प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कडाप्पा, जिल्हा - मद्रास इलाख्यांत असलेल्या जिल्ह्यापैकीं अगदीं आग्नेय दिशेचा जिल्हा.  क्षे.फ. ८७२३ चौ. मै. तेलगू भाषेंत कडाप्पा याचा अर्थ ''दरवाजा'' असा असून कडाप्पा गांव हें तिरुपति येथील पवित्र ठिकाणीं जाण्याचा दरवाजा असल्यामुळें यांस हें नांव पडलें.

मर्यादा :- उत्तरेस कुर्नुल; पूर्वेस, नेलोर; दक्षिणेस उत्तर अर्काट व म्हैसूर; आणि पश्चिमेस, अनंतपूर.

स्वभाविक वर्णन :- याचे पश्चिमेकडील चार तालुके म्हैसूरच्या पठारांत असून, जिल्ह्याच्या इतर भागांपेक्षा उंचावर आहेत.  या दोन भागांच्या दरम्यान शेषाचलम् व पालकोंड हे डोंगर आहेत.  उंचवट्याच्या प्रदेशांतील जमीन तांबडी, नापीक व मधून मधून खडकाळ आहे; आणि सखल भागांतील जमीन काळी आहे.  नल्लमलेचे डोंगर कुर्नूलपासून दक्षिणेकडे गेलेले आहेत.

पेन्नार ही या जिल्ह्यांतील मुख्य नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वहात जाऊन सोमसीलच्या खिंडीतून नेल्लोर जिल्ह्यांत शिरते.  हिला सगिलेरू व कुंडेरू या नद्या मिळतात.  चेयेरू, पापघ्नी, व चित्रावती ह्या नद्या उंच प्रदेशांतून वाहतात व पालकोंड डोंगराच्या खिंडीतून गेल्यावर सखल प्रदेशांत पेन्नारला मिळतात.  या सर्व नद्या लहान असून उन्हाळ्यांत त्यांनां पाणी नसतें.

या जिल्ह्याच्या दोन नैसर्गिक विभागांची हवा भिन्न आहे.  कडाप्पा गांवाच्या आसपासच्या भागांतील हवा मलेरियायुक्त आहे; व उंचवट्याच्या बहुतेक भागाची हवा निरोगी व तकवा आणणारी आहे.  कडाप्पाजवळच्या प्रदेशांत उन्हाळा फार असतो; तेथें मे महिन्यांतील उष्णमान सरासरी ९५० असतें.  या जिल्ह्यांत सर्व ठिकाणीं पाऊस सारखा पडत नाहीं.  परंतु येथील वार्षिक पावसाचें मान सरासरी २८ इंच आहे.  कधी कधीं पाऊस जास्त झाल्यामुळें लोकांचें नुकसान होतें.

इतिहास :-  या जिल्ह्याचा इतिहास म्हणजे यावर शेजारच्या राजांनीं केलेल्या स्वार्‍यांचा इतिहास होय.  अकराव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत हा जिल्हा तंजावरच्या चोल राजांच्या ताब्यांत होता.  चवदाव्या शतकांत विजयानगरकडे राहून त्यांचा मोड झाल्यानंतर तो गोवळकोंड्याच्या कुतुबशाही सुलतानाकडे आला.  त्यानंतर उंचवट्याचे तालुके, पूर्वीच्या छोट्या किल्लेदारांच्या हातांत गेले व अखेर सर्व जिल्हा इंग्रजांच्या हातांत आला.

१६७८ त शिवाजीच्या सैन्यानें हा जिल्हा उध्वस्त करून टाकिला.  पुढें १० वर्षांनीं औरंगझेबानें त्यावर स्वारी केली.  कर्नाटकच्या युद्धांत, कडाप्पाच्या नबाबानें मुझफरजंगाचा पक्ष स्वीकारून विश्वासघातानें नासिरजंगास मारिलें.  १७५२ मध्यें दक्षिणेचा नवा सुभेदार सलाबतजंग यानें हा जिल्हा आपल्या ताब्यांत घेऊन त्यावर मुझफरजंगाच्या लहान मुलास नेमिलें.  १७५७ त मराठ्यांनीं नबाबाचा पराभवर करून, त्याजपासून अर्धा मुलूख मिळविला; यांत गुरुमकोंडचा किल्लाहि होता.  नंतर ५ वर्षांनीं हा किल्ला हैदरअल्लीनें घेतला, व उरलेला प्रदेशहि घेण्याचा त्यानें प्रयत्‍न केला.  या कामांत माधवराव पेशव्यानें त्याला अडथळा केला व मराठ्यांनीं गुरुमकोंडचा विल्लाहि परत घेतला, परंतु १७७२ त माधवराव पेशवे मरण पावल्यामुळें हा किल्ला व पुढें बाकीचा प्रदेश हैदरच्या ताब्यांत गेला.

१७८२ त हैदर मरण पावल्यावर, टिपूचा सेनापति कमर उद्दीन याच्या ताब्यांत हा जिल्हा होता.  टिपूच्या निजामशीं झालेल्या युद्धानंतर १७९२ च्या तहांत, गुरुमकोंडचा किल्ला व जिल्ह्याचा बहुतेक भाग निजामास देण्यांत आला.  टिपूच्या मरणानंतर उरलेला भागहि निजामास मिळाला व निजामाकडून, मदतसैन्याच्या खर्चाकरितां सर्व जिल्हा १८०० त इंग्रजांस देण्यांत आला.

प्राचीन अवशेष :- गुरुमकोंड व गंडिकोट हे किल्ले जुने आहेत.  पेन्नारच्या खोर्‍यांत ऐतिहासिक कालापूर्वीची दगडाचीं हत्यारें, जुनी हिंदु नाणी वगैरे सांपडलीं आहेत.  सोमपल्ले व कदिरी येथील हिंदू देवालये प्रसिद्ध आहेत.

लोकसंख्या :-  कडाप्पा जिल्ह्याची लो. सं. (१९२१) ८८७९२९ आहे.  पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षां जास्त आहे.  तेलगू ही येथील मुख्य भाषा आहे.

येरुकल लोकांच्या फिरणार्‍या टोळ्यांशिवाय, बहुतेक सर्व हिंदू तेलगू वंशाचे व थोडेसे तामील वंशाचे आहेत.  मुसुलमानांत शेखांचा भरणा जास्त आहे पण हिंदु मुसलमानांच्या विवाहापासून उत्पन्न झालेल्या दुदेकुलाची संख्याहि बरीच आहे.  शे. ७१ लोकांची उपजीविका शेतकीवर अवलंबून असते.

शेतकी :- रयतवारी व इनामीपद्धति या जिल्ह्यांत चालू आहेत.  चोलम, कंबु व रागी हीं येथील मुख्य पिकें आहेत.  याशिवाय तांदूळ, कापूस, तंबाखू, ऊंस वगैरे पिकेहि होतात.  शेताला पाणी पुरविण्याकरितां कुर्नूल कडाप्पा कालवा, व सगिलेरू नदीला बांध घालून काढलेला कालवा असे दोन कालवे या जिल्ह्यांत आहेत.  याशिवाय या जिल्ह्यांत पुष्कळ तळीं आहेत.  त्यांचाहि शेतांनां चांगला उपयोग होतो.

जंगलें :-  २३६० चौरस मैल जागा जंगलांनीं व्यापिलेली आहे.  त्यापैकीं बहुतेक डोंगरावर व टेंकड्यावर असून सखल जमीनीवर फारच थोडीं जंगलें आहेत.  पुल्लंपेट तालुक्यांतील पालकोंड डोंगरावरची; रयचोटी व सिध्दौत तालुक्यांतील व नल्लमलेवरचीं जंगलें बरींच मोठीं आहेत.

धंदे व व्यापार :- येथें महत्त्वाचा धंदा मुळींच नाहीं.  पुल्लंपेटचे जरीचे कपडे प्रसिद्ध आहेत.  प्रोदतूर येथें कापूस दाबण्याच्या दोन गिरण्या हंगामांत चालतात.

मुख्य निर्गत माल :- डाळी, हरभरा, एरंडी, चोलम, नीळ हळद, गूळ तांदूळ, कापूस वगैरे.

मुख्य आयात जिन्नस :-  मीठ, विलायती कापड, भांडीं, नारळ, केरोसीन तेल वगैरे.

प्रोद्दतूर, जम्मल मदुगु, वायलपाद, व पुल्लंपेठ हीं व्यापाराचीं मुख्य ठिकाणें आहेत.  या जिल्ह्यांत व्यापार विशेष चालत नाहीं.

दळणवळणाचीं साधनें :-  यांत मद्रास रेल्वेचा वायव्य फाटा आग्नेय दिशेस पद्दपादूपासून वायव्येकडे गेलेला आहे.  हा फाटा कडाप्पावरून जातो.  साउथ इंडियन रेल्वे दक्षिण सरहद्दीवर पिलेरूजवळ या जिल्ह्यांत शिरून वायव्येकडे जाते.  या जिल्ह्यांत असलेल्या पक्या रस्त्यांची एकंदर लांबी ६४२ मैल व कच्च्या रस्त्यांची ६६२ मैल आहे.

राज्यकारभार :-  कडाप्पा जिल्ह्याचे चार पोटविभाग आहेत ते येणेंप्रमाणें :-  (१) रायचोटी, कदिरी, वायलपाद व मदनपल्ले हे तालुके मिळून होणारा मदनपल्ले पोटविभाग; (२) जम्मल मदुगु, यांत प्रोद्दतूर जम्मलमदुगु, पुलिवेंद हे तालुके आहेत; (३) सिध्दौत; यांत बदवेल सिध्दौत, व पुल्लंपेट हे तालुके आहेत; (४) चौथा कडाप्पा.  कडाप्पा येथें जिल्ह्याचा कलेक्टर, व इतर भागांवर डेप्युटी कलेक्टर, व प्रत्येक तालुक्यावर तहशीलदार आहेत.  पिलेरू, चित्वेल, कमलापुरम् व कडाप्पा येथें डेप्युटी तहशीलदार आहेत.

न्याय देण्याकरितां डिस्ट्रिक्ट जज्ज, सेशन्स कोर्ट व मुनसफ कोर्टे इतर जिल्ह्याप्रमाणे येथेंहि आहेत.  द्वेष व हेवा यामुळें येथें खून फार होतात.  दुष्काळाच्या वेळीं दरोड्यांची संस्था वाढते.

कडाप्पा येथील म्युनिसिपालिटीखेरीज इतर ठिकाणचा स्थानिक कारभार जिल्हाबोर्ड, व सिध्दौत, मदनपल्ले, कडाप्पा व प्रोद्दतर येथील तालुकाबोर्डाकडे आहे.

शिक्षण - शिक्षणाच्या बाबतींत हा जिल्हा फार मागसलेला आहे.

तालुका - मद्रास इलाख्यांत कडाप्पा जिल्ह्यांतील एक तालुका व पोटविभाग.  क्षेत्रफळ ५०९ चौ.मै.

दक्षिणेस व पूर्वेस पालकोन्डा टेंकड्या असून उत्तरेस लंकमल्ल पर्वताची ओळ आहे.  लोकसंख्या १००५३५.  पाऊसपाणी ३२ इंच.  यांत कडाप्पा गांव असून ९९ खेडीं आहेत.  ह्या तालुक्यांतून पश्चिम-पूर्व पेन्नारनदी वहाते.  कुन्देरू, पापघ्नी व बगेरु ह्या तीन नद्या तीस येऊन मिळतात. जमीनींत सोरा वगैरे द्रव्यें असल्यामुळें ती पिकास चांगली नाहीं.

गांव - मद्रास इलाख्यांतील कडाप्पा जिल्ह्यांतील कडाप्पा तालुक्याचें व जिल्ह्याचें मुख्य ठिकाण.  मद्रासहून रेल्वेनें १६१ मैल आहे.  व समुद्रसपाटीपासून ५०७ फूट उंच आहे.  लोकसंख्या १७८०७.  पैकीं अर्धी लोकसंख्या मुसुलमानांची असून हे लोक अगदीं निरक्षर व धर्मवेडे आहेत अशी त्यांची ख्याति आहे.  नेकनाम खानच्या नांवावरून ह्या गांवास मुसुलमान आमदानींत नेकनामाबाद म्हणत असत.  गांवाच्या तीन बाजूस टेंकड्या असून, सर्व इलाख्यांपेक्षां येथें उष्णता फार असते.  येथें मलेरियाची साथ असते.  १५७० सालीं गोंवळकोंड्याच्या एखाद्या सरदारानें येथें किल्ला उभारला असावा असें वाटतें.  १८ व्या शतकाच्या सुरवातीस कडाप्पाच्या पठाण नबाबाच्या ताब्यांत भोंवतालचा गुतीखेरीज करून प्रदेश आला.  व बारा महालहि त्यानें घेतले.  ह्या जिल्ह्याच्या वेगळ्या वेगळ्या नबाबांचा इतिहास जिल्ह्याच्या इतिहासांत दिला आहे.  सन १८०० मध्यें निझामसरकारनें हा प्रदेश कंपनी सरकारास दिला. सन १८६८ सालीं येथें छावणी ठेवण्यांत आली.  कडाप्पा हॉस्पिटल नांवाचें एक इस्पितळ आहे.  येथें एक ट्रेनिंग स्कूल व दोन, तीन हायस्कुलें आहेत.  दगडाच्या खाणीहि बर्‍याच आहेत.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .