प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

इब्नबतूता - (१३०४ ते १३७८) ह्याचें नांव अबुअबदुल्ला महंमद असे असून आडनांव इब्नबतूता हे होते. हा बडा मुसुलमान प्रवासी टांजियर येथे इ.स.१३०४ मध्ये जन्मला. १३२५ त याने आपल्या प्रवासाला आरंभ करून १३५५ मध्ये तो पुरा केला. प्रथम भूमध्यसमुद्रकिनारा पालथा घालून तो आलेक्झांड्रिआ येथे गेला. वाटेंत  त्याला दोन बायकांशी लग्न करण्याला फुरसत मिळालीशी दिसते.कायरो येथे कांही दिवस काढल्यावर  व तांबडया समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या ऐधबपासून मक्केला जाण्याचा त्याचा प्रयत्न निष्फल झाल्यावर तो पॅलेस्टाईन, अॅलेप्पो आणि दमास्कस या ठिकाणी गेला. नंतर तो मक्का व मदिना येथे यात्रेकरितां गेला. मशदअल्ली येथील अल्लीच्या कबरीचें दर्शन घेऊन पुढे तो बसऱ्यास गेला. तेथून खुझिस्तानचे पर्वत ओलांडून इस्पहानहून शिराजला आणि परत कुफा व बगदाद या गांवी तो आला. मोसल आणि दिआर बेकर येथील प्रवास आटपून तो दुसऱ्यांदा मक्केला गेला. तेथे त्याने तीन वर्षे काढली. पुढे तो तांबडया समुद्रांतून त्या वेळचे व्यापाराचें प्रसिध्द ठिकाण जें एडन तेथे पोहोंचला. एडनचे महत्त्व  व मोठाल्या कुंडापासून त्याला मिळणारा पाणीपुरवठा बतूतानें वर्णन केला आहे. आफ्रिकेच्या किनाऱ्यानें पुढे जाऊन मोम्बासा, क्विलोआ आणि इतर पुष्कळ ठिकाणे त्यानें पाहिली. पुन्हां उत्तरेकडे वळून ओमानमधील मोठाल्या शहरांवरून तो नवीन ओर्मझला पोहोंचला. इराणी आखातांतील इतर भागांत जाऊन आल्यावर तो अरबस्तान ओलांडून तिसऱ्यांदा हाज करण्याकरितां मक्केला गेला.तांबडा समुद्र ओलांडून तो बरेच कष्ट सोसून सायनेला गेला. तेथून नाइल नदीच्या किनाऱ्यानें कायरोला पोहोंचला. पुढे सिरीयामधून प्रवास करून त्यानें आशियामायनरमधील बारीकसारीक संस्थाने पाहिली. नंतर तो काळया समुद्रांतून काप्फा येथे गेला. त्या ठिकाणी जिनोइ लोक राहात होते. बतूतानें पाहिलेले हे पहिलेंच ख्रिस्ती शहर असावें, कारण तो तेथील घंटानादानें बराच त्रस्त झाला. पुढें त्यानें किप्चाकचा प्रवास केला व तेथील खान महंमद उझबेग याच्या छावणींत राहिला. रशियन साम्राज्यांतील त्याने पाहिलेल्या स्थळांपैकीं बोलघर (५४० ५४ ' उत्तर) हें एक असून उन्हाळयांतील लहान रात्र पाहण्यांकरितां तो तेथे गेला होता. आणखी उत्तरेकडे जाऊन तिमिर प्रदेश पाहाण्याची त्याची इच्छा होती पण त्याला आपला बेत बदलावा लागला. परत खानाच्या छावणींत येऊन तो एका ग्रीक राजकन्येबरोबर कॉन्स्टॅन्टिनोपल येथे गेला. तेथे त्यानें तिसरा अँड्रोनिकस (१३२८-१३४१) बादशहा याची मुलाखत घेतली. व्होलगा नदीकाठी सराई येथे पडलेल्या उझबेगच्या छावणींत पुन्हां परत येऊन ख्वारीझम आणि बोखारा पठारें त्यानें ओलांडली. तेथून खोरासान आणि काबूलमधून हिंदुकुश मार्गानें इ. स. १३३३ च्या सप्टेंबर महिन्यांत तो सिंधुनदीच्या काठी आला. येथें त्याच्या इतिहासाचा पहिला खंड संपतो .

सिंध प्रांत समुद्रापर्यंत व तेथून वर पादाक्रांत केल्यावर तो मुलतानला निघाला व शेवटी दिल्लीचा बादशहा महंमद तघलक याने आमंत्रण दिल्यावरून त्या ठिकाणी गेला.महंमदशाह फार चमत्कारिक स्वभावाचा  व अती ढोंगी होता. त्याने सार्वजनिक धर्मार्थ संस्था काढिल्या होत्या. पंडितांनां तो चांगाला आश्रय देई पण पितृहत्या, भ्रातृहत्या इत्यादि पापें त्याच्या हातून घडली होती. तो फार लहरी व रक्तपात पाहाण्यास उत्सुक असे. रोजच्या रोज राजद्वारी कोणीतरी उत्कर्ष पावे तर कोणी मरणाच्या द्वारीं बसत. अशा तऱ्हेच्या बादशहाने आपल्या या प्रवाशाला दिल्लीचा काजी नेमले व त्याला १२००० चांदीचे दिनार बक्षिस देऊन तितकेंच वेतन दरवर्षी करून दिले. सुलतानाच्या नोकरींत बतूता आठ वर्षे राहिला, पण त्याच्या उधळया स्वभावामुळें त्याला वेतनाच्या चार पांच पट कर्ज झाले. शेवटी बादशहाच्या मर्जीतून उतरून तो तेथून निघाला. त्यावेळी मंगोल घराण्यांतील चीनच्या शेवटच्या बादशहाने दिल्लीस एक वकीलात पाठविली होती. ती वकीलात परत जाण्याच्या वेळीं हा मूर तीबरोबर जाणार होता (१३४२). ही मंडळी मध्यहिंदुस्थानांतून खंबायतला गेली. तेथून जलमार्गाने कालिकतला पोहोंचली. बतूताने कौलम (क्विलामन), अॅलेक्झांड्रिया, क्रिमियांमधील सुडाक आणि चीनमधील झेटन यांच्या तोडीचें कालीकत बंदर असून ते जगांत एक अति मोठें व्यापारी ठिकाण आहे अशा तऱ्हेचे वर्णन केले आहे. हे वकीलातमंडळ चिनी जहाजांतून व लहान लहान  गलबतांतून प्रवास करणार होते पण जे जहाज इतर वकीलमंडळी व नजराणे घेऊन जाणार होते ते इन्बबतूता जाण्याची करण्याच्या पूर्वीच बंदरांतून निघालें व समुद्रांत पार फुटलें. बतूताचें सामान पुढें गेले व तो मात्र कालीकत बंदरांतुच राहिला. पुन्हां परत दिल्लीला जाण्याचें धाडस त्याच्याने करवेना म्हणून तो होनावर व पश्चिम किनाऱ्यावरील इतर शहरें हिंडला. त्या अवधीत तो मालदीव बेटाला जाऊन आला. त्या ठिकाणी तो काजी बनला व चार बायका त्यानें करून घेतल्या. मालदीव बेटांची त्यानें उत्तम माहिती लिहून ठेविली. आगस्ट १३४४ त त्यानें मालदीव सोडले व सिलोनला आला. त्या ठिकाणी त्यानें आदामचें पाऊल ज्या ठिकाणी उठलें आहे त्या आदाम शिखराची यात्रा केली. तेथून तो कॉरोमांडल किनाऱ्यावरील माबर गांवी गेला. त्या ठिकाणी त्याला मदुरेत राहणारा एक मुसुलमान धाडशी गृहस्थ भेटला, तो त्या प्रदेशाचा बहुतेक मालकच बनला होता पुन्हां एकदा मलबार किनारा आणि मालदीव बेटें या ठिकाणी जाऊन, त्याने ४३ दिवसांचा बंगालचा प्रवास केला. सद्कवन (चितागांग) येथें तो उतरला. बंगालमध्यें असतांना शेख जलालुद्दीनची त्यानें गांठ घेतली. जलालुद्दीन हा प्रख्यात मुसुलमान साधु असून सिलहट येथें अद्याप त्याची यात्रा भरते. डाका जवळच्या  सोनारगांव येथें जाव्हाला जाणाऱ्या जहाजांत तो बसला. अराकानच्या किनाऱ्याला लागून त्याचें जहाज ४०दिवसांत सुमात्रा येथे पोहोंचले.  त्या बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर नुकत्याच पसरलेल्या इस्लामी धर्माचा मलिक-अल-धाहीर म्हणून एक कट्टा अनुयायी तेथें होता. त्यानें चीनला जाणारें एक जहाज तयार करून ठेवले होते. त्यांत बसून बतुता निघाला. काम्बोजच्या मार्गानें जाऊन चीनमध्यें झेटन येथें बतूता उतरला सीन कलम (कँटन) खानसा (हंगचौ) आणि खानबलिक (कँबेलक किंवा पेकिंग) ही शहरें त्याने पाहिलीं. चीनमधील इतर ठिकाणाप्रमाणेंच मुसुलमान बंधुत्वाचे त्यानें वर्णन केलें आहे. मुसुलमानी वैद्य आफ्रिका आणि आशिया या ज्ञात खंडात कोठेंहि आढळतो, हें त्या धर्मांतील बंधुत्त्वाचे लक्षण बतूता मोठया चटकदार भाषेंत पुढे मांडतो. घराकडे परत जातांना वाटेंत मोठा रुख पक्षी त्यानें पाहिला (!) पुन्हां सुमात्रा, मलबार, ओमान, इराण आणि बगदाद ही ठिकाणें पाहून व वालुकारण्य तुडवून पामिर आणि दमास्कस येथें तो गेला. त्या ठिकाणी त्याला प्रथमच घरची बातमी समजली. १५ वर्षापूर्वी आपला पिता मृत्यू पावल्याची दुःखद वार्ता त्यानें येथें श्रवण  केली. हामाथ आणि अलेप्पो येथें जाऊन दमास्कसला परत आल्यावर त्या ठिकाणी काळा आजार चालू असून रोज २००० वर माणसे मरत आहेत असें त्यानें पाहिलें यरूशलेम आणि कायरो येथला पुन्हां प्रवास करून चौथ्यांदां त्याने हाज केले, आणि शेवटी २४  वर्षोनी, ८ नव्हेंबर १३४९ या दिवशी फेज येथे पाऊल टाकले, सर्व देशांत त्याला मोरोक्को फार बरा वाटला. टांजियर येथें घरी जाऊन तो स्पेनमध्यें शिरला, व जिब्राल्टरवरून अँडाल्यूसियाला त्यानें प्रदक्षिणा घातली. १३५२ मध्यें पायावर चक पडलेल्या या माणसानें मध्य आफ्रिकेचा प्रवास केला. सहारा ओलांडून तो टिंबकटू आणि गोगो येथे गेला. पण त्याच्या राजानें परत बोलावल्यावरून तो १३५४ त फेज येथे गेला. अशा रीतीने २८ वर्षाचा व सरळ रस्ता धरून मोजल्यास ७५००० मैलांच्यावर होणारा प्रवास त्यानें पुरा केला. राजाज्ञेने त्याने आपल्या प्रवासाचा इतिहास महंमद इब्नजुझाई यांस सांगितला. व त्याने तो १३ डिसेंबर १३५५ त लिहून पुरा केला. इब्नबतूता १३७८ मध्यें ७३ वर्षांचा होऊन वारला.[ए.ब्रि.]

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .