प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कनोजचें राज्य, मध्यदेश - आजच्या संयुक्त प्रांताला प्राचीनकाळीं मध्यदेश म्हणत.  हा प्रदेश म्हणजे गंगायमुनांचें खोरें.  हें प्राचीन भारतीय आर्य सुधारणेचें केन्द्र होतें.  प्राचीन भारतीयांचा सांस्कृतिक विकास येथेंच झाला आणि येथूनच त्यांनीं भरतखंडाच्या उत्तरभागावर आपलें राज्य स्थापिलें.  येथेंच पूर्वी यादवांचें राज्य होतें; पुढें त्यांनां जरासंधानें हांकून दिलें.  महाभारतांत (आ. १९१) कान्यकुब्जाचा उल्लेख येतो.  पतंजलीहि त्यास उल्लेखतो व कनोज असें स्पष्ट नांव फा-हिआन याच्या ग्रंथांत प्रथम आढळतें.  हा येथें (इ.स. ४०५) आला, तेव्हा तेथें २ हीनयानी १ मठ व १ स्तूप होता.  म्हणजे यावेळीं कनोज साधारण गांव होतें.

ह्युएनत्संग यानेंहि याला मध्यदेशच म्हटलें आहे.  वराहमिहिरहि तेंच नांव देतो.  या प्रदेशाचें हवामान निरोगी असे.  हा प्रांत फार सुपीक असल्यानें या लहान प्रदेशांत पूर्वी पासून अनेक राज्यें स्थापन होत होतीं.  याच प्रांतांत कनोज हें शहर आहे.

मौखरी :-  गुप्तांचें साम्राज्य चालू असतां कनोज येथें पहिलें राज्य मौखरीं या वंशानें स्थापन केलें.  गुप्तांचें साम्राज्य दुसर्‍या कुमारगुप्ताच्या मृत्यूमुळें नाहींसें झाल्यानंतर हे मौखरी प्रबळ झाले (इ.स. ५३८).  मौखरीवंश कनोजेस होता हें हर्ष चरित्रावरून समजतें.  यांची वंशावळ, अशीरगडमुद्रा व अफसड शिलालेख आणि देवबर्नाक लेख यांच्यावरून दिसते ती अशी :-

महाराज हरिवर्मा

महाराज आदित्यवर्मा - हर्षगुप्ता

महाराज ईश्वरवर्मा - उपगुप्ता

महाराजाधिराज ईशानवर्मा

परममाहश्वर महाराजाधिराज शर्ववर्मा (इ.स. ५५३)

परमेश्वर सुस्थितवर्मा

परमेश्वर अवन्तिवर्मा (इ.स. ५६९)
गृहवर्मा (इ.स. ६०६)

यांपैकी ईशान, शर्व व सुस्थित यांनीं कुमार, दामोदर व महासेन या गुप्‍त राजांशीं लढाचा दिल्या होत्या.  आदित्याची स्त्री हर्षगुप्ता ही त्याचा समकालीन हर्षगुप्‍त याची बहीण असावी.  शेवटचा गृहवर्मा हा प्रख्यात हर्षवर्धन सम्राट याचा समकालीन होता.  ईशानच्या कारकीर्दीत हें घराणें प्रबळ झालें.  यानें व शर्वानें हूणांशींहि टक्कर देऊन आपलें राज्य बरेंच वाढविलें.  पूर्वेकडे लौहित्य (ब्रह्मपुत्रा) नदी पर्यंत व दक्षिणेस अशीरगडा (बर्‍हाणपुरा) पर्यंत तें होतें.  शेवटचा गृहवर्मा याच्यावर देवगुप्‍त मालवराजानें स्वारी केली या सुमारास मौखरी दुर्बळ झाले होते.  मौखरी वंशाचीं बरींचशीं नाणीं सांपडलीं आहेत.  त्यांवरून त्यांचा काल वर दिला आहे.

हर्षाचें पालकत्व :-  ठाणेश्वर येथें सातव्या शतकाच्या सुरवातीस प्रभाकरवर्धन हा राजा होता हा त्यावेळीं उत्तर हिंदुस्थानांतील राजमंडळांत प्रमुख होता.  यानें हूणराज, माल व राज, सिंधुराज व गुर्जरराज यांचा पराभव केला होता.  यानें आपली मुलगी राज्यश्री हीं गृहवर्मा मौखरी याला दिली.  प्रभाकरवर्धनास महाराजाधिराज परमभट्टारक अशी पदवी होती.  हुणांनीं अवचित त्याच्यावर स्वारी केली, तेव्हां त्यानें आपला वडील पुत्र राज्यवर्धन याला त्यांचेवर पाठविलें.  त्यानें त्यांचा पराभव केला.  इतक्यांत इकडे एका एकीं प्रभाकर मेला (स. ६०५).  याच सुमारास गुप्‍त व मौखरी यांची लढाई सुरू झाली.  माळव्यांतील गुप्तांचें व कनोजच्या मौखरींचें पूर्वापार वैर होतें.  या लढाईंत गृहवर्मा (राज्यवर्धनाचा मेहुणा) पडला व राज्यश्रीला मालवराजानें कैदेंत ठेवलिं आणि कनोज घेऊन तो ठाणेश्वरावर आला.  मौखरीच्याबद्दल बंगालच्या गुप्तांनांहि मत्सर वाटत असल्यानें (कारण मौखरींनीं त्यांना मांडलिक बनविलें होतें.)  बंगालचा शशांकगुप्‍त यानें माळवी देवगुप्तास साहाय्य केलें होतें.  राज्यवर्धनानें या दोन्हीहि गुप्तांचा पराभव केला, त्यावेळीं मालवराजानें राज्यश्रीस सोडून दिलें.  इकडे शशांकानें आपली मुलगी देण्याच्या निमित्तानें राज्यवर्धनाला बोलावून त्याचा विश्वासघातानें खून केला.  यानंतर राज्यवर्धनाचा भाऊ हर्ष हा ठाणेश्वरास गादींवर बसला (स. ६०६).  नंतर तो लगेच दिग्विजयास निघाला व प्रथम कनोजेसच गेला.  त्यावेळीं त्याची बहीण राज्यश्री तेथें नसून शेजारच्या एका अरण्यांत लपून बसली होती.  ती पुढें अग्निकाष्ठें भक्षण करीत असतां बहिणभावांची भेट झाली.  दोघे कनोजेस आले.  राज्याची व्यवस्था कशी करावी याबद्दल वादविवाद होऊन अखेर शहराबाहेरील बोधिसत्व अवलोकितेश्वराच्या कौलावर निकाल ठरला गेला.  निकाला असा झाला कीं, राज्यश्रीच्या नांवानें हर्षानें कारभार चालवावा आणि स्वतः सिंहासनारूढ न होतां व कनोजाधिपति असें उपपद न लावितां राजपुत्र शिलादित्य हें नांव घ्यावें.  याप्रमाणें हर्ष हा यापुढें ठाणेश्वर सोडून कनोज येथेंच अखेरपर्यंत राहिला व तेथूनच दोन्ही राज्यांचा कारभार पाडूं लागला.  येथून त्यानें उत्तर हिंदुस्थानांत आपलें साम्राज्य सर्वत्र पसरविलें (हर्ष पाहा.)  सारांश, यावेळीं कनोज ही हिंदुस्थानची राजधानी होती.  पाटलीपुत्र यावेळीं मागें पडलें.  कनोजचें हें राजकीय महत्त्व हिंदुस्थानच्या ऐतिहासिक मध्ययुगीन कालापर्यंत (स. १२००) टिकून राहिलें.  पृथ्वीराजानें जयचंदाचा पराभव केल्यावर कनोज नामशेष होऊन दिल्ली पुढें आली.  हर्षानें कनोजेस बुद्धाच्या उत्सवाकरितां (स. ६४३) एक फार मोठी परिषद भरविली होती.  तिला ह्युएनत्संग स्वतः हजर होता.  त्याच वेळीं वर्षाच्या खुनाचा प्रयत्‍न झाला होता.  ह्युएन येथें (स. ६३६ व ६४३) राहिला होता.  त्याच्यावेळीं तेथें १०० वर बौद्धमठ व १० हजार भिक्षु असत.  हिंदूंचीं देवळें २०० होतीं; हिंदु व बौद्ध दोन्हीहि धर्म तेथें प्रचारांत होते.  थोडक्यांत सांगतां येईल कीं, भरतखंडांतील राजकारणांतील गुरुत्वाचा मध्य गंगाकाठाहून, पूर्वेकडून पश्चिमेकडे पाटलीपुत्राकडून कनोजमार्गे दिल्लीपर्यंत येऊन पोहोंचला.  स. ६००-१२०० पर्यंत कनोज हें हिंदुस्थानाचें राजकीय केन्द्र होतें.  अरब इतिहासकार हि हें कबूल करितात.  हिंदुस्थानच्या राजधानीचें नांव सदासर्वदा कनोज असेंच ते देतात.  हर्षानंतर प्रत्येक सार्वभौमाला तीच राजधानी करावीशी वाटे.  या कालांत या शहराचें ऐश्वर्य व संपत्तीहि वर्धिष्णु होती.  गझनवी महंमुदचे वेळीं तिचा व कलाकौशल्याचा कळस झाला.  त्यानें तेथील स्फटिक राजप्रासादांचा अद्धितीयपणा कबूल केला होता.  ह्युएनत्संगाचे वेळीं तर तें गर्भश्रीमंत व ५ मैल लांब आणि १ मैल रुंद असें तटबंदीचें शहर होतें  लोक रेशमी वस्त्रें वापरणारे श्रीमंत होते.  कारागीर व विद्वान लोकांचा भरणा शहरांत बराच होता.  त्यांत रम्य उपवनें, हौद, पदार्थसंग्रहालयें होती; ते आठव्या शतकांत इतकें वैभवसंपन्न व दुर्भेद्य होतें कीं, अशक्य गोष्ट साध्य करणारास '' तुला कनोज पाहिजे वाटतें '' असें विचारीत (चचनामा),
वर्म घराणें :- हर्ष मेल्यानंतर (स. ६४७) त्याला पुत्र नसल्यानें राज्यांत बंडाळी झाली.  स्मिथ म्हणतो, हर्षनंतर त्याचा प्रधान अर्जुन (अर्जुनाश्व) यानें कनोजचें साम्राज्य बळकाविलें व त्याचें पारिपत्य चिनी दरबारांतील वकिलानें केलें. पण ही हकीकत त्यानें चिनी बखरीवरून सजविली असून, चिनी लेखकांची इच्छा हिंदुस्थानांत स्वमहत्त्व दाखविण्याची असल्यामुळें तिच्यावर सर्वस्वीं विश्वास ठेवतां येत नाहीं.  हर्षानंतर जुन्या मौखरी अथवा वर्म घराण्यांतील कोणी वैदिकधर्माभिमानी पुरुष गादीवर आला असावा.  साताव्या शतकाच्या अखेरीस कनोजेस यशोवर्मा म्हणून राजा होता हें प्रसिद्ध आहे.  हा विद्वानांचा चहाता असून, याचे पदरीं भवभूति, वाक्पति वगैरे कवी होते.  यानें दिग्विजय ही केला.  परंतु काश्मीरचा राजा मुक्तापीड व चालुक्य राजा विनयादित्य यांनीं त्याचा मोड केला (इ.स. ७४०).  यशोवर्म्यानें गौडराज्य जिंकलें (इ.स. ६८०-९०).  याचें साग्र वर्णन गौडवहो या काव्यग्रंथांत सांपडतें.  यानें चीन देशीं आपला वकील पाठविला होता (७३१).  यशोवर्मा गादीवर बसण्यापूर्वी दोन राजे (यांचीं नांवें आढळत नाहींत) कनोजेस (हर्षानंतर) गादीवर होतें.  यशोवर्म्याच्या कारकीर्दीत वैदिकधर्माचा पुनरुद्धार झाला व कनोज शहर हें वैदिक धर्माचें केन्द्र बनलें, तें मुसुलमानी विजयापर्यंत तसेंच राहिलें.  यशोवर्म्याच्या नंतर झालेले राजे दुर्बल होते.  पैकीं त्याचा नातू वज्रायुध याचा पराभव कश्मीराधिपतीनें केला (इ.स. ७५०-७०).  यानंतर चक्रायुधाचा उल्लेख आढळतो (स. ८००).  याचे बापाचें नांव इन्द्रायुध असून त्याच्या वेळीं (७८३) कनोजचे राज्य बरेंच विस्तृत होतें.  प्रयागच्या पश्चिमेकडील उत्तर हिंदुस्थानचा बहुतेक भाग या राज्यांत येई.  यानंतर बंगालच्या पालराजांनीं वर्मराजांचा पराभव केला.  त्याच्या मांडलिकांनींहि बंडें उभारलीं.  अखेर (स. ८१६) राजपुतान्यांतील भलपालचा गुर्जरप्रतिहार राजा जो नागभट्ट त्यानें वर्म घराण्याचा नाश केला.  याच वेळीं कनोजची पुन्हां भरभराट झाली.  या गुर्जराचें व राष्ट्रकुटांचें वैर होतें.  पैकीं राष्ट्रकूट गोविंद तिसरा यानें या नागभट्टाचा पराभव केला (८२०).  त्याच्या नंतर रामभद्र यानें ८२५-८४० पर्यंत राज्य केलें.  त्याचा मुलगा मिहिर होय.  हे वर्म घराणें स. ५००-८०० पर्यंत राज्य करीत होतें.  यांच्याच कारकीर्दीत बौद्धधर्माचें उच्चाटन झालें.

मिहिर भोज - हा रामभद्राचा मुलगा असून भोज याच पदवीनें प्रसिद्ध आहे.  यानें जवळजवळ अर्धशतक (८४०-८९०) पर्यंत राज्य केलें.  हा फार शूर होता.  यानें राज्यविस्तार केला व स्वतः सम्राट बनला.  पंजाब, राजपुताना, संयुक्तप्रांत, ग्वाल्हेर इतक्या प्रदेशांवर त्याचें साम्राज्य होतें.  याच्यानंतरच्या दोन राजांनीं सुराष्ट्र व कदाचित गुजराथ व माळवा) जिंकलें.  मिहिरनें बंगाली देवपालावर स्वारी केली व त्याचा पराभव केला.  भोजानें स्वतःला आदिवराह हें बिरुद धारण केलें.  वराहाचे चित्र काढलेलीं यांचीं नाणीं उत्तर-हिंदुस्थानांत पुष्कळ सांपडतात.  मेगॅस्थिनीस किंवा बाण हे याच्या राज्यकारभाराचे कांहींच वर्णन देत नाहींत.  याचा पुत्र महेंद्रपाल (महेंद्रायुध) यानें मात्र बापानें मिळविलेल्या राज्याचें योग्य पालन केलें.  फक्त पंबाज याच्या हातून गेला, तर उलट यानें मगध जिंकला.  याचा गुरु प्रसिद्ध कवि राजशेखर होय.  याच्या मागून याचा मुलगा दुसरा भोज गादीवर आला, परंतु तो लवकर मेला; तेव्हां त्याचा सावत्रभाऊ महिपाल (९१०-९४०) राजा झाला.  याच्या कारकीर्दीत कनोजच्या साम्राज्यास पुन्हां उतरती कला लागली.  राष्ट्रकूट तिसर्‍या इंद्रानें (९१६) याच्यावर स्वारी करून सुराष्ट्र जिंकला व कनोजहि घेतलें; परंतु पुन्हां तें महिपालाकडेच ठेविलें.  याच्यानंतरि देवपाल राजा झाला (९४०-५५).  या सुमारास जेजकभुक्तीचा राजा यशोवर्मा चंदेल यानें देवपालाचें मांडलिकत्व झुगारून दिलें व कालंजरगड काबीज केला.  महिपाल दुर्बल झाला होता.  देवपालानंतर, त्याचा भाऊ विजयपाल (९५५-९०) राजा झाला.  याच्या वेळीं कच्छवाह वज्रदामन् यानें देवपालाचा ग्वाल्हेर प्रांत घेतला.  या सुमारास मुसुलमानांचा धुमाकुळ सुरू झाला.  सबक्तगीननें हिंदुस्थानावर ९८६-८७ मध्यें पहिली स्वारी केली.  त्यानंतर त्यानें आणखी स्वार्‍या केल्या.  तेव्हां, तत्कालीन मोठा हिंदु राजा जो भटिंड्याचा जयपाल, त्यानें सर्व हिंदु राजांची एकी करून सबक्तगिनाशीं लढाई दिली.  परंतु तींत त्याचा पराभव झाला (९९१).  यावेळीं विजयपाल मरून त्याचा मुलगा राज्यपाल हा कनोजचा राजा झाला होता.  त्यानेंहि या लढाईंत भाग घेतला होता.  सबक्तगिनानंतर त्याच्या मुलानें (सुलतान महंमुद) हिंदुस्थानावर सुमारें १७ स्वार्‍या केल्या.  त्यानें १०१९ च्या जानेवारीमध्यें खुद्द कनोजवरहि स्वारी केली.  त्यावेळीं राज्यपालाची तयारी चांगली नसल्यानें महंमदनें एका दिवसांतच कनोज शहर व तेथील सात किल्ले काबीज केले, तेथील देवळें फोडलीं व लूट घेऊन तो गझनीस परत गेला.  राज्यपालानें कनोज सोडून महंमदाचें मांडलिकत्व पत्करिलें.  त्यामुळें राज्यांतील सारे हिंदु चिडले व त्याच्याविरुद्ध त्यांनीं बंड केलें.  त्यांचा पुढारी चंदेल राजा विद्याधर हा होता.  त्यांनीं १०१९ त कनोज घेऊन, राज्यपालाचा वध केला व तेथील त्रिलोचनपालास थोडासा प्रदेश दिला.  या प्रकारानें महंमूद रागावला व त्यानें १०२० मध्यें चंदेल राजावर स्वारी करून त्याचा पराभव केला.  उलट त्रिलोचनपालानें महंमदाला परत जातांना थोडासा अडथळा केला, परंतु त्याचा कांहीं उपयोग झाला नाही.  यानें आपली राजधानी बारी (गंगाकांठ) केली होती.  याचा मुलगा यशपाल.  येथें या भोज घराण्याचा शेवट झाला.

गहरवार घराणें - मुसुलमानांनीं कनोज घेतल्यानंतर (१०२०) साठ सत्तर वर्षे कोणी रजपूत राजे कनोजप्रांतावर राज्य करीत होते; परंतु त्यांचा इतिहास बरोबर समजत नाहीं.  ते मुसुलमानांचें मांडलिक होते व ११९४ (घोरीच्या स्वारी) च्या पुढेंहि राज्य करीत होते.  त्यांची राजधानी जाफराबाद येथें होती.  यांचा व गुर्जर प्रतिहारांचा कांहीं सबंध नव्हता.  यांपैकीं चंद्रदेव गहरवार यानें १०९० मध्यें कनोज घेऊन आपला वंश तेथें स्थापिला.  या गहरवारास पुढें राठोडवंश असें नांव मिळालें.  चंद्रदेवाचा मुलगा मदनपाल व नातू गोविंदचंद्र यानें (११०४-११५५) फार वर्षे राज्य केलें.  याच्या बायकोचें नांव नयनकेली देवी.  त्याचा मुलगा विजयचंद्र व नातू जयचंद यांचें नांव हिंदी काव्य व दंतकथा यांत प्रख्यात आहे.  याचीच मुलगी (संयोगिता) अजमेर येथील पिथोरराया (पृथ्वीराजा) नें हरण केली ११७५.  मुसुलमान इतिहासकार जयचंदाला काशीचा राजा म्हणतात.  बहुधा काशी ही त्याची राजधानी असावी.  हा फार शूर असून यानें चीन ते माळवा व पंजाबपर्यंत राज्याचा विस्तार केला.  पुढें (११९४) शिहाबुद्दीन यानें त्याच्यावर स्वारी करून त्याचा पराभव केला व राज्य काबीज केलें.  लढाईंत जयचंद मेला.  शिहानें १४०० उंच लूट केली.  येथें कनोजेचें साम्राज्य अथवा स्वतंत्र राज्य संपलें.  या गहरवालां पैकीं कांहींनीं राजपुतान्यांत जाऊन तेथें राज्यें स्थापिलीं.  तिकडे त्यांना राठोड हें नांव मिळालें.  जोधपूरचें घराणें हें यापैकींच होय.  कनोज यावेळेपासून नामशेष झालें.  मुसुलमानी अमंलांत त्याचें महत्व पार गेलें.  पुढें शेरशहा (सूर) यानें हुमायूनवर जय मिळविल्यानंतर (१५४०) कनोजेशेजारीं शेरसून नांवाचे गांव विजयाभिनंदनार्थ वसवून कनोज अगदींच नामशेष केलें.

कनोजी ब्राह्मण :-  वर्म राजवटींत (कनोजचे) कनोजे ब्राह्मण हे सर्व उत्तर हिंदुस्थानांतील ब्राह्मणांत अग्रेसर गणले गेले.  यावेळीं पंचगौड व पंचद्राविड असा ब्राह्मणभेद निश्चित झाला नसावा.  कनोज्यांचें वर्चस्व यशोवर्म्याच्या वेळीं सुरू झालें तेव्हां कनोज येथील पांच ब्राह्मण व पांच कायस्थ यांनां बंगाल्यांत बोलावून नेऊन तेथील आदिसूर नांवाच्या प्राचीन धर्माभिमानी राजानें त्यांची तेथें वसाहत करविली.  हर्षाच्या वेळीं हे कनोजे निवृत्तमांस होते; परंतु यावेळीं ते पूर्वीप्रमाणें फिरून मांसाहारी झाले.

(संदर्भग्रंथ :-  स्मिथ - हिं. प्रा. इ. वैद्य - म. यु. भा; बील- ह्युएनत्संग; - बाण - हर्षचरित्र; स्मिथ - कनोजचा इतिहास ; राजतरंगिणी.)

तहशील - संयुक्तप्रांत.  फारुक्काबाद जिल्ह्याची आग्नेयीकडील तहशील.  उ.अ. २६० ५६' ते २७० १२' व पू. रे. ७९० ४३' ते ८०० १'.  क्षेत्रफळ १८० चौरस मेल.  लोकसंख्या (१९११) १,१६,४२६.  एकंदर खेडीं २११ आणि एक मोठें गांव.  जमीनमहसूल (१९०३-४) १,९५,००० रुपये व इतर कर ३३,००० रुपये.  इ.स. १९०३-४ सालीं १२४ चौरस मैल जमीन लागवडीखालीं असून पैकीं ४३ चौरस मैल जमीन बागाइती होती.

गांव - संयुक्तप्रांत.  फारुक्काबाद जिल्ह्यांतील एक प्राचीन गांव.  उ.अ. २७० ३' व पू. रे. ७९० ५६'.  कुशस्थल, कौश, गाधिपुर आणि महोदय हीं कनोजचीं दुसरीं नांवें होत. या गांवाच्या तटाखालून एके काळीं गंगा नदी वहात होती; परंतु हल्लीं तिचा ओघ दूर कांहीं मैल अंतरावरून वहात आहे.  लोकसंख्या (१९११) १८,१०५.  या गांवाचा उल्लेख महाभारतांत येत नाहीं, तथापि रामायणांत (बा. कां. स. ३२ हें) वसलें त्यावेळची दंतकथा आहे.  कुशनाभानें हें गांव वसविलें.  त्यास शंभर मुली होत्या.  त्यांच्यापैकीं सर्वांत जी धाकटी होती, तिच्याशिवाय सर्वांनीं वायुनामक ऋषीचा तिरस्कार केला.  त्यानें त्या सर्वांस पोंक येईल असा शाप दिला.  त्याप्रमाणें त्या सर्व मुलींच्या पाठीस पोंक आलें.  त्यावरून या शहरास कान्य-कुब्ज असें नांव पडलें.  ख्रिस्ती शकारंभीं टॉलेमी, या गांवाचा कनोसिझ असा उल्लेख करतो.  पांचव्या शतकांत हें गांव गुप्तांच्या राज्यांत मोडत होतें.  गुप्तांचा नाश झाल्यावर मौखरीनामक छोट्या राज्याच्या राजधानीचें हें शहर होतें.  सातव्या शतकांत उत्तरहिंदुस्थानांतील हर्षवर्धनाच्या साम्राज्यांत हें मोडत असें.  हर्षवर्धनाच्या दरबाराचें वैभव चिनी प्रवासी ह्युएनत्संग यानें वर्णिलें आहे; व बाणाच्या हर्षचरित्रांतहि तें आढळतें.  नवव्या शतकाच्या उत्तरार्धांत रघुवंशी राजांची राजधानी ही होती.  या राजांपैकीं एकाचा पराजय इ.स. ९१७ सालीं गुजराथच्या राजानें केला, परंतु महोबाच्या चंदेल राजानें त्यास पुन्हा गादीवर बसविलें.  इ.स. १०१९ सालीं गझनीच्या महमुदानें कनोज लुटलें.  या वेळीं हें शहर राठोडाकडे होतें.  इ.स. ११९४ सालीं महंमद घोरीनें शेवटचा राठोड राजा जयचंद याचा पराजय केला व त्या वेळीं कनोजचे राज्यहि लयास गेलें !

मुसुलमानी अमलांत याचें पूर्वीचें महत्त्व नष्ट झालें.  कनोजच्या जवळच शीरशहानें हुमायूनाचा पराजय केला.  अकबराच्या कारकीर्दीत जेव्हां शांतता नांदूं लागली तेव्हा कनोज एका सरकाराचें मुख्य ठिकाण होतें असें, ऐनी-इ-अकबरीवरून दिसतें.  अठराव्या शतकांत तें कधी फारुक्काबादच्या नबाबाकडे, कधीं अयोध्येच्या नबाबाकडे तर कधीं मराठ्यांकडे असे.  या ठिकाणीं पूर्वीच्या हिंदू इमारतींपैकी कांहीं शिल्लक राहिलेलें नाहीं.  इ.स. १४०६ सालीं बांधलेली जामा मशीद येथें आहे.  हिला हिंदु देवळांचें सामान वापरलें असून ही अद्यापि सीता-की-रसोइ 'सीतेचे स्वयंपाक गृह' या नांवानें ओळखली जाते.  येथें बाळापीर आणि त्याचा पुत्र शेख महदी याचे दरगे आहेत.  हे दोन प्रसिद्ध फकीर असून शहाजहान व औरंगझेब यांच्या कारकीर्दीत होऊन गेले.  नदीकाठीं पुष्कळ पडक्या इमारती दिसतात.  येथील अत्तराचे कारखाने प्रसिद्ध आहेत.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .