प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कर्ममार्ग -  कर्ममार्ग म्हणजे श्रौतकर्मे करणें.  याचें विवेचन (ज्ञा. वि. २) ''वेदविद्येंत'' सविस्तर केलें आहे.  मंत्रब्राह्मणें मिळून जो वेदभाग होता त्यास कर्मकांड म्हणतात आणि उपनिषदांस ज्ञानकांड म्हणतात.  ज्ञानकांड वेदग्रंथांच्या शेवटीं आहे किंवा सामान्य ज्ञानाचें अंतिम फल आहे म्हणून त्यास वेदांत म्हणतात.  भारतीय तत्वज्ञानांत मोक्षाचे तीन मार्ग सांगितले आहेत.  ते कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग हे होत.  या तिहींचा उदय याच अनुक्रमानें झाला आहे.  संगति दाखवूं लागणार्‍या वर्गाच्या मतें हे तीन मार्ग एकमेकंशीं विसंगत नाहींत,  तरी अनेक ठिकाणीं आपणांस त्यांची तुलना करून तिहींमध्यें पूर्वोत्तरता व स्पर्धा म्हणजे श्रेष्ठ कोणता हें ठरविण्याचा प्रयत्‍न केलेला आढळतो.  विशेषतः कर्म आणि ज्ञानमार्ग यांमध्यें विरोध आहे असें दाखविण्यांत येतें.  आणि खरी लठ्ठालठ्ठी या दोहोंतच होती.  भक्तिमार्गाचा उदय बराच उत्तरकालीन आहे.  कर्ममार्गाला निरनिराळ्या काळीं निरनिराळ्या ग्रंथांतून कोणतें स्थान दिलें आहे तें पाहिलें असतां कर्ममार्गाचें महत्त्व आपल्या लक्षांत येईल.

ऋग्वेदकालीं मनुष्याचा जणूं काय देवतांशीं प्रत्यक्ष संबंध असावा अशा तर्‍हेचीं वर्णनें आढळतात.  ऋग्वेदकालीन लोकांची देवतांविषयींची कल्पना म्हणजे उत्तरकालीन कल्पनेप्रमाणें देवता या केवळ बुद्धिगम्य अथवा एखाद्या गूढ शक्तीनें ज्ञात होणार्‍या अशा नसून त्या जणूं काय त्यांच्यापुढें प्रत्यक्ष त्यांच्या विशिष्ट क्रियारूपानें प्रत्ययास येत अशी होती.  त्यामुळें त्यांनां संतुष्ट करण्याकरितांहि कांहीं प्रत्यक्ष क्रिया केल्या पाहिजेत अशी त्यांची समजूत असे.  यामुळें ते यज्ञ वगैरे कृत्यें करूं लागले.  या ऋग्वेदकालीं श्रौतसंस्थाप्रारंभ दिसून येतो; पण त्याबरोबरच यज्ञापासूनच केवळ आपणाला स्वर्गप्राप्‍ती होईल असें न वाटून देवांविषयीं व पितरांविषयीं आदरबुद्धि बाळगणें, पुरोहितांस संतुष्ट करणें, शूर व सत्यवचनी असणें व तप करणें इत्यादि गोष्टी आवश्यक मानणारा वर्ग होताच.

ब्राह्मणांमध्यें आपणांस या विचारांत बराच फरक पडलेला आढळतो.  यज्ञाला यावेळीं कर्म ही संज्ञा प्राप्‍त होऊन त्यास अतिशय महत्त्व आलें.  आयुष्यांतील प्रत्येक गोष्ट यज्ञकर्माला अनुसरूनच केली पाहिजे व कर्माशिवाय कोणतीहि वस्तू प्राप्‍त व्हावयाची नाहीं अशी समजूत दृष्टीस पडते.  कर्मामुळेंच मनुष्याला मोक्ष अथवा स्वर्ग प्राप्‍त होतो व कर्मामुळेंच देवांनांहि सध्याचें स्थान प्राप्‍त झालें आहे अशी समजूत व्यक्त केलेली आढळते (श. ब्रा. ३.१,४,३ ऐ. ब्रा. २.१,१).  यापुढें कर्म म्हणजे यज्ञयागादिक कृत्यें असाच अर्थ रूढ दिसतो व तोच मोक्षाचा मार्ग अशी समजूत आढळते.  ब्राह्मणांतच आपणाला मनुष्याचीं तीन ऋणें - देव, ऋषी व पितर यांचीं - अनुक्रमें यज्ञ, स्वाध्याय व पुत्रप्राप्‍ती करून फेडावयाचीं हें तत्व आढळतें.

ऋग्वेदकालीं यज्ञाशिवाय इतर गोष्टींकडे लक्ष देणारा वर्ग होताच.  आणि त्याचें अस्तित्व चालूच राहिलें.  याच वेळीं सूतसंस्कृतींतहि विचाराची वाढ होऊन सूतसंस्कृतीचा अभिमानी आणि मांत्रसंस्कृतींतील विचारीवर्ग यांची एकी होऊन औपनिषद् तत्वज्ञानाची वाढ होत असलेली व ज्ञानमार्गास प्रामुख्य येत असलेलें आढळतें.  मनुष्याचें अंतिम ध्येय जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून सुटून मोक्ष प्राप्‍त करून घेणें हें असल्यामुळें ज्या कर्माचें चांगलें अगर वाईट फल भोगण्यास पुन्हां जन्म घ्यावा लागतो असे कर्म करण्यापेक्षां ज्ञानप्राप्ति करून घेणे हेंच अधिक चांगलें आहे असें ज्ञानमार्गी प्रतिपादन करीत.  तथापि ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग यांची तडजोडहि चाले.  कर्म हे साधन आणि ज्ञान हे साध्य असें मांडलें जाऊन वेदांती लोकहि 'एकदम ज्ञानप्राप्ति होणें शक्य नसून कांहीं कर्मे केल्यानंतरच ज्ञान प्राप्‍त करून घेण्यास मनुष्याची तयारी होते व कर्ममार्गामार्फतच मनुष्य ज्ञानमार्गाकडे जातो' असेंहि प्रतिपादीत.  आणि ज्ञानोत्तर कर्माचें समर्थन सुरेश्वराचार्य (मंडनमिश्र) 'ज्ञानवानास कर्मे अयत्‍नतः होतीलच, पण तीं साधनरूप नाहींत' असें सांगून कर्माची निरवश्यता नियमित करीत.  कर्म हें ज्ञानास साधन म्हणावें तर ज्ञान प्राप्‍त होण्यास कोणतीं विशिष्ट कर्मे करावीं हें आपणांस कशावरून कळावयाचें ?  याला उत्तर वेदविहित कर्मे करावीं हें होय.  तथापि एवढ्यानें सर्व गोष्टींचा उलगडा होत नाहीं.  वेदांत सांगितलेलें कर्म म्हणजे मुख्यतः यज्ञ हें होय.  कांहीं ठिकाणीं यज्ञांतील विशिष्ट क्रियेसंबंधीं वेदांत आढळणारे मंत्र व ब्राह्मणांत सांगितलेली क्रिया यांमध्यें असंगति आढळून येते.  अशा वेळीं कोणत्या विधानास प्रामुख्य द्यावें व असेच इतर कांहीं संशय आल्यास त्या ठिकाणीं काय करावें हें जैमिनीनें पूर्वमीमांसेंत सांगितलें आहे.  पूर्वमीमांसेसंबंधीं विवेचन पूर्वी (ज्ञा. वि. ५) केलेंच आहे.  नंतर धर्मसूत्रांमध्यें ज्ञानमार्ग व कर्ममार्ग यांची संगति लावून मनुष्यानें व्यवहारांत कसें आचरण ठेवावें हें सांगितलें आहे. धर्मसूत्रांमध्यें फक्त त्रैवर्णिकांचाच विचार केलेला आहे.  शूद्रांचा ज्ञान अथवा कर्ममार्गाशीं प्रत्यक्ष कांहीं संबंध नाहीं असें म्हटलें आहे.  त्रैवर्णिकांस ब्रह्मचर्य व त्यांत स्वाध्याय, गृहस्थाश्रम व त्यांत यज्ञकर्मे, वानप्रस्थाश्रम व त्यांत ज्ञानप्राप्ति आणि अखेरीस संन्यास अशी आश्रमधर्माची व त्या त्या आश्रमांतील कर्माची व्यवस्था सांगितली आहे.  

आत्तांपर्यंत कर्म म्हणजे यज्ञयागादि कृत्यें असाच अर्थ रूढ होता व तीं कर्त्याला त्यांपासून कांहीं तरी फल मिळावें या इच्छेनेंच करावयाचीं असत.  परंतु भगवद्गीतेमध्यें आपणांस निराळीच कल्पना आढळते.  मोक्षप्राप्ति केवळ ज्ञानानेंच होते असें नसून, भक्तीनेंहि किंवा कर्म करूनहि मोक्ष मिळतो असें भगवद्गीतेंत सांगितलें आहे.  मात्र कर्मानें मोक्ष प्राप्‍त करून घ्यावयाचा असल्यास तें कर्म निष्काम पाहिजे.  निष्काम कर्माबद्दल गीतारहस्यांत बरेंच विवेचन केलें आहे.  त्याचा सारांश असा :-

आयुष्यक्रमणाच्या मार्गांपैकीं जैमिन्यादि मीमांसकांनीं ज्ञानाला महत्व न देतां केवळ यज्ञयागादि कर्मे केल्यानेंच मोक्ष मिळतो असें प्रतिपादन केलें आहे (जै. सू. ५.२,२३ वरील शाबरभाष्य पहा); आणि उपनिषत्कार व बादरायणाचार्य यांनीं सर्व यज्ञयागादि कर्मे गौण ठरवून केवळ ज्ञानानें मोक्षप्राप्ति होते ज्ञानाखेरीज दुसर्‍या कशानेंहि मोक्ष मिळणें शक्य नाहीं, असा सिद्धांत केला आहे (वे. सू. ३.४.१.२).  पण या दोन्ही निष्ठा सोडून देऊन आसक्तिविरहित कर्मे करण्याची तिसरीच निष्ठा पंचशिखानें (स्वतः सांख्यमार्गी असतांहि) आपणांस सांगितली आहे, असें जनकाचें म्हणणें आहे.  ''दोन्ही निष्ठा सोडून'' या शब्दांवरून ही तिसरी निष्ठा पूर्वीच्या दोन निष्ठांपैकीं कोणत्याहि निष्ठेचें अंग नसून स्वतंत्र रीत्या वर्णिलेली आहे हें उघड होते.  वेदांतसूत्रांतहि (वे. सू. ३.४,३२ ते ३५) जनकाच्या या तिसर्‍या निष्ठेचा अखेर उल्लेख केलेला असून भगवद्गीतेंत जनकाची ही तिसरी निष्ठाच तींत भक्तीची नवी भर घालून प्रतिपादिली आहे.  पण मीमांसकांचा केवळ म्हणजे ज्ञानविरहित कर्ममार्ग मोक्षप्रद नसून नुसता स्वर्गप्रदच आहे असा गीतेचा सिद्धांत आहे (गी. २.४३-४४; ९.२१).  आणि जो मार्ग मोक्षप्रद नाही त्याला निष्ठा हें नांवहि देतां येत नाहीं.  कारण ज्यानें अखेर मोक्ष मिळतो त्या मार्गास निष्ठा म्हणावें ही व्याख्या सर्वांसच कबूल आहे.  म्हणून सर्वांच्या मतांचा सामान्य अनुवाद करताना जनकानें जरी तीन निष्ठा सांगितल्या असल्या तरी मीमांसकांचा केवळ म्हणजे ज्ञानविरहित कर्ममार्ग 'निष्ठा' या वर्गांतून काढून टाकून सिद्धांतपक्षी कायम रहाणार्‍या दोनच निष्ठा गीतेच्या तिसर्‍या अध्यायाच्या आरंभीं वर्णिल्या आहेत (गी. ३.३).  केवळ ज्ञान (सांख्य) व ज्ञानयुक्त निष्काम कर्म (योग) या त्या दोन निष्ठा होत; आणि सिद्धांतपक्षीय या दोन निष्ठांपैकी दुसर्‍या (म्हणजे जनकाप्रमाणें तिसर्‍या) निष्ठेच्या समर्थनार्थ'' कर्मणैवहि संसिद्धिमास्थिता जनकादयः'' (गी. ३.२०) - जनकादिक याप्रमाणें कर्म करूनच सिद्धि पावले असा जुना दाखला दिला आहे.

शुकानें ''वेद कर्मे सोडण्यास सांगतो आणि कर्मे करण्यासहि सांगतो; तर विद्येनें म्हणजे कर्माशिवाय ज्ञानानें आणि नुसत्या कर्मानें कोणती गति मिळते, हें मला सांगा'' (शां. २४०.१) असा व्यासास प्रश्न केल्यावर त्याचें उत्तर देतांना व्यासांनीं ''कर्मानें प्राणी बांधला जातो व विद्येनें मुक्त होतो; म्हणून जे पारदर्शी यती किंवा संन्यासी आहेत ते कर्म करीत नाहींत'' (शा. २४०.४७) असें सांगितलें आहे.  ''कर्मणा बघ्यते जंतुर्विद्यया तु प्रमुच्यते'' या सिद्धांताबद्दल कांहीं वाद नाहीं.  पण 'कर्मणा बघ्यते'' म्हणजे काय याचा विचार केला तर जड किंवा अचेतन कर्म कोणास बांधीत नाहीं आणि सोडीतहि नाहीं.  मनुष्य फलाशेनें किंवा आपल्या आसक्तीमुळें कर्मांत बद्ध झालला आहे.  ही आसक्ति सुटली म्हणजे त्यानें नुसत्या बाह्येंद्रियांनीं कर्मे केलीं तरीहि तो मुक्तच होय, असें निष्पन्न होतें हे तेथें दाखविलें आहे.  हाच अर्थ मनांत आणून अध्यात्मरामायणांत (२.४, ४२) रामचंद्र लक्ष्मणास असें सांगतात कीं, ''कर्ममय संसाराच्या प्रवाहांत पडलेला मनुष्य बाह्यतः सर्व प्रकारचीं कर्तव्यकर्मे करूनहि पुन्हां अलिप्‍त असतो.''  अध्यात्मशास्त्राचा हा सिद्धांत लक्षांत घेतला म्हणजे कर्म दुःखमय म्हणून तें सोडण्याची अवश्यकता न रहातां, मन शुद्ध व सम करून फलाशा सोडिल्यानें सर्व काम होतें असें दिसून येतें.  तात्पर्य ज्ञानाचा व काम्यकर्माचा जरी विरोध असला तरी निष्काम कर्म आणि ज्ञान यांमध्यें कोणताच विरोध येऊं शकत नाहीं म्हणून अनुगीतेंत ''तस्मात्कर्म न कुर्वंति'' म्हणून कर्मे करीत नाहीत.  या वाक्याऐवजीं, तस्मात्कर्मसु निःस्नेहा ये केचित् पारदर्शिनः ॥  ''म्हणून पारदर्शी पुरुष कर्माच्या ठिकाणी आसक्ति ठेवीत नाहींत'' (अश्व ५१ ३३) असें वाक्य आलें असून तत्पूर्वी जे ज्ञानी पुरुष श्रद्धेनें फलाशा न ठेवतां (कर्म) योगमार्गाचा अवलंब करून कर्म करितात तेच साधुदर्शी होत'' (अश्व. ५०.६,७), असें कर्मयोगमार्गाचें स्पष्ट प्रतिपादन केलें आहे.  त्याचप्रमाणें ''वेद कर्म कर आणि कर्म सोड म्हणून दोन्ही प्रकारें सांगतो; म्हणून (कर्तृत्वाचा) अभिमान न धरतां आपण आपलीं सर्व कर्मे करावीं,'' असा वनपर्वांत (वन. २.७३) शौनकाचा युधिष्ठिरास उपदेश असून, शुकानुप्रश्नांतहि ''ज्ञानवान होऊन सर्व कर्मे करूनच सिद्धि मिळविणें, ही ब्राह्मणाची पूर्वीची जुनी (पूर्वतर) वृत्ति होय''  (म. भा. शां. २३७.१; २३४.२९), असें व्यासांनीं शुकास दोनदा स्पष्ट सांगितलें आहे.  '' ज्ञानवानेव'' या पदानें ज्ञानोत्तर व ज्ञानयुक्त कर्मच या ठिकाणीं विक्षित आहे हें उघड होतें.  असो. दोन्ही बाजूंच्या या वचनांचा निराग्रहबुद्धीनें शांत विचार केला म्हणजे ''कर्मणा बघ्यते जंतुः'' या कोटिक्रमानें ''तस्मात्कर्म न कुर्वति'' म्हणून कर्मे करीत नाहींत हें कर्मत्यागपर एकच अनुमान निष्पन्न न होतां, त्याच कारणास्तव ''तस्मात्कर्मसु निःस्नेहाः'' म्हणून कर्माच्या ठायीं आसक्ति ठेवीत नाहींत हें निष्काम बुद्धीनें कर्मे करण्याचें दुसरें अनुमानहि तितक्याच योग्यतेचें आहे असें सिद्ध होतें.

ब्रह्मात्मैक्याचा अनुभव घेणारे ज्ञानी पुरुष मायासृष्टींतील व्यवहार केवळ शरीरानें अगर केवळ इंद्रियांनींच करीत असतात असें जें गीतेंत वर्णन आहे (गी. ४.२१; ५.१२) त्यांतील तात्पर्य हेंच असून, याच हेतूनें अठराव्या अध्यायात '' निःसंग बुद्धीनें फलाशा सोडून केवळ कर्तव्य म्हणून कर्म करणें हाच खरा 'सात्विक' कर्मत्याग होय,'' ''कर्म सोडणें हा खरा कर्मत्याग नव्हे, असा सिद्धांत केला आहे (गी. १८.९).  कर्म मायासृष्टींतील असलें तरी तें परमेश्वरानें कांहीं अगम्य कारणास्तव निर्माण केलें असून तें बंद पाडणें ही गोष्ट मनुष्याच्या ताब्यांतली नव्हे, परमेश्वराधीन आहे.  आणि बुद्धि निःसंग ठेवून केवळ शारीरकर्म केल्यानें ते मोक्षाच्या आड येत नाहीं हें निर्विवाद आहे.  मग चित्तांत वैराग्य ठेवून केवळ इंद्रियद्वारां शास्त्रतः प्राप्‍त होणारीं कर्मे करण्यास हरकत कोणती ? ' न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्टत्यकर्मकृत् '' (गी. ३.५; १८.११) या जगांत एक क्षणभर देखील कोणी कर्माखेरीज राहूं शकत नाहीं.  असें गीतेंत, तर ''नैर्ष्कम्य नच लोकेस्मिन् मुहूर्तमपि लभ्यते '' (अश्व. २०.७ ) या लोकीं (कोणासहि) घटकाभर देखील कर्म सुटत नाहीं, असें अनुगीतेंत म्हटलें आहे.  मनुष्यच काय पण सूर्यचंद्रादि देखील एकसारखें कर्मच करीत आहेत.  किंबहुना कर्म म्हणजेच सृष्टि आणि सृष्टि म्हणजेच कर्म हें निश्चित असल्यामुळें सृष्टीच्या घडामोडीस किंवा कर्मांस क्षणभर देखील विसावा नाहीं हें आपण प्रत्यक्ष पहातों ''कर्म. सोडिलें तर खावयाला देखील मिळणार नाहीं '' असें भगवंतांनीं गीतेंत (गी. ३,८) तर '' अकर्मणां वै भूतानां वृत्तिः स्यान्नहि काचन ''  (वन. ३२.८), कर्माखेरीज प्राणिमात्राचा निर्वाह नाहीं असें वनपर्वांत द्रौपदीनें युधिष्ठिरास सांगितलें असून त्याचप्रमाणें दासबोधांतहि पूर्वी ब्रह्मज्ञान सांगून नंतर ''प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला ।'' (दा. १३.१२.३) असें श्रीसमर्थ रामदासस्वामीहि म्हणत आहेत.

या जगांत कर्म कोणासहि सुटणें शक्य नसल्यामुळें कर्माची बाधा न लागण्यास नेहमीं आपल्या धर्माप्रमाणें प्राप्‍त झालेलें कर्तव्य फलाशा सोडून म्हणज रिक्त बुद्धीनें करणें, एवढाच काय तो एक मार्ग (योग) मनुष्याच्या ताब्यांतला असून उत्तम आहे.  प्रकृति आपले व्यवहार नेहमींच करीत रहाणार.  पण त्यांतील कर्तृत्वाच्या अभिमानची बुद्धि तुम्ही सोडलीत म्हणजे तुम्ही मुक्तच आहां (गी. ३.२७; १३.२९; १४.१९; १८.१६) मुक्तीसाठीं कर्म सोडण्याची किंवा सांख्य म्हणतात त्याप्रमाणें कर्मसंन्यासरूप वैराग्याची जरूरी नाहीं.  इतकेंच नव्हे, तर या कर्मभूमींत कर्माचा पूर्ण त्याग करणें शक्यहि नाहीं (लो. टिळक कृत गीतारहस्य).

बौद्ध संप्रदायाची कर्ममार्गासंबंधीं शिकवणहि बहुतेक भगवद्गीतेसारखीच आहे.  स्वतःला फल मिळावें या इच्छेनें केलेलीं कर्मे मनुष्याला बंधनकारक होतात.  परंतु निष्काम बुद्धीनें केलेलीं कर्मे मनुष्याला निर्वाणपदाचा मार्ग सुकर करतात.  

जैनांची कर्ममार्गविषयीं काय वृत्ति होती हें वेदविद्येच्या पहिल्या प्रकरणांत सांगितलेंच आहे.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .