प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कल्याणगोसावी -  समर्थ रामदास स्वामींचे पट्ट शिष्य.  गोदावरीच्या तीरीं असणार्‍या बाभूळगांवचे कुळकर्णी कृष्णाजीपंत म्हणून कौशिक गोत्री, देशस्थ, आश्वलायन शाखी ब्राह्मण होते.  त्यांचे कल्याणस्वामी हे वडील पुत्र होत.  यांचा जन्म शके १५४० त झाला.  यांचें मूळचें नांव अंबाजी होतें.  यास एक दत्तात्रय नांवाचा धाकटा भाऊ होता.  अंबाजी व दत्तात्रेय हे दोन पुत्र झाल्यावर कृष्णाजीपंत काशीस निघून गेले.  नंतर अंबाजी, दत्तात्रेय व त्यांची मातोश्री यांस अंबाजीचे पाराजीपंत नांवाचे मामा यांनीं कोल्हापूर येथें आपल्या घरीं नेलें.  

पाराजीपंतांनीं या उभयता भाच्यांस चांगल्या रीतीनें वाढविलें.  पुढें कांहीं वर्षांनीं समर्थ फिरत फिरत कोल्हापुरास आले असतां, पाराजीपंताच्या मनांत त्यांचा अनुग्रह घेण्याचें आलें.  म्हणून त्यांनीं समर्थांस विनंति केली कीं, मला अनुग्रह देऊन पावन करावें.  समर्थ बरें आहे असें म्हणाल्यावरून सर्व सिद्धता करून त्यांनीं समर्थांनां आपल्या घरीं आणलें व अनुग्रह घेतला.

पुढें भोजनाच्या वेळचा पाट रांगोळ्या वगैरेंचा सारा बेत-बात पाहून समर्थांनीं पाराजीपंतास विचारलें कीं, हा सर्व बेत ठेवणारा तुमच्या घरीं कोण मनुष्य आहे ?  पाराजीपंतांनीं सांगितलें हा अंबाजी माझा भाचा, यानें ही सर्व व्यवस्था केली.  त्यावरून अंबाजीकडे समर्थांनीं पाहिलें, व भोजन झाल्यावर पाराजीपंतास म्हटलें कीं, हा तुमचा भाचा तुम्ही आमच्या सेवेकरितां द्यावा.  पाराजीपंत म्हणाले आपल्या सेवेस मी स्वतः हजर आहे.  पाहिजेतर मीच समागमें येतों.  परंतु या भाच्यावर माझी सत्ता नाहीं; कारण यास आई आहे.  समर्थ म्हणाले तिला विचारून द्या.  त्यावरून पाराजीपंतानें बहिणीस विचारलें; तिचा रुकार मिळाल्यावर त्यानें तत्काळ अंबाजीस समर्थांच्या स्वाधीन केलें.  याचें अक्षर पाहून समर्थांनीं त्याला स्वहस्तें कित्ता घालून दिला.  या कित्त्याप्रमाणें पुढें त्यानें वळण बनविलें.  या कित्त्यास देववाणी म्हणतांत,  तो अद्यापि कल्याणस्वामींच्या मठांत डोमगांवीं आहे.

एकदा समर्थ अंबाजीस बरोबर घेऊन निघाले ते सातारा जिल्ह्यांतील मसूर गांवीं आले. चैत्र महिना असल्यानें त्यांनीं तेथें रामनवमीच्या उत्सवास आरंभ केला.  पालखीच्या वेळीं पिंपळाच्या एका झाडाची फांदी आड आली.  त्यावेळीं समर्थांच्या मनांत आलें कीं, छबिन्याच्या वाटेवरील पिंपळाची ही फांदी तोडली असतां पालखीचा प्रतिबंध दूर होईल.  म्हणून त्यांनीं ती तोडण्यास अधिकार्‍याची परवानगी घेतली, आणि अंबाजीस झाडावर चढून ती फांदी तोडण्याची आज्ञा केली.  अंबाजी तत्काळ उठला व कुर्‍हाड घेऊन समर्थांच्या आज्ञेप्रमाणें फांदी तोडूं लागला.  समर्थांनीं सांगितलें कीं, फांदीच्या उलट बाजूस (झाडाकडील बाजूच्या विरुद्ध शेंड्याकडील) बसून झाड तोड.  त्याप्रमाणें अंबाजीनें केलें.  अर्थात फांदी तुटून खालीं पडली.  तेव्हां तिच्याबरोबर अंबाजीहि खालीं पडला.  फांदीच्या खालीं एक मोठी विहिर होती तींत फांदी व अंबाजी दोघेहि पडले.  ही गोष्ट झाली त्यावेळेस समर्थ तेथें नव्हते.  ते स्नानसंध्येस गेले होते.  इतर मंडळी मात्र होती.  परंतु विहिरींत उडी टाकून त्यास वर काढण्यास कोणाचेंच धैर्य होईना.  शेवटीं ही बातमी समर्थांच्या कानांवर जाऊन स्नानसंध्या आटोपतांच ते विहिरीपाशीं आले; व अंबाजीस ''अंबाजी'' अशा २।३ हांका मारल्या.  तेव्हां त्यानें आंतून ओ दिली.  त्यावर समर्थांनीं ''कल्याण आहेस कीं'' म्हणून वरून पुसलें तेव्हां ''समर्थांच्या कृपेनें कल्याण आहे'' असें त्यानें आंतून उत्तर दिलें.  नंतर त्यांनीं त्यास बाहेर काढविलें.  आणि ''आजपासून तुझें नांव कल्याण ठेवलें असें म्हणून तेव्हांपासून त्याला कल्याण या नांवानें हांक मारण्याचा पाठ ठेवला.

पुढें समर्थांनीं दासबोधास प्रारंभ केला असतां कल्याणांनीं त्याचें सर्व लेखन केलें.  समर्थांनीं ओवी सांगावी व यांनीं लिहावी असा क्रम असे.  समर्थांचे बहुतेक ग्रंथ कल्याणांनीं स्वहस्तें लिहिले आहेत.  सारांश हे समर्थांचे लेखक होते.  यांनीं दासबोध ग्रंथावर जी आरती लिहिली आहे तींत या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

कल्याणस्वामी हे परम गुरुभक्त होते.  मोरोपंतांनीं यांचें एका आर्येत हे भरताचे अवतार होत असें वर्णन केलें आहे.  समर्थांच्या शिष्यमंडळींत जे पहिले शिष्य उद्धव गोसावी त्यांच्या बरोबरीचे हेच एक होते.  यांची कविता व पदें पुष्कळ आहेत.  डोमगांव येथें यांनीं मठ स्थापिला होता.  तेथें यांच्या हातचा लिहिलेला दासबोध अजून आहे.  यांची गुरुसेवा मोठी वर्णनीय होती.  हे आजन्म ब्रह्मचारी होते.  यांची शक्ति अचाट होती.  यांच्या शरीरसंपत्तीचें अनुमान ज्यास करणें असेल त्यानें सज्जनगडावर जे तांब्याचे दोन मोठमोठे गुंडे (पाणी आणावयाचे) आहेत ते प्रत्यक्ष जाऊन पहावे म्हणजे तेव्हांच ध्यानांत येईल.  ते दोन गुंडे गडाखालील उरमोडी नदीच्या पाण्यानें भरून एकेका हाती एक एक घेऊन एका खेपेंतच गड चढून वर नेत असत.  समर्थांकरितां पिण्यास हें पाणी लागे.  डोमगांव सीना नदीच्या कांठीं आहे.  तेथें यांचा मठ आहे.  मठांत स्वामींची बनात, समर्थांची चंची, पादुका व त्यांनीं स्वामीस दिलेल्या राम, लक्ष्मण, सीता या मूर्ती आहेत.  स्वामी डोमगांवापासून पावकोसावर सीना नदीच्या कांठच्या एका कड्यावर रहात.  ते चार महिने परंड्यास, चार महिने डोमगांवास चार महिने डोणजे येथें देवीच्या देवळांत रहात.  त्यांचें देहावसान परंड्यास झालें (शके १६३६ आषाढशुद्ध १३).  तेथून वाजत गाजत त्यांच्या शिष्यांनीं त्यांचें शव डोमगांवीं आणिलें व हल्लीं त्यांची समाधी आहे तेथें तें दहन केलें.  समाधीचें मंदीर भव्य व रम्य आहे.  समर्थसमाधीच्या खालोखाल असें हेंच काम आहे.  हें मंदिर स्वामींनीं समाधी घेतल्यानंतर ५९ वर्षांनीं बांधल्याबद्दलचा शिलालेख तेथें आहे.  खुद्द समाधीवर पांचहि बाजूंवर पांच शिलालेख आहेत.  कल्याण स्वामी हे आजन्म ब्रह्मचारी असल्यामुळें येथील गादीची शिष्यपरंपरा ब्रह्मचार्‍यांची शके १८२६ सालापर्यंत होती.  शाहु महाराजांच्या महाराणी सकवारबाई यांनीं कल्याणांचे शिष्य मुद्‍गलस्वामी यांचा उपदेश घेऊन मठाला अडीच हजारांचें इनाम दिलें होतें.  कल्याण स्वामीनीं बराच शिष्यसंप्रदाय केला असून त्या शिष्यांचे मठ या प्रांतांत बरेच आहेत.  यांनीं सालेविसुख, शुक्राख्यान व पदें, अभंग, आरत्या, भूपाळ्या वगैरे त्रुटित काव्य बरेंच केलें आहे.

यांचे भाऊ दत्तात्रय म्हणून जे वर सांगितले तेहि समर्थांचे शिष्य झाले होते.  त्यांचा मठ सातारा तालुक्यांतील शिरगांव येथें आहे.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .