प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कबीर - हिंदुस्थानांतील एक संत व धर्मसुधारक.  याच्या जन्माविषयी बर्‍याच विसंगत कथा आहेत.  डॉ. भांडारकर कबिराविषयीं पुढील माहिती देतात (वैष्णविझम, शैविझम अॅंन्ड मायनर रिलिजियस सिस्टिम्स).  हा एक ब्राह्मण विधवेचा मुलगा असून स्वतःच्या अब्रूचा बचाव करण्याकरितां तिनें त्यास जन्मताक्षणींच काशी येथील ''लहर'' तळ्याजवळ सोडून दिलें.  निरु नांवाचा एक मुसुलमान साळी आपल्या नीमा नांवाच्या बायकोसह त्या रस्त्यानें चालला होता.  त्यानें त्या अर्भकास पाहिलें व आपल्या घरीं नेलें.  या दोघांनीं कबीराचें पालणपोषण करून त्यास वाढविलें.  कबीर मोठा झाल्यावर तो साळ्याचा धंदा करुं लागला.  त्याचा हिंदुधर्माकडे कल असल्यामुळें रामानंदास आपला गुरु करावा अशी त्याच्या मनांत कल्पना आली.  पण आपण मुसुलमान असल्यामुळें तो आपणास शिष्य करणार नाहीं असें वाटल्यावरून त्यानें एक युक्ति लढविली.  रामानंद दररोज पहाटे गंगास्नानास जात असे असें पाहून कबीर एके दिवशीं घांटावर निजला.  रामनंदाचा चालतां चालतां त्याच्यावर पाय पडला तेव्हां ''राम राम'' असे उद्‍गार रामानंदाच्या तोंडांतून निघाले; तेव्हां हाच आपणास रामानंदानें गुरुमंत्र दिला व आपण त्याचे शिष्य झालों असें समजून कबीर उठला.  दुसरी हकीकत अशी सांगतात कीं, रामानंदाचा पाय पडतांक्षणींच कबीर उठला व मोठ्यानं रडूं लागला तेव्हां रामानंदानें त्यास उगी राहावयास सांगून ''राम राम'' म्हणावयास सांगितलें.  आपणांस रामानंदानें आपला शिष्य केलें असें समजून कबीरानें ईश्वरोपासनेचा आपला क्रम चालू ठेऊन आपण रामानंदाचे शिष्य आहोंत असें तो सर्वांना सांगत सुटला.  तेव्हां कांहीं हिंदू रामानंदाकडे गेले व कबीरास गुरुमंत्र दिला किंवा काय असें त्यांनीं त्यास विचारलें.  तेव्हां कबीरास बोलावून ''मी तुला केव्हां गुरुमंत्र दिला'' असें रामानंदानें त्यास विचारिलें.  कबीरानें घाटावर घडलेली हकीकत सांगितली तेव्हां रामानंदास सर्व आठवलें व त्यानें त्यास आलिंगन दिलें.  त्या वेळेपासून कबीर नियमितपणें आपल्या गुरुच्या मठांत जाऊन पंडितांशीं होणार्‍या वादविवादांत भाग घेत असे.  कबीर कांहीं काळ माणिकपुर येथें राहिला असें त्याच्या ''रमणीं'' त म्हटलें आहे.  तेथें त्यास शेक तक्की व एकवीस पीर यांची कीर्ती ऐकुं आली.  त्यांचीं संभाषणें कबीरानें ऐकलीं व त्यांच्या उपदेशाचा निषेध करून तो त्यांस म्हणाला, ''शेखहो, तुम्ही माझें ऐका; नीट डोळे उघडून सर्व वस्तूंची उत्पत्ति व लय यांजकडे लक्ष द्या.'' या पंथाच्या एका ग्रंथांत शेख तक्की हा कबीराचा शत्रु व शिकंदर लोदीचा पीर किंवा धर्मगुरु होता असें म्हटलें आहे.  तक्कीच्या सांगण्यावरून शिकंदरानें कबीराचा छळ करून त्याचा नाश करण्याचे पुष्कळ उपाय योजले.  परंतु दैवी चमत्कारांमुळें कबीर मृत्यूच्या दाढेंतून वांचला व शेवटीं शिकंदराशीं त्याचा समेट होऊन शिकंदरानें त्यास आपल्या कृपाछत्राखालीं घेतलें.  

कबीर मगहर येथें निधन पावला.  त्याच्या शवाची पुढें कशी वाट लावावी ह्याबद्दल हिंदुमुसुलमानांत तंटा लागला.  कबीराचें शव वस्त्रानें झांकलें होतें, त्यावरचें वस्त्रावरण काढून पाहतात तों शव नसून त्या ठिकाणी फुलें होतीं.  त्यांपैकीं मुसलमानांनीं अर्धी फुलें घेऊन तीं मगहर येथें पुरलीं व त्यांच्यावर एक कबर बांधली; बाकीची अर्धी फुलें हिंदूंनीं काशीस नेलीं व त्यांचे दहन केलें.  कबीराच्या बायकोचें नांव ''लोई'' असून कमाल (मुलगा) व कमाली (कन्या) अशीं त्यास दोन अपत्यें होतीं; पण हीं त्यास कशीं झालीं याबद्दल अद्‍भुत गोष्टी सांगतात.

वरील हकींकतींत ऐतिहासिक सत्याचा भाग किती व काल्पनिक भाग किती हें ठरविणें कठिण आहे.  तथापि तो प्रथम मुसुलमान साळी होता येवढी गोष्ट खरी समजून चालण्यास हरकत नाहीं.  त्याचप्रमाणें शेखतक्की हा कबीराचा शत्रु होता व शिकंदरलोदीच्या वेळीं कबीर होऊन गेला याहि गोष्टी खर्‍या मानण्यास हरकत नाहीं.  कबीर हा रामानंन्दाचा शिष्य होता किंवा नाहीं हा मात्र प्रश्न आहे.  मि. वेस्टकॉट म्हणतो कीं, तो ''सूफी'' मुसुलमान पंथाचा असणें अशक्य नाहीं; पण त्याच्या ग्रंथांत हिंदूंच्या धार्मिक वाङ्‌मयांतील नांवें व त्यांच्या चालीरिति यांच्याशीं इतका पूर्ण परिचय आढळून येतो कीं मुसुलमानी धर्मतत्त्वें त्यांच्या मुळाशीं आहेत असे कशावरूनहि दिसत नाहीं.  तर उलट शुद्ध हिंदुधर्माचींच तत्त्वे मुळाशीं दिसतात.  तथापि कबीर हा बाणेदार व न नमणारा असा (धार्मिक) सुधारक असून तो पंडित, आपल्या वर्णाचा टेंभा मिरवणारे ब्राह्मण व निरनिराळ्या पंथाचे आचार्य या सर्वांवर अभिशापांची लाखोली वाही.  यावरून मुसुलमानी धर्माचा त्याजवर पगडा बसला होता असें दिसतें.

निरनिराळ्या ग्रंथकारांनी कबीराचा जन्मकाल व निधन काल हे दोन्ही निरनिराळे दिले असून त्यांचा मेळ बसत नाहीं.  वेस्टकॉट म्हणतो तो इ.स. १४४० ते १५१८ म्हणजे ७८ वर्षे जगला.  मेकॉलिफ म्हणतो तो वि.सं. १४५५ म्हणजे इ.स. १३९८ पासून इ.स. १५१८ पर्यंत म्हणजे ११९ वर्षे (पांच महिने, २७ दिवस) तो जगला.  एके ठिकाणीं टीपेंत शक १३७० म्हणजे इ.स. १४६८ हा त्याचा निधनकाळ असल्याबद्दल त्यानें मूळ ग्रंथाचा आधार दिला आहे.  शिकंदरलोदी इ.स. १४८८ पासून इ.स. १५१७ पर्यंत दिल्लीच्या तक्तावर होता.  याच्याशीं इ.स. १४४८ हा कबीराचा निधनकाल जुळत नाहीं; तेव्हां तो त्याज्य होय.  रामानन्द इ.स. १२९८ सालीं जन्मला व इ.स. १४११ सालीं वारला असें सांगतात; तेव्हां वेस्टकॉटनें ठरविलेला काळ बरोबर आहे असें समजल्यास कबीर रामानंदाचा शिष्य असणें शक्य नाहीं.  मेकॉलिफनें दिलेला काळ खरा धरून चाललें तर तो रामानंदाचा शिष्य असणें संभवनीय आहे.  कारण यावरून रामानंदाच्या निधनकालीं कबीराचें वय १३ निघतें, व हें वर कबीराविषयीं ज्या दंतकथा सांगितल्या आहेत त्यांवरील वर्णनाशीं जुळतें.  दोघांहि ग्रंथकारांनीं इ.स. १५१८ हा जो कबीराचा निधनकाल ठरविला आहे.  तो बरोबर समजून चालण्यास हरकत नाहीं.  पण मेकॉलिफ ठरविलेला जन्मकाळ बरोबर समजण्यास कबीर ११९ वर्षे जगला असें समजावें लागतें !!  रामानंदहि ११३ वर्षे जगला !! हे दोघेहि इतके दीर्घायुषी होते किंवा काय हा एक प्रश्नच आहे.  तथापि अधिक सबळ पुराव्याच्या अभावीं मागें सांगितलेला रामानंदाचा काळ व मेकॉलिफनें ठरविलेला कबीराचा काळ हे तात्पुरते बरोबर समजण्यास हरकत नाहीं व कबीर रामानंदाचा शिष्य होता असेंहि मानण्यास हरकत नाहीं.  तथापि केवळ १३ वर्षांचा असताना पंडिताशीं होणार्‍या आपल्या गुरूच्या वादविवादांत तो भाग घेत असे हें शक्य नाहीं.  कबीराच्या ग्रंथांत (डॉ. भाण्डारकर यांनीं जेवढें पाहिलें आणि तेवढ्यांत तरी निदान) रामानंदाचें नांव कोठेंहि आढळत नाही.  तथापि ईश्वरास राम या नांवानें संबोधणें, जीवात्मा व राम यांचा परस्परसंबंध, ईश्वर विदेही किंवा निर्गुण आहे या मताचें खंडन करणें वगैरे गोष्टी रामानंदाच्या मतांतूनच घेतल्या असल्या पाहिजेत.

कबीराचीं मतें व त्यांचा प्रभाव - मुसुलमान व हिंदू या परस्परविरुद्ध अशा दोन वर्गांवर परिणाम करणारीं कबीराचीं मतें होतीं यातं शंका नाहीं.  सबंध हिंदुस्थानांतच त्याचे अनुयायी दहा लाखांपर्यंत असतील.  शीख धर्मसंस्थापक नानक यानेंहि आपला पंथ कबीराच्या शिकवणीवरून कांहींसा तयार केला (आदिग्रंथ पहा).  दादूपंथी, लालदासी, सत्‍नामी, बाबा लाली, साध, चरणदासी, शिवनारायणी, गरीबदासी व रामसनेही हे पंथ कबीराच्या उपदेशामुळें व त्यानें घालून दिलेल्या धड्यांतून निघाले आहेत.  कबीर हा हिंदु कीं, मुसुलमान हेंच समजत नाहीं; कारण दोन्ही धर्माविरुद्ध तो बोलतो.  जातिभेद, संन्यास, उपासतापास, दानधर्म व वेदांत या हिंदू धर्मांतील प्रधान गोष्टींनां तो मानीत नाहीं, वेदांताला तो शिव्या देतो याचें कारण त्याची अशिक्षितता असावी.  हिंदू देवकुलांच्या कल्पनेचा तो अत्यंत तिरस्कार करतो.  तो भक्तिमार्गाचा पुरस्कार करी.  ब्राह्मणी व इस्लामी धर्मांतील गहन विचार, मोठमोठे आचार व गूढ वाद यांविरुद्ध भोळ्याभाबड्या लोकांच्या बंडाचें कबीर हें एक उदाहरण म्हणतां येईल.  तो म्हणत असे कीं, जर ईश्वराला सुंता करणें आवडत असतें तर त्यानें सुंता केलेलीं माणसेंच निर्माण केलीं असतीं.  जर सुंता केल्यानें एखादा पुरुष मुसुलमान होऊं शकतो तर स्त्रियांच्या बाबतींत काय !!  हृदय जर निष्कपट नाहीं तर माळा ओढणें, स्नान करणें, यात्रेला जाणें वगैरे गोष्टी काय कामाच्या ?  जर जानवें घालून पुरुष ब्राह्मण बनतो तर स्त्रियांनीं काय घालावें ?  सर्व धर्मांतील ईश्वर एकच आहे.  अनेक देवांस भजणें चुकीचें आहे.  धर्मग्रंथ महत्वाचे आहेत पण त्यांनां डोक्यावर चढविण्यांत अर्थ नाहीं.

कबीरानें सृष्टयुत्पत्तीचें वर्णन दिलें आहे तें असें :- ''रामतेजांत सर्व जीवाचें मिळून झालेलें एक सूक्ष्म स्वरूपांत असलेलें द्रव्य होतें.  तें द्रव्य रामतेजानें प्रकाशित झालें.  नंतर स्त्री स्वरूपांत वासना प्रगट झाली.  तिला गायत्री व ''शब्द'' म्हणूं लागले व तिच्यापासून सृष्टयुत्पत्तीस सुरुवात झाली'' म्हणजे ''ईश्वराच्या सूक्ष्म इच्छेनें स्वरूपांत असलेल्या जीवाची उत्पत्ति झाली अगर त्याचा विकास झाला व ही ईश्वरी इच्छा शब्दस्वरूपांत प्रगट झालीं'' अशी कबीराची कल्पना आहे.  याचा अर्थ असा कीं ईश्वर हा जगताचें उपादान कारण नसून तो एक अगदीं निराळा सूक्ष्म पदार्थ आहे.  उपनिषदांत एकाचींच अनेक रूपें झालीं असें जें म्हटलें आहे तें एक 'सत्व' होय; साक्षात ईश्वर नव्हे.  यावरून कबीराचें मत अद्वैतपर नसून द्वैतपर आहे.  एकाच कारणापासून सर्व जीव निर्माण झाले, तेव्हां जातिभेद अगर वर्णभेद ह्या मागाहून रचलेल्या काल्पनिक अगर खोट्या गोष्टी होत असें कबीराचें मत होतें.  तेव्हां याविरुद्ध कबीर होता.  कबीराच्या शिकवणींत ख्रिस्तीधर्माची छटाहि कांहींना दिसते. (उदा. सर जॉर्ज ग्रिअर्सन, जे. आर. ए. एस. १९१८).

कबीराचा सर्व उपदेश तोंडीच असे.  तथापि त्यानें कांहीं ग्रंथ रचल्याचे त्याचे भक्त सांगतात.  कबीर व त्याचे भक्त यांच्या नांवावर मोडणारे ग्रंथ पुढील होत :-

सुखनिधान, गोरखनाथाच्या गोष्टी, कबीरपाजी, बालखकी रामायणी, रामानंदाच्या गोष्टी, आनंदसागर, शब्दावली, मंगल, वसंत, होळी, रेखना, झूलना, कहरा, हिंदोला, बारामास, चांचरस, चौतीसा, अलेफनामा, रमैणी, बीजक, आगमवाणी, ज्ञानसागर, कबीरगीता, व कबीरभानुप्रकाश.  याशिवाय कांहीं हस्तलिखित ग्रंथहि आहेत.

कबीराची पद्यरचना :- कबीराचे दोहोरे प्रख्यात आहेत.  तशींच त्यानें केलेलीं पदेंहि पुष्कळांच्या परिचयाचीं आहेत.  पण ही सर्व रचना स्फुट आहे.  भाषा हिंदी असून सरळ व सोपी आहे.  त्याची कवित्वशक्ति चांगली स्फूर्तिदायक व हृदयंगम आहे.  तुकारामाच्या अभंगांप्रमाणें कबीराचें दोहोरेहि म्हणींसारखे सर्वांच्या तोंडीं असतात.  तुकारामाच्या नांवावर ज्याप्रमाणें 'तुका म्हणे' असें शेवटीं घालून पुष्कळसे अभंग मागाहून दडपून दिले आहेत त्याचप्रमाणें 'कहत कबीरा' असें म्हणून दोहोरे रचण्यांत आले आहेत.  तेव्हां खरें व खोटें ओळखणें कठिण पडतें.  'कबीराचीं पदें' म्हणून जें पुस्तक मिळतें त्यांतील भाषा बरीच मराठी वळणाची दिसते.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .