प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कटक, जिल्हा - कटक हा बिहार व ओरिसा प्रांतांत ओरिसा विभागांतील एक जिल्हा आहे.  क्षे. फ. ३६५४ चौ. मै. याच्या उत्तरेस वैतरणी नदी, धाम्रनदीमुख व पलीकडे बलसोर जिल्हा; पूर्वेस बंगालचा उपसागर; दक्षिणेस पुरी, पश्चिमेस ओरिसाचीं मांडलिक संस्थानें.

स्वाभाविक वर्णन :- कटकचे तीन विभाग आहेत.  (१) किनार्‍याची ३ ते ३० मैल रुंदीची अरण्याच्छादित व दलदलीची पट्टी; (२) महानदीच्या मुखप्रदेशाच्या जुन्या भागांतील भाताची जिराइती जमीन; (३) पश्चिम सरहद्दीवरील तुटक व डोंगराळ प्रदेश.  चंदनाचीं झालें व बौद्ध अवशेष असलेला नल्तिगिरी; बुद्धाची भव्य मूर्ति, पवित्र तळें, देवालयांचे अवशेष व गुहा ज्यावर आहेत असा उदयगिरी; या जिल्ह्यांतील सर्वांत उंच व वर जुनी मशीद असलेला अस्सिअ; व पुष्कळ वर्षे ज्या ठिकाणीं शिवपूजा होत आहे असें महाविन्यक शिखर हे या जिल्ह्यांतील मुख्य डोंगर आहेत.

पश्चिम सरहद्दीवरील डोंगरांतून तीन मोठ्या नद्या निघतात.  वैतरणी नदी केओंझर संस्थानांत उगम पावून कटक व बलसोर यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वहात जाते; कटकच्या पश्चिमेस ७ मैलंवर, नराजजवळच्या दोन डोंगरांमधून महानदी जाते; या दोन नद्यांच्यामध्यें ब्राह्मणीनदी या जिल्ह्यांत शिरते.  किनार्‍यापाशीं या नद्या जवळ जवळ येऊन एकमेकींपासून ३० मैलांच्या अंतरानें वाहतात.  यामुळें यांनां पूर आल्यावर त्यांचीं पात्रें फार लहान पडून पाणी देशभर पसरतें.  वैतरणी व ब्राह्मणीं या नद्यांचा संगम होऊन धाम्र या नांवानें दोन्ही प्रवाह बंगालच्या उपसागरास पालमिरास टोंकाजवळ मिळतात.  जिल्ह्याच्या आग्नेय टोंकाकडे महानदी दोन मुखांनीं उपसागरास मिळते.  या सर्व नद्यांनां दुसर्‍या लहान नद्या मिळतात त्या :- कातजुरी, पैका, विरूपा, व चितर्तळ या होत.  इतर नद्या विशेष महत्त्वाच्या नाहींत.

भूस्तर वर्णन :- ब्राह्मणी नदीच्या दक्षिणेस उलती परगण्यापर्यंत, जंबूर दगड असलेल्या टेंकड्या सर्व देशभर पसरलेल्या आहेत.  कांहीं मैलपर्यंत हा दगड दृढ बनलेला आहे; परंतु दक्षिणेकडे त्याचें विघटन झालेलें असून त्यांत पृथक्करण झालेल्या चुनखडीचे तांबडे डाग आहेत.  हा दगड मऊ असल्यामुळें पुष्कळ कामाकरितां याचा उपयोग होतो.  दक्षिणेकडील चढउतार असलेल्या मैदानांत कुरुंद व मधून मधून जंबूर आढळतो.  कटकच्या पश्चिमेकडे व नैऋत्येकडे महानदीजवळच्या टेंकड्या वाळू, गोटे, रेती, आणि पांढरी व तांबडी माती यांच्या बनलेल्या आहेत.  

प्राणी :- वाघ, चित्ता, अस्वल, रानरेडे, नीलगायी, ठिपक्यांचें हरीण, डुक्कर, कोल्हे, खोंकड, रानटी डुकरें व सुसरी येथें आढळतात.

हवामान :-  ओरिसामधून जाणार्‍या चक्रवातांच्या वाटेवर हा जिल्हा असून बंगालच्या इतर भागांपेक्षां थंडी व उष्णता यांची तीव्रता येथें जास्त असते.  एप्रिल व मे या महिन्यांतील सर्वांत जास्त उष्णमान १०२॰ व फेब्रुवारींतील सरासरी उष्णमान ६.९॰ असतें.  वार्षिक पाऊस सरासरी ६० इंच पडतो.  साधारणपणें ओरिसाच्या किनार्‍याला चक्रवातापासून धोका होत नाहीं.  परंतु अलीकडे कित्येक चक्रवात झालेले आहेत.  १८८५ च्या चक्रवातानें समुद्रांत मोठें वादळ होऊन समुद्रकांठचीं पुष्कळ माणसें प्राणास मुकलीं.  केवळ केंद्रपार पोटविभागांतील ५००० मनुष्यें मरण पावलीं व घरें आणि पिकें यांचें नुकसान झालें.  नद्यांच्या पुरामुळेंहि पिकांचें व घरांचें नुकसान होतें.

इतिहास :-  ओरिसा प्रांताच्या इतिहासापेक्षां या जिल्ह्याचा इतिहास निराळा नाहीं. (ओरिसा पाहा)

लोकसंख्या :- १८७२ पासून या जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे.  १९२१ मध्यें ती २०६४६७८ झाली.  किनार्‍यावर व डोंगराच्या दक्षिणउतारावर वस्ती पातळ आहे.  या जिल्ह्यांतील पुष्कळ लोक रखवालदार व मजूर म्हणून मोठ्या शहरांत जातात.  कटकचे रहिवाशी बंगाल्यांत आचार्‍याचा धंदा करण्याकरितां व आसाम आणि सुंदरबन येथें शेतीच्या कामाकरितां गेलेले आढळतात.  लो.सं. पैकीं शें. ९७ हिंदू व शें. २.८ मुसुलमान आहेत.  येथें उडिया भाषा चालते.

शेतकी :- समुद्रकांठच्या ज्या प्रदइेशांत खारें पाणी न येण्याची व्यवस्था केलेली आहे, तो भाग फार सुपीक आहे.  पश्चिमेकडील खडकाळ जमीन नापीक आहे.  या दोन प्रदेशांच्या मध्यें नदींतील गाळाच्या योगानें बनलेली सुपीक व चांगली लागवड केलेली जमीन आहे.  तांदूळ हें येथील मुख्य पीक असून हिवाळा, शरदॠतु व वसंत ॠतु या तीन ॠतूंत याची निरनिराळीं पिकें निघतात.  याशिवाय कडधान्यें गळिताचीं धान्यें व ऊंस, तंबाखु, बटाटे, हींहि थोडीं बहुत होतात.

कालवे :- ताळदंड कालवा महानदीच्या उजव्या तीरापासून निघून आग्नेय दिशेकडे विरावतीपर्यंत गेल्यावर पुढें सुकपैका व महानदी यांच्या दक्षिणतीरावरून जातो.  लांबी ५२ मैल. (२) माचगांवचा कालवा, कटकच्या दक्षिणेस ७ मैलांवर ताळदंड कालव्यापासून निघून कातजुरीच्या उत्तर तीरावरून गेलेला आहे.  लांबी २२ मैल.  (३) केंद्रपार कालवा.  लांबी ३९ मै. (४) गोब्री कालवा.  केंद्रपार कालव्यापासून निघतो.  लांबी १५ मै. (५) केंद्रपार कालव्यापासूनच निघणारा पतामुंडाई कालवा.  लांबी ४७ मै. (६) उंच सपाटीचा कालवा.  लांबी ५॥ ७ मैल (७) वैतरणीपासून निघालेला जयपूर कालवा, लांबी ६॥ मैल.

व्यापार व दळणवळण :- कटक येथील जीगचें काम फार प्रसिद्ध आहे.  कापड विणण्याचा धंदाहि बराच चालतो.  याशिवाय कांशाचीं भांडीं, लाखेचे व पितळी डागिने, पोतीं, टोपल्या हे जिन्नस तयार होतात.  रेड्यांच्या शिंगाची खेळणीं व काठ्या, हरणाचीं शिंगे, हस्तीदंती सामान यांचा पुष्कळ खप होतो.  तांदूळ हा येथील मुख्य निर्गत माल असून तो कलकत्ता, सिलोन व मारिशस येथें जातो.  गळिताचीं धान्यें, कातडीं, ताग, इमारती लांकूड, शिंगें, लाख, कुचला, मेण, राळ व जीगचें काम कलकत्त्यास रवाना होतें.  हाडें कलकत्ता व गंजम येथें जातात.  कापड, केरोसीन तेल, कांच सामान, सूत, सुपारी, मसाले, धातूचें सामान वगैरे जिन्नस कलकत्याहून येतात.  मीठ कलकत्ता व मद्रास इलाखा येथून येतें.  कटक, फॉल्स पॉइंट बंदर व चांदबाली हीं व्यापाराचीं मुख्य ठाणीं आहेत.

आगगाड्या :-  बंगाल नागपूर रेल्वेचा कटक-मिदनापूर हा फांटा दक्षिणोत्तर गेलेला आहे.

रस्ते :-  कलकत्त्यापासून गंजमपर्यंत जाणारा मुख्य रस्ता; व कटकपासून पुरी व संबलपूरकडे जाणार्‍या रस्त्यांची व्यवस्था स्थानिक (लोकल) फंडांतून होते.  याच्या शिवाय कटकपासून, तळदाणा, माचगांव व चांदबालीकडे जाणारा आणि फुल्नाक्राहून माधवपर्यंत जाणारा असे दोन रस्ते जिल्हाबोर्डाच्या ताब्यांत आहेत.

उन्हाळ्यांत नद्या बहुतेक आटतात व पावसाळ्यांत पाणी फार येतें.  यामुळें नद्यांतून होड्या चालत नाहींत.  कालव्यातून मात्र थोड्या बहुत चालतात.

दुष्काळ :- असंरक्षित प्रदेशांत पाऊस कमी झाला, किंवा त्याची वांटणी विषम झाली, किंवा नद्यांना मोठे पूर आले असतां पिकांनां धोका असतो.  पाऊस कमी होऊन अवेळी बंद झाल्यामुळें १८६५-६७ ह्या वर्षी येथें मोठा दुष्काळ पडला होता.

राज्यव्यवस्था :- कटक जिल्ह्याचे तीन पोटविभाग असून कटक शहर, केंद्रपार व जाजपूर हीं त्यांचीं मुख्य ठिकाणें आहेत.  जिल्ह्याचा कलेक्टर कटक येथें रहातो.  इतर विभागांवर डेप्युटी मॅजिस्ट्रेट-कलेक्टर आहेत.  बाकी येथील तहशील कचेवरीवर सब-डेपुटी कलेक्टर आहे.  कटक शहर, केंद्रपार व जाजपूर येथील म्युनिसिपालिट्यांखेरीज इतर ठिकाणचीं स्थानिक कामें जिल्हाबोर्डाकडे आहेत.

शिक्षण :- १९११ त लोकसंख्येपैकीं शें. ६.५ (पुरुषांपैकीं शें. १३ व स्त्रियांपैकीं शें. ०.५) लोकांनां लिहितां वाचतां येत होतें.

कटक पोट विभाग :-  बिहार प्रांतांत असलेल्या कटक जिल्ह्याचा एक प्रमुख पोटविभाग.  क्षेत्रफळ १५६२ चौरस मैल लोकसंख्या इ.स. १९११ सालीं १०६८७७२ होती.  ह्या पोटविभागाचा पश्चिमभाग छोटा नागपूरच्या डोंगरसपाटीच्या किनार्‍यापर्यंत जात असून पूर्वेस बंगालचा उपसागर आहे.  मध्यभाग सुपीक असून लोकवस्ती बरीच दाट आहे.  कटक शहर व शिवाय २६७० खेडीं ह्या विभागांत आहेत.

शहर - बिहारमध्यें असलेल्या कटक जिल्ह्याचें व ओरिसा विभागाचें प्रमुख ठिकाण.  इ.स. ९५३ त हें शहर वसविण्यांत आलें.  पण तें १० व्या शतकांत प्रमुखत्वानें पुढें आलें.  त्या वेळचा हिंदु राजा मकर केसरी ह्यानें येथें किल्ला बांधिला.  बारबाती किल्ला नांवाचा एक पुरातन हिंदू अमदानींतला किल्ला अजून प्रसिद्ध आहे.  मराठ्यांच्या व त्याचप्रमाणें मोगलांच्या कारकीर्दीच्या वेळीं कटक हें प्रमुख ठाणें होतें.  व ब्रिटिशांच्या ताब्यांत हा प्रदेश आल्यानंतर (१८०३) बरेच वर्षांनीं या प्रदेशास कटक हें नांव देण्यांत आलें.  कलकत्ता व मद्रास या शहरांनां जोडणारी आगगाडी कटकवरून जाते.  फॉल्स पॉईंट हें बंदर कटकशीं कालव्यानें जोडलें गेलें आहे.  या बंदरामुळें कटकला जरा महत्त्व आहे.  लोकसंख्या (१९११) ५२५२८.  चाळीस हजारांहून अधिक लोक हिंदू असून ब्रम्हो व जैन लोकांची वस्ती फारच थोडी आहे.  कटक येथें सोन्याची किंवा चांदीची बारीक तार काढून जरीकाम फार चांगलें होतें अशी ख्याती आहे.  जवळच महानदी आहे.  ओरिसा विभागाचें हें मुख्य ठाणें असल्यानें येथें विभागांतील सर्व मुख्य अधिकारी असतात.  बॅप्टिस्ट मिशन कॉलेज व रॅव्हेन्झा कॉलेज येथें आहे.  वैद्यक शिक्षणाचीहि एक शाळा आहे.  गणेशघाट रस्त्यावर कटक बँक आहे.

   

खंड १० : क - काव्य  

 

  कंक

  कंकनहळळी

  कंकर
  ककुत्स्थ
  ककुर
  कंकोळ
  कक्कलन
  कंक्राळा
  कंक्राळा किल्ला
  कॅक्स्टन
  कग्नेली
  कच
  कंचिनेग्लुर
  कचिवि
  कचेरा
  कचेश्वर
  कचोरा
  कच्छ
  कच्छचें रण
  कच्छी
  कच्छी बडोदे
  कच्छी मेमन
  कंजर
  कंजरडा
  कंजामलाय
  कॅझेंबे
  कटक
  कँटन
  कटनी
  कँटरबरी
  कटास
  कटोसन
  कट्टगेरी
  कट्रा
  कठा
  कठुमर
  कठोडिया
  कडधान्यें
  कडान
  कडाप्पा
  कडा-लिंगी
  कडाळी
  कडिया
  कँडिया
  कडी
  कँडी
  कडुर
  कडुस
  कडूस
  कडूजिरें
  कडूनिंब
  कडेगांव
  कडेपुर
  कंडेरा
  कडैयनलूर
  कडोळी
  कडौरा
  कणाद
  कणावार
  कणिक
  कणियान
  कणेथी
  कणेर
  कण्णेश्वर
  कण्व
  कण्वल्ली
  कण्विसिद्गेरी
  कण्हेर
  कण्हेर किल्ला
  कण्हेर खेड
  कतारिया
  कथील
  कॅथे
  कॅथेराइन
  कदन
  कदंब आणि कादंब
  कदम इंद्रोजी
  कदम कंठाजी
  कदरमंदलगी
  कंदाहार
  कंदियारो
  कंदुकुर
  कदुपत्तन
  कद्रा
  कद्रु
  कंधकोट
  कंधार
  कनक
  कनकफळ 
  कनकमुनि
  कनक्कन
  कनखल
  कॅनन व कॅननाइट
  कनमडी
  कनि
  कॅनि
  कॅनिआ
  कॅनिंगपोर्ट
  कॅनिझारो स्टानिस्लास
  कॅनि
  कनेत
  कनोजचें राज्य
  कनोरा
  कॅनोव्हास
  कनौंग
  कन्नड
  कन्फ्युशिअस
  कन्याकुमारी
  कन्यागत
  कन्सस
  कन्हरगांव जमीनदारी
  कन्होली
  कपडवंज
  कंपनी
  कॅपरनेअम
  कंपली
  कॅपाडोशिआ
  कपालक्रिया
  कपिल
  कपिलमुनि
  कपिलर
  कपिलवस्तु
  कपिलाषष्ठी
  कपिली नदी
  कॅपुआ
  कपुरथळा
  कॅपो
  कपोक
  कॅप्रीव्ही
  कफ
  कबंध
  कंबर
  कबीर
  कबीरपंथी
  कबीर-वट
  कबीरवाल
  कंबोडिया
  कब्बालदुर्ग
  कब्बालिगर
  कंब्राय
  कमधिया
  कमरुद्दीनखान
  कमल
  कमलगड
  कमलगड किल्ला
  कमलाकर
  कमलाकरभट्ट
  कमा
  कमातापूर
  कमार
  कमाल
  कमालपुर
  कमासिन
  कमुदी
  कॅमेरिनो
  कमैंग
  कम्मा
  कम्माल
  कय्यट
  कर
  करकंब
  करकुंब
  करछना
  करंज
  करंजगांव
  करजगी
  करटोली
  करण
  करणकमलमार्तंड
  करणगड
  करणपाली
  करणप्रकाश
  करणवाघेला
  करणोत्तम
  करतोया
  करनाली
  करबला
  करमगड
  करमाळें
  करवंद
  करवली
  करहल
  कॅराकस
  कराची
  कराडी
  करार
  करारी
  कराष्टमी
  कॅरिअन
  करिआन
  कॅरिबी बेटें
  कॅरिसब्रूक
  करीमखान
  करीमगंज
  करीमनगर
  करुंगुळी
  करूर
  कॅरे, हेनरी चार्लस
  करेण
  करेण्णी
  करैया
  करोड
  करोर लाल इसा
  कर्कवॉल
  कर्कोट
  कर्ज
  कर्जत
  कर्डी
  कर्डे
  कर्ण
  कर्णक
  कर्णप्रयाग
  कर्णप्रावरण
  कर्णफुली
  कर्णभूषणें
  कर्णराज
  कर्णसुवर्ण
  कर्णाटक
  कर्तारपूर
  कर्दम
  कर्नलगंज
  कर्नाळ
  कर्नाळा किल्ला
  कर्नाळी
  कर्नूल
  कर्नूल-कडाप्पा कालवा
  कर्ब
  कर्मद
  कर्मनाशा
  कर्ममार्ग
  कर्मयोग
  कर्मवाद
  कर्माकर्मविचार
  कर्मान
  कर्वट
  कर्‍हाड
  कर्‍हेपठार
  कलइत
  कलकत्ता
  कलंकी
  कलंगा
  कलंगा डोंगर
  कलगीतुरा
  कलघटगी
  कलचुरी
  कलथ-थलइ
  कलदन
  कलबगूर
  कलबुर्गे
  कलम
  कलमदाने
  कलमाडु
  कलमेश्वर
  कलरायण डोंगर
  कलले
  कलश
  कलसिया
  कलहंडी
  कलहारि
  कला
  कलात
  कलात-इ-घिलझई
  कलादगी
  कॅलामेटा
  कलाल
  कलावंत
  कलावंतखातें
  कलि
  कलिंग
  कलिंगड
  कलिंगपट्टम
  कलित
  कलियुग
  कलियुगवर्ष
  कलुगुमलइ
  कलुशा
  कॅले
  कलेवल
  कलेवा टाउनशिप
  कल्पना
  कल्पनासाहचर्य
  कल्पसूत्रें
  कल्माषपाद
  कल्याण
  कल्याणगोसावी
  कल्याणद्रुग
  कल्याणपुर
  कल्याणमल्ल
  कल्याणी
  कल्लाकुर्चि
  कल्लादनार
  कल्लार
  कल्लोळ
  कल्वकुर्ती
  कॅल्व्हिन जॉन
  कल्हण
  कवकरीक
  कवचधरवर्ग
  कवठ
  कवध
  कवनाई किल्ला
  कवराई
  कवर्धा
  कवलापूर
  कवलिन
  कवष
  कवार अथवा कंवर
  कवि
  कविजंग
  कविरोंडो
  कॅव्हेंडिश हेनरी
  कश्यप
  कंस
  कसबा
  कसबी
  कॅसलबार
  कॅसलरॉक
  कसाई
  कसाईखाना
  कॅसांब्लाका
  कसेई
  कसौली
  कॅस्टेलर ई रिपोल एमिलिओ
  कस्तुरी व कस्तुरीमृग
  कहरोर
  कहळूर
  कहार
  कहूत
  कहोळ
  कळंब
  कळंबेश्वर
  कळम
  कळमनूरी
  कळवण
  कळस
  कळसा
  कळसूबाई
  कळसूत्री बाहुल्या
  कळानौर
  कळ्ळिकोटा आणि अंतगड
  कळ्ळूर
  काकडशिंगी
  कांकडी
  काकतीय
  काकर
  काकसि आली
  कांकेर
  कॉकेशस पर्वत
  काकोरी
  कांक्रेज
  कांक्रोली
  काखंडकी
  कागद
  कागवाड
  कागल
  कागान अथवा खागान
  कांगारू
  कागिरी
  कांगो
  कांगो फ्रीस्टेट
  काग्निआर्ड डी लाटोअर, चार्लस
  कांग्रा
  काँग्रीव्ह विल्यम
  कांच
  कांचकागद
  कांचन
  कांचनगंगा
  कांचना किल्ला
  काचार
  काचिन
  काची
  कांचुलिया
  कांचोळा
  काजवा
  कांजिण्या
  कांजीवरम्
  काजू
  कॉटन सर हेन्री
  काटमांडू
  काटवा
  काटोडिया
  काटोल
  काठी लोक
  काठेवाड
  काठेवाडी
  काठोर
  कांडू
  काण्व घराणें
  काण्वशाखा
  कात
  कातकरी
  कांतकाम
  कातडीं
  कांतनगड
  कातांगा
  कातारी
  कांतिगेल
  कातिया
  कात्यायन
  कांत्रा किल्ला
  कांथकोट
  काथगोदाम
  काथर वाणी
  काथारिया
  काथौन
  काथ्रोटा
  कादंब कवि
  कादंबरी
  कादंबरी, बाणभट्टीय
  कांदलूर
  कांदा
  कादिर
  कादिराबाद
  कादिरि
  कादीपुर
  कांदी संस्थान
  कादोद
  काद्रोली
  कांधळा
  कानगी
  कानगुंडी
  कानडा
  कानडा उत्तर
  कानडा दक्षिण
  कानडी वाङ्‌मय
  कानपूर
  कानफाटे
  कानमैल
  कानलदे
  कॉनवे
  कानाचे रोग
  कानानोर
  कानिकर
  कानिगिरी
  कानीफनाथ
  कानोर
  कानौद
  कान्ट इम्यान्युएल
  कान्टन जॉन
  कान्यकुब्ज
  कान्स्टंटा
  कॉन्स्टन्टाईन
  कान्स्टन्टाईन दि ग्रेट
  कॉन्स्टन्स
  कान्स्टन्स
  कान्स्टान्टिनोपल
  कान्हिरा किल्ला
  कान्हीरा खेडें
  कान्हेरी
  कान्होजी आंग्रे
  कान्होजी भोंसले
  कान्हो पाठक
  कान्होपात्रा
  काप
  कापडवंज
  कापशी
  कापालिक
  कांपिली
  कांपिल्य
  कापुसतळणी
  कापू
  कापूर
  कापूस
  काँपेन
  कॉप्ट
  काफा
  काफिरकोट
  काफिरलोक
  काफिरिस्तान
  कॉफी
  काफीखान
  काफ्रारिया
  काबरा
  काबूर
  काबूल
  काबूल नदी
  काबूल नदीचा कालवा
  कांबोज
  कांबोह
  काम, कामदेव
  कामकार
  कामगारहितवर्धक सभा
  कामटा-राजौला
  कामटी शहर
  कामठा
  कामठी
  कामतीलांग
  कामद
  कामंदक
  कामधेनु
  कामन
  कामबक्ष
  कामरगांव
  कामरान
  कामरूप
  कामरेज
  कामली
  कामशास्त्र
  कामश्चाटका
  कामाख्य अथवा कामाक्षी
  कामाठी
  कामारेड्डीपेठ
  कामार्‍हाटी
  कामालिया
  कामेरालिझम
  कामेरून
  काम्यकवन
  कायगावकर
  कायदा
  कायनकुलम
  कायर
  कायल
  कायलपट्टणम्
  कायस्थ
  काये
  कायेनी
  कारकळ
  कारंजा
  कारडगी
  कारडी
  कारडोना
  कारलें
  कारवान
  कारवार
  कारवाल, करौल
  कारवी
  कारस्कर
  काराकुल
  काराकोरम
  कारामुंगी
  कारिकल
  कॉरिन्थ
  कॉरेली, मेरी
  कारेवक्कल
  कारैकुडी
  कारोमान्डल किनारा
  कॉर्क
  कार्डिफ
  कार्तवीर्य
  कार्तागो
  कार्तिकस्वामी
  कार्थेज
  कॉर्नवालीस
  कार्नू मेरी आलेरे
  कॉर्नेजी अॅंड्रयू
  कार्नो, सादी निकोलस लिओनार्ड
  कार्पेथियन पर्वत
  कार्लस्क्रोना
  कार्लस्टाट
  कार्लाइल
  कार्लाइल टॉमस
  कार्लें
  कार्वेटिनगर
  कालकेय
  कालगणना
  कालंदर
  कालना
  कालनेमी
  कालमक
  कालयवन
  कालरा
  कालवे
  कालसी
  कालसेडान
  कालहस्ती
  कालाटिआ
  कालिकत
  कालिकापुराण
  कालिंगी
  कालिंजर
  कालिंजी, कालिंगी
  कालिदास
  कालिंदी
  कालिंदी नदी
  कालिंपोंग
  कालिमिर
  कालिया
  काली
  कालीघाट
  काली फ्लॉवर
  काले
  कालोल
  काल्का
  काल्पी
  कावळा
  कावळी
  कावीळ
  कावेरी
  कावेरीपट्टणम
  कावेरीपाक
  कावेल्ली व्यंकट बोरय्या
   काव्य
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .