प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कल्पसूत्रें, वैदिक -  वेदग्रंथांच्या षडंगांपैकी एक अंग.  यांचा तैत्तिरीय आरण्यकांत उल्लेख आढळतो.  (१.३१:२ १०) कल्पसूत्रें म्हणजे श्रौत व स्मार्त कर्माचे प्रयोगग्रंथ होत.  कल्प या शब्दावरून पूर्वी ब्राह्मण अथवा आरण्यक ग्रंथांचाच बोध होत असावा असें दिसतें.  कारण तै. आरण्यकांत (१.३१) पूर्वी कांहीं मंत्र असून त्यापुढें 'अतऊर्ध्वं कल्पः' असा उल्लेख आहे.  यावरून त्याकालीं कल्प व ब्राह्मणें हीं एकत्रच असून मंत्राशिवाय कल्परूपानें प्रयोगग्रंथ स्वतंत्र तयार होणें ही पुढील पायरी दिसते.  तै. अरण्यकांत ब्रह्मयज्ञ प्रकरणांत कल्पाचा उल्लेख आहे.  (२.१०) परंतु तेथें नुसता कल्प असाच शब्द आहे.  यांनां कल्पसूत्रें हें नांव हे प्रयोगरूप झाल्यानंतर मिळालें असावें.  पाणिनीच्या शिक्षेंत (८, ४), कल्प हे वेदपुरुषाचे हात होत असें म्हटलें आहे.  कल्पसूत्रें हीं वेदग्रंथांच्या प्रत्येक शाखेचीं श्रौत व स्मार्त अशीं वेगवेगळीं आहेत.  त्यासंबंधी माहिती त्या त्या सूत्रनामाखालीं सांपडेल.

जैन कल्पसूत्र -  ज्याला सामान्यतः जैनांमध्यें कल्पसूत्र म्हणून समजतात तें स्थविरावली, जिनचरित व पज्जोसवणाकप्प असे तीन भाग मिळून झालेलें आहे.  परंतु या तीन भागांनीं मिळून कल्पसूत्र हें नांव देणें युक्त नव्हे.  कारण यांपैकीं तिसर्‍यांतच फक्त संन्यासासंबंधीं वर्णन आलेलें आहे.  कल्प म्हणजे आचरण असा अर्थ असल्यामुळें ज्यांत संन्याशांच्या आचरणाविषयीं नियम दिले आहेत त्यासच कल्पसूत्र म्हटलें पाहिजे.  म्हणून पज्जोसवणाकप्प हेंच खरें कल्पसूत्र होय असें एक मत आहे.  यांत जैन यती व जोगिनी यांनीं कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या करूं नयेत याविषयीं नियम दिले आहेत.  ज्याला कल्पसूत्र म्हणून म्हणतात तें भद्रबाहूनें केलें आहे अशी साधारणतः समजूत आहे. पण हा समज चुकीचा आहे.  भद्रबाहु फार झालें तर पज्जोसवणाकप्पाचा कर्ता, किंवा फार तर संपादक असूं शकेल.  भद्रबाहूनेंच कल्पसूत्रावर नियुक्ति लिहिली.  ख्रिस्ती शकाच्या सहाव्या शतकांत संघदासानें त्यावर भाष्य लिहिलें व त्यानंतरहि त्याच्यावर कित्येक टीका लिहिल्या गेल्या.  कल्पसूत्राचा सारांश पुढें दिला आहे.

प्रथम परिच्छेद :-  जोग्यांनीं किंवा जोगिणींनी बिन फोडलेल्या अपक्ब ताडफळाची भिक्षा ग्रहण करूं नये.  जोगिणींनीं न फोडलेल्या पक्व ताडफळांचीहि भिक्षा वर्ज्य करावी; फोडलेलीं पक्क फळें मात्र शास्त्राज्ञेप्रमाणें त्यांनां घेतां येतात.  गांवाबाहेर वस्ती नसल्यास जोग्यांनीं त्या गांवांत एक महिना रहावें, पण वस्ती असल्यास एक महिना गांवांत व एक बाहेर असे दोन महिनें तेथें रहावें.  गांवांत असतांनां गांवांत, व बाहेर असतांना बाहेर भिक्षा मागावी.  जोगिणीकरितां मात्र या मुदती अनुक्रमें दोन व चार महिने अशा आहेत.  हा नियम उन्हाळा व हिंवाळा या दोन ॠतूंकरितांच आहे.  जाण्यायेण्यास एकच मार्ग असल्यास जोगी व जोगिणी यांनीं एकाच घरांत राहूं नये.  जोगिणींनीं भररस्त्यावर किंवा दुकानासारख्या सार्वजनिक ठिकाणीं राहूं नये.  जोग्यांनीं किंवा जोगिणींनीं जलाशयाच्या काठीं उभें राहूं नये, बसू नये, किंवा दुसरे कोणतेहि व्यवहार करूं नयेत.  त्यांनीं कुटुंबवत्सल माणसाच्या घरांत राहूं नये.  ज्या घरांत बायका नसतील त्या घरांत जोग्यांनीं रहावे व ज्या घरीं पुरुष नसतील त्या घरीं जोगिणींनी रहावें.  घरवाल्यांची संमति घेतल्याशिवाय देखील जोग्यांस एखाद्या घरीं राहतां येतें.  एखाद्या जोग्याच्या हांतून एखादी चूक झाली असली तरी दुसर्‍या जोग्यानें शक्यतोपावेतों त्याच्याशीं सामोपचारानेंच वागावें; आपल्या मनाची शांति ढळूं देऊं नये.  जोग्यांनीं पावसाळ्यांत पर्यटण करूं नये.  त्यांच्या पर्यटणाची मर्यादा पूर्वेस अंगमगध, दक्षिणेस कौशांबी, पश्चिमेस स्थूणा व उत्तरेस कुणाल ही आहे.  या मर्यादेबाहेरहि जेथें जैनधर्माचा प्रचार असेल तेथें त्यांनीं जावें.  त्यांनीं रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या वेळीं भिक्षा ग्रहण करूं नये किंवा रस्त्यात भटकू नये.

द्वितीय परिच्छेद :-  ज्या घरांत धान्यादि वस्तू इकडे तिकडे पसरलेल्या असतील तेथें जोग्यांनीं किंवा जोगिणींनीं क्षणभरहि राहूं नये.  धान्य चांगल्या रीतीनें सांठवून ठेवलें असल्यास मात्र रहावयास हरकत नाहीं.  आपण ज्याच्या घरीं राहतों त्याच्या येथील भिक्षा त्यांनीं ग्रहण करूं नये.  त्यांनीं कपडे वापरावयाचें तें उंटाचे केस, ताग, सण, लोंकर किंवा तिरीट यांचे केलेले असावेत.

तृतीय परिच्छेद :-  जोग्यांनीं जोगिणींच्या किंवा जोगिणींनीं जोग्यांच्या घरांत पाऊल देखील ठेऊं नये.  जोगी किंवा जोगिणी यांनीं उंचीं व धडकीं अशीं वस्त्रें वापरूं नयेत.  भिक्षा मागावयाच्या वेळीं कोणाच्या घरांत शिरूं नयेः बाहेर उभें राहूनच भिक्षा मागावी.  एखादा म्हातारा व अशक्त जोगी असला व तो मूच्र्छा येऊन पडण्याच्याच बेतांत असला तर त्यानें मात्र घरांत शिरावें.  एका ठिकाणाहून भिक्षा घेऊन कांहीं जोगी निघाले व त्याच दिवशीं जर तेथें दुसरे जोगी आले, तर पहिल्या ठिकाणीं त्यांनां पुन्हा भिक्षा मागतां येत नाहीं.  भिक्षा मागावयास निघाले असतां जर जोग्यांस सैन्याची छावणी लागली तर त्यांनीं रात्र पडण्यापूर्वी तेथून निघालें पाहिजे.

चतुर्थ परिच्छेद :-  जोग्यांनीं किंवा जोगिणींनीं पहिल्या प्रहरांत भिक्षा मागून आणलेलें अन्न चवथ्या प्रहरापर्यंत ठेऊं नये किंवा अर्ध्या योजनापेक्षां अधिक अंतरावर त्यांनीं आपल्याबरोबर अन्न नेऊं नये.  वर सांगितलेल्या कारणामुळें जर एखाद्या वेळीं अन्न निरुपयोगी झालें किंवा भिक्षा मागत असतांनाच जर अपवित्र अन्न मिळालें, तर तें स्वच्छ करून एका बाजूला चांगल्या जागी ठेऊन द्यावें.  जर एखाद्या जोग्याच्या हातून कांही चूक झाली तर त्यानें गुरूपाशीं जाऊन आपला आपराध कबूल करावा.  प्रायश्चित्त घेणार्‍या जोग्यानें स्वतः भिक्षा मागतां कामा नये.  त्याच्या गुरूनें त्याला रोज एकाच घरची भिक्षा आणून द्यावी.  जो प्रायश्चित्त घेणार नाहीं त्याला वाळींत टाकावें.  कोणाहि जोग्यानें किंवा जोगिणीनें गंगा, यमुना, शरयू, कोषिका व माही या पांच नद्या एका महिन्यांत एकापेक्षां अधिक वेळां ओलांडूं नये.  परंतु अजिरावती व कुणाला या सारख्या ठिकाणीं जेथें एक पाय पाण्यांत व एक पाय जमीनीवर ठेऊन नदी ओलांडतां येते तेथें मात्र ती अधिक वेळां ओलांडण्यास हरकत नाहीं.

पंचम परिच्छेद :-  जर एखाद्या जोग्याच्या किंवा जोगिणीच्या तोंडांत सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर न कळत घांस गेला, किंवा रात्रीच्या वेळीं घशाशीं अन्न आले तर तें न गिळतां थुंकून तोंड धुवून टाकावें; म्हणजे पाप लागणार नाहीं.  भिक्षापात्रांत जर एखादा जिवंत किडा किंवा मातीचा कण पडला व तो जर धुवून टाकतां आला तर तें अन्न जोग्यास किंवा जोगिणीस खाण्यास हरकत नाहीं.  जोगिणीनें कधींहि एकटे राहूं नये किंवा कोठें एकटे जाऊं नये.  तिनें आपलें अंग उघडें टाकुं नये किंवा कोणतेंहि अमर्याद वर्तन करूं नये.  संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळीं जर एखादी जोगीण मलमूत्रोत्सर्गास गेली; व त्या समयी एखाद्या प्राण्याचा तिनें आपल्या इंद्रियास स्पर्श होऊं दिला, तर तिच्या पावित्र्याचा भंग झाला असें होऊन, तिला प्रायश्चित्त घ्यावें लागेल.

षष्ठ परिच्छेद :-  जोग्यांनीं किंवा जोगिणींनीं खोटें बोलूं नये, कोणाला हांसूं नये, कोणाचा आपमान करूं नये, कोणाला कठोर बोलूं नये, किंवा ज्या गोष्टींबद्दल कोणी एकदां प्रायश्चित्त घेतलें असेल तिचा उल्लेख करूं नये.  मोठ्या संकटसमयीं जर कोण्या जोग्यानें जोगिणीस आधार दिला तर त्यास पाप लागत नाहीं.  जोगी व जोगिणी यांनी सद्वर्तनाच्या आड येणार्‍या लोकांचीं संगत टाळावी.  (इं. अॅं. पु. ३९).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .