प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कदंब आणि कादंब -  हीं एकासारखीं एक नांवें धारण करणारीं तीन घराणीं होतीं.  त्यांपैकीं पहिलें जास्त जुनें होतें; तें कदंब हें नांव धारण करीत असे.  व नंतरचीं दुसरीं दोन घराणीं कादम्ब या नांवानें ओळखिली जात असत.  

यांतील सर्वांत जुनें कदंब घराणें हें पलाशिका (बेळगांव जिल्ह्यांतील हळसि) येथें व उत्तर कानड्यांतील वैजयन्ति अथवा वनवासी येथें होतें.  त्यांच्या निरनिराळ्या दानलेखांवरून त्यांची वंशावळ पुढीलप्रमाणें तयार होते.  (वंशावळ नंबर १ पाहा.) लेखांच्या अखेरीस वंशावळी दिल्या आहेत.

कदंब राजांपैकी कोणाचाहि नक्की काल समजत नाहीं.  शिलालेखांत अथवा दानपत्रांत त्यांच्याविषयीं जे उल्लेख आढळतात त्यांत कालगणना कोणत्याहि शकाप्रमाणें केलेली नसून 'कारकीर्दीच्या अमुक वर्षी' एवढेंच लिहिलेलें असतें.  यामुळें त्यांचे काल ठरवितां येत नाहींत.  मि. राइस यांनीं ज्या उल्लेखांच्या आधारावर कृष्णवर्मादि कदंबांचे काल ठरविलेले आहेत ते उल्लेखच फ्लीट याच्या मतें बनावट असल्यामुळें ते काल बरोबर धरतां येत नाहींत.  फ्लीट याच्या मतें कदबांसंबंधीं तूर्त एवढेंच बिनधोक म्हणतां येईल कीं ते इ.स. च्या सहाव्या शतकाच्या सुमारास होऊन गेले असावे.  

यांपैकीं मृगेश्वरवर्मा याच्या एका शिलालेखांत त्याच्या कारकीर्दीच्या तिसर्‍या वर्षास पौष असें म्हटलें असून आठव्या वर्षास वैशाख असें म्हटलें आहे.  व वर्षाचे काल जुन्या पद्धतीप्रमाणें धरले आहेत.  त्यावरून मि. राइस याच्या मतानें काकुत्स्थ (इ.स. ५३८), मृगेश (इ.स. ५७०) व भानु (इ.स. ६००) याप्रमाणें हे राजे होऊन गेले.

मि. फ्लीट हा त्या शिषालालेखावरून काकुत्स्थ याचा काल ठरविला आहे, त्याच्या खरेपणाबद्दल संशय प्रदर्शित करून ''चालुक्य राजा कीर्तिवर्मा पहिला यानें इ.स. ५६७ मध्यें कदंबांस जिंकण्यापूर्वी हे तिघे राजे इ.स. ५ व्या शतकांत होऊन गेले असावे'' असें म्हणतो.

देवगिरी येथील शिलालेखांत कृष्णवर्मा व त्याचा पुत्र देववर्मा यांचीं नांवें आढळतात.  हे दोघे या तीन राजांच्या पूर्वी किंवा नंतर होऊन गेले याबद्दल नक्की सांगतां येत नाहीं.  कृष्णराजाची बहीण गंगराजा माधव दुसरा यास दिली होती.  हे कदंब राजे चालुक्य राजांप्रमाणे हारितिपुत्र मानव गोत्री होते व जैन धर्मी होते.

बनवासी व हानगल येथील कादंब - हे वरील कदंबांचे वंशज नसावेत असें त्यांच्या नांवांतील फरकावरून दिसतें असें मि. फ्लीट याचें मत आहे.  वंशावळ नंबर २ (पाहा) हीं मि. विल्सन यांच्या यादीवरून मि. राइस यानें सुधारून वाढविलेली आहे.  ती घराण्याच्या मूळपुरुषांची असून काल्पनिक किंवा पौराणिक असावी.

वंशावळ नंबर ३ (पाहा) ही शिलालेखांवरून केलेली आहे.  तिच्याहि खरेपणाबद्दल कांहीं आधार नाहीं.  मि. फ्लीट यांनीं असें दर्शविलें आहे कीं, राष्ट्रकूटांच्या बर्‍याच शिलालेखांवरून असें दिसतें कीं, बनवांसी येथें कादंबवंशापूर्वी इ.स. ९४७ पर्यंत तरी निदान महामंडलेश्वर हें उपपद धारण करणारा वंश राज्य करीत होता.

वंशावळ नंबर ४ (पाहा) ही यांच्या पुढील असून बहुतेक बिनचूक असावी.  परंतु मि. फ्लीट याचें असें म्हणणें आहे कीं, तिच्यांतील पहिलें ऐतिहासिक नांव म्हणजे कीर्तिवर्मा (दुसरा) हेंच होय.  या शिलालेखांत आपणास असें आढळतें कीं, इ.स. ११३५ मध्यें होयसल बल्लाळ विष्णुवर्धन यानें हानगल शहरास वेढा देऊन कादंबांपासून बनवासी व हानगल हे दोन परगणे मिळविले.  इ.स. ११९६ मध्यें होयसल बल्लाळ (दुसरा) यानें हानगल शहरास वेढा दिला.  पण त्यास कामदेवानें हांकून दिले.  मि. फ्लीट याच्या मतानें बल्लाळ (दुसरा) यानें लवकरच कादम्बांचा पूर्ण पराभव करून त्यांचा प्रदेश आपल्या राज्यास जोडला.  याबद्दल कामदेव हा इ.स. १२०३-४ या सालीं बल्लाळाबरोबर झगडत होता; यापेक्षां याची जास्त माहिती मिळत नाहीं.

गोवा येथील कादंब - हें एक तिसरेंच कदंबांचें घराणें असून यांचा बनवासी येथील कादंबाशीं कांहीं संबंध असावा; पण तो कोणता हे अद्याप कळलें नाहीं.  यांनीं गोवा हलसि (पलाशिका) येथें राज्य केलें.  (वंशावळ नं. ५ पाहा.)  यांच्यापैकीं षष्ठदेव (पहिला) व जयकेशिन (पहिला) हे चालुक्यांचे (पश्चिम) मांडलिक होते.  गोव्याचा कादंब, पहिला षष्ठदेव, चट्ट, चट्टल अथवा चट्टय, हा पश्चिम चालुक्य जयसिंह ह्याचा मांडलिक होता; असें या शिलालेखांत म्हटलें आहे.  जयसिंह हा त्याचा चुलता सत्याश्रय याचा राजप्रतिनिधि असावा.  वरील माहिती कदाचित मागून लिहिली असावी.

पश्चिम चालुक्य पहिला सोमेश्वर याचा मांडलिक, गोव्याचा कादंब, पहिला जयकेशिन हा श. ९७४ त राज्य करीत होता.  यानें कापर्दिक द्वीपाच्या राजाला ठार मारिलें असें म्हणतात.  कापर्दिक द्वीपाचा राजा हा कदाचित उत्तर कोंकणप्रांतांतील शिलाहार राजपुत्र मामवाणी असावा (इ.स. १०६०). त्यानें चोलांचा पराभव केला; कामदेवाचा समूळ नाश केला; आलुपांनां जिंकलें; चालुक्यांची स्थापना केली व त्यांचें चोलांशीं सख्य केलें आणि गोपकपट्टन हे आपलें राजधानीचें शहर केलें असें म्हणतात.  तो कदाचित कर्णदेव चालुक्याचा जांवई असावा.

शके ९८८ त पश्चिम चालुक्य, पहिल्या सोमेश्वराचा मांडलिक तोयिमदेव कादंब हा बनवासी आणि पानुंगल जिल्ह्यावर राज्य करीत होता.  शके. ९९०-९९९ मध्यें पहिल्या तैलपाचा मुलगा, (दुसरा) कीर्तिवर्मन (पहिला कीर्तिदेव) हा पहिला सोमेश्वर आणि सहावा विक्रमादित्य, या पश्चिम चालुक्य सार्वभौम राजांच्या अंमलाखालीं बनवासी जिल्ह्यावर राज्य करीत होता.  या बनवासीच्या कादंबांचा पूर्वीच्या कादंबांशीं नक्की काय संबंध होता हें अद्याप समजलें नाहीं.  त्यांच्या नांवावरून पहातां ते त्यांचे औरस पुत्रपौत्र नसावेत असें दिसतें.  ज्याच्याविषयीं ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे, असा पहिला कादंब म्हटला म्हणजे, दुसरा कीर्तिवर्मन हा होय.  कादंबांच्या संबंधींच्या शिलालेखांमधून सांपडणार्‍या त्याच्या पूर्वजांच्या वंशावळींवर विश्वास टाकणें केवळ अशक्य आहे.  कारण त्यांत ऐतिहासिक प्रमाणें न दिल्यामुळें ते लेख खरे आहेत किंवा खोटे आहेत हें समजण्याला मार्ग नाहीं.  शके ९९७ व १०११ मध्यें दुसरा जयवर्मन याचा मुलगा दुसरा शांतिवर्मन कादंब हा पश्चिम चालुक्य दुसरा सोमेश्वर आणि सहावा विक्रमादित्य यांच्या सार्वभौमत्वाखालीं मांडलिक म्हणून हानगलवर राज्य करीत होता.  त्यानें पांड्य कुलांतील सिरियादेवी हिच्याशीं लग्न केलें.

गोव्याचा कादंब पहिला जयकेशिन याच्यामागून राज्यावर बसलेला त्याचा मुलगा विजयादित्य अथवा पहिला विजयार्क, या नांवाचा असून त्यानें चट्टलदेवी हिच्याशीं लग्न केलें (इ.स. १०८८).  पट्टिपोंबुच्चपुराचा शांतरजगद्देव याची आई बिज्जलदेवी हिची चट्टलदेवी ही बहीण होती.

शके १०२२-१०५२ मध्यें बनवासी आणि हानगल या जिल्ह्यांचा कादंब अधिकारी जो शांतिवर्मन त्याच्या मागून राज्यावर आलेला त्याचा मुलगा तैल अथवा दुसरा तैलप हा सहावा विक्रमादित्य आणि तिसरा सोमेश्वर या चालुक्य राजांच्या सार्वभौमत्वाखालीं राज्य करीत होता.  विष्णुवर्धन होयसल यानें हानगलला वेढा दिला असतां अगर त्या वेढ्यानंतर शके १०५८ (इ.स. ११३५) सालीं तैलप मरण पावला असावा.  त्याचे प्रांत कांहीं दिवसपर्यंत विष्णुवर्धनाच्या ताब्यांत गेले होते.  पांड्य कुलांतील बाचलदेवी आणि चामलदेवी अशा दोन बायका तैल राजाला होत्या.  (संपगांव तालुक्यांतील कादरोळी येथील शिलालेख शके-१०२१) या वेळीं पश्चिम चालुक्य सहावा विक्रमादित्य याचा मांडलिक गूवल कादंब हा राज्य करीत होता.

पश्चिम चालुक्य सहावा विक्रमादित्य याचा मांडलिक (गोव्याचा कादंब) जो दुसरा जयकेशिन तो या वेळी गादीवर होता शके १०४१-१०४८.  त्यानें चालुक्य घराण्याचें सार्वभौमत्वरूपीं जूं झुगारून देण्याचा प्रयत्‍न केला; परंतु येलबुर्गचा सिंद व आचुगीचा मुलगा पर्मार्डि यानीं त्याला पळावयास लाविलें.  नंतर त्यानें विक्रमादित्याची मुलगी मैळलदेवी हिच्याशीं लग्न केलें; त्याचा एके काळीं होयसल विष्णुवर्धन यानें पराभव केला होता (इ. सन १११९).

तिसरा सोमेश्वर आणि दुसरा जगदेवमल्ल शके १०५५-१०६७ या चालुक्य राजांच्या सार्वभौमत्वाखालीं पहिला मल्लिकार्जुन (त्रिभुवनमल्लरस) कादंब, हा बनवासी आणि हानगल या प्रांतांवर सुभेदार होता.  शके १०५५ सालीं तो आपल्या बापाच्या मदतीनें राज्य करीत असावा व शके १०६० आणि १०६६ सालीं तो एकटाच राज्य करीत असावा असें दिसतें.

शके १०७० त दुसरा जयकेशिन याच्या मागून राज्यावर बसलेला त्याचा मुलगा पर्माडि अथवा परमार्दि शिवचित्त हा राज्य करीत होता.  हा कदाचित आपला भाऊ विजयादित्य अथवा दुसरा विजयार्क याच्या बरोबरीनें राज्य करीत असावा.  कोल्हापूर अथवा कर्‍हाडचा शिलाहार विजयादित्य यानें दुसरा जयकेशिन अथवा पर्मार्डि याच्यापासून कादंब राज्यांतील कांहीं भाग जिंकून घेतल्याचे बरेच उल्लेख आढळतात.  तसेंच आहवमल्ल कलचुरीचा मांडलिक चंडुगिदेव यानें त्याच्यावर हल्ला केला असावा असें दिसतें.  पर्मार्डि यानें कामदेवाची मुलगी कमलादेवी हिच्याशीं व विजयादित्यानें लक्ष्मीदेव राजाची मुलगी लक्ष्मीदेवी हिच्याशीं लग्न केलें.

शके ११०३-११२६ त चवथा सोमेश्वर चालुक्य याचा मांडलिक कामदेव अथवा कावदेव हा बनवासी, हानगल आणि पुलिगर जिल्ह्यांवर राज्य करीत होता.  त्यानें केतलदेवी हिच्याशीं लग्न केलें होतें.  त्याची अगदी शेवटची माहिती शके ११२६ सालची आहे.  त्यानंतर कामदेवाचा कोठेंहि मागमूस आढळत नाहीं.

शके १११० त तिसरा जयकेशिन हा त्याचा बाप दुसरा विजयादित्य याच्या मागून राज्यावर बसला.  सौंदत्तीच्या रट्ट राजांनीं या गोव्याच्या कादंबांपासून बेळगांव सभोंवतालचा प्रांत जो जिंकून घेतला, तो या तिसर्‍या जयकेशिन याच्या कारकीर्दीतच असावा.  याच सुमारास तेजिराज अथवा तेजुगि (कदंब) याचा मुलगा भायिदेव हा कुंडि जिल्ह्यावर राज्य करीत होता.  व भूत अथवा आहवमल्ल भूतिग, याचा मुलगा बर्म, हा लोकापूर, होळलुगुंद, कोळेजूरु, नविलुगुंद या जिल्ह्यांवर व दोड्डवाड शहरावर राज्य करीत होता.

यापुढें कादंब कुलांतील वीरमल्लिदेव अथवा मल्लिकार्जुन यानें बनवासी आणि हानगल जिल्ह्यांवर राज्य करण्यास सुरुवात केली.  शके ११६३ आणि ११७३ या सालच्या शिलालेखांवरून पहातां तो स्वतंत्र असावा असें दिसतें.

शके ११६८ त (इसवी सन १२४६) दुसरा षाष्ठदेव हा त्याचा बाप त्रिभुवनमल्ल याच्या मागून गादीवर बसला.  षाष्ठदेव हा त्याच्या (कदंब) घराण्यांतील अगदीं शेवटचा राजा असावा असें दिसतें.  रट्ट आणि शिलाहार राजांनीं त्याचे प्रांत जिंकून घेतल्यामुळें त्याच्या हातांत फारच थोडी सत्ता राहिली होती.  त्यानें इ.स. १२५७ पर्यंत राज्य केलें.

मि. फ्लीटच्या मतें जयकेशिन (तिसरा) मेल्याबरोबरच वस्तुतः या गोव्याच्या कादंबांच्या राज्याचा शेवट झाला; कारण षष्ठदेव (दुसरा) याचें सामर्थ्य फारच अल्प होतें.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .