प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कर्‍हाड, तालुका - मुंबई इलाखा.  सातारा जिल्ह्यांतील तालुका.  क्षे. फ. ३७८ चौ. मै. यांत कर्‍हाड हें मुख्य ठिकाण व दुसरीं ९८ लहान गांवें आहेत.  एकंदर लो. सं. (१९११) १३२५३१.  हा तालुका कृष्णा खोर्‍याचा एक भाग असून याच्या दोन्हीं बाजूला दक्षिणोत्तर डोंगरांच्या रांगा आहेत.  आगाशी, बहिरोबा, कमळेश्वर, मंडकेश्वर, नाइकबा, चंदोबा, चोरोबा व थोरोबा हे डोंगर मुख्य आहेत.  आगाशीच्या डोंगरांत कोरींव लेणीं आहेत.  पश्चिम डोंगरांतून कोयना नदी येऊन कर्‍हाड येथें कृष्णेस मिळते.  प्रदेश सामान्यतः सपाट व खुला असून डोंगराच्या बाजूस मात्र चढउतार आहेत.  बागा व मळे यांच्या योगानें या तालुक्यांतील प्रदेशाला मनोरमता आली आहे.  येथील जमीन चांगली सुपीक आहे.  हिवाळ्यांत दिवसा थंडी फारशी नसते परंतु रात्री बरीच असते व उन्हाळ्यांत कर्‍हाड येथें उष्मा बराच होतो.  वार्षिक पाऊस सरासरी ३० इंच पडतो.

कर्‍हाडचा आसमंत प्रदेश -  कर्‍हाड येथें सांपडलेल्या ताम्रपटांत त्याला करहाट म्हटलें आहे.  येथील शिलालेखांत असलेल्या कल्लिआदि बारा गांवांचीं हल्लींचीं नांवें खालीलप्रमाणें आहेत :-

(१) कल्ली, (२) कंकी, (३) आजूर, (४) सिजूर, (५) आढी, (६) सल्गन, (७) बेकोंकी, (८) तितूर, (९) खटाव, (१०) निग्नूर, (११) पांद्रेगांव, (१२) तावशी.  शिलालेखांत हीं गांवें अग्रणी नदीच्या आसपास आहेत असें दिलें आहे.  ही नदी हल्ली अगुर्णि या नावानें प्रसिद्ध आहे.  या गावांपैकीं सल्गर हें पूर्वी सेलगार या नांवानें प्रसिद्ध होतें.  आजूर याला हल्लीं अजुर म्हणतात.  व अग्रणीच्या पूर्वेस व कांगानोलीपासून तें सात मैल आहे.  सिजुर हें चुकीनें सिपुरबद्दल पडलेलें नांव आहे व हें सिपुर कांगानोलीच्या दक्षिणेस सात मैलांवर आहे.

करहाट चार हजार प्रांत -  या प्रांतांत चार हजार शहरें असावीं म्हणून याला करहाट चार हजार प्रांत म्हणत.  हल्लींच्या कर्‍हाड गावांवरून या प्रांताला हें नांव पडलेलें असावें.  हा प्रांत कृष्णा नदीच्या पूर्व व दक्षिण किनार्‍यांवर कर्‍हाड व बिड्री यांच्यामध्यें होता.  या प्रांताची सीमा निश्चित करण्यासारखी माहिती अद्याप उपलब्ध झाली नाहीं.  (इं. ऍं. ३० पा. ३७४-८२).

शहर -  सदर्न मराठा रेलवेवर सातार्‍याच्या दक्षिणेस एकतीस मैलांवर असून कृष्णा व कोयना या नद्यांच्या संगमावर आहे.  कोयना उत्तरेकडून आणि कृष्णा नैर्ऋत्येकडून वहाते.  नद्यांचा संगम पूर्वेकडे सरासरी १॥ मैल वहात जाऊन दक्षिणेकडे वळतो; व त्या काटकोनांत हें शहर आहे.  याची वायव्येकडील जमीन कोयना नदीच्या तीरापेक्षां ८० ते १०० फूट उंच आहे व उत्तरेकडील जमीन जरा खालवट असून नदीच्या बाजूस घाट आहेत.  वायव्येस ६ मैलांवर वसंतगडकिल्ला, ईशान्येस ४ मैलांवर सदाशिवगड टेकडी आणि आग्नेयेस ४ मैलांवर अगाशिव नांवाचें पर्वताचें शिखर आहे.

या ठिकाणीं पुणें-बेळगांव, कर्‍हाड-चिपळूण, कर्‍हाड-तासगांव, कर्‍हाड-विजापूर आणि कर्‍हाड-मसूर या पांच रस्त्यांचा संगम आहे.  याचें क्षेत्रफळ सरासरी औरसचौरस अर्धामैल असून यांतील जमीन काळी (सुपीक) आहे.  याच्या वायव्येस असलेला (मातीचा) किल्ला पहिल्यानें मुसुलमानांच्या ताब्यांत होता.  नंतर पंतप्रतिनिधीकडे होता आणि त्यांच्यापासून १८०७ सालांत पेशव्यांनीं जिंकला.  त्या किल्याजवळ व नद्यांच्या संगमाजवळ देवळें आहेत. पाण्याच्या उलट्या ओघानें वाळू वगैरे आंत येऊं नये म्हणून पूर्वी त्या ठिकाणीं पक्के बांध घातलेले होते; परंतु ते आतां कोसळून पडले आहेत.  शहरांतून दक्षिणोत्तर जाणार्‍या बाजूनें मुख्य व्यापारी रहातात व तेथें दर रविवारीं बाजार भरतो.  बाजाराजवळ मुसुलमानांची वस्ती पुष्कळ आहे व जवळच एक मशीद आहे.  विजापूरच्या राजानें यांत पूर्वी नेमलेल्या काजीचा वंशज अद्याप आहे.  यांतील मुख्य मुख्य रस्ते रुंद असून स्वच्छ आहेत.  यांतील कांहीं भागांत नळानें पाणी देण्याची सोय केली आहे.

देवळें -  यांत एकंदर ५२ देवळें आहेत.  त्यांपैकीं कृष्णाबाई देवी, काशीविश्वेश्वर आणि कमलेश्वर महादेव यांचीं देवळें मुख्य आहेत, व तीं सर्व कृष्णानदीच्या घाटावर आहेत.

किल्ला :-  ईशान्येच्या बाजूस पंतप्रतिनिधींचा (मातीनें बांधिलेला) किल्ला असून त्यांत त्यांचा एक दुमजली वाडा आहे.  वाड्यांतील दिवाणखाना ८३ फूट लांब, ३१ फूट रुंद व १५ फूट ऊंच आहे व त्याच्या पूर्वेकडील भागांत भवानी देवीची छत्री आहे.  हा किल्ला परशुराम श्रीनिवास प्रतिनिधींच्या मातुश्री काशीबाई यांनीं १८०० त बांधिला.  किल्याच्या पश्चिमेकडील भागाच्या शेवटीं पायर्‍यांची एक विहीर आहे.  ती कोयना नदीच्या पात्रापेक्षांहि खोल असून नदीचें पाणी नळानें विहीरींत घेतलें आहे.  विहीरीचें तोंड १३६ फूट लांब आहे.  विहीरींतल्या पायर्‍या, कमानी व चुनेगच्चीचें काम यावरून असें दिसतें कीं ती मुसुलमानांनीं बांधिली असावी.  विहीरीच्या आंतल्या बाजूस चुनेगच्चींतच तीन ठिकाणीं खोल्या आहेत.  किल्ल्यावर एकंदर बारा बुरूज आहेत, व भोंवतालची तटबंदीची भिंत ६ फूट उंच असून तिच्यांत जंग्या आहेत.  १८७५ त जो पूर आला होता त्यानें किल्ल्याचें बरेंच नुकसान केलें.  हल्लीं किल्ल्याची स्थिति फारच खराब झाली आहे.

मशीद व मनोरे -  विजापूरचा पांचवा राजा, पहिला अल्ली अदील शहाच्या वेळेस इब्राहिमखान नांवाच्या इसमानें ही मशीद बांधिली असें तिच्यावरील लेखांवरून दिसून येतें.  मशीदींतील खांबावर आरबी भाषेंत एकंदर नऊ लेख आहेत.  मनोरे १०६ फूट उंच आहेत.  त्यांच्या डाव्या बाजूस मुशाफरखाना व हमामखाना (स्नानगृह) आहे व उजव्या बाजूस मशीद आहे.

येथें पैशाच्या देवघेवीचा व्यापार फार आहे.  कर्‍हाड-चिपळून रस्त्यावरून व्यापार बराच चालतो.  बाजारांत धान्य, कापड आणि मातीचीं व धातूचीं भांडीं विकावयास येतात.  येथें महत्वाचें धंदे नाहींत.  स्वदेशी आगकाड्यांच्या पेट्यांचा कारखाना येथें नवीन सुरु झाला आहे.

इ.स. १८४४ त कृष्णानदीस पूर येऊन याचें फार नुकसान झालें.  किल्याची वायव्येकडील भिंत शहरांतील कांहीं घरें पुरांत वाहून गेलीं.

येथील लोकसंख्या (१९११) ११२२८ आहे.  म्युनिसिपालिटीची स्थापना १८५५ त झाली.  गांवांत एक हायस्कूल व कांहीं मराठी शाळा आहेत.  त्यांपैकीं एक हिंदी व एक मुलींकरितां शाळा आहे.  तालुक्याचें मुख्य ठिकाण असल्यामुळें मामलेदार, मुनसफ वगैरे अधिकार्‍यांच्या कचेर्‍या आहेत.

कोरीव लेणीं -  याच्या नैॠत्येकडील टेंकड्यांत बुद्ध लोकांचीं कोरीव लेणीं आहेत.  त्यांचें वर्णन पहिल्यानें सर बार्टले फ्रिअर यानें १८४९ त केलें.  लेण्यांच्या तीन ओळी आहेत.  पहिली ओळ दक्षिणेकडे जखनवाडी खेड्याजवळ असून त्यांत २३ गुहा आहेत.  दुसरी ओळ आग्नेयेस असून तींत १९ गुहा आहेत आणि तिसरी ओळ कोयना दरीच्या समोर असून तींत २२ गुहा आहेत.  वरील ६४ गुहांशिवाय दुसर्‍या पुष्कळ लहान गुहा आणि एक पाण्याचें कुंड आहे.  मोठ्या गुहेंतील खोलींत खांब नसणें, लहान लहान गुहा, निजण्याकरितां दगडाचें अंथरुण, चैत्यांच्या मूळच्या आकृती आणि नकसकामाचा अभाव या सर्वांवरून हीं लेणीं फार जुनीं आहेत असें दिसतें.  ओबडधोबड व ठिसूळ दगडांत गुहा खोदलेल्या असल्यामुळें जरी त्यांच्यावर कांहीं लेख लिहिलेले असले, तरी इतका काळपर्यंत तीं अक्षरें रहाणें शक्य नाहीं.  एका लेखाचा कांहीं भाग उपलब्ध झाला आहे व त्यांतील अक्षरें ओबडधोबड कोरलेलीं असून तो लेख कार्ल्यांतील लेखाइतका जुना, म्हणजे ख्रिस्ती शकाच्या पहिल्या किंवा दुसर्‍या शतकांतला आहे.  यावरून तीं लेणीं पुण्यांतल्या शेलारवाडी अथवा गारोडी आणि कुलाब्यांतील कुडा आणि पाल या लेण्यांच्या वेळची असावींत.  जुन्नर आणि नाशिक येथील गुहा व या गुहा यांच्या काळामध्यें फारसें अंतर नाहीं.  जो लेखाचा कांहीं भाग उपलब्ध आहे म्हणून वर सांगितलें आहे तो असा :-

गोपाळाचा मुलगा संगमित्र याजकडून या गुहेची पुण्यकारक देणगी.  (फर्ग्युसन आणि बर्जेस - केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया, पा. २१३-२१७).

इतिहास -  ख्रिस्ती शकापूर्वी २०० सालापासून व ख्रिस्ती शकानंतर १०० सालापावेतोच्या लेखांत कर्‍हाडचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो, आणि त्यांत असें लिहिलेलें आहे कीं, कर्‍हाडच्या यात्रेकरूंनीं मध्यप्रांताच्या जबलपूरजवळील भारहुतस्तूप येथें व कुलाब्यांतील अलिबागेच्या दक्षिणेस तीस मैल अंतरावर असलेल्या कुडा येथें देणग्या दिल्या होत्या.  त्या लेखावरून असें दिसतें कीं, कर्‍हाडास, करहाटक म्हणत असत.  शालिवाहन शकाच्या ११ व्या शतकांत येथें शेलारांचें राज्य होतें (वि. विस्तार पु. २२ पा. १०१).  विजापूरच्या सातव्या राजानें, महंमद अदिलशहानें, सन १६३७ सालीं शिवाजीच्या बापास (शहाजीस) कर्‍हाड जिल्ह्यांतल्या २२ खेड्यांवरची देशमुखी इनाम दिली होती.  १६५३ त ती देशमुखी मुधोळच्या बाजी घोरपड्याकडे आली.  १६५९ त जेव्हां अफझुलखानाचा वध झाला तेव्हां शिवाजीच्या एका अधिकार्‍यानें, (खंडुजी काकडे यानें) लांच घेऊन खानाच्या बायकोस व मुलांस सुरक्षितपणें कर्‍हाडांत आणून पोहोचविलें.  शिवाजीस चिरडण्याची निराशा होऊन विजापूरच्या आठवा राजानें- दुसर्‍या अली अदिलशहानें - स्वतः सैन्यानिशीं १६६१ च्या जानेवारींत या ठिकाणीं तळ दिला होता.

रामराजे यांचें संरक्षण शिवरामपंत अमात्य यांची स्त्री दुर्गाबाई ''इनें फार फार जपून केलें; त्यास दुर्गाबाईच्या साडीचोळीबद्दल प्रांत कर्‍हाड येथील सरदेशमुखीचें वतन स्वामी (छत्रपतीचें) आहे, तें तिजला इनाम करून देऊन चालविलें जाईल'' असें शाहुछत्रपति स. १७४५ त म्हणतात (रा. खं. ८. २०१).  इ.स. १७६३ मध्यें कर्‍हाडास गमाजी यमाजी यांची व नरसिंगराव पागे यांची लढाई होऊन तींत गमाजीचा पराभव होऊन तो दांतेगडास पळाला (रा. खं. १०५).  इ.स. १७८८ त प्रतिनिधींचें लग्न येथें झालें (कित्ता २२३).  कर्‍हाड परगण्याच्या देशमुखीबद्दल जगदळे व जाधव यांच्यांत फार पूर्वीपासून भांडणें लागलीं होतीं.  शेवटीं भोसल्यांनींच ती जप्‍त करून स्वतःकडे घेतली (रा. खं. १५).  कर्‍हाड येथें मराठशाहींत व मुसुलमानशाहींत वाद व तंटे वगैरे तोडीत असत.  कर्‍हाडच्या मनोर्‍यांत कैदी ठेवण्याची चाल मुसुलमानशाहींत होती.  (रा. खं. १५. ११३).  येथें शाहु व संभाजी छत्रपती यांच्या भेटी झाल्या (स. १७३०).  

१७९० सुमारच्या जमाबंदींत हा रायबागांतील मुख्य परगणा असून याचें सार्‍याचें उत्पन्न ३,६२,५५० रु. होतें.  १८०५ मध्यें बाजीराव पेशवा व शिंदे यांनीं प्रतिनिधी परशुराम श्रीनिवास यांस धरण्याचा मनसुबा केला तेव्हां पुण्यांतून तो आपल्या जहागिरीच्या गांवीं कर्‍हाडास पळाला.  बाजीराव पळत असतांनां या ठिकाणीं १८१८ च्या जानेवारीच्या २३ तारखेस थांबला होता.

कराड हें पंतप्रतिनिधींचें मुख्य शहर व रहाण्याचें ठिकाण होतें.  त्यांत २५०० घरें असून त्यांत २०० कोष्टी, १०० तेली, २५ कांबळे विणणारे आणि ३० कागद तयार करणारे होते,'' असें १८२७ त क्यापटन् क्ल्यून यानें म्हटलें आहे.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .