प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

करार, करारांसंबंधीं कायदा - (काँट्रॅक्ट)  हा कायद्यांतील पारिभाषिक शब्द, सौदा किंवा बोली ह्या अर्थी वापरतात.  कराराच्या कायद्याप्रमाणें (''इंडियन काँट्रॅक्ट ऍक्ट'') ह्याचा अर्थ, 'कायद्यानें अम्मलबजावणी करतां यईल अशी कबुलायत' असा होतो.  सचोटीनें केलेल्या व्यवहाराची अम्मलबजावणी हें एक न्यायकोर्टाचें मुख्य काम आहे.  शांतता राखणें आणि जुलूम व लबाडी ह्यांपासून मालमत्तेचें संरक्षण करणें ह्यांच्या खालोखाल महत्त्वाचें हें काम आहे.  तरी देखील कायद्याच्या इतिहासांत कराराचें महत्त्व बरेंच उशीरां कळून आलेलें दिसतें.  याज्ञवल्क्य स्मृतींत व्यवहाराध्ययांत सध्यां ज्याला आपण करार म्हणतों तशा तर्‍हेचा व्यवहार वर्णिला नाहीं.  तथापि वेतनादान, ऋणादान वगैरे प्रकरणांत कराराचा कांहीं भाग येतो, पतीवर व्यवहार करण्याला लायक होण्याइतकें, राष्ट्र जर उद्योगधंद्यांत व सुधारणेंत पुढें आलें तर त्याला करारांसंबंधीं चांगल्या सुधारून केलेल्या नियमांची आवश्यकता असते.  रोमन लोकांनीं ह्याविषयीं केलेला कायदा उत्कृष्ट असा होता.  सध्यांच्या कायद्याचीं बीजें त्यांतूनच घेतलेलीं आहेत.  पण पुढें जेव्हां रोमच्या राज्याचा र्‍हास झाला तेव्हां पश्चिमेकडील ख्रिस्ती धर्मसमाज परत अस्ताव्यस्त असा पडून राहिला व लोकांच्या सुव्यवस्थित न्यायाच्या व कायद्याच्या कल्पना इतक्या कोत्या बनून गेल्या कीं, आपल्याला फार जुने म्हणून माहीत असलेले रोमन कायदेकान त्यावेळीं अपरिचित व नवीन असे वाटूं लागले.

अशा स्थितींत ज्यावेळीं कायद्यासंबंधींच्या कल्पना विस्कळित स्वरूपाच्या असून न्यायतत्त्वशास्त्राची वाढ झाली नव्हती त्यावेळीं सर्वसामान्य कराराचें तत्त्व सामाजिक व धार्मिक बाबीखेरीज इतर ठिकाणीं पाळीत नसत.  ज्यांस एखाद्या गोष्टीविषयीं खात्री करून घ्यावयाची असेल, त्यांस शपथ घ्यावयास लावणें किंवा जामीन घेणें हे मार्ग असत.  त्यांतून, लोकांकरितां केलेलीं न्यायपीठें तर ह्याकडे मुळींच पहात नसत.  हप्तेबंदीनें दंड देण्याची व्यवस्था करून रक्तपातापर्यंत आलेलें भांडण मिटविणें हीं बहुतकरून करारपद्धतीची प्राथमिक व्यवस्था दिसते.  अशा तर्‍हेची कृत्यें हीं लोककल्याणाला आवश्यक असत म्हणून त्यावेळचे लोक कांहीं महत्त्वाच्या बाबतींत वचतांना लोकसंमतीचा शिक्का मारीत.  प्राचीन लोकांनां प्रथम, खाजगी व्यवहाराच्या अंमलबजावणीला सरकारी कायद्याची गरज लागते ही कल्पनाच नव्हती.  ह्या संबंधात बुद्धिमान पक्षकार, वकील व कांहीं अंशीं न्यायाधीश हे हळू हळू सरकारचा हात शिरकवूं देण्याच्या कामीं कारणीभूत झाले; राजांनीं होऊन आपली सत्ता गाजविण्याचा उघड प्रयत्‍न केला नाहीं.  कर्जाऊ दिलेले पैसे मात्र पूर्वीपासून कायदेशीर रीतीनें फेड करून घेतां येत असत.  ह्याचें कारण ऋणकोनें उसनवार घेतलेली रक्कम परत देण्याचें वचन दिलेलें असतें म्हणून नव्हे तर, ती रक्कम अजूनहि धनकोच्या मालकीची असून जणूं काय त्यानें ती ऋणकोजवळ ठेवण्यास दिली आहे, असें मानण्यांत येई.  जमीनीचा ताबा मिळविण्यासाठीं याच पद्धतीनें नार्मन स्वारीनंतर इंग्लंडांत बरींच शतकेंपर्यंत धनको पैशाकरितां दावे मांडीत असत.  म्हणजे कर्जाऊ दिलेल्या पैशाबद्दलच्या फिर्यादी स्थावर इंस्टेटींच्या फिर्यादीसारख्याच मानीत आणि त्यांच्याप्रमाणेंच, हिचाहि कोर्टाच्या देखरेखीखालीं होणार्‍या द्वंद्वयुद्धावरून शेवटीं निकाल देत.  ब्लॅकस्टोनच्या वेळेपर्यंत धनकोचा कर्जांत असलेल्या मालमत्तेवर हक्क आहे व तो हक्क त्याला ऋणकोनें मिळवून दिला आहे असें मानीत.  ज्याप्रमाणें घराचा मालक तें भाड्यानें देऊन कांहींकाळपर्यंत वहिवाट करण्याचा आपला हक्क तहकूब ठेवतो त्याचप्रमाणें पैसा कर्जाऊ देणें म्हणजे त्या पैशावर आपला ताबा असण्याचा प्रस्तुत हक्क केवळ तहकूब ठेवणें होय.  करारांविषयींचें सध्यांचें तत्त्व याहून थोडें निराळें आहे.

कर्जाऊ दिलेल्या रकमेबद्दल फिर्याद :-  या कर्जाऊ दिलेल्या पैशाबद्दलच्या फिर्यादीला करारशास्त्रांत अनायासें स्थान मिळालें.  वास्तविक ती करारशास्त्रांत येत नाहीं.  हिचें स्वरुप जंगम मालमत्ता परत मिळविण्याबद्दल करावयाच्या फिर्यादीसारखें असे.  जंगम मिळकत बेकायदेशीर रीतीनें ताब्यांतून गेलेल्या मालकांची फिर्याद चालाविण्याची पद्धत ह्यासारखीच असे.  जेव्हां जेव्हां कर्ज म्हणून दाखविलें जात असे, त्यावेळीं प्रतिवादीला तो कर्जाऊ पैसा किंवा माल नक्की मिळाला, हें वादीस सिद्ध करावें लागे.  तथापि वादीच्या हक्काची उभारणी सौद्यावर किंवा दिलेल्या वचनावर नसून प्रतिवादीनें वादीचा पैसा किंवा माल वाजवीपेक्षां जास्त दिवस ठेवला ह्या मुद्यावर असे.

लेखी पुराव्याची पद्धत -  पुराव्याच्या पूर्वीच्या अनेक पद्धतींत लेखी पुराव्याची एक पद्धत असे.  एकदां लेख मोहोरबंद झाला कीं, ज्यानें तो लिहिला असेल, त्याला तो नाकबूल करतां येत नसे व अशा रीतीनें तो बांधला जाई.  कारकुनांकडून त्यांच्या नोकरीसंबंधीं लेखी करार लिहून घेत.  ही दस्तैवजाची पद्धत हल्लींहि निराळ्या स्वरूपांत रूढ आहे.  ह्या पद्धतीनें पैशाची किंवा इतर कोणत्याहि तर्‍हेच्या कामाची बजावणी बरोबर करतां येत असे.  चवदाव्या शतकापासून पुढें व्यापाराच्या व इतर कामीं ही दस्तैवजाची पद्धत सुरू झाली.  जुन्या व्यवहारपद्धती (कॉमन ला) वरून ठरलेल्या कायद्याच्या कामांत खतावरून मोठमोठीं कामें करतां येऊं लागली व एखाद्या व्यवहारांत खत नसलें तर काम अडूं लागलें.

वचनावरील विश्वास -  खत करण्याला आवश्यक गोष्टींत कितीहि सरळपणा व साधेपणा ठेवला तरी, पंधराव्या शतकांतील भिक्षुक वर्गांतील लोकांखेरीज इतर लोकांनां ह्या पद्धतीचा क्वचितच फायदा होई.  कारण त्यावेळीं फारच थोड्या लोकांनां चांगलें लिहितां वाचतां येत असे.  तेव्हां साधें वचन देण्याघेण्याची चाल त्यावेळीं सर्व यूरोपियन राष्ट्रांत रूढ झाली होती. नुसत्या हस्तांदोलनानें सौदा पटवून टाकीत यावेळीं धार्मिक कोर्टांतून वचनभंगाबद्दल निकाल होत व बहिष्कार वगैरे शिक्षा सांगत.  त्यामुळें धार्मिक कोर्टांचें काम वाढलें व त्यांस चांगलें उत्पन्न होऊं लागलें.  राजानें नेमलेल्या न्यायाधिशांनां या बाबतींत स्वस्थ बसण्यावांचून गत्यंतर नव्हतें.  बिशप व त्याचे अधिकारी यांनां, राजाच्या कोर्टांत ज्यांवर इलाज नाहीं अशा खटल्यांत त्यांनीं निकाल देऊं नये असा प्रतिबंध करतां येईना.  इतर देशांतील कायदेपंडितांनीं ज्याप्रमाणें जस्टिनियननें घालून दिलेली पद्धत बाजूस ठेवून त्या काळास साजेलशी पद्धत स्वीकारली तसें निदान १५ व्या शतकांत तरी इंग्लिश न्यायाधिशांनां करणें अशक्य होतें, तेव्हां जर राजानें नेमलेल्या न्यायाधिशांनां ही जवळजवळ भिक्षुकवर्गाच्या हातांत गेलेली कायद्याच्या कामाची महत्त्वाची शाखा आपल्या ताब्यांत यावी असें वाटलें तर तें करण्याला उपाय म्हणजे, वचन राखणें हें सर्वसामान्य कर्तव्य आहे असें मान्य करून त्यासंबंधीं खटला आणण्याचा अधिकार ठेवणें हा होता.

वचनभंगाबद्दल दाव्याचा हक्क - नुसतें वचन पाळलें नाहीं हा मुद्दा मध्ययुगांतील वकिलांच्या मतें खटला आणण्यास पुरेसा नसे.  परंतु दुसर्‍यावर अवलंबून बसण्यानें होणारें नुकसान हा मुद्दा मात्र तसा नव्हता. त्यायोगें जेव्हां अंगावर एखादें काम घेतलें तेव्हां तें करण्याविषयीचें कर्तव्य उत्पन्न झालें असें होतें व तें लबाडीनें किंवा लायकी नसतां कामांत भलती ढवळाढवळ करण्यानें मोडलें हा दोष येतो.  समजा, एखाद्यानें मी हुषार नालबंद आहे असें सांगून, एकाचा घोडा जायबंदी केला तर हें करणें कायद्याचें अतिक्रमण करणारें नाहीं.  कारण मालकानें घोडा नालबंदाच्या स्वाधीन केला परंतु हें कांहींसें अतिक्रमणासारखें व बरेचसें फसवणुकीसारखें होईल.  पुन्हां, एकानें मी चांगला घरें बांधण्याचें काम करणारा मनुष्य आहे असें म्हणून दुसर्‍यापाशीं बाहाणा केला व कांहीं तरी वेठ वळून घर राहण्याच्या अगदीं निरुपयोगी असें बांधून ठेवलें.  अशा कृत्याबद्दल त्यावेळीं खटला करण्याची परवानगी असे. ह्यापुढील मोठी पायरी म्हणजे काम मुळींच न करण्याबद्दल कांहीं शासन ठेवणें.  घरें बांधण्याचें काम करणारानें जर ठरलेल्या मुदतींत कामास मुळींच हात लावला नाहीं तर तो त्याचा गुन्हा होईल काय ?  पहिल्यानें न्यायाधिशांनां, हा गुन्हा असें ठरविणें अप्रस्तुत वाटलें, पण पुढें पक्षकारांची जास्त निकड लागल्यानें १५ व्या शतकांत काम मुळींच न केल्याबद्दल, तसेंच वाईट काम केल्याबद्दल 'अॅसंसिट्' च्या आधारें खटला आणण्यास नवीन अधिकार प्राप्‍त झाला.  हा नुकसानभरपाईचा खटला असल्यानें (कांहीं पैशाच्या रक्कमेबद्दल दावा नसे म्हणून) कर्जवसुलीच्या खटल्याला लागणार्‍या पुराव्यासंबंधीं कडक नियम ह्याला लागू नसत; त्याचप्रमाणें हा थोडाबहुत कायद्याचें अतिक्रमण करण्यासंबंधीं खटला असल्यानें राजाकडे शांतताभंग झाल्याबद्दल अपील करण्याला ह्यांत हक्क येत असे व त्यामुळें जुन्या सर्वमान्य शपथविधीचा अंगीकार करून प्रतिवादी निसटून जाईल, ही धास्ती अजिबात गेली.  ह्या योगानें असें झालें कीं, पुढें पुढें फिर्यादी कर्जवसुलीकरितां, 'अॅसंसिट्चाच' उपयोग करूं लागले.  खरें पाहिलें तर ह्याचा उपयोग निव्वळ ज्यावर दुसरा इलाजच नाहीं असे खटले कोर्टांत आणण्याच्या कामीं करावयाचा असे.  १६ व्या शतकांत तर असेंच तत्त्व ठरून गेलें होतें कीं, देणें असलें म्हणजे कोर्टानें तें देवविण्याचें काम अंगावर घ्यावें.  ह्या नवीन खटला आणण्याच्या अधिकारपद्धतींत सर्व प्रकारचे करार येऊं लागले, इतकेंच नव्हे तर स्वपक्षसमर्थनार्थ योजलेल्या युक्तिप्रयुक्तीमुळें ज्यांत वास्तविक मुळीच करार नाहीं असेंहि पुष्कळ निरनिराळे दावे येऊं लागले.

ह्या नवीन पद्धतीनें मेहेरबानीखातर दिलेल्या वचनाची बजावणी करण्यास कांहीं मदत केली नाहीं.  कारण त्यावेळीं असें न्यायतत्त्व गृहीत धरत कीं, वादीनें प्रतिवादीच्या संमतीनें आणि प्रतिवादीच्या म्हणण्याला किंवा करण्याला भुलून जाऊन कोणच्या तरी बाबतींत आपली बाजू बिघडवून घेतली.  त्यानें पैसे दिले असतील किंवा देण्याविषयीं आपल्याला बांधून घेतलें असेल, त्यानें आपला माल दिला असेल, कांहीं श्रम खर्च घातलें असतील, किंवा कांहीं फायदा किंवा कायदेशीर हक्क सोडून दिला असेल, जर त्यानें प्रतिवादीच्या वचनावर विश्वासून एखादें कृत्य करण्याला स्वतःला बांधून घेतलें नसेल तर त्याचें प्रतिवादीकडून कांहीं नुकसान झालें नाहीं व म्हणून दावा आणण्याचा त्यास अधिकार येत नाहीं.  इच्छित गोष्ट घडून न आल्यामुळें झालेली निराशा वाईट तर खरीच; पण कायद्याच्या दृष्टीनें तें नुकसान होत नाहीं.  सध्यांच्या भाषेंत हें सांगावयाचें म्हणजे, प्रतिवादी जें काम अंगावर घेत आहे त्याबद्दल किंमत म्हणून वादीनें कांहीं तरी त्यास द्यावयास पाहिजे.  हें जें कांहीं वचन घेणारानें वचन देणारास त्याच्या कामाबद्दल म्हणून देणें व वचन देणारानें तें घेणें ह्यास हल्लीं वचनाचा मोबदला असें म्हणतात.  ह्या मोबदल्याचा अर्थ फार व्यापक आहे.  कारण एखाद्या वचनाचा मोबदला देता घेतां येण्याजोगा किंवा जवळ ठेवतां येण्याजोगाच असावा असें नाहीं.  तो मोबदला रोकड पैसा असेल किंवा कांहीं माल असेल; तो एखादें कृत्य किंवा कृत्यपरंपराहि असूं शकेल; शिवाय (व सध्यांच्या आपल्या कायद्याला अंती महत्वाचें असें म्हणजे) तो पैस देण्याबद्दलचें, किंवा माल हवालीं करण्याबद्दलचें, किंवा एखादें काम करण्याबद्दलचें, किंवा कांहीं विवक्षित तर्‍हेनें वागणें किंवा न वागणें ह्याबद्दलचें वैयक्तिक वचनहि असूं शकेल.  पुन्हां तो उघड वचन देणार्‍याच्या फायद्याचा असला पाहिजे असेंहि नाहीं.  ज्याअर्थी त्यानें तो मोबदला स्वीकारला त्याअर्थी त्याला त्याची किंमत वाटली असली पाहिजे हें उघड आहे.  तथापि वचन घेणार्‍याच्या जोखमीकडे जितकें लक्ष ह्यांत ठेवलें आहे तितकें कांहीं वचन देणार्‍याच्या फायद्याकडे नाहीं.  जेव्हां दोन पक्षांत एकमेकांचीं वचनें दिली घेतलीं जातात तेव्हां एकाचें वचन दुसर्‍याच्या वचनाचा मोबदला होतें व तें बंधनकारक होतें, ही शेवटची सुधारणा १७ व्या शतकांत मान्य झाली.  व ह्याचा परिणाम असा झाला कीं, बक्षीस, देणगी वगैरेंची वचनें पूर्वीसारखी अंमलबजावणी करण्यास सुलभ राहिलीं नाहींत; पण उलट कोणत्याहि तर्‍हेचा कायदेशीर सौदा न्यायकोर्टाला मान्य होऊन त्याची बजावणी होण्यास फारशी अडचण राहिली नाहीं.  हें मोबदल्याचें तत्व बहुतेक सर्व ठिकाणीं सर्व देशांत मान्य आहे.

मोबदल्याचें तत्व अंमलांत येण्यापूर्वी, दस्तैवजी (डीड) वायद्याची अंमलबजावणी होत असे, ती हल्लींहि सुरू आहे.  जेव्हां उमक एक गोष्ट करण्याविषयीं एखाद्यानें लिहून दिलें असेल, अमुक तेव्हां सौदा वगैरे करण्याची किंवा दुसर्‍या पक्षाची त्यास कबुली आहे कीं नाहीं अशी चौकशी करण्याची कांहीं एक जरूरी नाहीं.  तरी सुद्धा मेहेरबानगीं दाखल दिलेलीं लेखीं वचनें फार बारकाईनें व कसोशीनें तपासतात व जेवढें उघड हक्क मिळण्यासारखे असतील तेवढेच देतात.  ह्यांविषयीं खटला आणण्याचा अधिकार असला तरी करारनाम्याबरहुकुम करार पूर्ण करून घेण्याबद्दलचा हक्क प्राप्‍त होत नाहीं.

एखादें वचन कायदेशीर होण्यास तें कांहीं मोबदला घेऊन नंतर दिलें गेलें पाहिजे; ह्यावरून वचन व मोबदला देण्याच्या क्रिया एकाच वेळीं झाल्या पाहिजेत हें उघड होतें.  मोबदल्यापूर्वीच वचनाचा उच्चार म्हणजे निवळ कांहीं देऊ करण्यासारखें होईल; त्याच्या उलट मोबदला घेतल्यावेळींचे वचनाचे उद्‍गार किंवा कृतीवरून आणि वागणुकीवरून त्याविषयीं काढलेलें अनुमान हीं त्याच वेळीं कायम झाल्यासारखीं असतात; पुढील गोष्टींवरून बदलत नाहींत.  ठोकळ सिद्धांत असा कीं, देऊं केलेल्या गोष्टींचा ज्या वेळीं स्वीकार केला जातो त्याच वेळीं जो करार असेल तो बंधनकारक ठरतो.  इंग्लिश कायद्याच्या सिद्धांताप्रमाणें असें आहे कीं, व्यवहार कितीहि भानगडीचा असो ज्यांत म्हणून एखादा करार केला गेला आहे त्या त्या प्रत्येक बाबींत, नेहेमीं अशी वरच्या सारखी एक वेळ म्हणून असतेच.  त्याचप्रमाणें देऊं केलेल्या गोष्टीचा स्वीकार होण्याच्या अगोदर कांहींएक कर्तव्याचा बोजा येऊन पडत नाहीं.  मात्र ज्या ठिकाणीं ही मोबदल्याची इंग्रजी पद्धत अमलांत नाहीं तेथें हा नियम लागूं होईलच असें नाहीं.  देऊं केलेली गोष्ट योग्य मुदतीच्या आंतच स्वीकारावी लागते; तिचा स्वीकार होण्यापूर्वीच ती ज्याला देऊं केली असेल त्याला तसें कळवून ती उघड परत घेतां येते. स्वीकार करतांना तो सूचना करणार्‍याच्या अटींप्रमाणेंच केला पाहिजे. जर कांहीं अटींवर स्वीकार करावयाचा झाल्यास तो स्वीकार म्हणजे दुसरा नवीन करार होतो वगैरे नियम सर्व लोकांच्या सोयीकरतां असल्यामुळें बहुधा सर्व ठिकाणीं लागू पडतात.

एकमेकांपासून दूर राहणार्‍या लोकांमधील करारांची पूर्णता करण्यास इंग्लिश व इतर कायद्यांनां फारच त्रास पडला आहे. अशा करारांनां नियम अवश्य पाहिजेत हें खरें पण कोणताहि नियम कांहीं बाबतींत जुलुमी हा वाटणारच.  ह्या संबंधांत प्रचलित पद्धत एकंदरीनें खालीं दिल्याप्रमाणें आहे :-

सूचना करूं इच्छिणारानें ती स्वीकार करणारानें स्वीकार करण्याची कोणची तरी एखादी किंवा वाजवी अशी रीत नमूद करावी, आणि त्यानें तसें केलें नसल्यास एखादी प्रचारांत असलेली वाजवी रीत-आणि विषेशतः टपालाची पद्धत- त्याला संमत आहे असें मानण्यांत येतें.  नेहमींच शब्दांनीं कबुली दिली पाहिजे असें नाहीं.  एखाद्या सूचनेस त्याला पाहिजे ती कृति करून दाखवून ही कबूली देतां येते.  जसें :-  टपालमार्फत मागणी आली असतां, पाहिजे असलेला माग धाडून देणें; सांगितलेलें काम करणें, इ.  अशा गोष्टींत, फक्त कायद्याच्या दृष्टीनें पाहिलें तर ह्यापेक्षां जास्त व्यवहाराची तसें उघडपणें नमूद केलें असल्याखेरीज मुळींच जरूरी नाहीं.  जेथें कृति नको असून वचन पाहिजे असतें तेथें तें नमूद केलेल्या पद्धतीनें किंवा पत्रानें अगर तारेनें पाठविलें पाहिजे.  जसें :-  एखाद्या व्यापार्‍यानें पत्र लिहून कळविलें कीं, मी उधारीनें माल विक्रीकरितां पाठविण्यास तयार आहे, तर येथें 'आपली सूचना मला मान्य आहे, आपण माल पाठवावा' अशा आशयाचें त्यास उत्तर पाठविलें पाहिजे.  हें उत्तरादाखल लिहिलेलें पत्र एकदां पोष्टांत पडलें कीं, इंग्लिश कोर्ट असें मानतें कीं ह्याला पोष्टांत उशीर लागला किंवा गहाळ जाहलें तर त्यापासून होणारें नुकसान सूचना करणाराच्या पदरीं येतें.  म्हणजे एखाद्याच्या सूचनेचें उत्तर जरी त्याच्या हातांत पडलें नसलें तरी आपल्या सूचनेप्रमाणें वागण्यास तो बांधला जातो. वर सांगितलेंच आहे कीं, सूचना किंवा स्वीकार बोलून किंवा लीहूनच कळविला पाहिजे असें नाहीं.  कृति किंवा खुणा बहुशः हें काम चांगल्या रीतीनें करतात.  नदीच्या पलीकडे जाण्यास जेव्हां आपण नांवेंत बसतों तेव्हां ती वल्हविणारास, आम्हाला पलीकडे नेतोस कां, काय घेशील वगैरे ठराव आपण त्याच्याशीं करीत बसत नाहीं; तर जेव्हां आपण नावेंत पाय टाकतों तेव्हांच जें कांहीं नेण्याबद्दलचें ठराविक भाडें असेल तें देण्याला मूकसंमति देतो व तो नाव वल्हवून आपणास घेऊन जाण्याचें त्याच्या मूकपद्धतीनें कबूल करतो.  हें एक साधें उदाहरण झालें; पण सर्व गोष्टींत हेंच तत्त्व लागू आहे.  कराराची मांडणी किंवा त्याचा स्वीकार व्यक्त करावयास शब्दाव्यतिरिक्त अमुक कृति पुरेशी आहे, असें ज्या कृतीसंबंधानें समंजस माणसांचें मत असतें ती कृति कायद्यांत शब्दाइतकीच बंधनकारक समजली जाते.  अशा करारांनां ''ध्वनित करार' असें म्हणतां येईल.

कराराचें बंधन हें दोन्ही पक्षांच्या खुषीनें तयार होत असतें व ठरविलें जातें.  ह्यांतच करारशास्त्राचा, कायद्याच्या इतर सर्व शाखांपेक्षां विशेष निराळेपणा आहे.  ह्या शास्त्राचें काम म्हणजे दोन्ही पक्षांच्या हेतूंनां चालन देणें हें होय.  आणि करारांच्या अर्थनिर्णयाविषयींचे सर्व नियम ह्याच मूळ तत्त्वावर बसविलेले आहेत.  हें तत्त्व लागू करणें नेहमींच सोपें जातें असें नाहीं.  कारण पुष्कळ वेळां, अस्पष्ट विधानें केलेलीं असतात.  पुष्कळ वेळा असें होतें कीं, दोन्ही पक्षांच्या हेतूंमधील बराचसा भाग त्यांच्या मनांतच राहून जातो, किंवा अमुक प्रसंगीं काय करावयाचें ह्याविषयीं त्यांनीं कधीं विचारच केलेला नसतो. तेव्हां त्यांचा आशय काय हें कोठून कळणार ?  पण जेथें म्हणून कायद्याला फार हुषारीनें अटकळ बांधून अशा तर्‍हेचे खड्डे भरून काढावयाचे असतात त्या ठिकाणीं त्याला निर्देशक तत्व म्हणजे दुसर्‍यापासून कांहीं अपेक्षा करण्यासारखें पहिल्या (कोणच्याहि एका) पक्षानें त्याकरितां काय केलें ह्याचा नीट विचार करणें, हें होय.  कोर्टाचा उद्देश म्हणजे दोन्ही पक्षांवर कांहीं अटी लादाव्या हा नसून, शक्याशक्य गोष्टी त्यांच्या नीट लक्षांत येऊन त्यांनीं ज्या कांहीं वाजवी अटी ठरविल्या असतील त्याच अटी ठरवून कराराची पूर्णता करणें हा आहे.  ह्याकरितां कोर्टाला पुष्कळ निरनिराळ्या गोष्टी पहाव्या लागतात; जसें :-  दुसर्‍या तपशिलावर दिलेल्या गोष्टींत ह्या पक्षांनीं उघड रीतीनें काय योजना केली आहे ह्यांची तुलना करणें, ह्यासारख्या व्यवहारांत पडलेले लोक अशा प्रसंगीं बहुशः काय करतात हें पाहाणें, व वेळ पडली तर सरते शेवटीं कोर्टाच्या दृष्टीनें न्याय्य व प्रसंगोचित कोणतें हें ठरविणें.  ह्या गोष्टी सुद्धां दोन्ही पक्षांच्या मनांतील आशय उघड नसेल तेव्हां त्यांची इच्छा काय, ह्याचा विचार करून करावयाच्या असतात.  येथें हेंहि सांगितलें पाहिजे कीं, कधीं कधीं कराराची पूर्तता दोन पक्षांमध्यें एक नातें जमवून देते; तें एकदांचें जमलें कीं, कायद्याच्या अढळ नियमांनीं त्याचें नियंत्रण केलें जातें, तें पूर्वीच्या कराराने बदलूं शकत नाहीं.  विवाह हें एक अशा प्रकारांतील ढळढळीत उदाहरण आहे व प्रचलित कायदेपद्धतींत ह्यासारखें दुसरें येथें पूर्णपणें लागू पडणारें उदाहरण सांपडणार नाहीं.  

अर्थनिर्णयाला मर्यादित किंवा मदत करण्यासाठीं पुराव्यासंबंधीं कांहीं नियम केलेले असतात.  लेखी करारातील अटी तोंडी पुराव्यानें बदलतां येत नाहींत.  अटी लिहून काढण्याचा हेतु त्यांनां कायमचें स्वरून देण्याचा असतो, तेव्हां दूरवर विचार करून घातलेल्या अटी अशा कायमच्या स्वरूपांत असतांना, तोंडी पुराव्यावरून त्यांचे उच्चाटन करणें वाजवी होणार नाहीं.  ह्याला कांहीं अपवाद आहेत, त्यापैकीं प्रमुख म्हणजे विशिष्ट शब्द वादविषयींभूत ठिकाणीं व्यवहारांत रूढ असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या अर्थी वापरले आहेत हें दाखवावयाचें झाल्यास पुरावा दाखल करून घेतात. परंतु जीं सर्वसामान्य तत्वें या बाबतींत लागू करतां येतात तीं अशीं :-  दस्तैवज कायदेशीर करण्यापूर्वी त्याचा जो उद्देश आहे (अमुक अमुक तर्‍हेचा असावा म्हणून) त्याप्रमाणें तो खरोखर आहे कीं नाहीं हें आपण पाहिलें पाहिजे आणि जेव्हां आपण त्यांतील अटीप्रमाणें चालतों त्यावेळीं त्या अटी खरोखर काय आहेत त्याविषयीं आपली खात्री करून घेतली पाहिजे.  हे आतां सांगितलेले पुराव्याचे नियम सध्यां प्रचलित आहेत.  दस्तैवजासंबंधीं सांगितलेल्या जुनाट नियमांचा ह्यांच्याशीं कांहीं एक संबंध तेथें नाहीं.

करार करणार्‍या प्रत्येक पक्षानें त्यांतील अटींबर हुकूम वागलें पाहिजे आणि जेथें शंका उत्पन्न होईल अशा ठिकाणीं दुसर्‍या पक्षाला त्याविषयीं जें वाजवी रीतीनें वाटत असेल असें वागलें पाहिजे.  जेव्हां एक किंवा दोन्ही पक्षांकडून कराराची बजावणी एकसारखी किंवा हप्त्याहप्त्यानें काहीं काळपर्यंत चालू राहाते, तेव्हां एका पक्षाला दुसर्‍या पक्षाच्या चुकीमुळें पुढील बजावणी नाकारण्याचा किंवा तहकूब ठेवण्याचा हक्क येतो कीं काय असा प्रश्न उभा राहतो.  ह्यासंबंधांत कोर्टाची कराराच्या आशयावर व तत्वार्थावर जास्त मदार असते.  हल्लींच्या देवघेवीच्या व्यवहारासंबंधांत तर विचारपूर्वक संमति दिलेल्या अटींचा एक भाग दुसर्‍यापेक्षा जास्त आवश्यक व महत्वाचा आहे असें कोर्ट मानीत नाहीं.  व्यापारी लोकांच्या करारांत वेळेलाच जास्त प्राधान्य दिलें जातें.  करारांत नमूद केल्या नाहींत अशा अटी करार करणार्‍या पक्षांच्या मनांत बंधनकारक व्हाव्यात असें होतें कीं नाहीं असा प्रश्न अर्थनिर्णयाच्या वेळीं पुष्कळ वेळां निघतो.  करार करून घेणाराची कांहींएक चुकी नसतां, कांहीं बाह्य कारणांमुळें ज्यांत कराराची बजावणी अशक्य होते अशा खटल्यांत वरीलसारखा प्रश्न उद्‍भवतो.  अशाच सारखा दुसर्‍या तर्‍हेचा खटला म्हणजे हा कीं, ज्यांत कराराची बजावणी शब्दशः झाली असली तरी तीमुळें करार करून घेणाराला ज्याकरितां त्यानें हा सौदा ठरविला ती गोष्ट तर मुळींच मिळत नाहीं.  जे करार पहिल्यापासूनच उघड उघड अप्रयोजक, अयुक्त किंवा अशक्य असतील त्यांची अंमलबजावणी करतां येत नाहीं.  कारण दोन्ही पक्षांच्या मनांतून त्याबद्दल कोणाला तरी जबाबदार धरावें असें खरोखर नसतेंच.  ह्याच कारणामुळें सर्वसामान्य चालीरीती व मनुष्य जातींतील एकमेकांविषयी समज लक्षांत घेऊन साधारण समाजांतील बोली कायदेशीर करारासारख्या होत असल्या तरी त्या कायद्यानें बंधनकारक आहेत असें मानीत नाहींत.

कराराच्या सर्व बाबींत दोन्ही पक्षांचा जो निश्चित आशय असेल तो मानला जातो असें मागें सांगितलें आहे.  तथापि तो आशय कायद्याला मान्य व अनियंत्रित असा पाहिजे.  तेव्हां वरील सर्वसामान्य नियमाला दोन प्रकारचीं बंधनें आहेत.  एक वैयक्तिक इच्छा व लाभ ह्यापेक्षां श्रेष्ठ अशा देशाच्या कायद्यानें घातलेलें; व दुसरें लबाडी किंवा दुष्कृत्य ह्यापासून दोन्ही पक्षांमधील न्यायबुद्धि व दृढविश्वास ह्यांचे संरक्षण करण्याच्या आवश्यकतेमुळें उत्पन्न झालेलें. जेव्हां करार बजावणींत कायद्याविरुद्ध गुन्हा केल्याचा आरोप येऊं शकतो तेव्हां असल्या करारांची अम्मलबजावणी करतां येत नाहीं. राजद्रोह, दुराचरण वगैरे कृत्यें केली असतांच कायद्यानें गुन्हा होतो असें नाहीं तर शासनसंस्थेनें किंवा कायदे करण्याचा अधिकार असलेल्या संस्थेनें केलेले विधायक नियम मोडले असतांहि होतो.  ह्याशिवाय कांहीं अशा गोष्टी आढळतात कीं, ज्यांत कोणत्याहि प्रकारें कायद्याविरुद्ध न जातां, करार करून त्याची बजावणी करतां येते, पण सार्वजनिक हिताच्या दृष्टीनें (राजधोरणावरून) पाहातां जरी कायदेशीर रीतीनें त्याची अम्मलबजावणी करतां येत असती तरी तसें करणें बरोबर होणार नाहीं.  आपण वाटेल तर एकांतांत पैज लावावी व वेळ पडेल त्याप्रमाणें पैसे द्यावे किंवा घ्यावे; पण पैज जिंकणाराला पैज हरणाराविरुद्ध दावा आणितां येत नाहीं.  सार्वजनिक व्यवहारविषयक धोरणांतील ह्यासंबंधांत प्रमुख तत्त्व म्हणजे ''व्यापार नियंत्रक करारां'' ना कांहीं विशिष्ट मर्यादा घालणें हें होय.  मध्ययुगांत आणि अगदी परवांपर्यंत कुलमक्त्याविरुद्ध लोकांची फार ओरड होती.  पण हळू हळू ही कमी होऊन कांहीं कांहीं व्यवहारांत कुलमक्तेगिरी अन्यामूलक स्पर्धा बंद ठेवण्यासाठीं आवश्यक अशी भासूं लागली.  हे व्यवहार असे :-  नांवासकट धंदा विकणें, चालू असलेल्या पेढींतून भागीदारांनीं अंग काढणें, व्यापारीरहस्य समजून येईल अशा कामावर विश्वासू नोकराची नेमणूक करणें इ. हल्लीं व्यापारनियंयत्रक करार कायद्याला धरून आहेत.  पण त्यांबद्दल योग्य किंमतीचा मोबदला घेतलेला असला पाहिजे आणि लोकांचें नुकसान न होतां संबद्ध हिताचें संरक्षण करण्यास वाजवी तेवढेंच नियंत्रण त्यांत असलें पाहिजे.  इ.स. १८७२ त पास झालेल्या इंडियन काँट्रक्ट अॅक्टमध्यें हल्लींच्या परिस्थितीस अनुचित अशीं जीं मतें ठोकून दिली आहेत त्यांत कांहीं सुधारणा अजून केलेली नाहीं.  करारामध्यें त्याची अम्मलबजावणी न करतां येण्यासारखें कांहीं नसलें तरी सुद्धा करार करणार्‍या एखाद्या पक्षाची संमति त्याला कदाचित बंधनकारक होऊं शकणार नाहीं.  कारण वाजवी माहिती नसतांना त्यानें संमति दिली किंवा तो दुसर्‍या पक्षाचा पूर्ण अंकित असतांना त्याची संमति घेतली गेली असेल, जर एखाद्याला फसवून त्याच्या कडून करार करून घेतला तर जो फसला असेल त्याला खरी गोष्ट उघडकीस आल्यानंतर योग्य मुदतींत व तिसर्‍या मनुष्यानें किंमत देऊन करारांतील हक्क विकत घेण्यापूर्वी करारानें प्राप्‍त झालेलें बंधन झुगारून देण्याला सबळ कारण मिळतें.  धमकी देऊन काम करून घेणें हें दगलबाजी सारखेंच समजलें जातें.  नैतिक अधिकार गाजवून किंवा गैर वाजवी भीड घालून काम करून घेतलें आहे कीं काय हें कोर्ट फार दक्षतेनें पहात असतें व त्याचा नायनाट करण्याची त्याची फार खटपट आहे.  पालक, विश्वासूक सल्लागार, अध्यात्मज्ञान देणारे गुरू, ह्यांसारख्या अधिकारी माणसांनीं स्वार्थासाठीं आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करतां कामा नये.  त्यांनीं आपल्यावर अवलंबून असतील त्यांच्याकडून कांहीं फायदा करून घ्यावयाचा नाहीं असें नाहीं; तर फायदा करून देणारांनां जर तसें केल्याबद्दल पुढें पश्चाताप वाटला तर मात्र फायदा घेणारांवर देणगी पहिल्या प्रथम जाणून बुजून राजी खुषीनें दिलेली होती असें सप्रमाण सिद्ध करून देण्याची जबाबदारी येते.

स्वाभाविक प्रेमानें व नेहेमीच्या चालीरीतीप्रमाणें दिलेल्या मोठमोठ्या देणग्या किंवा नमूद केलेले करार तेवढे कायद्याला संमत आहेत.  एरवीं अशा गोष्टीला कोणतेंहि सुधारलेलें कायदेशास्त्र पुष्टी देत नाहीं.  दंगलबाजी व गैरवाजवी भीड यासंबंधांत ज्याला करार न मानण्याचा हक्क येतो त्यानें वाटेल तर पुढें त्याला दुजोरा द्यावा.  पण एकदां कां पूर्णपणें विचार करून राजीखुषीनें त्याला दुजोरा दिला, तर मग मात्र तो कधींहि परत घेतां येत नाहीं.  निराशा किंवा मानसिक दौर्बल्य यामुळें जो एरवी समंजस असलेला मनुष्य मत देण्याला नालायक होतो, अशा मनुष्याशीं जाणून बुजून जर करार केला तर तो दगलबाजीनें करून घेतलेल्या कराराप्रमाणेंच अम्मलबजावणीस बेकायदेशीर ठरतो.

कधीं कधीं असेंहि होतें कीं, एक पक्ष दुसर्‍या पक्षाला एखाद्या गोष्टीविषयीं खरी म्हणून माहिती देतो; माहिती देणाराला तिच्या खरेपणाविषयीं बिलकून शंका नसते, तरी पण ती खरोखरीची खोटी असते.  अशा प्रसंगीं जर तो दुसरा पक्ष त्यावर अवलंबून असेल, तर तो करार त्याला टाळतां येतो.  व्यवहारांतील नेहमीं घडणार्‍या गोष्टींत असें आढळून येतें कीं, एका पक्षालाच जें खरें खोटें असेल तें समजण्याला मार्ग असतो; व दुसर्‍या पक्षाला साहजिक रीतीनें ह्यासंबंधांत पहिल्यावर अवलंबून रहावें लागतें.  कांहीं कांहीं बाबतींत तर एखाद्या गोष्टीविषयीं चुकून कांहीं खरी माहिती सांगावयाची राहिल्यास, अन्यथा निवेदनाचा आरोप येतो.  विम्याचे करार ह्या सदरांत प्रमुख आहेत.  कारण येथें विमाकंपनी वगैरे हमी घेणारांनां स्वतः खरी व पूर्णपणें चौकशी करण्यास फारच थोडीं साधनें असतात.  विकाऊ स्थावर मालमत्तेसंबंधीं कांहीं एक कपट न बाळगतां केवळ चुकीचें वर्णन केल्यानें होणार्‍या नुकसानाची भरपाई किंमतीप्रमाणें मिळते किंवा त्यासंबंधीं केलेला करार रद्द ठरतो.  भलतीच समजूत करून देण्यानें-कपटानें नव्हे- प्रत्येक जातीचा करार रद्द ठरतो असा सर्वसाधारण नियम करतां येत नाहीं.  कारण लग्न करण्याविषयींचा करार किंवा मालाची विक्री यासंबंधांत हा नियम लागू नाहीं.  आतां दोन्ही पक्षांनां पाहिजे तर असाहि करार करतां येतो कीं, अशी अशी गोष्ट असली तरच हा करार कायदेशीर, एरवीं नाहीं.  अशा तर्‍हेची अट घालून करार केला म्हणजे ती नमूद केलेली गोष्ट तशी नसली तर आपोआपच करार रद्द ठरतो व तो भलतीच समजूत करून दिल्यामुळें नव्हे तर ही अट घातल्यामुळें तसा ठरतो.  तसेंच चुकीनें केलेले करार पुष्कळ वेळां बंधनकारक होत नाहींत; आणि ह्या (चुकीच्या) सदराखालीं कांहीं कांहीं दावे घालणें पुष्कळ सुलभ जातें.  वचनाचा वाजवी मोबदला घेतला नसणें किंवा जशी सूचना असेल तसाच स्वीकार केला नसणें, अशा प्रकारचा मुद्दा येथें लावतात.  अशा तर्‍हेच्या व्यवहारांत, मग तेथें दगलबाजी असो वा नसो, करार झाला असें मुळीं मानीतच नाहींत; तेव्हां तो मुक्रर करण्याची गोष्टच नको.  जेव्हां मनांतील आशय बरोबर उघड करून दाखवयाचा राहिला असून कराराला संमति दिली गेली असेल तेव्हां अशा चुकीची दाद घेण्यांत येते.  अशा वेळीं मूळचा खरा आशय कोणता हें चांगल्या रीतीनें सिद्ध करून दाखविलें असतां त्या चुकीच्या दस्तैवजांत न्याय्य अशी सुधारणा करण्यांत येते.

विशेष आवश्यक जिनसांबदृदल केलेले करार आज्ञानांनां बंधनकारक होतात.  करारांत त्यांनीं कबूल केलेली किंमत न देववितां, कोर्ट फक्त वाजवी ती किंमत आज्ञानांशीं करार करणारांनां देववितें.  वस्तुतः जे अज्ञानांशीं उधारीचा व्यवहार ठेवतात त्यांच्यावर नुकसानीची सर्व जोखीम येते.  जेव्हां ते अज्ञानी उघड उघड अडचणींत सांपडतील त्या वेळीं गरज केल्यास गोष्ट निराळी : पण एरवीं त्यांच्या सावकारांनां आपल्या नुकसानीबद्दल कुरकुर करण्यास जागा रहात नाहीं.

पूर्वी लग्न झालेल्या बायकांनां आपल्या नांवानें करार करतां येत नसे.  पण सध्यां त्यांनां निराळी इस्टेट करतां येते व करार करून आपल्या इस्टेटीपुरतेंच त्या आपल्याला बांधून घेऊं शकतात.  त्यांचा असा करार वैयक्तिक बंधन होऊं शकत नाहीं.

''कंपनीज ऍक्ट'' खालीं हल्लीं कंपन्यांनां शासन किंवा नियंत्रण करणारें जर कांहीं असेल तर ती त्यांच्या उद्देशांची व स्थापनेच्या नियमांची यादी.  हल्लीं ही यादी पुष्कळ दिवसांच्या अनुभवानें, फार व्यापक व चांगल्या तर्‍हेनें तयार करतात.  कंपनीच्या भागीदारांची अपात्रता तिला बांधू शकत नाहीं; व तिला कायद्याची अपात्रता बहुधा कधीं येत नाहीं.  

करारानें प्राप्‍त झालेले हक्क हे वचन देणारावर व त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधींवर गाजवावयाचे वैयक्तिक हक्क आहेत.  तेव्हां मालकीचे हक्क व त्यासारखे इतर हक्क कीं, जे सर्व जगाशीं भांडून आपणाला मिळवितां येतात अशांहून हे फार भिन्न आहेत.  तथापि हे पैशांनीं सुद्धां मोजतां येतात व मनुष्याच्या मालमिळकतीचा एक भाग असें यांस मानतात.  वहींत नोंदलेलें कर्ज हें एक याचें ढोबळ उदाहरण आहे.  अशा प्रकारचे हक्क एका प्रकारानें आपली जिंदगीच आहे.  हे विकतां येतात, दुसर्‍याला पैशासारखे देतांहि येतात.  हुंडी वगैरे बेचनीय दस्तैवजावरून मिळालेले हक्क, हे संपत्तीची एक अनन्यसाधारण व फार महत्त्वाची जात आहे.  ह्यांची देवघेव करतां येते इतकेंच नव्हे तर व्यापारी चलनी नाण्यांत ह्यांच्या इतकें दुसरें महत्त्वाचें नाणें नाहीं.  करार आणि फरोक्त हीं पुन्हां निरनिराळीं आहेत.  ''कॉमन लॉ'' प्रमाणें करारावरून फक्त जंगम मिळकत विक्रीनें दुसर्‍याला देतां येते, पण फ्रेंच व त्यासारख्याच कायदेपद्धतीप्रमाणें हा नियम स्थावर व जंगम अशा दोन्ही मिळकतींस लागू आहे.  एखाद्याला करार मोडावयास लावणें म्हणजे, दुसर्‍या पक्षाचा दिवाणी अपराध करणें होय असें इंग्लिश कायद्यांत सांगितलें आहे.

(संदर्भग्रंथ - एन्सायक्लोपीडिया ऑफ दि लाज ऑफ इंग्लंड.  पोलॉक-इंडियन कॉन्ट्रक्ट अॅक्ट, प्रिन्सिपल्स ऑफ कॉन्ट्रक्ट.  अॅन्सन- इंग्लिश ला ऑफ कॉन्ट्रक्ट.  लीके-प्रिन्सिपल्स ऑफ दि लॉ ऑफ कॉन्ट्रक्ट.  होल्मेज- दि कॉमन ला.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .