प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कर्मवाद -  या जगामध्यें मानवाला जी भिन्न भिन्न स्थिति प्राप्‍त होते व त्याला जीं निरनिराळीं दुःखें प्राप्‍त होतात त्यांच्या मूळ कारणाचा उलगडा भारतीय तत्त्वज्ञानपद्धति कर्मवादानें करते.  भरतखंडांत कर्मवाद हा शब्द फार प्राचीन काळापासून माहीत आहे.  परंतु यूरोपीयांस तो नवीन निघालेल्या थिऑसफी या संप्रदायामार्फत माहीत झालेला आहे.  भारतीयांची अशी समजूत आहे कीं जीवात्म्यास अनेक जन्मांच्या फेर्‍यांतून जावें लागतें व त्याला विशिष्ट जन्मांत जें सुख अथवा दुःख मिळतें तें त्याच्या पूर्वजन्मांतील कर्माचें फल होय.  ही उपपत्ति सर्वथैव समाधारकारक नाहीं.  कारण हिच्यामुळें अगदीं प्रारंभींच्या जन्मासंबंधीचा कांहींच उलगडा होत नाही.  तथापि हिच्या मुळें बर्‍याच लोकांस समाधान वाटतें.  पुष्कळांची नैतिक आचरणाकडे प्रवृत्ति होते व कांहीं अंशीं ती सत्यहि आहे.  कर्मवाद अथवा कर्माचें फळ भोगावेंच लागतें ही कल्पना भरतखंडांत वैदिक कालापासून चालत आली आहे.  कर्माची कल्पना ब्राह्मणग्रंथांत आढळते.  बृहदारण्यक उपनिषदांत (३.२,३) व इतर उपनिषदांत कर्मवाद वाढीस लागल्याचें दिसतें.  नैतिक कल्पनांमध्यें या तत्त्वास बरेंच प्रामुख्य दिलेलें आढळतें.  एखादा मनुष्य जर कुरूप अथवा रोगी स्थितींत जन्मास आला तर त्याचें कारण त्यानें पूर्वजन्मीं केलेलें पाप होय असें मानीत.

महाभारतांत अनेक ठिकाणीं कर्माचें प्राबल्य वर्णिलें आहे.  उदाहरणार्थ शांतिपर्वामध्यें १८१ व्या अध्यायांत असें म्हटलें आहे कीं, मनुष्य कितीहि वेगानें धांवूं लागला तरीहि पूर्वजन्मीचें कर्म त्याचा पाठलाग करीत असतें.  तो निजला तरीहि तें त्याजबरोबर निजलेलें राहतें.  तो उभा राहिला तर त्याच्या समीप उभें रहातें; तो चालू लागला तर त्याच्या मागून चालूं लागतें आणि तो कर्म करूं लागला तर तेंहि कर्म करूं लागतें.  सारांश प्राण्याच्या मागें त्याचें प्राक्तनकर्म छायेसारखें जडलेलें असतें.  ज्या ज्या पुरुषानें पूर्वी आपल्या इच्छेप्रमाणें जें जें कर्म केलें असेल तें तें सदैव त्याला एकट्यालाच भोगावें लागतें.  स्वकर्मफल हा ज्याचा ठेवा आहे व दैव ज्याचें संरक्षण करीत आहे अशा या प्राणिसमुदायाला जिकडूनतिकडून काळ खेंचीत असतो.  तसेंच २११ व्या अध्यायांत वासनेच्या योगानें कर्म घडतें व कर्माच्या योगानें वासनेची उत्पत्ति होते अशा रीतीनें हें अनादि आणि अनंत चक्र चालू आहे असें सांगितलें आहे.  तसेंच अनुशासनपर्वांत ५७ व्या अध्यायामध्यें कोणतें कर्म केलें असता कोणतें फल मिळतें याची एक लांबलचक यादी दिली आहे.  पण त्यांत कोणतें दान दिलें असतां त्यापासून पुढें काय मिळतें हेंच विशेषतः सांगितलें आहे.  अशा प्रकारचीं कर्मे व त्यांची फलें यांची यादी २२ व्या अध्यायांतहि आढळते.

भगवद्गीतेंतहि कर्मवादाचें विवेचन आढळतें.  लोकमान्यांनीं आपल्या गीतारहस्यांत कर्मविपाकाचें सुंदर विवेचन केलें आहे.  त्याचा सारांश असा :-  

मनुष्यानें केलेल्या अशुभ कर्मांचे मनूनें कयिक, वाचिक व मानसिक असे तीन भेद करून त्या त्या कार्मांपैकीं शिंदळकी, हिंसा व चोरी हीं तीन कायिक; कडू, खोटें, उणें आणि विसंगत बोलणें हीं चार वाचिक; आणि परद्रव्याभिलाष, दुसर्‍याचें वाईट चिंतणें आणि खोटा आग्रह हीं तीन मानसिक, मिळून दहा प्रकारचीं अशुभ किंवा पापकर्मे सांगितल्यावर (मनु. १२. ५-७; म. भा. अनु. १३) पुढें त्यांचीं फलें दिलीं आहेत.  तथापि हे भेद कांहीं कायमचे नाहींत.  कारणा याच अध्यायांत पुढें एकंदर कर्मांचे सात्त्विक, राजस आणि तामस असे तीन भेद केले असून प्रायः भगवद्‍गीतेंत वर्णन केल्याप्रमाणेंच या तीन प्रकारच्या गुणांची किंवा कर्मांची लक्षणें दिलेलीं आहेत (गी. १४. ११-१५; १८. २३-२५; मनु. १२. ३१-३४).  परंतु कर्मविपाकप्रकरणांत कर्माचा जो विभाग सामान्यतः आढळून येतो तो या दोहोंहून निराळा असून त्यांत कर्माचे संचित, प्रारब्ध व क्रियमाण असे तीन भेद केलेले असतात.  कोणाहि मनुष्यानें आजच्या क्षणापर्यंत केलेलें जें कर्म-मग तें या जन्मांत केलेलें असो वा पूर्वीच्या जन्मांत केलेलें असो तें सर्व- यास ' संचित ' म्हणजे ' सांठविलेलें ' कर्म असें म्हणतात.  या संचितास ' अदृष्ट ' किंवा मीमांसकांच्या परिभाषेंत ' अपूर्व ' अशीं दुसरीं नांवें आहेत.  हीं नांवें पडण्याचें कारण असें कीं, कर्म किंवा क्रिया ज्यावेळीं करावी त्या वेळेपुरतीच ती दृश्य  असतें; आणि ती वेळ गेल्यावर पुढें तें कर्म स्वरूपतः शिल्लक न रहातां त्याचे सूक्ष्म अतएव अदृश्य असे अपूर्व किंवा विलक्षण परिणाम मात्र शिल्लक रहातात (वे. सू. शां. भा. ३. २. ३९-४०).  कांहीं म्हटलें तरी 'संचित' 'अदृष्ट' किंवा 'अपूर्व' याचा अर्थ या क्षणापर्यंत जीं जीं कर्मे केलीं असतील त्या सर्वांच्या परिणामांचा ' सांठा ' हें निर्विवाद आहे.  हीं संचित कर्मे सर्व एकदम भोगणें शक्य नसतें.  कारण या संचित कर्मपरिणामांपैकीं कांहीं चांगलें तर कांहीं वाईट म्हणजे परस्परविरोधी फलें देणारे असूं शकतात.  उदाहरणार्थ, कांहीं संचित स्वर्गप्रद तर कांहीं नरकप्रद असल्यामुळें त्या सर्वांचीं फळें एके काळीं उपभोगणें शक्य होत नाहीं; एकामागून एक भोगिलीं पाहिजेत.  म्हणून 'संचिता' पैकीं जेवढ्या कर्मांचीं फलें भोगण्यास प्रथम सुरुवात झाली तेवढ्यांसच 'प्रारब्ध' म्हणजे 'सुरू झालेलें संचित' असें म्हणतात.  वेदान्तसूत्रांत प्रारब्धासच 'प्रारब्धकार्य' आणि जीं प्रारब्ध नाहींत त्यांस 'अनारब्धकार्य' अशीं नांवें दिलीं आहेत (वे. सू. ४. १, १५).  संचितांपैकीं जीं कर्मे प्रारब्ध झालीं तीं भोगल्याखेरीज सुटला नाहीं ''प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षयः ।''  पण अनारब्धकार्यकर्माची गोष्ट तशी नाहीं.  ज्ञानानें या सर्व कर्मांचा अजीबात नाश करितां येतो.  प्रारब्धकार्य व अनारब्धकार्य यामध्यें जो हा महत्वाचा भेद आहे त्यामुळें ज्ञानी पुरुषास ज्ञानोत्तरहि नैसर्गिकरित्या मरण येईपर्यंत म्हणजे देहाच्या जन्माबरोबर प्रारब्ध झालेलीं कर्मे संपेपर्यंत, शांतपणें वाट पहावी लागत.  तसें न करितां हट्टानें देहत्याग करील तर ज्ञानानें त्याच्या अनारब्ध कर्मांचा जरी क्षय झाला असला तरी त्याच्या हट्टामुळें ज्या देहारंभक प्रारब्धकर्मांचा भोग अपुरा राहिला तीं भोगण्यास त्याला पुनः जन्म घ्यावा लागेल; व मग अर्थांतच मोक्ष अंतरेल असें वेदान्त व सांख्य या दोन्ही शास्त्रांत सांगितलें आहे (वे. सू. ४. १, १३-१५ व सां. का. ६७).

मीमांसकदृष्ट्या सर्व कर्मांचे नित्य, नैमित्तक, काम्य आणि निषिद्ध असे चार भेद होतात.  पैकीं संध्यादिक नित्य कर्मे न केल्यास पाप लागतें, आणि नैमित्तिकांचें निमित्त उपस्थित झाल्यास तीं करावीं लागतात.  म्हणून हीं दोन्हीं कर्मे केलीं पाहिजेत असें या मीमांसकांचें म्हणणें आहे.  बाकी राहिलेलीं काम्य आणि निषिद्ध.  पैकीं निषिद्ध कर्मे केल्यानें पाप लागतें म्हणून तीं करूं नयेत; व काम्य कर्मे केल्यानें त्यांचीं फलें भोगण्यास पुनः जन्म घ्यावा लागतो म्हणून तींहि करूं नयेत.  अशा रीतीनें म्हणजे निरनिराळ्या कर्माच्या परिणामांचा तारतम्य विचार पाहून मनुष्य कांहीं कर्मे सोडून देईल व कांहीं यथाशास्त्र करीत राहील तर तो आपोआपच मुक्त झाला पाहिजे.  कारण, प्रारब्ध कर्मे या जन्मांतील उपभोगानें संपलीं आणि या जन्मांत सर्व नित्य नैमित्तिक कर्मे केल्यामुळें व निषिद्ध वर्जिल्यामुळें नरकगति घडत नाहीं व काम्य कर्मे सोडिल्यामुळें स्वर्गादिकांतील सुखें भोगण्याचीहि अवश्यकता उरत नाहीं.  इहलोक, नरक आणि स्वर्ग या तिन्ही गती याप्रमाणें सुटल्यावर मोक्षाखेरीज आत्म्याला दुसरी गतीच रहात नाहीं.  या वादास 'कर्ममुक्ति' किंवा 'नैर्ष्कम्यसिद्धि' असें म्हणतात.  पण मीमांसकांच्या वरील युक्तींत हें नैर्ष्कम्य पूर्णपणें साधत नाहीं, असें वेदान्त शास्त्रानें ठरविलें आहे (वे.सू.शां.भा. ४. ३, १४); आणि गीतेंतहि याच अभिप्रायानें ''कर्म न केल्यानें नैर्ष्कम्यॅ होत नाहीं व सोडल्यानें सिद्धीहि मिळत नाहीं '' असें म्हटलें आहे (गी. ३.४).

अध्यात्मशास्त्राप्रमाणें या जगांतील सर्व पदार्थांचें कर्म (माया) आणि ब्रह्म हे दोनच वर्ग होतात; म्हणून ज्या कोणाला यांपैकीं एका वर्गांतून म्हणजे कर्मांतून सुटण्याची इच्छा आहे त्यानें दुसर्‍या वर्गांत म्हणजे ब्रह्मस्वरूपांत शिरावें एवढाच काय तो एक मार्ग त्यास खुला रहातो.  ''माझी कर्माच्या ठायीं आसक्ति नसल्यामुळें मला कर्माचा लेप लागत नाहीं हें ज्यानें जाणिलें तो कर्मपाशापासून मुक्त होतो'' असें जें गीतेंत भगवंतांनीं म्हटलें आहे (गी. ४.१४ व १३.२३) त्यांतील तात्पर्य हेंच आहे.  या ठिकाणीं 'ज्ञान' म्हणजे नुसतें शाब्दिक ज्ञान किंवा नुसती मानसिक क्रिया असा अर्थ नसून वेदान्तसूत्रांवरील शांकरभाण्यांत आरंभींच सांगितल्याप्रमाणें 'ज्ञान' म्हणजे ''मानसिक ज्ञान प्रथम होऊन इंद्रियांचा जय केल्यावर ब्रह्मीभूत होण्याची अवस्था किंवा ब्राह्मी स्थिति'' एवढा सर्व अर्थ दर वेळीं विवक्षित आहे हें विसरतां कामा नये.

तथापि बौद्ध संप्रदायांत कर्मवादाची वाढ परकाष्ठेची झाली.  इतर ठिकाणीं कर्मवादाचा, फक्त नीतितत्वें उल्लंघन केल्यास अनिष्ट फळ मिळतें एवढेंच दाखविण्यास पुरेसा उपयोग केलेला आढळतो.  परंतु बौद्ध ग्रंथामध्यें सर्वच गोष्टींच्या मुळाशीं कर्म आहे व कर्मानें सर्व प्रश्नांचा उलगडा होतो असें दाखविलें आहे.  म्हणून बौद्धांच्या कर्मवादाकडे विशेष लक्ष दिलें पाहिजे.

भारतीय तत्वज्ञानापद्धतींत सामान्यतः आत्म्याचें अस्तित्व गृहीत धरलें आहे.  परंतु बौद्ध तत्वज्ञानांत जीव म्हणजे कर्माच्या योगानें अनेक द्रव्यांचा एकत्र झालेला व क्षणोक्षणीं बदलणारा समुच्चय असें म्हटलें आहे.  यामुळें बौद्ध पुनर्जन्म मानीत नाहींत.  जेव्हां एखादा मनुष्य मृत होतो तेव्हां एक नवीन मनुष्य जन्मास येऊन मृत जीवाचें कर्म ग्रहण करितो अशी त्यांची उपपत्ति आहे.  किंवा मनुष्याचा विशिष्ट जन्म हा त्यानें आपल्या कर्माबद्दल भोगावयाचा जन्मपरंपरेंतील एक विशिष्ट काल असून पूर्वसंचितापैकी राहिलेलें कर्मफळ भोगण्यास त्याला त्या विशिष्ट जन्मानंतर आणखीहि जन्म घ्यावे लागतात.

ब्राह्मणी तत्वज्ञानाप्रमाणें दैव हें कर्मापेक्षां श्रेष्ठ आहे व ही सृष्टि ब्रह्मदेवानें निर्माण केलेली आहे.  परंतु बौद्ध तत्वज्ञानाप्रमाणें पूर्वार्जित कर्म हेंच दैव, व सर्व जीवांचें एकवटलेलें कर्म हेंच सृष्टीचें कारण होय.  धार्मिक कृत्यें, तप व त्यांपासून मिळणारें पुण्य यांस पूर्वी बरेंच महत्त्व होतें.  कर्माला प्रथम मानसिक चेतना आणि नंतर शारीरिक क्रिया या दोन गोष्टी अवश्य असतात.  कांहीं क्रिया केवळ मानसिकच असतात परंतु मानसिक क्रियेपेक्षां प्रत्यक्ष शारीरिक क्रियेचें महत्त्व अधिक आहे.  शत्रूला प्रत्यक्ष  मारणें हें हें केवळ मारण्याची इच्छा करण्यापेक्षां अधिक महत्त्वाचें आहे.  

कर्म दोन प्रकारचें असतें.  शुद्ध अथवा अशुद्ध.  शुद्ध कर्म वासना, अज्ञान इत्यादिकांपासून अलिप्‍त असतें म्हणून त्याचें फल भोगावें लागत नाहीं; अशा कर्मापासून संसाराचा उच्छेद होऊन निर्वाणप्राप्‍तीचा मार्ग सुकर होतो.  इतर सर्व कर्मे अशुद्ध होत व त्यांचे पुन्हां चांगले व वाईट, पुण्यकारक व पापदायक असे फलांवरून भेद करतां येतात.  या जगांत सुख मिळावें म्हणून केलेलीं कर्मे वाईट व परलोकांत सुख मिळावें म्हणून केलेलीं कर्मे चांगलीं असें समजतात.  त्याच प्रमाणें दुसर्‍याचें बरें किंवा वाईट करण्याच्या उद्देशानें केलेलीं कर्मे सुचरित्रें किंवा दुश्चरित्रें मानिलीं जातात.

सुचरित्रांचें मूळ अलोभ, अद्वेष, आणि अमोह, या तीन गोष्टींत असतें.  सत्कृत्याच्या विरुद्ध केलेलीं सर्व दुष्कृत्यें होत, तसेंच मिथ्यादृष्टीनें केलेलीं सत्कृत्येंहि मिथ्या होतात.  सत्कृत्यांचें फल मनुष्यानें जाणून बुजून (दृष्टिचरित) इतर पाप केलें असल्यास मिथ्या होतें.  अर्थात पशु, षंढ इत्यादिकांचीं दुष्कृत्यें सत्कृत्यांचें फल नाहींसें करूं शकत नाहींत.

कर्माचे तीन विभाग करितात; कुशल, अकुशल आणि अव्याकृत; म्हणजे चांगलें फल देणारें, वाईट फल देणारें व चांगलें आणि वाईट असें कोणतेंच फल न देणारें.  पुण्य, अपुण्य व अनिंद्य अशीहि कर्माची एक विभागणी केलेली आढळते.  वासनायुक्त केलेलें सत्कृत्य पुण्यकारक समजलें जातें.  जेव्हां हें कर्म पारलौकिक असेल तेव्हां त्याला स्थिर असें म्हणतात, व त्याचें फल परलोकांत मिळतें.  कोणतेंहि वाईट कृत्य अपुण्य होय.  जें कृत्य दुःखाचा अंत करितें व निर्वाण जवळ करितें त्यास कुशल म्हणतात.  पण त्यास पुण्यकर्म म्हणत नाहींत.

कर्मफलास विपाक असें म्हणतात.  वरील तीन प्रकारचीं कर्मे, सुखवेदनीय, असुखवेदनीय, किंवा सुखासुखवेदनीय या नावानेंहि संबोधितात.  कर्माचें नियत व अनियत म्हणजे निश्चित फलदायी व अनिश्चित फलदायी असेहि भेद करितात.

पांच प्रकारच्या कर्मांनां आनंतर्य (ज्याचें फल दुसर्‍या कोणत्याहि चांगल्या कर्मानें चुकवितां येत नाहीं असें) म्हणतात.  यांत मातृवध, पितृवध वगैरे कर्मे येतात.  इतर सर्व कर्मांचें फल क्षांति, अनागामी (पुनर्जन्मरहित) वृत्ति अथवा अर्हत्पद प्राप्‍त केलें असतां चुकवितां येतें.  मनुष्याला त्याच्या कर्मामुळें जन्म प्राप्‍त होतो परंतु विशिष्ट जन्म प्राप्‍त होणें हें अनेक कर्मांचें सामुच्चयिक फल असतें आणि त्यामुळें निरनिराळी मनुष्यें भिन्न भिन्न परिस्थितींत जन्मास येतात.  सत्कृत्यें व दुष्कृत्यें यांमध्यें दहा कर्मास कर्मपथ असें नांव देऊन त्यांचा प्रामुख्यानें निर्देश केला आहे.  त्यांत हिंसा, चौर्य, व्याभिचार हे कायिक; असत्य, निंदा, गर्व, व मिथ्याभाषण हे वाचिक आणि लोभ असूया व मिथ्यादृष्टि हे मानसिक कर्मपथ असून पहिले दोन वर्ग चेतनायुक्त कायिक कर्मांत मोडतात व तिसरा वर्ग फक्त मानसिक किंवा चेतनायुक्त आहे.  प्रत्येक कर्माचें पुन्हां पूर्व तयारी प्रत्यक्ष कर्म व पश्चातकृत्य (पृष्ठा) असें पृथक्करण करतां येतें, उदाहरणार्थ - एखाद्या खाटिकानें एखादा पशु विकत आणून त्याच्या वधाची तयारी करणें, त्याचा प्रत्यक्ष वध करणें व त्याच्या मांसाचा विक्रय करणें ही तीन त्या कर्याचीं अंगें होत.  यांपैकीं प्रत्यक्ष वध करणें यासच कर्मपथ म्हणतात.  व त्याचेंच विशेषतः त्यास फल भोगावें लागतें.  कोणतेंहि कृत्य कर्मपथ या संज्ञेस प्राप्‍त होण्यास त्या कृत्याचें पूर्ण ज्ञान कर्त्यास अवश्य असावें लागतें.  चुकीनें केलेलें कृत्य या संज्ञेत येत नाहीं.  जो मनुष्य अजाणतः एखाद्या मनुष्याचा घात करितो तो घात करण्याचें पातक करितो, परंतु मनुष्यवधाचें पातक करीत नाहीं.  जैनांच्या मतें ज्याप्रमाणें अग्नि जाणत्यास व अजाणत्यास दोघांसहि सारखाच दग्ध करतो त्याप्रमाणें जाणता व अजाणता मनुष्यवध करणारा सारखाच दोषी असतो.  तथापि यामुळें बराच घोंटाळा होण्याचा संभव आहे.  उदाहरणार्थ :-  एखाद्या माणसाला तप करावयास सांगून शारीरिक क्लेश देणें हेंहि पाप होईल.  गर्भ व गर्भवती स्त्री हीं दोन्हीहि एकमेकांस क्लेश देत असल्यामुळें दोषी होतील.  खून झालेला मनुष्यहि खुनी मनुष्यास पुढें होणार्‍या त्रासामुळें दोषी ठरेल व एखाद्या मनुष्यानें दुसर्‍याच्या हातून खून केल्यास तो मुळींच दोषी ठरणार नाही, कारण आपण दुसर्‍याच्या हातानें अग्नि घेतल्यास आपला हात भाजत नाहीं.

वरील जैन विचारसरणी बरीच पटण्यासारखी आहे. पण दुसर्‍या एका ठिकाणीं मोठ्या मौजेचे विचार दृष्टीस पडतात.  जर एखाद्या मनुष्यानें दुसर्‍याच्या स्त्रीबरोबर ती आपली स्त्री आहे असें समजून संभोग केला तर त्यास व्यभिचाराचा दोष लागत नाहीं.  जर एखाद्या पुरुषानें दुसर्‍याच्या स्त्रीबरोबर तिसर्‍याच एका मनुष्याची स्त्री आहे असें समजून संभोग केला तर तो दोषी आहे किंवा नाहीं याबद्दल मतभेद आहे.  कांहींच्या मतें उद्दिष्ट स्त्री ही परस्त्री असल्यामुळें तो दोषी होतो तर कांहींच्या मतें उद्दिष्ट स्त्री व उपभुक्त स्त्री या भिन्न असल्यामुळें त्यास दोष येत नाहीं, असो.

निरनिराळ्या कर्माचें फल निरनिराळें असतें व त्याप्रमाणें फलानुसार निरनिराळ्या कर्माची योग्यताहि ठरविता येते.  मनुष्याची भावी उन्नति अगर अधोगति ही त्याच्या शीलावरून ठरते.  दान देणें हें सत्कृत्य असलें तरी त्याचें फल स्वतंत्रतेनें मनुष्यास संपत्ति अगर भोग या रूपानें प्राप्‍त होतें.  (वेद, ब्राह्मणें, उपनिषदें, पू. मीमांसा, महाभा. तिपिटक इ.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .