प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कलाल -  कलाल यांस संस्कृत कल्यपाल, कलवार, कलार, कलान अशीं नांवें आढळतात.  ही कलालांची जात हिंदुस्थानांतील सर्व भागांत विशेषतः बहार ओरिसा, संयुक्तप्रांत व मध्यप्रांत यांतून आढळते.  १९११ च्या खानेसुमारींत यांची संख्या ९५४२४१ भरली.  पैकीं ८७६०९५ हिंदू, ६४२८३ मुसुलमान, १२६९५ शीख, व ९६३ जैन होते.  इतर व्यापारी जातींप्रमाणें हिंदू कलवारहि समाजांत आपला दर्जा वाढावा म्हणून ते आपण जुन्या चालीचे हिंदू आहोंत असें भासवितात व वैष्णवपंथांत इतर व्यापारी जातींप्रमाणेंच शिरूं पाहतात.  बंगाल्यांत हे जरी आपले संस्कार ब्राह्मणांकडून करवितात तरी चांगले ब्राह्मण त्यांच्याकडे जात नाहींत.  बंगालमधील कलवार पुरातन देवांच्या मालिकेंत पुष्कळसे बारीकसारीक देवहि घुसडून त्यांची पुजा करतात.  उदाहरणार्थ यांच्यांतील एक पोटजात श्रावण शुद्ध पक्षांतील सोमवारी सोखा देवतेला दूध व तांदूळ अर्पण करते.  बुधवारी आणि गुरुवारी काली व बंदे यांनां बकरीं आणि मिठाई देते.  मंगळवारीं डुकराचीं पिलें आणि मद्यें गौराईला नैवेद्य म्हणून नेतात.  याच दिवसांत दुसरी एक पोटजात पांचाण पीर याला भाकरी व मिठाई अर्पण करते.  आणखी दुसरी एक जात भाद्रपद व माघ महिन्यांत बर्‍हम् देवाला अशाच तर्‍हेचा नैवेद्य दाखविते.  हे सर्व नैवेद्याचे पदार्थ यजमानाच्या घरांतील मंडळी खातात.  फक्त डुकराचीं पिलें मात्र बळी दिल्यानंतर जमीनींत पुरून टाकतात.  कारण तें केवळ हलक्या जातीचें अन्न म्हणून समजतात.  संयुक्त प्रांतांतील कलवारांचा दर्जा बंगाल्यांतल्यापेक्षा थोडा वरचा आहे.  कारण त्यांच्याकडे येणारे ब्राह्मण इतर ब्राह्मणापेक्षां कमी लेखण्यांत येत नाहींत.  या ठिकाणीं ते कालिका पूजा, इतर पांचाण पीर, फूलमाती व कॉलर्‍याचा देव, हरदौर लाला या लुंग्यासुंग्या देवतांच्या पूजेप्रमाणेंच मानतात.  दारूची भट्टी चालू असतां कलवार मदन या मद्य देवतेची पूजा करतात.  कलवार प्रामुख्यानें आवळ्याच्या झाडाविषयीं (त्याच्याखालीं होम करून व ब्राह्मणभोजन घालून) भक्ति बाळगतात.  त्याचप्रमाणें लिंबाचें व पिंपळाचें झाड पूज्य मानतात.  आदितवारीं सूर्यनारायणाप्रीत्यर्थ उपास करतात व पृथ्वीदेवता जी सायरी तिला मद्यार्पण करतात.  प्रत्येक घरांत एक देवघर असून त्यांत सर्व देव बसवितात.  प्रसूतीनंतर गाझी मियांची भाल्याच्या रूपांत पूजा करतात.  मध्यप्रांतांत कलवारसदृश कलार म्हणून जी जात आहे ती दुल्हा देवाची भक्ति करते.  दुल्हा देव हा एक नवरदेव असून लग्नप्रसंगीं त्याला मृत्यु आला असें मानतात (दुल्हा देव पहा).  कांहीं लोक एकेश्वरी पंथाच्या दिशेनें इतके पुढें गेले आहेत कीं, ते एका भगवानालाच काय ते ओळखतात.  तथापि ते सुद्धा पूर्वजांचीं श्राद्धें वगैरे करतात.  बहादूर कलरिया आणि त्याचा पुत्र सुसन चाबारी हे पूर्वीचे मोठे कलाल असून त्यांचे उत्साह करतात; त्यांच्या कारखान्यांचे अवशेष अद्यापहि दाखविण्यांत येतात.

पंजाबांतील कलाल -  या जातीचे सुमारें हजार लोक आहेत.  या जातींत. हिंदु, शीख, मुसलमान, या धर्माचे लोक आहेत.  त्यांचा पिढीजात धंदा दारू गाळण्याचा होता.  परंतु त्यांनीं आतां तो सोडला आहे.  ते आता शेतकी, सरकारी नोकरी, व्यापार वगैरे करितात.  आपला पिढीजात धंदा दारू काढण्याचा आहे.  असें हे कबूल करीत नाहींत व आपण जाट, रजपूत लोकाचे वंशज आहोत असें सिद्ध करण्याचा ते प्रयत्‍न करीत आहेत.  त्यांच्यापैकीं आहळुबाला वर्गास आपणास रजपूत म्हणवून घेण्यांत यश आलें आहे. (सेन्सर रिपोर्ट १९११ पंजाब.)

मध्यप्रांत व वर्‍हाड -  या भागांत यांची संख्या सुमारें २,००,००० आहे.  त्यांनां कलार म्हणतात.  यांच्या पुष्कळ उपजाती असून त्या बर्‍याच स्थानिक भेदामुळें झाल्या आहेत.  मालवी, लाड, उहारिया, जेसवार कनोजिया इत्यादि वर्गांचीं नांवें स्थानिक आहेत.  यांपैकीं राय कलार हे उच्च समजले जातात.  पण त्यांतहि ब्याहूत कलार मात्र फारच निवडक आहेत व खरोखर उच्च आहेत.  हे लोक आपल्या वर्गांतील विधवांस विवाह करूं देत नाहींत व बंगाल्यांत तर हे मद्य देखील विकीत नाहीत.  चौसके कलार एका पूर्वजाच्या चार पिढ्यानंतर लग्नसंबंध करतात.  शिवहारे अगरवाल्यास एकाच पूर्वजाच्या दोन मुलांची संतति समजतात.  जैसवार, शिवहारे, कनोजिया हे उत्तर हिंदुस्थानांत आहेत.  व ब्याहूत मध्यप्रांतांत आढळतात.  छत्तीसगडांत दंडसेन कलार नांवाचा एक वर्ग आहे.  याच्याबद्दल एक अशी आख्यायिका सांगतात कीं, वालोदच्या राजाच्या मुलाचा अत्यंत जिवलग मित्र हा एका कलाराचा मुलगा होता.  पण कलाराच्या मुलाची बहीण राजपुत्राच्या मनांत भरली.  तिची गांठ हा राजपुत्र नेहमीं घेऊं लागला. कलारानें राजास विचारलें कीं माझ्या घरीं एक कुत्रा येऊन सर्वत्र विटाळ करतो त्याला काय करावें ?  राजा म्हणाला त्याला जिवें मारावें.  कलार पुन्हां म्हणाला कीं मीं त्यास मारलें असतां शिक्षा तर होणार नाहीं ?  राजा म्हणाला मुळींच शिक्षा होणार नाहीं.  इतकें अभय घेऊन राजपुत्र कलार कन्येची एक दिवस भेट घेण्यास आला असतां तिच्या भावानें त्यास ठार मारलें.  यामुळें रजपुतांचें व कलाराचें युद्ध झालें.  त्यांत कलारांचा विजय झाला.  पण त्यानंतर त्यांनीं वालोद राज्य सोडलें व अजून तो नियम कलारांनीं पाळला आहे.

यांच्या लग्नाच्या चाली इतर स्थानिक हिंदू रीतीप्रमाणेंच असतात.  पण कलारांची वरात निघण्यापूर्वी वराची आई किंवा आत विहिरींत पाय सोडून काठांवर बसते व वर हातांत कुश घेऊन विहीरीस सात प्रदक्षिणा घालतो व प्रत्येक प्रदक्षिणेस एक एक काडी विहीरींत टाकतो व काठांवर बसलेल्या आतेस चांगली देणगी देण्याचें वचन देऊन परत येतो.  यापैकीं सधन लोक मुलीचीं लग्नें बाळपणांतच करतात.  पण प्रौढ मुलींचीं लग्नें केली असतां त्यांत कमीपणा आहे, असें समजत नाहींत.  लग्नें बहुधा जातिभोजनांतच ठरवितात, व ब्राह्मणाकडूनच लाविली जातात.  वधूशुल्काची चाल रुढ नाहीं पण वधूपक्ष फारच निर्धन असला तर वरपक्ष त्यास मदत करतो.  यांच्यांत काडी मोडण्याची चाल रुढ आहे व व्याहूताखेरीज इतर वर्ग विधवांच्या विवाहास परवानगी देतात.  हे लोक हिंदु दैवतांचें पूजन करतात.  पण यांच्यापैकीं कांहीं लोक जैन आहेत.  तरी पण यांचा दर्जा कुणब्यांच्याहि खालचा आहे.  मंडला जिल्ह्यांतील कलार पुष्कळ सधन आहेत.  त्यांचे पुरोहित सरवरिया ब्राह्मण असून यांपैकीं कांहींनीं त्यांची जात उच्च करण्याकरितां त्यांच्या हातचें पाणी पिण्यास सुरुवात केली म्हणून सरवरिया ब्राह्मणांत दोन तट झाले आहेत.

यांच्या दारू काढावयाच्या धंद्यामुळें गोंड लोक यांच्या हातांत बरेचसे आले आहेत.  व गोंड लोकांस दारू पाजून त्यांच्यापासून बर्‍याच ठिकाणीं यांनीं जमीनी मिळविल्या आहेत असें रसेल व हिरालाल आपल्या कास्ट्स अॅंड ट्राइब्स इन सी. पी. या पुस्तकांत लिहितात.

मठिया कलार -  वर्‍हाडांत मठिया कलार म्हणून एक जात आहे.  ते आपणास क्षत्रिय म्हणवितात.  त्यांच्यात जातिपंचायतपद्धति फार व्यवस्थेशीर चाललेली दिसते.  अखिलभारतीय मठियाकलारपरिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे व उमरावतींच्या मठियासमाजाचे अध्यक्ष रा. महाजन यांच्याकडून त्यांच्या समाजांत आजहि दिसून येणार्‍या पंचायतीची माहिती आली आहे ती पुढें देत आहों.

''गुन्हेगारास वठणीस आणण्यारितां त्याचे न्हावी, धोबि बंद करावे असें पंचायतींत ठरलें कीं, ताबडतोब गांवांतील सर्व न्हावी, धोबी यांनां जातीपुढार्‍याकडून तोंडी सूचना दिली जाते.  जो न्हावी अगर धोबी पंचांच्या सूचनेस धाब्यावर बसवून गुन्हेगाराचें काम करतो त्यानें अखिल मठियासमाजाचा भयंकर अपमान केला असें मानलें जातें.  सर्व प्रकारच्या व्यावहारिक बाबींत अशा न्हाव्यास अगर धोब्यास मठिया समाजाकडून एकजुटीनें तीव्र बहिष्कार घालण्यांत येतो.  अशा तर्‍हेनें एका गुन्हेगारास साह्य केल्याच्या आरोपावरून सबंध मठिया समाजाचा तो हाडवैरी बनतो आणि मठिया समाजाकडून होणारें त्याचें उत्पन्न तत्काल बंद होतें.  अर्थात एका व्यक्तीच्या उत्पन्नाकरितां सर्व मठिया समाजाच्या उत्पन्नास आंचवून सबंध मठिया समाजाच्या रोषास पात्र होण्यापेक्षां एका व्यक्तीचा त्याग करणें व्यावहारिक दृष्ट्या हितावह होतें म्हणून प्रत्येक गांवचे न्हावी धोबी मठिया समाजांतील पंचांचे निकालाबरहुकूम चालतात.

समाजांतील एखाद्या व्यक्तीकडून किंवा कुटुंबाकडून एखादी निषिद्ध, धर्मबाह्य अगर 'अपराध' या सदराखालीं येणारी गोष्ट क्वचित्प्रसंगी घडली तर समाजांतील नियोजित पंचाकडून त्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे न्हावी, धोबी, व सार्वजनिक विहिरीचें पाणी बंद करण्यांत येतें.  समाजांतील रूढीविरुद्ध वर्तन करणार्‍या इसमाला वठणीवर आणण्यास वरील सारखा बहिष्कार हें फार चांगलें साधन आहे.  हल्लींच्या सुधारलेल्या काळांत मोठमोठ्या शहरांत अशा प्रकारच्या बहिष्कारानें जेरीस आलेल्या व्यक्तीचें अगर कुटुंबाचे उदाहरण फारसें दिसून येत नाहीं; तथापि परंपरागत धर्मसमजुती, व रूढी यांवर श्रद्धा ठेवून समाजांतील नियोजित ज्ञातिपंचांस मान देणार्‍या किंवा भिऊन वागणार्‍या खेड्यांपाड्यांतील समाजामध्यें ही उदाहरणें आजच्या कालांतहि दृष्टोत्पत्तीस येतात.  समाजाकडून वर्ष सहा महिने बहिष्कार घातल्या गेलेल्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची केविलवाणी स्थिति नजरेस आली म्हणजे आजच्या दृष्टिकोनानें 'व सुधारलेल्या' अशा पूर्वीच्या काळांतहि ज्ञांतिपंचांच्या नियंत्रणाखालीं समाजकार्ये कशीं निर्वेध चालत होतीं व 'अपराध' या सदराखालीं येणारें वर्तन करणार्‍या व्यक्तीला हल्लींच्या पद्धतशीर कायद्याइतकीच 'पाणी, गुडगुडी' बंदीच्या कायद्याची कशी कदर वाटत होती याविषयीं खात्री पटते.  आजच्या मठिया समाजांतहि वरील प्रकारच्या बहिष्काराचा अवलंब ज्ञातिपंचांकडून केव्हां केव्हां करण्यांत येतो व कायदेशीर उपायांपेक्षां धर्मबाह्य वर्तन करणार्‍या व्यक्तीवर या बहिष्काराच्या अस्त्राचा उपाय विशेष परिणामकारक होतो.''  

मुंबई इलाखा -  संख्या (१९११) ७८६०.  मुंबई इलाख्याचा मध्यभाग व गुजराथ यांतून कलालांची वस्ती आहे.  ठाणें जिल्ह्यांत कांहीं कलार अथवा कलाल आढळतात.  देवी कालिकेच्या अनुज्ञेवरून आम्हीं दारू गाळण्याचा व विकण्याचा धंदा पत्करला आहे असें हे लोक म्हणतात.  उत्तरहिंदुस्थानांतून हे इकडे आले असावेत.  यांची भाषा मराठी असते.  धंद्यांत चलती नसल्यामुळें बरेचसे मोलमजुरी करूं लागले आहेत.  यांची रहाणी गलिच्छ असते.  परन्तु स्वभावतः हे इमानी व विचारशील असतात.  यांचीं घरें बहुधा गवती झोंपड्याच होत.  हे गुरेढोरें पाळतात; मद्य व मांस खातात.  यांचा पेहेराव म्हणजे - धोतर, जाकीट व मराठी धाटणीचें पागोटें - हा असतो.  यांच्यांत विधवाविवाह संमत आहे.  हें हिंदु देव मानतात.  विशेषतः खंडोबा भैरोबा, देवी हीं यांचीं उपास्य दैवतें असतात.  जातिप्रमुख हा जातींतील लोकांच्या विचारानें तंटे मिटवितो.  मुलांनां शिक्षण देत नाहींत.  (क्रूक, रसेल व हिरालाल; सेन्सस् रिपोर्ट, मुं. गॅ.; मठियासमाज उमरावती याकडून मठिया कलारांची माहिती मिळेल.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .