प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कलकत्ता -  बंगाल इलाख्याची राजधानी.  १९१२ पूर्वी हें हिंदुस्थानच्या राज्याची राजधानी असून व्हाईसरायसाहेबांचें वसतिस्थान होतें.  उत्तरअक्षांश २२ ३४' व पूर्वरेखांश ८८ २२'.  हें हुगळी नदीच्या पूर्वकिनार्‍यावर वसलेलें असून बंगालमधील २४ परगण्यांच्या जिल्ह्यांत आहे.  समुद्रापासून ८६ मैल दूर असून समुद्रसपाटीपासून फक्त १८ ते २१ फूट उंच आहे.  नदीच्या किनार्‍यानें उत्तरेस ६ मैल लांबी असून पूर्वेस सर्क्युलर कॅनाल व 'सॉल्ट लेक्स' मिठागारें आहेत.  क्षेत्रफळ २०५४७ चौ. मैल.  कालीदेवीच्या उपासनेशीं ह्या शहराच्या नांवाचा कांहीं संबंध आहे असें म्हणतात.  मुख्य शहराचा भाग सोडून भोंवतालीं नगरोपान्त लहान मोठ्या वस्तीचे विभाग आहेत.  ह्या भागांनां वेगळ्या म्युनिसिपालिट्या असून कलकत्त्यास मुख्य एक म्युनिसिपालिटी आहे.  कोसीपूर-चित्तपूर उत्तरेस असून पूर्वेस माणिकतोळा विभाग आहे.  नैॠत्येस 'गार्डनरचि' हा विभाग असून पश्चिमेस हुगळी नदीवर हावरा हा विभाग आहे.  सर्व विभागांचा व्यापार वगैरेमुळें एकजीव झालेला आहे.

हे सर्व विभाग धरून कलकत्ता शहराची लोकसंख्या १३,२७,५४७ आहे.  सार्‍या आशिया खंडांत टोकीओ (लो. सं. २१,७३,०००) शिवाय इतकी लोकसंख्या दुसर्‍या कोणत्याहि शहराची नाहीं.  ब्रिटिश राज्यांत लोकसंख्येच्या बाबतींत लंडन शहराच्या खालोखाल ह्या शहराचाच नंबर आहे.

नगरोपान्त विभाग जर सोडून दिले तर खुद्द कलकत्याची लोकसंख्या ९,०७,८५१ आहे.  ह्यांत १८९९ सालीं झालेल्या 'बेंगाल अॅक्ट तिसरा' प्रमाणें 'कलकत्ता म्युनिसिपल टाऊन,' फोर्ट विल्यम व इतर थोड्या भागाचा समावेश होतो.

१९१२ पर्यंत राजधानीचें ठिकाण त्याचप्रमाणें बंदर, रेल्वे लाइन्सचें मुख्य ठिकाण, गंगा व ब्रह्मपुत्रा ज्या प्रदेशांतून वहातात त्या सुपीक प्रदेशांतून माल आणण्याचें मुख्य ठिकाण, व त्याचप्रमाणें परदेशांतून आलेला माल उतरवून घेण्याचें मुख्य स्थान, किंबहुना व्यापाराचें व उद्योगधंद्याचें केंद्रस्थान या दृष्टीनें कलकत्ता शहरास फार महत्व आलें आहे.

शहराच्या मध्यभागीं फोर्ट विल्यम असून भोंवताली मैदान नांवाचा भव्य बाग आहे.  ह्याच्या उत्तरेस यूरोपियन लोकांचीं मोठमोठीं दुकानें आहेत.  दक्षिणेस व आग्नेयेस बालगिंज व अलीपूर हे यूरोपियनांचे राहण्याचे पुरे आहेत व बंगालच्या गव्हर्नरचें ठिकाणहि येथेंच आहे.  ह्याच्या भोंवतीं सर्व लोकवस्ती आहे.  शहरांत लोकवस्ती दाट असून अस्वच्छ आहे.

कलकत्ता शहराचें क्षेत्रफळ १२८३ एकर आहे.  मैदान फोर्ट विल्यम व खुद्द कलकत्ता व बंदर व कालवे जर धरले तर एकंदर ७३१० एकर आहे.  खुद्द कलकत्ता शहराचे 'जुनें शहर' व जादा भाग असे दोन आहेत.  हवामान उष्ण व सर्द आहे.  मे महिन्यांत पारा १०२० पर्यंत चढतो.  वार्षिक पाऊसाची सरासरी अहवाल ६१ इंच आहे.  पावसाळ्याच्या सुरवातीस व शेवटीं येथें जोराचे वारे सुटतात.  त्यांत प्राणहानि व इतर नुकसानी होते.  १८९७ सालीं बसलेला भूकंपाचा धक्का फार जोराचा होता.  मुंबईप्रमाणें कलकत्यास प्लेग होत नाहीं.  त्यामुळें हें शहर राहण्यास जास्त पसंत करितात.

१५३० सालीं जेव्हां व्यापार पोर्तुगीज लोकांच्या हातीं होता त्यावेळीं सरस्वती नदीवरील 'सातगांव' हें व्यापाराचें मुख्य ठाणें होतें.  नंतर पुढें हुगळी हें व्यापाराचें ठाणें झालें व लवकरच गोविंदपूर नांवाचें गांव वसविण्यांत आलें.  त्याच ठिकाणीं सध्यां फोर्ट विल्यम आहे.  नंतर कांहीं दिवसांनीं ' सुतानाटी ' हें व्यापाराचें मुख्य स्थान झालें.  चितागांव हे व्यापाराचें ठाणें करण्याचा मानस सिद्धीस न गेल्यामुळें १५९० सालीं कारनॅकच्या प्रामुख्याखालीं इंग्रजांनीं पुन्हां सुतानाटी हें व्यापाराचें ठाणें कायम केलें.

कलकत्ता हें व्यापाराचें अशा रीतीनें मुख्य शहर करण्यास बरींच कारणें झालीं.  एक तर गंगानदीच्या प्रदेशांत होणारा सर्व तर्‍हेचा उत्तमोत्तम माल हुगळी नदींतून येथें येत असे.  दुसरें कलकत्ता अशा ठिकाणीं वसलेलें आहे कीं, तेथपर्यंत व्यापारी जहाजें जाऊं शकतात.  तिसरें पश्चिमेस नदी व पूर्वेस पाणथळ जागा असल्यामुळें शहराचें संरक्षण करणें सोपें होत असे, व नदींतील जहाजांतून त्याचें रक्षण करतां येणें शक्य असे.

सन १६९६ सालीं जेव्हां सुभासिंग नांवाच्या बरद्वानच्या जमीनदारानें धुमाकूळ आरंभिला तेव्हां इंग्रजांनीं या शहरास तटबंदी करण्याची परवानगी नबाबाजवळ मागितली व ती दिलीहि गेली.  दोन वर्षांनीं गोविंदपूर, सुतानाटी व कलकत्ता हीं हुगळीच्या गव्हर्नराजवळून विकत घेतलीं.  अशा रीतीनें १७०२ मध्यें तटबंदी घातलेलें हें एक मोठें शहर तयार झालें.  १७०७ सालीं ह्या शहराचा अधिकार लंडनच्या डायरेक्टरांच्या हातीं गेला.  १७१७ सालीं त्यांनीं दिल्लीहून बादशहाकडून हुगळीस कांही मिळकत विकत घेण्याची परवानगी मिळविली.

१७४२ सालीं त्यांनीं मराठ्यांच्या स्वारीच्या भीतीनें आपल्या ठाण्याभोंवतीं संरक्षणार्थ एक मोठा खंदक खोदला.  ह्यास 'मराठा खंदक' असें म्हणतात.

१७५६ सालीं बंगालचा नबाब सिराज उद्दौला ह्यानें हें शहर घेतलें.  गव्हर्नर व कांहीं रहिवाशी जहाजांवर पळून गेले व हालवेल व त्याचे लोक ह्यांस शरण जाणें भाग पडलें.  कलकत्त्याच्या कुप्रसिद्ध 'ब्लॅकहोल' (अंधारकोठडी) चा इतिहास 'सिराज उद्दौला' या लेखांत येईलच.  १७५७ सालीं क्लाईव्हनें पुन्हा हें शहर आपल्या ताब्यांत घेतलें व प्लासीच्या लढाईनंतर मिरजाफरनें इंग्रजांस २४ परगण्यांची जमीनदारी दिली व त्याबरोबरच शहर व इतर लहान खेडीं इनाम दिली.  नबाबाजवळून मिळालेल्या पैशानें गोविंदपूर निर्जन करून त्या ठिकाणीं फोर्ट विल्यम उभारण्यात आला.  १७७३ सालीं बंगालच्या गव्हर्नरला व त्याच्या कौन्सिलला हिंदुस्थानांतील सर्व वसाहतीवर ताबा चालविण्याचा हक्क मिळाला.  वॉरन हेस्तिग्जनें लवकरच मुर्शिदाबादहून सरकारी खजिना कलकत्ता येथें आणिला.

१७९४ सालीं येथें 'जस्टिसेस ऑफ धी पीस' नेमण्यांत आलें.  सन १८७४ सालीं 'न्यू मार्केट' उघडण्यांत आलें.  खुद्द कलकत्याची लोकसंख्या ९०७८५१ वर दिलीच आहे.  कोलुतोला भागाची लोकसंख्या पुष्कळ आहे.  व सर्वांत कमी लोकसंख्येचें मान अलीपूर व बालीगंज येथें आहे.

बंगाली, हिंदी, उडिया, इंग्रजी व उर्दू वगैरे एकंदर ५७ भाषा ह्या शहरामध्यें चालतात.  शेंकडा ६५ लोक हिंदू आहेत. मुसुलमान, ख्रिश्चन, बौद्ध, ज्यू, ब्रह्मी इत्यादि जातीचें लोकहि आहेत.  पुरुषांचें बायकांशीं प्रमाण २:१ पडतें.  त्यामुळें २० ते ५० वयाच्या ४३ पुरुषांनां १ वेश्या असें वेश्यांचें प्रमाण दिसून येतें.  पूर्वी हें प्रमाण याहूनहि अधिक होतें.

हिंदूंत ब्राह्मण, कैवर्त, सुवर्णवणिक इ. लोकांचा भरणा अधिक आहे.  सुमारें एकतृतीयांश लोक कारखान्यांतून काम करीत असून सुमारें एकचतुर्थांश लोक व्यापारांत आहेत.  शहराच्या उत्तरेस बरतोलामध्यें व त्याचप्रमाणें दक्षिणेस भवानीपुरामध्यें धंदेवाईक लोक रहातात.  बिहारमध्यें होणार्‍या सोर्‍याला पूर्वी बंदुकीच्या दारूकरितां इंग्लंडांतून फार मागणी होती.

तांदूळ, तीळ, कापड, ताग, साखर इत्यादि माल बाहेर जातो व मीठ खनिज द्रव्यें बाहेरून येतात.  धातू, तेल, साखर व यांत्रिक सामान, गरम कापड, मीठ, दारू व रेल्वेकरितां सामान, इत्यादि माल बाहेरून आणविला जातो.  एकंदर येणार्‍या मालापैकीं सात अष्टमांश माल यूरोपांतून येतो.  कच्चा ताग, चहा, अफू, चामडें, कडधान्य, नीळ, कापूस, कोळसा, कच्चे रेशीम, सोरा वगैरे माल बाहेरून येथें येतो.  येथून रंगून, मौलमेन, अकियाब, मुंबई, मद्रास इत्यादि बंदरांशीं व्यापार चालतो.

कलकत्यास 'रॉयल एक्सचेंज'; बंगाल चेंबर ऑफ कार्मस, 'बेंगाल बाँडेड वेअरहौस असोसिएशन', 'कलकत्ता ट्रेड्स असोसिएशन' आणि 'बंगाल नॅशनल चेम्बर ऑफ कॉमर्स' वगैरे व्यापारी संस्था आहेत.  पूर्वी येथील बंदर सरकारच्या व्यवस्थेखालीं होतें.  पण १८७० सालीं 'पोर्टट्रस्ट' निर्माण करण्यांत आलें.  १९१९-२० सालीं ट्रस्टचें उत्पन्न २६६०८०३२ रु. होतें.

बजबजै येथें असलेला 'पेट्रोलियम धक्का १८८६ सालीं बांधला व 'चहाची वखार' १८८७ सालीं स्थापिली.

लाल बझार व बौ बाजार हे शहराच्या मध्यभागीं आहेत.  कलकत्ता शहर हावर्‍याशीं एका तरत्या पुलानें जोडलेलें आहे.  येथें विजेच्या ट्रामगाड्या आहेत.  जुन्या शहरांत हायकोर्ट आहे व एक स्मालकॉज कोर्ट आहे.

सन १८८१ पावेतों उत्पन्नावर कर घेत नसत.  जुन्या शहरांत जमीनीस सारा नाहींच म्हटलें तरी चालेल.  इ.स. १९०३-०४ सालीं जकात व जमीन महसूल उत्पन्न ३८८ लाख रु. होतें.  बाहेर जाणार्‍या तांदुळावरच्या जकातीचें उत्पन्न सवापंधरालाख होतें.

म्युनिसिपल व्यवस्था कॉर्पोरेशन संघ, जनरल कमिटी व अध्यक्ष यांच्या स्वाधीन आहे.  पिण्याकरितां पाणी हुगळी नदीचेंच वापरतात.  सुमारें अर्ध शतकापूर्वी जमिनी खालून गटारें करण्यांत आलीं आहेत.  शहराच्या पूर्वभागांत खार्‍या पाण्याचीं तळीं आहेत.  यांत शहरांतील सर्व घाण वाहून जाते.  दर माणसी १५ शि. ४ पे. म्युनिसिपल कर पडतो.

कार्पोरेशनचें उत्पन्न सुमारें एक कोट रुपयांचें आहे.  इंप्रुव्हमेंट ट्रस्टची स्थापना १९१२ त झाली.  १९१९-२० सालाच्या अखेरीपर्यंत ५.१४ मैलाचा १,५९,५२१ चौ. फुटाचा रस्ता ट्रस्टनें कॉर्पोरेशनच्या हवालीं केला.

खासगी व सार्वजनीक अशा पुष्कळ चांगल्या इमारती कलकत्त्यास आहेत.  कलकत्याचा गव्हर्नरचा बंगला डर्बीशायरमधील केडलस्टन हॉलच्या धर्तीवर बांधलेला आहे.  चौरिंगी येथें 'अजबखाना' व जवळच एक अर्थशास्त्रीय म्यूझियम व कलाशिक्षणाची शाळा आहे.

डलहौसी चौकांत १८७० सालीं उघडलेलें जनरल पोस्ट ऑफीस आहे.  बहुतेक सर्व मोठीं मोठीं ऑफिसें येथेंच आहेत.  स्ट्रँडच्या जवळ मेटकॉफ हॉलमध्यें एक मोठें पुस्तकालय आहे; त्यास इम्पीरियल लायब्ररी म्हणतात.  टिपू सुलतानचा मुलगा गुलाम महमद ह्यानें उभारलेली एक मोठी मशीद धरमतोळा रस्त्यावर आहे.  शहराच्या दक्षिणेस कालीघाट आहे.  मैदान येथें उघड्या जागीं जनरल अक्टरलोनी ह्याचें थडगें आहे.  तसेंच 'न्यूयार्क' रस्त्यावर सर जेम्स औट्रम ह्याचा पुतळा आहे.

१८७६ सालीं उघडलेलें अलिपूर येथें एक प्राणिसंग्रहालय आहे.  सिबपूर येथें हुगळीच्या पलिकडील तीरावर एक बाग व इंजिनिअरिंग कॉलेज आहे.

अलीपूर येथें एक कैदेंत ठेवलेल्या मुलांकरितां शाळा आहे व दुलुंदा येथें अपराधी वेड्यांचें रुग्णालय आहे.  कलकत्ता विश्वविद्यालय १८५७ त स्थापन झालें; त्याला जोडलेलीं व इतर पुष्कळ कालेजें येथें आहेत.  प्रेसिडेन्सी कालेज, दि डोव्हटन कालेज, ला मारटीनीर कालेज, फ्रीचर्च : इन्स्टिट्यूशन, डफ कॉलेज लंडन मिशनरी सोसायटीज इनस्टिट्यूशन, संस्कृत कॉलेज, बिशप कॉलेज, सेंट झेवियर कॉलेज, जनरल असेम्बली इनस्टिट्यूशन, मेट्रोपोलिटन कॉलेज, सिटी कॉलेज, रिपन कॉलेज, सेन्ट्रल कॉलेज, पुरुषाकरितां वंगवासी कॉलेज व स्त्रियाकरितां बेथुन कॉलेज, कलकत्ता मेडिकल कॉलेज इ. १९११ सालीं कलकत्यास असलेल्या ८९६०६७ लोकांपैकीं २८७८६७ साक्षर व १२७२३४ इंग्रजी जाणणारे होते.  २८८३९३ स्त्रियांपैकीं ४७४३५ साक्षर व १६,१०३ इंग्रजी जाणणार्‍या होत्या.  यावरून शिकलेल्या बायका कलकत्यास फार आहेत असें दिसतें.

इंग्रजी वर्तमानपत्रें कलकत्यास खालीप्रमाणें निघतात.  इंग्लिशमन, इन्डियन डेलीन्यूज, स्टेट्समन, एम्पायर, बंगाली, अमृतबझार पत्रिका, इन्डियन मिरर, हिंदु पेट्रियट, आणि फारवर्ड वगैरे.  त्याचप्रमाणें इतर भाषेंत हितवादी, वसुमती, वंगवार्ता व भारतमित्र.  मॉडर्न रिव्ह्यू बिझिनेस वर्ल्ड, कॉलेजियन, इंडियन एक्सप्रेस, इंडस्ट्री यासारखीं इंग्रजी मासिकें आहेत.  पांच सहा सामान्य रुग्णालयांखेरीज स्त्रियांकरितां डफरिन व्हिक्टोरिया हॉस्पिटल व एडन हास्पिटल हीं आहेत.

कॅम्पबेल हास्पिटल हें हिंदुस्थानांत सर्वांत मोठें हास्पिटल आहे.  दोन वेड्यांची हास्पिटळें असून एक कुष्टरोग्याकरितां आहे.

नगरोपांत विभाग -  कासीपूर चितपूर; माणिकतोळा व गार्डनरिच नांवाच्या तीन म्युनिसिपालिट्यांस मिळून हें नांव दिलें गेलें आहे.  बंगालमधील चोवीस परगण्यांच्या मिळून होणार्‍या जिल्ह्यांचा हा एक पोटविभाग आहे.  ह्याचें क्षेत्रफळ १० चौरस मैल असून १९२१ सालीं लोकसंख्या १६९४१३ होती.  कासीपूर चितपूर हें खुद्द कलकत्ता शहराच्या उत्तरेस आहे.  माणिकतोळा ईशान्येस असून, गार्डनरिच नैर्ऋत्येस आहे.

दक्षिण नगरोपंत विभाग -  बंगालमधील चोवीस परगण्यांच्या जिल्ह्यामधील मुख्य विभागांत हें एक गांव असून कलकत्त्याच्या दक्षिण नगरोपांत विभागाचा ह्यांत समावेश होतो.  यांची १९११ सालीं लोकसंख्या १३५३३ होती.  हिंदूंची वस्ती जास्त आहे.  पंचनगरमच्या सीमेच्या आंतील सर्व जमीनीला 'नगरोपांत विभाग' ही संज्ञा १८५७ सालच्या २१ साव्या अॅक्टाप्रमाणें दिली गेली आहे.  १८७६ सालच्या बंगाल म्युनिसिपल अॅक्टानें ही सीमा आणखी वाढवून ह्यांत 'दक्षिण नगरोपांत विभाग', 'टोलीगंज' व कलकत्त्याचा थोडासा भाग' ह्यांचा समावेश केला.  मुख्य गांवांचीं नांवें बरीसा व बेहाला हीं आहेत.

कलकत्त्या नजीकचे कालवे -  हे कालवे चोवीस परगणे, खुलना, बकरगंज व फरीदपूर ह्या बंगालमधील व कांहीं आसाममधील जिल्ह्यांतून होडकीं जाण्यायेण्यायेवढे मोठे कालवे काढण्यांत आले आहेत.  हे सर्व हुगळीच्या पूर्वेस पसरविलेले असल्यामुळें दळणवळणाच्या दृष्टीनें फार सोईचे झाले आहेत.  ह्या कालव्यांतून साधारणपणें दरवर्षी एक लाखाहून अधिक टन माल वर खालीं जातो येतो.  पूर्वबंगाल व उत्तरबंगालमधून तांदूळ, ताग, व बीं, आसाम व काचारमधून चहा, त्याचप्रमाणें सुंदरबनमधील उत्पन्न वगैरे माल ह्याच मार्गांनीं कलकत्ता शहरीं आणिला जातो.  त्याचप्रमाणें मीठ, मातीचें तेल वगैरे माल कलकत्त्याहून त्या त्या जिल्ह्यांत पुरविला जातो.  कालव्याच्या वेगवेगळ्या पाटांना वेगळीं वेगळीं नावें आहेत.  बेलिया घाट कालवा, टोली नाका, सरक्यूलर कालवा, न्यूकट, भान्गर, बोट कालवा, भादरीपूर बील इत्यादि.

बकरगंज जिल्ह्यांतील बारिसाल येथून तांदूळ आणितां यावा हा हे कालवे काढण्याचा मुख्य उद्देश होता.  १९०२-०३ सालीं ह्या कालव्यापासून दीड लाख रुपये उत्पन्न झालें व साधारणपणें ५ कोट रु. मालाची नेआण करण्यांत आली.

(संदर्भग्रंथ -  इं. गॅ; सेन्सस रिपोर्ट; बस्टीड-एकोज फ्रॉम ओल्ड कलकत्ता; अॅनल्स ऑफ बेंगाल; हिस्टरी ऑफ कलकत्ता; हिल-बेंगाल इन् १७५६-५७; फॉरेस्ट:-सिटीज ऑफ इंडिया.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .