प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कर्ब -  कर्ब हें एक अधातुरूप द्रव्य आहे (परमाणु भांरांक १२).  तें स्वाभाविकरीत्या, हिरा, ग्राफाईट, प्राणी व वनस्पती यांचे पेशीजाल, दगडी कोळसा आणि पेट्रोलियम यांचा घटक या रूपानें आढळतें.  खडू, संगमरवरी दगड, डेलोमाइट, खटकर्बित, (कॅल्साइट), चुनखडी, विदराइट, जशदकर्बित व स्पाथिक आयर्न वगैरे खनिज पदार्थांतहि कर्ब हा घटक असतो.  हवेंतहि कर्बद्विप्राणिदाच्या रूपानें (कार्बन डायॉक्झाइड) याचें अस्तित्व असतें.  कर्ब हा घनरूप पदार्थ असून तो भिन्न भिन्न भौतिक गुणधर्म असलेल्या निरनिराळ्या स्वरूपांत आढळतो.  अस्फटिक स्वरूपांत कर्ब हा कर्बसंयुक्त पदार्थांचा विध्वंसक अभिषव केला असतां मिळतो.  त्याचे मुख्य प्रकार म्हणजे दिव्याची काजळी, दिव्याचा धूर, लांकडाचा कोळसा, हाडांचा कोळसा व कोक हे होत.  अपुर्‍या हवेंत डांबर, राळ, टरपेंटाईन व दुसरे कर्बयुक्त पदार्थ जाळले असतां काजळी तयार होते; ज्वलनानंतर उत्पन्न झालेले पदार्थ एका खोलींत टांकून ठेवलेल्या कापडावर जाऊन बसतात.  काजळी आणखी शुद्ध करण्याकरितां बंद भांड्यांत तापविली जाते.  छापण्याची शाई व काळा रंग तयार करण्याकरितां आणि चिटें करण्याकरितां काजळीचा उपयोग होतो.  दिवे लावण्याचा धूर (ग्यास) उत्पन्न करण्याच्या कारखान्यांत दगडी कोळशाच्या विध्वंसक अभिषवापासून दिव्याचा धूर मिळतो.  तो चांगला उष्णता व विद्युद्वाहक असून विजेच्या तीव्र प्रकाशाच्या दिव्याला लागणार्‍या कर्बशलाका व बन्सनच्या विद्युद्धटकांतील ऋणद्रव्य तयार करण्याकरितां त्याचा उपयोग केला जातो.

कोळसा हा कर्बचा एक सछिद्र प्रकार असून त्याचे पुष्कळ प्रकार आहेत.  साखरेच्या कर्बनीकरणापासून साखरेचा कोळसा मिळतो.  त्यांतील खनिज द्रव्यें काढून तो शुद्ध करण्याकरितां प्रथम अम्लांबरोबर उकळतात व नंतर त्यांतील उज्ज काढण्याकरितां हरच्या प्रवाहांत तापवितात.  लोखंडी तोटीच्या भांड्यांत-ऊर्ध्वपातनयंत्रांत-(रिटॉट) हाडांस उष्णता दिली असतां हाडांचा कोळसा बनतो.  तो फार अशुद्ध असून त्यांत खटस्फुरिताचें प्रमाण सरासरी शेंकडा ८० असतें.  लांकडी कोळशापेक्षां ह्या कोळशाच्या अंगीं विवर्ण करण्याची शक्ति व शोधनशक्ति जास्त असते.  लांकडी कोळसा हा कठिण व ठिसूळ असा काळा पदार्थ आहे.  तो तयार करण्याकरितां लांकडाचा ढीग करून त्यावर माती किंवा गवत घालून तो ढीग हळू हळू जळूं देतात.  जळतांना हवा पुरेशी देत नाहींत व जळण्याची क्रिया करून खालीं आणि बाहेरून आंत अशीं चालते.  ह्या कृतींत असा एक दोष आहे कीं दारिन काष्ठार्क (पायरोलिग्निअस), अम्ल या सारखे आड उत्पन्नाचे पदार्थ फुकट जातात; याकरितां कधीं कधीं लांकूड ऊर्ध्वपातन यंत्रांत घालून उष्ण करितात व त्यांतून निघणारे बाष्पमय पदार्थ थंड होऊन थिजल्यावर उपयोगांत आणतात.

लांकडाचा प्रकार व तयार करण्याची कृती यांवर कोळशाचे गुणधर्म अवलंबून असतात.  ३००० श उष्णमान ठेवून तयार केलेला असल्यास तो मऊ व ठिसूळ असून लवकर पेट घेतो व जास्त उष्णमान ठेवून कोळसा तयार केलेला असल्यास तो घट्ट असून लवकर पेट घेत नाहीं.  कोळसा हवेंत जळतांना त्याला सहसा ज्वाला नसते.  त्याच्या अंगीं वायु शोषण करण्याची विलक्षण शक्ति आहे.  त्याच्या घनफळाच्या १७१.७ पट अम्र (अमोनिया), ८६.३ पट नत्रसप्राणिद ६७.७ पट कर्बएकप्राणिद, २१.२ पट कर्ब द्विप्राणिद १७.९ पट प्राण, १५.२ पट नत्र व ४.४ पट उज्ज याप्रमाणें निरनिराळे वायू शोषण केले जातात.  उज्ज, प्लव प्राण, नत्रस पदार्थ, सिकितें: (सिलिकॉन) वगैरेशीं कर्बचा संयोग होऊन निरनिराळे संयुक्त पदार्थ बनतात.  कर्बची विशिष्ट उष्णता उष्णमानाप्रमाणें बदलतें.

संयुक्त पदार्थ -  कर्बचीं तीन प्राणिदें, प्रसिद्ध आहेत.  ती कर्बअधिप्राणिद (कार्बन सब ऑक्साइड) कर्बएकप्राणिद (कार्बन माकॉक्साइड) व कर्ब द्विप्राणिद हीं होत.  त्यांपैकीं पहिलें वर्णहीन व वायुरूप असून त्याच्या वासानें गुदमरल्यासारखें होतें.  हा चांगला क्रियाकारक पदार्थ असून त्याचा पाणी, उदहराम्ल व अम्न यांशीं संयोग झाला असतां अनुक्रमें मेलॉनिकाम्ल, मेलॉनिल हरिद व मेलॉनमाइड हे पदार्थ बनतात.

कर्बएकप्राणिद :-  हें थोड्या प्रमाणांत ज्वालामुखीपासून निघालेल्या वायूमध्यें आढळतें.  तांबड्या लाल कर्बावरून किंवा लोखंडावरून कर्बद्विप्राणिद नेलें असता, जस्ताची भुकटी किंवा लोह याबरोबर कर्बित तापविले असतां किंवा कित्येक धातूंचीं प्राणिदें कर्बाबरोबर तापविलीं असतां हा वायु मिळतो.  तो वर्णहीन व वासरहित असून त्याचें विशिष्ट गुरुत्व ०.९६७ (हवा - १) आहे.  हा वायु द्रवरूप करण्यास फार कठिण असतो.  तो पाण्यांत फारच अल्प प्रमाणांत द्रवतो.  तो जळला असतां कर्बद्विप्राणिद बनतें.  त्याच्या ज्वालेचा रंग फिकट निळा असतो.  तो अत्यंत विषारी व बलवान क्रियाकारक आहे.

कर्बद्विप्राणिद :-  चुनखडी व दुसर्‍या कित्येक खनिज पदार्थांत कर्बद्विप्राणिद हा एक घटक असतो.  मुबलक हवेंत किंवा प्राणवायूंत कर्ब जाळला असतां व उष्णतेनें अगर खनिज अम्लांच्या योगानें कर्बितांचें पृथक्करण केल्यास हें प्राणिद मिळतें.  कुजण्याची जळण्याची व श्वासोच्छवासाची क्रिया सुरू असतांहि तें होतें.

कर्बद्विप्राणिद हा वर्णहीन वायु आहे.  त्याला थोडासा तिखट वास व आंबट चव असते.  तो स्वतः अदाह्य असून त्यांत इतर पदार्थहि जळत नाहींत.  परंतु पुष्कळ तापविलेले उल्क धातू व मग्न हे मात्र त्यांत जळतात; व त्या योगानें प्राणिद तयार होऊन कर्ब हा स्वतंत्र होतो.  त्याचे विशिष्ट गुरुत्व १.५२९ आहे (हवा - १) ० अंशावर ३५ वातावरणांचा दाब लाविला असतां तो द्रवरूप होतो.  त्या स्थितींत तें - ७८.२ ला उकळतें व पुढें - ६५ सेंटिग्रेडला घन होतें.

हा वायु पाण्यांत कांहीं प्रमाणांत द्रवतो.  दाहक अल्कलीच्या द्रावणांत त्याचें लवकर शोषण होऊन अल्कलीकर्बित तयार होतात.  चुन्याच्या निवळींत हा वायु मिळविल्यास पांढरा सांका रहातो.  त्यावरून या वायूचें अस्तित्व कळून येतें.  पुष्कळ तापविल्यानें त्याचें पृथक्करण होऊन कर्बएकप्राणिद व प्राण हे वायू मिळतात.  सोडा, साखर, सोडावॉटर, लेमोनेड वगैरे पेयें व कृत्रिम बर्फ तयार करण्याच्या कारखान्यांत हा वायु उपयोगांत आणिला जातो.

उत्कर्ब -  उत्कर्ब म्हणजे कर्ब व उज्ज यांच्या रासायनिक संयोगानें झालेलें संयुक्त पदार्थ.  हे सृष्टीमध्यें असंयुक्त स्थितींत पुष्कळ आढळतात; उदाहरणार्थ अनूपवायु (मार्शगॅस), राकेल, राकेल तेलाचें मेण (पॅराफिन) वगैरे पदार्थ हे फक्त कर्ब व उज्ज यांचेच संयुक्त पदार्थ होत.  याशिवाय रबर, तर्पिन्तिन, (टर्पेटाइन) व दुसरीं कांहीं सुगंधी तेलें या सृष्ठ पदार्थापासून उत्कर्ब उत्पन्न होतात.  विच्छिन्नकिरणदर्शक यंत्राच्या योगानें या उत्कर्बांचें अस्तित्व, तारे, शेंडेनक्षत्र व सूर्य यांवरहि असल्याचें आढळून आलें आहे.

हे उत्कर्ब कृत्रिम रीतीनें तयार करण्याचा सोपा व यशस्वी मार्ग म्हटला म्हणजे पुष्कळ उद्भिज सेंद्रिय पदार्थाचें शुष्कपातन करणें हा होय.  अगदीं नेहमींच्या प्रचारांतलें उदाहरण म्हणजे दगडी कोळशाचें शुष्कपातन (ड्रायडिस्टिलेशन) हें होय.  यापासून धुराच्या दिव्याचा धूर (लायटिंग गॅस) तयार होतो; त्यांत वायुरूप उत्कर्ब असून शिवाय कोळशाचें डामर असतें.  या डामराचें आंशिक पातन (फ्रॅक्शनल डिस्टिलेशन) केलें म्हणजे त्यापासून रसरूप व घनरूप असे पुष्कळ प्रकारचे उत्कर्ब तयार होतात.  हे सर्व औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे पदार्थ असतात.  रसायनशास्त्राच्या दृष्टीनें उत्कर्ब हे मूलभूत महत्त्वाचे पदार्थ आहेत.

उत्कर्ब हे उज्ज व कर्ब यांचे संयुक्त पदार्थ आहेत.  यामुळें त्यांच्या घटनेंत या मूलद्रव्यांशिवाय अन्य मूलद्रव्यें नसतात.  उत्कर्बाशिवाय इतर सेंद्रिय संयुक्त पदार्थ उत्कर्बापासूनच निघालेले आहेत असें तात्विकदृष्ट्या समजतात.

कर्बचे परमाणू ज्या रीतीनें संयोग पावलेले असतात त्यावरून मुख्यत्वें कर्बच्या संयुक्त पदार्थाचे वर्ग पाडतात.  उत्कर्बांचे मुख्य दोन वर्ग कल्पिले आहेत.  (१) चर्बी वर्ग (पराफिन वर्ग) व (२) ऊदीन वर्ग (बेंझीन वर्ग).

(१) चर्बीवर्गातील उत्कर्ब :-  प्राणी व वनस्पति यांच्या चबर्बीमध्यें व चर्बीच्या अम्लांत या वर्गांतील बरेच पदार्थ आढळतात.  नत्राम्ल व हराम्ल यांसारख्या तीव्र प्राणिदीकरण (ऑक्णिडेशन) करणार्‍या पदार्थांचें या वर्गांतील उत्कर्बांवर कांहीं रासायनिक कार्य होत नाहीं.  म्हणजे त्यांच्या अंगीं रासायनिक स्नेह-स्निग्धता नाहीं.  म्हणून यास अस्निग्ध असें नांव दिलें आहे.  या वर्गांस इंग्रजी नांव पॅराफिन असें आहे.  व याचा अर्थ ''रसायनाकर्षणापलीकडचा'' असा होतो.  या वर्गाचे पोटवर्ग कर्बपरमाणूंच्या संख्येवरून करतात.  शिवाय संतृप्‍त व असंतृप्त असेहि दोन मुख्य पोटवर्ग कल्पितात :-

संतृत्प उत्कर्ब साधारण लक्षणें-कर्ब चतुमूर्ल्य असल्यानें कर्बचा एक परमाणु उज्जच्या जास्तींत जास्त म्हणजे चार परमाणूंशीं संयोग पावूं शकतो.  यामुळें या वर्गांतील अगदीं पहिला व साधा उत्कर्ब कउ४ हा होय.  यास अनूपवायु (मार्शगॅस पहा) असें नांव आहे.  सेंद्रिय रसायनशास्त्रांत यास मिथुन (इंग्रजी मिथेन) असें नांव आहे.

या वर्गांतील सर्व उत्कर्ब मिथुनपासूनच निघाले आहेत.  त्यांची घटनासारणी क सं २सं + २ अशी आहे.

यावर्गांतील उत्कर्बांचीं नांवें खालीं दिलीं आहेत :-

 मराठी   इंग्रजी   सारणी
 मिथुन  मिथेन  कउ४
 इथुन   इथेन  क२उ६
 मेदुन  प्रोपेन   क३उ८
 वैधेयिदशुन  नॉर्मल बुटेन   क४उ१०
 तुल्य दधुन  इसो बुटेन
 वैधेयिक पंचुन  नार्मल पिन्टेन   क५उ१२
 द्विमिथिल इथिल मिथुन किंवा तुल्य पंचुन  डायमोथिल एथिल मिथेन किंवा इसोपिन्टेन     ,,
 चतुर्मिथिल  टेट्रामेथिल मिथेन  ,,
 नवपंचुन  निओ पिन्टेन   ,,

सदरहु उत्कर्बांचे रसांक (मेल्टिंग पॉइंट) उत्क्कथनांक (बायलिंग पॉइंट) व विशिष्ट गुरुत्व माहीत असणें अत्यावश्यक असल्यानें खालीं दिले आहेत :-

 म. नांव  रसांक  उत्क्कथनांक   वि.गु.
 मथुन  -१८६ ० श  -१६४  .४१५ उ.अ. वर
 इथुन  -१७२ ० श  - ९०  .४४६ ० शवर
 मेदुन    - ३८ - ५३६ शवर
 वैधेयिक दधुन  + १  . ६०० ० शवर
 तुल्य दथुन  - १७  --
 वैधेयिक पंचुन  x ३६  . ६२७ शवर
 द्विमथिल इथिल मथन वातुल्य पंचुन  + १०   "
 चतुर्थर्मथिल मथन वानव पंचुन   ----  ----
  वैधेथिक षडुन  ६९  . ६७७० शवर

या श्रेढींतील प्रत्येक पद कउ२ यासारख्या अंतरानें वाढत गेलें आहे; म्हणून यास समपदांतर श्रेढी असें म्हणतात.  यांतील पदें केवळ घटनेनें मात्र सारखीं आहेत असें नसून त्यांच्या रासायनिक क्रियांत व भौतिक धर्मांतहि कांहीं साम्य आहे.  हे सर्व पाण्यांत बहुतेक अविद्राव्य आहेत.  पहिले चार दथुनपर्यंत वायुरूप असून अल्कहल व इथ्र यांत विद्राव्य आहेत.  पंचुन व त्यापुढील उत्कर्ब रंगहीन रसरूप असतात.  हे पाण्यांत अविद्राव्य परंतु अल्कहल व इथ्र यांत मिसळतात.  यांचे उत्क्कथनांक व वि. गुरुत्व कर्बच्या परमाणू संख्येप्रमाणें वाढत जातात.  कर्बच्या परमाणूंची संख्या १६ पर्यंत वाढली म्हणजे उत्कर्ब साधारण उष्णमानावर घन असतात.  हे अल्कहलांत व इथ्रात विद्राव्य असून पृथग्भवन न पावतां कढतात.  उत्क्कथनांक अणुगुरुत्वाप्रमाणें वाढतात, तसेंच रसांकहि क्रमानें वाढतात.

हे उत्कर्ब पाण्यापेक्षां हलके असल्यानें त्यावर तरतात.  हलक्या प्रतीचे व बाष्पभावी जे उत्कर्ब असतात त्यांस एक प्रकारचा वास असतो.  त्यांस असह्य असा वाईट वास नसतो.

या मथुन वर्गाच्या उत्कर्बास अरिनग्ध (पॅराफिन) असें नांव दिलें आहे.  हें नांव देण्याचीं दोन कारणें आहेत.  बाजारी ''पॅराफिन'' नांवाचा जो पदार्थ आहे तो या वर्गांतील वरच्या उत्कर्बांच्या मिश्रणापासून झालेला आहे.  शिवाय या उत्कर्बांच्या अंगी रासायनिक स्नेह-स्निग्धता नसल्यानें त्यांच्या अंगी अतृप्तमूल्यत्व शक्ति नसते.  यामुळें दुसर्‍या पदार्थांचे अणू या उत्कर्बांच्या अणूंशीं संयुक्त होऊं शकत नाहींत.  या धर्मावरून या वर्गांतील उत्कर्बांस ''संतृप्त'' असें म्हणतात.  उत्कर्बांवर केलेल्या प्रयोगांवरून असा अनुभव आला आहे कीं कोणत्याहि उत्कर्बापासून त्यांतील उज्जचें निःसारण झाल्याशिवाय नवा पदार्थ तयार होणें अगदीं अशक्य आहे.  उदाहरणार्थ, कर्बएकप्राणिदा (कप्र) वर हरची (क्लोरिनची) क्रिया केली म्हणजे त्यापासून कर्बिलहरिद या नांवाचा पदार्थ तयार होतो तो असा :-

कर्बएकप्राणिद        हर    -    कर्बिलहरिद
कप्र        -    ह        कप्र. ह
    
    या स्थळीं कर्बएकप्राणिदाचा एक अणु हरच्या एका अणूशीं संयुक्त होतो व ही संयुक्त होण्याची क्रिया होत असतांना दोन्ही पदार्थांच्या अणूंतील कोणताहि भाग निराळा होत नाहीं.  दोन्ही अणू अविभक्त स्थितींत एकमेकांशीं रासायनिकदृष्ट्या संयुक्त होतात.  अशा रीतीनें अणु-अविभक्त स्थितींत- संयुक्त होऊन जे पदार्थ तयार होतात त्यांस आसक्त पदार्थ असें म्हणतात.  परंतु हरची क्रिया उत्कर्बावर केली असतां त्याप्रमाणें घडत नाहीं.  हरचा व उत्कर्बाचा अणु असे दोन्ही विभक्त होऊन नंतर संयुक्त होतात.  यामुळें उत्कर्बांतीलं असंयुक्त झालेला उज्ज परमाणु व हरमधील असंयुक्त झालेला परमाणु हे संयुक्त होऊन उद्हराम्ल उद्भूत होतें.  उदाहरणार्थ मथुन (मिथेन) वर हरची क्रिया केली असतां जी क्रिया होते ती खालीं दाखविली आहे :-

मथुन  -  हर    -     एकहरमथुन (मथिलहरिद)    -   उद्धराम्ल
कउ    ह    कउह                                        +  उह     

    याची कर्बएकप्राणिदाप्रमाणें अविभक्त क्रिया होत नाहीं.  जसें :-  कउ - ह - कउ. ह.

यावरून ध्यान्यांत येईल कीं, उत्कर्ब - जशाचें तसें - अविभक्त स्थितींत हरशीं संयुक्त होत नाहीं.  व तें संयोग होतांना उद्धराम्ल उद्भूत होतें व नवा पदार्थ कउ३ ह हा आदिष्ट पदार्थ बनतो.

स्तंभ (ब्रोमिन) किंवा गंधकाम्ल यांचेंहि उत्कर्बावर हरसमानच रासायनिक कार्य होतें.  तीव्र नत्राम्लाचें साधारण उष्णमानांत यावर कार्य घडत नाहीं.  तसेंच तीव्र नत्राम्ल व गंधकाम्ल यांच्या मिश्रणाचेंहि कार्य घडत नाहीं.  पालाशद्विक्लमित (पोट्याशिअम ब्रायक्रोमेट) व पालाश परिमंगलित (पोट्याशिअम परम्यांगनेट) या शक्तिमान प्राणिदीकरण (ऑक्सिडाइज) करणार्‍या पदार्थांचेंहि यावर थंडपणीं कार्य होत नाहीं.  मात्र यांबरोबर उकळल्यास कर्बद्विप्राणिद व पाणी हे पदार्थ बनतात.  स्तंभ याचें यावर कार्य घडल्यास उत्कर्बामधील उज्जच्या जागीं स्तंभचा परमाणू जाऊन हरप्रमाणें आदिष्ट पदार्थ बनतात.  यामुळें यास संतृप्‍त (पॅराफिन) उत्कर्ब असें म्हणतात.

नांवें :-  संतृप्‍त वर्गांतील जे उत्कर्ब आहेत त्यांची घटनासारणी क सं उ २सं - २ अशी असून त्यांची मालिका वर दिलीच आहे.  या वर्गांतील उत्कर्बांच्या नांवाच्या शेवटीं उन हा प्रत्यय लाविलेला आहे.  सदर उत्कर्बांची जीं इंग्रजी नांवें आहेत त्यांच्या शेवटीं एन हा प्रत्यय आहे.

वर दिलेल्या श्रेढींतील कांहीं पदांचीं नांवें दोन किंवा अधिक पदार्थ दर्शवितात.  यांची अणुघटकसारणी तीच आहे; परंतु त्यांच्या परमाणूंचे समूह मात्र वेगळेवेगळे आहेत.  यामुळें हे पदार्थ एकमेकांशीं तुल्यपरिमाणी आहेत म्हणजे तुल्यरूपी आहेत.  यावरून यांस तुल्यरूपी पदार्थं असें म्हणतात.

मूलकें :-  वरील समपदांतर श्रेढींतील पदार्थांच्या धर्मांमध्यें जें साम्य असतें त्याचें सकारण स्पष्टीकरण करण्याकरितां अशी कल्पना रसायनशास्त्रवेत्त्यांनीं बसविली आहे कीं प्रत्येक श्रेढींत एक परमाणूसमूह वेगळा होण्याजोगा असतो व त्याचें कार्य थेट मूलद्रव्याप्रमाणें होतें.  म्हणजे हे परमाणूसमूह परस्परांशीं व दुसर्‍या मूलद्रव्यांशीं संयुक्त होऊं शकतात.  तसेंच ते एका संयुक्त पदार्थांतून दुसर्‍या पदार्थांत अविकृत म्हणजे जशाचे तसे पृग्थभवन न पावतां दुसर्‍यांतील मूलद्रव्यांच्या किंवा तुल्यपरमाणु समूहांच्या स्थानीं जातात.  असे परमाणुसमूह  केवळ संयुक्त मूलद्रव्येंच समजून त्यांस संयुक्तमूलक असें नांव दिलें आहे.  सेंद्रिय रसायनशास्त्रास संयुक्तमूलकांचें रसायनशास्त्र असेंहि म्हणतात.

अशा संयुक्त मूलकांस कधीं वेगळें काढितां येत नाहीं; व त्यांस वेगळें काढण्याचा प्रयत्‍न केल्यास दोन मूलकांचा संयोग होऊन तिसराच नवा पदार्थ निर्माण होतो.  यामुळें संयुक्त मूलक स्वतंत्र किंवा वेगळे राहूं शकतात ही कल्पना मागें पडली, आणि कित्येक पृथग्भवनांत जे परमाणुसमूह जशाचे तसेच अविकृत शेष राहतात त्यांसच संयुक्तमूलक म्हणूं लागले.  सांप्रत तर जे परमाणुसमूह पुष्कळ संयुक्त पदार्थांत आढळतात व ज्यांचें कार्य मूलद्रव्याप्रमाणें घडतें, म्हणजे द्विगुण पृथक्करणांत (डबल डिकाँपोझिशन) एका पदार्थांतून दुसर्‍या पदार्थांत जातात किंवा संयुक्त पदार्थांत मूलद्रव्यांच्या व दुसर्‍या परमाणुसमूहांच्या स्थानीं जातात त्यांसच संयुक्तमूलक हें नांव देतात.  संतृप्‍तअणूंतील एक किंवा अधिक परमाणू काढून टाकल्यावर जे शेष राहतात व ज्यांचें वर्तन मूलद्रव्यासारखें बरेंच होतें, म्हणजे जे जशाचे तसेच-अविकृत न होतां- एकांतून दुसर्‍यांत किंवा दुसर्‍याच्या जागीं जातात त्यांस संयुक्तमूलक ही संज्ञा देतात.

सेंद्रिय रसायनशास्त्रांत कर्बचे परमाणू असलेल्या अशा तर्‍हेच्या परमाणुसमूहांस संयुक्तमूलक हें नांव साधारणपणें देतात, आणि उप्र, उग, नउ, नप्र इत्यादि कर्ब परमाणूविरहित यांस शेष किंवा परमाणुसमूह म्हणतात.  कउ; क वगैरे कर्बपरमाणुसमूहांस संयुक्त मूलक असें म्हणतात.

सं. उ सं - २ या सारणीच्या भिन्न भिन्न संतृत्प उत्कर्बांतून उज्जचे एक, दोन, तीन असे परमाणू काढून घेतल्यानें एकमूल्य, द्विमूल्य, त्रिमूल्य इत्यादि संयुक्त मूलक निर्माण होतात.  हे मूलक दुसर्‍या मूलद्रव्याशीं किंवा त्याच्या परमाणुसमूहांशीं त्यांचे रूप क सं सं - २ या सारणीबरोबर होईपर्यंत संयोग पावूं शकतात.  उज्जचा एकच परमाणु काढला असल्यास त्यांचा एक अवयव असंतृप्‍त राहतील व त्यास एकमूल्य म्हणतां येईल.  दोन परमाणु काढल्यास दोन अवयव असंतृत्प राहतील व त्यांस द्विमूल्य म्हणतां येईल.

सं. उ२ सं - २ या सारणीचे जे उत्कर्ब वर दिलेले आहेत.  त्यांच्या सारणींतून एकच उज्जचा परमाणु काढला म्हणजे क सं उ २सं - १ या सारणीचे उत्कर्ब संयुक्तमूलक राहतात.  त्या मूलकांचीं नांवें मूळ उत्कर्बाच्या नांवांतील उन प्रत्यया ऐवजी इल प्रत्यय लावून दर्शवितात जसे :-

  मूळउत्कर्ब   याचा संयुक्तमूलक
  मथन - कउ   मथिल - कउ
  इथन - कउ६   इथिल - क
  मेथुन - क   मेथिल - क
  दथन - क१०   दथिल - क
  पंचुन - क१२   पंचिल - क११
  षडुन - क१४   षडिल - क१६
  पंचत्रिशतुन क३५७२   पंचत्रिंशतिल क३५७१

हे उत्कर्ब (संयुक्तमूलक) एकमूल्य आहेत कारण उत्कर्बाच्या घटनेंतून एकमूल्य उज्जचा एकच परमाणु काढून टाकल्यानें हे उत्कर्बमूलक बनतात.  या उत्कर्ब मूलकांस स्वतंत्र अस्तित्व नाहीं.  हे काल्पनिक आहेत.  या उत्कर्बसंयुक्तमूलकांची घटना पाहिली असतां असें दिसून येईल कीं यांच्या घटनेंत जे उज्जचे परमाणू आहेत ते विषम आहेत जसे :-  मथिल - कउ३, इथिल - क२उ५, मेथिल - क३उ७ इ. यावरून असाहि नियम बांधला आहे कीं उज्जचा विषम परमाणु असलेला संयुक्तमूलक स्वतंत्र म्हणजे असंयुक्त स्थितींत असूं शकत नाहीं.  या संयुक्तमूलकांचें अस्तित्व जरी काल्पनिक आहे तरी तसें मानणें अवश्य आहे.  कारण यायोगें सेंद्रिय पदार्थांची घटना, संयोग वियोग व रासायनिक क्रियाप्रतिक्रिया कशा होतात ते सुलभ रीतीनें समजतें व सारणीरूपानें सुगम दर्शवितां येतें; कोणत्या रासायनिक क्रिया कारकाचें (एजंट) काय कार्य होईल, कोणता पदार्थ नवा तयार होईल याचेंहि भविष्य वर्तवितां येतें व यामुळें पुष्कळ नवीन शोध लागून कलाकौशल्याच्या कामांत अतर्क्य प्रगति झाली आहे.  यावरून या काल्पनिक संयुक्त मूलकांचें महत्व सेंद्रिय रसायनशास्त्रांत किती आहे हें उघड आहे.

वर दिलेले उत्कर्ब संयुक्तमूलक एकमूल्य असल्यानें ते एकमूल्य मूलतत्वाच्या एकाच परमाणूशीं किंवा एकमूल्य एकाच परमाणुसमूहाशीं संयोग पावतात.  यावरून या संयुक्तमूलकांचा संयोग एकमूल्यउज्ज या मूलतत्वाशीं केल्यास ते उज्जच्या एकाच परमाणूशीं संयोग पावतात व त्यांच्या संयोगापासून उत्कर्ब तयार होतात.

कर्बनत्र - कर्बनत्र (सायनोजेन) वायूचें व उज्ज वायूचें मिश्रण करून तें मिश्रण शतभागोष्णमानाच्या ५०० ते ५५० अंशापर्यंत तापविलें असतां ते दोन वायू संयोग पावतात.  व अशा रीतीनें तयार झालेल्या अम्लास उत्कर्बनत्राम्ल (हायड्रोसायनिक असिड) असें नांव आहे.  या अम्लाचा निरनिराळ्या धातूंशीं संबंध आला असतां त्या त्या धातूंचीं कर्बनत्रिदी (पोटॅशम सायनाइड) हें फार उपयोगी आहे.  याचा उपयोग सोनें शुद्ध करण्याकडे होतो.

तयार करण्याच्या रीती - (१) कर्बनत्र वायू किंवा वायुरूप उत्कर्बनत्राम्ल यांशीं कित्येक धातू संयोग पावून त्या धातूंचें कर्बनत्रिद तयार होतें.  (२) सिंधु व पालाश या धातूंचे कर्बितक्षार (कार्बोनेट) व उत्प्राणिद (हायड्रोऑक्साइड) उत्कर्बनत्राम्लाच्या प्रवाहांत तापविले असतां सिंधु व पालाश या धातूंचीं कर्बनत्रिदें तयार होतात.  (३) खट (कॅलशिअम), भार (बेरिअम) व स्त्रांत (स्ट्रॉन्शिअम) या धातूंचे कर्बितक्षार कोळशाबरोबर मिसळून, नत्र वायूच्या प्रवाहांत तापविले असतां वरील तीन धातूंचीं कर्बनत्रिदें तयार होतात.

गुणधर्म :-  सिंधु, पालाश, खट, भार व स्त्रांत या धातूंचीं कर्बनत्रिदें पाण्यांत विरघळतात.  खुल्या हवेंत तीं तापविलीं असतां त्यांत प्राणवायु मिसळून तीं कांहींशीं कर्बनत्रितें होतात.

इतर धातूंच्या कर्बनत्रिदांचें उष्णतेनें पृथक्करण होतें व त्यांतून कर्बनत्रिल वायु बाहेर पडतो.  जड धातूंचीं कर्बनत्रिदें पाण्यांत न विरघळतां पालाशकर्बनत्रिदांत विरघळून त्यांचे द्विभस्मिक क्षार तयार होतात.  उदाहरणार्थ :-  पार (कन)२; पा स्व (कन)२.

साधीं कर्बनत्रिदें व उत्कर्बनत्राम्ल हीं भयंकर विषारी आहेत.  तीं पेशीजालांचा तत्काल नाश करितात.  परंतु द्विभस्मिक क्षार हीं अगदीं निरुपद्रवी आहेत.  वरील अम्ल हें इतकें विषारी आहे कीं एकदां जोरागें हुंगल्यास मनुष्य बेशुद्ध होईल व कदाचित मरेलहि.  तें किडे व जंतूं यांस मारणारें आहे.  उलट याचा औषण म्हणून उपयोग करितात.  एक औंस पाणी व ग्लिसरीन यांच्या मिश्रणांत या अम्लाचा एक थेंब टाकल्यास कसलीहि खरूज बरी होते.  परंतु कातडी खरचटलेली असल्यास हें लावतां कामा नये.  सुका खोकला झाल्यास व कफ पडत नसला तर खोकल्याच्या औषधांत हा अम्ल थोड्या प्रमाणांत मिसळतात.

शुद्ध अम्लाचा उपयोग केल्यास (पोटांत घेतल्यास) तत्काल मृत्यु येईल.  पाण्याशीं मिश्रण करून घेतला तरी थोड्या वेळांतच तो आपला अम्मल गाजवितो, मनुष्य बेशुद्ध पडतो, डोळे ताठतात व निश्चल राहतात,  कातडी थंडावते, अवयव ढिले पडतात, नाडी व श्वासोच्छ्वास मंदावतो.  अशा वेळेस ऍट्रोपिन् हें औषध उत्तम.  याचा एकपन्नासांश ग्रेन त्वचेच्या खाली पिचकारीनें सोडला पाहिजे.  वांतिकारक औषणेंहि द्यावीं.  अम्न वायु हुंगण्यास द्यावा व कृत्रिम श्वासोच्छ्वास क्रिया करावी.  त्यानें मंदावलेला श्वासोच्छ्वास जोरानें सुरू होईल व तो मनुष्य वांचेल.

कॅर्बालिकाम्ल किंवा फेनॉल -  (हायड्रोबेन्झ क-उ प्रउ) हें अम्ल शाकतृणजीवि प्राण्यांच्या मूत्रांत सांपडतें.  परंतु बाजारांत विकलें जाणारें अम्ल डांबराचें आंशिक पातन केलें असतां १५० व २५० च्या उष्णमानाच्या दरम्यान मिळणार्‍या अर्कांत सांपडतें.  ह्या अर्कापासून फेनॉल तयार करण्याकरितां त्यांत दाहक सोडा (कॉस्टिक सोडा) मिळवितात.  अर्कांतील फेनॉल व त्याचे तुल्यजातीय पदार्थ होमोलोग्ज व थोडेसें नाफथलिन आणि सोडा यांत द्रवतात.  त्या द्रावणांत पाणी मिसळून पातळ केल्यावर उत्कर्ब (हायड्रोकार्बन) पदार्थ सांक्याच्या रूपानें तळीं बसून वेगळे होतात.  नंतर तें द्रावण अम्लीकृत केलें जातें, व फेनॉल निराळें होऊन तेलाप्रमाणें वर तरंगतें.  हा तवंग काढून घेऊन त्याचें आंशिक पातन केल्यावर फेनॉल प्राप्‍त होतें.  पोट्याशम, बेंझीन सल्फोनेट व दाहक अल्कली हीं एके ठिकाणीं वितळविल्यास, ऍनिलीनवर नत्रसाम्लाच्या क्रियेनें, अल्युमिनियम हरिदासह उकळणार्‍या बेंझीनमध्यें प्राणवायूचा प्रवाह सोडल्यास बेंझीनच्या प्राणिदीकरणापासून फेलॉनचें संश्लेषणहि करितां येतें.

याचें स्फटिक समभुज चौकोनाकृति असून ते ४२.५-४३ उष्णमानावर वितळतात व तें १८२-१८३० सें. ला उकळतें.  याचें विशिष्टगुरुत्व १.०९०६ (० सेंटिग्रेड) आहे.  त्याला एक प्रकारचा विशिष्ट वास व तीव्र चव असते.  हें विषारी असून याचा कृमिनाशक सारखा उपयोग होतो.  १६-१७ सें. ला १५ भाग पाण्यांत एक भाग फेनॉल द्रवतें.  परंतु सुमारें ७० श ला तें वाटेल त्या प्रमाणांत द्रवतें.  वाफेंत ठेवलें असतां तें उडून जातें व अलकोहल, इथर, बेंझीन, कर्बद्विगंधकिद, क्लोरोफार्म, व हैमसिरकिताम्लांत तें लवकर द्रवतें, दाहक अल्कलींच्या द्रावणांतहि तें लवकर द्रवतें पण सिंधुकर्बिताच्या द्रावणांत तें बहुतेक अद्रवणीय आहे.  ओलसर असून तें हवेंत ठेवलें असतां त्याला तांबूस रंग येतो.  तें लोह हरिदाबरोबर मिळविलें असतां जांभळा रंग व ब्रोमीनमिश्रित पाण्याबरोबर मिळविलें असतां पांढरा सांका मिळतो.

औषधिविज्ञान व भेषजप्रकरण -  परोपजीवि अशा कीटकांचा नाश करण्यांत कॅबॉलिकाम्ल हें वस्ताद असून गजकर्णाच्या कृमींचा नाश करण्याकरितां त्याचा उपयोग करितात.  वीस भाग पाण्यांत एक भाग अम्ल मिळवून केलेलें द्रावण अंगास लाविलें असतां कित्येक तास पर्यंत अंग बधिर होतें.  तीव्र द्रावण दाहक परिणाम करितें.  तरी त्यामुळें कधी फोड येत नाहींत.  ह्या अम्लांत भिजविलेला कापसाचा बोळा दातांत धरिला असतां, दांतांतींल कुजक्या पदार्थांमुळें होणारें दुःख कमी होतें, परंतु दांतांसंबंधीं इतर दुःखावर त्याचा कांहीं उपयोग होत नाहीं.  एकपासून तीन ग्रेनपर्यंत कॅर्बालिक अम्ल पोटांत घेतल्यास वांत्या बंद होतात; त्याचा कृमिनाशक म्हणूनहि उपयोग होतो.

विष विज्ञान -  कॅर्बालिक अम्लानें विषप्रयोग झाला असतां मज्जातंतूवर परिणाम होतो.  ऑक्झेलिकाम्ल व उत्कर्बनत्राम्ल (हायड्रोसायनिकाम्ल) या दोन अम्लांखेरीज इतरांचे परिणाम असे होत नाहींत.  शस्त्रक्रियेनंतर लावलेल्या मलम पट्टींतून कॅरवॉलिकाम्ल आंत शोषलें गेलें असल्यास क्षोभकारक चिन्हें दृष्टीस पडत नाहींत.  परंतु निविष्ट द्रावण पोटांत गेल्यास, पोटांतील आंतडीं सुजल्याचीं चिन्हें दिसूं लागतात.  रोग्याची शक्ति एकदम गळून जाते,  त्याचें अंग थंड होऊन त्याला घाम सुटतो; व त्याचा श्वासोच्छ्वास अगदीं सावकाश होऊं लागून, झांपड आलेल्या स्थितींत त्याला मरण येतें.  याचें मूत्रावरून निदान करतां येण्यासारखें असल्यामुळें मूत्रपरीक्षा ही फार महत्वाची होय.  अम्लानें विषप्रयोग झालेल्या मनुष्याची लघवी काळसर हिरवी होते.  साधारण वजनाच्या मोठ्या पुरुषास १५ ग्रेन अम्लाचे परिणाम घातक होतात.  हें अम्ल जास्त प्रमाणांत अंगांत भिनल्याचे दुसरे परिणाम म्हणजे भोंबळ, बधिरपणा, कानांतील आवाज, अंगाचा थंडपणा, मळमळ, वांती व नाडीचा मंदपणा हे होत.

कोणत्याहि द्रवणीय गंधकितानें या विषाला उतार पडतो.  कॅर्बालिकाम्ल व गंधकित याच्या संयोगानें तयार होणारे गंधीकर्बित निरुपद्रवी असतात.  याकरितां एक औंस सिंधुगंधकित पाण्यांत घालून तें पाणी प्यावयास द्यावें किंवा अंग टोंचून हें द्रावण आंत घालावें.  मग्नगंधकिताचेंहि द्रावण पिण्यास देण्याला कांहीं हरकत नाहीं.  पण तें टोंचून घातलें असतां त्याचे परिणाम विषारी होतात.  अम्ल पोटांत गेलें असतां पोट आंतून धुवून काढून चुन्याची निवळी प्यावयास द्यावी.  कारण खटकर्बित अद्रावणीय आहे.  ज्या अल्कलीपासून द्रवणीय कर्बित होतात ते अल्कही देण्यास निरुपयोगी होत.  ईथर व दारू हीं प्यावयास द्यावी व रोग्याची शक्ति गळून गेली असल्यास गरम पाण्याच्या बाटल्यांनीं अंग शेंकून अंगावर उबदार कपडे घालावेत.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .