विभाग नववा : ई-अंशुमान
ऋषिक (१) - भारतवर्षीय भरतखंडस्थ देश. हा परम कांबोजच्या उत्तरेस असून याच्या उत्तरेस पुढें हिमालय पर्वत आहे. हाच प्रस्तुत रशिया असावा असें प्राचीन कोशकार म्हणतात (भार. सभा. अ. २९ श्लो. २५-२९).
(२) दक्षिण विभागांतील एक जात. अशोकाच्या एका आदेशांतील 'ऋस्टिक' अथवा 'रास्टिक' या रूपांशीं या नांवाचा कांहीं संबंध असूं शकेल काय? (बृहत्संहिता १४.१५; इ. अँ. पु. २० पा. २४०, २४७-२४८.)