प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कलचुरी - या राजघराण्याचीं नांवें कलचुरी, कलचुर्य, कटचुरी अशीं भिन्न भिन्न आढळतात.  हें क्षत्रिय घराणें वास्तविक हैहय या अत्यंत प्राचीन घराण्याचीच एक शाखा आहे.  हें चेदि देशावर राज्य करीत होते.  महाभारतांत या चेदि देशाचें नांव येतें (सचेदिविषयं रम्यं. म. भा. आदिपर्व) यांचें राज्य यमुनेच्या दक्षिणतीरीं होतें.  या चेदि (हैहय) वंशांतच सहस्त्रार्जुन व शिशुपाल जन्मले.  हैहयांचीं अनेक कुले होतीं (हैहय पहा).  कलचुरी यांची राजधानी त्रिपुर होती.  हें गांव हल्लीं जबलपूरजवळ आहे.  कलचुरीच्या जवळच जेजकभुक्तीचें राज्य असून तेथील राजे चंदेल व कलचुरी यांच्यांत पुष्कळदां लग्नव्यवहार झाला होता.  अकराव्या शतकापासून या चेदि देशाचे पूर्वचेदि (महाकोसल, राजधानी रतनपूर) व पश्चिमचेदि (दाहल, राजधानी त्रिपुर) असे दोन भाग झाले.  पैकी त्रिपुरकर कलचुरी यांनीं आपला स्वतःचा एक शक सुरू केला.  त्याला चेदि शक असें नांव असून त्याचा आरंभ इ.स. २४८ सप्टेंबर ५ रोजीं झाला.  याचें वर्ष आश्विनादि व महिने पौर्मिमान्त असत.  यावरून या कालीं चेरी राजांचा फार उत्कर्ष झाला असावा.  त्रिपुरकर हैहय (कलचुरी) यांचा कांहीं कालपर्यंत गुजराथ व कोंकण या भागांत अंमल असल्यानें, दक्षिण गुजराथेंतील त्रैकूटक देशांत त्यांचा शक चालू होता.  या चेदी शकाला कलचुरी शक हें नांव मात्र इ.स. च्या ८ व्या शतकांत मिळालें.  या शकाचा संस्थापक महाक्षत्रप ईश्वरदत्त होता असें भगवानलाल इंद्राजी यांचें मत आहे.  या ईश्वरदत्तानें क्षत्रपांची सत्ता अर्धवट नाहीशी केली.  याच्या नाण्यांवर चेदि शकाचें १ लें व २ रें वर्ष कोरलेलें आहे.  यानेंच कोंकणांत आपली सत्ता स्थापून त्रिकूट (तिकोटा?) ही राजधानी केली.  पुढें रुद्रसेन क्षत्रपानें त्रिकूटांचा पराभव केला.  तेव्हां ते कलचुरी हें नांव धारण करून मध्यहिंदुस्थानांत गेले.  नंतर जेव्हां क्षत्रपांचा समूळ नाश झाला, तेव्हां त्यांच्यापैकीं दर्हसेन राजानें आपली राजधानी त्रैकूट ही परत घेऊन पुन्हां राज्य स्थापिलें (इ.स. ४५६).  बारोल (बुंदेल) खंडांतील उच्छकल्प (ओर्छा ?) येथील राजघराणेंहि या चेदि (कलचुरी) घराण्याचीच एक शाखा होय असें म्हणतात, पर्दि ताम्रपटावरून वरील दर्हसेनाचा काल ठरतो.  मंगलीश चालुक्य (५६७-७१०) याच्या एका शिलालेखांत या कट(ल) चुरी घराण्याचा उल्लेख येतो.  मंगलीशानें या घराण्यांतील शंकरगणाचा पुत्र बुद्ध यास जिंकलें असें वरील लेखंत म्हटलें आहे.  फ्लीटच्या मतें ही कलचुरी शाखा निराळी आहे.  पुढें ९ व्या शतकांत कोक्कलदेव पहिला नांवाच्या एका कलचुरी राजाचा उल्लेख आढळतो.  त्यानें राष्ट्रकूट दुसरा कृष्ण याच्या मुलीशीं लग्न केलें (८७७).  याचा मुलगा शंकरगण यानें चंदेल राजकन्या नट्टा इच्याशीं विवाह केला.  दुसरा पुत्र मुग्धतुंग (प्रसिद्धधवल) यानें (९००) ''पूर्वसमुद्राच्या किनार्‍यालगतच्या देशाच्या रांगाच्या रांगा जिंकून कोसलाधिपतीपासून पाली घेतलें'' (बिल्हरी शिलालेख).  पुढें बालहर्ष व त्याचा भाऊ केयूरवर्ष (युवराजदेव) हे राज्यावर आले.  केयूरानें अवन्तिवर्मा (चालुक्य) याची मुलगी नोहला हिच्याशी लग्न केले (खजुराहो शिलालेख स. ९२५).  याचा पुत्र लक्ष्मणराजदेव यानें राज्यावर बसल्यानंतर कोसलाधिपतीचा पराभव करून '' अत्यंत सुखकर अशा पश्चिमदेशावर '' (कोंकण ?) स्वारी केली (९५०).  नंतर गुजराथवर जाऊन सोमेश्वराची आराधना केली (बि. शि.).  याची मुलगी बोंथादेवी ही पश्चिम चालुक्य दुसरा तैलप याची आई होय.  याच्या मागून याचा मुलगा शंकरगणदेव राजा झाला (९७०).  त्याच्या नंतर त्याचा धाकटा भाऊ दुसरा युवराजदेव हा गादीवर आला; त्याचा मुंज वाक्पति मालवराज यानें पराभव केल्याचें उदेपूर प्रशस्तीवरून समजतें (९७५).  नंतर त्याचा पुत्र दुसरा कोक्कल (१०००) व त्याचा गांगेयदेव (विक्रमादित्य) हे राजे झाले.  याचा उल्लेख अल्बेरूनी यानें ''डाहालचा राजा'' असा केला आहे (१०३८).  याचा मुलगा कर्ण देव; यानें हूण राजकन्या आवल्लदेवीशीं लग्न केलें.  हा मोठा शूर होता.  यानें कर्णावती शहर बसवून काशीस ''कर्णाचा मेरू'' या नांवाचें एक देऊळ बांधलें (जबलपूर ताम्रपट).  यानें १०३५ त मगधच्या पाल राजांचा पराभव करून नंतर पांडय, मुरल, कुंग, वंग, कलिंग व हूण यांचाहि पराभव करून (भेडाघाट शिला.), चोड, कुंग, हूण, गौड, गुर्जर व कीर या राजांनां आपल्या सेवेस लाविलें (१०४२).  यानें १०६० त भीम गुर्जर राजाच्या मदतीनें मालवराज प्रख्यात विद्वान भोजाचा पराभव केला.   पुढें याचा काळ फिरला.  उदयादित्य मालवराजानें (नागपूर प्रशस्ती), चंदेल कीर्तिवर्म्यानें (प्र. चंद्रो.), दुसर्‍या भीमदेव गुर्जरानें (हेमचंद्र), पश्चिम चालुक्य पहिल्या सोमेश्वरानें (बिल्हण, वि. दे. च.), इतक्या राजांनीं याचा वेळोवेळीं पराभव केला (१०७०).  याच्या दरबारीं गंगाधर म्हणून एक कवि होता (बिल्हण, वि. दे. च.).  कर्णाचा मुलगा यशःकर्णदेव (११२२) याचे कांहीं प्रांत कनौजच्या गोविंदचंद्रानें घेतले (जबलपुर ताम्र.) व लक्ष्मणदेव परमारानें खुद्द त्रिपुरीवर मोहीम केली (नागपुर प्र.) यशःकर्णानेंहि आंध्रराजांचा पराभव करून चंपारण उध्वस्त केलें (भेडाघाट शि.) होतें.  याचा मुलगा गयाकर्णदेव (११५१) यानें मेवाडचा राणा विजयसिंह याची मुलगी अल्हाणदेवी इला आपली राणी केली होती.  तिचाच भेडाघाट येथील शिलालेख आहे.  तिचा मुलगा नरसिंहदेव याच्या कारकीर्दीत हा शिलालेख तयार झाला (११५५).  यानें लालपहाड किंवा भर्हुत येथें एक शिलालेख कोरला असून (११५८), अलहघाट येथेंहि दुसरा कोरला आहे (११५९).  याच्या मागून राजा झालेला याचा भाऊ जयसिंहदेव (रेव ताम्र. ११७९) यानें गोसलदेवीशीं लग्न लाविलें (तेवर शिला. ११७७).  त्याचा पुत्र विजयसिंहदेव (कुंभी. ताम्र. १८८०) याचा उल्लेख इ.स. ११९५ पर्यंतचा आढळतो.  त्यानंतर या त्रिपुरकर चेदि कलचुरी वंशाचा पत्ता लागत नाहीं.  बहुधा त्यांचा नाश रेवा येथील बाघेल यांनीं केला असावा.  वर गांगेयदेवाचा उल्लेख आला आहे.  यानें सुमारें (१०५०-४०) २५ वर्षे राज्य करून आपल्या घराण्याचें नांव पुढें आणलें.  यानें उत्तरहिंदुस्थानांत सार्वभौमसत्ता स्थापण्याचा प्रयत्‍न केला व तो बराच सिद्धीसहि गेला होता.  स. १०१९ मध्यें तिरहुत पर्यंतचे राजे त्याचे मांडलीक बनले होते.

मध्य हिंदुस्थानांतील रतनपुरचे राजे -  हेहि आपणास चेदि अगर हैहय (कलचुरी) वंशीय म्हणवितात.  त्यांची माहिती रतनपुर या नांवाखालीं पहावी.  

दक्षिणेंतील कलचुरी घराणें -  याचा आरंभीचा उल्लेख इ.स. ११४८ च्या सुमारचा आढळतो.  या वेळीं तिसरा सोमेश्वर चालुक्य हा सार्वभौम असून त्याचा मांडलिक म्हणून एक (जोगमाचा पुत्र) पर्मार्दि कलचुरी हा तर्दवाडी प्रांताचा राजा होता (११२८).  हे कलचुरी राजे पश्चिम चालुक्याच्या सार्वभोमसत्तेखालीं वैभवास चढले.  परमार्दीचा मुलगा जो बिज्जल त्याच्या वेळीं तर त्यांनी सार्वभौमसत्तेसहि हात घातला होता.  परंतु चवथ्या सोमेश्वर चालुक्यानें (११८३) पुन्हां आपली सत्ता स्थापिली आणि त्यानंतर मात्र या कलचुरींचा मागमूस लागत नाहीं.  कारण पुढें होयसल बल्लाळ यादव यानें कल्याणीचें सर्व राज्यच पादाक्रांत केलें (११८४).

बिज्जल कलचुरी -  तैल तिसरा (चालुक्य) याचा बिज्जल हा सेनापति होता.  विज्जल असेंहि त्याचें नांव आढळतें.  यानें बंड करून व तैलाला एकीकडे ठेऊन आपण राज्य घेतलें (११५६).  तें त्याच्या वंशाकडे ११८३ पर्यंत चालत होतें.  हा शूर होता.  यानें म्हैसूरपैकीं कांहीं प्रदेश जिंकला होता.  याची राजधानी कल्याणी होती.  बिज्जलाचे विरुद्ध लागलींच एक बंड उभें केलें गेलें व तें सफळ होण्यास मुख्यतः धार्मिक क्रांति कारण झाली.  बिज्जल हा जैन होता, आणि या वेळीं कर्नाटकांत बौद्ध व जैन धर्मांविरुद्ध वीरशैवधर्माची एक लाट उसळली होती.  त्याचा फायदा घेऊन बसव नांवाच्या बिज्जलाच्या ब्राह्मण प्रधानानें प्रथम त्याला पदच्युत करून व त्यानें आपल्या लिंगायत पंथांतील (बसव हा वीरशैव अथवा लिंगायत या पंथाचा संस्थापक होता)  दोघा साधूंचे डोळे काढल्याचा आरोप त्याच्यावर ठेऊन त्याचा वध केला (११६७).  बसवाची बहीण पद्मावती ही बिज्जलाची बायको होती.  बिज्जलाच्या वंशजांनीं ११८३ पर्यंत कल्याणीस राज्य केलें.  बनवासी, अण्णिगिरी, बेळगोळ वगैरे ठिकाणींहि या बिज्जलाच्या आप्‍त घराण्यापैकी कांहीं घराणीं कारभार करीत असत.  पश्चिम चालुक्य, पूर्वचालुक्य राष्ट्रकूट व यांनीं या कलचुरा घराण्याशीं अनेकदां लग्नव्यवहार केलेले होते.  बिज्जलाचा मुलगा सोविदेव (सोमेश्वर अगर रायमुरारी) याच्यासाठीं त्यानें राज्यत्याग केला अशी एक गोष्ट आढळते (बेळगांव शिला.) व ती बहुधा खरी असावी.  तसें असल्यास त्याच्या वधाची मागील गोष्ट खोटी ठरते.  बिज्जलाला सोमेश्वर, संकम, आहवमल्ल, सिंघण अशीं ४ मुलें होती.  सोविदेवाचा अलीकडील उल्लेख ११७७ चा होय.  सिरीया देवी परमार्डीची मुलगी व बिज्जलाची बहीण कलचुरी राजकन्या ही चाउंड घराण्यांत दिली होती व तिच्या मुलांनां कलचुरी राज्यांत मोठमोठ्या जहागिरी होत्या (ऐहोळ शिला. ११६९) सोविदेव याच्या नंतर त्याचा भाऊ संकम (दुसरा निश्शंकमल्ल) गादीवर आला (११७८).  तत्पूर्वी हा सोविदेवाच्या कारकीर्दीत त्याला राज्यकारभाराच्या कामीं मदत करीत असे.  याचा भाऊ आहवमल्ल हा त्याला तो राजा असतांना मदत करी.  संकमाचा अर्वाचीन काल ११८० हा आहे.  याच्या मंत्र्यांचीं नांवें बेळगांव येथील ११७९ च्या शिललेखांत आलीं आहेत.  पुढें आहवमल्ल गादीवर आला (११८०).  यानें चोल, होयसल व विजयादित्य यांच्याशीं लढाया दिल्या होत्या.  यानें बहुधा ११८२ पर्यंत राज्य केलें असावें.  याच्या नंतर याचा भाऊ सिंघण हा राजा झाला.  हा दुर्बल असल्यानें चालुक्य चवथा सोमेश्वर यानें आपला मांडलिक व सेनापति बोम्म (ब्रह्म) याच्या साहाय्यानें सिंघणाचा पराभव करून आपलें राज्य घेऊन अण्णिगिरीस गादी स्थापिली (११८३).  परंतु थोडक्याच दिवसांत होयसल यादव वीर बल्लाळ (दुसरा) यानें त्याचा पराभव करून (व चालुक्य आणि कलचुरी या दोन्ही घराण्याचा नाश करून) आपली सत्ता स्थापिली (११८४).  (स्मिथ, फ्लीट, वैद्य, भांडारकर.  आयंगार यांचे यांचे इतिहास व शिलालेख संग्रह वगैरे).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .