प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कॅपो - (१७७६-१८३१) काउंट.  हा रशियन मुत्सद्दी व ग्रीक रिपब्लिकचा प्रेसिडेंट कार्फ्यु येथें १७७६ फेब्रुवारी ११ रोजीं जन्मला.  हा जुन्या कॉर्फियट घराण्यापैकीं असून तें घराणें इस्ट्रियामधून १३७३ मध्यें तिकडे रहावयास गेलें होतें व त्या घराण्याला काउंट ही पदवी सॅव्हॉयचा डयूक चार्लस इमॅन्युअल यानें दिली होती.  त्याचा बाप त्या बेटांतील एक मोठा वजनदार सनातनवादी गृहस्थ होता.  त्यानें १७९८ मध्यें कँपो फोर्मिओच्या तहानंतर आयोनियन बेटें फ्रेंच सरकारच्या हातीं दिलीं; नंतर नव्या अमलाला विरोध केल्याबद्दल त्याला कैदेंत टाकण्यांत आलें; पण पुढल्या वर्षीच त्याची मुक्तता झाली.  याचें श्रेय त्याच्या पुत्राच्या कारस्थानकुशलतेस आहे.  १८०० मध्यें टर्किश बादशाही सत्तेखालीं तेथें रिपब्लिक स्थापन झालें त्यावेळीं कॅपोनें कायदे कौन्सिलच्या सेक्रेटरीची सरकारी नोकरी पत्करिली.  यात्पूर्वी पदुआ येथें त्यानें वैद्यकीचा अभ्यास केला होता.  नोकरींत शिरल्यापासून पुढें सात वर्षे त्यानें रिपब्लिकच्या कामकाजांत बराच भाग घेतला.  १८०७ मध्यें त्याची 'जादा लष्करी गव्हर्नर' च्या जागीं नेमणूक होऊन आयोनियाच्या अल्लीपाशाच्या सांटा मौरावरील हल्ल्यापासून बचाव करण्याची कामगिरी त्याच्यावर सोंपविण्यांत आली.  त्याचवेळीं भावी ग्रीक स्वातंत्र्ययुद्धांतील कोलोकोट्रोन्स वगैरे प्रमुख पुढार्‍यांशीं ओळख होऊन त्यांच्या सहवासानें त्याच्या मनांत हेलेनिक देशभक्ति उद्दीपित झाली व त्याचा त्याच्या पुढील चरित्रावर मोठा परिणाम झाला.  तथापि आयोनियन सरकारच्या नोकरींस असतां त्या बेटांवर रशियाची सत्ता असावी असाच त्याचा प्रयत्‍न असे.  पुढें १८०७ टिलसिटच्या तहानें ती बेटें नेपोलियनच्या ताब्यांत गेलीं, तरी ग्रीसच्या स्वातंत्र्यप्राप्‍तीच्या कार्यांत रशियाचीच मदत होईल असा त्याला भरंवसा असे.  यामुळें फ्रेंच सरकारनें देऊं केलेलीहि नोकरी न पत्करतां तो रशियन झारच्या नोकरींत शिरला.  सेंट पीटर्सबर्ग येथें कांहीं दिवस परराष्ट्रखात्यांत नोकरी केल्यावर १८११ मध्यें रशियन वकीलाचा मदतनीस म्हणून त्याची व्हिएन्नाला नेमणूक झाली.  पूर्वेकडील देशांची त्याला माहिती उत्तम असल्यामुळें नेपोलियनविरुद्ध चाललेल्या दोस्तांच्या कारस्थानांत त्याचा फार उपयोग झाला.  १८१३ मध्यें ड्रेसडेन व लीपझिंग वगैरे लढाईंत तो हजर होता.  पहिल्या पॅरिस तहांत व नंतर व्हिएन्नाच्या काँग्रेसमध्यें त्यानें रशियाचा प्रतिनिधी म्हणून काम केलें.  जर्मन राष्ट्र निर्बल राखून रशियाचें वर्चस्व अबाधित ठेवण्याची त्याची नेहमीं खटपट असे व याला पोषक म्हणून फ्रान्सचे तुकडे न पाडतां कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्‍न होता तो सिद्धीस जाऊन १८१५ मधील तह त्याच्याच सूचनांनुरूप होऊन यूरोपमध्यें बलाढ्य राष्ट्रांचा एकोपा बरींच वर्षे टिकला.  त्याच सालीं 'होला अलायन्स' ची स्थापना झाली, व नंतर स्टेट सेक्रेटरीची जागा मिळून तो पीटर्सबर्ग येथें परराष्ट्रमंत्रिमंडळांत शिरला.  इ.स. १८१८ मध्यें अलेक्झांडर झारबरोबर एलाचापेल येथें काँग्रेसमध्यें तो हजार होता.  तेथून आपल्या गांवीं परत जात असतां मार्गांत प्रत्येक ठिकाणीं त्याचा गौरव झाला.  परंतु मेटरनिकसारख्या मुत्सद्याच्या डोळ्यांत त्याचें डोईजड होत असलेलें प्रस्थ खुपूं लागलें होतें.  शिवाय अलेक्झांडर झारसारख्या विलक्षण महत्वाकांक्षी बादशहाचा हा परराष्ट्रमंत्री व ग्रीकचें आणि इटलीचें स्वातंत्र्य व कार्बोनरी संस्था यांच्याबद्दल त्याची सहानुभुती, अशा कारणामुळें कॅपोला यूरोपच्या राजकारणांतून अजीबात दूर करण्याची मेटर्निकला तळमळ लागून राहिली होती.  योग्य संधि मिळावी म्हणून आपल्या गुप्‍त हेरांच्यामार्फत कॅपोच्या तोंडून निघणार्‍या सर्व गोष्टींची माहिती त्यानें जमविण्याचा उद्योग चालविला होता.  असो. कॅपो आयोनियन बेटांत येतांच तेथील रहिवाशींनीं आपल्या या देशबंधूचें मोठें स्वागत करून स्नेहभावानें थामस मेटलंड नांवाच्या ब्रिटिश गव्हर्नराविरुद्ध असलेल्या आपल्या सर्व तक्रारी त्याला सांगितल्या.  व्हिएन्नाच्या काँग्रेसनें ठरविल्यावरून आयोनियन बेटांवर ब्रिटिशांची 'संरक्षक सत्ता' चालू होती.  पण त्यांनीं आपला अम्मल फार कडकपणें चालविल्यामुळें वरील तक्रारी उत्पन्न झाल्या.  त्या तक्रारी ऐकून या देशभक्ताच्या मनाला फार संताप आला व तत्संबंधीं एक खासगी रिपोर्ट त्यानें झारकडे पाठविला व शिवाय स्वतः पॅरिस मार्गानें इंग्लंडला जाऊन त्यानें ब्रिटिश सरकारपुढें आयोनियन द्वीपवासीयांच्या सर्व तक्रारी मांडल्या.  परंतु तेथें त्याच्या तक्रारीकडे इंग्लंडनें विशेष लक्ष दिलें नाहीं.

१८१९ मध्यें कॅपो पीटर्सबर्गला परत येऊन झारच्या नोकरीवर रुजू झाला.  १८२० मध्यें स्पेन व नेपल्स येथें राज्यक्रांत्या झाल्या.  तेव्हां मॅटर्निकनें झारला क्रांतिकारकांचा पक्षपाती कॅपो यास सोडून आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्‍न सुरू केला.  इतक्यांत १८२१ ग्रीक देशभक्त इप्सीलेंटी यानें डान्यूब नदीकांठच्या प्रांतांवर हल्ला केला.  त्याचा फायदा घेऊन मेटर्निकनें झारचें मन कॅपोच्या विरुद्ध पूर्ण कुलुषित केलें.  तेव्हां झारनें काढून टाकण्यापूर्वी कॅपोनें राजीनामा दिला व तो जेनेवा येथें १८२२ मध्यें जाऊन राहिला.

पुढें ग्रीक लोकांनीं तुर्कांशीं युद्ध करून आपलें स्वातंत्र्य मिळविलें व रिपब्लिक स्थापन करून १८२७ एप्रिल ११ रोजीं प्रेसिडेंटच्या जागीं कॅपोची निवड केली.  ग्रीसमध्यें त्यावेळीं रशियन पक्ष प्रबळ होता.  कॅपोनें ती जागा पत्करली.  नंतर पहिल्या निकोलस झारची त्यानें भेट घेऊन राज्यकारभारांतील धोरणाबद्दल त्याची सल्ला घेतली.  नंतर इतर यूरोपीय दरबारांनां भेटी देऊन त्यांची सहानुभूति संपादन करून तो इंग्लंडला गेला.  तो परत आला त्यावेळी देशांत भयंकर अडचणी उत्पन्न झाल्या.  खजिन्यांत पैसा नव्हता; बहुतेक लोक रानटी, अडाणी आणि त्यांत नूतन विजयमदानें शेफारलेले होते.  शिवाय ग्रीसचा शत्रू इब्राहिमपाशा हा मोरियामध्यें ससैन्य तळ देऊन बसलेला होताच.  कॅपोची सर्व मदार स्वतःच्या बुद्धिमत्तेवर व रशियाच्या मदतीवर होती; पण तो पिढीजाद अरेराव पडला.  शिवाय तो 'हम करेसो कायदा' अशा अधिकारावर वाढला असल्यामुळें सर्वसामान्य प्रजाजनांबद्दलची वत्सलता त्याच्या अंगीं नव्हतीं.

त्यामुळें त्या अडदांड परंतु स्वराज्योन्मुख ग्रीक लोकांवर राज्य करण्यास तो फारसा लायक नव्हता.  तरीहि त्यांनीं त्याचा योग्य असाच सन्मान ठेवला.  त्यामुळें प्रथमारंभीं कॅपोची कारकीर्द उत्तम यशस्वी झाली.  त्यानेंहि चिमुकल्या पण स्वतंत्र अशा या ग्रीक राज्याच्या इभ्रतीस धक्का न पोचेल अशा बाण्यानेंच परराष्ट्राशीं वागणूक ठेविली.  व ग्रीसच्या राज्याची मर्यादा आकुंचित करण्याचे इतरांचे सर्व डाव हाणून पाडले.  परंतु अंतस्थ बंडाळ्या मोडून शांतता राखण्याचें काम त्यानें रशियाच्या मदतीनें चालविलें होतें, ते धोरणच अखेर त्याच्या सत्तानाशास कारण झालें.  राज्यक्रांतीच्या काळीं ज्या अशिक्षित पण रणमस्त सरदारांनीं तरवार गाजविली होती त्यांनां पारितोषिक म्हणून कॅपोनें, प्रथम त्यांचा राज्यकारभारी मंडळांत समावेश करून त्यांत मानाच्या जागा दिल्या होत्या.  परंतु लवकरच त्यांच्या जागीं त्यानें सुशिक्षित व लायक ग्रीक लोकांच्या नेमणुका केल्या.  अर्थात या कृत्यानें ते लोक बिथरले.  शिवाय कॅपोच्या यूरोपीय थाटाच्या वागणुकीनें, त्याच्या रशियन युनिफॉर्ममुळें, व त्यानें आपल्या भाऊबंदास मोठाल्या बढत्या दिल्यामुळें त्यांचा क्रोधाग्नी भडकला.  त्यांनीं त्याच्या विरुद्ध जाहीर बंड उभारलें.  तेव्हां बंड मोडण्याकरितां त्यानें रशियाची मदत बोलावली.  त्यामुळें प्रकरण जास्तच चिडीस गेलें.  माइना येथें पेट्रोबी नांवाच्या प्रसिद्ध वीरानें बंडाळी माजविली; परंतु लवकरच रशियन सरकारनें त्याला कैद केलें; तेव्हां तो समेटासहि राजी झाला.  पण कॅपोनें चिडून रागानें त्याची मुलाखत घेण्याचेंच नाकारलें !  खरोखर पाहिलें तर कॅपोनें मागील स्वातंत्र्ययुद्धांत पळभरहि हातांत शस्त्र धरलें नव्हतें.  पण प्रेसिडेंटचा उच्च अधिकार मात्र त्या खर्‍या देशभक्तांवर व आपल्या जुन्या दोस्तांवर तो गाजवूं लागला.  त्यामुळें अपमानानें त्या वृद्ध व अभिमानी सरदारा चें (पेट्रोबीज)  डोकें क्रोधानें फिरून गेलें; व परत कैदेंत जातां जातां आपला पुत्र जार्ज व बंधू कांस्टंटाइन यांनां त्यानें इषारा दिला.  त्याबरोबर दुसर्‍याच दिवशीं (१८३१) आक्टोबर ता. ९) नित्याप्रमाणें कॅपो चर्चमध्यें जात असतां त्यावर कॉन्स्टंटाइननें गोळी झाडली व तो खालीं पडतांच जॉर्जनें उरांत खंजीर खुपसून त्याचा प्राण घेतला.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .