विभाग दहावा : क ते काव्य
कनक - पश्चिमविभागांतील सोनें असलेला प्रदेश. याचा बृहत्संहितेंत उल्लेख आहे. (१४. उ २१) मूळ ग्रंथांत जृंगवैश्य-कनक-शका: असा पाठ आहे; याचें भाषांतर कर्न हा ''जृंग, वैश्य, (व) सुवर्ण-सिथियन लोक'' असें करतो. परंतु टीकेंत निराळा अर्थ दिला आहे. ''सुवर्णभूमी व शक लोक'' अशी तो टीप देतो. अल्बेरूनी देखील हे शब्द अलग करून ''वैश्य, कनक, शक'' असा अर्थ करतो.