प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कथील - (परमाणुभारांक ११७.६).  कथील हें एक धातुरूप रासायनिक मूलद्रव्य आहे.  ओतीव कथलाचा रंग पांढरा असतो.  परंतु त्यावर थोडीशी निळसर छटा असते.  तें चकचकीत असून हवेंत मुळींच गंजत नाहीं.  ही धातु मऊ असून तीवर घण मारले असतां पातळ होत जाते.  परंतु तिच्या अंगीं धारणशक्ति किंवा चिवटपणा फारसा नाहीं.  ओतीव कथलाचें विशिष्ट गुरुत्व ७.२९ व वैद्युतिक रीतीने तयार केलेल्या धातूचें ७० १४३ ते ४० १७८ पर्यंत असतें.  ओतिव कथील रवेदार असतें, यामुळें कथलाची कांडी वांकवितांना एक प्रकारचा आवाज होतो.  फार थंड जागीं (३९ सें.) बराच वेळ ठेवल्यास कथील ठिसूळ होतें व खलबत्यांत घालून त्याची भुकटी करतां येते.  नेहमीचें उष्णमान असतां कथलाच्या अंगीं थोडीबहुत तन्यता असते.  उष्णमान वाढेल तसतशी (१०० सें. पर्यंत) ती वाढत जाते.  लोखंडाच्या योगानें कथील कठीण व ठिसूळ बनतें.  तांबें व शिसें यांच्या योगानें तिचा कठीणपणा व मजबुती हीं वाढतात; परंतु तिची घनवर्धनीयता कमी होते.  २३० श. ला कथील वितळतें व १६०० पासून १८०० श. पर्यंत उकळूं लागतें.  त्याचा प्रसरणगुणक (०० ते १०० श. पर्यंत) ०. ००२७१७ व विशिष्ट उष्णता ०. ०५६२ आहे.  कथलाचें उष्णता व विद्युतवाहकत्व अनुक्रमें १४५ ते १५२ व ११४० ५ ते १४०० १ आहे.  (चांदीचें वाहकत्व १०००).

यास संस्कृतांत वंग व त्रपु, हिंदीत कलई, मलायांत तिमा, ब्रह्मदेशांत क्ये-प-क्यू अशा तर्‍हेची नांवें आहेत.  सर्व जगाच्या पाठीवर कथलाचा जेवढा खप होतो त्याच्या जवळ जवळ अर्धे कथील संयुक्त मलायासंस्थानांतून येतें.  या ठिकाणची कथलाची खनिज धातू ही मुख्यत्वेंकरून ओढ्यांमधून सांठलेल्या कथलाच्या खनिज द्रव्यांचा सांठा होय.  हल्ली ब्रह्मदेशांतून (बरमा) हि कथलाचा बराच पुरवठा होतो.  हीं कथलाचीं उत्पत्तिस्थानें म्हटलीं म्हणजे मर्गूई आणि तव्हॉय या नांवाचे प्रांत होत.  इ.स. १९१३ सालीं ब्रह्मदेशामध्यें कथील आणि कथलाची खनिज धातु काढण्यांत आली.  तिची किंमत ४६००० पौंड होती.  हजारीबाग नांवाच्या परगण्यामध्यें कथलाची खनिज धातु सांपडत असल्याचें माहीत आहे.  हजारीबाग येथील नोरुळगा खाणीमधून थोडीशी कथलाची खनिज धातु काढ्यांत आली आहे.  इ.स. १९११ मध्यें सर्व जगावरील कथलाची उपज एकंदर ११८२०० टन होती.  यापैकी ५७९४४ टन मलाया द्वीपकल्पामध्यें पैदा झालें.  या जगाच्या पाठीवर कथलाचा एकंदर पुरवठा जेवढा होतो, त्यापैकीं निम्याहून अधिक कथलाची उपज फक्त ब्रिटिश साम्राज्यांत होते.

खुद्द हिंदुस्थानांत कथील फार विरळ सांपडतें  ब्रह्मादेशांत, विशेषतः तेनासेरीमच्या दक्षिणभागांत मात्र कथलाची अशुद्ध धातु बरीच आहे.  बाबलेक संस्थान, करेण्णी, दक्षिण शानसंस्थानें व दक्षिणब्रह्मदेशच्या तबॉय आणि मर्गुई जिल्ह्यांत नद्यांची वाळू धुवून कथलाचे दगड काढण्याचे प्रयत्‍नहि झाले आहेत.  दक्षिण ब्रह्मदेशांत १८९८ ते १९०३ पर्यंत दरवर्षी सरासरी १६४५ हंड्रेडवेट कथील निघे.  पण १९१८ साली १५६०७ हंड्रेडवेट अशुद्ध कथील निघलें.  त्याची किंमत १५९७६७५ रुपये होती.

१९०६-०७ सालीं परदेशाहून मुख्यतः स्ट्रेटस सेटलमेंट मधून हिंदुस्थानांत २९४४०६१ रु. किमतीचें २०३३६ हं. कथील आलें.  आयात मालापैकी जवळ जवळ निम्मा बंगाल्यांत व बाकीचा मुंबई, ब्रह्मदेश व मद्रास येथें जातो.

ब्रह्मदेशांत निघणारें कथील गटांच्या रूपांत परदेशी पाठवितात.  बहुतेक निर्गत माल स्ट्रेटसमध्यें जातो.  १९०३-४ मध्यें ३८८२९ रु. किमतीचें ४८० हं. कथील निर्गत झालें.  १९०६-७ पर्यंत निर्गत बरीच वाढली असून त्या वर्षी ७२३१२ रु. किंमतीचें ९२९ हं. कथील निर्गत झालें.  मुंबइहून इराण व आशियांतील तुर्कस्थानांत कांहीं कथलाची पुनर्निर्गतहि होते.

खनिज कथिल :- अशुद्ध धातूपासून बहुतेक सर्व कथलाची उपज होते, आणि या कथलाची खनिजधातु मर्यादित प्रमाणांत असते.  कारण खणून काढण्याइतकी पुष्कळ ती फारच थोड्या ठिकाणीं आढळते.  ही जी कथलाची खनिज धातु आहे ती वंगपाषाण (कॅसिटराइट) होय.  या खनिज धातूचें विशिष्ट-गुरुत्व जवळ जवळ सात असल्यानें ती जडत्वाबद्दल प्रसिद्ध आहे.  यामुळें या कथलाच्या खनिज धातूसारख्या ज्या दुसर्‍या पुष्कळ खनिज धातू सांपडतात, त्यांपासून ही ओळखतां येते.  ही कथलाची खनिजधातु शुद्ध स्थितींत असली म्हणजे तींत धातुरूपानें कथील जवळ जवळ शेंकडा ७९ भाग असतें.  जगाच्या सर्व पृष्ठभागावर वंगपाषाण (कॅसिटराइट) हा वज्रतुंड (ग्रॅनाइट), गारेचे स्फटिक (क्वॉर्टझ), पॉरफायरी आणि ग्रीसेन हे जे ज्वालामुखींतून रसरूप होऊन आलेले आम्लरूपी (ऍसिडिक) खडक आहेत, त्या खडकांमधून शिरारूप किंवा दृष्टोप्‍तत्तीस येण्यासारख्या कणरूपानें चोहोंकडे पसरलेला आहे.  याशिवाय जंबूर (नीस) नांवाच्या खडकामधून, अभ्रकाच्या खडकामधून (मायकासिस्ट) अथवा (क्लोराइट सीस्ट) नांवाच्या खडकामधून धातूच्या शिरा आढळतात.  परंतु मख्यत्वेंकरून या अशुद्ध कथलाच्या शिरा वज्रतुंड (ग्रॅनाइट) खडकाच्याच आसपास नेहमीं आढळतात.  शिवाय अशुद्ध कथील धातू ही करणरूप आणि खड्यांच्या रूपानें ओढ्याजवळील वाळूमध्यें आढळते.  हीस ''ओढ्याचें कथील'' असें म्हणतात.  हे कथलाचे बारीक कण मूळ सांठलेल्या कथलाच्या दगडाचे क्षरीकरण होऊन झालेले असतात.

खनिज रूपानें जे वंगपाषाण आढळतात ते निरनिराळ्या वर्णाचे व रंगाचे असतात.  जसें :- राखेसारखा करडा (ऍसग्रे), फिकट पिंगट (लाईट ब्राऊन), गुलाबी (पिंक), तृणमणीसारखा पिवळसर (अॅंबर यलो), काळसर पिंगट (डार्क ब्राऊन) आणि काळा (ब्लॅक).  ज्यांचा वर्ण उजळ असतो ते वंगपाषाण साधारणतः अगदी शुद्ध समजले जातात.  या खनिज पाषाणाचें चूर्ण केल्यावर आणि त्यावर सिंधुकर्बनत्रिद (सोडियम सायनाइड) आणि पालाशकर्बनत्रिद (पोट्याशियम सायनाईड) यांची क्रिया करून विस्तवावर उष्णता दिली म्हणजे त्यापासून कथलाच्या धातूच्या बारीक पांढर्‍या मण्यासारख्या गोळ्या होतात.  या घनवर्धनीय असतात.

या खनिज वंगपाषाणाशीं साधारणतः मिश्र झालेले पदार्थ असतात ते हे :- गार (क्वार्टस), पुष्पराग (टोप्याझ), (टूर्मलाइन) चित्रखनिज, तुंगस्थाचे पाषाण (वुल्फरॅम), (क्लोराइट), लोखंड, तांबें आणि ताल यांचे गंधकित (पायराइट्स), ज्या खनिज द्रव्यांत प्लव (फ्ल्युओरिन) असतो त्या खनिज द्रव्याशीं हे वंगपाषाण मिश्र असतात.  यावरून कथल धातू ही वंगप्लविदाच्या रूपानें (फ्ल्यूओराइड ऑफ टिन) मूळ स्थितींत असली पाहिजे आणि या वंगप्लाविदाचें पृथक्करण होऊन त्याशीं मिश्र असलेले खनिज पदार्थ तयार झाले असले पाहिजेत.

खनिज रूपांतून कथल शुद्ध करण्याच्या रीती अवघड आहेत.  प्रथम वंगपाषाण कुटून त्याची चांगली बारीक पूड केल्यावर वंगपाषाण आणि गंधकिद (पायराइटिक मिनरल्स) खनिज द्रव्यें यांचें एकीकरण करणें हें होय.  हीं गंधकिद खनिज द्रव्यें भाजून चांगलीं धुतल्यावर कथलाची खनिज धातु बरीच शुद्ध स्थितींत येते.  या स्थितींत कथलाच्या खनिज धातूला कृष्णवंग (ब्लॅक टिन) असें म्हणतात.  या कथलाच्या खनिज धातूमध्यें जी तुंगस्थ पाषाणांची (वोल्फ रमाइट) अशुद्धता असते ती काढणें प्राचीन काळीं फार त्रासाचें काम होतें.  कारण याचें विशिष्ट गुरुत्व अतीशय असल्यामुळें तें कथलाच्या खनिज द्रव्यापासून काढणें फार जड जात असे.  अलीकडे ही अडचण चुंबकीय (मॅग्नेटिक) पृथककारका (सेपॅरेटर) च्या योगानें दूर झाली आहे.  या प्रमाणें शुद्ध झालेली कथलाची खनिजधातु कोळशाशीं मिश्र करून भट्टींत वितळवितात.  ही भट्टी दोन प्रकारची असते (१) वायुभट्टी किंवा वक्रभट्टी, यानंतर कथलाचा रस करून तो चांगला उकळतात आणि नंतर त्याच्या मोठमोठ्या लगडी पाडून बाजारांत पाठवितात.

उपयोग - कलाकौशल्यांत कथलाचा उपयोग पुष्कळ तर्‍हेनें करितात.  कथलाचा पहिला उपयोग म्हटला म्हणजे भांड्यांस कल्हई करण्यास होतो.  प्रस्तुत लोखंडाचीं मोठमोठीं भांडीं व छपरावर घालण्याचे पत्रे यांसहि कल्हई करण्यांत येते.  हे कथलाच्या कल्हईचे पत्रे म्हणजे लोखंडाचे किंवा पोलादाचे पत्रे असतात.  ते पत्रे कथलाचा रस करून त्यांत बुडवून त्यावर पातळ थर बसविलेला असतो.  शुद्ध कथलावर हवेचा परिणाम होऊन ते गंजत नाही.  त्याचप्रमाणेंच त्याजवर अम्लद्रवाचा (अॅसिड लिक्विड) जसें आसव, लिंबाचा रस, चिंच वगैरे यांचा परिणाम होत नाहीं.  म्हणून स्वयंपाकांतील आणि घरकामांतील भांडीं कथलाचीं करितात.  त्याशिवाय बाप्पीभवन करण्याचीं पात्रें (इव्हॅपोरेटिंग बसीन्स), काढे उकळण्याचीं भांडीं (इनफ्यूजन पॉटस) इत्यादि अनेक उपकरणीं करण्याकडे कथलाचा उपयोग करितात.

भांडीं, उपकरणीं वगैरेशिवाय कथलाचे वर्खासारखे पातळ पत्रेहि करितात.  हे पातळ पत्रे दोन प्रकारचे असतात.  अगदीं पातळ वर्खासारखे कथलाचे पातळ पत्रे असतात, त्यांचा उपयोग भिंगांस पारा चढविण्याच्या ऐवजीं करून आरसे करण्याकडे होतो.  दुसर्‍या जातीचे पत्रे असतात त्यांचा उपयोग तंबाखूचे चिरूट, साबूच्या वड्या, चाकोलेटच्या वड्या वगैरे गुंडाळण्याकडे करितात.

कथलाचा उपयोग पुष्कळ प्रकारच्या मिश्र धातू (अलॉय) करण्याकडेहि होतो.  जसें :- निरनिराळ्या प्रकारचें कांसें (ब्राँझ) म्हणजे तोफांची धातु (गनमेटल), घंटेची धातु (बेलमेटल), इत्यादि.  यांमध्यें कथील तांब्याशीं मिश्र केलेलें असतें.  याचें प्रमाण शेंकडा २० भाग कथील आणि ८० भाग तांबें असतें.  कथील आणि शिसें हीं एकत्र वितळवून यांपासूनहि एक प्रकारची मिश्रधातु होते.  या मिश्रधातूसहि मराठींत कांसें असें म्हणतात, परंतु इंग्रजींत यास प्युटर असें नांव आहे.  यांत कथील चार भाग आणि शिसें एक भाग वितळविलेलें असतें.  पुष्कळ प्रकारचे डांक तयार करण्याकडेहि कथलाचा उपयोग होतो.  अंज (ऍंटीमनी) आणि कथील वितळवून तयार केलेल्या मिश्रधातूस 'ब्रिटानिया' धातू असें म्हणतात.  या धातूचा उपयोग चमचे, पळ्या वगैरे तयार करण्याकडे अतिशय होतो.  ''क्वीन्स मेटल'' ही कथील, शिसें आणि अंज धातू मिश्र करून तयार केलेली असते.  'बॉबिट् मेटल' नांवाची धातू कथील, तांबें आणि अंज धातूशी मिश्र केलेली असते.  डांकाच्या (फ्यूजि-बलडांक लावण्याकरितां जलद वितळणारी धातु) धातूमध्यें कथील आणि शिसें यांच्या मिश्र धातूचा उपयोग केलेला असतो.  कथील, शिसें आणि बिस्मथ यांच्या मिश्रणापासून तयार केलेली मिश्र धातु पाण्याच्या उत्क्वथनांकापेक्षां कमी उष्णमानावर वितळते.  त्याशिवाय कथलाचा उपयोग पांढरी जिल्हई, मिना (कांचेसारखा मुलामा), नकशी केलेलीं मातीची भांडीं (मॅजोलिका) वगैरे तयार करण्याकडे होतो.  याशिवाय रंग देण्याच्या कामीं लागणारे निरनिराळे कथलाचे क्षार आणि इतर रासायनिक कला यांत कथलाचा उपयोग अतिशय होतो.

भांड्यानां कल्हई करण्याची रीत :-  ज्या भांड्यांनां कल्हई करणें असेल तीं भांडीं स्वच्छ घांसून तीक्ष्ण टोंकाच्या हत्यारानें सर्व मळ व जुनी कल्हई खरडून काढावी, नंतर तें भांडें भट्टींत घालून खूप तापवावें.  मग त्यावर कथलाची कांब थोडीशीं फिरवावी व नवसागराची पूड सर्व भांड्यांत थोडी पसरून टाकून चिंध्यांच्या बोळ्यानें तें कथील त्या भांड्यास खूप चोळावें.  कच्चें नवसागर पाण्यांत कढवून थंड करून त्याची पूड बनवितात ती या कामास उपयोगी पडते.

पन्हाळ पाडलेले व साधे लोखंडी पत्रे यांवर कल्हई करण्याची रीत :- ही कल्हई दोन तर्‍हेची असते.  शुद्ध कथील वितळून त्याचा पातळ थर देणें किंवा कथील व शिसें एकत्र करून त्या मिश्रणाचा थर देणें.  पहिल्या जातीच्या पत्र्यास (टिनप्लेट) कथलाच्या कल्हईचा पत्रा व दुसर्‍या जातीच्या पत्र्यास टर्नप्लेट अशीं व्यापारी नांवें आहेत.  ह्या कामास लागणारे पत्रे पोलादाचे असतात.  पूर्वी लोखंडी पत्र्यांचाहि उपयोग करीत.  परंतु अलीकडे पोलादी पत्र्यांवरच कल्हई चढवितात.  ही कल्हई देण्याची फक्त बोहोमियांतील लोकांनांच माहिती होती.  तेथून १६२० च्या सुमारास साक्सनींत त्या कलेचा प्रसार झाला.  १६६५ त अंड्रयू यारन्टन नांवाच्या एंजिनियरला इंग्लंडच्या लोकांनीं ही कला शिकण्याकरितां बोहेमियांत पाठविलें होतें.  त्यानें मिळविलेल्या माहितीचा विशेष उपयोग झाला नाहीं.  त्याच्या नंतर ५० वर्षांनीं ह्या कलेचा उत्कर्ष झाला व इंग्लंडमध्यें तयार झालेले पत्रे उच्च प्रतीचे ठरले.  १८३४ पासून पुढें या धंद्याची फार भरभराट झाली.  या कामाकरितां पत्रे प्रथम तापवितात व स्वच्छ घांसून गंधकाम्ल घातलेल्या पाण्यांत अगदीं स्वच्छ व चकचकीत होईपर्यंत ठेवितात.  नंतर पाण्यांत धुवून ऍसिडचा व पाण्याचा अंश शिल्लक न रहावा म्हणून खोबरेल तेलांत पत्रे शिजवितात व त्यानंतर वितळलेल्या कथलाच्या कढत्या मिश्रणांत ते बुडवितात.  नंतर पहिल्यापेक्षांहि जास्त शुद्ध असलेल्या कथलाच्या दुसर्‍या मिश्रणांत कांहीं वेळ पत्रे राहूं देतात.  नंतर अंबाडीच्या बोळ्यानें स्वच्छ घांसून ते पत्रें पुन्हां तिसर्‍यांदा कथलाच्या मिश्रणांत बुडवितात.  म्हणजे त्यावर पुरी कल्हई होते.  याच पद्धतीनें टर्नप्लेट तयार करतात.

औषधि उपयोग :-  आर्यवैद्यकांत वंगभस्माचे उपयोग पुष्कळ सांगितले आहेत.  हें भस्म करण्याची रीति शार्डधर नांवाच्या वैद्यकग्रंथांत पुढीलप्रमाणें दिली आहे :-  मातीचें खापर चुलीवर ठेवून त्यांत कथलाचा रस करावा.  मग चिंचेची साल व पिंपळाची साल या दोन्ही सालींचें चूर्ण कथलाचा १/४ हिस्सा घेऊन कथलाच्या रसावर थोडें थोडें टाकीत जावें, नंतर लोखंडाच्या पळीनें घोंटावें.  याप्रमाणें सुमारें दोन प्रहर घोटल्यास कथलाचें भस्म होतें.  त्या भस्माच्या समभाग हरताळ घेऊन कागदी निंबाच्या रसांत दोहोंचा खल करून मातीच्या परळांत घालून मातीकापड करावी व खड्डा खणून रानगोंवर्‍याचा गजपुट अग्नि द्यावा.  याप्रमाणें दहा अग्निपुटें दिलीं असतां कथलाचें भस्म उत्तम होतें.  यालाच वंगभस्म म्हणतात.  हें अनुपानपरत्वें निरनिराळ्या व्याधींवर उपयोगी पडतें.

इतिहास - फार प्राचीन काळापासून कथलाची माहिती सांपडते.  ऐतिहासिक कालापूर्वी हजारों वर्षे या धातूचा उपयोग कांसें (ब्राँझ) तयार करण्याकडे होत होता.  मानवी जातीची उन्नति आणि कांसें याचा फार निकट संबंध आहे.  पाषाणयुगानंतर लोहयुगाचा आरंभ होण्यापूर्वी कांस्ययुगाचा आरंभ झाला.  यूरोपमध्यें इ.स. पूर्वी २००० ते १८०० च्या दरम्यान कांस्ययुगाचा आरंभ झाला असावा असें पुष्कळ संशोधक पंडितांनीं निश्चित केलें आहे.  यावरून हें स्पष्ट आहे कीं या पुरातन कालीं यूरोपमध्यें कथलाच्या धातूची माहिती होती.  परंतु तांब्याची आणि कथलाची अशुद्ध खनिज धातु एकत्र वितळवून किंवा तांबें आणि कथील या शुद्ध धातू एकत्र वितळवून कांसें तयार करीत असत कीं नाहीं हें निश्चित माहीत नाहीं.  पुष्कह संशोधक पंडितांनीं अशी एक उपपत्ति पुढें आणिली आहे कीं, मनुष्याला कांसें तयार करण्याची माहिती ही केवळ आकस्मिक रीतीनें झाली असावी.  कथील, तांबें, लोखंड आणि गंधक यांचे संयुक्त असलेले खनिज पायराइट नांवाचे पदार्थ (गंधकिदें) हे सृष्टीमध्यें पुष्कळ सांपडतात, ते आणि एक जातीचें दुर्मिळ असणारें खनिज द्रव्य यांचे मिश्रण होऊन तें अकस्मात कोळशाच्या उष्णतेनें वितळण्यांत आलें असावें.  आणि त्यापासून कांसें तयार झालें असावें.  परंतु रसायन शास्त्राच्या दृष्टीनें आणि कलाविज्ञानशास्त्राच्या दृष्टीनें ही कल्पना संयुक्तिक वाटत नाहीं.  अशीहि एक कल्पना पुढें मांडण्यांत येते कीं प्रागैतिहासिक कालाच्या आधीचें कांसें हें नाना प्रकारच्या तांब्याच्या खनिज अशुद्ध धातू आणि पुष्कळ सांपडणारे कथलाचे खनिज दगड हे एकत्र वितळवून तयार करीत असत.  ही जर कल्पना खरी मानिली तर चिनी कांसें खेरीजकरून बाकीच्या सर्व प्राचीन कांश्यामध्यें शेंकडा १० प्रमाणांत कथील आणि शेंकडा ९० प्रमाणांत तांबें असतें याचें समाधानकारक स्पष्टीकरण होण्यास अडचण पडते.  शिवाय धातुविद्येच्या दृष्टीनें पाहतां हल्लींप्रमाणें दोन धातू एकत्र वितळवूनच आपल्या पूर्वजांनीं प्रथम कांसें तयार केलें असलें पाहिजे हेंच मत ग्राह्य मानावें लागतें.  याशिवाय कांहीं प्रांतांतील झर्‍यांत कथलाची अशुद्ध धातु विपुल सांपडते आणि तिजपासून कथील धातुरूपांत सहज काढतां येते.  या गोष्टीचा विचार करितां कांस्ययुगांतील सुसंस्कृत माणसांत कथील हें धातुरूपांत माहीत असलें पाहिजे हीच कल्पना अधिक संभवनीय दिसते.  स्वित्झर्लंड देशांत जीं सरोगृहें होतीं त्यांत कथलाच्या पातळ पत्र्यांनीं मढविलेले कांहीं पदार्थ, मातीचीं भांडीं आणि मोगरे (नॉब्स) सांपडलेले आहेत.  त्याचप्रमाणें श्लेसविग् हॉलस्टिन जवळील आमरूम बेटावरील प्राचीन कबरस्थानांत कथलाच्या निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू सांपडलेल्या आहेत.

इजिप्‍त देशांत दहा भाग कथील असलेल्या कांश्याचा उपयोग बर्‍याच प्राचीनकाळीं म्हणजे बाराव्या राजघराण्याच्या कारकीर्दीत निरनिराळ्या प्रकारचीं हत्यारें व इतर कामाकरितां करीत असत.  तांबें आणि कथील यांची मिश्र किंवा जोडधातु ही तांब्यापेक्षां अधिक कठिण असते, म्हणून तिचा उपयोग तरवारी, भाले आणि कुर्‍हाडी करण्याकरितां करीत असत.

हिंदुस्थानांत वेदकालीं कथील माहीत होतें.  सोनें आणि रुपें यांशिवाय कथलाचा उल्लेख तैतिरीय संहितेंत व शुक्ल यजुर्वेदांत आला आहे.  उदाहरणार्थ '' सीसंचमे त्रपुश्चमे लोहंचमे'' (तै. सं. ४.७, ५) त्याचप्रमाणें छांदोग्यउपनिषदामध्यें (४.१७, ७) कथलाचा उल्लेख आहे.  उदाहरणार्थ लवणेन सुवर्ण संदध्यात, सुवर्णेन रजतम, रजतेन त्रपुं (कथील), त्रपुणासीसम, सीसेन लोहम, लोहेन दारु, दारु चर्मणा ।

फार प्राचीनकाळीं हिंदुस्थानांत तांबें आणि कथील एकत्र वितळवून तयार केलेल्या कांस्याचा उपयोग माहीत होता.  उदाहरणार्थ :- ''यथा त्रपुस्ताम्रयो: संयोगे धात्वन्तरस्य कांस्यस्योत्पत्ति:'' मनुसंहितेमध्यें घरांत उपयोगी पडणार्‍या कथलापासून केलेल्या भांड्याचा उल्लेख आलेला आहे.  परंतु या कामीं लागणारें कथील कोणच्या ठिकाणाहून आणीत असत याचा उल्लेख केलेला नाहीं.  बहुतकरून सयाम, ब्रह्मदेश आणि मलाया द्वीपकल्प येथून सदर कथलाचा पुरवठा होत असावा.

यूरोपमधील प्राचीन पूर्वज ज्या कथलाचा उपयोग करीत असत, तें बहुतेक सर्व कथील फिनिशियन लोकांनीं कॅसिटराइड्सकडून आणलेलें असे.  या कॅसिटराइड्सचें स्थान कोणतें असावें याबद्दल पुष्कळ कल्पना करण्यांत आलेल्या आहेत; आणि पुष्कळ विद्वान पंडितांनीं असें सिद्ध करण्याचा प्रयत्‍न केला आहे कीं, कॅसिटराइड्स नांवाचीं बेटें हिंदुस्थानच्या जवळच आसपास फिनिशियाच्या पूर्वेस कोठें तरी असावीत.  पुराणवस्तुशास्त्रज्ञ पंडितांपैकीं पुष्कळांचें असें मत आहे कीं, कॅसिटराइड्स नांवाचीं बेटें हीं सिलिआइल्स आणि चॅनेल आयलंड्स हींच होत, व त्यांत मुख्यत्वेंकरून कॉर्नवॉल हेंच असावें.  कारण त्या कालीं मुख्य बेटापासून हें निराळें मानण्यांत येत असे.  कथील या अर्थी ग्रीक शब्द कॅसिटरॉस हा आहे; आणि कॅसिटरॉस हा शब्द हिब्रू शब्द कत्सेह - शेवट या अर्थी बहुतेक असावा.  या ठिकाणीं शेवट याचा अर्थ पृथ्वीचें टोंक असा आहे आणि ब्रिटन देशचा किनारा हा पूर्वजांस तसा वाटणें हें शक्य आहे.  कास्तीर हा शब्द सं. काश - प्रकाशणें यापासून झाला असून, कास्तीरपासून अरबी शब्द कास्दीर हा झाला आहे (थॉर्प - हिस्टरी ऑफ केमिस्ट्री पु. १ पाहा).

अर्वाचीन यूरोपियन भाषांमध्यें कथील यास निरनिराळीं नांवें आहेत.  जसें :-  झिन, टिन, इटेन स्टॅग्रो, एस्ताना इत्यादि; हीं सर्व नांवें केल्टिक धातु 'इस्तश्न' यापासून निघालेलीं आहेत.  यावरून फिनिशियन लोकांचें कॅसिटराइड्स म्हणजे कॉर्नवॉल असावें या उपपीला बळकटी येते.  प्रस्तुत कॉर्नवालमधील कथलाच्या खाणींतील उपज फार अल्प प्रमाणावर आहे.

प्राचीन काळीं कथलाच्या वस्तू फार तुरळक होत्या याचें आश्चर्य वाटण्याचें कारण नाहीं.  कारण कथलाची फार चमत्कारिक विकृति होते किंवा त्या धातूसच प्रत्यक्ष संसर्गजन्य रोग होतो हें प्रस्तुत माहीत आहे.  कथलाची ही विकृति दुसर्‍या धातूंच्या विकृतीप्रमाणें नसते.

लोखंड आणि तांबें रासायनिक क्रियेनें हवेंतील प्राणवायु (ऑक्सिजनं) आणि पाणी यांशीं संयुक्त होऊन त्यापासून नवीन संयुक्त पदार्थ उत्पन्न होतात.  लोखंडाचें उतप्राणिद् (हायड्रॉक्साइड) होतें आणि तांब्याचें जलयुक्त कर्बित (मॅलचाइट) होतें.  परंतु कथलावर कांहीं रासायनिक क्रिया घडत नाहीं.  तें धातुरूप कथलाच्याच रूपांत रहातें, परंतु तें हलके हलके बुर्‍या रंगाचें होऊन रजोरूप बनतें व त्याची भुकटी होते.  अतिशय थंडी आणि आर्द्रता यांच्या योगानें ही कथलाची विकृति लवकर घडून येते.  परंतु ती निर्जल स्थितींतहि घडते.  या कथलाच्या विकृतीला ''कथलाची सांथ'' असें योग्य व अन्वर्थक नांव उट्रेक्टचा प्रोफेसर अर्नस्ट कोहेन यानें दिलें आहे.  एखाद्या कथलाच्या भांड्यावर या कथलाच्या सांथीचा हल्ला झाला म्हणजे त्या भांड्याचें संरक्षण करणें अशक्य होतें.  कारण ती विकृति कथलांत पसरत जाते आणि तें ठिसूळ होऊन शेवटीं त्याची भुकटी होते.  या कथलाच्या पुडीच्या अंगीं, दुसरीं कथलाचीं भांडीं जवळ असल्यास त्यांसहि स्पर्शाच्या योगानें ही सांथ त्यांत उत्पन्न करण्याचें सामर्थ्य असतें.  असें होतां होतां अगदीं सन्निध असणारीं कथलाची सर्व भांडी नाश पावतात.  या प्रकारें कथलाचा नाश झाल्याचीं पुष्कळ उदाहरणें माहीत आहेत.  उदाहरणार्थ : इ. स. १८६८ सालीं पेट्रोग्रॅड येथील जकात खात्याच्या इमारतींतील कोठारांत ठेवलेल्या ब्लांका कथलाच्या (श्वेतवंगाच्या) लगडी सर्व पिष्टरूप झालेल्या आढळल्या; आणि रशियाच्या सरकारी दारूखान्यांत लढाईच्या प्रसंगीं घालण्यांत येणारे एकसारखे पोशाख (युनिफॉर्म) यांस लावण्याच्या कथलाच्या गुंड्यांचे ढीग होते.  त्या ठिकाणीं पिठाचे लहान लहान ढील आढळले !  इ.स. १८७७ च्या हिंवाळ्यांत रॉटरडॅम येथून आगगाडीनें मास्कोला पाठविलेलें सर्व कथील भुकटीच्या रूपांत आलें.  फिनलंड येथील ख्रिस्त देवालयांतील वाजाविण्याच्या पेट्यांनां असलेल्या कथलाच्या नळ्या त्याचप्रमाणें घराच्या छपरावरील कथलाचे पत्रे यांस वारंवार कथलाच्या सांथीचा विकार झालेला आहे.

कथलाची अशी विकृति होण्याचें खरें कारण पुष्कळ दिवसपर्यंत माहीत नव्हतें.  प्रथम अशी कल्पना होती कीं, ही विकृति अशुद्ध हवेमुळें घडत असावी.  दुसरी अशीहि कल्पना करण्यांत येत होती कीं, घरावरील छपरें आणि गाण्याबजावण्याचीं यंत्र (जसें अलगुजें, पावे वगैरे) ही जशीं वारंवार हलविलीं जातात त्याचप्रमाणें कथील धातूवर अविरत हालण्याची क्रिया घडल्यामुळें ही विकृति घडत असावी.  परंतु फ्रिट्स येथील अन्स्ट कोहेन आणि व्होन इजिक यांनीं केलेल्या प्रयोगांवरून असें सिद्ध झालें आहे कीं, कथील धातूवर घडणारी विकृति ही त्याच्या अंतस्थ स्फटिकीय घटनेचें अवस्थांतररूपच होय; आणि यामुळें कथलाच्या आकारमानाची (व्हॉल्यूम) दृश्य वृद्धि होते.  ही विकृति गंधकाच्या स्फटिकाच्या रूपांत ज्याप्रमाणें होते त्यासारखीच आहे.  गंधकाचे चौकोनी सुईसारख्या आकाराचे लांब स्फटिक प्रथम असतात.  त्यांचें रूपांतर सावकाशपणें घडून त्यांचे अष्टपैलू स्फटिक होतात.  त्याचप्रमाणें कथलाच्या बाबतींत त्याच्या स्फटिकाचा आकार बदलतो.  परंतु तो फार सावकाश घडून येतो इतकेंच.  हे गंधकाचे अष्टपैलू स्फटिक उष्णतेच्या योगानें ज्याप्रमाणें चौकोनी रूपांत पुन्हा पूर्ववत् आणतां येतात, त्याचप्रमाणें ही कथलाची कबरी रंगाची पूड उष्णतेच्या योगानें पांढर्‍या शुभ्र कथील धातूच्या रूपांत आणतां येते.

(मॉडर्न रिव्ह्यू.  जुलै १९१७.  ए.ब्रि. वाट.  देशी वैद्यक ग्रंथ.  दत्त - मटी.  मेडिका ऑप दि हिंदूज, इत्यादि.)

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .