प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कर्नूल, जिल्हा -  मद्रास इलाख्यांतील एक जिल्हा.  याचें क्षेत्रफळ ७५८० चौ. मैल आहे.  याच्या उत्तरेस तुंगभद्रा व कृष्णा या नद्या, ईशान्येस गंतूर जिल्हा, पूर्वेस नेलोर जिल्हा, दक्षिणेस कडाप्पा व अनंतपूर जिल्हे, पश्चिमेस बल्लारी जिल्हा.  तुंगभद्रा व कृष्णा या मुख्य नद्या जिल्ह्यांत असून यांनां मिळणार्‍या लहान नद्या पुष्कळ आहेत.  यांतील मुख्य गुंदलकम्मा ही असून गुंदला ब्रह्मेश्वरम् येथें तिचा उगम होऊन ती कंबम् जवळून वहात जाते.  या ठिकाणीं तिला धरण बांधून एक तलाव १५ चौ. मैलाचा केलेला आहे.  पश्चिमेकडे हिंदरी नांवाची नदी पट्टीकोंड तालुक्यांत उगम पावून कर्नूल शहराजवळ तुंगभद्रेला मिळते.

नल्लमलाय जंगम २००० चौ. मैल क्षेत्रफळाचें आहे.  एकंदर इलाख्यांत या जंगलासारखें रम्य जंगम दुसरीकडे क्वचित आढळेल.  यांत झों अनेक प्रकारचीं आहेत.  कित्येक झाडांपासून तंतू निघतात, कित्येकांच्या तळाशीं मोठें कंद लागतात.  साग, बिवळा वगैरे इमारतीचें लांकूड मुबलक सांपडतें.  त्याचप्रमाणों वन्यपशू वाघ, चित्ते, लांडगे वगैरे शिकारीस योग्य अशीं रानटी श्वापदें इतस्ततः भ्रमण करीत असतात.  तुंगभद्रा व कृष्णा नदीत बरेच जलचर प्राणी व मासे आहेत.

कर्नूलची हवा निरोगी म्हणतां येत नाहीं.  एप्रिल, मे महिन्यांत पारा ११२० अंशापर्यंत असतो.  नवंबर महिन्यांत उष्णमान ६७० अंशापर्यंत उतरतें.  पावसाची सुरुवात जून महिन्यांत होऊन सप्टेंबर महिन्यांत अखेर होते.  हिंवतापाची सांथ बहुधा सर्वत्र असून नारू व पानथरीची वाढ यांच्यामुळें पुष्कळ लोक आजारी असतात.  पाऊस थोडा व अनियमितपणें पडतो.  यामुळें दुष्काळ वारंवार पडतो.  एकंदर दरसाल पावसाचें मान २६ इंच असतें.  नद्यांनां परू, तुफान व वादळें हीं अर्थात कमी प्रमाणांवर असतात.  १८५१ सालीं तुंगभद्रेला मोठा पूर येऊन फार नुकसानी झाली होती.  त्यावेळीं कर्नूल शहराचा थोडा भाग वाहून गेला होता.

इतिहास -  विजयानगरच्या राजानें कर्नूल आपल्या अमलांत आणण्यापूर्वीचा याचा इतिहास फारसा उपलब्ध नाहीं असें म्हटलें तरी चालेल.  परंतु कर्नूलवर चालुक्यांचें, चोलांचें व वारंगळच्या गणपतीचें आधिपत्य असावें.  १६ व्या शतकांत विजयनगरच्या कृष्णदेवरायानें कर्नूल आपल्या राज्यास जोडिलें.  १५६५ सालीं तालिकोटच्या लढाईनंतर विजयानगरचा र्‍हास झाल्यावर कर्नूल गोवळकोंड्याच्या कुतुबशाही सुलतानाकडे गेलें.  १६८७ मध्यें अवरंगझेब दक्षिणेंत मराठ्यांच्या समाचाराकरितां आला होता.  त्याचा पठाण सरदार ग्यासुद्दीन यानें कर्नूल हस्तगत केलें.  पुढें दाऊदखानला कर्नूल जहागीर मिळाली.  १७४१ मध्यें मराठ्यांनीं कर्नूलवर फार पुंडगिरी चालविली.  १७५५ सालीं हैदरअल्लीनें कर्नूलवर निशाण लाविलें व १७९९ च्या सुमारास टिपूच्या मरणानंतर कर्नूल जिल्हा निझामसरकाराकडे गेला व १८०० मध्यें निझामानें तों इंग्रजांनां दिला.  परंतु त्यांनीं कर्नूलच्या नबाबापासून १ लक्ष रुपये खंडणी घेऊन तो जिल्हा नबाबाकडे ठेविला.  पुढें १८१६ मध्यें पेंढार्‍यांनीं तो लुटला.  १८३८ मध्यें शेवटचा नबाब गुलाम रसूलखान नांवाचा होता.  त्याजवर कांहीं तोहमत येऊन त्याला त्रिचनापल्लीस तुरुंगांत ठेविलें.  त्याच्या नोकरानें त्याला तुरुंगांत ठार मारिलें.  तेव्हां नबाबाला कांहीं पेनशन ठरवून देऊन सर्व प्रांत इंग्रज राज्याला जोडला गेला.  १८४६ त पदच्युत पाळेगाराच्या वंशांतील एका पुरुषानें थोडीशी चळवळ केली परंतु त्याला लवकरच पकडून सार्वजनिक रीत्या फांशीं देण्यांत आलें.

लोकवस्ती -  कर्नूल जिल्ह्यांत तीन शहरें व ७५१ खेडीं आहेत.  त्याचे ८ तालुके आहेत.  त्यांचीं नांवें मार्कापूर, कंबम, नंदीकोटूर, रामल्लकोट, पट्टीकोंड, नंदयाल, सिरव्हेल, व कोइटकुंटल हीं होत.  जिल्ह्याची लोकसंख्या १९२१ सालीं ९१४८९० होती.

शेतकी - सबंध जिल्ह्याची जमीन लाल अथवा काळसर आहे व जमीनीचा मगदूर सामान्यच आहे.  नदीच्या कांठीं विहिरी खणून बागाईत करतात.  सबंध जिल्ह्यांत रयतवारी पद्धत आहे.  जमीनदारी कर्नूल जिल्ह्यांत फारशी नाहीं.  कर्नूल कडाप्पा कालवा जरी थेट जिल्ह्यांतून सररहा आहे तरी पिकामध्यें अद्यापि सुधारणा दिसून येत नाहीं.  लोकांची प्रवृत्ति जुन्या पद्धतीला नेहमीं धरून असते याकरितां इंग्रजी यंत्रें व अवजारें शेतकर्‍यांनीं उपयोगांत आणावीं म्हणून ठिकठिकाणीं ठेवलीं आहेत.  तथापि त्यांचा उपयोग शेतकरी लोक अद्यापि फारसा करून घेत नाहींत व सरकारकडून कर्जहि घेत नाहींत.  एकंदर क्षेत्रफळांत शेंकडा ३४ जंगम असून, कोरा व चोलम् हीं मुख्य धान्यें होत.

घोड्याकरितां हरबरा पुष्कळ पेरतात.  तांदूळ फारसा पेरीत नाहींत.  गळिताचीं धान्यें २१७ चौ.मै. च्या क्षेत्रांत असून १२८ चौ.मै. त तांदूळ पेरतात.  कापसाकडे ४३० चौ. मैलांचें क्षेत्र असतें.  बागाइत फारसें नाहीं.  या जिल्ह्यांत गुरें चांगलीं नसतात.

जंगल :-  या जिल्ह्यांतील जंगल मात्र विस्ताराच्या मानानें महत्त्वाचें आहे.  १९०३-४ सालीं २६४९ चौ.मै. क्षेत्रफळाचें जंगम असून फक्त नल्लमलायमध्यें २००० क्षेत्रफळ होतें.  मद्रास सदर्नमराठा रेल्वेला सरपणाचा पुरवठा याच जंगलांतून विशेषतः होतो.  साग वगैरे इमारतीचें लांकूड पुष्कळ निघतें व तें बाहेर गांवीं पाठवितात.  चंदनहि उत्पन्न होतें.  पण कोइमतूर व मद्रासच्या इतकें तें सुवासिक नसतें.  बांबू विपुल होतात.  खनिज पदार्थांत लोखंड मुख्य आहे.  गनी जंगलांत सांपडणारें लोखंड उत्तम प्रकारचें समजलें जातें.  रुद्रावरम् येथें लोखंड वितळण्याच्या भट्टयांचें मुख्य ठिकाण आहे.  येथील लोखंडाचीं नांगर आदिकरून शेतकीचीं हत्यारें मुख्यत्वेंकरून करतात.  गनी जंगलांत पूर्वी तांबें निघत असे.  गाझलपल्ली येथें शिसें सांपडतें.  रामल्लकोट व बंगमपल्लीला पूर्वी हिरे सांपडत होते.  सध्यां कर्नूल जिल्ह्यांत मोठा महत्वाचा उद्योग म्हटला तर कापूस हा होय.  हातमागांवर कापसाचें जाडेभरडें कापड निघतें व गिरणींत बारीक कापड काढतात.  कर्नूल व कंबम् येथें सतरंज्या उत्तम प्रकारच्या तयार होतात.  नांदियाल व कर्नूल येथें कापूस दाबण्याचे प्रेस असून रबर उत्पन्न करण्याचीं झाडें नुकतीच यूरोपियनांच्या देखरेखीखालीं कर्नूलास लावण्यांत आलीं आहेत.  चामड्याला रंग देण्याचे कारखाने अलीकडे निघालेले आहेत.

व्यापारदृष्ट्या कर्नूल फारसें महत्वाचें नाहीं.  बाहेर जाणार्‍या मुख्य जिन्नसांत, कापूस, तंबाखू, तूप, गोंद, मध, कलिंगडें, गळिताचीं धान्यें, नीळ, कांदे, साग, घोंगड्या, सुती कापड आणि सतरंज्या यांचा समावेश होतो.  बाहेरून येणारे पदार्थ विलायती कापड, मीठ, सुपारी, नारळ, साखर, तांब्यापितळेची भांडीं, गुरें, मसाले हे होत.

मद्राससर्दनमराठा रेल्वे पट्टिंकोंड तालुक्याच्या पश्चिमेस, कर्नूल जिल्ह्यांत येत असून पश्चिमेपासून पूर्वेस कंबमला जाऊन नंतर उत्तरेस वळली आहे.  १८८७ सालीं वरील रेल्वे सुरू होऊन नंदपाल स्टेशन व्यापाराला मोकळें झालें.  कर्नूल जिल्ह्यांत पक्क्या सडकांची लांबी ५४७ मैल असून कच्च्या सडका १७१ मैल आहेत.

राज्यव्यवस्था :-  कर्नूल जिल्ह्याचे चार पोटविभाग केलेले असून प्रत्येक पोटविभागावर अ. कलेक्टर अधिकारी असतो.  याशिवाय मामुली जिल्ह्याकरितां जितके कामदार असतात तितके आहेत.  जंगम कान्सरव्हेटरचें ऑफीस येथें असून कर्नूल कडाप्पा कालव्याचा मुख्य देखरेख करणारा अंमलदार कर्नुलास राहतो.

मद्रास इलाख्यातील २२ जिल्ह्यांमध्यें कर्नूलाचा शिक्षणाच्या बाबतींत १९ वा नंबर लागतो.  कर्नूल व नंदपाल येथें इंग्रजी शाळा असून सरकारला शिक्षणाप्रीत्यर्थ खर्च इ.स. १९०३-४ सालीं ९२,५०० आला होता.

पोटविभाग -  मद्रास.  कर्नूल जिल्ह्यांतील एक पोटविभाग.  क्षे. फ. ६४०.  चौ. मै. लो. सं. (१९११) १११२२७.  

गांव - मद्रास इलाखा.  कर्नूल जिल्हा व पोटविभागांचें मुख्य शहर.  हें तुंगभद्रा व हिंदरी या दोन नद्यांच्या संगमावर कर्नूलरोड स्टेशनापासून ३३ मैल लांब असून येथून मद्रास ३५० मैल दूर आहे.  १९२१ सालीं लो. सं. २७९०८ होती.  टिपूवरील स्वारींत हरिपंत फडक्यांचा मुक्काम येथें होता (रा. खं. १०. २८७).  येथील किल्ला विजयानगरच्या कृष्णदेव राजाचा मुलगा अच्युतराय यानें बांधलेला होता.  त्याचा बराच भाग पडला असून शेष असलेल्या भागांत पोलिस खात्याचा कांहीं दारू गोळा असतो.  हिंदरी नदीच्या तीरावर अबदुल वाहाब नांवाच्या सुभेदाराचें थडगें आहे.  कर्नूल हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण असून येथें जिल्हाकामगारांच्या सर्व कचेर्‍या आहेत.  पाण्याचा पुरवठा झाल्यानंतर कर्नूलची हवा कांहींशी सुधारली आहे. १८६६ सालीं कर्नूल येथें म्यु. कमिटी स्थापन झाली.  तिचें १९०३-०४ सालीं उत्पन्न व खर्च हीं अनुक्रमें ५७,००० व ५१,५०० रु. होतें.  १८९७ सालीं २॥ लक्ष रु. खर्च करून शहराला पाण्याचा पुरवठा केला.  येथें कापूस दाबण्याचे प्रेस असून सतरंज्या व हातमागांवर सुती कापड तयार होतें.  एका मुसुलमानानें चामड्याचा कारखाना सुरू केला आहे.  सरकी काढण्याचे कारखाने चार पांच आहेत.  प्राथमिक शाळांखेरीज दोन हायस्कुलें व ट्रेनिंग शाळा आहेत.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .