प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कराची, जिल्हा :- मुंबई. सिंध प्रांतांतील जिल्हा.  क्षे. फ. ११९७० चौ. मै. मर्यादा :-  उत्तरेस लारखाना; पूर्वेस सिंधू नदी व हैद्राबाद जिल्हा; दक्षिणेस अरबी समुद्र व कोरी नदी; आणि पश्चिमेस समुद्र व लासबेला (बलुचिस्तान) संस्थान. पश्चिम सरहद्दीवर बर्‍याच मर्यादेपर्यंत हाब नदी गेलेली आह. सिंध प्रांताच्या सामान्य सपाट स्वरूपापेक्षां या जिल्ह्याचें स्वरूप बरेंच निराळें असून कोहिस्तानच्या महालांत व कराची तालुक्यांत मुलुख डोंगराळ आहे.  येथून जसजसें आग्नेयीकडे जावें तसतसा मुलुख सपाट होत जाऊन अगदीं दक्षिणेकडे सिंधू नदीच्या मुखप्रदेशांतील प्रदेश विस्तीर्ण, सखल व सपाट पसरलेला असून त्यांत फक्त समुद्राला जाऊन मिळणार्‍या लहान लहान खाड्या तेवढ्या आहेत.

या जिल्ह्यांत सिंधू व हाब नद्यांखेरीज दुसरे प्रवाह फार थोडे असून ते वर्षांतून बरेच दिवस कोरडे असतात.  हजाम्री व बघर ह्या सिंधु नदीच्या शाखा आहेत.  पीरमंघो येथें डोंगरात ऊन पाण्याचे झरे असून येथील पाणी औषधी गुणाबद्दल प्रख्यात आहे.  कोत्री तालुक्यांत लखी येथेंहि ऊन पाण्याचे झरे आहेत.  व तेथें दरवर्षी बरीच यात्रा जमत असते.

या जिल्ह्यांत फळझाडें फारशी नाहींत.  व आहेत त्यांपैकीं आंबा, बोर, खजुर, अंजीर, केळें व डाळिंब हीं मुख्य होत.

डोंगराळ भागांत चित्ता, तरस, लांडगा, कोल्हा नीलगाय गांवठीं किंवा रान शेळी, हेहि प्राणी आढळतात.  मागर तलाव, हाब व सिंधु नद्या आणि मोठमोठे कालवे यांत सुसरी पुष्कळ आहेत.

कराची शहर व त्याच्या आसपासचा प्रदेश खुला असून तेथें समुद्रावरील वारे वाहतात.  त्यामुळें सिंध प्रांताच्या इतर भागापेक्षां तेथील हवा फार चांगली आहे.  कोहिस्तानच्या डोंगराळ प्रदेशांतील हवा सपाट भागांतील हवेपेक्षां उन्हाळ्यांत थंड व हिवाळ्यांत उष्ण असते.  उलटपक्षीं, उत्तरेकडे लखी डोंगराजवळ कधीं कधीं उष्णता असह्य होते.  वार्षिक उष्णमान सरासरी ७९० असतें.  खुद्द कराची येथें पाऊस थोडा व अनियमित पडतो.  जिल्ह्यांतील सरासरी वार्षिक पाऊस ७.५ इंच आहे.

इतिहास :-  आपल्या हिंदुस्थानावरील स्वारीच्या अखेरीस आलेक्झांडर दि ग्रेट यानें या जिल्ह्यांतील कोणत्यातरी एखाद्या ठिकाणाहून (कदाचित ठठ्ठा) इराणाचें आखात शोधून काढण्याकरतां निआर्कस याला पाठविलें.  या जिल्ह्यावर आरब लोकांची पहिली स्वारी ७१३ या वर्षी झाली.  इ.स. १०१९ व १०२६ यांच्या दरम्यान गझनीच्या महंमुदानें या जिल्ह्यावर स्वार्‍या करून सुम्रा घराण्याला राज्य स्थापन करण्याकरितां रस्ता मोकळा करून दिला; व १३३३ त कच्छमधील सम्मा टोळीनें लारखाना जिल्ह्यांत सेहवान येथें व नंतर ठठ्ठा येथें आपलें ठाणें दिलें.  सम्मा राजे मूळचे हिंदू किंवा बाद्ध असून त्यांची राजधानी मकली डोंगरांत समुई येथें होती.  चौदाव्या शतकाच्या अखेरीस त्यांनीं मुसुलमानी धर्माची दीक्षा घेतल्यामुळें, दिल्लीच्या फेरोजशहाचे ते नामधारी मांडलिक असले तरी बहुतेक स्वतंत्रच होते; व त्यांचें रहाण्याचें ठिकाण जें ठठ्ठा तें कांहीं वर्षांनीं सर्व सिंधप्रांतांत लोकसंख्येच्या व व्यापाराच्या दृष्टीनें मुख्य ठिकाण बनलें.

अर्घुन घराण्याचा संस्थापक शहावेग यानें १५२१ सालीं शेवटल्या सम्मा राजाचा पूर्णपणें पराभव करून खालच्या सिंध खोर्‍यांत आपली सत्ता स्थापन केली; परंतु ३४ वर्षानंतर १५/४ त त्याचा मुलगा निपुत्रिक वारल्यानंतर अर्घुन घराणें मोडणें गेलें.  १५९२ त अकबराच्या सैन्यानें लठ्ठाच्या राजाचा पराभव करून सर्व सिंधबरोबर हा जिल्हा मुलतानच्या सुभ्यांत सामील केला.  देशी घराण्याच्या किंवा मोंगलांच्या कारकीर्दीत कराची शहराला फारसें महत्व आलेलें नव्हतें.  मोंगल पातशाही मोडल्यानंतर कोल्हार राजांच्या मागून आलेल्या तालपूर मीरांनीं कराची बंदराचें व्यापारदृष्ट्या महत्त्व ओळखून १७९२ त कलातच्या खानापासून तें परत मिळविलें.  ब्रिटिशांनीं मीर लोकांबरोबर दोस्तीचे तह करण्याचे प्रयत्‍न केले परंतु ते व्यर्थ गेले; व दोघांमध्यें वितुष्ट येऊन ब्रिटिशांनीं सर्व सिंधप्रांत १८४३ त आपल्या राज्यास जोडला.

जिल्ह्यांतील प्राचीन अवशेषांपैकीं ठठ्ठा ह्या जुन्या गांवांतील मशिदी, शिलालेख, थडगीं व किल्ला; व चार्लो चकर आणि रणजी येथील मोडकळीस आलेले किल्ले हे मुख्य आहेत.

या जिल्ह्यांत कराची, काटी, कोत्री, मानझंद व ठठ्ठा ही मोठी गांवें व ६२८ लहान गांवें असून एकंदर लोकसंख्या (१९२१) ५४२०६५ आहे.  पैकीं शेंकडा ७७ मुसुलमान, शें. २१ हिंदु व शें. १ ख्रिस्ती आहेत.  शे. ७६ लोक सिंधी भाषा बोलतात.  शें. ४५ शेतीवर व शें. २४, शें. २ व शें. २ लोक अनुक्रमें उद्योगधंदे, व्यापार व निरनिराळे धंदे करून पोट भरतात.

ज्वारी, बाजरी, तांदूळ व गहूं हीं या जिल्ह्यांतील मुख्य पिकें आहेत.  कराची जिल्ह्यांतील म्हशीचें तूप प्रख्यात आहे.  त्याचप्रमाणें येथील गाईंचीहि दूध देण्याबद्दल ख्याति असून त्या मुंबईस विक्रीकरितां पाठविण्यांत येतात.

मुसुलमान लोकांपैकी मुहान जातीचे लोक समुद्रकांठीं मासे मारण्याचा धंदा करतात.  मीर लोक कित्येक ठिकाणीं मोत्यें काढण्याचा धंदा करीत असत.  पण तीं मोत्यें आकारानें लहान असून उंची नसल्याकारणानें हा धंदा अलिकडे बहुतेक बसला आहे.

सुती कापड, रेशमी ओढण्या, गालिचे, रग व सामान्य धातूचीं भांडीं वगैरे जिन्नस येथें तयार होतात.  कराची शहरांत कांहीं गिरण्यांखेरीज दुसरे महत्त्वाचे कारखाने नाहींत.  ठठ्ठा शहर बायकांच्या लहंग्याकरितां प्रसिद्ध आहे.  शहा बंदर तालुक्यांत मिठाच्या मोठ्या खाणी आहेत व कराचीपासून कांहीं मैलांवर मौर्यपूर येथें मिठागरें आहेत.

बहुतेक व्यापार कराची शहर व बंदर येथें एकवटलेला असून गहूं, कापूस, लोंकर, कच्चीं व कमावलेलीं कातडीं हे निर्गत जिन्नस आणि साखर, राकेल, कापड, मद्यें व धातूचे जिन्नस हा मुख्य आयात माल होय.  कराची जिल्ह्यांत कराची, काटी व सिरगंद अशीं तीन बंदरें आहेत.

कराची बंदराला कित्येक बोटी लागतात व शिवाय हें शहर महत्त्वाचे दोन रेल्वेरस्ते व अफगाणिस्तान, कलात आणि मध्यआशिया ह्यांशीं चालणारे व्यापारी मार्ग यांजबरोबर जोडलेलें आहे.  नॉर्थवेस्टर्न रेल्वेनें हा जिल्हा पंजाब व संयुक्त प्रांताबरोबर जोडला गेला असून जोधपूर-बिकानेर रेल्वेच्या योगानें थर आणि पार्कर जिल्हा व मुंबई ह्यांजबरोबर दळणवळण सुरू करण्यांत आलें आहे.  सिंधचा अंतर्भाग, लासबेला व कलात ह्यांशीं दळणवळण होण्याकरितां कराचीपासून गाडी रस्ते गेलेले आहेत.

राज्यव्यवस्था - जिल्ह्याचे तीन पोटभाग असून त्यांत, कोट्रा, कराची, ठठ्ठा, मीरपूरसक्रो, घोराबारी, मीरपूर बोटोरो, सुजावल, जाटी व शहाबंदर हे ९ तालुके आणि काटी बंदर माझंद व कोहिस्तान हे ३ महाल आहेत.  प्रत्येक तालुक्यावर मामलेदारासारखे मुखत्यार आहेत.  हा जिल्हा एका डेप्युटी कलेक्टरच्या ताब्यांत असतो.  कराची, कोत्री, मांझंद ठठ्ठा व काटी बंदर या गांवी म्युनिसिपालिट्या असून इतर ठिकाणचा स्थानिक कारभार जिल्हा व तालुका बोर्डाकडे आहे.

जिल्ह्याच्या लोकसंख्येपैकीं शें. ५.६ पुरुष व शें. ०.५ स्त्रिया साक्षर आहेत.  इलाख्याच्या इतर भागाच्या मानानें या जिल्ह्यांत शिक्षण बरेंच मागासलेलें असून १९०३-४ मध्यें खासगी व सरकारी मिळून एकंदर २९७ शिक्षणसंस्था होत्या.  पैकीं १ आर्ट कॉलेज, ६ हायस्कुलें ८ मध्यम शाळा, २ ट्रेनिंग स्कूल्स.  २ विशिष्ट शाळा, व १८६ प्राथमिक शाळा होत्या.  विद्यार्थ्यांची एकंदर संख्या १३,६०५ असून त्यांपैकीं ३०२८ मुली होत्या.

तालुका - मुंबई इलाख्यांत, सिंध प्रांतांत, कराची जिल्ह्याचा नैर्ऋत्येकडील तालुका.  क्षे. फ. १६७७ चौ.मै. यांत कराची हें जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण व इतर १४ लहान गावें आहेत.  लोकसंख्या (१९११) १८६७७२.  समुद्रकिनार्‍याचा प्रदेश सोडला तर हा सर्व तालुका डोंगराळ आहे.  ह्या तालुक्यांत कालवे नाहींत; परंतु त्यांतून कित्येक नैसर्गिक जलप्रवाह वाहतात.  पैकीं मलिर व लयारी हे मुख्य होत.

शहर - मुंबई इलाख्यांतील, सिंध प्रांताची राजधानी व याच नांवाच्या जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण.  हें शहर सिंधुनदीच्या मुख्यप्रदेशाच्या अगदीं उत्तरटोंकाला पाब डोंगराच्या दखिणपायथ्याशीं व बलुचिस्तानच्या सरहद्दीजवळ आहे.  तें मुंबईपासून रेल्वेनें ९९३ मैल व जलमार्गानें ४८३ (समुद्रांतील) मैल आहे.  हें शहर लाहोरशीं दोन मार्गांनीं जोडलेलें असून; एकमार्ग सक्करवरून व दुसरा कोट्रा-रोहरी रेल्वेनें जातो.  दोन्ही मार्गांनीं अंतर सारखेंच म्हणजे सुमारें ८०० मैल आहे.  लोकसंख्या (१९२१) २१६८८३.  १९११ सालीं एकंदर लो. सं. १५१९०३ पैकीं ७४०७५ मुसलमान, ६६०३८ हिंदू, ७९३६ ख्रिस्ती, व २१६५ पारशीं होते.

मनोरा हेडच्या पुढें आलेल्या भागानें कराची बंदराला वांकणाचें (आखताचें) स्वरूप आलेलें असून किनार्‍यावरून १० मैल लांबीच्या खडकाच्या रांगेनें नैसर्गिक धक्का बनलेला आहे मनोरा व त्याच्या समोरील क्लिफ्टनचें आरोग्य स्थान ह्यांच्या दरम्यान ३१/२ मैलांचे अंतर आहे.  मनोरा हेडच्या उत्तरेस पांच मैल लयारी नदीपर्यंत व जुन्या कराचीपासून पूर्वकिनार्‍यानें पश्चिमटोंकापर्यंत कराची बंदर पसरलेलें आहे.  परंतु यापैकीं फारच थोड्या भागांत मोठमोठी जहाजें लागूं शकतात.  कराची बंदराकडे येणार्‍या मनुष्याला दृग्गोचर होणारी पहिली गोष्ट मनोरा हेड ही होय.  त्यावर समुद्रसपाटीपासून १४८ फुटांवर असलेला दिवा हवा स्वच्छ असतांनां २० मैलांवरून दिसतो; पूर्वी त्याचें संरक्षण करण्याकरितां एक किल्ला होता.  परंतु हल्लीं त्याऐवजीं अर्वाचीन तर्‍हेची तटबंदी केलेली असून तेथें बंदराच्या व्यवस्थेकरितां लागणार्‍या कामगारांच्या इमारती, एक ख्रिस्ती देवालय व इडोयूरोपियन तारखातें हीं आहेत.

मुखाच्या दुसर्‍या बाजूला किआमारी येथें कराचीस येणारे उतारू व माल उतरतो.  व येथें उतरण्याचे तीन धक्के आहेत.  नेपियर धक्यापासून ३ मैलपर्यंत जाणार्‍या रस्त्यानें बेट शहराला व मुख्य जमीनीला जोडलें गेलें असून त्यावरून ईस्टइंडियन ट्रामवे जाते.  नार्थवेस्टर्न रेल्वे सुद्धा किआमारीपर्यंत जाते; परंतु धक्क्याच्या बाजूनें न जातां ती एका मोठ्या खाजणाच्या बाजूनें वळसा घेऊन दक्षिणेकडे गेलेली आहे.  खाजणांतील पाणी बंदरांत नेहमीं नेतां यावें म्हणून बंदरांतील धक्क्यावर १८६५ त १२ फूट लांबीचा पूल बांधलेला आहे.  ह्या पुलाच्या उत्तरटोंकाला, पूर्वपश्चिम असा एतद्देशीय लोकांनीं बांधलेला धक्का आहे.  बंदरांतील धक्क्याच्या टोंकाला मुख्य जमीनीच्या बाजूला रस्त्यावर कस्टम-हाऊस आहे.

कस्टम - हाऊसपासून कराचीच्या छावणीपर्यंत बदर व मॅकलिऔड नांवाचे दोन मुख्य रस्ते जातात.  हे रस्ते ज्या ठिकाणीं मिळालेले आहेत तेथें सर विल्यम मेरीवेदर याच्या स्मरणार्थ घड्याळाचा मनोरा उभारलेला आहे.  बंदररस्त्याच्या बाजूला जुना व अतिशय दाट वस्तांचा भाग आहे.  हा भाग व लयारी भाग यांच्या दरम्यान लयारी नदी (हिला वर्षांतून २-४ वेळच पाणी असते.)  वहातें.  मॅक लिऑड रस्त्यावर, मुख्य कोर्ट, मुंबई बँक, नॅशनल बँक ऑफ इंडिया, रेल्वे स्टेशन, पोस्ट व तार ऑफिसें, लोखंडी कारखाना, कापसाचे दाब हीं आहेत.  शिवाय ह्या भागांत दवाखाना, सिंध कॉलेज, नवें हिंदू देवालय व बहुतेक यूरोपियन व्यापार्‍यांचीं ऑफिसें हि आहेत.  कंदाहारहून येणार्‍या तांड्यांच्या सेयीकरितां बांधलेली अफगाण सराई सुमारें ३ एकर मोठी आहे.  गांवाच्या उत्तरेस व पूर्वेस लष्करी छावणी असून तेथून सुमारें अर्ध्या मैलांवर सार्वजनिक बाग असून तींत वन्य प्राण्यांचा संग्रह केला आहे.

कराचींतील वास्तुसौंदर्य आंग्लो-इंडियन पद्धतीचें आहे.  ह्यां गांवातील मुख्य इमारती म्हणजे ख्रिस्ती प्रार्थनामंदिरें मुसलमानी कॉलेज, सिंधक्लब, एम्प्रेस मार्केट, पोस्टऑफिस व फ्रेअर हॉल ह्या होत.

वर्षांतून ८ महिने समुद्रावरील वारे येत असल्यामुळें कराचीची हवा सिंधमधील इतर भागाच्या हवेपेक्षां जास्त आरोग्यकारक आहे.  शहर सखल जागेंत वसलें असून, आसपासचा भाग दलदलीचा असल्यामुळें वातावरण आर्द्र व गरमही असतें.  परंतु अगदीं उन्हाळ्याच्या दिवसांतहि येथील उष्णमान समुद्रापासून दूरच्या प्रदेशापेक्षां कमीच असतें.

इतिहास :-  कराची शहर ब्रिटिशांच्या ताब्यांत १८४३ त आलें व त्यानंतरच येथील विस्तीर्ण व्यापार, सुंदर बंदर, व मोठमोठ्या संस्था अस्तित्वांत आल्या असें म्हणण्यास हरकत नाहीं.  १७२५ पूर्वी हल्लींच्या जागीं मुळींच गांव नव्हतें असें दिसतें.  परंतु ज्या ठिकाणीं हाब नदी समुद्राला मिळते  त्याच्या दुसर्‍या बाजूला खरक नांवाचें गांव असून तेथें व्यापार मोठा चालत असे असा उल्लेख आढळतो.  सरक बंदराला जाण्याचा मार्ग वाळूनें बंद झाल्याकारणानें हल्लींच्या कराची बंदराच्या टोंकांकडे लोक जाऊं लागले व त्या स्थलाला कलाचीकून असें नांव मिळालें (१७२९).  ही जागा सोयीची वाटल्यामुळें कालांतरानें तेथील व्यापार वाढत चालला व शेजारच्या वाढत्या गांवाला कराची असें कलाचीपासून अपभ्रष्ट नांव मिळालें.  थोड्याच काळानें शहा बंदरचे बंदर बंद झाल्यामुळें तेथील लोकवस्ती व व्यापारहि कराचीकडे वळला.

कोल्हारा राजांच्या कारकीर्दीत कलातच्या खानानें हें गांव मिळवून तेथें शिबंदी ठेवली.  १७९२ ते ९५ या अल्पावधींत तीन वेळां बलुची सैन्य या गांवावर आलें; परंतु फक्त तिसर्‍या वेळीं (या वेळीं बलुची सैन्याचें आधिपत्य हैद्राबादच्या तालपूर सरदारांकडे होतें).  त्याला यश आलें.  तालपूर सरदारांनीं कराचीचा व्यापार वाढविण्याची पुष्कळ खटपट केल्यामुळें गांवची वस्ती वाढूं लागली.  १८३८ त कराचीची लो. सं. १४,००० असून तीपैकीं निम्मे हिंदू होते.  मीर राजांच्या कारकीर्दीत या शहराची व आजूबाजूची व्यवस्था पहाण्याचें काम नबाबाकडे सोंपविलेलें होतें; व तो सर्व कारभार एकतंत्रीपणानेंच करीत असे.

व्यापार :-  ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी सुद्धां सिंधु नदीच्या योगानें दळणवळण करणें फार सोयीचें असल्यामुळें कराची शहराला व्यापारीदृष्ट्या बरेंच महत्त्व आलेलें होतें.  तथापि आजूबाजूला लोकवस्ती थोडी असून राज्यकर्तेहि अदूरदर्शी असल्यामुळें व्यापाराची वाढ व्हावी तशी झालीं नाहीं.  तालपुर मीरांच्या वेळीं आयात मालावर शें. ४ व निर्गत मालावर दोनपूर्णांक एकद्वितीयांश जकात घेतली जात असे.  १८०९ त कस्टमचें उत्पन्न ९९,००० रु. होतें.  तें १८३७ त १,७४,००० रु. झालें.  त्या वेळीं गुलाम, इंग्लिश रेशीम, कापड, चिटें, बंगाली व चिनी कच्चें रेशीम, खजूर, साखर, हस्तिदंत, तांबें, मसाले व कापूस हे मुख्य आयात जिन्नस आणि अफू, तूप, नीळ, गहूं, मंजिष्ठ, लोंकर, राळ व खारे मासे हे मुख्यनिर्गत जिन्नस असत.

१८४३ त, ब्रिटिशांच्या कारकीर्दीच्या आरंभीं कराची, काटी व सिरंगद या तिन्ही बंदरांचा मिळून व्यापार १२ लक्षांचा होता.  तो १९०३-४ सालीं २४.९ कोटीपर्यंत वाढला.  याचें कारण सिंध व पंजाबमधून गहूं व इतर धान्य येऊन येथून परदेशीं रवाना होतें; व या धान्याचें प्रमाण दरवर्षी सारखें वाढत आहे हें होय.

संयुक्त राज्यांतून कराची येथें सुती माल, रेल्वेचें सामान, मद्यें, दगडी कोळसा, यांत्रिक सामान व औषधें; मुंबईहून सुती कापड, वळीव सूत, खनिज धातू, रेशीम, साखर, चहा, ताग, मसाले, रंग, लोंकरीचे जिन्नस, नारळ, रेशमी कापड, मद्यें, फळें, धान्य व घोडे; मक्रानच्या किनार्‍याहून लोंकर धान्य व डाळी; कलकत्याहून ताग व धान्य आणि रशियांतून खजिन तेल याप्रमाणें जिन्नस येतात.

कराचीहून गहूं, कापूस, कातडीं, हाडें, नीळ वगैरे जिन्नस बाहेर रवाना होतात.

कराचीस जमीनीवरून होणार्‍या व्यापाराच्या जिन्नसांत पंजाब व संयुक्त प्रांतांतून गहूं; पंजाबांतून कापूस; आणि कंदाहार व कलात येथून लोंकर, सुकीं फळें व घोडे हे मुख्य जिन्नस येतात.  तालपूर मीरांच्या वेळीं व ब्रिटिशांच्या अमदानींतील पहिल्या कांहीं वर्षांत कराची बंदरांत फक्त लहान जहाजें राहूं शकत.  मोठमोठ्या बोटी मनोरा पॉइंटच्या बाहेर लागत व तेथून मनुष्यें व माल लहान होड्यांतून नदीनें कांहीं मर्यादेपर्यंत वर आणली जात, व तेथून पुन्हां होडग्यांत घालून हल्लींच्या कस्टम हाऊसच्या जवळपास नेत. परंतु नंतर हळूहळू बोटी धक्क्यास लागूं लागल्या.

कराची येथील म्युनिसिपालिटी १८५२ त स्थापन झाली.  तिचें १९०३-४ चें उत्पन्न १५ लक्ष होतें.  छावणीची व्यवस्था एका कमिटीकडे आहे.  कराचीच्या शिबंदीची संख्या सामान्यतः १३०० असते, व स्वयंसैनिक सैन्य ८०० असतें.

कराची शहरांतील विहिरींचें पाणी खरें असल्यामुळं शहरच्या पाणीपुरवठ्यासंबंधानें पुष्कळ दिवस अडचण भासत असें; हल्लीं मालिर नदीपासून आणलेल्या पाण्याच्या नळाच्या योगानें पाण्याची चांगली सोय झाली आहे.

सिंध कॉलेज, एंजिनिअरिंग कॉलेज, सरकारी व निमसरकारी हायस्कूलें, आंग्लोर्व्हन्याक्युलर शाळा, देशी शाळा, मुलींच्या शाळा व व्यापारी शाळा या ह्या शहरांतील शिक्षणसंस्था होत.  या शहरांत सिंध ऑब्झर्व्हर, सिंध टाइम्स, फोडानिक्स, प्रजामित्र, कराची क्रॉनिकल इत्यादि इंग्रजी, सिंधी, गुजराथी व फारसी भाषेंत मिळून सुमारें १४ वर्तमानपत्रें निघतात.  कराची येथें एक सिव्हिल हॉस्पिटल, एक प्रसुतिगृह एक महारोग्याकरितां आश्रम व कांहीं दवाखाने आहेत.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .