प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

इस्त्रायल राष्ट्रधर्म - इस्त्रायल अथवा यहुदी लोक आज जगाच्या पाठीवर सर्वत्र पसरलेले आढळतात. आज अमुक एका प्रदेशास इस्त्रायलांचे राष्ट्र असें म्हणतां येत नाहीं, तथापि या अनेक देशांत पसरलेल्या लोकांनी आपले वैशिष्ट्य कायम ठेविले आहे. या लोकांवर धार्मिक, सामाजिक व राजकीय कारणांनी अनेक संकटे आली व अनेकदां क्रूर छळास बळी पडावें लागलें, तरी या जातीनें त्यातून आपणांस निभावून घेऊन चिकाटीनें आपला मार्ग आक्रमण केला. आज जगांतील श्रीमंत घराण्यांत इस्त्रायल घराणी अधिक आहेत. यांचा राजकीय इतिहास व भूप्रदेशावरील प्रसार याची कांही माहिती “यहुदी” या लेखांत दिली आहे. हिंदुस्थानात वसाहत करुन राहिलेल्या इस्त्रायलांस बेने इस्त्रायल असें म्हणतात. त्यांची माहिती “बेने इस्त्रायल” या लेखांत दिली आहे. त्यांचे जुने वाङमय जो जुना करार त्याचा संपूर्ण वृतांत आणि त्याचा सेमेटिक संस्कृतीच्या विकासाशीं संबंध मागे सेमेटिक संस्कृतीची जगद्यापकता या प्रकरणांत (विभाग ४) दिला आहे.

उपपत्ति. -इस्त्रायल या नामाभिधानावरुन सूचित होणाऱ्या अनेक प्रश्नांचा विचार करणें या कार्यास एक निराळा ज्ञानकोशच तयार करावा लागेल. तथापि मानवजातीच्या आध्यात्मिक उपदेशकांवर इस्त्रायल संस्कृतीचा पुष्कळ परीणाम घडून आला असल्यामुळे या संस्कृतीच्या धार्मिक विचारसरणींमध्ये कसकसा विकास होत गेला, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. इस्त्रायल राष्ट्रधर्माचा विकास होऊन तो एक विशिष्ट विचारसंप्रदायहि बनला आणि इस्त्रायल राष्ट्र जरी नष्ट झालें तरी संप्रदाय टिकून तो इस्त्रायल धर्म या नावानें लोकांत ओळखला गेला. अभ्यासकास धार्मिक विचारविकसनाचा अभ्यास करतांना या पंथाच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करुन चारणार नाहीं इस्त्रायल या संज्ञेवरुन ख्रिस्ती शकापूर्वी एक हजारच्या सुमारास पॅलेस्टाईनमध्ये बनलेल्या एका राष्ट्राचा बोध होतो; परंतु या राष्ट्रामध्यें खऱ्या इस्त्रायल सांप्रदायिक विचाराची उत्पत्ति बरीच मगाहून झालेली दिसते. इस्त्रायल लोक अरबी लोकांस आपले पूर्वज मानीत असून पॅलेस्टाईन प्रांत हस्तगत करण्यापूर्वी इजिप्तमध्यें आरेमियन लोक कांही काळपर्यंत वस्ती करुन राहिले होते. पुढे मोझेझ यानें त्या ठिाकाणच्या जुलमांतून त्याची सुटका केली, अशी इस्त्रायल लोकांची सामन्य समजूत होती. इस्त्रायल पंथातील सर्व जाती कधी काळी इजिप्तमध्ये होत्या की नाही, हा एक प्रश्नच आहे. सांप्रत इस्त्रायल संप्रदायाच्या ज्या प्राचीन दंतकथा उपलब्ध आहेत, त्यांचें शेवटचे संस्करण इस्त्रायल लोकांची राष्ट्रीय ऐक्याची कल्पना जोरांत असतांना झालेले असल्यामुळे मूळ दंतकथांच्या वेळीहि राष्ट्रैक्याची कल्पना अशीच जोराची होती हे म्हणणें चुकींचे होईल.

जातिविभाग व पॅलेस्टाइन प्रांताचें स्वायत्तीकरण- इस्त्रायल लोकांमध्ये मागाहून ज्या बारा जाती पडल्या त्या सर्वांचे मिळून पूर्वी चार वर्ग पाडलेले होते. तो - (१) ली, (२) रेचेल, (३) झिलपा व (४) बिल्हा हे होत. या सर्वाचा संबंध मूळ चार स्त्रियांशी दाखविण्यांत येत असे. या मूळ चार स्त्रियांपैकी ली व रॅचेल या मुख्य असून झिलपा व बिल्हा या अनुक्रमे त्यांच्या दांसी होत असें समजण्यात येते. ‘ली’ वर्गामध्ये रुबेन, सायमन, लेव्ही, जूडा इसेचर व झेब्यूलन; रॅचेल वर्गामध्ये जोसेफ (याच्या पोटजाती एफ्राएन व मनास्से) व बेंजामिन, झिलपा वर्गांत गेंड व अक्षर; आणि बिल्हा वर्गांत डॅन व नॅप्तली इत्यादि जातीचा समावेश होतो. याखेरीज कॅननाइट, कॅलेबाइट इत्यादि दुसऱ्या बऱ्याच मिश्र जातींचा इस्त्रायल पंथांत समावेश करण्यांत आला असावा. या जातींनी एकंदर किती प्रदेश व्यापिला असावा हे कळत नाही, तथापि जॉर्डनच्या पश्चिमेकडील पांच ली जाती शेजारी शेजारी असून जूडा जातींने दक्षिणेमध्यें वसाहत केली, इसेचर व झेब्युलन यांनी मॅगिडो येथील सपाट प्रदेश व उत्तरेकडील प्रदेश इत्यादि ठिकाणी वस्ती केली असावी असे अनुमान होते.

इस्त्रायल लोकांच्या पॅलेस्टाईनमध्ये स्वाऱ्या सुरु झाल्या, त्या वेळी बरेच किल्ले कॅनॅनाइट लोकांच्याच ताब्यात होत, तथापि क्रमाक्रमाने इस्त्रायल लोकांनी त्या प्रांतात आपली सत्ता स्थापन केली व इतर मिश्र जातींवर आपला अम्मल बसविला.

हया जातीचे एकीकरण पुढील रीतीने झाले असावे. कित्येक पिढया तेथील कॅनेनाइट रहीवाशी इस्त्रायल लोकांच्या नागवणुकीच्या प्रकारामुळे संत्रस्त झालेले होते.तसेच इस्त्रायल लोकांप्रमाणे फिलिस्टाइन इत्यादी लोकहि हया प्रांतांवर स्वाऱ्या करीत होते. अशा रीतीने हॅझोर येथील राजाबरोबर झालेल्या युध्दांत नप्तली वगैरे अनेक शेजारच्या जाती सामील झाल्या होत्या. सिसेराच्या वाढत्या सत्तेमुळे व मेगिडो आणि जेझ्रिल या सपाट प्रदेशांवरील तटबंदी शहरामुळे इसेचर आणि झेब्युलन या ली वर्गांतील इस्त्रायल जातींनां व त्याच्या दक्षिणेस असणाऱ्या रॅचेल वर्गांतील जातींनांही बरीच दहशत बसली होती. वेळोवेळी अशा प्रकारच्या कलहांमध्ये विजयी झालेला एखादा शूर योध्दा कांही कालपर्यंत राजाप्रमाणे या प्रांतांत अम्मल  गाजवीत असे. ख्रिस्त शतकापूर्वी अकराव्या शतकाच्या अखेरीस फिलिस्टाईन, अॅमोबाइट व अॅमॅलेकाइट इत्यादी जातींनी बरीच जोराचा विरोध केल्यामुळे त्यांच्या तोडीस तोड देण्याकरितां म्हणून सुसंघटित प्रयत्नाची आवश्यकता भासूं लागली व काही कालपर्यंत रॅचेल व ली वर्गांतील इस्त्रायल जातींचे ऐक्य झाले. हे ऐक्य फार दिवस टिकले नाही; परंतु त्यावरुन इस्त्रायल लोकांच्या भविष्य कालांतील आदर्शभूत संघशक्तीची थोडकीशी कल्पना आली.

या सुमारास होऊन गेलेल्या सॉल व डेव्हिड या दोन राजांनी बऱ्याच लढाया मारल्या वगैरे सामान्य माहितीपेक्षां त्यासंबंधी काही विशेषशी माहिती उपलब्ध  नाही.

इस्त्रायल लोकांच्या प्राथमिक अव्यस्थेतील धर्मं कल्पना : पॅलेस्टाईन प्रांत काबीज करतेवेळी इस्त्रायल लोकांच्या धार्मिक कल्पना कशा प्रकारच्या होत्या, यांविषयी प्रत्यक्ष अशी माहिती कांहीच उपलब्ध झालेली नाही. ख्रिस्त शकापूर्वीच्या सातव्या आठव्या शतकांत इस्त्रायल लोक कसल्याहि प्रकारचे यज्ञ करीत नव्हते किंवा आहुति देत नव्हते, असे म्हणतां येत नाही. कारण कांही पंथांत यज्ञ किंवा आहुति देत असावेत. अशा प्रकारच्या आख्यायिका आढळतात, ही गोष्ट नि:संशय खरी आहे व इतक्या प्राचीन काळात यज्ञसंस्था लोकांस अज्ञात होती असे म्हणणे केव्हाहि संयुक्तिक होणार नाही; तथापि अॅमोस व जेरोमिया यांच्या म्हणण्याप्रमाणे यज्ञ हे फार क्वचित प्रसंगी होत असत. कारण इस्त्रायल लोकांचे मोठमोठे सण शेतकीच्या संबंधाने प्रचारांत आले होते. इस्त्रायल लोकांमध्ये शिकार करुन आणिलेल्या जनावरांचे मांस खाण्याची जरी मोकळीक असे तरी कॅनन प्रांत काबीज करण्यापूर्वी हे लोक मुख्यत: दुधावरच रहात असत. अशा रीतीने प्रथमावस्थेतील इस्त्रायल लोकांचे कल्पनाचित्र रंगवावयाचे म्हणजे असे म्हणतां येईल की, हे लोक दिसण्यांत निर्दय, भयंकर व अगदी रानटी तर होतेच; परंतु त्यांचा उदरनिर्वाह शेतकीशिवाय अन्य मार्गांनी होत असल्यामुळे या लोकांमध्ये शेतकीशी निगडित असलेली सृष्टिशक्तिपूजा प्रचलित नव्हती.

इस्त्रायल लोकांच्या राष्ट्रीय देवतेच्या याहचे नांवाचे उत्पत्तिस्थान कोणते याचा सुध्दां अद्याप निर्णय लागलेला नाही. मात्र पॅलेस्टाईन प्रांतावरील विजयापूर्वी इस्त्रायल जातीनी याहवे देवतेच्या उपासनेचा सर्वसाधारणपणे स्वीकार केला असावा ही गोष्ट संभवनीय दिसते. निरनिराळया जातींच्या एकाच देवतेची निरनिराळया स्वरुपांत उपासना करीत असत. उदाहरणार्थ ली वर्गांतील जातीमध्ये या देवतेचे स्वरुप एखाद्या देवदूतासारखे किंवा सपक्ष सर्पासारखे दाखविलेले असे, व रॅचेल वर्गांतील जाती बैलाच्या स्वरुपांत या देवतेची उपासना करीत. या लोकांमध्ये सुंता करण्याची चाल प्रचीन काळी होती; परंतु हा विधि मुसुलमान लोकांप्रमाणे लहानपणी न होता मनुष्य पूर्ण वयांत आल्यावर होत असे. त्याचप्रमाणे गारगोटीच्या शस्त्रांचा उपयोग वगैरे गोष्टीवरुन हा विधि अर्वाचीन झुलू वगैरे असंस्कृत जातीप्रमाणे रानटी स्थितीचा निदर्शक होता. कदाचित 'याहवे ही प्राचीनकाळी युध्ददेवता समजली जात असावी.

वर दिलेल्या कल्पनांखेरीज इस्त्रायल लोकांच्या ज्या दुसऱ्या कांही धार्मिक कल्पना आहेत, त्या त्यांनी पॅलेस्टाईनमध्ये बाहेरुन येतांना आणिल्या किंवा पॅलेस्टाईनमध्येंच संपादन केल्या याबद्दल कांहीच विधान करतां येत नाही. तसेच विश्रांतिदिन (सॅबॉथ) व अमावास्या या व्रतांचा परिपाठ प्राचीनकाळी होता किंवा नाही हेहि सांगता येत नाही. त्याचप्रमाणे पॅलेस्टाईन-पूर्वकाळामध्ये इस्त्रायल लोकांच्या नीतिकल्पना कशा प्राकारच्या होत्या, हे कळणेहि अशक्य झाले आहे. एवढे मात्र म्हणतां येईल की, प्राचीन काळी पुढील काळाप्रमाणे बहुपत्नीकत्वाची चाल रुढ होती, आणि परस्त्रीगमन जरी निंद्य मानिले जात असे, तरी दासीगमनास पूर्ण स्वतंत्रता होती.

इस्त्रालाइट व कॅननाइट धर्मकल्पना व परंपरा यांचे संमिश्रण- पॅलेस्टाईनवरील विजयानंतर लवकरच जेते असे जे इस्त्रायल लोक त्यांनी कॅननाईट या जित लोकांचे आचारविचार व धर्मकल्पना हळूहळू स्वीकारल्या कॅननाइट मठ, जित आणि जेते यांच्या संयोगापासून उत्पन्न झालेल्या मिश्र जातीची विद्यापिठे बनली. या मठांमध्ये इस्त्रायल लोकांना त्या त्या मठाशी संबध्द असलेल्या मोठमोठया व्यक्तींच्या परंपरांचे ज्ञान होऊं लागले असावे. व कालांतराने या व्यक्ती एकत्रित झालेल्या समाजाचे पूर्वज मानिले गेल्यामुळे त्यांच्यासंबंधी नवीन नवीन आख्यायिका प्रचलित झाल्या असाव्यात; कारण ज्या राष्ट्रांत ऐक्याची जाणीव दिवसेंदिवस जास्त होऊं लागते त्या राष्ट्राच्या परंपरा मुळांत जरी विशिष्ट स्थानसंबध्द असल्या तरी त्यांस लवकरच सर्वमान्यता प्राप्त होते, व अशा रीतींनें एखाद्या विशिष्ट जातीचे सुप्रसिध्द पूर्वज हे त्या संबध राष्ट्राच्या आदरास पात्र होतात. या वेळी कॅननाइट संप्रदायाचा इस्त्रायल संप्रदायावर बराच परिणाम होणे अपरिहार्य होते. समाजाच्या प्रथमावस्थेत शेतकी व धर्म यांचा परस्परसंबध दृढ असल्यामुळे त्या समाजाच्या शेतकीविषयक हालचालींना धार्मिक महोत्सवाचें स्वरुप येते. अशा प्रसंगी दुसरा एखादा गोपालवृत्तीचा समाज जेव्हां पहिल्या मूळच्या समाजांतील शेतकीचा स्वीकार करतो, तेव्हां अप्रत्यक्षपणें त्या समाजाच्या धर्मकल्पनांचाही तो स्वीकार करीत असतों. इस्त्रायल लोकांनी कॅननाइट लोकांची बाल ही देवता व दुसरे अनेक महोत्सव स्वीकारले यांतील रहस्य  हेंच होय. इस्त्रायल संप्रदायामधील कांही प्रकार मूळच्या स्थानिक रुढी असाव्यात. उदाहरणार्थ ख्रिस्तशकापूर्वी सातव्या शतकांत होऊन गेलेल्या व ईश्वराचे प्रेषीत म्हटल्या जाणाऱ्या कांही धर्मसुधारकांनी निषिध्द मानिलेली ‘मलोक’ देवाची उपासना हा प्रचीन कॅननाईट संप्रदायाचा राहिलेला अवशेष दिसून येतो. या उपासनेमध्यें स्त्रीपुरुषांस प्रथम झालेली मुलें देवतेच्या साक्षात प्रतिमा म्हणून राजास बळी दिली जात असत. या वेळीं मठदेवालयादिकांमध्ये बरीच यज्ञस्थंडिलें असून त्या ठिकाणी पहिल्याप्रथम जन्मलेल्या मुलांच्या चरबीची आहुति देण्यांत येत असून स्थण्डिलावर रक्ताचा सडा घालण्यांत येत असे, व महत्वाच्या मठांतून अशा अनेक कार्यांकरितां एक उपाध्यायवर्ग तयार करण्यांत येत असे. अर्थात् या वर्गास धार्मिक कथांचे रक्षण करणें, देवताप्रतिमांची नीट व्यवस्था राखणे, देवतांना कौल लावणे वगैरे अनेक कृत्ये करावी लागत असल्यामुळे या वर्गास बरेच महत्व प्राप्त झाले होते. यापेक्षांहि अत्यंत किळसवाणा प्रकार म्हटला म्हणजे हे मठवासी उपाध्याय सृष्टींतील उत्पादन शक्तीस जास्त प्रज्वलीत करणारे असे ईश्वराचे प्रतिनिधी असल्याबद्दल स्वतःस मानीत. या मठवासी उपाध्यायांच्या स्वरुपांत असलेल्या ईश्वराशी संभोग झाल्याने विवाहाची जास्तच सफलता होते, अशी त्यावेळची सार्वत्रिक समजूत असल्यामुळे या उपाध्यायाकडून प्रत्येक स्त्रीस झालेले पहिले मूल, ही ईश्वराची मालमत्ता समजली जात असे, व प्रथम जन्मलेल्या मुलास यज्ञामध्यें बली देण्याची चाल या कल्पनेमुळेच पडली असावी. कांही मठांमध्ये याच प्रकारच्या कार्याकरीतां मठवासिनी स्त्रियांचाही वर्ग उत्पन्न झालेला दिसतो. या मठवासी वर्गाखेरीज दुसरे कित्येक स्वतंत्र वर्गहि स्वतःच्या अतीन्द्रियशक्तीनें किंवा दुसऱ्या कांही जादुटोण्यामुळें पुढे घडून येणाऱ्या गोष्टींचे स्वतःस आगाऊ ज्ञान होत असल्याचे ढोंग लोकांस फसवीत असत.

राजसत्तेच्या अमदानीत ख्रिस्तशकापूर्वी नवव्या शतकाच्या मध्यकालापर्यंतच्या इस्त्रायलांच्या धार्मिक इतिहासाविषयी कांही माहिती उपलब्ध होत नाही. सोलराजाने केलेली स्थण्डिलरचना, डेव्हिडनें मौंट सियॉनवर केलेली नवीन मठाची स्थापना वगैरे बारीक सारीक गोष्टीची माहीती उपलब्ध झाली आहे. एवढी मात्र खरे की या वेळी इस्त्रायल लोक जरी असंस्कृत स्थितींत होते, तरी कॅननाइट धर्मातील अनेक किळसवाण्या प्रकारापासून पूर्ण अलिप्त राहीले होते.

बालदेवतेच्या उपासनेस प्रारंभ. - इस्त्रायल संप्रदायाच्या धार्मिक इतिहासास वास्तविक ख्रिस्तपूर्व नवव्या शतकाच्या मध्यभागाच्या सुमारास प्रारंभ होतो. या वेळी ओम्री राजाचा टायर येथील राजाशी तह झाल्यामुळे व त्याचा मुलगा अहेब याचा जीझेबेल या टायर येथील राजकन्येशी विवाह झाल्यामुळे हा काळपर्यंत इस्त्रायल लोकांनीं सर्वसामान्यपणें मान्य केलेल्या देवतेचें प्रमुख स्थान टायरमधील बालदेवतेकडे जाते कीं काय, अशी भीती उत्पन्न झाली. ही नवीन चळवळ लोकप्रिय होणें संभवनीय दिसूं लागल्यामुळें व ओम्री आणि अहेब हे दोन्ही मोटे बलाढय राजे असल्यामुळे याह्वेचे वर्चस्व अबाधित ठेवण्याची गोष्ट अशक्य दिसूं लागली. पण एलिजा नामक प्राचीन परंपरेच्या अनुयायांच्या पुरस्कर्त्यानें नॅबोथ याच्या वधामुळें राजकीय कुटुंबाविरुध्द कलुषित झालेल्या प्रजेच्या चित्तक्षोभाचा फायदा घेऊन आम्रीचे राजघराणें नष्ट केलें, व इस्त्रायल राष्ट्रामध्यें ‘याहवेच्या प्रदेशांत याहवे हाच एक देव हें तत्व पुनश्च प्रस्थापित केले. बालदेवता संप्रदाय विशेषतः उत्तर इस्त्रायल मध्यें बऱ्याच महत्वास चढला होता व जूडाप्रांत उत्तर इस्त्रायलच्या वर्चस्वाखालीं होता. तथापि, प्रचीन एशियाटिक जेत्यांच्या फक्त खंडणी घेण्याच्या नेहमीच्या चालीप्रमाणें जूडामधील इस्त्रायल संप्रदायावरही कसल्याच प्रकारचे अनिष्ट परिणाम झाले नाहीत. या वेळी एलिजा याच्या अनुयायांनी देवतेच्या उपासनापध्दतीत कांहीं सुधारणा केल्याचे दिसून येत नाही. कारण यावेळी इस्त्रायल लोकांची दमास्कस येथील आरेमियन लोकांबरोबर सुमारे अर्धशतक पर्यंत जंगी झटापट चालली असल्यामुळे हा कालही धर्मसुधारणेस अनुकूल नव्हता. तथापि याहवे देवतेच्या उपासनेचें वर्चस्व सुव्यवस्थितपणें जुन्या शिलालेखांवर व “करारांच्या” सुप्रसिध्द “कमानीवर’ खोंदलेल्या दहा धर्मज्ञांवरुन स्पष्ट दिसून येतें. या दहा प्राची धर्माज्ञा पुढीलप्रमाणें आहेतः - (१) मी याहवे तुझा देव आहे. माझ्याखेरीज दुसऱ्या कोणत्याही देवतेची उपासना करूं नकोस. (२) बिनखमिरी रोटया शिल्लक राखून त्या तूं सात दिवस खात जा. (३) गर्भाशयांतून प्रथमच बाहेर येणारी अर्भके, बैल व मेंढया इत्यादिकांची  पहिली प्रजा माझी आहे. (४) सहा दिवस काम करुन सातव्या दिवशी विश्रांती घे व सॅबॅथ पण पाळीत जा. (५) सर्व ॠतुंतील नवी नवावळ इतकेच नव्हे तर गव्हांची पहिली पिकें देखील मला अर्पण कर. (६)वर्षाअखेर एकदा तूं माझा महोत्साह कर. (७) आंबलेल्या रोट्यांवर यज्ञिय रुधिराचें तूं हवन करुं नकोस. (८) मला समर्पण केलेल्या अन्नांतील चरबी सकाळपर्यंत (रात्रभर) शिल्लक ठेवूं नकोस. (९) तुझ्या जमिनीच्या पहिल्या पिकांपैकी प्रथम भाग तुझा देव जो मी याहवेत्या माझ्या देवालयांत आणून टाक. (१०) बकरिच्या अंगावर दूध पीत असलेलें तिचें पिल्लूं माझ्याकरिता मारुं नकोस.

ख्रि्. पू. आठव्या शतकांतील उत्तर इस्त्रायल मधील धर्मोपदेशकांची चळवळ. - ख्रिस्तपूर्व आठव्या शतकाच्या मध्यापासून इस्त्रायल संप्रदायांतील महत्वाच्या सुधारणाविषयक चळवळीस आरंभ होतो. बाहयदृष्टया हा काल भरभराटीचा दिसत होता. कारण बरेच दिवस चाललेल्या आरेमियन युध्दाची परिसमाप्ति झाल्यामुळे इस्त्रायल लोकांची भीति नाहींशी होऊन हे देवतेचें वर्चस्व पूर्णपणे स्थापन झाले व याहवेच्या कृपेमुळेच जयसंपादन झाले अशी समजूत असल्यामुळे याहेवे देवतेची उपासना इतकी वाढली की त्यामुळे सामाजिक नीतिनियमांकडेहि दुर्लक्ष होऊं लागले. पॅलेस्टाइनच्या विजयापूर्वी जे इस्त्रायल लोक गोपाल स्थितीमध्यें केवळ दुधावर राहून उपजिवीका करित, व कधीकाळी एखादया विशिष्ट  प्रसंगीच आपल्या कळपांपैकी एखादी मेंढी मारीत, त्या लोकांमध्ये ख्रि. पू. आठव्या शतकापासून पुष्कळ याज्ञिक माजले. याज्ञिकांच्या या बेसूमार वाढीमुळे बऱ्याच पुराणमतानुयायी धर्मोपदेशकांनां या प्रकारांत कांहीतरी सुधारणा घडून येणे इष्ट आहे असे वाटूं लागले. याच सुमारास असुरियाच्या वाढत्या सत्तेपुढे पॅलेस्टाईन संस्थानांस मान वांकवावी लागते किंवा काय, याबद्दल काळजी उत्पन्न झाली. परंतु या अशा प्रकारच्या राजकीय परिस्थीतीची कल्पना फार थोडया लोकांस होती; व त्यापैकीच अॅमॉस हा एक सुप्रसिध्द धर्मोपदेशक होय. त्याने बेथेल या ठिकाणच्या मठामध्यें यज्ञादिकांच्या निष्फलतेबद्दल लोकांनां उपदेश केला. त्याचे म्हणणें असें की, या हवे देवता यज्ञाने खूष होणार नाही. कारण तसें जर झाले असते, तर असंख्य यज्ञ करणाऱ्या इस्त्रायल लोकांवर याहवेने कधीच अवकृपा केली नसती. म्हणून याहवेच्या संतोषाकरितां यज्ञ करण्याऐवजी सदाचरण व प्रामाणिकपणा यांची कांस धरली पाहीजे.

अॅमॉसच्या मागून थोडक्याच काळात होसिया नावांचा एक धर्मोपदेशक उदयास आला. होसियाने केलेल्या धर्मोपदेशाचे एक त्रुटीत पुस्तक उपलब्ध झाले आहे. त्यावरुन इस्त्रायल सत्तेचा शेवटचा अधःपात होण्यापूर्वीची त्या ठिकाणची परिस्थिती कशी भयंकर होती हें दिसून येतें. अॅमॉसप्रमाणे होसिया याचीहि यज्ञाच्या निष्फलतेबद्दल खात्री झाली होती परंतु त्याची विशेष कामगिरी म्हणजे धर्माच्या नांवाखाली राजरोसपणे चाललेल्या वेश्यावृत्तीचा निषेध करणे ही होय. लोभ आणि विषयवासना, उपभोग आणि निष्रुरता इत्यादी मनोविकार बहुजनसमाजामध्यें इतके वाढले होते की, मठ देवालयें इत्यादि धार्मिक स्थाने देखील कुंटणखाने बनली होती. निसर्गपूजेबरोबर उद्भवणारा जो धर्मभोळेपणा त्याच्या विरुध्द होसियाचें  मत असल्यामूळे अर्थात प्रतिमापूजेविरुध्दही त्याला झगडावे लागलें. मूर्तिपूजेचा पहिला इस्त्रायल निषेधक हाच होय. परंतु हा काल धर्मसुधारणेस प्रतिकूल असल्यामुळे होसियाच्या  आध्यात्मीक शिकवणुकीचा इस्त्रायल लोकांचा धर्मभोळेपणा नाहीसा करण्याच्या बाबतीत काही उपयोग झाला नाही.

सॅमेरिया प्रांतात ख्रि्. पू.७२२ नंतर चालू झालेली याहवेदेवतेची उपासना. -  ख्रिस्तपूर्व ७३४ च्या सुमारास  असुरियाचा राजा तिगलथ पिलेसर याच्या स्वारीमुळे उत्तर इस्त्रायलमधील सत्ता नामशेष झाली. हयानंतर इस्त्रायल संप्रदायाचा कसकसा विकास होत गेला हे पाहणे असल्यास समेरिया प्रांताकडे वळले पाहिजे तिगलथ पिलेसर, सारगन वगैरेनी शेकडो इस्त्रायल लोक या देशाबाहेर हद्दपार केले व त्यांच्या जागी वायव्य मेसापोटेमिया प्रांतातील बरेचसे वसाहतवाले आणविले. परंतु इतकें करुनही याहवे देवतेची उपासना नाहींशी झाली नाही. ख्रि. पू. ७२२  च्या सुमारास उत्तरेकडील मठांचा पूर्ण नाश झाल्यामुळे व त्यांतील मूर्तीही पळवून नेल्यामुळे सुधारणावादी इस्त्रायल लोकांच्या बाजूस जास्तच बळकटी आली, आणि उपर्युक्त दहा धर्माज्ञांमध्ये मूर्तीपूजेचा निषेध करणारा एक नियम जास्त घालण्यांत आला. याशिवाय दुसऱ्या बाजूने परदेशांहून आलेल्या परकीय लोकांस आपल्या बाजूस ओढून घेण्याकरितां याहवे देवतेच्या उपासकांनी खूप जोराचे प्रयत्न चालविलेच होते. यामुळे इस्त्रायल धर्माचा एक नवीन महत्वाच्या बाबतीत विकास झाला.

खि. पू. आठव्या शतकाच्या उत्तरार्धात जूडा प्रांतात झालेली सुधारणा चळवळ -जूडा प्रांताच्या धार्मिक इतीहासाबद्दल जोआश याने केलेल्या सुधारणेपासून आहाज याच्या कारकीर्दीपर्यंतची कसल्याही प्रकारची माहिती उपलबध होत नाही. तथापी या वेळच्या राजांची हकीकत लिहीणाऱ्या ग्रंथकाराने ऐतिहासीक दृष्टया उपयुक्त व अत्यंत महत्वाची अशी दोन विधाने केली आहेत. यांपैकी एक विधानांत असे म्हटले आहे की यरुश लेमखेरीज इतर ठिकाणच्या मठांमध्ये जे उपासना करतात, त्या लोकांस याहवे देवतेचा उपमर्द करणाऱ्या वगात घालावयाचे. दुसरे विधान असे म्हटले नाश हा दुराचरणाचा प्रत्यक्ष परिणाम समजला जात असल्यामुळे ज्यांच्यावर सर्व नाश होण्याची पाळी आली, ते सर्वांपेक्षा जास्त पापी असले पाहिजेत, हें उघडच आहे. यावेळी जूडा प्रांतांत होऊन गेलेल्या इसाया नांवाच्या धर्मोपदेशकाची प्रवचने जास्त प्रमाणांत उपलब्ध झाली असती तर त्या वेळच्या परिस्थितीबद्दल जास्त विचार करतां आला असता. तथापि आहे या सामुग्रीवरुन असे दिसून येते की इसाया याने त्यावेळच्या धर्मविचारांस दोन प्रकारांनी जोराची चालना दीली. त्याचे मुख्य आग्रहाचे म्हणणे आहे की याहव देवतेचे ज्या प्रतीमांच्या साधनांनी निदर्शन करण्यांत येते त्या प्रतीमांपेक्षा असंख्य पटीनी जास्त असणारे याहवे देवतेंचे ऐश्वर्य आणि पावित्र्य यांचे मानवी बुध्दीस आकलन होणार नाही. इसाया याने असे म्हटले आहे की, इस्त्रायल लोकांना शुध्दीवर आणण्याकरितां याहवे देवतेच्या प्रदेशांत घुसलेले असुरियन लोक हा एक रोगच होय; आणि हे कार्य समाप्त झाल्यावर असुरियन लोकांची महत्वाकांक्षा व निर्दयता यांबद्दल त्यांस शासन मिळालेच पाहिजे.इसाया याने केलेल्या मुर्तिपूजेच्या निषेधाची आद्य कल्पना याच्या पूर्वीच्या होसिया नामक धर्मोपदेशकापासून घेतलेली दिसते. असुरियन वर्चस्वाबद्दल इसाया याने केलेल्या भविष्यामुळे  व याहवे देवतेच्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या अढळ निष्ठेमुळे जूडा प्रांतामध्ये काही कालपर्यंत त्याचे वजन इतके वाढले की त्या योगाने त्याला हेजेकिया राजाचें कांही तरी सुधारणा घडवून आणण्याबद्दल मन वळविणे शक्य झाले.इसायाच्या मुर्तिपूजेविरुध्द शिकवणुकीचा असा परिणाम झाला की याहवेची कांसे या धातूची बनविलेली जी सपक्ष सर्पाकृती प्रतिमा तीचा नाश करण्यांत आला. हेझेकियाने घडवून आणिलेल्या धर्म सुधारणेचे स्वरुप नीट रीतीने समजत नाही. ही सुधारणा बहुतेक यशस्तंभ काढून टाकण्याची  व धर्मोपदेशकांची स्थाने पापचरणहीन करण्याची असावी. लोकांच्या धर्मसमजुतीत इतक्या तऱ्हेने ढवळाढवळ करणाऱ्या राजाचे सिंहासन सुरक्षित राहणे ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. हेझेकिया राजाच्या कारकीर्दीच्या शेवटच्या काळांत बहुतेक लोक असूरियन युध्दाच्या भीतीनें ग्रस्त झाल्यामुळे त्यांस बंड करणे अशक्य वाटून ही सुधारणा स्वीकारणे भाग पडले असावे.

शुधारकांविरुध्द प्रतीक्रीया.- उपरिनिर्दिष्ट धर्म सुधारकांनी सुधारणेचें घोडे लोकांनां पटेल व रुचेल यापेक्षा जास्त पुढे दामटेल. हेझेकियाची मूर्तिपूजेविरुध्द चळवळ हे एक पाप आहे व या पापाचा सूड घेतलाच पाहीजे अशा मताचे त्या वेळी बरेच लोक होते व हेझेकीयाच्या मरणानंतर थोडयाच वर्षांत वरील सुधारणेविरुध्द प्रतिक्रिया सुरु झाली. यावेळी प्राचीन धार्मिक समजुतींचा उध्दार करण्यांत आला. इतकेच नव्हे तर असुरियन अधिकारी व वसाहतवाले यांनी कित्येक नवीन पंथ काढले व कांही कालपर्यंत जूडा प्रांतामध्यें शुध्द एकेश्वरवाद दृष्टीआड झाला.

 या कालामध्ये इस्त्रायल संप्रदयावर परकीय विचारांचा काहीच परीणाम झाला नाही असे मात्र नाही. या वेळच्या यरुशलेम येथील अत्यंत  रानटी उपासनापध्दतीवर शेजारच्या देशांतील उच्च संस्कृतीचा व सुधारलेल्या लोकांचा बराच परीणाम झाला. ख्रि. पू.७३२ मध्ये अहाझ हा दमास्कस येथे गेला असतां त्याने त्या ठीकाणी यरुशलेम येथील देवालयांतील कांशाच्या यज्ञवेदीपेक्षा पुष्कळ मोठी आणि मोठाले यज्ञ करण्यास उपयुक्त अशी पाषाणाची यज्ञवेदी पाहिली, व तशाच नमुन्याचे एक मोठे स्थण्डिल त्याने यरुशलेम येथे स्थापन केले.

ख्रि. पू. सातव्या शतकांतील समेरिया  प्रांतांत चालू असलेल्या याहवेदेवता संप्रदाय.-मनास्से राज्यावर आल्यापासून जूडा प्रांतामध्ये जरी धर्मसुधारणेची गळचेपी झाली, व याहवे संप्रदायाची स्थिति संकटव्याप्त झाली तरी उत्तरेकडे धार्मिक परिस्थिति उत्साहवर्धक होऊं पहात होती. समेरीया शहरांतील इस्त्रायल  सत्तेचा नाश झाल्यापासून बरेच इस्त्रायल लोक हद्दपार करण्यात आल्यामुळे व त्या ठिकाणी अनेक मिश्र जातींची वस्ती झाल्यामुळे याहवे देवतेचे वर्चस्व अगदी संपुष्टात आले. बेथेल येथील सुप्रसिध्द मठांतून तेथील धर्मोपदेशकांस हांकून लावल्यामुळे अॅमॉस, होसिया, एलिशा वगैरे धर्मोपदेशकांनी केलेल कार्य निष्फळ होण्याचा रंग दिसूं लागला. तथापि या प्रांतांत कांही इस्त्रायल धर्मोपदेशक अद्यापि राहिले होते याच वेळी देशांत बराच वेळ चाललेल्या युध्दामुळे व लोकसंख्या कमी झाल्यामुळे एकाएकी ग्रांथिक ज्वराचा प्रादुर्भाव झाला. या संधीचा फायदा घेऊन वरील धर्मोपदेशकांनी हा रोग याहवे देवतेची उपासना बंद पडल्यामुळे झाला असे जाहीर करुन नवीन वसाहतवाल्यांनां इतकी दहशत घातली की, त्यानी असुरियाच्या राजास इस्त्रायल धर्मोपदेशकास याहवे देवतोपासनेचा उपदेश करण्यास परवानगी देण्याबद्दल याचना केली व ती मान्य होऊन बेथेल येथील सुप्रसिध्द मठाचें द्वार राजाज्ञेवरुन खुले करण्यांत आले. या ठिकाणच्या मिश्र जातीच्या लोकांस विशिष्ट दैवतें सोडून देऊन याहवे देवतची उपासना करावयास लावणे ही गोष्ट अशक्य होती. तथापि, त्याची मनें हळूहळू याहवे संप्रदायाकडे आकर्षिण्याकरितां सार्वजनिक उपदेशस्थानें व यज्ञस्थण्डिलें जास्त जास्त बांधण्याची युक्ति फार उपयोगी पडली. एका बाबतीत मात्र होशियाच्या शिकवणुकीविरुध्द प्रतिक्रीया झाली. बेथेल येथील सुवर्णवृषभाची प्रतिमा काढून टाकण्यांत येऊन बेथेलाईट धर्मोपदेशकांनी अमूर्त्युपासनेचा स्वीकार केला.

समेरिया देशाकरितां झालेल्या कायदयाचे क्रमवार संहीतीकरण.- समेरिया प्रांतांतील नवीत रहीवाशांनां केवळ इस्त्रायल लोकांच्या सांप्रदायिक आचाराच्या ज्ञानाची जरुरी होती इतकेच नव्हे तर इस्त्रायल लोकांच्या व्यवहारांतील चालीरीतींच्या शिक्षणाचीहि आवश्यकता होती. ही जरुरी भागविण्याकरितां इस्त्रायल लोकांच्या प्राचीन दहा धर्माज्ञांमध्ये गुलामगिरी, मालमत्ता इत्यादि व्यवहारिक बाबींच्या नियमांची भर घालण्यांत आली.हाच नियमसंग्रह, थोडयाबहुत फरकाने सांप्रत उपलब्ध असलेल्या जुन्या करारांतील एक्झोडस (प्रकरण २० ते २३) मध्ये आढळतों.

केवळ कायदा तयार करण्याने परकीय परंपरेतील जाती मनापासून याहवे देवतेच्या उपासक बनतील, अशांतला भाग नव्हता, तर त्यांनां इस्त्रायल परंपरेचे व याहवे देवतेच्या इस्त्रायल राष्ट्राचें संरक्षण करण्याकरितां वारंवार केलेल्या अचाट कृत्यांचे, शिक्षण देण्याची जरुरी भासूं लागली. हा उद्देश साध्या होण्याकरितां त्या वेळी मोठमोठया मठांत  प्रचलित असलेल्या कथा,  अख्यायिका वगैरेंचा एक संग्रह तयार करण्यांत येऊन त्या सर्व माहितींचे मिळून एक सुसंबध्द कथानक बनविण्यांत आले, त्यांमध्ये उपर्युक्त मोझेसच्या कायदयाचीही भर घालण्यांत आली. या संग्रहातील अंतर्गत पुराव्यावरुन याची रचना त्या ठिकाणी आलेल्या परकीय जातीच्या लोकांकरितां केलेली दिसते. ही एकत्रीकरणाची व संस्मरणाची क्रिया किती काळपर्यंत चालू होती याचे अनुमान करतां येत नाही. या क्रियेची परिसमाप्ति ख्रि. पू. सातव्या शतकाच्या अखेरीस झाली असावी व समेरियांतील बेथेलच्या मुख्य मठामध्ये या संग्रहास शेवटचे संस्करण मिळाले असावे या एलोहीस्टने केलेल्या संग्रहाच्या मागाहून उत्तर इस्त्रायलमधील पंरपरेचा संग्रह करुन ठेवण्याची आवश्यकता तेथाल लोकांस भासूं लागली, व लवकरच पॅलेस्टाईनचा विजय आणि न्यायाधीश, राजे व धर्मोपदेशक महत्कृत्ये यासंबंधी प्रचलित असलेल्या आख्यायिकांचे संग्रह करण्याचा प्रयत्न झाला असावा. हे संग्रह करण्यामध्ये संग्राहकांचा केवळ प्राचीन विद्यासंशोधनाचा उद्देश नसून व्यवहारिक दृष्टी होती.

जोसियाच्या कारकीर्दीत सुधारणा.- या सुमारास जूडा प्रांतामध्ये मनास्से याच्या राज्यारोहणापासून धार्मिक सुधारणेविरुध्द जी जोराची प्रतिक्रिया झाली तिला हलके हलके ओहोटी लागण्याचा रंग दिसूं लागला. मनास्से हा ख्रि. पू. ६४१ मध्यें मरण पावल्यावर  त्याचा मुलगा अॅमॉन यास कांही थोडी वर्षें राज्य केल्यानंतर मृत्यू आल्यामुळे याचा आठ वर्षांचा जोसिया नावाचा मूलगा गादीवर बसला. जोसियाच्या कारकीर्दीतील आरंभीची फार थोडी माहिती अपलब्ध आहे. परंतु ख्रि. पू. ६२६ च्या सुमारास पॅलेस्टाईनच्या उत्तरेकडील भागांत सीथियन लोकांनी उडविलेल्या धूळधाणीची बातमी एकाएकी कानावर येऊन आदळली व या प्रकारचा उपद्रव जूडा प्रांतास न व्हावा म्हणून  त्या वेळच्या जेरेमिया इत्यादि प्रमुख धर्मोपदेशकांनी ही अरिष्टे, याहवे देवतेच्या क्रोधाचा परिणाम होय, अशा प्रकारचा उपदेश करण्यास सुरवात केली. जेरेमियाच्या मतांवर त्याच्या पूर्वी होऊन गेलेल्या होसियाच्या शिकवणुकीचा पुष्कळ परिणाम झालेला दिसतो. अशा रितीने जूडियन मठांमध्ये चालू असलेल्या यज्ञविधीसारख्या जुन्या धर्मक्रियांस आळा घालण्याची आवशकता राजा व त्याचे मंत्री यांस भासूं लागली असावी हे उघड आहे. परंतु राष्ट्राचे कल्याण, या धर्मकृत्यांवर अवलंबून आहे. अशी सार्वत्रिक समजूत असल्यामुळे वरील सुधारणा नुसता कायदा करुन घडवून आणणें शक्यच नव्हते. कोणताहि राजा कितीहि एकतंत्री असला तरी आपल्या प्रजेच्या सार्वत्रिक भावनांचा बिमोड करण्यास सहजासहजी धजणार नाही. परंतु या वेळी जोसिया राज्याच्या अमलाखाली असलेली सर्व मोठी नगरे परसत्तेखाली जाऊन जुडा प्रांतात यरुशलेम या सुप्रसिध्द नगराशिवाय बहुतेक सर्व खेडी शिल्लक राहिली होती. कोणत्याहि प्रकारच्या परिरिस्थितीत राजा व त्याचे सल्लागार यांनां यरुशलेम नगरावर धार्मिक सुधारणा लादणे शक्य नसल्यामुळे, सरतेशेवटी अशी तडजोड निघाली की, यरुशलेम नगरास मान्य होईल अशी एखादी सुधारणा काढली तर राहिलेल्या गावांच्या विरोधास जुमानण्याचे कारण नाही. शिवाय यरुशलेम येथील देवालयावर राजास देखरेख ठेवतां येणे शक्य होते.

अशा सर्व परिस्थितीचा विचार करुन जोसिया राजा व त्याचे सल्लागार यांनी एकदम येरुशलेम खेरीज इतर ठिकाणच्या मठांचा   फन्ना उडविला, व देवालयांत वस्ती करुन राहिलेल्या कुपथगामी धर्मोपदेशकांस ठार मारिले, व परठिकाणांहून आलेल्या नवीन पंथाची समूळ उचलबांगडी केली. यज्ञविधीच्या बाबतीत कोणताहि फेरफार न करितां अशी एक अट घालण्यांत आली की, पूर्वीचेच यज्ञविधी यरुशलेम खेरीज कोणत्याही ठिकाणी करण्यात येऊ नयेत. या सर्रास केलेल्या सुधारणेमुळे कांही कालपर्यंत अनेक अडचणी उद्भवल्या, हे सांगावयास नकोच. यांपैकी पहिली अडचण म्हणजे सभोवतालच्या प्रदेशांतील नष्ट झालेल्या मठांतील लीव्हाइट नांवाच्या मोकळया झालेल्या धर्मोपदेशक वर्गास वरील देवालयांतील धर्मोपदेशकांप्रमाणे ठार न मारतां त्यांची कोठेतरी सोय लावावयास पाहिजे होती. यरुशलेम येथील यात्रेकरुंची संख्या आतां साहाजिकच वाढणार असल्यामुळे तेथील उत्पन्नही वाढले, व तेथे वरील उपाध्यायांची सहज सोय करतां येईल अशी जोसियाची कल्पना होती व त्याप्रमाणे त्याने व्यवस्थाही केली. परंतु तेथील झेडोकाइट उपाध्याय वर्गाने या बाहेरुन आलेल्या उपाध्यायवर्गास जरा कमी प्रतीचे मानल्यामुळे यरुशलेम येथील देवालयांत दोन प्रकारचे उपाध्यायवर्ग निर्माण झाले.

याशिवाय, वरील सुधारणेच्या योगाने बाहेरील प्रांतात बराच असेतांष माजणे सहाजिक होते. कारण यज्ञाकरितां आणिलेला पशु आतां केवळ यरुशलेम येथेच मारावा लागत असल्यामुळे दूरदूर राहणाऱ्या लोकांची फार गैरसोय होत होती. अशा प्रकारच्या धार्मिक परिस्थितीत यज्ञविधीची आवश्यकता प्रतिपादन करणारा एक नवीन उपदेशकवर्ग उदयास आला. अशा रीतीने उपरिनिर्दिष्ट उपाध्यायवर्ग  व जेरेमिया या दोन पक्षांतील मतभेद लक्षांत घेतला, तरी जेरेमियाचे एकंदर समाजावर बरेच वजन होते. जोसिया राजास धर्मभोळेपणाचे कित्येक प्रकार व सुधारलेल्या संप्रदायातील अनीतिमूलक आचार इत्यादि ज्या गोष्टी काढून टाकतां आल्या नाहीत, त्या गोष्टींवर देखील जेरेमियाने झणझणीत कोरडे उडवून वरील प्रकार बंद करण्याचा यशस्वी रीतीने प्रयत्न केला. जोसियाच्या मृत्यूनंतर लोकांच्या मनाने पूर्वीच्या धर्मभोळेपणाच्या गोष्टींकडे पुनश्च धाव घेतली नाही याचे सर्व श्रेय जेरेमियासच दिले पाहिजे.

कार्चेमिश येथील युध्दांत फारोच्या पराजयामुळे जूडाप्रांतातील लोकांस ज्या कांही खोटया आकांक्षा उत्पन्न झाल्या त्यामुळे जेरेमियाच्या कर्तृत्वशक्तीस पुन्हां वांव मिळावा. उत्तरेकडून येणाऱ्या शत्रूंच्या हस्ते जूडा प्रांताचा समूळ नाश होईल ही जेरमियाची अपेक्षा अद्याप खरी झाली नव्हती. कारण, सिथियन लोकांनी जूडा प्रांतावर स्वारी केल्याचा बिलकूल पुरावा नाही. परंतु सुप्रसिध्द खाल्डियन लोकांच्या स्वारीच्या नवीन उत्पन्न झालेल्या भीतीमुळे वरील अपेक्षा खरी होण्याची चिन्हे दिसूं लागली. आपण दिलेला पूर्वीचा निर्णय चुकलेला नसून फक्त जरा पलीकडे गेला, हे दाखविण्याकरितां जेरेमियाने ख्रिं. पू. ६२६ सालापासून तयार केलेली आपली भविष्ये आपल्या बरुच नामक शिष्यास लिहून काढण्यास सांगितली.

जूडा प्रांतातील राजसत्तेची परिसमाप्ति व यरुशलेम येथील देवालयाच्या नाशा नंतरची धार्मिक स्थिती- ख्रि. पू. ६०० च्या सुमारास जूडा प्रांताचा राजा जेहुयाकिम याने नेबुकाडंरेसर या खाल्डियन बादशहाशी केलेला तह मोडून बंड केल्यामुळे यरुशलेमवर खाल्डियन लोकांची स्वारी झाली, व तीमध्ये जेहुयाकिम हा बेपत्ता झाल्यामुळे त्याचा मुलगा जेहुयाचिन हा राज्यावर बसला. परंतु खाल्डियन लोकांनी जेहुयाचिन याचा चुलता झेडोकिया यास गादीवर बसवून पूर्वीच्या घराण्यांतील सर्व मंडळीस कैद करुन बाबिलोन येथे नेले. खाल्डियन लोकांच्या सामर्थ्याचा झेडोकिया यास पुरा अंदाज नसल्यामुळे जेरेमिया नको नको म्हणत असतां त्याने बंडाचे निशाण उभारले, व याचा परिणाम असा झाला. की, यरुशलेम येथील देवालयादिकांची जाळपोळ करण्यांत येऊन पूर्वीच्या स्वारीतून राहिलेले पुष्कळ धर्मोपदेशक व रहिवाशी यांस बाबिलोन येथे कैद करुन नेण्यांत आले. व झेडेकियाचे डोळे काढण्यांत आले. हा सर्व प्रकार ख्रि. पू. ५८६ च्या सुमारास झाला.

जुन्या कराराच्या रचनेचा स्थलदृष्टया व कालदृष्टया विचार केला असतां तो ग्रंथ उमरावशाहीच्या दृष्टीकोनास अनुसरुन लिहिलेला आहे. या धर्मग्रंथावरुन सकृदृर्शनी असा भास होतो की, जूडा प्रांतातील अत्यंत गरीब लोकांखेरीज इतर सर्व प्रजा हदृपार केली असावी. परंतु खरी वस्तुस्थिति अशी होती की, सर्व जूडा  प्रांतास खाल्डियन लोकांपासून बराच त्रास झाला होता, तरी नेबुकाडरेसर याच्या रागाचा मुख्य भर, यरुशलेम नगरावर होता व खाल्डियन लोकांची स्वारी परतल्यावर बरीचशी हदृपार केलेली कुटूंबे पुन्हां जूडा प्रांतांत परत आली. प्रांतावरील सत्ता एका इस्त्रायल मनुष्याच्या हातांत देण्यांत आली व अहिकमचा मुलगा गेडॅलिया हा जूडा प्रांताचा मुख्य अधिकारी नेमण्यांत आला. पांच बर्षानंतर गेडॅलियाचा कोणी तरी वध केल्यामुळे या वेळेपासून कोणी तरी बाबिलोनी अधिकारी जूडा प्रांतावर अम्मल चालवीत असे.

गेडॅलियाच्या वधामुळे खाल्डियन लोक चिडून जाऊन जूडा प्रांतावर स्वारी करतील या भीतीने तेथील बरेचसे इस्त्रायल लोक ईजिप्तमध्ये पळून गेले. ईजिप्त हा देश बराच कालपर्यंत समेरिया, जूडा वगैरे प्रांतांतील संत्रस्त रहिवाशांचे माहेरघर बनले असल्यामुळे त्या ठिकाणी इस्त्रायल लोकांची बरीच वस्ती होऊन याहवेदैवतोपासनाहि त्यांमध्ये जारीने सुरु झाली होती. वरील रहिवाशांनी ईजिप्तमध्ये आपणांवर जेरेमिया यास येण्यास भाग पाडले. यानंतरच्या जेरेमियाच्या चरित्राबदृल व मृत्यूबदृल कांही माहिती उपलब्ध होत नाही. कदाचित् तो यरुशलेमला परत येऊन मृत्यू पावला असावा. या ठिकाणी असे दिसून येते की, शेवटपर्यंत जेरेमिया याच्या वांटयास विघातक कामगिरी करण्याचेच श्रेय आले. आयुष्याच्या शेवटच्या कालापर्यंत जेरेमिया याच्या चित्तांत आपणास कांही तरी विधायक कामगिरी केली पाहिजे, ही जाणीव झाली नाही.

यरुशलेममधून तेथील उपाध्यायवर्गास हदृपार केले व मुख्य देवालय जाळले, तरी यज्ञविधि करणे, अशक्य झाले नव्हते. कारण, अहाझ याने उभारलेले पाषाणस्थण्डिल अद्यापि शिल्लकच होते. तथापि, उपाध्यायवर्गाच्या अभावी पुष्कळ संकटे उत्पन्न झाली असावीत. कारण, धार्मिक व व्यावहारिक आयुष्यक्रमांतील भेद ओळखण्याची पात्रता सामान्य जनसमूहाच्या अंगी क्वचितच होती. या बाबतींत जूडा प्रांतापेक्षा सॅमेरियाची स्थिति चांगली होती. कारण, सॅमेरिया प्रांतात असुरियन बादशहाच्या खास परवानगीने  बेथेल येथील मठद्वार सर्व लोकांस खुले करण्यांत आले होते. डेव्हिडच्या राजघराण्याच्या हकालपट्टीने समेरिया  जूडा या दोन प्रांतातील वैमनस्याचे कारणच नाहीसे झाल्यामुळे व दोन्ही प्रांतांची राजकीय परिस्थिति सारखीच झाल्यामुळे परस्परांच्या फायदयाकरितां या दोन्ही प्रांतांचे संगनमत होण्यास कांहीच हरकत नव्हती; व अशा प्रकारचे संगनमत कोणत्या तरी उपायांनी केव्हां तरी घडवून आणण्यांत आले, ही गोष्ट अनेक प्रकारच्या इतर पुराव्यावरुन सिध्द होणारी आहे. बेथेल येथील उपाध्यायवर्ग जेरेमिया याचा अनुयायी नसून तत्पूर्वीच्या एका परंपरेपैकी होता. बेथेल आणि यरुशलेम ही शहरे जवळ जवळ असल्याने बेथेलच्या  उपाध्यायवर्गाने यरुशलेम येथील इस्त्रायल लोकांच्या गरजा भागवावयाच्या, व याच्या उलट यरुशलेमचा मठ बेथेलच्या मठांतील उपासकांकरिता खुला ठेवावयाचा, असें परस्परानुमतीनें ठरविण्यांत आलें असावे. अर्थात या ऐक्याच्या सार्वत्रिक प्रसाराच्या मार्गामध्ये बरेच अडथळे होते. त्यांतल्या त्यांत यरुशलेम व सॅमेरिया या दोन्ही ठिकाणच्या लोकांस मान्य असलेल्या दोन निरनिराळया मूळ धर्मग्रंथांचे एकीकरण कसें करावयाचे हा प्रश्न विशेष महत्वाचा होता. समेरियांतील  बेथेल वगैरे ठिाकाणच्या मठांतून एलोहिस्टीक लेख सामान्यपणें धर्मग्रंथ म्हणून मानिला जात असे व जूडा प्रांतामध्ये जेरेमियाच्या विरोधास न जुमानतां जव्हिस्टिक लेखास मान्यत्व प्राप्त झाले होते. या दोन्ही जातींपैकी कोणतीहि एक जात स्वतःस प्रमाणभूत असलेल्या धर्मग्रंथाचा त्याग करण्यास अनुकल होईल ही अपेक्षा करणेच चुकीचे होते आणि ही महत्वाची अडचण नाहींशी करण्याकरितां एलोहिस्टिक व जव्हिस्टिक या दोन्ही धर्मलेखांचे एकत्रीकरण करण्यांत आले.

कोणत्याहि प्रकारच्या राष्ट्रीय आंकाक्षा बाळगणारांनां हे उघड दिसून येईल की, राष्ट्रांतील शक्तीचे केंद्रीकरण व ऐक्य उत्पन्न करणाऱ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. व या दृष्टीने पाहतां जेव्हा बेथेल व यरुशेलम यांच्या सलोख्यापासून बरेच फायदे होण्याचा रंग दिसूं लागला. तेव्हां आपोआपच एक मठ करणाऱ्या कायद्याचे क्षेत्र विस्तृत होईल तर बरे, असे सामान्य जनसमूहास वाटूं लागले असल्यास नवल मानण्याचे कारण नाही. परंतु या मार्गांतहि बऱ्याच अडचणी होत्या. यरुशलेमखेरीज इतर ठिकाणी प्राणिवध करतां येणे शक्य नसल्यामुळे जूडा प्रांतातील दूरदूरच्या प्रदेशांतील लोकांस आधीच गैरसोय झाली होती; मग उत्तर समेरिया किंवा गॅलीली या प्रदेशांतील दूरदूरच्या लोकांनी ही गैरसोय सहन केली असती, अशी कल्पना करणेच चुकीचे होईल.

शिवाय, सबंध प्रांताने एकमताने यरुशलेम येथील देवालय हीच एक प्राणियज्ञाची जागा म्हणून मान्य केली असती अशी जरी कल्पना केली तरी इतर ठिकाणच्या उपाध्याय वर्गाची कोणत्या तऱ्हेने सोय लावावयाची हा प्रश्न पुढे होता. तसेंच या समाजांत खुनाचा सूड घेण्याची चाल असल्यामुळे ज्याठिकाणी एखाद्या उपद्रवी नरहिंसकास आश्रय मिळत असेल ते सर्व मठ मोडून टाकणे या गोष्टीबद्दल तेथील शासनसत्तेस बरेच अवघड गेले असावे. दुसरी एक अडचण अशी होती की, जूडा प्रांतामध्ये थोडयाबहुत प्रमांणात या सुधारणाकल्पनांची वाढ अगोदरच झाली असल्यामुळे समेरिया व जूडा या प्रांतात सारख्याच दर्जाच्या सुधारणा लागू करणे, फायद्याचें झाले नसतें. अशा रीतीनें मागल्या चुकांनी मिळालेला धडा घेऊन ख्रि.पू. सहाव्या शतकांतील सुधारणावाद्यांनी उदार धोरण स्वीकारले. प्रथम जन्मलेल्या अर्भकांची यज्ञांत हिंसां करण्याच्या पध्दतीची पूर्ण बंदी करण्यांत आली., व ग्राम्यपशुहिंसेच्या बाबतीतहि मारलेल्या पशुंच्या अंगातील चरबी व रक्त ही अत्यंत पवित्र मानली जाऊन चरबीची आहुति देण्यांत येत असे. या पदार्थांपैकी एकहि खाण्याची परवानगी न ठेवता फक्त त्या पशूचे रत्तच् तेवढे जमीनीवर शिंपडण्याची परवानगी देण्यांत आली. अर्थात, या एका दुरुस्तीने एक मठाचा कायदा चोहोकडे लागू करण्यामध्ये असलेली मोठी अडचण दूर झाली. या सुधारणावाद्याचे इतर बाबीतहि उदार धोरण होते.

इतर ठिकाणच्या उपाध्यायवर्गाची एकाच मुख्य मठामध्ये तरतूद करावयाची, हेंच जोसियाचे धोरण जे मध्यंतरी झाडोकच्या मुलांनी बंद केले होते, ते पुनश्च स्वीकारण्यांत आले, व कांही मठांमध्ये पशुयज्ञ करण्याची जरी बंदी करण्यांत आली, तरी त्या मठांचे आश्रितांना राहण्याचें हक्क कायम राखण्यांत आल. या व आणखी दुसऱ्या कांही सुधारणांचे द्दश्य स्वरूप म्हटले म्हणजे डयूटेरोनोमी हा ग्रंथ असून यांतील मुख्य भाग कायद्याचा होय. या कायद्याच्या भागांतील पहिले कलम यज्ञकृत्ये एकाच ठिकाणी करण्यांत यावीत, याबद्दलचे आहे. या कायद्याच्या भागांत यज्ञकृत्यांची आवश्यकता सांगितली असल्यामुळे जरी यांत व जेरेमियाच्या शिकवणुकीत बरेंच अंतर आहे, तरी जेरेमियाच्या यज्ञसंस्थेस उच्चस्वरुप देण्याचा उद्देश यामुळे बराच सफल झाला. पूर्वकाळी मांसाशन हाच यज्ञक्रियेचा प्रधान उद्देश असल्यामुळे जेरेमियाने यज्ञक्रियांवर झणझणीत टीका केली. परंतु आतां इच्छा होईल त्याला घरी मांसाशन करणे शक्य असल्यामुळे यज्ञसंस्था तरी या किळसवाण्या प्रकारापासून अलिप्त ठेवणे शक्य झाले. यज्ञ वारंवार न झाल्यामुळे लोकांस कदाचित धर्माची आठवण होणार नाही, ही एक भीति असतेच, परंतु या भीतीचें निवारण करण्याकरितां डयुटेरोनोमिक धर्मसुधारकांनी इस्त्रायल लोकांचा सामान्य कायदा पाळण्याची आवश्यकता उपदेशिली होती. तसेंच यज्ञसंस्थेच्या आवश्यकतेवर उभारणी केलेल्या प्राचीन दहा धर्माज्ञा त्यावेळी इस्त्रायल लोकांना मान्य होणे शक्य नसल्यामूळे ज्यांमध्ये न्याय, दया व सत्य यांचे महत्व प्रस्थापित केले होते अशा नवीन दहा धर्माज्ञा बनविण्यांत आल्या. यांमध्ये मूळांपैकी पहिली व सॅबॅथ हा सण पाळण्याची अशा दोन आज्ञा पूर्वीच्या कायम ठेविल्या असून शिवाय मूर्तिपूजेचा निषेध व जेरेमिया इत्यादी धर्मोपदेशकांनी केलेल्या समाजनीतिमूलक शिकवणुकी यास धरुन बाकीच्या आज्ञा तयार केल्या होत्या. शेवटी शेकेम येथील मठ तेवढाच वरील कायदा लागू केल्यावांचून राहिला होता. हा मठ जोसेफ याचें दफनस्थान समजण्यांत येत असे व तेथील स्थण्डिलाजवळील कांही शिलाखंड जोशिआ याने स्थापन केले असल्याबद्दल समज होता. वरील एक मठाचा कायदा लागू करुन शेकेम येथील मठाचे महत्वच कमी होणार होते. आणि कायदा जर न लागू करावा तर इस्त्रालय राष्ट्राच्याऐक्यास पुर्णत्व प्राप्त झाले नसते. ही दुहेरी अडचण टाळण्याकरितां अशी तडजोड करण्यांत आली की, शेकेम येथील मठाला नवीन कायदा लागू करण्यांत यावा. परंतु पूर्वीचे यज्ञस्थंडिल कोणत्याहि प्रकारच्या यज्ञक्रियेकरितां उपयोगांत न आणतां तसेंच ठेवण्यांत यावें. या वेळी यज्ञिय पशुहिंसेच्या उपयोगी पडत असलेल्या शिलाखंडावरील सर्व घाण स्वच्छ करण्यांत येऊन त्यावर चुन्याचे लुकण लावण्यांत येऊन नवीन कायद्याची कलमे कोरण्यांत आली. राष्ट्रीय ऐक्याची भावना उद्दीपित् करण्याच्या कामी शेकेम येथील जत्रांचा बराच फायदा घेण्यांत आला. अशारीतीने सर्व ठिकाणच्या इस्त्रालय लोकांना एकच कायदा लागू करण्यांत आल्यामुळे इस्त्रायल लोकांतील राष्ट्रीय ऐक्याची जाणीव पुष्कळच वाढली.

बाबिलोन मध्ये हद्दपार केलेल्या लोकांमध्ये झालेला संप्रदाय विकास. - याच सुमारास बाबिलोनमध्यें वस्ती करुन राहिलेल्या यहुदी जातीच्या लोकांमध्ये एका अत्यंत महत्वाच्या बाजूनें संप्रदायाचा विकास होत होता. ईजिप्तमध्ये राहिलेल्या ज्यू लोकांप्रमाणे यांनीहि देवतेच्या उपासनेकरिता एक दोन देवालयें बांधून आपला संप्रदाय संरक्षण केला असावा. परंतु ईजिप्तमधील यहुदी रहिवाशांनी स्वखुषीने आपला देश सोडला होता व बाबिलोन मधील लोंकाची तशी स्थिति नसल्यामुळे त्यांमध्ये राष्ट्रीयत्वाचें वारें फार जोरानें खेळत होते. या लोकांच्या धार्मिक कल्पनांना सुव्यवस्थित स्वरूप देण्याची मोठी महत्वाची कामगिरी ख्रि.पू. ५९७ त जेहुचिन याजबरोबर हद्दपार होऊन गेलेल्या झेडोकाइट उयाध्यायांनी केली. जोशियाच्या सुधारणेमुळें उपाध्याय वर्गास यरुशलेम येथील मठांत महत्वाचा उच्च दर्जा प्राप्त झाला असल्यामुळे बाबिलोन देशांत मठ बांधण्याबद्दलच्या मागणीचा उपाध्याय वर्गाने केव्हांहि इनकारकच केला असता. यांपैकी इझिकेल या धर्मोपदेशकाने आपल्या हद्दपारीनंतर चार वर्षांनी स्वतःस देवाचा प्रेषित असे म्हणवून घेऊन, सुमारे बावीस वर्षेंपर्यंत आपल्या देशबांधवांमध्ये बरीच धर्मसुधारणा घडवून आणिली. इतर मोठया धर्मोपदेशकांप्रमाणे इझिकेल याची देखील अशी पक्की समजूत झाली होती की, इस्त्रालय लोकांस होत असलेला त्रास ही पूर्वीच्या पापाची फळें होत. उदाहरणार्थ बापाच्या बायकांचा मुलानें पत्नीत्वाने स्वीकार करणे, त्याचप्रमाणे पित्यास दुसऱ्या स्त्रीपासून झालेल्या मुलीशी म्हणजे आपल्या सावत्र बहिणीशी विवाह करणे, इत्यादी गोष्टी त्याने अक्षम्य मानल्या आहेत. त्याच्या मते इस्त्रायल लोकांचे मुख्य पाप म्हणजे मूर्तिपूजा हे होय. इझिकेल याने जरेमियाप्रमाणे यज्ञसंस्थेवर टीका केली नाही. कारण त्याचे असें ठाम मत होतें की, यज्ञसंस्था ही दैवीस्वरुपाची आहे.

अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये इझिकेल यानें एक प्रकारचा व्यक्तिवाद स्थापन केला ही गोष्ट स्वाभाविक आहे. ह्या हद्दपार झालेल्या लोकांपैकी कांही बाबिलोनमधील परकीय संप्रदायामध्ये गुरफटून गेले असावेत ही गोष्ट दिसून येते, व अर्थातच इतर लोकांपैकी प्रत्येकाच्या मनावर याहवे देवतेच्या अचाट सामर्थ्याचे, अनुपमेय कृपेचे महत्व ठसलेले रहावे म्हणून इझिकेलने प्रत्येक जीवाचा याहवे देवतेशी अत्यंत जिव्हाळयाचा असा निकट संबंध असतो हे मत स्थापन करण्याचा अट्टाहासपूर्वक प्रयत्न केला. इझिकेलची अत्यंत महत्वाची कामगिरी म्हटली म्हणजे परकीय संस्कृतीचा हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याकरितां इस्त्रायल संप्रदायामध्ये त्याने उत्पन्न केलेली शक्ति होय. झाडोकाइट यांसच यरुशलेम येथील उपाध्येपणाचा हक्क आहे अशी इझिकेलची पूर्ण खात्री असल्यामुळे, त्यांनी एकंदर इस्त्रायल लोकांच्या देवालयांतील याज्ञिकीचा संग्रह करण्यास आरंभ केला व नवीन काळास अनुरुप असें त्यांमध्ये पुष्कळ फेरफार केले.

सायरसने मिळविलेले विजय व बाबिलोनवर येऊं पहात असलेली परकीय सत्ता या गोष्टीमुळे तेथील हद्दपार केलेल्या इस्त्रायल लोकांमध्ये इतकेंच नव्हे तर पॅलेस्टाइनमधील त्यांच्या देशबांधवामध्येंहि विलक्षण अस्वास्थ उत्पन्न झाले. या प्रकारच्या परिस्थितीमुळे या काळांतील एका धर्मोपदेशकाच्या सुप्रसिध्द वत्कृत्वास अवसर मिळाला. या धर्मोपदेशकाच्या  प्रवचनापैकी फार थोडा भाग सांप्रत उपलब्ध आहे, व त्यावरुन खाल्डियन सत्तेच्या लौकरच होणाऱ्या ऱ्हासामुळे इस्त्रायल लोकांची सुटका होणार इत्यादि गोष्टी दूरदर्शीपणामुळे त्यास अवगत झाल्या असाव्यात. अर्थात ह्या अंकाक्षा पुढे झाल्या किंवा नाही, व बाबिलोनियांतील यहुदी लोकांस स्वदेशी परत जाण्यास परवानगी मिळाली किंवा नाही या गोष्टीस 'किंग्ज क्रानिक्लर' याच्या विधानाखेरीज दुसरा विश्वासार्ह असा पुरावाच नसल्यामुळे त्यास कांहीच किंमत देता येत नाही. सायरसचा ''सिलेंडर शिलालेख'' याजवरुनहि बाबिलोनमधील सर्व इस्त्रायल लोकांस स्वदेशी जाण्यास परवानगी मिळाली असे सिध्द होत नाही. मात्र सायरसच्या कारकीर्दीत जूडा प्रांत हा शेस बाझर नांवाच्या बाबिलोनी अधिकाऱ्याच्या हाताखाली होता असे दिसते.

यानंतर डरायसच्या कारकीर्दीतील दुसऱ्याच वर्षी जूडा प्रांतातील पूर्वीच्या राजघराण्यांतील एका झेरु बाबेल नांवाच्या गृहस्थाच्या अधिपत्याखाली जूडा  प्रांत देण्यांत आला. कारण त्या प्रांतातील रहिवाश्यांनी सलोख्याने रहावे अशी डरायस याची इच्छा होती. झेरुबाबेलच्या वेळी बऱ्याच लोकांना बाबिलोनमधून स्वदेशी परत येण्यास सवलत मिळाली असावी ही गोष्ट खरी दिसत नाही. परंतु त्याच्या सभोवती कांही झाडोकाइट उपाध्याय वर्गांपैकी लोक गोळा झाले होते यांत शंका नाही.

यरुशलेमध्ये इस्त्रायल संप्रदायास ऊर्जितावस्था आणण्याकरितां कोणत्याच प्रकारचे प्रयत्न ह्यावेळी झाले नव्हते. त्या ठिकाणच्या स्थण्डिलांवर अद्यपि यज्ञक्रिया चालू होत्या. परंतु देवालयाचा अद्याप जीर्णोद्वार झाला नसून त्याचा मोडकळीस आलेला भागहि स्वच्छ करण्यांत आला नव्हता. यरुशलेम भोवतालचा तट अद्यापि पडीक स्थितीतच होता, व तेथील रहिवाशी हे सामान्यतः दारिद्रयाने गांजलेले होते. तथापि, हे दारिद्रय सार्वत्रिक नसून यांपैकी कांही लोकांची निवासस्थाने वाजवीपेक्षा जास्त ऐषआरामाने युक्त अशी बांधिलेली होती. याच सुमारास झेरुबाबेल याच्या झालेल्या नेमणुकीमूळे लोकांमध्ये यरुशलेम येथील देवालय पुन्हां बांधण्याबद्दल जी खळबळ सुरु झाली. तिचा फायदा घेऊन हग्गई या धर्मोदशेकाने लोकांस इतका परिणामकारक उपदेश केला की, त्या उत्साहभरांत सर्व जागा साफसूफ होऊन एक महिन्याच्या अवधीतच पायाचा दगड बसविण्यापर्यंत पाळी आली. पर्शियन साम्राज्य मोडण्याबद्दलचे हग्गईचें भविष्य खरें ठरण्याचे चिन्ह दिसेना अशा रीतीने वाढलेल्या लोकांच्या उत्साहास कमीपणा येऊं नये म्हणून झकारिआ यानें अनेक रुपकपूर्ण भविष्ये लिहून ठेविली. देवालयाच्या बांधणीचे काम जसजसे उत्तम तऱ्हेने होऊं लागले तसतशी झेरुबाबेलच्या मनांत यरुशलेमचा तट पुन्हा बांधून काढण्याची कल्पना जास्त द्दढ होऊं लागली. परंतु या कल्पनेमुळे स्वाभाविकपणे सॅमॅरिटन लोकांच्या मनांत असा संशय येऊं लागला की झेरुबाबेल हा दुसरा सालोमन बनण्याची महत्वाकांक्षा बाळगीत असावा. अशा परिस्थितींत यरुशलेम येथे कायम वस्ती करुन राहिलेल्या इस्त्रायल लोकांमध्ये व पूर्वेकडून आलेल्या त्यांच्या बांधवामध्ये खटका उडणे अपरिहार्य होते. यावेळी जेहोझाडाकचा मुलगा जोसिया हा यरुशलेम येथील मुख्य धर्माधिकारी होता. जोसिया हा पूर्वी बेथेल येथील मठांत काम करणाऱ्या आरोनाइट उपाध्याय वर्गापैकी असल्यामुळे झेरुबाबेल याच्याबरोबर असलेल्या झाडोकाइट उपाध्याय वर्गास जोसिया हा अत्यंत कमी दर्जाचा आहे असे वाटले; तथापि जोशुआ यास आपली बाजू उचलून धरण्यास झाकरिआ नांवाच्या उपर्युक्त राजाचे पुष्कळ साहाय्य झाले. कारण झकारिया याने असे जाहीर केले की, जोपर्यंत जोशुआ याहवे देवतेचा कायदा पाळीत आहे तोपर्यंत देवालयाचा सर्वाधिकारी तोच असावा. अर्थात् याबरोबर झकारियाने असेंहि कबूल केले की, डयुटेरोनोमिक कायद्यांतील नियमाप्रमाणें झाडोकाइट उपाध्यायांना तेथील उपाध्यायकी करण्याची परवानगी असावी; परंतु देवालयातील मुख्य धर्माधिकाऱ्याची जागा आरोनाइट उपाध्यायास देण्याचा असा परिणाम व्हावयाचा की, ज्या झाडोकाइट धर्मोपदेशकांस लोकांची उपाध्यगिरी करण्याची इच्छा असेल, त्यांनां आरोनाइट वर्गांत आपली नावे नोंदलीच पाहिजेत. ही बातमी जेव्हां बाबिलोन मधील हद्दपार केलेल्या झेरुबाबेलच्या अनुयायी यहुदी लोकांना कळली, तेव्हां तेथील धर्मोपदेशकांनांहि ही गोष्ट स्वीकारावी लागली व झाडोकाइट वर्गाचा आरोनाइट वर्गाशी संयोग करणे भाग पडले असावें.

समेरिया व जूडाप्रांतांतील मत्सर व यरुशलेम भोवतालच्या तटाची पुनश्च बांधणी. - झकारिआ यानें केलेल्या जोशुआच्या तरफदारीचे परिणाम बरेच महत्वाचे झाले समेरिआ व जूडा या दोन प्रांतामध्ये घडून आलेले धमैक्य नवे असल्यामुळे या वेळी बाबिलोनी पक्षाचे वर्चस्व  झाले असते, तर या दोन्ही प्रांताचे ऐक्य नाहीसे होऊन समोरियांतील इस्त्रायल संप्रदाय व राष्ट्रीय जीवन यांचा अगदी निराळया तऱ्हेने विकास झाला असता. तथापि, या मतभेदाचे वारें सामान्य लोकांस लागले नव्हते. या दोन प्रांतातील स्पर्धेचे स्वरुप धार्मिक म्हणण्यापेक्षा राजकीय होते व त्यातच राजसत्ता पुन्हां स्थापन करावयाची असल्यास सॉल व डेव्हिड या दोन घराण्यांतील गादीच्या वारस हक्काबद्दल असलेली तेढ होतीच.

प्राचीन आख्यायिकांचा संग्रह करण्याचे कार्य अद्यापपर्यंत सुरुच होते. पॅलेस्टाइनच्या विजयाबद्दल निरनिराळया जातीमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथाचे ऐक्यवर्धनाच्या उद्देशाने पुनःसंस्करण करण्यांत  आले होते. यावेळी या प्रांतामध्ये परधर्मीय लोकांचे लोटचे लोट येणे चालू असल्यामुळे व याहवे देवतेच्या उपासनासंप्रदायाची अवहेलना होत असल्यामुळे एक निराळाच धर्मोपदेशक वर्ग पुढे आला. या वर्गाने प्राचीन आख्यायिका आधाराला घेऊन मूर्तिपूजेचा निषेध वगैरे गोष्टीसंबंधी लोकांस उपदेश केला. झकारिआ यानें ज्या लोकांची मने यरुशलेमभोवती तट बांधण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच लोकांच्या मनांतील वरील कल्पना अद्यापि नाहीशा झाल्या नव्हत्या; व त्याप्रमाणे ख्रि. पू. ५१५ च्या सुमारास यरुशलेमचा तट बांधण्याचे काम सुरु झाले असावे. या कामामध्ये पर्शियन प्रांताधिकाऱ्यांनी बरेच वेळां हरकती घेऊन काम बंद पाडण्याचा यत्न केला. ख्रि.पू. ४५५ च्या सुमारास बहुतेक तट बांधण्याचे काम पूर्ण झाले. परंतु या वेळी अर्टाक्सर्क्सिस या पर्शियन बादशहाच्या परवानगीने समारिटन, अॅमोनाइट, मोबाइट वगैरे मिश्र लोकांचे सैन्य उभारण्यांत येऊन या तटाची पुष्कळ नासधूस व जाळपोळ करण्यांत आली, व बरेच लोक गिरफदार करण्यांत आले. अशा रितीने एका शतकाच्या अवधीत उत्तरेकडून जूडा प्रांतामध्ये समाविष्ट झालेल्या एडोमाइट लोकांस या विश्वासघाताच्या कृत्यामध्ये भाग घेण्यास लावले असण्याचा पुष्कळ संभव आहे.

लवकरच यरुशलेमवर स्वाऱ्या करणाऱ्या लोकांवर त्यांनी स्वतः केलेली कृत्ये शेकली. ख्रि.पू.४८८ मध्ये मेगॅबिझोस या सिरियन सत्रपानें बंड केले व त्यामध्ये समेरिया प्रांत समाविष्ट झालेला दिसतो. अर्थातच यावेळी यहुदी लोक अगदी दूर राहिले; व या योगाने त्यांच्या राजनिष्ठेबद्दल खात्री पटल्यामुळेंच की काय, ख्रि.पू.४४५ च्या एप्रिलमध्ये नेहेमिया नांवाच्या एका अधिकाऱ्याने यरुशलेम शहराची पाहणी करण्याबद्दल व त्यासभोवती तट बांधण्याबद्दल परवानगी मिळवली. नेहेमिया यानें यरुशलेम येथे आल्यावर पूर्वीच्या तटाची पाहणी करुन नागरिकांची एक सभा बोलावली. या सभेत नेहेमियाची सूचना मान्य होऊन बावन दिवसांमध्ये तटाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यांत आले. या एका गोष्टीखेरीज धर्मसुधारणेंचे फार थोडे कार्य नेहेमियास करितां आलें.

 कारण, पूर्वेकडील इस्त्रायल लोकांस मान्य असलेली नेहेमियाची धार्मिक ध्येये पॅलेस्टाइनमधील यहुदी बांधवांस मान्य नसल्यामुळे नेहेमियास असे समजून आले की, आपणास ज्या सुधारणा करावयाच्या त्याची अंमलबजावणी बाबिलोनमधील आपल्याच मताचे कांही लोक आणल्याशिवाय नीट करितां येणार नाही. नेहेमिया हा बाबिलोनमध्ये परत गेल्यावर त्याने एझा याच्या नेतृत्वाखाली एक यहुदी लोकांचे मंडळ पॅलेस्टाइन प्रांतात आणण्याकरितां अर्टाक्सक्सींस बादशहाची परवानगी मिळविली.

एझाचें कार्य व समारिटन लोकांशी फूट. - वरील मंडळ यरुशलेममध्ये आल्याबरोबर यहुदी लोकांस इतरांपासून वेगळे करण्याबद्दल व मिश्रविवाहास आळा घालण्याबद्दल  बरेच प्रयत्न करण्यांत आले. परंतु त्यापासून कोणत्याहि प्रकारचा फायदा न होतां, उलट तीव्र विरोध मात्र उत्पन्न झाला. यरुशलेममध्ये एझाच्या अपेक्षित धर्मसुधारणेस कोणीच पांठिबा देणारा नसल्यामुळे त्याला कांहीच करता येईना. सरतेशेवटी एझ्रानें बाबिलोनमधील झाडोकाइट वर्गाचा कायदा यरुशेलममध्ये प्रसिध्द करण्याचा निश्चय केला. याकरितां त्याने पूर्वेकडे प्रयाण केले. नेहेमिया व एझा यांनी प्रसिध्द केलेल्या कायद्यामध्ये जेव्हिस्टिक लेख, एलोहिस्टिक लेख, डयूटरोनोमी, प्रीस्टली कोड व पावित्र्याचा कायदा या पांच प्रकारच्या लेखांचा अंतर्भाव होतो. अर्थात या संग्रहामध्ये मागाहून परिथितीप्रमाणे बरेच फेरफार करण्यांत आले असावेत. पहिला  नेहेमिया हा इतर जातीपासून अत्यंत अलग राहिलेल्या अशा जातीमध्ये जन्मला असल्यामुळे भिन्नभिन्न देशांतील लोक खरे इस्त्रायल पंथाचे अनुयायी कसे असूं शकतील या गोष्टीची त्यास कल्पनाच करतां आली नसेल. त्याच्या मते जूडा प्रांतातील लोक तेवढे खरे  इस्त्रायल पंथाचे असून समारिटन लोकांचा तो अत्यंत द्वेष व तिरस्कार करीत असे. अशा परिस्थितीत लवकरच पुढे मागे एकंदर संप्रदायांत फूट पडणे अपरिहार्य झाले. समेरिया प्रांतामध्ये अद्यापि शेकेम येथील सुप्रसिध्द मठांचे अवशेष शिल्लक होते. त्या ठिकाणी मनास्से याची मुख्य धर्माधिकाऱ्याच्या जागेवर पुन्हां नेमणूक करण्यांत आली. ही विभागणी राजकीय द्दष्टीने करण्यांत आली असून त्यायोगाने यरुशलेम येथील यहुदी लोक पॅलेस्टाईन मधील यांच्या बांधवांपासून विभक्त झाले. यानंतर एक शतकपर्येंत तुटकपणे राहिल्यानें, यहुदी धर्माच्या ठिकाणी, सुप्रसिध्द अॅलेक्झांडर दि ग्रेट याच्या अमदानीत उत्पन्न झालेल्या नवीन कल्पनांविरुध्द झगडण्याचे, सामर्थ्य उत्पन्न झाले.

या विभागणीचे गॅलिलीमध्ये काय परिणाम झाले, याची कल्पना होत नाही. परंतु समेरिया व जूडा यांमधील दुफळी राजकीय स्वरुपाची असल्यामुळे व गॅलिली आणि समेरिया हे प्रांत परपस्परांपासून भिन्न असल्यामुळे गॅलिली हा शेवटपर्यंत जूडा प्रांताशी सलोख्याने राहिलेला असावा. यहुदी लोकांच्या हद्दपारीपासूनच इस्त्रायल संप्रदायामध्ये पूर्वेकडील व पश्चिमेकडील लोकांत कायमची फूट पडणार व या संप्रदायाचा विकास, दोन्ही प्रांतात निरनिराळया प्रकारांनी होणार ही गोष्ट स्पष्ट कळून चुकली होती. हे संकट टाळण्याकरितां नेहेमियाने पूर्वेकडील व पश्चिमेकडील कायद्याचें एकत्रीकरण केले. इजिप्तमध्ये गेलेल्या इस्त्रायल लोकांस या घडामोडीची वार्ताहि नसावी असे दिसते. नवीन कायद्याची योग्य तऱ्हेने अम्मलबजावणी व्हावी म्हणून नेहेमियाने घालून दिलेल्या कडक नियमांमुळे या संप्रदासास बरीच बळकटी आली. तथापि यामुळें लोकांच्या राष्ट्रीय भावना नामशेष झाल्या असा प्रकार नव्हता.

सामुदायिक उपासना पध्दतीची उत्पत्ति व यहुदी आणि ग्रीक संस्कृतीमधील स्पर्धा. - नेहेमियाच्या संप्रदायसुधारणेच्या प्रयत्नापासून झालेला मुख्य कायदा म्हटला म्हणजे इस्त्रायल संप्रदायाच्या आध्यात्मिक उत्कर्षांत उपयुक्त अशा सामुदायिक उपासनापध्दतीची उत्त्पति हा होय. यापुढे सांप्रदायिक नियम अतिशय गुंतागुंतीचे झाले असल्यामुळे जिज्ञासू लोकांना हे नियम समजावेत हा उद्देश साधण्याकरितां शिक्षणाची आवश्यकता भासुं लागली. बाबिलोनसारख्या उच्च संस्कृतीच्या राष्ट्रांतील  लोकांमध्ये राहून देखील यहुदी लोक पूर्वीसारखे असंस्कृत राहणें हे कधीहि शक्यच नव्हते आणि त्याप्रमाणे ख्रि.पू. ५ व्या व ६ व्या शतकांत पॅलेस्टाइन देशाचा पूर्वेकडील राष्ट्रांशी जो संबंध आला, त्या योगानें यरुशलेम येथे बरीच विचारक्रांती झाली. समारिटन दुहीपासून अॅलेक्झांडरच्या आगमनापर्यंत घडून आलेल्या यहुदी संप्रदायांतील घडामोडीचा इतिहास अज्ञात स्थितीत आहे. अॅलेक्झांडरच्या आगमनाबरोबर म्हणजे ख्रि.पू.३३२ च्या सुमारास यहुदी संप्रदायामध्ये नवीन युगास प्रारंभ होतो. पूर्वीचे पर्शियन बादशहा लोकांच्या तिरकारास पात्र झाले होते व अॅलेक्झांडरने यहुदी लोकांस एकदम पुष्कळच स्वातंत्र्य दिले. याचा परिणाम असा झाला की, प्रथम कांही काळपर्यंत जरी सामान्य यहुदी जनतेस या स्वातंत्र्याचे काय करावे अशी भीति पडूं लागली, तरी इस्त्रायल लोकांनी अॅलेक्झांडरच्या साम्राज्यांतील अत्यंत दूरच्या प्रदेशांत वस्ती केली. याच सुमारास इस्त्रायल संप्रदायास जास्त बलवत्तर संकट येऊं पहात होते. प्रथम प्रथम अॅलेक्झांडरसारच्या बादशहाच्या परधर्मसहिष्णुतेमुळे यहुदी लोकांना धनाढय होण्याची संधि मिळत असल्यामुळे या ग्रीक संस्कृतीचे आकर्षकत्व जास्तच नुकसानकारक होते. ख्रि.पू.१९८ च्या सुमारास सुप्रसिध्द अँटायोकस हा जेव्हां पॅलेस्टाईन देशाचा मालक झाला त्यावेळी यहुदी संप्रदायाची बाह्यतः अत्यंत भरभराटीची स्थिति होती. यावेळी यहुदी संप्रदायाचा विस्तारहि पुष्कळ ठिकाणी झाला होता. यावेळी यहुदी समाजात धनिक व गरीब असे वर्ग पडले असल्यामुळे गरीब लोक जरी संप्रदायविधी दक्षतेने पाळीत, तरी धनिकांची मते मात्र परकीय ग्रीक संस्कृतीच्या मोहकतेकडे झुकूं लागली होती. या दोन्ही वर्गांमधील तेढ वाढत जातां जातां अँटायोकस एपिफेनस याने यहुदी संप्रदायाचा नाश करण्यापर्यंत पाळी कशी आली, या घडामोडीची सूक्ष्म रीतीने माहिती देणें या ठिकाणी अप्रासंगिक होणार आहे. अँटायोकसचा हा शेवटचा प्रयत्न म्हणजे इस्त्रायल संप्रदायाच्या विकासाचा परमावधि होय. याहवे संप्रदायाची अशा प्रकारची खडतर कसोटी पूर्वी केव्हांहि आली नव्हती. या परिक्षेतून इस्त्रायल संप्रदाय वांचला इतकेच नव्हे, तर जास्त सतेज होऊन बाहेर पडला. प्रथम प्रथम यहुदी लोकांनी अक्रियप्रतिकार केला. संप्रदायाकरितां एकामागून एक बळी पडूं लागले व कत्तलीमागून कत्तली होऊं लागल्या. अश प्रकारच्या विपन्न  स्थितीमध्ये याहवे देवतेस शरण जाणे व पूर्वी होऊन गेलेल्या साधुसंताच्या वचनावर अढळ निष्ठा ठेवणे एवढयाच गोष्टी करणें लोकांच्या हाती होते.

अशा प्रकारच्या खडतर स्थितीतून पुढे मार्ग काढून यहुदी लोकांनी कसकसे विजय संपादन केले, ही कथा सांगणे मानवी बुध्दीच्या आंवाक्याबाहेरचे आहे मात्र ख्रि.पू. १६५ सालच्या डिसेंबर महिन्यांतील २५ व्या तारखेस यहुदी लोकांना सायमनच्या नेतृत्वाखली पूर्ण स्वायत्तता देण्यांत आली. या धामधुमच्या काळांत यरुशलेम वगैरे महत्त्वाच्या मठांत जुने शास्त्रग्रंथ जाळण्यांत किंवा खाडाखोड करण्यांत आले, आणि या वणव्यानंतर त्रुटित साधनसामुग्री वरुन हे ग्रंथ पुन्हा तयार करण्याची आवश्यकता भासूं लागली, व सांप्रत उपलब्ध असलेला जुना करार. हाच तो संग्रह असन त्यामध्ये यहुदी संप्रयाचे सुसंस्कृत असें अगदी निराळेंच स्वरुप द्दष्टीस पडतें. या द्दष्टीने पाहतां जुन्या करारांत इस्त्रायल संप्रदायाच्या तत्पूर्वीच्या सातशे वर्षेंपर्यंत चालू असलेल्या परिणतीचा इतिहास नमूद केला आहे असे म्हटले पाहिजे.

उपसंहार

राष्ट्रामध्ये उत्पन्न होणारा विचारसंप्रदाय त्याचा विकास आणि त्याचा विशिष्ट मानवसमुच्चयांशी अन्योन्याश्रय या द्दष्टीने हिंदु आणि इस्त्रायन यांच्या वैचारिक आणि सामाजिक इतिहासांत अनेक साद्दश्यें द्दष्टीस पडतात, त्यांपैकी कांहीचा उल्लेख येथे करतो.

वैध धर्मांतून आध्यात्मिक धर्मांत संक्रमण – हे इस्त्रायल आणि भारतीय या दोहोंतहि दिसून येत आहे. इस्त्रायल लोकांनी क्रूर चाली मूर्तिपूजेशी संलग्न झालेल्या पाहिल्या आणि श्रौतकालीन भारतीयांनी क्रौर्य श्रौतसंस्थांशी म्हणजे यज्ञांशी संलग्न झालेले पाहिले; आणि त्यामुळे इस्त्रायलांमध्ये मूर्तिपूजेविरुध्द चळवळ सुरु झाली तर भारतीयांमध्ये श्रौतसंस्थाविरुध्द सुरु झाली.

ईश्वरैक्य - इस्त्रायलांमध्ये याहवे हा पूर्वी एक विशिष्ट देव होता. याहवेचे अनन्यत्व आणि सर्वश्रेष्ठत्व इतर दैवतांची नाकारणी करुन स्थापित झाले व याहवे हा बऱ्याच कालपर्यंत इस्त्रायलांचा देव म्हणजे जातिदैवताच्या स्वरुपांत राहिला व राजकीय वर्चस्व झाले, त्यामुळे याहवेचे महत्व झाले. मूर्तिपूजेविरुध्द संग्राम करतां करतां याहवेस सर्वेश्वरत्व प्राप्त झाले. भारतीयांत अद्वैत कल्पनांचा उद्भव होऊन निरनिराळे देव एकाच ईश्वराची रुपे होत, अशा कल्पना प्रसृत झाल्या व ईश्वरैक्य प्रस्थापित झाले.

संस्कृत वर्गाखेरीज इतर धार्मिक पुरुष. - हे इस्त्रायलांत प्रवक्ते म्हणजू उदयास आले, तर भारतीयांत आरण्यकीय ब्रह्मवेत्ते उदयास आले.

इस्त्रायल लोकांमध्ये आध्यात्मिक विचारविकास झाला होता, त्याप्रमाणे भारतीयांतहि आला. इस्त्रायलांस आपलें आध्यत्मिक धन हे ज्ञातिविशिष्ट वाटे, त्याप्रमाणे भारतीयांसहि वाटे. आणि यामुळे या दोघांचे आध्यात्मिक धन जगाच्या उपयोगास पडण्यासाठी सामाजिक बाबतीत कमी तुटकपणा बाळगणाऱ्या परंतु अशा राष्ट्रीय आध्यत्मिक विचार ग्रहण करणाऱ्या अशा संप्रदायांची स्थापना झाल्याशिवाय जगाच्या हाती लागणे शक्य नव्हते; आणि त्यामुळे इस्त्रायलांमध्ये ख्रिस्ती संप्रदायाची आणि भारतीयांत बौध्दसंप्रदायाची स्थापना झाल्यानंतर दोघांच्याहि संस्कृतीस अधिक व्यापक स्वरुप आले.

''इस्त्रायल'' हा राष्ट्रस्वरुपी समुच्चय होता. त्याचे स्वांतंत्र्य गेले तरी वाङमयीन आणि सांस्कारिक वैशिष्टयामुळे तो समुच्चय स्वतंत्ररुपाने अस्तित्वांत राहिला. इस्त्रायलांमध्ये विशिष्ट विचारसंप्रदाय विकास पावले; पण ते केवळ विचारसंप्रदाय म्हणूनच राहिले. ते जातिस्वरुप पावले नाहीत. जेव्हां त्यांच्यांतील एक संप्रदाय जातिस्वरुप होऊं लागला आणि मतैक्य आणि उपासनैक्य यांवर आपल्या समाजाचें सदस्यत्व देऊं लागला, तेव्हां जातिरक्षणासाठी इस्त्रायल या समुच्चयाचें रक्षण करण्यासाठी इस्त्रायलांनां आपल्या समुच्चयाचे सदस्यत्व मतांवर करवून घेऊन इतरांस देण्यास सुरवात करावी लागली. अर्वाचीन भारतीयांतहि जवळ जवळ तीच क्रिया सुरु झाली आहे.

[संदर्भग्रंथ – राबर्टसन स्मिथ - प्राफेट्स ऑफ इस्त्रायल, बेनेट –थिऑलॉजी ऑफ दि ओल्ड टेस्टॅमेंट; बुचॅनन ग्रे-डिव्हाईन डिसिप्लिन ऑफ इस्त्रायल ; कुक – रिलिजन ऑफ एन्शंट पॅलेस्टाईन; एन्यायक्लो बिब्लिका; ए. रि. ए. (इस्त्रायल) ए.ब्रि.(हीब्रू रिलिजन) बुध्दोत्तर जग, प्रकरण १३]

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .