प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कलेवल -  अथवा कालेवाला हें फिनलंड देशाचें ऐतिहासिक महाकाव्य आहे.  ईलिअड, रामायण, महाभारत इत्यादि जीं कांहीं जगांतील नामांकित महाकाव्यें आहेत त्यांमध्ये याची गणना मॅक्समुल्लरसारख्या पंडितांनीं केली आहे.

फिनलंडमधील लोक जुन्या ऐतिहासिक पोवाड्यांचे फार हौशी असल्यानें त्यांच्या तोंडात हे पोवाडे नेहमी असतात.  अशा प्रकारचे ऐतिहासिक पोवाडे एके ठिकाणीं जमविण्याची कल्पना एलियस लून्रॉट नांवाच्या एका माणसाला सुचली; व त्याप्रमाणें त्यानें १८३५ सालीं असे पोवाडे व काव्यें एकत्र करून दोन भागांत प्रकाशित केले.  या संग्रहाला त्यानें 'कलेवल' हें नांव दिलें.  या संग्रहाचें त्यानें प्रथमतः २५ रूनो अगर सर्ग पाडले होते.  पण पुढें त्यानें तो काव्यसंग्रह वाढवून त्याचे ५० सर्ग पाडले.  ही सुधारून वाढविलेली आवृत्ति त्यानें १८४९ मध्यें प्रकाशित केली.  हा काव्यसंग्रह एकत्र करण्याकरितां लुन्रॉटला फारच परिश्रम करावे लागले.  फिनलंडच्या सर्व भागांतील सर्व प्रकारच्या लोकांमध्यें जाऊन त्यांच्या तोंडून हा काव्यें व गाणी म्हणून घेऊन नंतर ती त्यानें एकत्र केली.  'कलवेल' शिवाय त्यानें इतरहि काव्यसंग्रह अगर एकक स्वतंत्र काव्य छापले पण 'कलेवल' हें ऐतिहासिक असें प्रमुख काव्य होय.  या संग्रहांत त्यानें फिनिस लोकांतील ऐतिहासिक काव्यें, दंतकथा, वीरांच्या स्तुतिपर काव्यें, कल्पित काव्ये, भावगीतें व चेटुकगीतें या सर्वांचा समावेश केला आहे व अशा प्रकारच्या निरनिराळ्या साधनांचा उपयोग करतांना या मोठ्या काव्यांत सूत्रबद्धता ठेवण्याची त्यानें शक्य ती खबरदारी घेतली आहे.

मूळकाव्य -  कलेवल याचा अर्थ 'वीरांची जन्मभूमी' असा आहे.  फार प्राचीन काळीं फिनलंडमध्यें, कलेव नांवाचा एक सर्वगुणसंपन्न असा वीर होऊन गेला.  त्यानंतरचे जे वीरपुरुष निर्माण झाले ते कलेवानेंच निर्माण केले अशी फिन लोकांची समजूत आहे.  अर्थातच कलेवानें उत्पन्न केलेल्या अशा कांहीं वीर पुरुषांची-हकीकत यात लून्रॉटनें गुंफिली आहे.  या सर्व महाकाव्यांत खुद्द कलेवाचा असा एकदाहि उल्लेख आलेला नाहीं.  कलेवाची मुलगी कलेवतर व कलेवाचा एक वंशज कलेवलैनेन यांचे मात्र उल्लेख आलेले आहेत.

स्वरूप -  'कलेवला'त व्हाइनामोइनेन, इल्मरिनेन, लेम्मिनकैनेन व कुल्लेर्व्हो या चार शूर पुरुषांचा वृत्तांत आलेला आहे.  व्हइनामोइनेन हा वारा व त्याची मुलगी इल्टर यांच्यापासून झालेला असून तो विद्यासंपन्न कवि व वीर पुरुष असा दाखविण्यांत आला आहे.  इल्मरिनेन हा व्हाइनामोइनेनचा सावत्र भाऊ असून त्याची आई ही मानव जातींतली होती.  तो मोठा कसबी असून फार सुस्वरूप होता असें या काव्यसंग्रहावरून दिसून येतें.  लेम्मिनकैनेन हा रंगेल व अविचारी तरुण असून तो आपल्या अविचारी साहसानें अनेक वेळां विघ्नांच्या भोंवर्‍यांत सांपडतो.  पण त्याला मंत्रविद्या अवगत असल्यानें तिच्या जोरावर अगर त्याच्या आईच्या सहाय्यानें तो या विघ्नांच्या तडाक्यांतून सुटलेला आहे.  जाज्वल्य मातृभक्ति हा त्याच्या अंगांतील मोठा गुण होता.  व त्यामुळें त्याच्या इतर दुर्गुणांवर थोडेसें पांघरूण पडलेलें आहे.  त्याला कौकोमेली असें दुसरें नांव आहे.  कुर्लेव्हो हा दुर्मुखलेला, दुष्ट पण राक्षसी शक्तीचा असा दाखविला गेला आहे.  आपल्या प्रचंड शक्तीचा तो नेहमीं दुरुपयोग करतो.  फिनिश लोकांतील एस्थोनियन जातीच्या लोकांत त्याच्यावर पुष्कळ काव्यें रचलेलीं आढळतात.  त्या काव्यांत त्यास कलेवाचा मुलगा असें म्हटलें आहे.  कलेवलमध्यें तो एका जातीचा मुख्य होता असें म्हटलें आहे.  या चारी वीरांचयासंबंधीं एक गोष्ट लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे व ती म्हणजे या चारी वीरांनां मंत्रविद्येचें ज्ञान असे.  आपल्या मंत्रसिद्धीच्या बळावर ते देवांनां देखील वश करूं शकत.  एखाद्या विघ्नापासून आपलें रक्षण करून घ्यावयाचें झाल्यास त्या विघ्नाचें मूळ, त्याची वाढ इत्यादि सांगितलें कीं, ते विघ्न दूर होत असे अशा प्रकारचें वर्णन यांत आलेलें आहे.

या काव्यांतील प्रमुख नायिका म्हणजे इल्मटर, मर्जट्टा, ऐनू, लौही व तिची मुलगी या होत.  इल्मटर ही या जगाची जननी होय.  ऐनू ही लॅप जातीची एक सुंदर तरुणी असून तिच्यावर आलेले दुःखाचे प्रसंग फारच हृदयस्पर्शी आहेत.  हिच्यावर व्हाइनामोइनेनचें प्रेम असतें.  लौही ही फिनलंडचा उत्तर भाग जो पोहोजोल त्याची स्वामिनी असते.  तिच्या मुलीशीं इल्मरिनेन याचा विवाह होतो.  या मुलीचा स्वभाव कांहीं वेळां फार सरळ व निष्कपटी तर कधीं दुष्ट व निर्दय व कांहीं प्रसंगीं भित्रा व भोळसर असा दाखविलेला आहे.  या एकाच गोष्टीवरून कलेवलांतील काव्यें एकाच्या हातचीं नसून अनेकांच्या हातचीं आहेत.  हें निर्विवाद सिद्ध होतें.

कथानक -  इल्मटरनें व्हाइनामोइनेनला उत्पन्न केल्यानंतर तो आपल्या वयाला पुष्कळ वर्षे होईपर्यंत आपल्या जन्मभूमीची चांगली मशागत करून आपला देश संपन्न करतो.  त्याचें ऐनू नांवाच्या एका मुलीवर प्रेम बसतें.  पण असल्या वृद्ध मनुष्याशीं लग्न करण्याचें तिला वाईट वाटून ती एका सरोवरांत जीव देते.  पण त्या सरोवरांत उडी मारतांच तिचें माशांत रुपांतर होतें.  ही गोष्ट व्हाइनमोइनेनला कळतांच त्या सरोवरांत मासे धरण्याकरितां तो जातो पण ती त्याच्या जाळ्यांत न सांपडता 'तुझ्याशीं मी लग्न करणार नाहीं' असें सांगते.  यामुळें तो वेडा होतो पण त्याच्या आईनें पोहजोल येथील सुंदर मुलींपैकीं एकीशीं विवाह करण्यास सांगितल्यामुळें तो तिकडे जातो.  त्या प्रदेशाची स्वामिनी जी लौही ही त्याला एका अटीवर आपली सुंदर मुलगी द्यावयाचें कबूल करते.  ती अट म्हणजे सँपो नांवाची एक गूढ वस्तु तिला मिळवून देणें ही होय.  ही वस्तु प्राप्‍त करून देण्याचें काम त्यानें आपल्या भावाकडे सोंपविलें.  इल्मरिनेन हा हरप्रयत्‍नानें ती गूढ वस्तु मिळवितो व लौहीपाशीं तिच्या कन्येची मागणी करतो; पण ती मुलगीच स्वतः त्याच्याबरोबर लग्न करण्याचें नाकारतें.  नंतर लोमिनकैनेन हा लौहीच्या मुलीला मागणी घालतो.  पण लौही त्याला कांहीं अवघड गोष्टी करावयास सांगते व त्यांतच तो मारला जातो.  पण पुढें तो पुन्हां जिवंत होतो.  पुढें व्हाइनामोइनेन व इल्मरिनेन हे दोघेहि पुन्हां लौहीच्या मुलीकडे येतात व आम्हां दोघांपैकी तुझ्या पसंतीस येईल त्याला वर असें सांगतात.  ती कांहीं अवघड अटी घालते, त्या इल्मरिनेन पार पाडतो.  व ती त्याला वरते.  पुढें त्यांचा विवाह मोठ्या थाटानें पार पडतो.  या समारंभाला लोमिनकैनेन याला आमंत्रण नसल्यानें त्याला फार राग येतो.  त्यामुळें तो त्या ठिकाणीं रागानें येतो, लौहीच्या नवर्‍याला ठार करतो व पुन्हां आपल्या देशाला पळून जातो.  कांहीं काळानंतर तीरा नांवाच्या आपल्या मित्राच्या सहाय्यानें पुन्हां तो पोहोजलवर स्वारी करण्याकरितां जातो.  पण त्यांत त्याचा पराभव होतो.  कुल्लेर्व्हो नांवाचा एक गुलाम इल्मरिनेनजवळ असतो.  इल्मरिनेनची बायको म्हणजे लौहीची मुलगी ही त्याला फार वाईट तर्‍हेनें वागविते.  व त्यामुळें तो तिला वाघ, लांडगे इत्यादिकांच्या भक्ष्यस्थानीं टाकून देतो व आपण जंगलांतून मार्ग काढीत आपल्या पूर्वीच्या घराकडे येतो.  पुढें त्याच्या आईच्या उपदेशावरून तो त्याचा बाप उंटाभो याच्याकडे जाऊन त्याला व त्याच्या लोकांनां ठार मारतो व पुन्हां आपल्या गांवाकडे येतो.  पण एवढ्या अवधींत त्याच्या गांवचे सर्व लोक मेलेले असतात.  त्यामुळें तो वैतागून रानावनांत भटकतो व आपल्याच तरवारीला बळी पडतो.  पुढें इल्मरिनेन हा लौहीच्या दुसर्‍या मुलीशीं लग्न करतो पण तिचें व त्याचें पटत नाहीं.  शेवटीं व्हाइनामोइनेन, इल्मरिनेन व लोमिनकैनेन हे तिघे संगनमत करून पोहजोलवर स्वारी करण्यासाठीं - सँपो हस्तगत करण्यासाठीं - निघतात.  पण लौही ही त्यांचा पाठलाग करीत असतां सपोतिच्या हांतून पाण्यांत पडते.  व्हाइनामोइनेनला ती सांपडते व तिच्या योगानें तो कलेवल देश समृद्ध व संपन्न बनवितो.  लौही ही त्या देशावर अनेक आपत्ती आणते पण व्हाइनामाइनेनच्यापुढें तिचें कांहीं एक चालत नाहीं.  पुढें मर्जट्टा हिला मुलगा होऊन तो करेलियाचा राजा होतो.  हें व्हाइनामोइनेनला न खपून तो कलेवल देश सोडून निघून जातो.  पण भावी प्रजेसाठीं तो आपली वीणा व गाणीं शिल्लक ठेवतो.

गुणदोष विवेचन :-  या कथानकांतील मुख्य दोष म्हणजे त्यांत असावी तितकी सूत्रबद्धता नाहीं; पण त्यांत लून्रॉटकडे कांहींच दोष येत नाहीं.  या कथानकांत अवांतर अशा इतर पुष्कळ गोष्टी आल्या आहेत व त्यांमध्यें फिनिश लोकांतील तत्कालीन चालीरीतींचें प्रतिबिम्ब पडलेलें दिसतें.  या सर्व कथानकाच्या मुळाशीं 'चांगलें विरुद्ध वाईट' यांचा झगडा दिसून येत असून त्यांत शेवटीं सत्याचा अगर चांगल्याचा जय होतो असें दाखविलें आहे.  मर्जट्टासंबंधींचा मजकूर हा या कथानकाशीं असंबद्ध असा आहे व तो वगळला असतां काव्याची कोणत्याहि प्रकारें हानी होत नाहीं.  हें कथानक रंगवितांना जे कांहीं प्रसंग निर्माण करण्यांत आले आहेत त्यांपैकीं कांहीं सुंदर व सहजमनोहर आहेत. उदाहरणार्थ, व्हाइनमोइनेनसारख्या वृद्धाशीं लग्न लावण्याचा तिच्या आईचा आग्रह असतां ऐनूच्या मनाची काय स्थिति झाली याचें वर्णन मनाला चटका लावतें.  लौहीच्या मुलीचा इल्मरिनेनशीं विवाह झाल्यानंतर ती जेव्हां सासरीं जावयास निघते तेव्हां तिला सासरीं कसें वागावें यासंबंधीं करण्यांत आलेला उपदेश शाकुंतल नाटकांतील कण्वानें शकुंतलेला केलेल्या उपदेशाइतका उदात्त नसला तरी वाचनीय आहे यांत शंका नाहीं.  याशिवाय आणखीहि कित्येक मनोहर प्रसंग या काव्यांत आढळतात.  या काव्यांत तींच तींच वाक्यें पुन्हां पुन्हां पुष्कळ वेळां आलीं आहेत.  इतर प्राचीन महाकव्यांतहि अशाच प्रकारचे पुनरुक्तीचे दोष आढळून येतात.  कांहीं ठिकाणीं ही पुनरुक्ति योग्य असते.  पण पुष्कळ ठिकाणीं ती कंटाळवाणीच होते असें म्हणावयास हरकत नाहीं.  (डल्ब्यु एफ कर्बी - कलेवल (एव्हरी मॅन्स लायब्ररी)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .