प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कल्पनासाहचर्य -  कल्पनासाचर्य हें तत्व, तत्वज्ञान व मानसशास्त्र या दोहोंतहि आढळतें.  तत्वज्ञानामध्यें इंद्रियांस ज्या निरनिराळ्या संवेदना होतात त्यांपासूनच सर्व ज्ञान प्राप्‍त होतें अशी जी एक उपपत्ति आहे.  तीमध्यें या तत्वाचा उपयोग केलेला आढळतो. मानसशास्त्रामध्यें एखाद्या वस्तूचें प्रत्यक्ष ज्ञान झालें असतां त्यामुळें जें मागील अनुभवाचें स्मरण होतें त्या क्रियेस हा शब्द लावतात.  अशा तर्‍हेचे तीन साहचर्य नियम दिलेले आढळतात, (१) सान्निध्य; प्रत्यक्ष पाहिलेली वस्तु ज्या वस्तूच्या सन्निध पूर्वी पाहिलेली असेल त्या वस्तूची आठवण करून देते.  उदा. एखादा आपल्या गांवाकडील मनुष्य आला म्हणजे आपणांस आपल्या गांवाकडचें स्मरण होतें.  (२) साम्य; प्रत्यक्ष दिसत असलेली वस्तु तिच्यासारख्याच दुसर्‍या वस्तूचें स्मरण करून देते.  उदा. आपण एखाद्या मनुष्यास पाहिलें असतां त्याच्या सारख्याच चेहर्‍याच्या एखाद्या आपल्या ओळखीच्या माणसाची आठवण होते.  (३) विरोध; प्रत्यक्ष दिसत असलेली वस्तु तिच्याविरुद्ध असलेल्या दुसर्‍या वस्तूचें स्मरण करून देते.  उदा. एखाद्या मुळींच मूल नसलेल्या घरांत आपण गेल्यास मुलांनीं गजबजलेल्या अशा एखाद्या घराची आठवण होते.

हे साहचर्याचे नियम सर.  डब्ल्यू. हॅमिल्टन याच्या मतें अॅरिस्टॉटलमध्यें दिसून येतात.  अॅरिस्टॉटलनें स्मरणशक्तीचें विवेचन करतांना आपणास विस्मृत गोष्टीची पुन्हां आठवण कशी होते यासंबंधीं चर्चा केली आहे व तेथें या साहचर्याच्या नियमांचें मूळ सांपडतें असें हॅमिल्टनचें म्हणणें आहे.  प्लेटोनेंहि एखादी वस्तु पाहिल्याबरोबर आपणांस तेथें नसलेल्या दुसर्‍या वस्तूची आठवण होते इत्यादि गोष्टींचें विवेचन केलें आहे.  उदा. सतार पाहिल्याबरोबर ती वाजविणार्‍या प्रियतमेची तिच्या प्रियकरास आठवण होते.  यावरून त्यानें सदृश अथवा विसदृश गोष्टींवरून विशिष्ट गोष्टीचें स्मरण होतें असें विधान केलें आहे.  परंतु यासंबंधीं नियम त्यानें सांगितले नाहींत.  स्टोईक, एपिक्यूरियन व स्कूलमेन या तत्वज्ञानांतील संप्रदायांनीं कल्पनासाहचर्याचें तत्व मान्य केलें होतें पण त्यांनीं याविषयींच्या ज्ञानांत फारशी भर घातली नाहीं.

या तत्वासंबंधी उपपत्ति लावण्याचा पहिला प्रयत्‍न थॉमस हॉब्ज यानें आपल्या मानवीस्वभाव (ह्यूमन नेचर) या पुस्तकांत केला आहे.  त्यानें एका कल्पनेवरून आपणांस दुसर्‍या कल्पना एकामागोमाग कशा सुचत जातात हें दाखविलें आहे.  उदा. एखाद्या पांढर्‍या दगडापासून संगमरवरी दगडाची, त्यापासून ताजमहालाची, त्यापासून शहाजहानची इत्यादि कल्पना आपणांस सुचत जातात.  हॉब्जनें मानसशास्त्रांतील जो कल्पनासाहचर्याचा सिद्धांत तोच तत्वज्ञानांतीलहि सिद्धांत होय असें म्हणून या दोहोंची सांगड घालून दिली आहे.  तो म्हणतो अनुभव म्हणजे निरनिराळ्या गोष्टींचे स्मरण होय.  अर्थात सर्व ज्ञान हें स्मरणात्मकच आहे.  कारण तें प्रत्यक्ष इंद्रियांपासून मिळालेलें किंवा तेंच स्मरणांत राहिलेलें अशा स्वरूपाचें व अनुभवजन्य आहे.  त्याप्रमाणेंच मनुष्य आणि पशु यांत अंतर हेंच कीं मनुष्य आपल्या कल्पनांनां कांहीं तरी खुणा कल्पून त्या निश्चित करतो व अशा अनेक कल्पनांचें साहचर्य वाढवितो.  अशा तर्‍हेच्या निश्चित खुणा नसतील तर कल्पनेचा प्रवाह अखंड चालू रहाणार नाहीं असेंहि तो प्रतिपादितो.

कल्पनासाहचर्य यास अन्वर्थक शब्दयोजना 'असोसिएशनस् ऑफ आयडियाज' ही होय.  ही प्रथम जॉन लॉक यानें उपयोगांत आणिली.  परंतु या शब्दांनीं तो फक्त 'ज्या कल्पना स्वतः एकमेकांशीं सारख्या नाहींत त्यांचा संबंध' येवढीच गोष्ट दर्शवितो.  त्यानें याचा तात्विक किंवा मानसशास्त्रीय चर्चेत फारसा उपयोग केला नाहीं.

ह्यूमनें मात्र कल्पनासाहचर्याला तत्वज्ञानामध्यें बरेंच महत्व दिलें.  त्यानें केवळ स्मरणांतील गोष्टींचाच संबंध कल्पनासाहचर्यानें दाखविला जातो असें नव्हे तर कल्पनेंतील गोष्टींचाहि संबंध या तत्वानें दाखविला जातो असें प्रतिपादन केलें, व याचीं कारणें कल्पनांतील साम्य, सान्निध्य व कार्यकारणभाव हीं दिली (ट्रिटाइज ऑन ह्यूमन नेचर).

ह्यूमनें लॉकप्रमाणेंच ज्ञानाचें शुद्ध व मिश्र असें पृथक्करण केलें; परंतु त्यानें साहचर्याला बरेंच महत्व दिलें व या कल्पनासाहचर्यामुळेंच शुद्ध कल्पनांचें मिश्र कल्पनांत रूपांतर होतें असें दाखविलें आहे.  कार्यकारणभाव हाहि एक कल्पना साहचर्याचाच प्रकार आहे असें त्यानें प्रतिपादिलें.  तथापि त्यानें कल्पनासाहचर्याची तात्विक उपपत्ति लावण्याचा प्रयत्‍न केला नाहीं.  तो म्हणतो कीं ''या कल्पनासाहचर्याचे परिणाम सर्वत्र दिसून येतात; परंतु त्याचीं कारणें अज्ञात असून तो एक मनुष्यास्वभावाचाच प्रकार असावा यापलीकडे मला त्याचें स्पष्टीकरण देतां येत नाहीं.''

कल्पनासाहचर्याची उपपत्ति आपणांस प्रथम हार्टलेच्या ग्रंथांत (ऑबझरव्हेशन्स् ऑन मॅन) पहावयास सांपडते.  यानें मानसिक क्रियांचें विवेचन करून साहचर्याच्यामुळें शुद्ध मानसिक क्रियांचें मिश्र क्रियांत कसें रूपांतर होतें व स्मरणशक्ति हा त्यांतीलच एक विशिष्ट प्रकार कसा आहे हें विशद करून दाखविलें आहे.  यानें आपल्या मानसशास्त्रीय उपपत्तीचा इंद्रियविज्ञानशास्त्राशीं संबंध जोडिला आहे.  परंतु त्यामुळें त्याच्या मानसशास्त्रीय उपपत्तीकडे बर्‍याच तत्ववेत्यांनीं दुर्लक्ष्य केलें.  तथापि फ्रान्समध्यें कॉन्डिलॅक, स्कॉटलंड मध्यें थॉमस ब्राऊन, इंग्लंडमध्यें जे. एस. मिल यानीं या उपपत्तीचा पुरस्कार केला.  मिल आपल्या ज्ञानाच्या उपपत्तीमध्यें असें म्हणतो कीं इंद्रियापासून प्रत्यक्ष प्राप्‍त होणार्‍या ज्ञानाखेरीज इतर सर्व ज्ञान निगमनात्मक आहे.  म्हणजे विशिष्ट उदाहरणांपासून सामान्य नियम काढण्याच्या स्वरूपाचें आहे.  स्वतःसिद्ध असें सत्य कांहींच नाहीं.  ज्याला आपण सत्य म्हणतों ते आपले विशिष्टापासून काढिलेले सामान्य सिद्धान्त असतात.  गणितांतील स्वयंसिद्ध गोष्टींना जें आपण विशेष महत्व देतों त्याचें कारण त्या आपल्याला अतिशय परिचित अशा असतात हेंच होय.  एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध गोष्ट असण्याच्या कल्पनेची अश्यकता हें जें त्या गोष्टीच्या सत्यतेबद्दल गमक म्हणून नेहमीं समजलें जातें तेंच मुळीं त्या दोन कल्पनांतील 'निरंतर साहचर्य' अथवा समवायसंबंध दाखवितें.  ''त्यापैकीं एकाचें अस्तित्व असल्यास दुसरें त्यापासून विभक्त करण्याचा आपण कितीहि प्रयत्‍न केला तरी तें असणारच.'' (अॅनलिसिस् ऑफ ह्यूमन माइन्ड.)

अलेक्झांडर बेन यानें तर ''बुद्धीचें विवेचन करतांना तिचे निरनिराळ्या क्रियांत किंवा शक्तींत विभाग करण्याची पद्धत टाकून देऊन तिचें कार्य साहचर्याच्या नियमानेंच विशद करून दाखविलें आहे.  व त्याचीं निरनिराळीं उदाहरणें देऊन तें सुगम केलें आहे'' (सेन्सस् अॅन्ड इंटलेक्ट).  तथापि बेननें जरी साहचर्याची कल्पना घेऊनच मानसिक क्रियांचें विवेचन केलें आहे तरी त्यानें पुढें पुढें मानसशास्त्र हें पदार्थविज्ञानशास्त्राप्रमाणें जडवस्तूंचें शास्त्र न समजतां त्याला जीवितशास्त्राचा एक भाग-मानसजीविताचें शास्त्र- म्हणून कल्पिलें आहे व विकासवादास अनुसरून त्याचें विवरण केलें आहे.  अर्थात यावेळीं मानसशास्त्रास निराळीच दिशा मिळाली होती.

स्पेन्सर यानें आपल्या मानसशास्त्राचीं तत्वें (प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलाजी) या ग्रंथांत या सर्वांच्या मुळाशीं जीवितशास्त्राचींच तत्वें असून शरीर व मन यांच्या क्रिया ही जीवनकार्यांचींच विशिष्ट रूपें असून एकंदर जीवनकार्यांची कल्पना आली म्हणजे मानसिक जीवन अथवा बुद्धि या विशिष्ट शक्तीच्या कार्यांचा उलगडा होईल.  असें म्हटलें आहे.  जीवित म्हणजे बाह्यपरिस्थितीशीं अंतःपरिस्थितीचें सारूप्य करून घेंणें हेंच होय अशी स्पेन्सरनें जीविताची केली व्याख्या आहे.  यांत सारूप्य हें मुख्य तत्व आहे.  अर्थात पूर्ण ज्ञान म्हणजे विषय व विषयीं यांचें सारूप्य होय. संवेदनांचें साहचर्य त्यांतील साम्यावर अवलंबून असतें.  याप्रमाणें साहचर्यानें नवीन मिळालेलें ज्ञान त्यासारख्याच पूर्वीच्या ज्ञानाच्या अनुभवांत सामील होतें व जुन्या सर्व ज्ञानाचा संग्रह होऊन नवीन गोष्टींत साधर्म्य व वैधर्म्य शोधून काढण्यास साधन होतें.

जर्मन तत्ववेत्यांपैकीं हर्बर्ट, वुंट आणि कुल्प यांचीं मतें हार्टले व मिल यांच्या मतांशीं बरींच जुळतात.

सध्याच्या मानसशास्त्रीय उपपत्तीमध्यें कल्पनासाहचर्य हें तत्व सर्व गोष्टींचा उलगडा करण्यास पुरेसें मानीत नाहींत.  तथापि प्रो. सली यांच्या ग्रंथांत जरी अर्वाचीन पद्धत व शोध यांचा स्वीकार केलेला दिसतो तरी मानसिक क्रियांमध्यें साधर्म्य-वैधर्म्य-निरीक्षण व सात्मीकरण यांच्याबरोबरच कल्पनासाहचर्याला स्थान दिलेलें आढळतें व या शेवटच्या क्रियेनें स्मरणांत राहण्याची व पुनर्दर्शनाची क्रिया होते, व त्यामुळें निरनिराळ्या वेळीं होणार्‍या क्रिया एकत्र बद्ध केलेल्या आढळतात असें त्यानें प्रतिपादन केलें आहे.

वॉर्ड आणि स्टाउट यांनीं ही जुनी पद्धत अजीबात सोडून दिली आहे.  वॉर्डच्या मतें आपणांस ज्या संवेदना होतात व आपण ज्या क्रियांचा अवलंब करतो त्यांमुळेंच निरनिराळ्या संवेदनांचें एकीकरण होतें.  ज्या संवेदनापासून आपणाला सुख होतें त्याजकडे आपण जास्त लक्ष पुरवितों व दुःख होतें.  त्याजकडे कमी लक्ष पुरवितो व तद्‍नुरूप आपण क्रिया करतों, व एकीचें ग्रहण करतो व दुसरी टाकून देण्याचा प्रयत्‍न करतो. याप्रमाणें आपण निवड करण्याची क्रिया प्रथम स्वाभाविकपणें करतों व पुढें त्या त्या विषयानुरूप करतों.  याप्रमाणें ज्ञानसंचय होतो व कल्पनासाहचर्य हें फक्त या क्रियेचें एक उदाहरण आहे.  सान्निध्यमूलक साहचर्याचें स्वतंत्रतेनें स्पष्टीकरण करणें अशक्य आहे.  याप्रमाणें विशिष्ट संवेदनेकडे कमीजास्त लक्ष देणें हीच जाणीव होय व यामुळेंच कर्ता कोणतीहि क्रिया करतो.

स्टाउटच्या मानसशात्रांतहि आपणांस जाणीव, साधर्म्य-वैधर्म्य-निरीक्षण, व सात्मीकरण यांचें एैक्य कल्पिलेलें दिसतें.  याप्रमाणें वॉर्ड आणि स्टाउट या दोघांच्याहि ग्रंथांत कल्पनासाहचर्य ही एक मानसिक प्रगतीच्या नियमांस अनुसरून, असलेली विशिष्ट क्रिया असून, तिच्यामुळें सर्व ज्ञानाचें स्पष्टीकरण होण्याऐवजीं तिचेंच स्पष्टीकरण मानसशास्त्रीय नियमांनीं करितां येतें.  असें प्रतिपादिलें आहे.

(संदर्भग्रंथ :-  हॅमिल्टन - वर्क्स ऑफ रीड; हॉब्ज -ह्यूमन नेचर; लॉक-एसे कन्सनिंग ह्यूमन अंडरस्टँडिंग; ह्यूम-ट्रिटाईज ऑन् ह्यूमन नेचर; हार्टले-आब्झर्व्हेशन्स ऑन् मॅन; ब्राऊन-लेक्चर्स ऑन् फिलासॉफी ऑफ ह्यूमन माईंड; मिल्ल-अॅनॅलिसीस ऑफ दि ह्यमन माइंड; बेन-सेन्सेस अॅड इंटलेक्ट : इमोशन्स अॅड विल् : स्पेन्सर - प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी; वुंड, कुल्प व प्रो. सली यांचे 'आउटलाईन्स ऑफ सायकॉलॉजी ' या नांवाचे ग्रंथ.  वॉर्ड- सायकॉलॉजी (ए.ब्रि.); स्टाउट:- ए मॅन्युएल ऑफ सायकॉलॉजी)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .