प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कंपनी - कंपनी हा शब्द इकडे सर्वत्र रूढ झाल्यामुळें तो तसाच कायम ठेवून त्याच्या संबंधाची माहिती संक्षिप्‍त रीतीनें खालीं देण्यांत येत आहे.  कोणत्याहि प्रकारचा व्यापार अगर धंदा करून पैसा मिळवावयाचा असा हेतु मनांत धरून एकापेक्षां अधिक अशी मंडळी कायदेशीर उद्यमासाठीं एकत्र झाली म्हणजे ती मंडळी कायद्याप्रमाणें कंपनी होऊं शकते.

हिंदुधर्मशास्त्रांत कंपनीचा कायदा आजच्या स्वरूपांत पहावयास मिळत नाहीं.  आज ज्याप्रमाणें सामायिक भांडवलावर व नियमित जाबाबदारीवर व्यापार करतां येतो तसा व्यापार करण्याची कल्पना तेव्हां नव्हती, तथापि भागीदारीनें व अर्थात अनियमित जबाबदारीवर व्यापार करण्याची पद्धत फार प्राचीन असून याज्ञवल्क्य स्मृतीमध्यें व्यवहाराध्यायांत 'संभूय समुस्थान' या बाविसाव्या प्रकरणांत भागीदारीसंबंधीचे नियम दिले आहेत.  त्यांत भागीदारांनीं ज्या प्रमाणांत व्यापारांत भांडवल घातलें असेल त्या प्रमाणांत किंवा जसा मूळ करार असेल त्या प्रमाणांत होणारा नफा वांटून घ्यावा असें सांगितलें आहे.  नारद, कात्यायन यांनींहि अशा तर्‍हेचेच नियम दिले आहेत; त्यांत बृहस्पतीनें अशक्य, आळशी, रोगी वगैरेबरोबर भागीदारानें व्यापार करूं नये असें सांगितलें आहे.  भागीदारानें व्यापार करितांना ज्या भागीदारानें प्रतिषिद्ध व्यवहार केल्यामुळें किंवा त्याच्या चुकीमुळें तोटा आला असेल त्यानेंच तो भरून द्यावा.  ज्यानें एखाद्या नाशापासून मालाचें रक्षण केलें असेल त्यानें त्याचा १० वा हिस्सा घ्यावा.  राजानें मालाचे किमतीचा २० वा भाग शुल्क म्हणून घ्यावा व राजाच्या योग्य ज्या वस्तू असतील, व राजानें ज्या विकण्याचा निषेध केला असेल त्या वस्तु विकल्या असल्यास राजानें त्यांची सर्व किंमत घ्यावी.  एखादा भागीदार देशांतरास व्यापार करण्याकरितां गेला असतां मरण पावला तर त्याचें द्रव्य त्याच्या दायादांनीं नाहींतर बांधवांनीं, नाहींतर जातीनें किंवा त्यांच्या अभवी त्याच्या इतर भागीदारांनीं घ्यावें.  जो भागीदार लबाडी करील त्याला भागीदारींतून काढून टाकावें.  जो अशक्त असल्यामुळें काम करण्यास असमर्थ असेल त्याचें काम दुसर्‍याकडून करवून घ्यावें अशा प्रकारचेहि नियम सांगितले आहेत. वरील शेवटचा नियम व्यापार्‍याप्रमाणें ॠत्विजांसहि लागू आहे.

चाणक्याच्या कालीं देखील श्रमजीवींचे समवाय होते.  त्याशिवाय इतर संघांना खेड्यांतून राहूं देत नसत.  त्याप्रमाणेंच सामायिक मेहनतीनें अथवा द्रव्यानें बांधलीं जाणारीं कामें असत (संभूय, सेतुबंध वगैरे).  या कामावर जर कोणी स्वतः गेला नाहीं तर त्यानें आपले नोकर व बैल पाठवावे व खर्चाचा हिस्सा द्यावा परंतु त्याला नफा मिळणार नाहीं असा नियम असे.  कौटिल्यानेंहि भागीदारां (संभूय समुत्थातरट) नीं आपलें वेतन सर्वांनीं सारखें अगर पूर्वी ठरलेल्या कराराप्रमाणें वांटून घ्यावें असाच नियम दिला आहे.  शेतकर्‍यांनीं किंवा व्यापार्‍यांनीं काम संपल्यावर किंवा मध्यंतरीं आपल्या नोकरांनां त्यांच्या झालेल्या कामाच्या प्रमाणानें मजुरी द्यावी.  मजूर जर मध्येंच सोडून गेले व त्यांनीं बदली दिले तर त्यांस पूर्ण मजुरी द्यावीं.  जो मनुष्य आपल्या वाट्याचें काम करण्याचें टाळील त्याला पहिल्या वेळीं अभय देऊन दुसरें काम द्यावें व दुसर्‍या वेळीं टाळल्यास त्याला संघांतून काढून टाकावें इत्यादि नियम दिले आहेत.  ॠत्विजांसहि जवळ जवळ असेच नियम सांगितले आहेत.

कंपनी घटनेचा इंग्लंडांतील इतिहास - इंग्रजीतील कंपनी हा शब्द प्रथम सहभोजन करणार्‍या व्यक्तींस लावण्यास सुरुवात झाली.  परंतु सध्यां इंग्लंडमध्यें कंपनी हा शब्द विशिष्ट प्रकारच्या मोठमोठ्या नोंदलेल्या संघांनीं पूर्णपणें आपलासा करून टाकला आहे.  व्यापार, विमा, माल बनवणें इत्यादि धंदे करणार्‍या कंपन्या व सार्वजनिक हितासाठीं उदा.  रेल्वे, गोद्या, विजेचे दिवे, पाण्याचा पुरवठा इत्यादींकरतां उभारलेल्या कंपन्या असे त्यांत प्रकार आहेत.

समाईक भांडवलाच्या कंपन्या :-  समाइक भांडवलानें उभारलेल्या द्रव्यनीधीच्या बळावर कांहीं व्यापारी धाडस करण्याकरितां जेव्हां कांहीं लोक संघ निर्माण करतात, तेव्हां त्यास समाईक भांडवल कंपनी असें म्हणतात.  ज्या संघाचा उद्देश द्रव्योत्पादनाचा अथवा नफा मिळविण्याचा नसून निव्वळ विद्या, शास्त्र, धर्म, भूतद्‍या किंवा इतर सत्कार्ये यांचा प्रसार करावा असा असतो ते संघ बहुधा आपणास कंपनी असें न म्हणतां, इंग्लंडमध्यें सोसायटी, युनिव्हरसिटी, इन्स्टिट्युशन, इत्यादि नांवांनीं आणि आपल्याकडे समाज, मंडळ संस्था, विद्यापीठ इत्यादि विशिष्ट प्रकारच्या नांवांनीं संबोधितात.  पूर्वीची समाईक भांडवलाची जुनी कंपनी सनद मिळवीत असे.  कंपन्यांनां सनदा देणें हा राजांचा पुरातन काळापासून आलेला हक्क असून त्याप्रमाणें ते व्यापारवृद्धीसाठी व्यापारी कंपन्यांस सनदा देतहि असत.  उदा. इलिझाबेथ राणीनें ईस्ट इंडिया कंपनीस दिलेली सनद (इ.स. १६००).  परंतु असल्या सनदी कंपनीस पुष्कळ तोटेहि होते.  कारण ही सनद लौकर मिळत नसे.  शिवाय ततप्रीत्यर्थ फार पैसा खर्च करावा लागत असे.  कंपनीचे भागीदार कंपनीच्या कर्जाबद्दल जबाबदार नसत, व अशी कंपनी एकदा निर्माण झाली म्हणजे मग एकदा ज्या उद्देशानें ती अस्तित्वांत आली त्याच उद्देशास चिकटून राहण्याचें तिला प्रयोजन नसें.  कारण परवानगी मिळण्याच्या प्रसंगीं सांगितलेल्या विशिष्ट उद्देशापुरतेंच कंपनीस काम करूं देणें म्हणजे एक प्रकारचें पारतंत्र्यच तीवर लादणें होय.  व अशा प्रकारचें पारतंत्र्य चालूं देणें हें समाजदृष्ट्या गैरकायदा असल्यामुळें कंपनीस आपल्या विशेष उद्देशास चिकटून राहण्याची सक्ति न करतां त्यांस इतर उद्देश सिद्ध करण्यास मुभा देण्यांत आली.  म्हणून यासाठीं हे सर्व दोष नसलेली अशी व्यापारीकंपनीची नवीन पद्धति उत्पन्न होणें अगदीं अवश्य होतें, व त्याप्रमाणें 'कॉमन लॉ कंपनी' निर्माण झालीहि.  सामान्य कायद्यानुसार निर्माण झालेली ही कंपनी सांप्रतच्या व्यापारी कंपनीची मूळ जनक होय.  ती कांहीं आजच्या प्रमाणें नव्हती.  ती म्हणजे भाग दुसर्‍यास बदलतां येईल अशा अटीवर निर्माण केलेल्या भागीदारांचा प्रचंड संघ होता.  सतराव्या शतकाच्या शेवटीं व १८व्या शतकाच्या आरंभीं असल्या कंपन्यांची झपाट्यानें वाढ झाली.  परंतु त्यांवर कायद्याची फार इतराजी झाली.  याचें कारण काय तर या कंपन्यांनीं कॉरपोरेट मंडळाप्रमाणें वागण्याचें ठरविलें !  दुसर्‍यास देतां येणारे किंवा अदलाबदल करतां येण्याजोगें यांनीं भांडवल उभारिलें.  विशिष्ट कार्याकरितां दिलेल्या सनदांचा दुरुपयोग करूं लागल्या.  शिवाय कांहीं कंपन्या भयंकर स्वरूपाच्या (?) व खोडसाळ होत्या किंवा असण्याचा संशय होता, व त्यामुळें राजाच्या प्रजेचें व व्यापार उदीम आणि इतर कायदेशीर रोजगार करणारांचें फार नुकसान गैरसोय आणि अहित होणार होतें.  अशा मतलबाचे शब्द 'बबल' म्हणजे 'बुडबुडा' नांवाच्या कायद्याच्या उपोद्धातांत आले आहेत.  परंतु ह्या कारणांचा अर्थ निदान आधुनिक काळीं तरी अगदीं दुर्बोध झाला आहे.  एवढी मात्र गोष्ट खरी कीं बरेच वेळ असल्या कंपन्या बेजबाबदार, स्वार्थसाधु आणि बेताल वर्तन करणार्‍या लोकांच्या विचित्र आणि फसवेगिरीच्या कृत्यांना बळी पडल्यामुळें त्यांविरुद्ध मात्र बराच गैरसमज उत्पन्न झाला होता.  याचा परिणाम असा झाला कीं, इ.स. १७१९ च्या कायद्यानें असल्या कंपन्या त्रासदायक आणि खोडसाळ ठरविण्यांत आल्या.  परंतु हा कायदा १८२५ पर्यंत चालू होता तरी यानें असल्या प्रकारच्या समाईक भांडवलांवर उभारलेल्या कंपन्या बंद पडेनात, तेव्हां कायदेकारी मंडळास त्यांच्याकडे डोळेझांक करणें भाग पडलें, व असल्या कंपन्यांच्या नियंत्रणार्थ अन्य प्रकारचे कायदे निर्माण करणें अवश्य झालें.

असल्या कंपन्या सदैव बदलणार्‍या व्यक्तिसमूहांच्या बनल्या असल्यामुळें, इतर लोकांस आपण कोणाशीं करार करीत आहोंत आणि प्रसंगीं आपणांस कोणावर फिर्याद करतां येईल हें धड कळेना.  हा दोष घालविण्यासाठीं कायदेकानूमंडळानें असल्या कंपन्या संघ म्हणून नोंदून त्यांच्यावर फिर्याद करण्यास किंवा त्यांनां फिर्यादी आणण्यास सोईचें व्हावें म्हणून राजाला असल्या कंपन्यांस लेटर्स पेटंट देण्याचा अधिकार दिला.  इ.स. १८४४ मध्यें कंपनी नोंदण्याचें एक फार महत्त्वाचें तत्त्व अमलांत आणण्यांत आलें.  यामुळें सर्व कंपन्यांस सनद किंवा विशिष्ट कायदा मागितल्याशिवाय संघत्व म्हणजे इनकार्पोरेशनचा दाखला देण्यांत आला.  अर्थात यावेळीं कांहीं थोड्या कंपन्या वगळण्यांत आल्या होत्या.  १८६२ सालीं या नवीन तत्त्वानें आणखी एक पाऊल पुढें टाकलें.  यामुळें २० हून जास्त लोकांच्या सर्व कंपन्यांस रजिस्टर केल्याशिवाय कारभार चालूं ठेवण्यास बंदी करण्यांत आली.  हे सर्व कायदे उपयुक्त होतें.  परंतु ते पूर्वीच्या कायद्याच्या बाह्य स्वरूपांतच फरक करणारे होते.  परंतु त्यांच्या उद्देशांत फरक घडवून आणण्याच्या कामीं ते अगदीं निरुपयोगी होतें.  वास्तविक पाहिलें असतां सामायिक भांडवलाच्या कंपनीचें खरें जीवितं म्हटलें म्हणजे त्यांतील सहकारितेचें तत्व, आणि त्याची नैसर्गिक वाढ हेंच असतें. आणि ह्या तत्त्वास अमर्यादित जबाबदारीमुळें १८ व्या शतकाच्या अर्धापर्यंत पुढें सरसावण्यास वांवच मिळाली नाहीं.  सामान्य हिस्सेदारींत प्रत्येक भागीदाराची जबाबदारी जरी अमर्यादित असली, तरी सामान्यतः त्यांनां आपणावर किती जबाबदारी आहे हें सांगतां येतें. आणि त्यामुळें मर्यादित जबाबदारीची कल्पना कायद्यांत शिरली.  हि फारच महत्त्वाची सुधारणा होय.  आणि आज ''प्रायव्हेट कंपन्या'' देखील नियमित जबाबदारीच्या झाल्या आहेत.

हिंदुस्थानांतील कंपन्यांचा कायदा इंग्लंडांतील कंपन्यांच्या कायद्यावर रचला गेला आहे एवढेंच नव्हे तर त्यांत बदल होत गेले तेहि इंग्लंडमध्यें बदल झाल्यानंतर त्यांचेच अनुकरण झाल्यानें होत गेले आहेत.  १९०८ सालीं इंग्लंडांत जो कायदा झाला त्याचेंच अनुकरण १९१३ सालीं इकडे झालें.

सध्यां कंपन्यांना लागू असलेला कायदा १९१३ सालचा होय.  त्या कायद्याप्रमाणें पुढील माहिती दिली आहे :- कंपनी नोंदावयाची म्हणजे तिला सनद पाहिजे.  आज तिची सनद तिनेंच बनवावी असें ठरलें आहे.  तिची सनद म्हणजे ''मेमोरँडम ऑफ असोशिएशन'' उर्फ ''प्रतिज्ञालेख'' होय. या लेखांत कायद्याप्रमाणें खालीं लिहिलेला मजकूर असलाच पाहिजे. (१) कंपनीचें नांव व शेवटीं लिमिटेड हीं अक्षरें, (२) कंपनीच्या ऑफिसाचा प्रांत, (३) ज्या कामाकरितां कंपनी काढली असेल त्या कामाचें दिग्दर्शन, (४) कंपनीच्या भागीदाराची जोखीम नियमित आहे अशी कबुली, (५) कंपनीच्या कामाकरितां उभारण्यांत येणार्‍या भांडवलाची रक्कम व भांडवलाची रक्कम किती रुपयांच्या हिश्श्यांनीं म्हणजे शेअर्सनीं जमा करावयाची याची फोड.

वरील पांच बाबींत महत्त्वाची बाब म्हटली म्हणजे तिसरी होय.  या तिसर्‍या बाबीनें कंपनीचे हातपाय जखडले जातात.  लेखी जाहीर केलेल्या कामाशिवाय दुसर्‍या कोणत्याहि कामांत कंपनीचें भांडवल लावतां येणार नाहीं.  त्या कामाव्यतिरिक्त कंपनीनें व्यापार केला व त्यांत बूड आली तर त्याची जोखीम कंपनीच्या भागीदारांवर येत नाहीं अशी बड कंपनीचे जे कोणी चालक असतात त्यांच्यावर पडते.

कंपनीच्या अंतर्व्यवस्थेकरितां म्हणून एक लेख होत असतो.  त्यास ''आर्टिकल्स ऑफ असोसिएशन'' म्हणतात.  इंडियन कंपन्यांच्या १९१३ च्या कायद्याप्रमाणें कंपन्यांचे व्यवहार चालतात.  त्या आक्टामध्यें टेबल ए म्हणून एक पुरवणी आहे.  ज्या कंपन्यांस स्वतःचीं स्वतंत्र आर्टिकल्स नसतील त्यांस टेबल ए हीं आर्टिकल्स आहेत असें समजण्यांत येतें.

कंपनी उभारण्याचा किंवा सुरू करण्याचा नेहमींचा प्रकार असा आहे कीं, एखादा मनुष्य किंवा कांहीं मनुष्यें एखादा फायदेशीर धंदा किंवा व्यापार काढावयाचा असें आपापसांत ठरवितात.  असें ठरविल्यावर तो अगर ते मेमोरँडम व आर्टिकल्स तयार करून कांहीं त्यावर शेअर घेणार्‍यांच्या सह्या मिळवून कंपनी नोंदावयास पाठवितात.  अशा मनुष्यास अगर मंडळीस कंपनीचे प्रवर्तक ऊर्फ ''प्रमोटर'' समजतात.  या प्रमोटरनें आपला फायदा लपवून न ठेवितां स्पष्ट करावा ही गोष्ट आज कायद्यानें अवश्य केली आहे.

कंपन्यांचे अनेक प्रकार असतात.  मुख्य दोन प्रकार, एक पब्लिक अगर सार्वजनिक कंपनी दुसरा व प्रकार म्हणजे खाजगी कंपन्या.  प्रचलित कायद्याप्रमाणें खाजगी कंपनी अशा मंडळीला म्हणावें कीं जी कंपनी आपल्या भांडवलाचे भाग आपल्या मंडळींतच ठेवलेलें बाहेर जाऊ देत नाहीं व भांडवल उभारण्यास लोकांस प्रॉस्पेक्टस काढून आमंत्रण करीत नाहीं, व जी पन्नासपेक्षां जास्त भागीदार करीत नाहीं ती खाजगी लिमिटेड कंपनी होय.

भागीदारांची संख्या व कंपनीचें स्वरूप :-  कंपनींत भागीदार किती असावे यासंबंधानें नियम एवढाच कीं वीस किंवा अधिक भागीदारांस धंदा करावयाचा झाला तर त्यांनीं कंपनी नोंदवून धंदा केला पाहिजे.  नोंदल्याशिवाय धंदा करणें बेकायदेशीर आहे.  कंपनी नोंदावावयाची झाली तर ती खासगी म्हणून नोंदतां येते किंवा सार्वजनिक म्हणून नोंदतां येते.  सार्वजनिक म्हणून नोंदावयाची झाली तर कमींत कमी सात भागीदार नोंदतेवेळस असले पाहिजेत.  सातांपेक्षां कमी झाले तर तिला खासगी कंपनी बनलें पाहिजे किंवा गाशा गुंडाळला पाहिजे.  जास्तींत जास्त किती चालतील याविषयीं निर्बंध कांहींच नाहीं.  खासगी लिमिटेड म्हणून नोंदावयाची झाली तर कमींत कमी दोन भागीदार पाहिजेत व जास्तींत जास्त म्हणजे ५० पर्यंत होऊं शकतील.  यांपेक्षां जास्त करावयाचे झाले म्हणजे सार्वजनिक कंपन्यांचें नियम लागू करून घ्यावे लागतील.  सात माणसांची एखादी कंपनी न नोंदली असूं शकेल, प्रायव्हेट लिमिटेड म्हणून नोंदली असूं शकेल किंवा 'पब्लिक लिमिटेड' म्हणून नोंदली असूं शकेल.  वीस मंडळींची कंपनी खासगी लिमिटेड किंवा सार्वजनिक लिमिटेडहि असेल.  एकावन भागीदारांची कंपनी सार्वजनिक लिमिटेडच असली पाहिजे.

कंपनी रजिस्टर करतेवेळस कंपनीचा मेमोरँडम, आर्टिकल्स असल्यास आर्टिकल्स, आणि प्रॉस्पेक्टस आणि प्रॉस्पेक्टस काढला नसेल तर प्रास्पेक्टसऐवजीं विशिष्ट माहिती भरणारे कोष्टक व डायरेक्टराची 'आम्ही डायरेक्टर होण्यास तयार आहोंत' अशी प्रतिज्ञापत्रकें हें साहित्य कंपनीच्या रजिस्ट्रारकडे पाठवावें लागतें.  रजिस्टर करावयाला स्टांप लागतो व शिवाय रजिस्ट्रेशनची फी भांडवलानुसार भरावी लागते.  प्रत्येक प्रांतास एक एक रजिस्ट्रार असतो.  तो इतकें साहित्य घेऊन तपासून कंपनी रजिस्टर करतो व त्याचें एक साक्षीपत्रक आपल्या शिक्यानिशी देतो.  प्रॉस्पेक्टस तयार करणें हें मोठ्या काळजी पूर्वक केलें पाहिजे आणि त्यांत कायद्यानें अवश्य असलेल्या सर्व बाबी अंतर्भूत झाल्या आहेत कीं नाहीं हें पाहिलें पाहिजे.

कंपनी चालविणें - कंपनी चालविण्याची जबाबदारी कायद्यानें डायरेक्टरांकडे सोंपविली आहे.  डायरेक्टरचे अधिकार म्हणजे ट्रस्टीचे अधिकार केवळ नव्हेत.  डायरेक्टरांचें काम कंपनीचा मुख्य हेतु जो पैसा मिळविणें तो साध्य करावयाचा असतो.  डायरेक्टरांची जबाबदारी कांहीं तरी जास्त असावी म्हणून प्रयत्‍न चालले आहेत; पण त्यास जितकें म्हणावें तितकें यश आलें नाहीं.  प्रॉस्पेक्टसमध्यें जर एखादें लबाडीचें विधान असेल तर त्याबद्दल डायरेक्टर जबाबदार आहेत.

१९१३ च्या कायद्यामध्यें ''मिनिमम सबस्क्रिप्शन'' चें तत्त्व घालण्यांत आलें.  ''मिनिमम सबस्क्रिप्शन'' म्हणजे कमींत कमी जितक्या किमतीचे शेअर खपले असतां कंपनींचें काम कसुरू करावयाचें ती रक्कम.  ही रक्कम कंपनीच्या प्रवर्तकांस अगोदर ठरवावी लागते.  आणि तितक्या रकमेचे शेअर खपल्याशिवाय कंपनीचें काम चालूं करतां येत नाहीं.  समजा कंपनीचें संकल्पित भांडवल एक लाख असलें तरी एक लाखाचे शेअर एकदम खपतील असें नाहीं.  व अगदींच थोडक्या रकमेचे शेअर खपले असतां कंपनीनें काम सुरू करणेंहि धोक्याचेंच होईल.  यासाठीं प्रवर्तकांनां अमुक रक्कम जमली म्हणजे कंपनीच्या कामास सुरुवात करूं असें ठरवावें लागतें; आणि तें आर्टिकल्समध्यें घालून प्रॉस्पेक्टसमध्येंहि जाहीर करावें लागतें.  ही कमींत कमी हमी उर्फ मिनिमम सबस्क्रिप्शन १२० दिवसांत भरली नाहीं म्हणजे तितक्या रकमेचे शेअर खपले नाहींत तर कंपनी आपोआप मोडते; व जमलेली रक्कम लोकांस परत करावी लागते.  यासाठीं त्या रकमेपुरते शेअर खपविण्याची धडपड त्या १२० दिवसांत असते.  या १२० दिवसांत मिनिमम सबस्क्रिप्शन भरली म्हणजे शेअर देतां येतात व पुढचे कॉल करतां येतात.  शेअरसाठीं मागणी करणारा या काळापर्यंत फक्त अर्जदार व अर्जाबरोबर द्यावी लागणारी रक्कम भरणारा असतो.  अर्जाबरोबर भरावी लागणारी रक्कम शेकडा ५ पेक्षां कमी नसते.  म्हणजे कल्पना करा कीं एक लाखाची कंपनी आहे व तिची मिनिमम सबस्क्रिप्शन १० हजार आहे.  शेअर शंभर शंभर रुपयांचे आहेत व अर्जाबरोबर भरावयाची रक्कम शेकडा ५ म्हणजे ५ रुपये आहे.  म्हणजे ५०० रुपये जमा झाले म्हणजे शेअर देण्याला (अलॉटमेंटला) सुरुवात होईल.  अलॉटमेंट केलें व अलॉटमेंटनंतरचा हप्ता जो लोकांकडून मागण्यांत येतो तो डायरेक्टरांनीं भरला म्हणजे त्या प्रकारची प्रतिज्ञा करून तो प्रतिज्ञालेख कंपन्यांच्या रजिस्टरांकडे नोंदावयाचा असतो.  व तो नोंदल्यानंतर रजिस्ट्रार कंपनीच्या कार्यारंभास परवाना देतो. परवाना दिल्यानंतर सहा महिन्यांच्या आंत एक सर्व शेअरहोल्डरांची सभा भरवावी लागतें; आणि त्या सभेच्या अगोदर कांहीं दिवस एका ठराविक मसुद्याप्रमाणें रिपोर्ट लिहून तो शेअरहोल्डराकडे व रजिस्टराकडे पाठवावा लागतो.  या रिपोर्टास ''स्टॅच्युटरी रिपोर्ट'' म्हणतात व त्यानंतर भरणार्‍या सभेस स्टॅच्युटरी सभा म्हणतात.  ही स्टॅच्युटरी सभा झाल्यानंतर एका वर्षानें कंपनीची ऑर्डिनरी जनरल मीटींग म्हणजे 'सामान्य साधारण सभा' भरते.  स्टॅच्युटरी मीटिंगचा उद्देश असा कीं कंपनीचें सर्व इतिवृत्त शेअरहोल्डरांच्या ताब्यांत द्यावयाचें.  सर्वसामान्य शेअरहोल्डरांचे अधिकार जे आहेत ते डायरेक्टर निवडणें, दरसालचा जमाखर्चाचा आढावा पास करणें इतकेच असतात.  डायरेक्टर आपल्या बैठकींत कंपनीचें सर्व कामकाज पाहतात व पहावें अशी त्यांची अपेक्षा असते व त्याप्रमाणें त्यांस अधिकारहि दिलेले असतात.  परंतु सामान्यतः बहुतेक काम डायरेक्टरांतला कोणीतरी एक मनुष्य पाहतो आणि त्यास मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर, किंवा सेक्रेटरी असें पद देण्यांत येतें.  कधींकधीं मॅनेजर व सेक्रेटरी हे निराळे असतात.  अशा वेळेस सेक्रेटरीचें काम मुख्यतः हें कीं कंपनीचे सर्व व्यवहार कायद्याप्रमाणें चालले आहेत कीं नाहीं हें पाहणें, डायरेक्टरांच्या सभांचे अहवाल लिहून ठेवणें इत्यादि असतें.

कंपनीचे नियम - कंपनीचे जे सर्वांत पक्के नियम म्हणजे मेमोरँडममधील कलमें होत, त्यांपेक्षां कमी योग्यतेचे नियम म्हणजे आर्टिकल्समधील नियम.  हे दोन्ही प्रकारचे नियम बदलावयाचे झाले म्हणजे ते स्पेशल रेझोल्यूशननें बदलतां येतात.  फक्त भांडवल वाढविण्यासंबंधीचा जो ठराव असतो तो बदलण्यास स्पेशल रेझोल्यूशन लागत नसून एक्स्ट्रा ऑर्डिनरी रेझोल्यूशन चालतो.  एक्स्ट्रा ऑडिनरी रेझोल्युशन म्हणजे तो एक्ट्राआर्डिनरी म्हणून आमंत्रण पत्रिकेंत उल्लेख करून सभेपुढें आणणें व तीनचतुर्थांशापेक्षां अधिक बहुमतानें तो पास करणें.  स्पेशल रेझोल्युशन म्हणजे तो स्पेशल रेझोल्युशन म्हणून आमंत्रणपत्रिकेंत लिहिणें व प्रथमतः एका सभेंत तीनचतुर्थांश बहुमतानें पास करून घेतल्यानंतर दुस-या सभेंत तो बहुमतानें पास करून घेणें.  स्पेशल रेझोल्युशननें आर्टिकलें बदलतात.  परंतु मेमोरँडममधील कलमें बदलण्यास स्पेशल रेझोल्युशन पुरा होत नाहीं.  त्याला कोर्टाची परवानगी लागते.  म्हणजे कंपनीचें नांव, हेतु व मुख्य ऑफीसचा प्रांत हे बदलावयाचे झाल्यास त्यास ही सर्व यातयात पाहिजे.  वर जें बहुमत सांगितलें तें केवळ जमलेल्या सभासदांपैकीं बहुमत नाहीं.  तर शेअरांचें बहुमत लागतें.  एखाद्या मनुष्यानें शंभर शेअर घेतले असले व दुसरी पंचवीस मंडळीं एक एक शेअर घेतलेली असलीं तर तो शंभर शेअर घेणारा एकटा वाटेल तें पास करील किंवा नापास करील.  या वेळेस जमलेल्या मंडळींच्या मताशिवाय प्रॉक्झीनीं मिळविलेलीं मतें सुद्धां मोजावीं लागतात.  जो शेअरहोल्डर सभेंत स्वतः हजर राहूं शकत नाहीं तो दुसर्‍या शेअरहोल्डरास आपल्याकरितां मत देण्यासाठीं प्रॉक्झीपत्रक भरून प्रतिनिधित्व देतो.

काम करण्याची शिस्त - कंपनीस कोठें तरी एखादे रजिस्टर केलेलें ऑफिस असावें आणि त्याचा पत्ता रजिस्टरापाशीं नोंदावा लागतो.  आणि ऑफिस बदललें तर बदलेली जागहि पुन: नोंदावी लागते.  व कंपनी रजिस्टर झाल्यापासून नांवाची पाटी लावावी लागतें.  कंपनीचें नांव इंग्रजी व प्रांतिक भाषेंत असें दुहेरी लिहावें लागतें.  मुंबई, मद्रास व कलकत्ता येथें मात्र देशी भाषेंत नांव नसलें तरी चालेल.  कंपनीचें नांव तिच्या सर्व मुख्य जाहीरपत्रकांवर इंग्रजींत असलें पाहिजे.  सर्व बिलांवर, पत्रांच्या कागदांवर, जाहिरातीवर आणि सर्व प्रकारच्या ऑफिशियल प्रसिद्धीपत्रकांवर, हुंड्यावर, प्रॉमिसरी नोटांवर हें नांव इंग्रजी अक्षरांत असलें पाहिजे.  ज्या वेळेस कंपनी आपलें संकल्पित भांडवल जाहीर करील त्यावेळेस प्रत्यक्ष जमा झालेले भांडवलहि जाहीर केलें पाहिजे.  कंपनीनें दरसाल एक बॅलन्सशीट म्हणजे : (अ) कंपनीचें भांडवल व कर्ज यांचा तक्ता, (आ) मत्तेचा तक्ता, (इ) शिलकेचा तपशील व (ई) नफ्यातोट्याचा अहवाल प्रसिद्ध केला पाहिजे व तो शेअरहोल्डरांकडे पाठविला पाहिजे व तो पाठविण्यापूर्वी सरकारी सर्टिफिकिटाच्या ऑडिटरकडून तपासून घेतला पाहिजे, बॅलन्स शीट व ऑडिटरचा रिपोर्ट हे रजिस्टरकडेहि पाठविले पाहिजेत.  कंपनीनें ज्या लिहिण्याच्या वह्या ठेविल्या पाहिजेत.  त्यांतील मुख्य येणेंप्रमाणें :- हिशोबाची वहीं, हींत कंपनीचा सर्व व्यवहार आला पाहिजे.  शेअरहोल्डरांचें रजिस्टर डायरेक्टरांच्या बैठकीच्या अहवालाचें पुस्तक, डायरेक्टरांच्या हजीरीचें पुस्तक कंपनीनें रजिस्ट्रारकडे पाठविण्याचे तक्ते इ. रजिस्ट्रारकडे पाठविण्याचे कागद मुख्यतः येणेंप्रमाणें :- (१) डायरेक्टर, मॅनेजर, व सेक्रेटरी इत्यादिकांची यादी, (२) शेअरहोल्डराकडे पाठविलेल्या बॅलन्सशीट व ऑडिटरचा अहवाल, (३) डायरेक्टरांत फरक झाला असेल तर त्याचा निर्देश, (४) शेअर अलॉट केले (म्हणजे लोकांनां दिले) म्हणजे त्या शेअर होल्डरांचीं नांवें; (५) आर्टिकल्समध्यें जर फरक केला तर तो फरक, (६) कंपनीच्या वस्तुस्थितीसंबंधाचा दरसालचा गोषवारा, (७) कंपनीची मालमत्ता जर गहाण ठेविली गेली तर गहाणपत्रकाची नक्कल इत्यादि.  कंपनीनें शेअर होल्डरांचें एक रजिस्टर ठेविलें पाहिजे; व तें वाटेल त्या शेअरहोल्डराच्या अवलोकनासाठीं खुलें पाहिजे.

कंपनीचा व्यवहार घोंटाळ्याचा होऊं लागला तर शेअर होल्डरांनां इन्स्पेक्टर नेमण्यासाठी योग्य तारण देऊन सरकारी इन्स्पेक्टर चौकशीसाठी मागण्याचा अधिकार आहे.  त्याप्रमाणेंच कंपनीच्या रजिस्ट्रारला कंपनीनें केलेलें एखादे स्पष्टीकरण अपुरें वाटल्यास तें मागण्याचा देखील अधिकार आहे.

कंपनीचे अधिकार - कंपनी कशाकरितां निघते, हें सर्व मेमोरँडममध्यें लिहिलेलेंच असतें.  तथापि कंपनी ही व्यक्ति या नात्यानेंहि कंपनीस कांहीं अधिकार असतातच.  ज्याप्रमाणें एखाद्या व्यक्तीस कंपनीचा शेअरहोल्डर होतां येतें त्याप्रमाणें कंपनीसहि दुसर्‍या कंपनीचे शेअरहोल्डर होतां येतें आणि यामुळें अनेक कंपन्या एका सूत्राखालीं आणून एक मोठा महासंघ बनविण्यास संधि उत्पन्न होते. व्यक्तीस असे कोणते अधिकार आहेत कीं, जे कंपनीस नाहींत ? अशा संबंधानें इंग्लंडांत एकदां वादविवाद सुरू झाला असतां कंपनीस लग्न करतां येत नाहीं असें एका ब्रिटिश कायदेपंडितानें उत्तर दिलें.  सामान्यतः असें मानण्यांत येतें कीं, कंपनीस व्यक्तीचे बहुतेक सर्व अधिकार आहेत एवढेंच नव्हे तर असे अनेक हक्क आहेत कीं, जे व्यक्तीस नाहींत पण कंपनीस आहेत.  उदाहरणार्थ एखाद्यानें बेकायदेशीर गोष्टी केल्या तर त्यास तुरुंगांत जावें लागतें.  पण कंपनीनें जर कांहीं बेकायदेशीर गोष्टी केल्या तर कंपनीला फार तर दंड होईल किंवा कंपनीच्या ज्या अधिकार्‍यांवर तो दोष लावतां येईल त्याला शिक्षा करण्यांत येईल.

कंपन्यांचे प्रकार - कंपनी खाजगी लिमिटेड असो किंवा सार्वजनिक लिमिटेड असो त्यांतहि भांडवलाच्या रोखीवर किंवा जबाबदारीवर अवलंबून असणार्‍या असेहि प्रकार करतां येतील.  आपण ''कंपनी लिमिटेड बाय शेअर्स'' आणि ''कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी'' असे दोन प्रकार विचारांत घेऊं.  प्रत्येक शेअरबद्दल जेव्हां कांहीं तरी ठराविक रक्कम द्यावी लागते ती शेअरवाली कंपनी होय.  परंतु प्रत्येक शेअरहोल्डरनें नियमित रक्कम न देतां नुकसानी आल्यास नियमित रकमेपुरतें अभिवचन मात्र द्यावयाचें असतें अशाहि कंपन्या असतात.  जेव्हां भांडवल खर्च करण्यास एखादी व्यक्ती तयार असेल परंतु नफानुकसानीची जबाबदारी घ्यावयास तयार नसेल अशा वेळेस नियमित तारणाची उर्फ ''कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी'' अशी कंपनी उपयोगी पडते.  उदाहरणार्थ एखादा क्लब काढावयाचा आहे.  क्लबच्या स्थापनेकरितां लागणारें भांडवल खर्च करण्यास एखादा हॉटेलवाला तयार आहे.  परंतु क्लब स्थापन केल्यामुळें होणारी नफानुकसानी घ्यावयास तो तयार नाहीं.  त्यावेळेस पंचवीस तीस मंडळींनीं तयार होऊन नफानुकसानीची जबाबदारी आम्ही घेऊं असें तारण दिलें तर ती तारण देणारी मंडळी कंपनीच्या कायद्याखाली नोंदतां येतें.  तसेंच धंद्यास कर्ज पाहिजे आहे, ब्यांका जर दुसरें कोणी तारण राहील तर आम्ही कर्ज देऊं असें म्हणत आहेत.  तारण म्हणून उभी राहणारी मंडळी मालमत्तावाली आहे पण रोकडवाली नाहीं.  तर ही तारणमंडळी कंपनी म्हणून नोंदून ती बँकेच्या रिणकोस तारण राहूं शकेल.  म्हणजे ही बिनभांडवली कंपनी झाली.  असल्या कंपन्या अमेरिकेंतल्या कांहीं शहरांत आहेत.  हीं शहरें आपल्या क्षेत्रांत नवीन नवीन धंदे व उद्योग यांस असल्या कंपन्या काढून उत्तेजन देतात.  किंवा जेथें सहकारी पद्धतीनें विमा उतरावयाचा असतो तेव्हां असल्या प्रकारच्या कंपन्यांचें अस्तित्व संभवतें.  दहा गलबतवाले एकत्र होतात आणि ते आपल्या गलबतांचा विमा उतरण्याकरितां असली एखादी कंपनी काढतात.  नुकसान झालें तर तें ठरलेल्या हिश्श्यांप्रमाणें वाटून द्यावयाचें.  तसेंच ज्या संस्था परीक्षा घेण्याचा व पदव्या देण्याचा धंदा करतात व या धंद्याच्या नियमित व्यापामुळें त्यांना फारशा भांडवलाचीहि जरूर नाहीं त्यांनां स्वतःला संस्था स्वरूप मिळविण्यासाठीं ''कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी'' हा प्रकार अवलंबावा लागतो.  समजा दहा हिशोबनीस एकत्र गोळा झाले व त्यांना नवीन हिशोबनीस होऊं पहाणाराची परीक्षा घेऊन त्यांस शिफारसपत्र द्यावयाचें असलें तर तें स्वतः संस्थास्वरूपानें संघटित होण्यासाठीं 'कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी' अशीच कंपनी स्थापन करतात.  कारण त्यांनां त्यावेळीं खर्चाचा  प्रसंग कांहींच नसतो फक्त संस्थास्वरूप पाहिजे असतें असो.

कंपनी व रोकड बाजार - कंपनीचा उद्देश पैसे मिळविण्याचा असतो व भांडवलवाल्याचा उद्देशहि पैशावर नफा मिळविण्याचा असतो.  त्यामुळें असा एक वर्ग समाजांत आहे कीं जो आपली रक्कम तयार ठेवतो, कंपनीला मुनाफा चांगला सुटेल तर त्या कंपनीचे शेअर घेतो, मुनाफा वसूल करून शेअर विकून टाकतो.  यामुळें पुष्कळ कंपन्यांचे शेअर शेअरबाजारांत विक्रीस असतात सर्वांचेच असतात असें नाहीं.   (शेअर बाजार पाहा).  तथापि, शेअरबाजारांत कंपनीचे शेअर असल्यामुळें दुसरे अनेक धंदे करणारांना आपल्या शिलका कंपन्यांच्या शेअरमध्यें गुंतवावयास सांपडतात.  व ज्या कंपनीचे हिस्से शेअरबाजारांत विकले जाऊं शकतील तिचें भांडवल ताबडतोब जमतें.  शेअरबाजारांत नफ्याच्या आशेवर शेअरच्या किंमतींत तेजीमंदी होते.  आणि त्यांमुळें कित्येक सट्टेबाज लोकहि कंपन्यांच्या शेअर खरेदीविक्रीचा व्यवहार करतात.  आणि पुष्कळदां बाहेरच्या सट्टेबाजीकडे लक्ष देऊन कंपनीच्या अधिकार्‍यांनां किंवा विशेषतः ''आंतल्या'' मंडळीस कांहीं विशेष खटपटी करतां येतात.

कंपन्यांच्या व्यवहारांतील लटपटी - प्रत्येक कंपनींत कांहीं गर्भगृहांतील मंडळी असतात.  त्यांनां आंतील माहिती असते.  निदान असते असा ते बहाणा बाळगतात.  असा बहाणा केल्यानें त्यांच्या बोलण्यास शेअरबाजारांत किंमत येते.  त्यांनां कंपनी चांगली चालली आहे कीं वाईट चालली आहे याच्या : ज्ञानासंबंधानें अधिकारी समजतात.  यांचा मुख्य धंदा असा असतो कीं, कंपनीचा मुनाफा जाहीर होण्यापूर्वी कंपनीस मुनाफा कितपत झाला आहे याची माहिती मिळविणें, आणि कंपनीस जर बराच मुनाफा सुटणार असेल तर शेअरचा भाव वाढेल अशा बुद्धीनें शेअर खरेदी करणें किंवा मुनाफा कमी सुटणार असला तर शेअर असतील ते विकून टाकणें.  कां कीं पुढें भाव उतरले आणि त्यामुळें शेअरची किंमत कमी होईल.  अर्थात, त्यांच्या हालचालीकडे इतर लोकांची नजर असणारच.  आपल्या हालचालीवर नजर आहे तर आपण लोकांस चकवावें कसें याच्या युक्त्या हे लोक (शेअर बाजारांतील व्यापारी) योजून ठेवतातच.  यांतील सामान्य युक्ति म्हटली म्हणजे आपणांस शेअर खरेदी करावयाचे असतील त्यावेळेस शेअर कमी किमतीला विकावयास काढणें आणि शेअरचा भाव उतरविणें आणि शेअरचा भाव उतरत आहे असें पाहून लोकांनीं शेअर विकावयास काढले म्हणजे दुसर्‍या दलालांमार्फत तेच शेअर विकत घेऊन ठेवणें.  शेअरच्या चढउतारीचा फायदा पुष्कळ कंपन्यांच्या गर्भगृहांतील लोक घेतात तो येणेंप्रमाणें :- ज्यावेळेस कंपनी खरोखर चांगल्या स्थितींत असेल त्यावेळेस हिशेबामध्यें थोडी बहुत हुशारी करून कंपनीस फारच थोडका फायदा झाला असें दाखवावयाचें, शेअरचा भाव कमी करावयाचा आणि लोकांनीं शेअर विकले आणि आपण विकत घेतले म्हणजे दुसर्‍या वर्षी पुष्कळ मुनाफा दाखवून बर्‍याचशा वाढलेल्या किमतीस शेअर विकून टाकावयाचे.  हिंदुस्थानांत बर्‍याच प्रसिद्ध प्रागतिक आणि देशाभिमानी म्हणविणार्‍या व्यापारी कंपन्यांनीं अशी हुशारी दाखविली आहे.

कंपन्यांच्या व्यवहारांत लटपटी पुष्कळ होतात.  यावरून कंपनी हा प्रकार अनिष्ट आहे असें समजूं नये.

भांडवलाचें संधीकरण ही एक महत्वाची गोष्ट असून मोठालीं कार्ये त्यावांचून होणार नाहींत.  याशिवाय हीहि गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं, जेव्हां एखादा धंदा प्रायोगिक स्वरूपांत करावयाचा असतो तेव्हां त्या धंद्यापासून होणारें नुकसान व्यक्तीस टाळावयाचें असतें.  पण नुकसान व्हावयाचें हेंहि बहुतांशीं ठरलेलेंच असतें.  तेव्हां तें नुकसान अनेकांवर वांटून देण्यास हातीं घेतलेल्या धंद्यास कंपनीचें स्वरूप देणें अत्यंत योग्य असतें.  आपल्याकडे नवीन नवीन असे अनेक धंदे अद्याप व्हावयाचेच आहेत व प्रथमतः ते धंदे करणार्‍या ज्या कंपन्या निघतील त्यांपैकीं कांहीं अर्थातच नुकसान पावतील, आणि मोडतील हेंहि खरें आहे.  त्यामुळें ज्यांनीं काढलेली कंपनी बुडाली त्या लोकांनीं लबाडीं केली असें धरुन चालणें योग्य होणार नाहीं.  मोठ्या भांडवलाचें एकीकरण, प्रायोगिक नुकसानीची वांटणी, यांखेरीज कंपन्यांपासून होणारे फायदे अनेक आहेत.  मोठ्या मालमत्तेची वांटणी करतेवेळी स्थावर किंवा जंगम वस्तुरूप जिनगीची वाटणी करण्यापेक्षां शेअरची वांटणी करणें सोपें होतें.  शिवाय जे लोक आपली रक्कम शेअरमध्यें गुंतवितात, त्यांस शेअर तारण ठेवून वेळेवर रक्कम उभी करतां येते आणि जिनगी गहाण ठेवून रक्कम करण्यापेक्षां, शेअरच्या तारणावर रक्कम उभी करण्यास यातयात कमी पडते म्हणजे एकच रक्कम दोनदां वापरणें अधिक सुलभ होतें.

यापेक्षां सर्वांत मोठा फायदा देशाला होतो तो हा कीं, जेव्हां परकीय संघ हिंदुस्थानांत धंदा करीत आहे व त्या संघाच्या पाठीमागें मोठ्या रकमांचा जोर आहे, तेव्हां त्यांजबरोबर टक्कर देण्यास आपल्या इकडे महासंघ उभारिले पाहिजेत.  कंपन्यांचें भांडवल मोठें करणें, कंपन्यांनीं संयुक्त होणें, किंवा एखादी 'होल्डिंग कॉर्पोरेशन' काढून महासंघ बनविणें इत्यादि उपायांनीं मोठ्या भांडवलाचें एकीकरण होऊं शकतें आणि हें आपणांस अवश्य आहे.

बाहेरदेशांचें भांडवल आपल्याकडे ओढण्यास कंपनीचें साधन बरेंच उपयुक्त आहे.  पुण्यांतल्या स्थावर इस्टेटीवर लंडनहून रक्कम आणतां येणार नाहीं.  परंतु पुण्यांतील स्थावर इस्टेटीची मालकी बाळगणारी जी कंपनी असेल त्या कंपनीला आपले कांहीं शेअर्स परदेशांत खपविणें अशक्य नाहीं.  ज्यावेळेस आपला व्यापार वाढेल त्यावेळेस या प्रकारची रक्कम उभारण्याची पद्धति बरीच अनुसरली जाईल असें वाटतें; असों.

(वाङ्‌मय - कंपनी या विषयावर कायद्याचें वाङ्‌मय आहे.  त्याप्रमाणें भांडवल या दृष्टीनेंहि वाङ्‌मय आहे.  कायद्याच्या वाङ्‌मयामध्यें १९१३ चा कायदा व त्यास झालेल्या पुरवण्या व त्यांवर झालेले टीकाग्रंथ हे पाहावेत.  हिंदुस्थानांतील कंपन्या यांवर पद्धतशील ग्रंथ तयार नाहीं.  तथापि प्रत्येक प्रांत व अनेक संस्थानें यांत नोंदल्या गेलेल्या कंपन्यांचे अहवाल प्रसिद्ध होत आहेत.  व्यापार व धंदे यांचा जो एक मतसंघ प्रत्येक प्रांतांत आहे, त्या प्रत्येक प्रांतांत कंपन्यांनां निवडणुकीचे विशिष्ट अधिकार दिले आहेत.  शेअरबाजारांत कोणत्या कंपन्यांचें शेअर येतात वगैरे माहिती प्रत्येक शेअरबाजाराकडून मिळण्याजोगी आहे.  शेअरबाजारांत येणार्‍या कंपन्यांकडे म्हणजे भांडवलबाजारांत उभ्या राहिलेल्या कंपन्यांकडे वर्तमानपत्रांचें लक्ष अधिक असतें.  व तशा कंपन्यांचे अहवाल वर्तमानपत्रांतून वारंवार प्रसिद्ध होतात.  यासंबंधाचें मुख्य पत्र म्हणजे कलकत्त्याचें 'क्यापिटल' होय.

यूरोपांत व विशेषेंकरून अमेरिकेंत कंपन्यांचा विकास अधिक झाला आहे.  आणि भांडवलाचें एकीकरण केल्यानें काय परिणाम होतात व ते लोकांवर अनन्यगतिकत्व कसें लादतात याबद्दल विवेचन त्या त्या देशाच्या अर्थशास्त्रीय वाङ्‌मयांत सांपडेल.  ट्रस्ट उर्फ ''महासंघ'' यांचें ''ट्रस्ट'' सदराखाली त्या संबंधीचें तात्विक विचेन आम्ही देऊं.  त्यांचें स्थूलस्वरूप पहिल्या भागाच्या 'इतिकर्तव्यता' प्रकरणांत येऊन गेलेंच आहे.  कोआपरेटिव्ह सोसायट्या व ब्यांका या निराळ्या कायद्याखालीं रजिस्टर केल्या जातात.  'कोआपरेटिव्ह ब्यांक' : ''प्रवर्तक'' ''डायरेक्टर'' ''दिवाळें'' ''ट्रस्ट कंपनी'' 'व्यवस्थापक' इत्यादि सदरें पाहा).

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .