प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कलुशा - हा काश्मिरी  ब्राह्मण असून याचें मूळचें नांव 'कब कलस' असें होतें.  हा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर व संभाजीच्या राज्यारोहणापूर्वी थोडे दिवस दक्षिणेंत आला.  हा साधारण योग्यतेचा होता.  याला मंत्र, तंत्र, जादू, टोणे करण्याची कला अवगत असून हा वाममार्गीहि होता.  असल्या प्रकारच्या लोकांस दुसर्‍यावर छाप बसविण्याची कला नैसर्गिकच असते.  विशेषतः एखादा मनुष्य संकटांत सांपडलेला पहातांच हीं वाममार्गी माणसें आपल्या 'शाक्त' शक्तीचा परिणाम त्याच्यावर तेव्हांच करूं शकतात.  देव्युउपासक भोसल्यांच्या कुळांतील संभाजीच्या धर्मनिष्ठ भोळ्या मनावर, राज्यारोहणप्रसंगीं जे अनेक शकुनापशकुनांचे अनिष्ठ परिणाम झाले, त्यावेळीं संभाजीच्या उग्र प्रकृतीला त्याच्या राज्य चालविण्याच्या कामास अर्थातच याचा उग्रस्वरूपी सल्ला अधिकच मानवला.  या प्रकारे संभाजी हा या 'आदिशक्ति' उपासक 'शाक्ताच्या' शक्तीच्या गवसणींत सांपडला.  जर कोणी माणूस त्यावेळीं त्याला महाराष्ट्रांत हितकर असा वाटला असेत तर तो हा कलुशा होय.  संभाजीनें याला कांहीं महिने जवळ बाळगिलें होतें.  कारण ज्यावेळीं फितुरी व फुट यांचाच अंमल राज्यांत (पहिल्या १०-१२ महिन्यांत) बसला होता.  त्यावेळीं संभाजीला कोणावर विश्वास ठेवावा हेंच समजेनासें झालें होतें.  अर्थातच प्रत्येक मनुष्याचा कोणावर ना कोणावर तरी विश्वास असावयाचा या न्यायानें त्याचा विश्वास या परदेशीय व वयस्क कलुशावर बसला.  कलुशावर जरी संभाजीचा विश्वास बसला होता, तरी तो त्याची किंमत जाणून होताच.  त्यानें त्याला कधींहि 'पेशवे' किंवा 'पंडितराव' किंवा अष्टप्रधानांतील कोणतेंहि एखादें प्रधानपद दिलें नाही.  फक्त त्याला कांहीं तरी अधिकार देणें प्राप्‍त होतें म्हणून 'छंदोगामात्य (म्हणजे सामवेदाध्यायी अर्थातच सामवेदी म्हणजे मंत्रप्रयोजक ब्राह्मणांची व्यवस्था करणारा अधिकारी) असें एक नवेंच पद दिलें.  मात्र कलुशाचा संभाजीशीं निकट सहवास असल्यामुळें व त्यानें स्वतःच आपल्या राजाजवळील वजनाचा स्वार्थपरायणतेनें जास्त गवगवा केल्या कारणानें लोकांनां त्याचें भय व वचक वाटूं लागला.  तसेंच संभाजीच्या विरुद्ध (सोयराबाईच्या) बाजूंतील लोकांनां व तटस्थ वृत्ति ठेवून राहिलेल्या सर्व कर्त्या मंडळींनां आपल्या कृतकर्माबद्दल संकोच वाटल्यामुळें तीं आपलीं सर्व कामकाजें या त्रयस्थ कबजीबावा कडूनच करून घेऊं लागलीं.  त्यामुळें या बावांचें प्राबल्य जसें लोकांत निष्कारण अधिकाधिक वाढूं लागलें, तसेंच संभाजीजवळहि कोणीच मनमोकळेपणानें बोलेनासा झाल्यामुळें संभाजीलाहि कबजीशिवाय विश्वासार्ह असा कोणीहि दिसेनासा झाला.  शिवाय संभाजीची कारकीर्द सुरू होतांच  मराठ्यांच्या राज्यास मूठमाती देण्याची प्रतिज्ञा करून औरंगझेब मराठी राज्यासभोंवतीं धरणें धरून बसला होता.  त्यामुळें जीं कांहीं थोडीं माणसें कर्तृत्त्ववान होतीं तीहि या परचक्राच्या निवारणार्थ चार दिशेला पांगलीं गेलीं होतीं. त्यामुळें कलुशाला या सर्व परिस्थितीचा चांगलाच फायदा मिळाला, व त्यानें भिक्षुकी मामला सोडून देऊन तो राजकारणी पुरुष बनला.

महाडचे दादजी प्रभु यांनीं आपलें जंजिर्‍याचें कारस्थान कबजीच्या मार्फत संभाजीस समजाविलें व आपली जंजिर्‍याच्या स्वारीवर योजना करून घेतली.  परंतु कलुशाकडून वेळेवर मदत न पोहोंचल्यामुळें दादजीची फजीती होऊन तो परतला.  यापुढें ते दोघे एकमतानें कारस्थानें करूं लागले.  अशा प्रकारें संभाजीच्या सान्निध्यांत कलुशाचे सहा सात महिने जातात न जातात तोंच, औरंगझेबाचा लाडका मुलगा अकबर आपल्या बापावर यागी (रुसून) होऊन उत्तर हिंदुस्थानांतून संभाजीच्या आश्रयार्थ इ.स. १६८१ च्या मे महिन्यांत आला.  इतक्यांत संभाजीची बायको येसूबाई कलुशाचा द्वेष करूं लागली होती.  म्हणून अकबराचा बंदोबस्त आणि विशेषतः त्याच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्याकरितां म्हणून संभाजीनें कबजीबावास रायगडाहून दूर करून अकबराजवळ पालीस पाठविलें.  तेथें बावास अण्णाजी दत्तो व अकबर यांच्यामध्यें चाललेलें (अकबरास दिल्लीच्या तख्तावर व राजारामास मराठ्यांच्या राज्यावर बसविण्याचें) कारस्थान समजलें.  तेव्हां त्याची वर्दी त्यानें संभाजीस पोहोंचविली.  बावाला विशेषतः आपला जम बसवून वाढत चाललेली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास शिवाजी महाराजांच्या वेळची जुनी व कर्ती खोडें दूर करावयाची होतीं.  म्हणून त्यानें या गुप्‍त कटाची उग्रता अधिकच तीव्रतर भासविली.  शिवाय अकबरानेंहि भीतीनें त्या कारस्थानाबद्दल कबुली दिली.  तेव्हां संभाजीचें चित्त अधिकच खवळलें.  या कटाच्या स्फोटांत कलुशानें अण्णाजी दत्तो, महादजी अनंत, सोमाजी दत्तो व हिराजी फर्जंद यांस परळीखालीं मारविलें.  तसेंच ओल्याबरोबर सुकेंहि जळतें या नात्यानें दादजी व कबजीनें बाळ प्रभु यासहि मारविलें व शामजी नाईक यांस कैद करविलें.  याचा परिणाम असा झाला कीं, राज्यांतील कर्ती वडील माणसें नाहींशी झालीं.  मुख्यतः चिटणीसी दरख आपल्या ताब्यांत आल्याविना आपला बोज बसणार नाहीं हें बावा व दादजी पूर्णपणें जाणून होते.  म्हणून ते दोघेहि या खटपटींत होते.  त्यांनीं या प्रसंगीं जेव्हां संभाजीस खोटेंच भासवून चिटणीसाच्या घराण्याचाच नाश करण्याचा प्रयत्‍न केला, तेव्हां चिटणीसी व शिक्केकट्यार येसूबाईनें आपल्या ताब्यांत घेतली व खंडो बल्लाळाच्या करवीं ती स्वतःच काम पाहूं लागली.  त्यामुळें बावांच्या 'शाक्त' शक्तीचा परिणाम संभाजीपर्यंतच थांबून राज्यांतील इतर व्यवस्थेवर होण्याचा बंद झाला.

पुढें इंग्रजांशीं जो इ.स. १६८३ त तह झाला त्यावेळीं कबजीं एकटाच वडील, संनिध, बोलका व व्यवहारचतुर असल्याकारणानें त्यासच इंग्रजांकडे पाठविलें.  नंतर ज्या वेळीं इ.स. १६८३ च्या सप्टेंबरच्या अखेरीस संभाजी अकबरास घेऊन फोंड्याच्या लढाईस गेला व त्यानें गोवेकर रगेल पोर्तुगीजांची चांगलीच रग जिरविली त्यावेळीं बावा अकबराबरोबरच होते.  अकबरास व त्याच्या बरोबर बावासहि संभाजीनें शत्रूच्या संनिध येऊं दिलें नव्हतें.  पुढें शहा अलमचा रामसेजेचे घाटाच्या बाजूनें संभाजीस शह बसतांच संभाजीस आपल्या सैन्यानिशी निकडीनें निघावे लागलें पण गोवेकरांचें तहाचेयं बोलणें तर चालूच होतें.  तेव्हां गोवेकरांशीं सल्ला करण्यासाठीं संभाजीनें 'बावाला कुल येखत्यार देऊन तेथेंच ठेविलें' व आपण मात्र रायगडास गेला.  बावा व अकबर यांनीं भीमगडच्या झाडीत इ.स. १६८४ च्या जानेवारींत जाऊन गोवेकरांशीं सल्ला केला व १८ मे १६८४ रोजीं बावा रायगडास येऊन दाखल झाला.  पुढें ७ नवंबरला कोथळगड मोंगलांनीं घेतला व शाहादि खानहि पुण्याहून दौड करून बोरघांट उतरों लागला.  तेव्हां संभाजीनें बावास त्याच्या पाठविलें; व बावानींहि गागोलीला शाहादिखानास गांठून त्यांसी १४ जानेवारी १६८५ रोजीं भांडण दिलें व शाहादिखानास कोंकणांतून पिटाळून लाऊन त्याला पुन्हां घाटांवर परतविलें.  नंतर कबजी रायगडास आला व दोन तीन महिने त्याचा मुक्काम तेथें होत आहे न होत आहे तोंच विजापुरास मोंगलांचा वेढा पडल्याची खबर आली.  त्यामुळें संभाजीला विजापुरकरांच्या मदतीस कोणाला तरी पाठविणें जरूरीचें वाटलें; व इतक्यांत हंबीररावहि स्वामी कार्यावरी पडलेला व इतर सर्व सरदार चारी दिशेस पांगलेले त्यामुळें इ.स. १६८५ च्या जून महिन्यांत बावासच विजापूरकरांच्या मदतीस पाठविलें.  परंतु बावानें फौजा मात्र पुढें रवाना करून आपण खासा पन्हाळा येथें राहिला.  अशा रीतीनें बावाजी तीन वर्षेपर्यंत आपला आयुष्यक्रम कधीं पन्हाळा तर कधीं संगमेश्वरीं घालवित असतां शिर्के व बावाजी यांच्यांत वैमनस्य आलें व त्यांनीं बावावर बंड उभारलें.  तेव्हां बावा इ.स. १६८८ च्या नवंबरांत संगमेश्वराहून खेळण्यास पळून गेला.  ह्या शिर्क्यांच्या पारखेपणाची बातमी संभाजीस लागतांच तो रायगडाहून निघाला व संगमेश्वरी येऊन ''शिर्के व त्यांच्या साथीदारांशी युद्ध करून त्यांनां हांकलून लाविलें.  तेव्हां शिर्के राजापुरीस पळून गेले'' व संभाजी खेळण्यास गेला. बावानें या शिर्क्यांच्या कटाशीं प्रल्हादपंत व इतर कांहीं सरकारकुनांचा संबंध आहे असें भासिवल्यावरून त्यांनां संभाजीनें धरलें; विजापुरकडे पाठविलेल्या सैन्यांत धनाजी, संताजीसारखीं माणसें असल्यामुळें फौजेंत किंवा लढाईंत विशेषसा घोटाळा उडाला नाहीं.  मात्र मोंगली व मराठी सैन्याच्या हालचाली मराठी राज्याच्या अगदीं निकट असल्याकारणानें फितुरी करणें वगैरे मोंगली प्रयत्‍न जारीनें सारखे चालू होतेच.  संभाजी खेळण्याहून बावासह निघाला व ही बातमी मोंगली सरदारांनां मराठ्यांकडील कोण्या फितुरी लोकांनीं पोहोंचविली.  बातमी लागतांच सेक निजाम- ज्याला त्याच्या शौर्याबद्दल मुकरीबखान संभाजीस 'युक्तीनें पकडलें' म्हणून पुढें तकरीबखान असे किताब मिळाले होते तो कोल्हापुरीहून दौड करीत निघाला.  रायगडास जाण्याकरितां निघालेल्या संभाजीचा मुक्काम संगमेश्वरीं होताच.  तारीख १ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी व बावा यांस वरकड लोकांनिशी खानानें पकडलें.  त्यावेळीं दोन्हीहि बाजूंच्या लोकांत मारामारीं झाली व बावास तीर लागून तो जखमी झाला.  संभाजी वगैरे मंडळी निःशस्त्र व बेसावध असल्यानें शेख निजामानें त्यांनां थोड्याच वेळांत धरून औरंगझेबाकडे पाठविलें.  औरंगझेबानें तारीख ११ मार्च १६८९ रोजीं प्रथम बावास व नंतर संभाजीस ''जिवेंच मारून शिरच्छेद'' केला.

बावाची योग्यता जरी लघु होती तरी त्याची आकांक्षा फार जबर होती.  एखादें मोठें राजकाज करावें व नांव मिळवावें असें बावास वाटे.  परंतु तसें त्याच्या हातून घडलें नाहीं.  संभाजीच्या मर्जीतला हा बावा आहे एवढीच गोष्ट जरी प्रजेवर व सरदारांवर त्याचा पगडा बसविण्यास पुरेशी होती तरी त्याच्या हातून कांहीं महत्वाचें काम घडलें नाहीं व त्यामुळें संभाजीनें त्याला अधिकार दिल्याचें आढळत नाहीं.  बावास कधीं कधीं लहान लहान खटले तोडणें व न्याय देणें वगैरे कामें करावीं लागत हें जरी खरें आहे तरी तीं केवळ सर्व प्रधान व कारकून मंडळी पांगली गेल्यामुळें करावीं लागत येवढेंच.  तसेंच संभाजी कलुशाच्या पूर्णपणें आधीन झाला होता असेंहि दिसत नाहीं.  उलट कलुशाचे इकडील जनतेच्या रीतीरीवाजांच्या व देशांतील परिस्थितीच्या आज्ञानामुळें घोटाळे उडतात हें संभाजी जाणून असल्यानें त्यानें त्याला मोठे अधिकार दिले नाहींत.  कलुशा व संभाजी यांचीं व्यसनें वगैरे वाईट आचरणाविषयींची बखरकारांनीं लाविलेली संगति व काढलेलीं अनुमानें संभाजीच्या झटपटीच्या हालचाली व विशेषतः या दोघांचें जें अगदीं थोडेंच सान्निध्य झालें त्याचा थोडाहि विचार केल्यास अगदींच निराधार व फोलकट वाटतात.  तसेंच कलुशानें फितुरी केली हाहि आरोप अगदींच खोटा आहे.  (डफ; राजवाडे ८; जेधे; सरदेसाई; सरकार). (वा. सी. बेंद्रे)

(रा. बेंद्रे यांनीं जी कलुशाबद्दल माहिती दिली आहे ती बरीच नवीन भासणारी आहे.  परंतु परिचित माहितीपेक्षां तिला जास्त आधार सांपडले आहेत.  काश्मीरच्या राजघराण्यांत 'कलस' हें उपपद असणारे कांहीं राजे होऊन गेले (कलस पहा).  कलुशाला संभाजीनें महत्वाचा अधिकार जरी दिला नव्हता तरी त्याचें वाटेल तें बोलणें संभाजी मानी.  विशेषतः त्याच्या खोट्या चहाड्या खर्‍या मानून संभाजीनें पूर्ण विचार केल्याशिवाय बहुतेक सारी कर्ती माणसें (ज्यांनीं शिवाजीस राज्य उभारण्यांत मदत केली तीं) जीवें मारिलीं; परस्परांचें सान्निध्य जरी थोडकेंच होतें तरी त्याचा हा परिणाम झाला !  कलुशानें शेवटीं फितुरी केली असावी असें आम्हांस वाटतें.  कारण तो हलक्या दर्जाचा व हांवरा माणूस होता व अशा माणसाला कसें फोडावें हें औरंगझेब उत्तम जाणत असे.  संभाजी अमक्या दिवशीं अगदीं थोड्या लोकांनिशीं संगमेश्वरी येतो ही नक्की बातमी शेख निजामास कशी कळली ?  कबजीशिवाय संभाजीच्या भरंवशाचा (कीं ज्याच्याजवळ तो आपला जाण्याचा बेत फोडील असा) त्या वेळीं दुसरा कोणीहि इसम नव्हता.  तसेंच खेळण्याहून स्वतःच्या संरक्षणापुरती जास्त फौज संभाजीस सहज घेतां आली असती, पण ती त्यानें घेतली नाहीं; यांत कोणाचा तरी हात असला पाहिजे.  ऑर्महि कबजीच्या फितुरीची साक्ष देतो.  सारांश, कलुशा यानेंच फितुर होऊन संभाजीस औरंबझेबाच्या स्वाधीन केलें असें आमचें मत - वरील आधारांवरून - आहे (संपादक).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .