प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

करेण्णी - ब्रह्मदेशांत, सालवीन नदीच्या दोन्ही तिरावर असलेल्या तांबड्या करेण लोकांचा देश.  याच्या उत्तरेस शान संस्थानें; दक्षिणेस सालवीन जिल्हा; पूर्वेस सयाम व पश्चिमेस टोंगू जिल्हा.  या देशाचे पूर्व करेण्णी व पश्चिम करेण्णी असे दोन भाग आहेत.  पैकीं पहिल्यात गंतरवडी (२५०० चौ. मै.) हें एकच संस्थान असून दुसर्‍यात क्येबोग्यी (३५०० चौ.मै.), बवलेक (२०० चौ.मै.), नमोकोन (५० चौ.मै.) व नौंगपले (३० चौ.मै.) अशीं चार लहान संस्थानें आहेत.  देशाच्या उत्तरेकडे लोइका येथें शान संस्थानचा असिस्टंट सुपरिंटेंडेंट राहतो; तो ब्रिटिश सरकारचा एजंट या नात्यानें येथील संस्थानिकांवर हुकमत चालावितो करेण्णींचा वायव्य भाग खुला व सपाट मैदानाचा असून त्यात पाणीहि मुबलक आहे.  या देशांतून सालवीन व तिला मिळणारी नमपॉन या दोन नद्या वहातात.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत करेण्णी संस्थानच्या इतिहासासंबंधीं निश्चित माहिती मिळत नाहीं.  त्या शतकाच्या उत्तरार्धांत, शान संस्थानांतून येणार्‍या स्वार्‍या व अंतःकलह यामुळें देशात एकसारखी अस्वस्थता पसरली होती.  वरचा ब्रह्मदेश ब्रिटिशांनीं आपल्या राज्यास जोडल्यानंतर करेण्णींतील सर्व संस्थानें ब्रिटिशांचीं मांडलिक होऊन त्यांनां खंडणी देऊं लागलीं.

१९०१ त करेण्णींची एकंदर लोकसंख्या ४५९७५ असून ती पुढील प्रमाणें निरनिराळ्या भागांत विभागलेली होती :-

गंतरवडी :- २६३३३.  क्येबोग्यी :- २७०१, बवलेक :- ५७०१, नम्मेकोन :- २६२९, नौंगपले :- १२६५.

नमपिलू खोर्‍यांत पाणी दुर्मिळ झाल्यामुळें अलीकडे लोकसंख्या कमी झाली आहे असें म्हणतात.  तांबड्या करेणपैकी अर्धे अधिकलोक सुधारणेच्या अगदी खालच्या पायरीवर असून त्यांची शरीरें व संवयी गलिच्छ असतात.  करेण लोकांखेरीज संस्थानांत शान, तौंगथु, ब्रे, पदौंग व पांढर आणि इतर करेण हे लोक आहेत.  ह्या देशाची मुख्य संपत्ति म्हणजे सागचें लांकूड ही असून सालवीन नदीच्या डाव्या तीराला, नमपॉनच्या दोन्ही कांठांला व वायव्येकडील संस्थानात मोठमोठी अरण्यें आहेत.  १८९३-९४ त संस्थानांचें एकंदर वार्षिक उत्पन्न ६७००० रु. होतें.

करेण्णी लोक अथवा लाल करेण हे स्वतःला कया म्हणवितात.  त्यांचें साहित्यंग्रंथांतले नांव किरात असें आहे.  ते लढाऊ लोक आहेत व छापा मनुष्यस्तेय व पशुस्तेय करण्याचा त्यांचा प्रघात आहे.  च्वे अथवा कुलक्रमगत हाडवैर चालू ठेवण्याच्या पद्धतीमुळें काचीन करेण्णी व ब्रह्मदेशातील दुसर्‍या जंगली जाती यांमध्यें ऐक्य होत नाहीं.  अधिपतीचा हुद्दा आनुवंशिक नसतो.  तो कांहीं धार्मिक विशिष्ट गुणामुळें एखाद्याला मिळतो.  त्यानें वर्तन शुद्ध ठेविलें पाहिजे व खाद्यपेयांत कांहीं निर्बंध पाळले पाहिजेत.  त्याला नजर केलेल्या पक्ष्यांच्या पायांच्या हाडांतील छिद्ररचनेवरून शकुनविद्येनें तो सुलक्षणी आहे किंवा नाहीं हें ठरवितात.  प्रत्येक मनुष्य दुसर्‍यानें केलेल्या अपराधाकरितां सूड स्वतःच घेतो.  फक्त महत्त्वाच्या तक्रारी अधिपति तोडतो.

करेण्णी लोक नियमित सारा आपल्या अधिपतींनां कधींहि देत नाहींत.  फक्त कांहीं ठरलेल्या दिवशी व सणाच्या दिवशी अधिपतीला एक चांदीची देगणी त्यांनां द्यावी लागते.  करेण्णी लोक शपथा फार इमानानें पाळतात.  रेडे मारून त्यांचें मांस खाणें व हाडें स्मारक म्हणून ठेवणें, भुजांतील रक्ताचा थेंब पाण्यांत टाकून पिणें, फणस खाणें, भाल्यांचा बदल करणें, हें शपथांचे प्रकार आहेत.

बायबल व करेणी पुराणकथांचें साम्य -  करेण लोकांच्या जुन्या दंतकथा व ख्रिस्ती धर्मग्रंथांची भाषा यांमध्यें इतकें साम्य आहे कीं प्राचीन पाद्री लोकांचें असें मत झालें होतें कीं करेण लोक हे ज्यू लोकांपैकीं असावेत.  या लोकांची भाषा व हिब्रू भाषा यांमध्यें साम्य असून हे लोक नाहींशा झालेल्या दहा जातींपैकीं असले पाहिजेत असें कांहीं पाद्री समजतात.

ईश्वराला हे लोक 'यवा' असें म्हणतात व हा शब्द थोडासा 'यहे' शब्दासारखा आहे.  ईश्वरानें हें सर्व विश्व उत्पन्न केलें असून तो अमर्त्य आहे असें हे मानतात.  त्यांच्या ईश्वर व सृष्ट्युत्पत्तीच्या कल्पना पुढीलप्रमाणें आहेत :-  

''ईश्वर निर्विकल्प व अनद्यानंत असून सर्वशक्तिमान, सर्वज्ञ व सर्वव्यापी आहे; तो स्वर्गांत रहातो व त्याला सर्व वस्तू दिसतात; त्यानें पृथ्वीपासून मनुष्य उत्पन्न केला व मनुष्याच्या बरगडींपासून स्त्री उत्पन्न केली.  आपल्या प्राणाचा कांहीं अंश मनुष्य व स्त्री यांच्या नाकपुडींत घातला व अशा रीतीनें त्यांच्यांत प्राण उत्पन्न झाला, ईश्वरानें नंतर खाद्य, पेय, तांदूळ, अग्नि, जनावरें, हत्ती, पक्षी उत्पन्न केले.''

दंतकथा - या पूर्णपणें समजण्यास ज्या सैतानानें ईश्वराची आज्ञा मनुष्याला मोडावयास लाविलें त्या सैतानाविषयीं करेण लोकांचें काय मत आहे हें समजून घेतलें पाहिजे.  या सैतानाला 'नौकल्पौ' असें म्हणतात.  ''हा सैतान पहिल्यानें नीट वागत होता; परंतु त्यानें कांहीं काळानें ईश्वराच्या आज्ञेचें उल्लंघन केलें, ईश्वरानें त्याला हांकून दिलें; कारण त्यानें मनुष्याला मोह पाडून फसविलें.''  या सैतानानें मनुष्याचा नाश केला.  ''पा यवा (ईश्वर) म्हणाला, 'मुलांनों, तुमच्यासाठीं एक बाग मी तयार करीन; तींत सात निरनिराळीं झाडें असून त्या प्रत्येकाला निरनिराळीं फळें येतील.  परंतु त्या सात फळांपैकीं एक फळ तुम्ही खातां कामां नये.  खाल्ल्यास तुमचा नाश होईल.  मी उत्पन्न केलेले इतर सर्व जिन्नस तुम्हाला देतों; आठवड्यांतून एकदां मीं तुमची भेट घेईन.  मीं काय म्हणतो तें नीट लक्षांत ठेवून सकाळ संध्याकाळ माझी पूजा करीत जा.''  नंतर मुकाली (सैतानाचें दुसरें नांव) यानें त्या स्त्रीपुरुषांनां विचारिलें, 'तुम्ही येथें काय खातां' त्यांनी सांगितलें, 'ईश्वरानें आमच्यासाठीं पुष्कळ अन्न उत्पन्न केलें आहे.'  सैतानानें तें पहाण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावरून त्यांनीं तीं झाडें व फळें त्यास दाखविलीं; व एक फळ न खाण्याविषयीची आज्ञाहि त्यास कळविली.  नंतर तो सैतान म्हणाला 'ईश्वर तुमची काळजी वहात नाहीं; जें फळ फार चांगलें आहे तें खाण्याची तुम्हाला त्यानें बंदी केली आहे.  तें फळ तुम्ही खाल्लें तर तुम्हाला स्वर्ग मिळेल.  तुमचें कल्याण व्हावें अशी ईश्वराची इच्छा दिसत नाहीं; व तुम्हांवर त्याचें प्रेमहि नाहीं.  परंतु तुमचें कल्याण व्हावें अशी माझी इच्छा आहे व तुमच्यावर माझें प्रेम आहे.  म्हणून तें फळ तुम्ही खाऊन टाका.  परंतु मनुष्यानें हें ऐकिलें नाहीं; व तो तेथून निघून गेला.  परंतु त्या स्त्रीला तें बोलणें खरें वाटल्यामुळें तिनें त्या फळाचा थोडा भाग खाल्ला.  नंतर सैतानाच्या सांगण्यावरून स्त्रीनें आपल्या नवर्‍याचेंहि मन वळविलें; व त्यानेंहि तें फळ खाल्लें.  इतकें झाल्यावर त्या सैतानानें समाधान प्रदर्शित केलें.

दुसर्‍या दिवशीं ईश्वर त्यांच्या भेटीस आला, त्या वेळीं मना केलेलें फळ कां खाल्लें, असा प्रश्न त्यानें त्या दोघांनां केला; परंतु कांहीं एक उत्तर दिलें नाहीं त्यावर ईश्वर म्हणाला, 'तुम्ही माझें ऐकिलें नाहीं, म्हणून तुमच्या लोकांत, आजार, म्हातारपण व मृत्यु यांचा प्रवेश होईल; कांहीं लोक अगदीं बाल्यावस्थेंत मरण पावतील, कांहीं लोक तारुण्यावस्थेंत मरतील व कांहीं लोक वृद्धावस्थेंत नाश पावतील' असा शाप देऊन ईश्वर निघून गेला.

पुढील उतार्‍यावरून असें समजतें की सैतानानें सर्पाचें रूप धारण केलें होतें.  ''सैतानानें लबाडीनें त्या स्त्रीपुरूषांस ईश्वराची आज्ञा मोडण्यास लाविलें.  कारण तो सर्प त्यांचा द्वेष करीत असे, त्यानें पिवळें फळ व पांढरें फळ त्या दोघांस खावयास दिलें; अशा प्रकारें त्यांची फसगत झाली; व त्यांनीं ईश्वराचें न ऐकिल्यामुळें त्यांचा नाश झाला.''

जलप्रलयकथा - '' पूर्वी जलप्रलय झाला तेव्हां दोघा भावांनां मोठें संकट पडल्यामुळें ते एका तराफ्यांत बसले; परंतु पाणी इतकें वाढलें कीं तें आकाशापर्यंत जाऊन पोहचलें.  धाकट्या भावाला एक आंब्याचें झाड आढळलें व तो त्यावर चढला.  परंतु एकाएकीं पाणी कमी झाल्यामुळें तो मनुष्य झाडावरच राहिला.'' मनुष्यप्राणी निरनिराळ्या ठिकाणीं पृथ्वीवर कसा आला त्याविषयीं :-  ''एकाच आईबापांपासून सर्व मनुष्यें उत्पन्न झालीं; परंतु एकमेकांवर त्यांचें प्रेम नसल्यामुळें तीं सर्व वेगळीं झालीं; नंतर एकमकांचीं ओळख नाहींशी झाली; व त्यांच्या भाषेंत फरक पडून, त्यांच्यामध्यें वैरभाव उत्पन्न झाल्यामुळें तीं एकमेकांशीं भांडूं लागली.  करेण लोकांनीं ईश्वराच्या आज्ञेचा भंग करून त्याच्यावर विश्वास ठेविला नाहीं यामुळें त्यांच्या निरनिराळ्या भाषा होऊन, त्यांच्यांत फाटाफुट झाली.''  दुसर्‍या एका दंतकथेंत असें आहे कीं धाकट्या भावानें थोरला भाऊ करेण यास, ज्या ठिकाणीं त्यानें ईश्वरास सोडिलें होतें, त्या ठिकाणीं परत येण्याविषयीं विनंति केली.  परंतु करेण यानें तें ऐकिलें नाहीं.  धाकटा भाऊ त्या ठिकाणीं गेला; त्याची व ईश्वराची भेट झाली.  ईश्वरानें करेणाच्या देशांत राहूं नको असें त्यास सांगितलें.  अशाप्रकारें ईश्वरानें पांढर्‍या लोकांस पश्चिमेकडील प्रदेशांत नेलें.  जलप्रलयासंबंधीं दंतकथा व नंतर झालेली मनुष्यजातीची विभागणी या दोन गोष्टी चुकून एके ठिकाणीं केल्या गेल्या आहेत.

करेण लोकांचा धर्म -  करेण लोकांमध्यें जेव्हां ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला, त्यावेळीं यवाची पूजा करण्याचा फारसा प्रचार नव्हता.  मंत्रतंत्र पिशाचविद्या वगैरे गोष्टींकडे या लोकांचें मन हळूहळू वळत चाललें असें एका दंतकथेवरून कळतें.  ईश्वरापासून मनुष्याची ताटातूट झाल्यावर त्यांनी सैतानाची मदत घेतली; कारण त्यांनां ईश्वरानें सांगितलेली मरणाची शिक्षा बदलणें शक्य नव्हतें.  सैतानानें त्यांनां मरण येऊं नये म्हणून मंत्रतंत्र शिकविले.  हल्लीं मूर्तिपूजक करेण लोकांमध्ये चालू असलेला भूतपूजेचा प्रकार अशा रीतीनें अस्तित्त्वांत आला.  आत्मा अविनाशी आहे असा सर्वसाधारण यांचा समज आहे.  पुनर्जन्माची कल्पना त्यांच्यांत नाहीं.  मरण आलें असतां प्राणवायु हवेंत मिसळून जातो असें हे समजतात.

पुराणकथा - यांच्या पौराणिक कथा मनोरंजक आहेत. कित्येक देवांनां हे भजतात; व त्यांपैकीं बहुतेकांनां 'केल्हा' अशी संज्ञा आहे.  या शब्दाचा मूळ अर्थ स्वच्छ किंवा शुद्ध असा आहे.  प्रत्येक वस्तूचा निरनिराळा केल्हा असे.  एखाद्या जमीनींतील पीक चांगलें पिकणार नाहीं असें वाटल्यास ते लोक धान्याच्या देवतेची प्रार्थना करून तिला बोलावितात.  इतकें करूनहि ती देवता न आल्यास तें पीक बुडेल असें समजलें जातें.  देवतेची प्रार्थना करण्याचा त्यांचा प्रकार विशिष्ट आहे'' हे धान्यदेवते ! शेतावर सत्वर ये; खो नदीपासून, कॉ नदीपासून किंवा या दोहोंच्या संगमापासून ये; पूर्वेकडून वा पश्चिमेकडून ये; पक्ष्याच्या किंवा हत्तीच्या कंठापासून ये; नद्यांच्या मुखापासून किंवा शान व ब्रह्मदेशापासून ये.'' प्रत्येक प्राण्याच्या वेगवेगळ्या देवता (आत्मा) आहेत.  एखाद्या व्यक्तीच्या केल्हा (आत्म्या) ला एखाद्या शत्रूनें अडथळा केल्यास त्या व्यक्तीला मरण येतें.

केल्हा व आत्मा हे एक नाहींत; तथापि तो शरीरापेक्षां भिन्न आहे.  अशक्त लोक मुलें यांनां हा केल्हा सोडून जातो.  प्रेत नेत असतांना मुलांच्या केल्ह्यांनीं त्यांस सोडून जाऊं नये म्हणून मुलांनां एक विशिष्ट जागीं बांधून ठेवितात.  ज्या घरांत मनुष्य मेला असेल तें घर सोडून देतात.  नाहीं तर त्या घरांत रहाणार्‍या मनुष्यांनां विशेषतः मुलांनां सोडून केल्हा जाईल अशी त्यांस भीति असते.

केल्ह्याचा अर्थ जीवित किंवा अस्तित्व असा आहे.  शीरांतील इंद्रियरचनेहून केल्ह्याची रचना निराळी आहे.  तो आपल्या मनाप्रमाणें शरीरांत राहतो व वाटेल त्यावेळीं निघून जातो.  सृष्टींतील अनेक चमत्कारांची भूमिका हा केल्हा घेतो.  याला सात प्रकारच्या निरनिराळ्या स्थिती आहेत.  व त्या मनुष्याचा नाश करूं पाहतात.  पहिली स्थिति मनुष्याला वेडा बनविते, दुसरी मूर्ख व तिसरी निर्लज्ज बनविते.  आणि चवथ्या अवस्थेंत मनुष्य रागीट व क्रूर होतो.  वाईट गोष्टी करण्याकडे या केल्ह्यांची प्रवृत्ति असते.

मनुष्याच्या डोक्याच्या वरच्या भागीं 'त्सो' नांवाची एक देवता असते.  ही देवता त्या ठिकाणीं असली म्हणजे केल्ह्यापासून मनुष्यास कांहीं एक त्रास होत नाहीं.  ही त्सो अशक्त झाली म्हणजे मनुष्याला फार त्रास होतो.  'त्सो' स खूष ठेवण्यासाठीं डोक्याची फार काळजी घेतली जातो व डोक्याला चांगला चांगला पोशाख घालतात.  'त्सो' चा अर्थ सामर्थ्य असा आहे.  व 'जीवितासंबंधीचा अगर मनोवृत्तीसंबंधी स्वभाव' असा 'केल्हा' या शब्दाचा अर्थ आहे. त्सो किंवा 'बुद्धि' केल्ह्याच्या वरच्या भागीं असते.  मनुष्याची खरी शक्ती या या त्सो मध्येंच आहे.  कोणत्याहि संकटापासून त्सोच्या योगानें मनुष्याचें संरक्षण होतें.  त्सो किंवा विचारशक्तीच्या व्यंगांमुळें किंवा गैरहजीरीमुळें मनुष्याला अपयश येतें अशी कल्पना आहे.

थेरेट, थेक व केफू या नांवांत भूत, पिशाच यांचा समावेश होतो.  केफू व थेरेट या रक्त पिणार्‍या भूतांच्या जाती आहेत.  या जाती केल्ह्यांचा संहार करितात.

'मुखाह' नांवाच्या भुतांपासून करेण लोकांची उत्पत्ति झाली असें म्हणतात.  हीं दैविक भुतें असून त्यांच्या पासूनच हल्लींच्या लोकांची उत्पत्ति झाली.  मुखाहच्या राजांपासून झालेली प्रजा पंगू, बेढब अशी होती.  जन्म व विवाह यांवर मुखाहांची सत्ता असे.  ज्यांचें लग्न व्हावयाचें असेल त्यांचें रक्त ते एकत्र करितात.

केलीफो नांवाचीं पिशाच्चें आपल्या पंखांच्या योगानें वारा उत्पन्न करितात; ताहयूमु सूर्य व चंद्रग्रहणें घडवून आणितात.  आणखी दोन प्रकारचीं भुतें आहेत त्यांनां कुडा व लाफो असें म्हणतात.  पावसाळ्याचें व उन्हाळ्याचे अधिष्ठान यांच्याकडे असून तीं वीज व मेघनाद उत्पन्न करितात.  लाफो पैकीं एका वर्गाकडे उन्हाळ्याचें अधिष्ठान असून तो सतत परिश्रमानें कंटाळून जातो; दुसरा वर्ग उन्हाळ्याच्या शेवटीं बाहेर निघून कंटाळलेल्या पहिल्या वर्गांतील पिशाच्चावर हल्ला करून त्यास परत जाण्यास लावितो व अशा प्रकारें सर्व सत्ता याच्या ताब्यांत येते; परंतु पुन्हां उन्हाळा सुरू होतांच पहिला वर्ग आपली सत्ता पुन्हां बळकावितो.

मुखाहांची पूजा केली जाते व यांच्यानिमित्त बळीहि देतात; हे जरी चांगले आहेत तरी हे मनुष्याचें रक्त अगदींच पीत नाहींत असें नाहीं. हीं सर्व काल्पनिक भुतें रक्त पिणारीं आहेत.

फीबी, यौ किंवा सिरेस हीं पिशाच्चें फार परोपकारी असतात; हीं निवांत जागीं बसून धान्याची वाट पहात असतात.  काटकसरी व उद्योगी लोकांचीं धान्याची कोठारें धान्यानें भरून जावीं असा यांचा उद्देश असतो.  हीं भुतें फार लोकप्रिय असतात.

(संदर्भग्रंथ - रेव्ह.  ई.बी.क्रॉस-करेण्स (ज.ए.ओ.एस.४); इं. गॅ; इं. अॅ. २१.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .