प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कर्ज - भारतीय कर्जपद्धति व व्याज पद्धति -  याज्ञवल्क्यस्मृतींत व्यवहाराध्यायांत ॠणादान या शब्दाखालीं तत्कालीं रूढ असलेल्या दुसर्‍याकडून कर्ज काढण्याच्या पद्धतीचेय विवेचन केलें आहे तें असें :-  कर्ज काढण्याचे प्रकार सात आहेत.  ते असे (१) कोणत्या प्रकारें कर्ज द्यावें, (२) कोणत्या प्रकारें देऊं नये (३) कोणत्या अधिकार्‍यानें द्यावें; (४) कोणत्या वेळीं व (५) कोणत्या रीतीनें द्यावे.  हें पांच प्रकार ॠणकोसंबंधी होत व (६) दानविधि व (७) अदानविधि हे दोन प्रकार धनकोसंबंधीं होत.  व्याजीं लावलेलें द्रव्य गहाण ठेवून लावलें असेल तर त्यावर द्रव्याचा ८० वा भाग व्याज घ्यावें, पण गहाणावांचून द्रव्य व्याजीं लावल्यास ब्राह्मणादि चार वर्णांकडून क्रमानें दरमहा शेंकडा दोन, तीन, चार व पांच टक्केप्रमाणें व्याज घ्यावें.  व्याज घेण्याचे चार प्रकार बृहस्पतीनें सांगितले ते :- (१) व्याजाच्या व्याजास चक्रवृद्धि (२) दरमहाच्या व्याजास कालिकावृद्धि, (३) ॠणकोच्या इच्छेनुरूप (इच्छाकृत) ठरलेल्या कालाच्या व्याजास कारितावृद्धि व (४) व्याजी लावलेल्या रकमेचें दररोज होणारें व्याज दररोज घेणें त्याल ऐकाहिकावृद्धि म्हणतात.  याज्ञवल्क्यानें धनकोस धनी व ॠणकोस अधमर्णिक असे शब्द दिले आहेत.

याशिवाय ॠणकोच्या धंद्यानुरूप व्याजाचे आणखी दोन प्रकार आहेत.  ते असे :-  द्रव्य लाभाकरितां जीव धोक्यांत घालणारे शिकारी अथवा सैनिक अशा लोकांकडून दरमहा शेंकडा १० प्रमाणें व्याज घ्यावें.  तसेंच जलमार्गानें व्यापार करणार्‍यांकडून दरमहा दरशेंकडा वीसप्रमाणें व्याज घ्यावें.  कारण त्यांचा जीव धोक्यांत असल्यामुळें मुद्दल बुडण्याचा संभव असतो.  दाम दुपटीपेक्षां व्याज मुद्दलाची रकम जास्त देऊं नये असें मनूचें मत आहे.  पोषणसामर्थ्याच्या अभावीं गाय, म्हैस इ. जनावरें दुसर्‍याच्या स्वाधीन केल्यास त्यांची संतति हेंच त्यांचे व्याज होय.  तूप, तेल वगैरे पदार्थ उसने नेऊन पुष्कळ दिवस परत न केल्यास मालकानें ते जिन्नस परत घेतांनां जास्तींत जास्त आठपट घ्यावें.  त्याचप्रमाणें वस्त्र, धान्य व सोनें यांची वाढ अनुक्रमें चौपट, तिप्पट, व दुप्पट ही जास्तीत जास्त होय.

धनकोनें ऋणकोस दिलेले कर्ज वसूल करण्याचे प्रकार धर्म (प्रीतियुक्त भाषणानें), व्यवहार (साक्षीपुराव्यानें), छल (ॠणकोच्या अंगावरील दागिने वगैरे हिसकावून घेऊन), आचरित (ऋणकोच्या दारांत उपाशीं बसून) व बल (ऋणकोस बांधून ठेवणें, मारणें इ.) वगैरे पांच आहेत.  ऋणको यास अनेक धनकोंचें ॠण द्यावयाचें असल्यास व धनको समान वर्णांचे असल्यास ज्या क्रमानें ऋणकोनें ऋण घेतलें असेल त्याच क्रमानें राजानें ऋणकोकडून फेड करवावी व धनको भिन्न वर्णाचे असल्यास वर्णक्रमानें ऋणाची फेड करवावी.  ऋणकोला मान्य असलेलें धन परत करण्यास तो दुर्बल असल्यामुळें समर्थ नसेल तर तें द्रव्य राजानें धनकोस देववावें व त्याबद्दल ऋणकोकडून शेंकडा दहाप्रमाणें दंड घ्यावा व धनकोपासून शेंकडा पांचप्रमाणें वेतन घ्यावें.  व्याजी दिलेली रक्कम ऋणको परत देऊं लागला असतां व्याजाच्या लोभानें धनको घेत नसेल तर ऋणकोनें ती एका मध्यस्थापाशीं ठेवावी.  म्हणजे तेव्हांपासून व्याज बंद होतें.  पण ऋणकोनें मध्यस्थापाशीं ठेवलेली रक्कम मध्यस्थानें वेळीं न दिल्यास त्या दिवसापासून धनकोनें पूर्वीप्रमाणें व्याज घ्यावें.

अविभक्त बंधूनीं अथवा त्यांतील एकानें कुटुंबपोषणार्थ कर्ज काढलें असल्यास तें कुटुंबांतील मुख्यानें फेडावें.  पतीनें केलेलें ऋण पत्‍नीनं, मुलानें केलेलें ऋण आईनें अथवा बापानें तसेंच पत्‍नीनें केलेलें पतीनें फेडूं नये.  पण हें कुटुंबपोषणार्थ असेल तर कुटुंबांतील मुख्यानें फेडावें.  बापानें केलेलें ऋण मुलानें फेडावें.

बापाचें कर्ज मुलानें अथवा नातवानें फेडावें.  परंतु बापानें ते जर मद्यप्राशन, जुगार, बाहेरख्यालीं इत्यादि व्यसनांसाठीं केलेलें अथवा नट, भाट, मल्ल इत्यादिकांनां देऊं केलेल्या रकमेचा अवशेष असें असेल तर तें मुलानें फेडूं नये.  कुटुंबपोषणासाठींच केलेलें कर्ज मुलानें अथवा नातवानें फेडावें.  मुलानें तें व्याजसुद्धां फेडावें व नातवानें फक्त मुद्दलच फेडावें व्याज देऊं नये.  पतीनें केलेलें कर्ज पत्‍नीनें फेडूं नये असें सांगितलें आहे.  परंतु पति मरणोन्मुख असल्यास त्यानें कुटुंबपोषणार्थ केलेलें कर्ज त्याच्या पत्‍नीनें फेडावें.  पतीनें दुर्व्यसनामुळें केलेले कर्ज फेडण्याची जबाबदारी पत्‍नीवर नाहीं पतीच्या पश्चात कुटुंबपोषणाकरितां केलेलें कर्ज पुत्राच्या अभावी पत्‍नीनेंच फेडावयाचें असे.

सध्यांचा हिंदु कायदा, कर्ज देण्याची जबाबदारी -  मयत हिंदूचें कर्ज देण्यास जितकी मयताची इस्टेट वारसाच्या ताब्यांत येईल तितक्या रकमेची कर्जाची जबाबदारी वारसावर येते.  मयताच्या कर्जाबद्दल वारसावर जातीची जबाबदारी नसते; वारस प्रत्यक्ष मुलगा अगर नातू कां असेना, इस्टेट वारसानें आली नसेल तर, मयताच्या कर्जाची जबाबदारी ही वारसावर नसते.  हा नियम मयताची व वारसाची इस्टेट निरनिराळी असते तेव्हां लागू पडतो.

मयत हिंदु व त्याचा वारस हे दोघेहि जेव्हां एका अविभक्त कुटुंबातील माणसें असतात तेव्हां कर्जाच्या बाबतींतील नियम वेगळे आहेत.  अविभक्त कुटुंबांतील एखाद्या माणसानें कर्ज केल्यास त्याच्या सावकारानें ॠणकोच्या हयातींत कोर्टांतून हुकुमनामा मिळवून, त्याची बजावणीहि ऋणकोच्या हयातींत एकत्र असलेल्या मिळकतींतील त्याचा वाटा जप्‍त व लिलाव करून, केली पाहिजे.  जर अविभक्त असलेला ऋणको, मिळकत जप्‍त होण्यापूर्वीच वारला तर त्याची इस्टेट इतर शेषाधिकारी असणार्‍या अविभक्त मंडळीकडे जाईल; सावकारास एकत्र असलेली मिळकत विकून मिळणार नाहीं.  त्या ऋणकोची स्वतंत्र वेगळी असलेली मिळकत मात्र जप्‍त व लिलांव करतां येईल.

या वरील नियमास एक अपवाद आहे.  जेव्हां बाप अथवा बापाचा बाप हा ऋणको असतो तेव्हां त्याच्या कर्जाबद्दल मुलगा अगर नातू यांस, मयताच्या अमिभक्त इस्टेतींतील वाट्याइतकें, जबाबदार धरतां येतें.  परंतु बापाचें अथवा आजाचें तें कर्ज, अनीतिकारक व गैरकायदा वागणुकीनें झालेलें नसलें पाहिजे.  कारण बापाचें व आजाचें अनीतिकारक व गैरकायदा नसलेलें कर्ज देण्याबद्दल धर्माचें बंधन आहे.  परंतु बापाचें अगर आजाचें कर्ज अनीतिकारक अगर गैरकायदा वर्तणुकीनें झालें असल्या, सावकारास, बापाच्या अगर आजाच्या अविभक्त इस्टेटींतील हिस्सा, त्याच्या मरणाच्यानंतर जप्‍त करतां येत नाहीं.  शेषाधिकारी या नात्यानें तो हिस्सा मुलगा अगर नातू यांजकडे जातो.

बाप अगर आजा यांच्या कर्जाची जबाबदारी वैयक्तिक जातीवर कधींहि नसते.  म्हणून सावकारास मुलाच्या अगर नातवाच्या जातीवर अगर त्याच्या संपादित इस्टेटीवर बजावणी करतां येत नाहीं.  मुलावर, फक्त एकत्र असलेल्या हिश्शापुरती जबाबदारी असते.  सारांश, मुलगा व बाप एकत्र असल्यास सावकारास, बापावर फिर्याद लावून बापाची व मुलाची एकत्र असलेली सर्व इस्टेट विक्रीस आणतां येते.  तसेंच, बापास आपल्या हयातींत आपल्या कर्जाकरितां मुलाची व बापली एकत्र असलेली मिळकत विकतां अगर गहाण टाकतां येते.  या कामास मुलाची संमत्ति असण्याची जरूरी नाहीं.

नवरा व बायको - नवर्‍याच्या कर्जाबद्दल नवर्‍याच्या पश्चात बायको स्वतः जबाबदार नाहीं.  तसेंच तिचें धनहि जबाबदार नाहीं.  फक्त नवर्‍याची इस्टेट जबाबदार आहे.  तसेंच बायकोच्या कर्जाबद्दल नवरा अगर त्याची इस्टेट जबाबदार नाहीं.  पण ज्या वेळेस कर्ज काढण्याबद्दल नवर्‍यानें बायकोस परवानगी दिली असेल तेव्हां त्या कर्जाची जबाबदारी नवर्‍यावर येते.

कर्ता व वडील बंधु -  एकत्र कुटुंबांतील वडील भावानें अगर कर्त्या भावानें कायदेशीर कारणासाठीं कर्ज केलें असल्यास तें सर्व एकत्र कुटुंबाकरतां होतें कीं काय हें पाहिलें पाहिजे.  एकत्र कुटुंबाकरतां कर्ज काढल्यास त्याची जबाबदारी सर्व भावांवर असते; एखाद्या भावास त्या कर्जाचा फायदा झाला नसल्यास त्या कर्जाची जबाबदारी त्या भावावर नसते.

कायदेशीर कारणें -  यांत सरकारी सारा, एकत्र कुटुंबांतील माणसांचें पोषण, मुलामुलींचीं लग्नें, मृतांच्या संस्काराबद्दल खर्च, इस्टेटीच्या संरक्षणार्थ केलेल्या फीर्यादींचा व अन्यखर्च, कुटुंबांतील कर्त्या पुरुषास फौजदारी आरोपांतून मुक्त करून घेण्यास लागणारा खर्च व कुटुंबाचा निर्वाह चालविण्यास काढलेलें कर्ज या सर्वांचा समावेश होतो.  बापानें केलेल्या अनीतिकारक व गैरकायदा कर्जांत दारू, जुगार, बाहेरख्याली वगैरे अनीतिकारक वर्तनापासून झालेल्या कर्जांचा समावेश होतो (ले. ल. ब. पेठकर).

हिंदुस्थानातील इतर कर्जपद्धति इंग्लंडप्रमाणेंच असल्यामुळें प्रथम इंग्लंडातील कर्जाच्या कायद्याची सामान्य माहिती दिली पाहिजे.

कोणतीहि विवक्षित रक्कम एक मनुष्य दुसर्‍यास कर्जाऊ देण्यास जबाबदार असतो तीस कर्ज असें म्हणतात.  तें व्यक्तिशः करार, कायदा किंवा कोर्टाचा ठराव या तीन प्रकारांनीं उत्पन्न होतें.  त्याचें साधारणपणें तीन प्रकार आहेत.  (१) कोर्टाच्या ठरावानें होणारें, (२) विशिष्ट प्रकारचें (स्पेशल्टि) व (३) खासगी करारानें होणारें.

पहिल्या प्रकारचें कर्ज अम्मलबजावणी करून किंवा नवीन फिर्याद लावून वसूल करतां येतें.  दुसर्‍या प्रकारचें कर्ज कर्जरोखा करून उत्पन्न करतां येतें.  हल्ली त्याचा विशेष म्हटला म्हणजे हें कोणत्याहि प्रकारचा मोबदला न देतां उत्पन्न करतां येतें.  आणि त्याला वीस वर्षांची मुदत असते.  परंतु खासगी साध्या कर्जाच्या बाबतींत सहा वर्षांची मुदत असते.  पहिल्या दोन प्रकारांव्यतिरिक्त कोणत्याहि ॠणास साधें किंवा खासगी कर्ज म्हणतात.

याशिवाय एकाच्या देण्याबद्दल दुसर्‍यानें हमी दिल्यास तें त्याचें कर्ज होऊं शकतें.  आणि त्याबद्दल त्याच्यावर फिर्यादहि होऊं शकते.  अथवा एकानें दुसर्‍याकडून निघत असलेल्या बाकीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास तें परत देण्याबद्दल तो जबाबदार असतो.

सन १८७३ पूर्वी इंग्लंडमध्यें एकाच्या नांवाचें कर्ज दुसर्‍यास बेचन करून देतां येत नसे.  परंतु आतां ऋणकोस कळविल्यानंतर तसें करतां येतें.  साधारणपणें कर्जास व्याज नसतें.  परंतु खासगी करार किंवा रूढी किंवा त्या बाबतींत एखादा कायदा असल्यास व्याज घेतां येतें.

फेड करणें :-  जें देणें असेल तें पूर्ण देऊन किंवा तडजोडीनें देण्याच्या पोटीं दुसरें कांहीं घेऊन किंवा धनकोचें ऋणकोस दुसरें कांहीं देणें असल्यास त्याची वजावाट करून कर्ज वारतां येतें.  या व्यतिरिक्त उपाय म्हणजे नादार होणें हा होय.  ऋणकोनें धनकोकडून मागणीची वाट न पहातां तो असेल त्या ठिकाणीं कर्जाची रक्कम नेऊन देणें हें त्याचें कर्तव्य आहे.  धनको जर समुद्रापलीकडे गेला असेल तर ऋणकोनें स्वस्थ बसण्यास हरकत नाहीं.  ऋणकोनें देऊं केलें असतां जर धनकोनें घेण्याचें नाकारलें तर कर्जफेड झालीं असें होत नाहीं.  परंतु जर त्यानें फिर्याद केली तर ऋणकोला धनकोकडून खर्च मिळतो.

कधी कधीं एकाच्या कर्जाच्या फेडीबद्दल दुसरा हमी घेतो.  तेव्हां ऋणकोबरोबर तोहि जबाबदार होतो.  १०० पौंडांपेक्षां जास्त कर्ज ज्यावेळेस नसेल त्यावेळेस परगणा कोर्टांत फिर्याद आणतां येते.  त्यापेक्षां जास्त असल्यास हायकोर्टात आणावी लागते.  कोर्टाचा हुकूम मिळाल्यावर तो त्याच्या जातीवर, किंवा त्याची मालमत्ता जप्‍त करून किंवा त्याचें येणें जप्‍त करून बजावतां येतो.  जर ऋणकोनें कर्ज बुडविण्याचा प्रयत्‍न केला असेल आणि कर्जाची रक्कम ५० पौंडांपेक्षां जास्त असेल तर त्यावेळेस त्याच्या नादारीचा कर्ज कोर्टाकडे करतां येतो.

सन १८६९ पासून कार्जाबद्दल तुरुंगांत टाकण्याची पद्धत बंद केली आहे.  परंतु दंडाची रक्कम, पंच व सॉलिसिटर यांनी तो नियम लागू नाहीं.  त्याचप्रमाणें ऋणकोनें ऐपत असून हप्ते देण्याचें चुकविलें तर ४८ दिवसपर्यंत त्यास तुरुंगांत ठेवण्याचा कोर्टास अधिकार आहे.  या तुरुंगवासानें कर्ज देणें चुकत नाही पण त्याच त्याच देण्याबद्दल पुन्हां तुरुंगांत ठेवतां येत नाहीं.

ही तुरुंगाची शिक्षा आयर्लंडमध्यें सन १८७२; स्कॉटलंड १८८०, फ्रान्स १८६७, बेल्जम १८७१, स्वित्झरलंड आणि नार्वे १८७४, इटली १८७७, याप्रमाणें निरनिराळ्या वेळीं बंद करण्यांत आली.  अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत ही पद्धति सर्व ठिकाणीं होती.  परंतु अलीकडे ती बंद केली आहे.  फक्त ज्या वेळेस ऋणको धनकोस फसविण्याकरितां देशाबाहेर जात असेल त्यावेळेस त्यास तुरुंगात ठेवतात.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .