स्नायूंच्या साह्यानें हालचाल होऊं शकते; त्यांच्या हालचालीनें आंतील अन्नाचें चर्वण होतें.  तसेंच अंतःकलेला खालच्या बाजूनें पुष्कळ दाट केंस लागलेले असतात.  त्यामुळें फक्त अगदीं बारीक अन्नाचे कण पुढें आंत्रांत जाऊं शकतात.  जठराचा पश्चिम शेवट निमुळता होऊन आंत्राचा उगम होतो व त्याच्या अंतःकलेंत पिंडपेशी बनलेल्या असतात व त्यांच्या पासून पाचक रस तयार होतो.  या मध्यांत्रांत वक्षाच्या भागीं पसरलेल्या पिवळ्या घन यकृताचीं दोहोंबाजूवरील यकृत स्त्रोतसें उघडतात व यकृतांतील पाचक रस तीं त्यांत ओततात व त्यामुळें अन्नाचें पचन होतें.  शेंवड्याचें यकृत हें पृष्ठवंशप्राण्याच्या यकृताप्रमाणें नसून वास्तविक पाहिलें असतां तें पृष्ठवंशीय प्राण्यांच्या यकृत व पक्वपिंड या दोहोंबरोबर आहे, म्हणजे तें एक संयुक्तपिंड आहे म्हणून त्यास यकृतपक्वपिंड म्हणतात.  त्याच्या घटकपेशींतील कांहीं पेशींत पिवळ्या रंगाच्या तेलाचे गोलाकार ठिपके असलेले दिसतात व कांहीं पेशी पाचक रस तयार करतात.  हा पाचक रस किंचित अम्ल असून मांसल धातूंना पचवितो.  तसेंच पिष्टमय पदार्थांना शर्करामय बनवूं शकतो व स्निग्ध पदार्थानां दुग्धमय बनवूं शकतो.  ह्या मध्यांत्राच्या पुढचा भाग पश्चिमांत्र होय.  याच्या कलेला सुद्धां चुनखडीक्षाराचे उभे पट्टे झालेले असतात.  ह्यांच्या शेवटीं गुदद्वार असतें.  तें टेलसनच्या उदरतलाच्या भागीं उभ्या चिरेनें बाहेर उघडतें.

मलोत्सर्ग इंद्रियें :-  नत्रयुक्त मल रुधिरांतून वृक्कांच्या द्वारें बाहेर टाकिला जातो.  ही वृक्कांची जोडी शीर्षाच्या प्रत्येक बाजूस एक एक अशी असते.  या वृक्काच्या स्त्रोतसाचें बाह्य छिद्र वर म्हटल्याप्रमाणें उदरतलावर बृहतशृंगाच्या उगमस्थानाजवळ एका लहानशा उंचवट्याच्या शेवटीं असतें.  वृक्क हें एका वेटोळें झालेल्या नलिकेचें बनलेलें असून तिच्या शेवटीं थोडासा फुगारा झालेला असतो.  त्यांत नलिकेच्या भागांतून मूत्र तयार होऊन सांठतें व तें स्त्रोतसाच्या मार्गानें बाहेर निघून जातें.

ज्ञानेंद्रियव्यूह :-  शेंवड्याच्या ज्ञानेंद्रियव्यूहाची रचना सर्वसाधारणपणें म्हणजे गांडूळ (भूकृमि) अथवा काडवाच्या ज्ञानेंद्रियव्यूहाच्या रचनेप्रमाणें आहे.  तरी त्यांत थोडासा फरक आहे.  भूकृमींमध्यें ज्ञानपेशी ह्या ज्ञानकंदांतच एकवटून न राहतां त्या ज्ञानरज्जूंच्यावरहि आढळून येतात.  शेंवड्यामध्ये या ज्ञानपेशी फक्त ज्ञानकंदांतच एकवटलेल्या राहतात; त्या ज्ञानरज्जूवर पसरत नाहींत.  पुन्हां शेंवड्यांत ज्ञानकंदाच्या जोड्या एका पाठीमागें एक अशा अलग न राहतां कांहीं संयोग पावतात.

शेंवड्यांत शीर्षाच्या पृष्ठभागांत नेत्रांच्या देठांपाठीमागें मेंदूसारखा असणारा शीर्षज्ञानकंदांचा द्वित्त गोळा असतो.  त्याच्यापासून पूर्व शेवटीं तीन ज्ञानरज्जूंच्या जोड्या निघतात.  त्या नेत्ररज्जु, लघुशृंगरज्जु व बृहतशृंगरज्जु ह्या होत.  पश्चिम शेवटीं त्या गोळ्याच्या दोहोंबाजूवर ज्ञानरज्जूचे दोन फांटे निघून प्रत्येक फांटा अन्ननलिकेच्या बाजूवरून जाऊन वक्षाच्या उदरतलाच्या भागीं असलेल्या मोठ्या लांब ज्ञानकंदांच्या गोळ्यांला मिळतो.  या फांट्याला अन्ननलिकापार्श्वरज्जु म्हणतात.  हा ज्ञानकंदाचा गोळा अकरा ज्ञानकंदांच्या जोड्या संयुक्त होऊन झालेला असतो परंतु त्याचे भाग स्पष्ट दिसत नसून त्याच्यापासून अकरा ज्ञानरज्जूंच्या जोड्या निघतात व त्या अकरा गात्रांच्या जोड्यांकडे जातात.  ह्या लांब संयुक्त ज्ञानकंदांच्या गोळ्याला वक्षज्ञानकंद म्हणतात.  ह्या संयुक्त ज्ञानकंदाच्या गोळ्याच्या मधोमध एक छिद्र असतें.  त्यांतून अधोगामी धमनी निघून उदरतलावर येते व नंतर ती दुभागली जाते.  उदरामध्यें प्रत्येक वलयाला किंवा भागाला एक अशा एका पाठीमागें एक सहा उदरज्ञानकंदांच्या जोड्या झालेल्या असतात व त्या एकमेकीशीं तसेंच वक्षज्ञानकंदाशीं उभ्या ज्ञानरज्जूंनीं जोडलेल्या असतात.  शेवटल्या उदरज्ञानकंदापासून टेलसनकडे ज्ञानरज्जू जातात व त्यांपासूनच पश्चिमांत्राकडे अंतरिंद्रिय ज्ञानरज्जू जातात.  जठराकडे सुद्धां अंतरिंद्रियज्ञानरज्जू शीर्षज्ञानकंदाच्या पश्चिम शेवटापासून व अन्ननलिकापार्श्वरज्जूपासून निघून जातात.

जननेंद्रियें -  नर व मादी हे निरनिराळे प्राणी असतात.  जननेंद्रियें वक्षाच्या पोकळींत असतात.

नराच्या शरीरामध्यें लांबचलांब दोन मुष्क असतात व ते मध्यभागीं एका आडव्या भागानें जोडले जातात.  साधारणतः मुष्काच्या मध्यभागांतून प्रत्येक बाजूवरील शुक्रस्त्रोतसाचा उगम होतो.  हें शुक्रस्त्रोतस एका लांब नागमोडी, अरुंद नलिकेप्रमाणें सुरुवातीला असून तें पुढे बरेंच रुंदावतें.  या रुंद भागाला शुक्राशय म्हणतात.  याच्यांत शुक्रबीज एकवटतात.  नंतर हें स्त्रोतस पंचमचरणाच्या मुळाशीं असलेल्या चिरेमध्यें उघडतें.  शुक्रबीजाचा आकार तार्‍याप्रमाणें असतो व त्याला हालणारे नेहमीचें केश नसतात.

मादीमध्यें अंडकोश नराच्या मुष्कासारखे लांबचलांब दोन असतात व ते मध्याला जोडले जातात.  ते अपक्वदशेंत पांढरे असतात परंतु परिणतद्‍शेंत वेळेवर लाल होतात व फारच लांब असतात.  प्रत्येक बाजूवरून एक सरळ नलिका अंडकोशापासून निघते तिला अंडस्त्रोतस म्हणतात व हें स्त्रोतस तृतीयचरणाच्या मुळाशीं एका लहानशा छिद्रानें बाहेर उघडतें.

मादीं अंडीं बाहेर पाण्यांत टाकिते व नंतर त्यावर नर शुक्राचा स्त्राव करितो.  अंड्याशीं शुक्रबीजाचें संमीलन झालें असतां तें फलद्रूप होतें व पुढें विकास पावतें.  शेंवड्याचीं अंडीं केशरी रंगाचीं असतात व तीं फलद्रुप झाल्यावर परिपूर्णतावस्थेंतून विकास पावत असतांना रूपांतरें पावतात व शेवटीं शेंवडा तयार होतो.  (लेखकः- व्ही.एन. लिखिते, बी. ए., प्रो. टी. जी. येवलेकर व प्रो. व्ही. एन. हाटे)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .