प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

करवली, संस्थान - करवली अथवा करौली हें राजपुतान्याच्या पूर्वेकडील संस्थान आहे.  क्षेत्रफळ १२४२ चौरस मैल.  याच्या उत्तरेस भरतपूर; वायव्येस व पश्चिमेस जयपूर; दक्षिणेस व आग्नेयीस ग्वाल्हेर; व पूर्वेस घोलपूर.  बहुतेक सर्व प्रदेश तुटक व डोंगराळ असून विशेष मनोहर नाहीं; परंतु लष्करीदृष्ट्या हा सोयीचा असल्यामुळें यादव राजांच्या कारकीर्दीत तहनगड (समुद्रसपाटीपासून उंची १३०९ फूट) येथें राज्यकारभाराची जागा होती.  दक्षिणेकडे भैरव व उटगीर हीं सर्वांत मोठीं शिखरें आहेत.  त्यांची समुद्रसपाटीपासून उंची अनुक्रमें १५६५ फुट व १४७९ फूट आहे.  चंबळा, बनास, मोरेल व पंचनद ह्या संस्थानांतील मुख्य नद्या होत.  गांवठी प्राण्यांखेरीज, चंबळा नदीजवळच्या जंगलांत वाघ, चित्ता अस्वल, नील, गाय, सांबर वगैरे प्राणी पुष्कळ आढळतात.  हवा एकंदरीत बरी आहे.  वार्षिक पाऊस राजधानीच्या शहरीं सरासरी २९ इंच पडतो.  ईशान्य भागांत माचिलपूर येथें व आग्नेयीस मंड्रेल येथें सामान्यतः पाऊस सर्वांत जास्त होतो.

इतिहास -  करवलीचा महाराज यादव (?) वंशीय रजपुतांचा मुख्य असून श्रीकृष्णाचा वंशज आहे असें म्हणतात.  यादव लोक हे मथुरेभोंवतालच्या व्रजभागाजवळ रहात होते आणि एके काळीं त्यांच्या ताब्यांत अर्धा अलवार व सर्व भरतपूर, करवली, व धोलपूर, यांखेरीज गुरुगांव व मथुरा हे ब्रिटिश जिल्हे, यमुनेच्या पश्चिमेकडील आग्र्याचा बराच भाग व चंबळा नदीच्या कांठचा ग्वाल्हेर संस्थानचा कांहीं भाग एवढा मुलुख होता असें म्हणतात.  अकराव्या शतकांत कृष्णापासून अठ्ठयांशीवा पुरुष विजयपाल यानें बयाना येथें आपली सत्ता स्थापन करून एक किल्ला बांधला.  त्याचा वडील मुलगा तहनपाल यानें १०५८ च्या सुमारास तहनगड नांवाचा प्रख्यात किल्ला बांधला.  हा अद्यापि करवली संस्थानांत आहे.  कुंवरपालाच्या कारकीर्दीत ११९६ या वर्षी महंमद घोरी व त्याचा सेनापति कुतुबुद्दीन यांनीं प्रथम बयाना व नंतर तहनगड हीं सर केलीं.  सर्व मुलूख शत्रूच्या ताब्यांत गेल्यानंतर कुंवरपाल रेवासस्थानांत पळून गेला.  त्याच्या वंशजांपैकीं अर्जुनपाल नांवाच्या एका पुरुषानें आपल्या पूर्वजांस मुलुख परत मिळण्याचें मनात आणून १३२७ त मंड्रेलवर हल्ला केला; व हळूहळू तहनपालाच्या ताब्यांत असलेला सर्व मुलुख परत मिळविला.  व १३४८ त हल्लींची राजधानी जे करवली गांव त्याची स्थापना केली.  यास ''करौली'' असेंहि म्हणतात.

अकबराच्या वेळीं (१५५६-१६०५) हें संस्थान दिल्लीच्या साम्राज्यांत अंतर्भूत झालें.  करवली संस्थानचा सर्वांत प्रसिद्ध संस्थानिक गोपाळदास याजवर अकबराची बरीच मर्जी असून त्याच्याच सांगण्यावरून गोपाळदासानें आग्र्याचा किल्ल्याचा पाया घातला.  मोंगल सत्तेच्या र्‍हासानंतर हें संस्थान मराठ्यांनीं आपल्या ताब्यांत आणिलें; व या संस्थानापासून ते २५००० रु. खंडणी घेत असत.

करवलीकर हे जाधव वंशांतील राजे होते.  यांच्याच शाखेंतील प्रसिद्ध पिलाजीजाधव वाघोलीकर होत.  पिलाजीच्याच विनंतीवरून १७२६ मध्यें बाजीराव साहेबांनीं संस्थानिकास अभयपत्र देऊन संस्थान खालसा केलें नाहीं.  ते तेथें आपला कमावीसदार ठेऊन खंडणी घेत असत.  पानिपतापर्यंत खंडणी सुरळीत आली.  नंतर तिकडे जाटांचा अमल झाल्यानें खंडणीस अडथळा झाला.  पुढें कानडे व बिनिवाले यांनीं जाटांनां पराभूत करून आपला अंमल बसविला.  मध्यंतरी नजीबाचा अंमल थोडा वेळ होता.  परंतु शिंदे-होळकरांनीं तो उठविला व सार्‍या हिंदुस्थानांत आपला अंमल बसविला.  त्यावेळीं पुन्हां करवलीची खंडणी येऊ लागली.  पुढें पुढें ती शिंदेच परभारां वसूल करीत.  शिंद्यानंतर पेशवाईअखेर इंग्रजांनीं तो प्रांत हस्तगत केला.  (रा. खं. १० ४८९-९०).  मराठ्यांचा अखेरचा कमावीसदार नारोत्र्यंबक भावे हा होता.  यानें फिरंग्याकडे संस्थान जाऊं नये म्हणून १८१० च्या सुमारास फार खटपट केली.  तो म्हणतो 'साठ पासष्ट वर्षांचा अंमल कसा सोडावा ?  परंतु पेशवे, शिंदे व इतर सरदार यांच्यामध्यें तंटे लागल्यामुळें अखेर करवली फिरंग्यांच्या हातीं गेलीं' (कित्ता ४९४-९६).

याप्रमाणें इ.स. १८१७ त इंग्रजांनीं करवली संस्थान आपल्या संरक्षणाखालीं घेतलें.  येथील संस्थानिकाला खंडणी द्यावी लागत नाहीं; परंतु जरूर लागेल तेव्हां ब्रिटिशांनां फौजेची शक्य ती मदत द्यावी लागते.  संस्थानिकाला महाराजा असें म्हणतात व १७ तोफांची सलामी मिळते.  त्याला दत्तक घेण्याचा अधिकार आहे.  मागले सात संस्थानिक दत्तकच होते ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे.  तहनगड व राजधानीच्या दक्षिणेकडे आठ मैलांवर असलेलें बहादुरपुर हीं गांवें जुनीं असून तेथें पुराणवस्तूंचे अवशेष आहेत.

लोकसंख्या :-  संस्थानांत लहान व मोठीं मिळून ४३७ गांवें असून एकंदर लो. सं. (१९२१) १३३७३० आहे.  संस्थानांत करवली (किंवा सदर), जिरोत, माचिलपुर, मंड्रेल व उटगीर असे पांच तालुके आहेत.  जिरोत व उटगीर या तालुक्यांचीं मुख्य ठिकाणें अनुक्रमें सपोत्र, व कर्णपूर हीं असून बाकीच्या तालुक्यांचीं मुख्य ठिकाणें त्यांच्या (तालुक्यांच्या) नांवाच्या गांवीं आहेत.  करवली हें एकच मोठें व म्युनिसिपालिटींचें गांव आहे.

शें. ९४ लोक हिंदुधर्मी असून मुख्यतः कृष्णभक्त आहेत व शें. ५ पेक्षां जास्त मुसुलमान आहेत.  येथें पश्चिमहिंदी लोक डांगी, डांगभाग, वगैरे पोटभाषा बोलतात.

शेतकी :-  बाजरी, हरभरा, उडीद, गहूं, ज्वारी, थोड्या प्रमाणावर कापूस, खसखस व ऊंस हीं पिकें संस्थानांत होतात.  शेतीला पाणी विहिरींचें किंवा तळ्यांचें दिलें जातें.  संस्थानांत जंगल म्हणण्यासारखें नसून चांगलें इमारती लांकूड थोडें आहे.  वालुकामय तांबडा दगड संस्थानभर सांपडतो.  करवलीच्या ईशान्येकडील डोंगरांत अशुद्ध लोखंड सांपडतें.  परंतु त्यापासून शुद्ध लोखंड तयार करणें फायदेशीर पडत नाहीं.

व्यापार व दळणवळण :-  संस्थानांत महत्वाचे असे कारखाने नाहींत.  कापड विणण्याचा व रंगविण्याचा धंदा थोडासा चालतो.  लांकडी खेळणीं, पेट्या व पितळी दागिनें वगैरे जिन्नस थोड्या प्रमाणांत तयार होतात.  करवली येथें होणारी तागाची पोतीं आसपासच्या बाजारांत प्रसिद्ध आहेत.

मुख्य निर्गत माल :-  कापूस, तूप, अफू, जिरें, तांदूळ व इतर धान्य.

मुख्य आयात माल :-  कापड, साखर, गूळ, मीठ व नीळ; बहुतेक व्यापार शेजारच्या जयपूर व ग्वाल्हेर संस्थानशीं आणि आग्रा जिल्ह्याशीं चालतो.

या संस्थानांत आगगाड्या नाहींत.  बी.बी.सी.आय. रेल्वेवर हिंदौन रोड (राजधानीच्या उत्तरेस ५२ मैल) व ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वेवरून धोलपूर (पूर्वेकडे सुमारें ६५ मैलांवर) हीं जवळचीं रेल्वे स्टेशनें आहेत.  राजधानीपासून हिंदौन रोडच्या दिशेनें जाणार्‍या ९ मैल सडकेखेरीज इतर सडका संस्थानांत नाहींत.  या संस्थानांत पांच ब्रिटिश पोस्ट ऑफिसें व करवली येथें तार ऑफिस हीं आहेत.

राज्यकारभार :-  या संस्थानचा कारभार महाराजा पहातो.  त्याला मदत करण्याकरितां पांच सभासदांचें एक मंडळ असतें.  करवली हा त्या मंडळाचा अध्यक्ष असतो.  करवली (किंवा सदर), जिरोत, माचिलपूर, मंड्रेल व उटगीर या तहसिलीपैकीं प्रत्येकीवर तहसिलदार असून त्यांवर डेप्युटीकलेक्टर नांवाचा एक मुलकी अधिकारी असतो.  प्रत्येक गांवांत तहसिलिया नांवाचा एक संस्थानचा नोकर असतो व तो विभागाच्या पटवार्‍याच्या हाताखालीं काम करतो.  संस्थानांत सामान्यतः ब्रिटिश कायदेच चालतात; परंतु तेथील पीनलकोडांत गाय व मोर मारणें हे गुन्हे मानलेले आहेत.  महाराजाला देहांत शिक्षा देण्याचा अधिकार आहे.  संस्थानचें वार्षिक उत्पन्न सुमारें ६ लक्ष रुपये आहे.

अगदीं अलीकडील काळापर्यंत करवली संस्थानचीं स्वतःचीं नाणी असत.  १८७० त संस्थानच्या रुपयाची किंमत ब्रिटिश रुपयापेक्षां अर्ध्या आण्यांनीं जास्त होती; परंतु पुढें ती कमी झाली.  म्हणून अलीकडे दरबारनें संस्थानांत फक्त ब्रिटिश नाणेंच चालूं ठेवलें आहे.

१९११ मध्यें, संस्थानांत शें. ४ पुरुषांनां व शें. ०.२ स्त्रियांनां लिहितां येत होतें.  राजधानीच्या शहरीं असलेलें हायस्कूल व मुलींची शाळा यांखेरीज संस्थानांत कांहीं सरकारी व कित्येक खासगी शाळा आहेत.  सरकारी शाळांत शिक्षण मोफत असतें.

गांव -  राजधान्यांत याच नांवाच्या संस्थानच्या राजधानीचें ठिकाण.  हें मथुरा, ग्वाल्हेर, आग्रा, अलवार, जयपूर व टोंक या शहरांपासून सारख्याच (सुमारें ७५ मैल) अंतरावर आहे.  हें सदर तहसिलींचे मुख्य ठिकाण आहे.  हें गांव इ.स. १३४८ त राजा अर्जुनपाल यानें वसविलें व त्याच वेळीं येथें बांधलेल्या कल्याणजीच्या देवळावरून याचें मूळचें नांव कल्याणपुरी असें होतेंसें दिसतें.  येथून बी.बी.सी.आय रेल्वेच्या हिंदौन रोड स्टेशनकडे जाण्याकरिता ५२ मैल लांबीचा पक्का रस्ता आहे.  लो. सं. (१९११) १९८०३.  पैकी शेंकडा ७६ हिंदू व शेंकडा २२ मुसुलमान आहेत.  कांहीं ठिकाणांहून गांवाकडे नजर टाकल्यास गांवचा देखावा फार चांगला दिसतो.  गांवाभोंवती तांबड्या दगडाचा तट असून उत्तरेकडे व पूर्वेकडे असलेल्या दर्‍यांच्या जाळ्यामुळेंहि त्याला सुरक्षितता प्राप्‍त झाली आहे.  दक्षिणेस व पश्चिमेस त्या मानानें जमीन सपाट आहे.  परंतु त्या बाजूनें वहाणार्‍या नैसर्गिक जलप्रवाहानें तटाभोंवती खंदकाचेंच काम केलें आहे, व प्रवाहाच्या दुसर्‍या बाजूला बाहेरची तटबंदी व चर असल्यानें गांवाची सुरक्षितता दुप्पट झाली आहे.  तथापि खड्या फौजेपुढें गांवची तटबंदी विशेष टिकाव धरील असें वाटत नाहीं; कारण तट दिसावयास सुंदर असला तरी त्याचें बांधकाम मजबूत झालेलें नाहीं.  गांवचा घेर २। मैल असून त्याला ६ वेशी व ११ लहान दरवाजे आहेत.  रस्ते अरुंद व वांकडे तिकडे आहेत.  परंतु त्यांवर दगडी फरसबंदी केलेली असल्यामुळें ते धुवून स्वच्छ करतां येतात.  गांवांत कांहीं मोठीं घरें व सुंदर देवालयें आहेत; पैकी महाराजा प्रतापलाल यानें (१८३७-५०) बांधलेलें अर्वाचीन मथुरापद्धतीचें प्रताप सरोमान देवालय हें सर्वांत सुंदर आहे.  राजवाडा पूर्वतटापासून सुमारें २०० यार्डांवर आहे.  मूळचा राजवाडा १४ व्या शतकांत अर्जुनपालानें बांधला होता.  परंतु त्याचा आतां मागमूसहि नाहीं.  हल्लींचा राजवाडा अठराव्या शतकाच्या मध्यांत राजा गोपालसिंहानें बांधला असून त्याचें बांधकाम दिल्लीच्या इमारतींच्या धर्तीवर आहे.  या गांवांत १८८४ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली असून तिनें शहरसफाईचें एकंदर काम फार चांगलें केलें असल्यामुळें करवली गांव राजपुतान्यांतील अत्यंत स्वच्छ गांवांत मोडतें.  येथील म्युनिसिपालिटीचें वार्षिक उत्पन्न ७००० ते ९००० रु. पर्यंत असतें.

गांवांत कांहीं प्राथमिक शाळा व एक मुलींची शाळा असून शिवाय एक हायस्कूलहि आहे.  येथें एक सर्वसामान्य व एक स्त्रियांकरितां अशीं दोन रुग्णालयें आहेत.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .