विभाग दहावा : क ते काव्य

करमगड - पंजाबांतील पतियाळ संस्थानांतील एक निजामत.  क्षेत्रफळ १८३४ चौरस मैल.  लो. सं. (१९०१) ५००६३५.  या निजामतींत पतियाळा, भवानीगड, सुनाम व नरवान अशा चार तहशिली असून पतियाळा, समान, सुनाम, व सनौर हीं मोठीं गावें व ६६५ खेडी आहेत.  निजामतीचें मुख्य ठिकाण भवानीगड अथवा धोदान हें आहे.