प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कल्लार -  कल्लण.  वस्ती मद्रास इलाखा.  लो. सं. (१९११)  ५३६६२९.  यांत पुरुषांपेक्षां बायकांची संख्या जास्त आहे.  यांचें मूळ ठिकाण चोल देशांत किंवा तंजावरांत असावें असें फ्रॅन्सिस म्हणतो (मद्रास सेन्सस रिपोर्ट, १९०१).  तंजावरांत यांचे आचार ब्राह्मणांसारखे असतात.  घरफोडी, दरवडे, गुरें चोरणें हे यांचे नेहमींचे गुन्हे होत.  तामीळ भाषेंत 'कल्लण' या शब्दाचा अर्थ दरवडेखोर असा आहे.  तथापि यावरून सर्वच कल्लार चोर आहेत असें अनुमानणें चुकीचें होईल.  या जातीपैकीं बहुतेक लोक प्रामाणिक असून चांगल्या दर्जाचेहि कांहीं लोक आहेत व या जातींतला एक संस्थानिकहि आहे. कल्लार लोकांचे पूर्वज मोठे धाडशी असत व हा गुण त्यांच्या पुढील पिढ्यांतहि दिसून येतो असें म्हणण्यास मुळींच हरकत नाहीं.  तंजावर व त्रिचनापल्ली तालुक्यांतील लोकांनां तसेंच मदुरा व रामनद जिल्ह्यांतील पिरमलाई जातीच्या कल्लार लोकांनां त्यांचा साहसीपणा कधीं कधीं भोंवतो हेंहि खरें आहे.  गुन्हा करणें हें वाईट आहे याची पुष्कळ कल्लारांनां जाणीवच नसते.  पटाईत गुन्हेगार हा मोठा वीर मानला जातो व खेड्यांतील मुलींनां तो पति होण्यास सर्वस्वी योग्य आहे असें वाटत असतें.  कांहीं खेड्यांतील कल्लार तरुणांनां एखादा मोठा गुन्हा केला कीं शतकृत्य केलें असें वाटतें व त्यांचें अनुकरण करणार्‍यांची संख्या बरीच वाढून पोलिसांनां बंदोबस्त करणें मोठें अवघड काम वाटते.  तीन चार वेळांपेक्षांहि जास्त वेळां शिक्षा झालेला कल्लार धर्मवीर म्हणून मानला जातो व तो तुरुंगांत असतांनां त्याच्या कुटुंबास मदत केली जाते.  पोलिसांच्या तावडींतून सुटणार्‍या त्यांच्या पुढार्‍यांचे बरेच अनुयायी असतात.  गुन्हेगार कल्लार लोकांपैकीं बहुतेकांची स्वतःची मालमत्ता असते.  वास्तविक त्यांनां गुन्हा करण्याची जरूरी नसूनहि या पांढरपेशा कल्लारांनां केवळ साहसाकरितां गुन्हे करावे असें वाटत असतें.  इतर जातींच्या ग्रामस्थांनां या कल्लारांचा इतका वीट आला आहे कीं, गुन्हेगार सांपडला कीं ते त्यास चोप देतात व ठारहि करतात.  तीस वर्षांपूर्वी मदुरा जिल्ह्यांत कल्लारांविरुद्ध मोठी चळवळ झाली व त्यांनां बाहेर घालवून देण्याचा मोठा प्रयत्‍न केला गेला.  अंतस्थ बंडाळी माजेल या भीतीनें अधिकार्‍यांनीं ही चळवळ बंद करून टाकली.

कल्लार हे लोकांकडून दोन तर्‍हेनें पैसे उकळतात.  'तपुकुली' ही एक तर्‍हा असून जनावरें चोरून न्यावयाचीं व कल्ला मध्यस्थानें तीं मालकाला अर्धी किंमत घेऊन परत करावयाचीं या प्रकाराला 'तपुकुली' म्हणतात.  'कावल' ही दुसरी तर्‍हा होय.  या प्रकारांत ग्रामस्थ, कल्लारांनां चोरी होणार नाहीं या हमीकरितां कांहीं पैसे देतात.  पैसे उकळण्याच्या या दोन्ही पद्धतीविरुद्ध कोणी वागूं लागला कीं, घरें फोडणें, चोर्‍या करणें वगैरे साथींचा प्रादुर्भाव ताबडतोब सुरू होतो.  कल्लारांत पुढारी व अनेक टोळ्या असतात.  'कल्ला कावल गारांनां' एखाद्या खेड्यानें मान्यता दिली कीं तें खेडें टोळ्यांपासून सुरक्षित असतें; व  जर एखादा गुन्हा घडला तथापि या 'कावल' गारांच्या मध्यस्तीनें मालमत्ता त्या टोळ्यांकडून परत मिळूं शकते.  कधीं असेंहि घडून येतें कीं कल्लारांचे दोन्ही वर्ग एकाच खेड्यावर 'कावल' कराचा हक्क सांगूं लागतात.  अशा वेळीं त्या खेड्याची स्थिति कठिण होते.  प्रत्येक वर्गाचा कावलगार विरुद्ध पक्षाच्या लोकांकडूनच प्रत्येक गुन्हा झाला असें म्हणूं लागतो व त्या खेड्यांतील लोकांनां कल्लारांच्या दोन्ही पक्षाला 'कावल' देणें प्राप्‍त होतें.  कल्लार आपणांस जंगलाचे राजे समजून चोल राजांशीं संबंध लावतात.

१९०९ सालीं जिल्हा पोलीस सुपरिंटेंडेंटनें जनावरें डागण्याची पद्धत सुरू केली.  मालकाला अक्षरें व आंकडे पाहून आपली जनावरें ओळखतां यावीं व कल्लारांनां मालकाशिवाय इतरांनां हीं जनावरें देतां येऊं नयेत असा जोड हेतु या पद्धतींत होता.  दहा वर्षांपेक्षांहि जास्त काळ ही पद्धत अमलांत होती.  डागण्यानें जनावरें खराब होतात असें मालकांनां वाटत असे.  'तपुकुली' वसूल होईपर्यंत कल्लार हीं जनावरें गुप्‍त ठिकाणीं ठेवीत व पुन्हां जास्त पैसे मागत.  ग्रामस्थांनीं जनावरें डागूं नयेत म्हणून कल्लार त्यांची कत्तल करून टाकीत व त्यामुळें मालकाला त्या जनावरांची अर्ध्याऐवजीं सर्वच किंमत गमावून बसावें लागत असे.  डागण्याचें काम त्रासदायक असून ते डाग पुसून जात असत.  खेडवळ लोक टाकाऊ जनावरेंच डागीत असत व कल्लारांनांहि हा टाकाऊ माल घेण्यांत फायदा नसे.

१९०९ सालापासून क्रिमिनल ट्राइब्ज कायदा अंमलांत आणून या स्थितीशीं तोंड देण्यास सुरुवात झाली.  पुरुष गुन्हेगारांची हजेरी घेण्याच्या पद्धतीनें फारसा परिणाम झाला नाही.  परिस्थितीचें निरिक्षण करून जिल्हाधिकार्‍यांची खात्री झाली कीं गुन्हे कमी होण्याकरितां खालील उपाय योजिले पाहिजेत.  ते असे :- (१) इतरांप्रमाणें स्वजातीकडूनहि गुन्हेगार हा बहिष्कृत व अप्रिय मानला जाणें. (२) कांहीं तरी दुसरा उद्योग योजून गुन्हेगाराला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणें. (३) तरुण व साहसी कल्लारांच्या उत्साहास निराळें वळण लावणें.  हे उपाय यशस्वी करण्याकरितां एका व्यक्तीबद्दल खेड्यांतील सर्व कल्लार जातीला जबाबदार धरुं अशी समज देणें इष्ट आहे असें आढळून आलें.  कल्लार खेड्यांत ग्रामपंचायती स्थापन झाल्या.  त्यामुळें गुन्ह्याची चौकशी कल्लारांतर्फे तेथें होऊं लागलीं; 'कावल' व 'तपुकुली' सोडून देऊन पोलिसांनां गुन्हेगार धरून देण्यास कल्लार प्रवृत्त झाले; पंचायत उत्तम चालल्यामुळें क्रिमिनल ट्राइब्ज कायदा खेड्यांतून योजावा लागला नाहीं.  पंचायत जेथें जेथें सुरू झाली तेथें गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे.  तिरुमंगलम् आसपास १९२० सालीं २१ घरें फोडलीं गेलीं पण १९२१ सालीं दोनच घरें फोडण्यांत आली.  मदुरा वगैरे तालुक्यांमध्यें अशीच प्रगति दिसून येते.

प्रामाणिकपणें चरितार्थ चालण्याबद्दल व मुलांच्या शिक्षणाबद्दल कल्लारांनां मदत करण्यासाठीं मुद्दाम नेमलेल्या अधिकार्‍यांस थोडें बहुत यश आलें आहे.  गुन्हेगारी ही धोक्याची व अप्रिय मानली गेल्यामुळें इतर धंद्यांकडे त्यांचें मन वेधूं लागलें आहे.  दोर करण्यासारखे घरगुती उद्योगधंदे सुरू झाले आहेत.  केवळ शेती करणार्‍या खेड्यांपेक्षां कल्लारांच्या खेड्यांतून घरगुती उद्योगधंदे सुरू करणें सुलभ आहे.  कारण कल्लारांनां तुरुंगांत थोडेसें हस्तकौशल्य प्राप्‍त झालेलें असतेंच.  तेल काढणें, चट्या करणें, कापड विणणें हीं कामें त्यांनां देण्यांत आलीं आहेत.  जिल्हाबोर्डानें त्यांनां कंत्राटेंहि दिलीं आहेत व मदुरा येथील गिरणींत दोनशें मजूर कामास लागले आहेत.  पीरिमाडेव मूनर येथील चहाच्या व्यापार्‍यांनीं ४।५ शें मजुरांनां काम मिळेल अशी व्यवस्था केली आहे.  जमीन विकणार नाहीं व गहाण ठेवणार नाहीं या करारावर कल्लारांनां पडीत जमिनीहि दिल्या आहेत.  शिक्षणानें गुन्हा कमी होईल या हेतूनें कल्लारांचें मन वळवून त्यांच्या मुलांनां शाळेंत पाठविण्याची खटपट पंचायत करीत आहे.  ह्याप्रमाणें तालुकाबोर्डे, अमेरिकन, स्वीडिश व कॅथोलिक मिशनरी, या संस्था शाळा स्थापून सरकारचें व पोलिसांचें काम हलकें करीत आहेत.

या जातींत अनेक पोटजाती आहेत.  पुरमलई-नाडु-कल्लणांत सुंता करण्याची चाल आहे.  मुलांच्या सुंतेचा खर्च त्याची आत्या सोसते; कारण तिची मुलगी त्याची बायको व्हावयाची असते.  आतेबहिणीला मागणी घालण्याचा प्रत्येक कल्लणाचा जन्मसिद्ध हक्क आहे.  याच हक्काला अनुसरून मुलीचा मामा तिच्या नाहणाचा खर्च सोसतो.  आते बहिणीचें वय मामेभावापेक्षां कितीहि मोठें असलें तरी त्या दोघांचें लग्न होतें.  घटस्फोट सहज होतो.  पुनर्विवाहाला मोकळीक आहे.  कल्लार नांवाचे मात्र शैव धर्मी आहेत.  पण वास्तविक त्यांनां भुताखेतांची उपासना करणारे म्हणावें असें स्टुअर्ट म्हणतो (मद्रास सेन्सस, १८९१).  अलगरस्वामी हा त्यांचा मुख्य देव होय.  (थर्स्टन.  सेन्सन रिपोर्ट.  कल्लारांवर मद्रासच्या पब्लिसिटी ब्यूरोनें प्रसिद्ध केलेली माहिती.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .