प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु

इंद्रजित - लंकाधिपती रावणास मंदोदरीपासून झालेला पुत्र याने जन्मतांच मेघासारखी गर्जना केल्यामुळे, याचे मेघनाद असें नाव ठेविले होते. (अध्यात्म रामायण उत्तरकांड सर्ग २) मेघनाद हा स्वभावतः भयंकर असे. यानें शुक्राचार्याच्या साह्याने निकुंभिला येथे, अश्वमेध, अग्निहोम, बहुसुवर्णक, राजसूय, गोमेध, वैष्णव आणि माहेश्रवर असे सात यज्ञ केले व शिवप्रसादानें दिव्य रथ, धनुष्यबाण, शस्त्रे तामसी माया, इत्यादिक प्राप्त करुन घेतली. याने आणखीहि कित्येक यज्ञ करावे असें मनात आणिले, परंतु रावण देवाचा द्वेष्टा असल्यामुळे त्याला देवास हविर्भाग देणे इष्ट नव्हते, त्यामुळे इंद्रजिताला अधिक यज्ञ करणे शक्य झालें नाही. (वा.रा.उत्तरकांड स.२५)

रावण, देवांस जिंकण्याकरितां स्वर्गी केला असतां तेथे देवांचा व राक्षसांचा घोर संग्राम झाला या युध्दांत मेघनादानें अपूर्व युध्दकौशल्य दाखवून इंद्रास आपल्या शस्त्रास्त्रांनी जर्जर करुन बध्द केले. तेणेकरुन रावण हर्षित होऊन व यशब्द करीत त्यास घेऊन लंकेस गेला. इकडे इंद्र गेला असे पाहून सर्व देव चिंताक्रांत होऊन ब्रह्मदेवास शरण गेले. ब्रह्मदेव हे स्वतः मेघनादाकडे आले व त्यांनी इंद्राला सोडून देण्याविषयी मेघनादाजवळ प्रार्थना केली. पण 'मी अग्नीत जेव्हां हवन करीन, तेव्हां त्यांतून अश्वासहित दिव्य रथ निघत जावा, आणि त्यावर जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मी विजयी व अमर असावें' असा वर दिल्यास मी इंद्राची सुटका करीन असे मेघनादाने म्हणतांच ब्रह्मदेवानें तथास्तु म्हटले, आणि इंद्रास सोडवून आणून त्यास त्याच्या पदावर स्थापिले. त्या दिवसापासून मेघनादास इंद्रजित असें नाव पडले. (वा. रा उत्तर. स. २९-३०)

मारुती सीताशुध्दीसाठी अशोक वनांत आला, त्यावेळी त्यानें रावणाचें असंख्य सैन्य मारलें. तेव्हा इंद्रजितानें मारुतीला ब्रह्मास्त्राने बध्द करुन रावणाकडे नेलें. ( वा. रा. सुंदर. स ४२)

सीताशुध्दी करुन, मारुती किष्किंधेस परत गेल्यावर वानरसेनेसहित रामचंद्र लंकेस आले असतां रावणाशी युध्दप्रसंग उपस्थित होऊन, प्रथम दिवशी इंद्रजित हाच युध्दास उभा राहिला. त्याने अंगद वगैरेशी अनिवार युध्द करुन रामलक्ष्मणास व इतर वानरांस नागपाशाने बध्द करुन मूर्च्छित केले व तो लंकेस परत गेला. ( बा. रा. बुध्द. स. ४५)

पुंढे देंवातक नरांतकादि रावणपुत्र तसाच कुंभकर्ण महापर्श्व आणि महोदर हे युध्दांत मरण पावल्यावर रावणास अतिशय दुःख झाले, त्या काळी हा त्याचें सात्वन करुन युध्दास निघाला तो प्रथम निकुंभिलेस जाऊन, तेथें यांने आपली शस्त्रःस्त्रें अभिमंत्रित केली. नंतर युध्दभूमीवर येऊन अद्वितीय पराक्रम गाजवून सदुसष्ट कोटि वानर एका प्रहारांत मारुन, रामलक्ष्मणांसहि मूर्च्छित करुन हा लंकेस रावणाकडे हर्षाने परतला. (वाल्मिकी रामायण युध्द स.७३)

नंतर मकराक्ष युध्दास जाऊन तोही मरण पावला. तेव्हां रावणानें यास पुनः युध्दास पाठविलें. त्याकाळी हा नित्याप्रमाणें निकुंभिलेस जाऊन, रथांत बसून, रामसैन्यावर आला, व त्यास यानें अतिशय पीडा दिली, तिच्या योगानें ते सर्व व्यथित आहेत, तो यानें मायीक सीता निर्माण करुन, व ती मुखानें 'राम राम' असा दीन शब्द करीत आपल्या रथांत आहे, असे सर्वांस दाखवून ते पाहत असतां, तिचा वध केला व तो लंकेस परत गेला. तें कृत्य सुग्रीवादिकांस सत्यच वाटून ते शोकाकुलित झाले. पण बिभीषणानें खरा प्रकार सांगून त्यांचे समाधान केलें. (वा. रा. युध्द. स.७३).

इंद्रजित निकुंभिलेस गेला, आणि ब्रह्मदत्तवराप्रमाणें, तेथे त्याने हवन आरंभिले. त्यांत कोणाचा प्रवेश होऊन त्यास विघ्न होऊं नये, अशी व्यवस्था त्यानें जागोजाग राक्षसांची मंडले स्थापून केली होती. पण ते वृत्त बिभीषणास कळले, म्हणून त्यानें रामाची आज्ञा घेऊन, मोठया वानर समुदायासहित लक्ष्मणास त्या यज्ञाचा विध्वंस करण्याकरिता पाठविले. त्याप्रमाणें वानरसेनेने आसमंताद्भागी संरक्षणास असलेल्या सर्व राक्षसांस मारुन यज्ञाचा भंग केला. तथापि याचा यज्ञ पूर्ण होत आला होता, म्हणून यानें इतका नाश झाला तरी तिकडे लक्ष दिले नाही. परंतु वानरांनी त्याच्या शरीरावर अनेक प्रहार करुन, अग्नीही पाषाणादिकांच्या वृष्टीनें छिन्न केला. तेव्हा इंद्रजित निरुपाय होऊन, क्रोधाने उठला, व वानरांस मारुं लागला, आणि बहुतांस पीडित करुन, त्याचा तेथे एक अद्दश्य होण्याचा वटवृक्ष होता, तिकडे तो जाऊं लागला; परंतु बिभीषणाच्या सांगण्यावरुन वानरांनी त्याला तिकडे जाऊं दिले नाही. त्यामुळें तो चिडून जाऊन युध्दाला उभा राहिला. इतक्यांत लक्ष्मण पुढें होऊन, त्यानें याशी युध्द आरंभिले, त्यांत लक्ष्मणानें प्रथमतः याचा सारथि मारिला. इतर प्रमुख वानरांनी याच्या रथाचे घोडे मारिले. इंद्रजित हा दुसऱ्या रथांत बसून आला व त्यानें क्रोधाने लक्ष्मणावर शक्ति सोडिली, ती लक्ष्मणानें मध्येंच छेदिली. लगेच दुसरी यमदत्त शक्ति त्यानें त्यावर टाकिली; तिचाहि लक्ष्मणानें छेद केला. लक्ष्मणाचे व त्याचे तीन अहोरात्रे भयंकर युध्द झाले. शेवटी इंद्रजीत मरत नाही असे पाहून लक्ष्मणानें ऐद्रास्त्र हातांत घेतलें, आणि प्रतिज्ञा केली की, जर श्रीराम, धर्मात्मा आणि सत्यप्रतिज्ञ असेल, तर या बाणाने इंद्रजित मरण पावो, असें म्हणून तो त्यावर सोडताच त्यांचे किरीट. कुंडलयुक्त मस्तक तात्काळ तुटून पृथ्वीवर पडले. (भारवन. अ.२८८-२८९). ते पाहताच देवांस व महर्षीस आनंद होऊन, त्यांनी लक्ष्मणावर पुष्पवृष्टि केली. इंद्रजिताचें मस्तक रामास दाखविण्याकरितां वानरांनी सुवेलाचली नेले. (वा. रा. युध्द स.८६-९२). इंद्रजितास सुलोचना या नांवाची स्त्री होती. ही स्त्री अतिशय पतिव्रता होती. हिनें रामाकडून ते मस्तक परत आणले व त्यासह ती सती गेली.

   

खंड ८ : आफ्रिका ते इक्ष्चाकु  

  आफ्रिका

  आफ्रिडा

  आंब

  आबई
  आंबगांव, जमीनदारी
  आंबगाव, तहशिल
  आंबगांव, परगणा
  आंबगांव
  आबदारखानां
  आंबरण
  आंबा
  आबाजी कृष्ण शेलूकर
  आबाजी विश्वनाथ प्रभू
  आबाजी सोनदेव
  आंबेगांव
  आब्ब्वादीद
  आब्बास
  आवास अल्ली
  आब्बास बिन-अल्ली शिखानी
  आब्बास मिर्झा
  आब्बासीद
  आभीर
  आमगांव
  ऑमडरमन
  आमला
  आमलीयार
  आमातिसार
  आमारा
  आमांश
  आमील
  आमोद
  आमोनिया
  आयटन
  आयर्टन्, विलिअम् एडवर्डस्
  आयर्लंड
  आयर्व्हिंग वाशिंग्टन
  आयर्व्हिंग सर हेनरी
  आयर्व्हिन विल्यम
  आयला भास्कर
  आयव्हरी कोस्ट
  आयसिंग्लास
  आयसौरिआ
  आयस्लंड
  आयान
  आयावेज
  आयु
  आयुर्वेद
  आयेषा
  आयोडीन
  आयोनियन तत्त्वज्ञान
  आयोनियन बेटें
  आयोनियन लोक
  आयोनिया
  आरंग
  आरण्यकें
  आरमार
  आरमोरी
  आरल
  आरसा
  आरसिबिडी
  आराकान
  आराध्य ब्राह्मण
  आरामबाग
  आराराट
  आरारूट
  आरास
  आरिओस्टो
  आरिस्टाटल
  आरिस्टोफिनिज
  आरू द्वीपसमूह
  आरे
  ऑरेंज शहर
  ऑरेंज घराणें
  ऑरेंज नदी
  ऑरेंजफ्रीस्टेट
  आरोग्यविज्ञान शास्त्र
  आर्कलगूड
  आर्केंजल
  आर्कोनम्
  आर्ड्रे
  आर्ताल
  आर्निका
  आर्मगांव
  आर्मूर, तालुका
  आर्मेंटेरिस
  आर्मेनिया
  आर्य
  आर्य (जात)
  आर्यक
  आर्यदीक्षित
  आर्यन्
  आर्यन
  आर्यप्पत्तर
  आर्यभट
  आर्यरक्षित
  आर्यवैद्यक
  आर्यशूर
  आर्यसमाज
  आर्यावर्त
  आर्लेकट्टी
  आर्लेश्वर
  आर्वी
  आर्ष्टिषेण
  आर्सीकेरे
  आर्सेनिक
  आलकरी
  आलंड बेटें
  आलबाका
  आलमपूर
  आलवखाव
  आलवार तिरुनगरी
  आलसेस-लारेन
  आलाजुएला
  आलिंथस
  ऑलिंपस
  ऑलिंपिआ
  ऑलिव्ह
  ऑलिव्हज टेकडी
  ऑलिस
  आलुप
  आलूर
  आलें (सुंठ)
  आलेवाही
  आल्फ्रेड दि ग्रेट
  आल्बर्ट
  आल्व्हा फरनॅन्डो आव्हॅरझ डी टोलेरा-डयुक
  आवण
  आवंतीभाषा
  आंवळी
  आवाळू
  आविक्षित
  आव्हा
  आशिया
  आशिया मायनर
  आशौच
  आश्रम
  आश्वलायन
  आसड
  आसंदी
  आसन
  आसस
  आसाम
  आसुंदी
  आसेगांव
  आस्का
  आस्काबाद
  ऑस्टरलीइझ
  ऑस्टिन जॉन
  आस्टिन जेन
  ऑस्टिया
  ऑस्टेंड
  ऑस्टेंड कंपनी
  आस्ट्राखान
  ऑस्ट्रिया
  आस्ट्रिया हंगेरी
  ऑस्ट्रेलिया
  आस्ट्रेलेशिया
  आस्तीक
  आस्बोर्न
  आस्त्रोनि
  आहवनीय
  आहवमल्ल
  आहाव
  आहिताग्नि
  आहोम
  आळंद
  आळंदी
  आळवार
 
  इकबालखान
  इक्केरी
  इक्वेडोर
  इगतपुरी
  इंगर
  इंगरसॉल, रॉबर्टग्रीन
  इंगलगुंडी
  इगलास
  इंगलेश्वर
  इंग्रजी वाङ्मय
  इंग्लंड
  इंग्लिश कायदेपध्दति
  इंग्लिश बाजार
  इचलकरंजी
  इच्छापुरम
  इच्छामती
  इच्छावर
  इंजाराम
  इंझवार
  इझावा
  इंटरलेकन
  इटली
  इटालियन वाङमय
  इटा
  इटारसी
  इटावा
  इटैयापुरम
  इटो, हिरोबुमी प्रिन्स
  इडमिडे
  इडा किंवा इला
  इडास
  इडाहो
  इंडियन
  इंडियन टेरिटरी
  इंडियन रिझरव्हेशन
  इंडियाना
  इडुमिया
  इंडोचीन (फ्रेंच)
  इतखेड
  इतवाद
  इतिमादपूर
  इतिहासशास्त्र
  इत्रिया-गधाला
  इत्सिंग
  इंथ लोक
  इथिओपिया
  इथिल (एथिल)
  इथिल अल्कहल
  इथिलिन (क२उ४)
  इंदरपत
  इंदापूर
  इंदाव
  इंदावग्यी
  इंदिन
  इंदी
  इंदूर संस्थान
  इंदूर सेसिडेन्सी
  इदैयन
  इन्दोरी
  इन्द्र
  इंद्रकील
  इंद्रगिरी किल्ला
  इंद्रजव
  इंद्रजित
  इंद्रद्युम्न
  इंद्रधनुष्य
  इंद्रनंदिन
  इंद्रप्रस्थ
  इंद्रभूति
  इंद्राणी
  इंद्रावणी
  इंद्रावती नदी
  इंद्रियविज्ञानशास्त्र
  इद्रिसा
  इंद्रोतःशौनक
  इध्मजिव्ह
  इध्मवाह
  इनाम
  इंपे, सर एलिजा
  इंफाल
  इन्फल्युएंझा
  इन्व्हर्नेस
  इन्व्हररी
  इन्सीन
  इब नदी
  इबादी पंथ
  इब्न गॅबिरोल
  इब्नतुफैल
  इब्नबतूता
  इब्न हझम
  इब्राहिम कुतुब्शहा
  इब्राहिमखान गारदी
  इब्राहिम शाहा
  इब्रो नदी
  इब्लिस
  इमर्सन राल्फवाल्डो
  इमादशाही
  इमाम
  इरकद
  इरलिग
  इराक
  इराण
  इरावती
  इरावती नदी
  इरावान
  इरावती विभाग
  इरिंजालकुड
  इरिट्रिआ
  इरुल
  इरेक
  इर्कुटस्क
  इलकल
  इलयतु
  इलाम
  इलाम बाझार
  इलावृत्त
  इलिअट्
  इलियान
  इलियड
  इलियाटिक पंथ
  इलीरिया
  इलुबन
  इलेश्र्वरोपाध्याय
  इल्वल
  इव्हँगोरॉड
  इसब
  इसबगोल
  इसाखेल
  इसागड
  इसिस
  इस्टर
  इस्टालिफ
  इष्टुर फांकडा
  इस्पहान
  इस्माइल हाजी मौलवी-महंमद
  इस्मालिया
  इस्त्रायल राष्ट्रधर्म
  इस्लाम नगर
  इस्लामपूर
  इस्लामाबाद
  इक्ष्वाकु
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .