प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

इन्फ्ल्युएंझा- खोकला, पडसें, सर्दी, ही लक्षणें ज्यांत प्राधान्येंकरून असतात असा हा एक प्रकारचा सांथीचा ताप आहे. पुष्कळ लोक साधारण पडशासहि व विशेषतः त्यांत ताप वगैरे असल्यास त्यास इन्फ्ल्युएंझा म्हणतात, परंतु ती चूक होय. या तापाच्या सांथी अतिप्राचीनकाळी यूरोपादि देशांत पुष्कळदां  येऊन गेल्या होत्या. अलीकडील अत्यंत जोराची सांथ इ.स. १८४७-४८ यूरोपांत होती. त्यानंतर ती नष्ट होऊन पुनः इ.स. १८९०-९१ साली उद्भवली. तिचा प्रथम उद्भव सेंटपीटर्सबर्ग (पेट्रोग्राड)  येथे होऊन लवकरच ती ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंड या देशांत पसरली. व तेथून त्वरेने इतर यूरोपियन देश व्यापल्यावर अमेरिकेंतील संयुक्त-संस्थानांत तिचा प्रादुर्भाव झाला. थोडयाच महिन्यांनी हिंदुस्थान,आस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिकेंतील किनाऱ्यालगतचें प्रांत व दक्षिण व अमेरिका या सर्व ठिकाणी  या सांथीचा कहर मोठया चपलतेनें झाला. ही सांथ हिंदुस्थानवासीयांच्या आठवणींतून बुजली असेल नसेल तोंच उग्र  स्वरूपांत तिला फारच मागें टाकणारी अशी इ.स. १९१८-१९ मधील साथ यूरोपांतून इकडे आली व सर्व देशभर फैलावून तिच्या योगानें थोडया अवधींत अश्रुतपूर्व प्राणहानि खेडयापाडया पासून तो मोठमोठया शहरांत झाली, व अद्याप ती सांथ सौम्य स्वरूपांत आपणांत वास्तव्य करीतच आहे. असे म्हणण्यास हरकत नाही. जेथे ही सांथ प्रवेश करिते त्या देशांत चार पांच वर्षे राहून ती शेवटी नाहीशी होते.

रोगोद्भवाचीकारणें.-पूर्वी अशी समजूत असे की, हा रोग स्पर्शजन्य नसून वायुजन्य असावा. कारण या सांथीच्या प्रसाराचा झपाटा कांही विलक्षणच असतो. थोडया दिवसांच्या अल्पावधीत शहरांतील गर्दीच्या भागांतून शेंकडों माणसें एकदम अजारी पडतात ही गोष्ट व दुसऱ्या कांहीं गोष्टीमुळें या समजुतीस बळकटी आली होती. परंतु पुढे इ.स. १८९२ मध्यें प्लीफर यानें या तापाच्या विशिष्ट जंतुचे अस्तित्व ठामरीतीनें सिध्द केले हा जंतु बहुधा रोग्यांच्या कफामध्यें व क्वचित रक्तामध्यें  सांपडतो. यावरून हा रोग स्पर्शसंचारी आहे हें उघड झालें. आतां शेंकडों माणसांत या रीतीने एकदम संसर्ग होऊं शकतो हा विशेष या सांथीमध्ये आहे येवढेंच. सांथीचे कारण हें जंतूच होत असे निश्चित ठरलें आहे. हा बारिक जंतू सूक्ष्मदर्शक यंत्रानेंच पहातां येतो व याचे दोन तीन भेद असावेत असें अनुमान आहे. याबरोबर स्ट्रोप्टोकॉकाय, स्टॅफीलोकॉकाय व पुप्फुसदाह उत्पन्न करणारे न्यूमोकॉकाय नांवाचे जंतू मिश्रित असतात व त्यांच्यामुळे या तापांत आगंतुक दोष उत्पन्न होतात. यांच्या स्पर्शाने मनुष्यास विकृति होते व रोगोद्भव होण्याची गर्भावस्था एखाददुसऱ्या तासापासून ते थोडयाशा दिवसांपर्यंत असते, आणि मग रोगलक्षणें दिसूं लागण्यास आरंभ होतो. अंमळ श्रमपूर्वक व शोधक दृष्टीनें पाहिलें असतां स्पर्शानें संसर्ग कसा बाधला हे निश्चित ठरवितां येतें. पण बारीकसारीक सांथी ज्या मागाहून उद्भवतात त्या या जंतूची बीजें (अंडी) पूर्णावस्थेप्रत येऊन आपोआप नवीन जंतू निर्माण होतात व ते अदृश्य असल्यामुळें रोगोद्भव कसा झाला व संसर्ग कोठून आला हें कोडें पडते. भिन्न प्रकृतिमानाप्रमाणें कांही लोकच या सांथीचे तडाख्यांत पुनःपुनः सांपडतात. कित्येक जणांस जन्मतःच या रोगापासून निर्भयता असलेली आढळून येते.

लक्षणें.-या तापाचे लक्षणानुसार भेद पुष्कळच आहेत, व त्यांत वैवित्र्यहि बरेंच दिसून येतें. (१) ज्वरप्रधान भेद अगर साधा दोषरहित ज्वर-पुष्कळ लोकांस अशा प्रकारचाच ताप येतो. त्यांत फक्त ज्वराचीं लक्षणें असतात. व महत्त्वाचीं इंद्रियें बिघडून दोष उत्पन्न होत नाहीत. कपाळाचा पुढील भाग एकाएकीं दुखूं लागून डोळयाचे मागील भाग दुखतो. कमरेच स्नायु मनस्वी ठणकून दुखतात, व नंतर मांडया, पोटऱ्या व शरीराच्या इतर भांगासहि असेंच होऊ  लागते. थंडी वाजून येत नाही, पण ताप लवकरच १०२०-१०४० पर्यंत चढतो व ज्वराची लक्षणें  म्हणजे जलद चालणारी नाडी , थोडी तहान व लालसर रंगाची लघवी ही असतात. जिभेवर पांढरी दाट बुरशी येऊन तिला किंचित कंप असतो व तिच्यावर दांताचे वण असतात. घसा व गलग्रंथी लाल होऊन तोंडास व श्वासास अंमळ दुर्गंधि येते. पाणथरी जरा मोठी झालेली असते. त्वचा  बहुधा रूक्ष असते पण कधी कधी बराच घामहि सुटतो.  रोग्यास  अगदी चैन पडेनासे होऊन त्याची उलघाल होते; झोप येत नाही; अगदी निःशक्त होऊन असहाय असा अंथरूणांत पडून राहतो व जबर दुखणें आल्याची स्पष्ट चिन्हे दिसतात. बहुधा यांपेक्षा अन्य लक्षणें होत नाहीत  व अशी स्थिति २४ तास ते ४८ तासपर्यंत राहिल्यावर उतारहिपण भराभर पडूं लागतो. तथापि ताप निघाल्यावर सुध्दां सर्वांग ठणकणें व अशक्तपणा ही लक्षणे जी प्रथम दिसून येतात ती चांगलीशी कमी होत नाहीत . कांही दिवसांनी सावकाशपणे ती कमी होतात. तथापि हे उघड दिसून येते की, या तऱ्हेच्या  तापाचा जोर, आरंभ, मुदत व शेवट यांमध्ये बरेच वैचित्र्य आढळून येते. उदाहरणार्थः-कांही रोग्यांत तापाची तीव्रता फार असते  पण तो थोडा वेळ टिकून निघतोहि लवकर; तर कांही रोग्यांत ताप मध्यम पण जरा दीर्घकालीन असून निघण्यास अवधि लागतो व सावकाश निघतो यामुळे विषमज्वरादि इतर तापाशी याचें साम्य होऊं लागल्याने मनात घोंटाळा उत्पन्न होतो. या दोन्हीहि प्रकारांमध्यें ताप उलटणे संभवनीय असते.

(२) कफप्रधान ज्वरः-या भेदांतहि तापाची सुरूवात वरीलप्रमाणेंच होते. ताप, डोकेदुखी, हातपाय व सर्वांग वळणे आणि अत्यंत अशक्तपणा ही  चिन्हें तर असतातच, पण लवकरच असे आढळून येते कीं, रोग्यास दम लागला आहे, छातींत दुखूं लागून त्रासदायक खोकला येतो आहे व असे झाले म्हणजे श्रवसनमार्ग व इंद्रियें यांमध्ये बिघाड होण्यास आरंभ झाला असे समजून येते. छाती तपासून पाहिली असतां श्वासनलिकांचा दाह सुरू झाल्याचीं लक्षणें आढळून  येतात व त्या खोकल्याबरोबर अति दाट असा कफ पडतो. हे सौम्य प्रकारच्या रोगाचे वर्णन झाले. पण श्वासमार्ग दूषित झालेल्या बऱ्याच रोग्यांमध्ये निवळ श्वासनलिका दहापेक्षां मिश्र फुप्फुसदाह झाल्याचें आढळतें, व छाती तपासून परीक्षा केली असतां पाठीमागें, फुप्फुसांत एकेच ठिकाणीं अगर तुटक तुटक  अशा दोन तीन ठिकाणी फुप्फुसें बिघडल्याचें कळून येते. अतिशय दम लागतो. नंतर  कफ पुष्कळ फेसाळ पूर्वीपेक्षां कमी दाट व लालसर रंगाचा पडूं लागतो. कांही थोडया रोगांत निव्वळ फुप्फुप्सदांह असतो व फुप्फुसावरणदाह व फुप्फुसावरणपूर्णदाह हेहि रोग झालेले आढळतात. ह्या रोगांत रोग प्रखर असून रोगी बरा होणे कठिण असतें! ज्या मानानें या श्रवसनेंद्रियांत बिघाड झालेला असेल, त्या मानानें या ज्वराची तीव्रता असते. या तापांत पुष्कळसें पडसें डोळे आणि पापण्या पडशानें गेंगारल्याप्रमाणें फुगीर दिसणें ही लक्षणें प्रथम होतात असे लोक समजतात. पण पुष्कळदां श्वसनेंद्रियें बिघडलेल्या रोग्यांत व अन्य साध्या प्रकारच्या रोग्यांत ही लक्षणे नसतात.

(३) पित्तप्रधानज्वर.-या प्रकारचे रोगी कमी असतात व निरनिराळया साथींत या प्रकारच्या ज्वराचें प्रमाण कधी कमी तर कधी जास्ती असलेलें आढळते. या मध्यें उदर व त्यांतील नळ वगैरे इंद्रियें यामध्ये विकार उत्पन्न होऊन पोटशूळ, ओकारी, अतिसार व क्वचित् प्रसंगी कावीळ ही लक्षणें होतात. या प्रकारांत वर वर्णिलेल्या दोन भेदांपेक्षां ज्वरमान कमी व सौम्य असते. या प्रकारच्या ज्वरांत व कफप्रधान ज्वरामध्ये मूलतः हा ज्वर आणि त्यांत आगंतुक उत्पन्न झालेले कफ व पित्त हे दोष व मागाहून उत्पन्न झालेले रोग तापाचे परिणाम होत असे जाणावें. मूळच्या तापांशी त्याचा संबंध नसतो. याप्रमाणें पण जरा कालावधीनें शरीराचे इतर भागांतही दोष उत्पन्न होतात.
(४) हद्दौर्बल्यप्रधानज्वर.-यामध्यें ह्यदयाची क्रिया अति मंदत्वाने चालल्यामुळे मूर्च्छा व बेशुध्दीचे झटके येणे हातपाय थंड पडून मृतप्राय स्थिति होणे, दम, अनियमित व अशक्त नाडी व त्वचेंत एकदम लाली येणे ही लक्षणे होतात. दुर्बलतेने ह्यदयास शिथिलता येते. नाक, तोंड, गुद, इत्यादि द्वारांतून रक्तस्त्राव होणें  ही लक्षणे कधी कधी होतात.

(५) वातप्रधानज्वर .-हा प्रकार बराच सर्व साधारण आहे. आरंभी ताप आल्यानंतर सुस्ती, झांपडहि विशेष दिसून येते. जास्त तीव्र रोगांत रोग्यास वात होऊन तो बरळूं लागतो. नंतर उलटा प्रकार होऊन निद्रानाशामुळें रोग्यास पीडा होते. कोठले तरी एका अगर अनेक मज्जातंतूचे ठिकाणीं लवकर आराम न पडूं देणारा असा शूल उद्भवतो, व सर्व शरीरांतील मांसल भाग ठणकतात. कांही रोग्यामध्ये अशा विविक्षित ठिकाणी वेदना न होतां बरीच दीर्घकाल रहाणारी अशी अशक्तता शरीराला येते. किंचितहि शारीरिक अथवा मानसिक काम करवेनासे होते. तापाच्या आरंभापासून तो कित्येक महिनेपर्यंत रोग्याच्या मनःस्थितिमध्ये अत्यंत  औदासिन्य व दुर्बलता दिसून येते.

याज्वरापासूनहोणारेआणखीपरिणाम.-हे त्वचेंतहि दिसून येतात. ऐन तापांत कधी कधी अंगावर पुरळ अगर फोड दिसतात, किंवा ते मागाहूनहि पाहाण्यांत येतात. गुलाबसर रंगाची अथवा गोवर, गांधी इत्यादि व्याधि मध्ये जसा लालसर पुरळ येतो तशी लाली कांही ठिकाणी डागा सारखी आढळते. या शिवाय या तापाचा कोणत्याही इंद्रियावर थोडा फार परिणाम झाला नाही असे घडतच नाही. सर्व ठिकाणी दाह उत्पन्न होणे अगदी संभवनीय असते. यामुळे खालील दाहयुक्त दुष्परिणाम निरनिराळया रोग्यांत पहाण्यांत येतात ते असेः-कर्णदाह, वृषणदाह, मज्जातंतूदाह, शिरादाह, कर्णपार्श्वग्रंथीदाह, हृदावरणदाह, मस्तिष्कावरणदाह, मस्तिष्कदाह, पृष्ठरज्जुदाह, अक्षिफटदाह, डोळयावर साराफुलें, मूत्रपिंडदाह, संधिरोग, गंडदाह. मज्जातंतू व मज्जस्थानाची रचना विकृत न होतां फक्त त्यांच्या क्रिया विकृत झाल्यामुळे खालील दुष्परिणाम उद्भवतात. रसनेंद्रिय व घाणेंद्रियांतील तंतू विकृत होऊन चव व सुवास अगर घाण कळत नाही. कांही रोग्यामध्ये मनाची उद्विग्नस्थिति इतक्या विकोपाला जाते की परम औदासीन्ययुक्त अगर भ्रमयुक्त वेडहि लागलेले पहाण्यांत येते. या तापाच्या सौम्य सांथी वारंवार उद्भवतात व त्यांतले त्यांत दुसरी अगर हिवाळयाचे दिवसांत उत्पन्न होणारी सांथ फुप्फुसदाहादि दोष उत्पन्न होत असल्याने विशेष भयंकर असते, व त्या सांथीत प्राणहानी अतिशय होते. नाहीतर एरवीच्या सांथी एवढया प्राणघातक नसतात.

निदान.-वर सांगितलेले व इतर अन्य भेद या तापाचे असल्यामुळे हा मूळचा फुप्फुसदाह रोग आहे किंवा विषमज्वरादि इतर प्रकारचा ज्वर आहे, हे त्या त्या भेदांत सांगिलेल्या लक्षणांवरून ओळखतां येते. या निदानास बळकटी आणण्यासाठी ताप एकदम येणें, अंग ठणकणे, व ताप थोडेच दिवस टिकणे ही मुख्य लक्षणे उपयोगी पडतात. पण कांही सौम्य ज्वरांमध्ये ही लक्षणे नीटशी जमेस धरण्याजोगी नसतात. अशावेळी मागून बरेच दिवस राहणारा अशक्तपणा अगर शरीरांत होणारे दोष अगर वर सांगितलेले दुष्परिणाम यांच्या योगें अनुमान करणे सोपें  जाते. ज्या रोग्यांत श्वसनेद्रिये बिघडून कफोत्पत्ति झालेली असते, त्यांच्या कफांत आढळून येत असलेले प्लीफरचे जंतू योग्य साधनांच्या योगानें दाखवितां येतात.

ज्वरप्रतिबंधकउपाय.-सांथ सुरू असता रोज २-४ गुंजा क्किनाईन घेतल्यानें ज्वर येत नाही असा पुष्कळ सांथीत अनुभव घेतलेला आहे. विशेषतः मोठमोठया शाळांतील वसतिगृहांतून मुलांना अगर मुलींना नियमितपणें शिक्षकांच्या देखत हे औषध रोज देत गेल्याने त्यामध्ये सांथीचा प्रादुर्भाव होऊं नये व त्याच वसतिगृहांतील हे औषध घेत नसलेल्या नोकर मंडळीत तेवढी सांथ पसरावी हे या औषधाची उपयुक्तता उत्तम रीतीने दाखविते. कोणास हा ताप आल्यास (१) त्याचा कफ ज्या भांडयात असतो त्यांत जंतुघ्न औषध टाकित जावे. (२) रोग्यास वेगळया खोलीत अगर इमारतींत निजवावा व इतर सर्व माणसांनी त्याजकडे जाऊं नये. (३) पुष्कळ माणसे जमतील असे प्रसंग घडवून आणूं नयेत. (४) व जेथे अशी माणसे जमणें अपरिहार्य असते तेथील खिडक्या, दारे, उघडी टाकून स्वच्छ हवेने दूषित हवेचे शुध्दीकरण करीत असावे या स्वल्प उपायांनी सांथीच्या प्रसारास आळा चांगला बसतो.

उपाय.-या ज्वरास उत्तम उपाय म्हणजे इकडे तिकडे हिंडून जो शक्तिपात या ज्वरात एकदम होतो तो होऊं नये यासाठी अंथरूणांत अगदी निश्चेष्ट पडून रहावे. ज्वराचे आरंभी अंग अतिशय ठणकते त्यासाठी सोडा सालिसिलेट १० ग्रेन दर चार ते सहा तासांनी दिल्याने आराम वाटतो. अथवा एस्पिरिन ५-७ ग्रेन अगर फेनासिटिन ५ ग्रेन हीहि चांगली औषधे आहेत. पण ही औषधे डॉक्तराचे सल्याने घ्यावीत कारण मागाहून जी दीर्घकाल टिकणारी अशक्तता येते तिला उत्तेजक ही औषधे असल्यामुळे यांचा उपयोग बेतानेच करावयाचा असतो. ही औषधे न देतां पोटास सायट्रेट, आमोनियम आसिटेट यासारखी निरूपद्रवी क्षारयुक्त औषधे कफोत्सर्जन करणाऱ्या इतर औषधांशी मिश्र करून देणे फार चांगले. ताप कमी झाल्या नंतर शक्ति लवकर येईल अशी औषधयोजना करावी. क्विनाईन व कुचलाअर्क यांचा या कामी पुष्कळ उपयोग होतो. अति लहान मुलें, अशक्त माणसे व वृध्दलोक यांनां रोगाच्या तीव्रावस्थेत अलकोहलमिश्रित उत्तेजक औषधे देणे जरूर असते. उदाहरणार्थ, पोर्टवाईन वगैरे. मागाहून जी विलक्षण अशक्तता येते त्यासाठी लोह, स्ट्रिकनिया मिश्रित औषधे फायदेशीर असतात. पूर्ण विश्रांति व समुद्रकाठी अगर डोंगराच्या उंचवटयावर हवापालट करणे तर उत्तमच होय. अशावेळी हृदयक्रिया फारच अशक्त असल्यास कापूर १० ग्रेन व आलिव्ह तेल १०० भाग या मिश्रणाचे २० थेंब दिवसांतून  १-२ वेळां टोचून घालावे. सांथीच्या दिवसांत प्रत्येकाने किंचित मीठ पाण्यांत विरघळून त्या पाण्यानें नाक, घसा व तोंड या ठिकाणी तुषार उडवून हे भाग साफ ठेवावे, अथवा या पाण्याचें उषःपान करावे.

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .