प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कंदाहार, प्रांत - अफगाणिस्तानांतील एक प्रांत.  याच्या उत्तरेस हिरात प्रांतांतील तैमनी प्रदेश व काबुल प्रांतांतील हजारजात आणि गझनी हे जिल्हे; पूर्वेस आणि दक्षिणेस बलुचिस्तान आणि पश्चिमेस फराह.  कंदाहार येथील नायब-उल हुकुमा (सुभेदार) याच्या अमलाखालीं कलात-इ-घिलझइ, माकुर, पुष्त-इ-रुद, झमिंदवर आणि गिरिष्क हे जिल्हे आहेत.

कंदाहारापासून फराह येथवर जर एक रेषा काढली तर या रेषच्या उत्तरेकडील प्रदेश डोंगराळ आहे.  त्या भागांतील पर्वत १००० फूटपासून ४००० फूट उंच आहेत.  वर सांगितलेल्या रेषेच्या दक्षिणेस २००० ते २५०० फूट उंचीचे डोंगर प्रथम लागतात.  परंतु आणखी थोडें दक्षिणेस गेलें म्हणजे, ही उंची एकदम कमी झालेली आढळते.  कंदाहार शहराच्या दक्षिणेस रेजिस्तान नांवाचें एक अरण्य आहे.  या प्रांतांतून कडेनइ, तरणक, अरघस्तान, अरघंदाब, हेलमंड, हरूत आणि फरा रुड या नद्या वाहतात.  येथें पूर्वी हिंदूंची वस्ती असून ते हिंदू ग्रीक लोकांस 'गंदारी' या नांवानें माहीत होते.  यावरूच यास कंदाहार हें नांव पडलें आहे.  परंतु हल्लीं या प्रांतांत दुराणी लोकांची वस्ती आहे.  या भागांत पारसीवानांची (पर्शियन वंशांतील लोक) बरीच वस्ती असून खुद्द कंदाहार शहरांत ५०० हिंदू आहेत.  या प्रांतांतील लोकसंख्येचा अजमास बरोबर सांगतां येणें शक्य नाहीं.  स्थानपरत्वें येथील हवा निरनिराळी आहे.  अरण्यांतील हवा सोडून दिली तर एकंदरींत येथील हवा चांगली आहे.  डोंगराळ प्रदेशांत हिवाळा जरा कडकच असतो.

शहर :- अफगाणिस्तानच्या कंदाहार प्रांताची राजधानी.  उत्तर अक्षांश ३१० २७' व पूर्व रेखांश ३५० ४३'.  हिरात पासून हें शहर ३५४ मैल व काबूलहून ३१२ मैल आहे.  तसेंच ब्रिटिश सरहद्दीवरील न्यू चमन या ठिकाणापासून ६२ मैल हें शहर आहे.  समुद्रसपाटीपासून याची उंची ३४६२ फूट आहे.  तरणक व अरघंदाब या नद्यांच्या दरम्यान असलेल्या सपाट प्रदेशावर हें शहर वसलें असून दक्षिणेस व पश्चिमेस बरीच वस्ती आहे.  परंतु उत्तरेस, वायव्येस, व ईशान्येस हें शहर ओसाड पडलें आहे.  या शहराभोंवती २४ फूट रुंद व १० फूट खोल असा एक खंदक असून २७ फूट उंचीची एक भिंत आहे.  दोन पूर्वेस, दोन पश्चिमेस, एक उत्तरेस व एक दक्षिणेस याप्रमाणें या शहरास सहा दरवाजे आहेत.  यांपैकी पूर्व व पश्चिमेकडील दरवाजे प्रमुख असून त्यांची रुंदी सुमारें ४० फूट आहे.  शहराच्या उत्तरेस बालेकिल्ला आहे.  दक्षिणेस एक मोकळी जागा असून तीस तोफखाना असें नांव आहे.  पश्चिमेस याचप्रमाणें एक मोकळी जागा असून तेथें अहमदशहा दुराणी याचें थडगें आहे.  या शहरांत सुनी पंथाच्या सुमारें १८० मशिदी आहेत.  यांपैकी खिरका मुबारक ही प्रसिद्ध आहे.  येथें शिया पंथांतील लोकांचीहि पुष्कळ वस्ती आहे, परंतु त्यांची मशीद या शहरांत नाही.  हिंदुस्थानाकडे येणारा लोकर व इतर माल सांठविण्याकरतां शहराच्या पूर्वेकडील दरवाजाबाहेर एक मोठी कारवान सराई आहे.  या शहराची लोकसंख्या सुमारें ३१,००० असावी असा तर्क आहे.  पारसीवान लोकांचाच भरणा जास्त आहे.  सुमारें १६०० दुकानें असून येथील गंजांत गुरें, मेंढरें व धान्य यांचा बाजार प्रतिदिवशीं भरतो.  पाणीपुरवठा अरघंदाब नदीपासून काढलेल्या कालाव्यापासून होतो.  विहिरी देखील या शहरांत पुष्कळ आहेत.  या शहराची हवा विशेषशी चांगली नाहीं.  पाऊस फारच थोडा पडतो.

फळफळावळीविषयीं कंदाहार प्रसिद्ध आहे.  अप्रिकॉट, पीच, डाळिंबें, द्राक्षें, अंजीर, कलिंगडें वगैरे फळें ताजीं व सुकविलेलीं बाहेर रवाना होतात.  तंबाखूची लागवडहि पुष्कळ आहे.  ही तंबाखू हिंदुस्थानांत येते.

हें शहर अफगाणिस्तानांतील महत्वाचें व्यापारी ठिकाण आहे.  येथें स्थानिक महत्त्वाचे असे उद्योगधंदे फारसे नाहींत.  तथापि या शहराच्या व्यापाराचें क्षेत्र फार मोठें आहे.  निरनिराळ्या देशांतील मालाची देवघेव येथें होत असते.  कंदाहारमध्यें हिंदू लोकांची वस्ती पुष्कळ असून त्यांपैकीं बरेच व्यापारी आहेत व ते फार श्रीमंत आहेत.  ते सिंधप्रांत व मुंबई बंदराशीं व्यापार करतात.  ते ब्रिटिश व हिंदी कारखान्यांतील माल तिकडे नेऊन, हिंग, लोंकर सुकी फळफळावळ, तंबाखू, इत्यादि जिन्नस बाहेर देशीं पाठवितात.  इ.स. १९०३-४ सालीं कंदाहारमधून हिंदुस्थानांत ३५ लाखांचा माल आला व हिंदुस्थानातून कंदाहारमध्यें ३३ लाखांचा माल गेला.

इतिहास :-  याचा प्राचीन इतिहास गांधार शब्दाखालीं दिला आहे.  अर्वाचीन इतिहास 'अफगाणिस्तान' या लेखांत बराच येऊन गेला आहे.  फार प्राचीन काळापासून कंदाहार हें आशियाखंडांतील एक महत्वाचें ठिकाण असलें पाहिजे.  कारण हिरात, सीस्तान, घोर, काबुल आणि हिंदुस्थानकडून येणारे रस्ते येथें मिळतात.  अलेक्झांडर दि ग्रेट याच्या लक्षांत या शहराचें महत्त्व आलें होतें व त्यानें जीं शहरें नवीन वसविलीं अगर पुन्हां बांधलीं त्यांत हें असावें असें दिसतें.  हें निरनिराळ्या काळीं सेल्युसिड, पार्थिअन, सस्सानिड आणि अरब या साम्राज्यांत होतें.  खिलाफतीचा नाश झाल्यावर कंदाहार अनुक्रमें इराणी, सफाविद आणि सांमानिद गझनीचें घराणें, सेल्जुक, घोरी आणि ख्वारिझमचे शहा यांच्या ताब्यांत होतें.  अखेरीस इ.स. १२२२ सालीं चेंगीजखान नांवाच्या मोंगलानें तें काबीज केलें.  पुढें त्याच्या वंशजांकडून कांहीं काळपर्यंत घोरी घराण्याच्या एका शाखेंतील हिरातच्या कर्त या नांवाच्या राजाचा यावर अंमल चालत होता.  इ.स. १३८९ सालीं तें तैमूरलंगानें सर केलें.  पुढें इ.स. १४६८ ते १५१२ च्या दरम्यान यावर स्थानिक राजांचा ताबा चालत होता.  परंतु त्या सालीं बाबरानें तें पुन्हां जिंकलें.  हा मोंगल साम्राज्याचा संस्थापक होय.  याच्या मृत्यूनंतर कंदाहारच्या स्वामित्वाविषयीं मोंगल व पर्शियन सफाविद यांच्यांत तंटा बरींच वर्षे चालला होता.  त्यावेळीं कधीं हें मोंगलांकडे व कधी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडे असे.  अखेरीस इ.स. १६४ : सालीं तें मोंगलांच्या ताब्यांतून कायमचें गेलें.  शहाजहाननें व औरंगजेब बादशहानें तें परत मिळविण्यासाठीं पुष्कळ प्रयत्‍न केले.  परंतु ते सर्व निष्फळ झाले.  इ.स. १७०८ सालीं कंदाहारच्या घिलझई लोकांनीं पर्शियन सत्तेचें जूं झुगारून दिलें व कांहीं वर्षांनीं त्यांनीं खुद्द इराणांत जाऊन सफाविद लोकांस पराजित केलें.  नादीरशहाच्या वेळी पुन्हां थोडा वेळ इराणी अंमल चालू झाला होता.  इसवी सन १७३८ सालीं नादीरशहानें कंदाहार शहराचा नाश करून तें पुन्हां वसविलें.  हल्लींच्या गांवाच्या पश्चिमेस ३ मैलांवर एका टेंकडीच्या पायथ्याशीं जुन्या गांवाचे अवशेष अद्यापि दिसतात.  नादीरशहाच्या हांतून हें अहमदशहाच्या ताब्यांत गेलें.  त्यानें नादीरशहानें वसविलेलें नगर उध्वस्त करून हल्लीं अस्तित्वांत असलेलें शहर इ.स. १७४७ सालीं वसविलें.

इ.स. १८३४ सालीं अफगाणिस्तानचा पदच्युत झालेला (सदझोई) राजा यानें कंदाहार येथें पुन्हां आपली सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्‍न केला, परंतु त्याचा प्रतिस्पर्धी दोस्तमहमद यानें त्यास हांकून लावलें व आपण अमीर ही पदवी धारण केली.  या प्रसंगीं उपर्युक्त शहासुजानें मुसुलमानांची मदत वगैरे न घेतां फक्त ब्रिटिश सरकारची मदत मिळवून तो पुन्हां रणांगणावर आला.  त्यावेळी इ.स. १८३९ सालीं या सैन्यानें कंदाहार हस्तगत करून घेतलें व शहासुजास येथेंच तख्ताभिषेक करण्यांत आला.  इ.स. १८४२ सालीं काबुल येथें ठेवलेल्या ब्रिटिश सैन्याची कत्तल झाली.  त्यावेळीं कंदाहार सफदरजंग सदझोई याच्या ताब्यांत दिलें होतें.  परंतु कोहनदिल खान नांवाच्या इराणांतून आलेल्या एका माणसानें सफदरजंगास हांकलून दिलें व आपण कंदाहारचा ताबा घेतला.  इ.स. १८५५ सालीं कोहनदिल खान मरण पावला व त्याच्यानंतर त्याचा पुत्र महमद सादीक याजकडे सर्व अधिकार आला.  परंतु त्याच वर्षी तें शहर दोस्तमहमदानें पुन्हा हस्तगत करून घेतलें.  दोस्तमहमदानें आपला पुत्र गुलाम हैदर खान यास तेथील सुभेदार नेमलें.  पुढें हा इ.स. १८५८ सालीं मरण पावल्यावर शेर अल्लीखान यास अधिकार मिळाला.  पुढें शेरखानास अमीरपद प्राप्‍त झाल्यावर त्यानें आपला सख्खा भाऊ महमद अमीन खान यास कंदाहारचा सुभेदार केलें.  हा इ.स. १८६५ सालीं लढाईंत मारला गेला.  त्यामुळें कंदाहार पुन्हां शेरखानाकडे आलें.  परंतु लवकरच त्याचा प्रतिस्पर्धी व सावत्र भाऊ यानें तें इ.स. १८६७ सालीं त्याजपासून हिसकून घेतलें.  परंतु शेर अल्लीखानाचा पुत्र याकुबखान यानें इ.स. १८६८ सालीं तें पुन्हां मिळविलें.

अखेरच्या अफगाण लढाईत इ.स. १८७९ साली कंदाहार ब्रिटिश सैन्यानें व्यापलें होतें.  त्याच सालीं सरदार शेर अल्लीखान यास कंदाहार प्रांताचा वाली म्हणून गादीवर बसविण्यांत आलें व हा प्रांत काबूलपासून अगदी स्वतंत्र करण्यांत आला.  याकुबखानाचा धाकटा भाऊ सरदार महंमद अयुबखान यानें हिरातहून (जुलै १८७९) चाल केली व ब्रिटिश सैन्याचा मैबंद येथें पराजय केला व कंदाहार ताब्यांत घेतलें.  परंतु लवकरच (आगष्ट) ब्रिटिशांनीं त्याचा पूर्ण पराजय केला व या विजयामुळें अफगाणिस्तानांत शांतता नांदू लागली व ब्रिटिश सैन्यानें इ.स. १८८१ सालीं दक्षिण अफगाणिस्तान सोडलें.  शेरअल्ली खानास आपणांस मिळालेलें वाली पद संभाळण्याचें सामर्थ्य नव्हतें.  त्यामुळें त्याच्याच विनंतीवरून त्यास हिंदुस्थानांत आणून पेनशन दिलें.  ब्रिटिशांनां अफगाणिस्तान सोडून तीन महिने झाले नाहींत तोंच अयुबखानानें अबदुल रहिमानच्या सैन्याचा पराजय केला व कंदाहार पुन्हां आपल्या ताब्यांत घेतलें.  परंतु लवकरच (सप्टेंबर १८८१) अमीराच्या सैन्यानें त्याचा पराजय केला व त्याला हिरातकडे पळून जावें लागलें.  परंतु हें शहर अमीराच्याच ताब्यांत असल्यामुळें त्यास तेथें थारा मिळाला नाहीं व अयुबखानास अखेरीस इराणचा मार्ग सुधारावा लागला.  इ.स. १८८८ सालीं हा हिंदुस्थानांत आला.  (''अयुबखान पाहा.'')

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .